आज सकाळी आम्ही एकुण ८ कुटुंबियांनी दुपारी जेवायला नव्याने सुरू झालेल्या व वॉसप वर प्रचार झालेल्या 'मेतकूट' या मराठमोळ्या उपाहारगृहात जाण्याचे ठरवले. रविवार आहे हे लक्षात घेता आरक्षणासाठी संपर्क साधला तेव्हा दुपारी १२.३० ते १.४५ या वेळत उपाहारगृह पूर्णतः आरक्षित झाले असल्याचे समजले. आम्ही ८ जणांसाठी दुपारी २ वाजताची चौकशी केली व फोनवर श्री सनी पावसकर यांनी आमची वेळ निश्चित केली.
दुपारी १.५५ ला आम्ही पोचलो असता बाहेर बरेच लोक ताटकळताना दिसले. आरक्षण आगाउच केल्याने आम्ही निर्धास्त होतो. आत शिरताच मी नाव व आरक्षणाविषयी सांगताच व्यवस्थापकाने आवंढा गिळला. त्याने हातातील कागदावर लिहिलेल्या प्रतिक्षा यादीत माझे नाव टाकताच मी त्याला आरक्षणाचे स्मरण करुन दिले. पाचेक मिनिटात जागा होईलच असे त्याने आश्वासन दिले व कोपर्यतले मोठे टेबल दाखवुन हे रिकामे झाल्यावर तुम्हालाच देणार आहोत असे संगितले.
२.३० झाले तरी काही हालचाल नाही. चौकशी केली असता. होइलच इतक्यात असे मोघम उत्तर मिळाले. आता इतका उशीर केला आहात, आत आल्यावर जेवण संपले असे सांगु नका असे म्हणताच काळजी नको, पोटभर जेवा असे आश्वासन मिळाले. अखेर २.४५ ला प्रवेश मिळाला. ८ जणांना दोन जागी विभागुन बसावं लागलं. तसच बसवायचं होतं तर आधीच बोलवायचं होतं! असो. गर्दी आहे तर बसू वेग़ळे म्हणुन आम्ही सोडुन दिले. वास्तविक शेजारचे टेबल दुसर्या कुटुंबाला देण्याऐवजी आम्हाला जोडुन देता आले असते, पण कुणाला पडली नव्हती. अखेर दहा मिनिटे वाट पाहुन वेटरला मेनू कार्डाची विचारणा केल्यावर चौघात एक दिले गेले. आम्ही थाळी मागवणार होतो, पण अन्य वेळेस आले तर काय मिळते ते पाहायचे होते. वेटरला ऑर्डर देताच त्याने थाळी संपल्याचे सांगितले. संतप्त होऊन व्यवस्थापकाला जाब विचारला असता हो संपली असे उत्तर मिळाले.
आम्ही बाहेर पडायचे ठरवले. कुणाला काही पडली नव्हती. बाहेर श्री सनी पावसकर यांना "आमचे आरक्षण असतानाही पाऊण तास रखडवलत आणि आता जेवण संपलय असे सांगता?" असे विचारले असता त्यांनी कसलीही दिलगिरी व्यक्त न करता ' आ ला कार्टे मागवा असे मग्रूर उत्तर दिले. जेवण संपले याचा सरळ अर्थ पोळी, भाजी, वरण, भात हे पदार्थ निश्चितच उपलब्ध नव्हते. मग भर दुपारी आम्ही जेवणा ऐवजी काय वडे, भजी, आळुवड्या, थालिपिठ खावे? आम्ही पैसे मोजुन आपल्या आवडीचे जेवायला अलो होतो, उपाहारगृहातले उरले सुरले संपवायला आलो नव्हतो. नाराजी व्यक्त करुन बाहेर पडत असता श्री सनी पावसकर यांच्याशी बोलत असलेल्या बाई त्यांना म्हणाल्या, 'आपण तर यांना टेबल तर दिले होते"
म्हणजे केलेली मेहेरबानी ऩ जाणणारे गिर्हाइकच वाईट.
एकुण "उघडुन चार दिवस नाही लागले तर कशी दारात लाईन लागली" असा आविर्भाव दिसुन आला.
बाहेर पडलो आणि राम मारुती रस्त्यावरील शिव सागर मध्ये गेलो. उत्तम स्वागत झाले, उत्तम जेवण मिळाले. चार वाजुन गेल्यावर म्हणजे बंद करायची वेळ झाली असताना सुद्धा अखेरपर्यंत तत्पर सेवा मिळाली, कसलीही घाई केली गेली नाही. नाइलाजाने असे वाटले की त्या मेतकूटवाल्यास जाऊन सांगावे की बाबारे, हॉटेल कसं चालवायचं, ग्राहकाशी कसं वागायचं हे शिकायला इथे काही दिवस नोकरी कर आणि मग हॉटेल उघड.
मिपाकरांनो, पैसे द्यायची तयारी असतानाही जर गैरसोय, मनस्ताप व अपमान सहन करायचा असेल तर घंटाळी, ठाणे येथे सुरू झालेल्या 'मेतकूट' ला अवश्य भेट द्या.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
72589
प्रतिक्रिया
233
मिसळपाव
प्रतिक्रिया
zomato, burrp या साईटस वर हा
@zomato, burrp या साईटस वर हा
In reply to zomato, burrp या साईटस वर हा by परिंदा
नक्की कराच हे
In reply to zomato, burrp या साईटस वर हा by परिंदा
जरुर प्रसिद्धी द्या याला !
In reply to zomato, burrp या साईटस वर हा by परिंदा
आज साऊथ इंडिजला आरक्शन न
परिन्दा
यान्चे म्हणणे ऐका. zomato,
In reply to परिन्दा by रघुपती.राज
नक्कीच रिव्ह्यु टाका
In reply to यान्चे म्हणणे ऐका. zomato, by गवि
बापरे..
माझे मत थोडेसे वेगळे आहे.
अजिबात सहमत नाही.
In reply to माझे मत थोडेसे वेगळे आहे. by धर्मराजमुटके
किमान स्~ओरी तरी म्हणायला पाहिजे
In reply to अजिबात सहमत नाही. by आदूबाळ
१००% असहमत.
In reply to माझे मत थोडेसे वेगळे आहे. by धर्मराजमुटके
++++१
In reply to १००% असहमत. by कॅप्टन जॅक स्पॅरो
पूर्णतः असहमत.
In reply to माझे मत थोडेसे वेगळे आहे. by धर्मराजमुटके
प्रश्न वृत्तिचा आहे
In reply to माझे मत थोडेसे वेगळे आहे. by धर्मराजमुटके
विठ्ठल कामतांचे इडली
In reply to प्रश्न वृत्तिचा आहे by सर्वसाक्षी
सहमत
In reply to विठ्ठल कामतांचे इडली by कपिलमुनी
करेक्ट
In reply to सहमत by आजानुकर्ण
होय.
In reply to विठ्ठल कामतांचे इडली by कपिलमुनी
अगदी!
In reply to होय. by vikramaditya
विठ्ठल कामत..
In reply to होय. by vikramaditya
भाराभर शाखा / फ्रँचायजी काढून
In reply to विठ्ठल कामत.. by योगी९००
+१०००
In reply to भाराभर शाखा / फ्रँचायजी काढून by गवि
+१.....
In reply to भाराभर शाखा / फ्रँचायजी काढून by गवि
अतिथी देवो भवः
In reply to प्रश्न वृत्तिचा आहे by सर्वसाक्षी
तुमच्या प्रतिसादाची वाट बघत होतो....
In reply to अतिथी देवो भवः by प्रभाकर पेठकर
+१
In reply to तुमच्या प्रतिसादाची वाट बघत होतो.... by मुक्त विहारि
सूडबुद्धी ने नव्हे, पण
In reply to +१ by नगरीनिरंजन
सहमत.
In reply to सूडबुद्धी ने नव्हे, पण by फारएन्ड
व्हॉट्सअॅपसारख्या ठिकाणी
In reply to सहमत. by बॅटमॅन
संतुलितऐवजी वस्तुनिष्ठ वाचावे
In reply to व्हॉट्सअॅपसारख्या ठिकाणी by नगरीनिरंजन
प्रतिसाद आवडला
In reply to अतिथी देवो भवः by प्रभाकर पेठकर
दोन ध टोक
In reply to अतिथी देवो भवः by प्रभाकर पेठकर
पेठकर काकांचा प्रतिसाद आवडला. +१
In reply to दोन ध टोक by टवाळ कार्टा
"सार्थ अभिमान" आणि "माज"
In reply to पेठकर काकांचा प्रतिसाद आवडला. +१ by नाखु
सार्थ माज.
In reply to "सार्थ अभिमान" आणि "माज" by टवाळ कार्टा
त्यांच्याच ...
In reply to "सार्थ अभिमान" आणि "माज" by टवाळ कार्टा
"चकली संपली, परत येणार नाही",
In reply to "सार्थ अभिमान" आणि "माज" by टवाळ कार्टा
तोंडी दुरुत्तरे
In reply to "चकली संपली, परत येणार नाही", by आदूबाळ
मी चितळ्यांची फ्यान नाही पण
In reply to तोंडी दुरुत्तरे by कपिलमुनी
सहमत
In reply to अतिथी देवो भवः by प्रभाकर पेठकर
हं !
In reply to अतिथी देवो भवः by प्रभाकर पेठकर
पेठकर साहेब
In reply to अतिथी देवो भवः by प्रभाकर पेठकर
संधी द्यावी.
In reply to पेठकर साहेब by सुबोध खरे
धन्यवाद
In reply to अतिथी देवो भवः by प्रभाकर पेठकर
सहमत.
In reply to धन्यवाद by सर्वसाक्षी
परत जाणारच नाही तर वारंवार
In reply to अतिथी देवो भवः by प्रभाकर पेठकर
पूर्ण असहमत... त्यांनी २.४५
In reply to माझे मत थोडेसे वेगळे आहे. by धर्मराजमुटके
मराठी माणसाने हॉटेल सारख्या
धर्मराज साहेब
अगदी अस्साच अनुभव
फारच वाईट अनुभव आणि ते एका
च्यायला
गोखले बद्दल असहमत
In reply to च्यायला by अत्रन्गि पाउस
..गोखले..हॅ हॅ हॅ..
In reply to गोखले बद्दल असहमत by वेल्लाभट
हे कसले मेतकूट हे तर रद्दडकूट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Beatbox brilliance | Tom Thum | TEDxSydneyघरीच मऊ भात करून त्यावर तूप
+ १....
In reply to घरीच मऊ भात करून त्यावर तूप by चित्रगुप्त
.
In reply to घरीच मऊ भात करून त्यावर तूप by चित्रगुप्त
अश्या माजोरड्या लोकांना धडा
त्यापेक्षा संबंधित व्यक्तीला
In reply to अश्या माजोरड्या लोकांना धडा by निनाद मुक्काम …
तुमचा अनुभव वाचून आठवले.
हॉटेलचं नाव द्या हो. निदान
In reply to तुमचा अनुभव वाचून आठवले. by रेवती
पुणे सातारा रस्त्यावरील
In reply to हॉटेलचं नाव द्या हो. निदान by काळा पहाड
जेव्हा हॉटेल उघडलं (साधारण
In reply to पुणे सातारा रस्त्यावरील by रेवती
हां, तेच म्हणते, शिवाय
In reply to जेव्हा हॉटेल उघडलं (साधारण by काळा पहाड
बासुरी
In reply to पुणे सातारा रस्त्यावरील by रेवती
अहो आधी बरं होतं म्हणून तिकडे
In reply to बासुरी by कपिलमुनी
अरेच्च्या....
In reply to पुणे सातारा रस्त्यावरील by रेवती
त्या उ. गृहात पूर्वी दिवसभर
In reply to अरेच्च्या.... by सविता००१
बिबवेवाडे चौकात "नवरत्न"
In reply to त्या उ. गृहात पूर्वी दिवसभर by रेवती
ओके, धन्यवाद जयंतकाका.
In reply to बिबवेवाडे चौकात "नवरत्न" by जयंत कुलकर्णी
'मथुरा'
In reply to बिबवेवाडे चौकात "नवरत्न" by जयंत कुलकर्णी
थंडगार दोसा पुढ्यात आला.
In reply to तुमचा अनुभव वाचून आठवले. by रेवती
सवाई गंधर्व महोत्सवात जे
In reply to थंडगार दोसा पुढ्यात आला. by गवि
गवि, विनोदी आहात. अत्यंत
In reply to थंडगार दोसा पुढ्यात आला. by गवि
..उलट मीही तेच म्हणतोय.
In reply to गवि, विनोदी आहात. अत्यंत by रेवती
कॅफे मद्रास - माटुंगा. गरमगरम
In reply to थंडगार दोसा पुढ्यात आला. by गवि
तिथली रसम इडली तर वाह!!!!!!!!
In reply to कॅफे मद्रास - माटुंगा. गरमगरम by बोका-ए-आझम
तुळशीबागेमधलं "अगत्य" किंवा
In reply to तुमचा अनुभव वाचून आठवले. by रेवती
अ-क्षय?
In reply to तुळशीबागेमधलं "अगत्य" किंवा by कॅप्टन जॅक स्पॅरो
माझ्या आईनी त्याला बरचं काही
In reply to अ-क्षय? by सुनील
नाही नाही. वर नाव दिलय.
In reply to तुळशीबागेमधलं "अगत्य" किंवा by कॅप्टन जॅक स्पॅरो
तुळशीबागेत
In reply to तुळशीबागेमधलं "अगत्य" किंवा by कॅप्टन जॅक स्पॅरो
अरे!! माझा थायी हॉटेलवाला वेळ
एक शिक्षा
इथे एवढी गर्दी आहे म्हणजे
केलंय. छान आहे.
In reply to इथे एवढी गर्दी आहे म्हणजे by नित्य नुतन
फेब्रुवारी-मार्चमध्ये मी सलग
In reply to इथे एवढी गर्दी आहे म्हणजे by नित्य नुतन