Skip to main content

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 15/01/2015 03:24 या दिवशी प्रकाशित केले.
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

वाचने 367574
प्रतिक्रिया 1423

प्रतिक्रिया

In reply to by टवाळ कार्टा

त्या दुसर्या धाग्यावर अजुन आहे तो...इथे असायला काय प्रॉब्लेम मग?

In reply to by मुक्त विहारि

सकाळीच अभ्यारावांन्नी बन्नेर दाखवला होता , तो इथे अपडेट करणार आहे .... :) त्यांनी तो आधीच वर प्रकाशित केला आहे तो इथे मुव्ह कराना संपादक काका ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

१००० वा किंवा १००१ वा किंवा ११११ वा "बुच लावणारा" प्रतिसाद लिहायला संपादकांमधे सुध्धा काम्पिटिशन असेल काय? ;)

In reply to by पैसा

मुविशेख - बगळ्यांची माळफुले...अजुनी वाळवंटात बाजूला बसलेला काय बोलतोय ते त्यालाच ठौक :(

In reply to by टवाळ कार्टा

अर्रेच्चा "बगळ्यांची माळफुले" च्या ऐवजी मुविशेख - उंटांची माळफुले...अजुनी वाळवंटात असे हवे

ह्या अपेक्षा सरसकट सगळ्याच शिक्षण-नोकरी गटातल्या मुलींच्या असतात की विंजेनर-यम्बिये गटातल्या महानगरी नोकरीवाल्या मुलींच्या असतात हे जाणून घ्यायला आवडेल. आयटीवाल्या बव्हंशी मुलींना आपल्या मैत्रिणींमध्ये मिरवता येऊ शकणारा( मुलांनाही तशीच मुलगी पाहिजे असते म्हणा), स्वतःचा किमान १ बीहेच्चके असलेला,चार चाकी( न्यानो-आल्टो सारखे गरीबांचे मॉडेल्स नको) असणारा, अमुकपेक्षा जास्तच प्याकेज अससणाराच हवा असतो. बरं, ह्यांचे बाहेरच्या जगाविषयी पराकोटीचे अज्ञान असते. व्यासंग म्हणून नाही, डोक्याला खाद्य देण्याची इच्छा नाही, बिग बॉस च्या घरातली भांडणे हापिसात आणणार. (हापिसात सतत ह्यांची पिरपिर,निराळ्याच जगात असणारा वावर नि अपेक्षांची क्यासेट ऐकून डोके भंजाळले नि आयटी क्षेत्राला कायमचा रामराम ठोकला. ) प्रेमविवाहात पण प्रॅक्टिकलपणा आला आहे. मुली, नि मुलेही, आंधळेपणाने प्रेमात पडत नाही. मुली सहसा आपल्याच हापिसातला, प्रोजेक्टमधला, काही वर्षे सिनिअर असलेल्या, शक्यतो जातीतल्या मुलाच्या प्रेमात पडतात आणि लग्नही करतात. घरचेही मुलगा नाकारण्यासारखा नाही म्हणून मंजूरी देतात. ह्यात एक विनोदी प्रकार पाहिलाय. तो म्हणजे हुंडावाल्या जातीतली मुलगी असेल तर कित्येक पालक 'बरं झालं, हुंड्याचा खर्च वाचला.' हादेखील विचार करताना पाहिले आहे. ते विरोध करतच नाही. कॉलेजमधले प्रेमप्रकरण कॉलेजमध्येच सोडून कंपनीत नवी इनिंग सुरु करणार्‍या मुली परिचयाच्या आहेत. मुलींची संख्या तशीही कमी असल्याने पोरं पोरगी गळ्यात पडतेय तर पडू देत म्हणत नकार काही देत नाही.त्यांचे मुलींच्या बाबतीत एकंदर धोरण 'आन्देव' प्रकारात मोडत असते. ( पण ज्याची गर्लफ्रेन्ड सोडून गेलेली असते त्याला पुन्हा बरी मुलगी शोधायला फार कष्ट पडतात.) म्हणून माझ्या ज्या मैत्रिणींनी कॉलेजात ज्याच्या प्रेमात पडल्या त्याच मुलाशी लग्न केले, त्यांच्याविषयी प्रचंड आदर आहे. कोणापाशीही फ्लॅट नाही, कार नाही, पण एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे, नात्यात मस्त अवखळपणा, खेळकरपणा आहे. हे सगळे अर्थातच आयटीत जॉब असणारे आहेत. फ्लॅट-गाडी घेतील तेव्हा स्वतःच्या पैशाने घेतीलच, पण सध्या तरी मजेत आयुष्य जगत आहेत. असो. अस्मादिकांचा एक किस्सा आठवला. एका मुलीला अपेक्षा विचारल्या तेव्हा तिने मुलगा खूप पैसेवाला हवा जेणेकरून मला मनाप्रमाणे शॉपिंग करता येईल, असे सांगितले.बाकी काही अपेक्षा नाहीत. मी शॉक्ड! म्हणालो, गं पोरी, पैसा असेल पण संतोष नसेल तर काय फायदा? म्हणाली खूप पैसा असला तरच मला संतोष लाभेल.. मी म्हणालो, बरं. भेटून आनंद झाला.

In reply to by दादा पेंगट

पोग्गी कोणत्याही टायपची असो...नखरे बव्हांशी सगळ्यांचेच असतात...बदल असतो ते फक्त नखरे कधी करायचे त्या टायमिंगचा

In reply to by टवाळ कार्टा

अंमळ वैयक्तिक टिप्पणी झालीय इथे असं वाटतं. दोन्ही पार्ट्यांना अडचण नसेल तर मला काय प्राब्ळम असणारे? पण म्हटलं कमीतकमी निर्देश तरी करावा.

In reply to by टवाळ कार्टा

तेही बरोबरच म्हणा. दिल पे लेनेका अधिकार एकाच साईडला दिलेला आहे.

In reply to by बॅटमॅन

तसे नै...मुद्दलात दिलच एका साईडला अस्ते असे सांगतात सग्ळ्यांना

In reply to by टवाळ कार्टा

टका खरा खिलाडू आहे! @बॅट्या, वैयक्तिक वाटलं तरी ते तुमच्यासारख्या सगळ्या मुलांसाठी आहे. इथे पीसीसमोर बसून काथ्या कुटत बसलात तर कठीण आहे. आमच्यासाठी एकमेकांना भेटायच्या बर्‍याच जागा असायच्या आणि वेळ पण. कारण कॉम्प्युटरांनी जग व्यापलं नव्हतं. तात्पर्य काय, उत्तिष्ठ, जाग्रत आणि बाहेर पडा! पीसीसमोर बसून वेळ काढलात तर खर्‍या जगातल्या लग्नाच्या मुली तुमची वाट बघत थांबणार नाहीत. मुली बघून लग्न करायचं असेल तर २/४ भेटीत मग स्वभाव कळत नाही, "क्लिक" होत नाही असं काही काही चालवून घ्यावं लागेल. मुदलात मुलींचे नखरेच असतात अशा विचाराने मुलींकडे पाहिलंत तर चांगल्या गोष्टी समोर असल्या तरी लक्षात येणार नाहीत.

In reply to by पैसा

पैसा तै...ठ्याम्क़ू :) रच्याकने...माझ्या कॉलेजात आणि आत्तापर्यंतच्या सगळी कम्पन्यांत एकही "सिंगल" पाखरु नव्हते....बाहेर लग्नांत वगैरे असतात पण तिथे मोठे पण आम्च्यावर नजर ठेउन अस्तात...मॉल मधे कोणी दिसली तर बोलण्याची सुरवात कशी करायची ते सांगता का

In reply to by टवाळ कार्टा

मुलीला पाखरू समजून बोलायला गेलास तर ती बिथरलीच म्हणून समजा! बाकी सल्ले प्रगोच्या लेखाचा दुसरा हप्ता आला की मिळतील! फिल्मी स्टैलने अ‍ॅप्रोच करायचं असेल तर चष्मेबद्दूर मधला अमिताभ आणि रेखाचा सीन बघा! =))

In reply to by टवाळ कार्टा

मॉलमधे ओळख करून घ्यायचं काम अगदीच सोप्पंय. ती मुलगी जी वस्तू खरेदी करायला बघत असेल त्याच वस्तूबद्दल तिला प्रश्न विचारावेत आणि आपल्याला खरेदी करायला मदत कर म्हणून सांगावे. मुलींच्या वस्तू असतील तर बहिणीला भेट द्यायची आहे किंवा बहिणीने, आईने आणायला सांगितलंय म्हण. जास्त इंप्रेशन पडेल!

In reply to by टवाळ कार्टा

गेला तो जमाना
अरे अरे टका.. आमी आता लगीन झाल्यामुळे असे म्हणालो तर एकवेळ ठिक आहे रे. तूला काय झालं ?

In reply to by हाडक्या

हे सग्ळे कॉलेजात जात असतानाच जुने झालेले पर्याय आहेत आणि याचे कंफरमेशन सुध्धा कॉलेजातल्याच मैत्रिणींने दिलेले होते

In reply to by पैसा

ऑनलैन आणि ऑफलैन आयुष्यं एकच नव्हेत हो. सल्ल्याबद्दल धन्यवाद पण डोंट अझ्यूम टू मच हा त्यावर सल्ला आहे.

In reply to by बॅटमॅन

सल्ल्याबद्दल थ्यांकू बर्का! तुम्हाला असल्या सल्ल्यांची गरज नै हे विसरलेच होते. बरं, तुमचं नाव त्यातून कट करून टाका! क्षमस्व!

In reply to by बॅटमॅन

गेल्या जन्मी मास्तर होता काय रे हा ब्याट्या ? सगळ्यांची प्रगती पहात बसतो ते.. ;)

In reply to by हाडक्या

असेच काही नाही हां. चांगली प्रगती असेल तर मात्र आमचे मास्तरचक्षू क्षणार्धात इ. उघडल्या जातात.

In reply to by बॅटमॅन

मास्तरचक्षू क्षणार्धात उघडल्या जातात
आणि प्रगतीला पहात बसतात .. होय ना ? लब्बाड .. :)

In reply to by दादा पेंगट

गं पोरी, पैसा असेल पण संतोष नसेल तर काय फायदा? म्हणाली खूप पैसा असला तरच मला संतोष लाभेल.
समजा मुलाचंच नाव संतोष असेल तर या प्रयोगाच्या निकालात काही फरक पडू शकेल काय?

आता कोणी नाही आले तर ८५० पर्यंत एकटा लढण्याची मी हातातला चहाचा कप खाली ठेवून प्रतिज्ञा घेतो. जोवर ८५० होत नाहीत तोवर मी चहा पिणार नाही.. (विजा कडकडल्याची स्माईली कल्पावी)

In reply to by हाडक्या

चला मी जेवण सोडलं. (उद्या दुपारपर्यंत ८५० न झाल्यास फेरविचार करण्यात येईल.)

In reply to by यसवायजी

असे जर टकाने ठरवले असेल तर, थोडा प्रतिसाद-भार मी पण लावीन...

In reply to by टवाळ कार्टा

टकोबा, नुस्ते खिक्क करु नका. पर्तिज्ञा करा, तरच काही होईल.. शिडात हवा कमी पडतेय (कसली ते विचारु नका)... ;)

In reply to by हाडक्या

अहो...खिक्क नंतर जे लिहायचे होते ते "नवीन" प्रतिसादात लिहिन ना ;)

इथे इतक्या जणांनी आपापली मते लिहिली आहेत...तरी सुध्धा स्त्रीवर्गाची इतकी कमी उपस्थिती का?

In reply to by टवाळ कार्टा

तुम्ही लोक थिअर्‍या पक्क्या करा. त्या तोपर्यंत प्रॅक्टिकल संपवून गेल्या!

In reply to by टवाळ कार्टा

पुढचा आकडा ठरवा... अर्थात, जे काही वाद-विवाद किंवा चर्चा आणि अनुमान निघायचे होते ते आधीच समजल्याने, आता ही शेपटी किती लांबवायची, ते आपल्याच हातात आहे. नक्की किती प्रतिसाद झाले, की धागा उघडणे बंद होते, त्याची चाचपणी करू या.

थंडावला वाटतं धागा... फिल्डींग लावली होती ना राव ८८८,९००,९९९ व१०००व्या प्रतिसादासाठी.... वाया जाणार असे दिसतेय.

In reply to by खमक्या

हे मिपाकरांचेच स्ट्रेस टेस्टींग झाले काय? ८००+ प्रतिसाद हा फक्त मिपाविक्रम आहे की यच्च्ययावत मराठी संस्थळांमधला विक्रम म्हणायचा? रच्याकने एका मराठी माणसाला दुसर्या मराठी माणसाचा धागा इतका पॉपुलर झाला याची जळजळ नसेल ना??

In reply to by टवाळ कार्टा

ये पीएस्पीओ नहीं जान्ता! कार्ट्या, मायबोली हे मराठीतलं आद्य संस्थ़ळ आहे. १९९६ पासून चालतंय.