✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

देवस्थाने आणि भटजी....

म
मुक्त विहारि यांनी
Fri, 01/23/2015 - 01:15  ·  लेख
लेख
मुळात माझे आणि देवाचे नाते फारच घट्ट. मी मागावे, हट्ट करावा आणि त्याने द्यावे, हा आमच्या दोघां मधला अलिखित नियम.देवाच्या दरबारात मध्यस्थाची गरज नसते, हा माझा अनुभव आणि आमच्यापेक्षा आमच्या बायकोचे देव जास्त ऐकतो, हा दुसरा अनुभव. आमच्या वडीलांचे आणि आईचे मात्र देवाशी फार काही पटत नाही.तसे दोघेही फिरायला वगैरे जातात, पण मुद्दाम जेजुरी किंवा आंबिजोगाईला जात नाहीत. आमचे लग्न झाले आणि लग्नाच्या वेळी समजले की, आमची बायको फार धार्मिक.(तसे लग्ना आधीच थोडी-फार कल्पना आली होती.पण लग्ना नंतर शिक्का-मोर्तब झाले.) आमचे कुलदैवत म्हणजे जेजूरी.लग्ना आधी एकदा जावून आलो होतो.पण तिथला बाजार बघून मला परत तिथे पावूल ठेवू नये, असेच वाटत होते. लग्ना नंतर परत एकदा जेजूरीला भेट द्यावी लागणार होती.बायकोचा तसा हट्ट पण होताच.लग्ना नंतर वेळ-काळ बघून मी आणि बायको, जावून आलो.तिला पण माझ्या सारखाच अनुभव (पुजार्‍यांचे पैसे काढणे) आल्याने, ती म्हणाली, "हे नक्की देवस्थान आहे की, पुजार्‍यांसाठी टांकसाळ?" असो, पुढे नौकरी बदलल्याने, चिपळूणला गेलो.सहज म्हणून गुहागरला गेलो.छान समुद्र-किनारा आणि बाजूलाच मंदिर.का कुणास ठावूक, पण मंदिरात अभिषेक करायची, मनापासून इच्छा झाली.सकाळ असल्याने मंदिरात चौकशी केली. भटजी म्हणाले,"बसा.करू या अभिषेक.आता ही बॅच संपली, की नंतर तुमचाच नंबर." मी, " अहो, पण माझ्या कडे पुजेचे सामान किंवा पीतांबर तर सोडाच.जानवे पण नाही." गुरुजी,"ते होईल हो.तुम्ही बसा तर खरे." जेजूरीचा अनुभव असल्याने, हा भटजी आता किमान ५०१/- रु. तरी काढणार्,ह्यांत शंका न्हवती. एक अर्ध्या तासातच आधीच्या मंडळींचा अभिषेक झाला, आणि आमचा नंबर लागला. गुरुजींनी मस्त पीतांबर नेसवले आणि आत गाभार्‍यात गेलो. जानवे घातले आणि मस्त साग्रसंगीत पुजा झाली. दक्षिणा विचारली. भटजी,"अभिषेक करून तुम्हाला समाधान वाटले का?" मी,"हो." भटजी,"मग तुम्हाला योग्य वाटेल ती दक्षिणा द्या.मला ५/- दिलेत तरी चालतील." योग्य ती दक्षिणा दिली आणि एकच ठरवले, परत जर कधी अभिषेक करावासा वाटला तर गुहागरलाच जायचे. डिस्क्लेमर : देव देवालयांत नसून आपल्याच मनांत असतो, ह्यावर माझा ठाम विश्र्वास असल्याने, मी शक्यतो घरच्या कुठल्याच कार्याला भटजी बोलवत नाही.आमच्या घरी सुपारीचाच गणपती असतो आणि आमच्या सत्यनारायणाला भटजीची आवश्यकता नसते."
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
तंत्र
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार

प्रतिक्रिया द्या
44950 वाचन

💬 प्रतिसाद (204)

प्रतिक्रिया

.

hitesh
Fri, 01/23/2015 - 01:47 नवीन
धर्म हा इश्वरनिर्मित नसुन मानवनिर्मित व्यवसाय आहे
  • Log in or register to post comments

बरं

प्रसाद गोडबोले
Fri, 01/23/2015 - 12:21 नवीन
आजकाल तुमच्या , नेफळे , माई वगैरे लोकांच्या प्रतिसादाचा चांगला अंदाज बांधता यायला लागला आहे मला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh

पटलं. हिंदुधर्मात अशी काही

कंजूस
Fri, 01/23/2015 - 01:48 नवीन
पटलं. हिंदुधर्मात अशी काही मतं व्यक्त करायचं आणि वेगळं वागण्याचं स्वातंत्र्यतरी आहे हेही नसे थोडके.
  • Log in or register to post comments

हिंदुधर्मात अशी काही मतं

खटपट्या
Fri, 01/23/2015 - 05:39 नवीन
हिंदुधर्मात अशी काही मतं व्यक्त करायचं आणि वेगळं वागण्याचं स्वातंत्र्यतरी आहे हेही नसे थोडके.
१००% सहमत. माझा गोरा बॉस मला विचारत होता की हींदू धर्मात असे काय आहे की तो तुला वेगळा वाटतो. मी सांगीतले की हींदू धर्म म्हणजे स्वातंत्र्य. अमकेच एक पुस्तक वाचले पाहीजे. नमाज पडलाच पाहीजे. पुजा केलीच पाहीजे असे काही नाही. कोणताही धर्मग्रंथ वाचा. कुराण वाचा, बायबल वाचा. मसजीदमधे जाउन नमाज पडा. चर्चमधे जा. काहीही खा. अगदी गोमांससुध्दा !! सर्व धर्म पाळायचे स्वातंत्र्य ज्याला आहे तो हींदू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

अगदी गोमांससुध्दा >> याबाबत

टवाळ कार्टा
Fri, 01/23/2015 - 10:45 नवीन
अगदी गोमांससुध्दा >> याबाबत साशंक पण बाकी सग्ळे बरोबर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

इंडोनेशियाच्या बाली

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 01/23/2015 - 11:09 नवीन
अगदी गोमांससुध्दा >> याबाबत साशंक पण बाकी सग्ळे बरोबर इंडोनेशियाच्या बाली प्रांतामध्ये ८०% पेक्षा जास्त जनता हिंदू आहे. तेथिल जनता गोमांस खाते, सणासुदीला तर नक्कीच (भारतात कोंबडी-मटण खाल्ले जाते तसेच). फक्त पुजारी मंडळी (ब्राच्मन) गोमांस खात नाहीत. अनेक संप्रदाय आणि चार वर्ण असले तरी त्या सर्वांत रोटीबेटी व्यवहार सहजपणे होतात. बालीत हिंदू धर्म भारतातून गेला. मात्र गेल्या काही शे वर्षांच्या इंडोनेशियाच्या मुस्लिमीकरणाच्या प्रक्रियेने ते बेट सर्व बाजूंनी मुस्लिम समाजाने वेढले गेले आणि त्याचा भारतिय हिंदू समाजाशी संपर्क तुटला होता. हा इतिहास पाहता जातीव्यवस्थेची, शाकाहाराची आणि विषेशतः गोमांस न खाण्याची रुढी सुरू होण्यापूर्वी भारतातल्या हिंदू धर्माची काय परिस्थिती असावी याचा ठोकळ अंदाज बालीवरून यावा. बाकी प्राचीन भारतिय साहित्यात गोमांस खाण्याचेच नव्हे तर यज्ञाच्या कोणत्या प्रकारच्या पुरोहितांना यज्ञात बळी दिलेल्या पशूंचा (यात गायीबैलही होते) कोणता भाग द्यावा याचेही नियम नमूद केलेले आहेत. अवांतर : अर्थातच, मांस / गोमांस खावे की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आणि हक्क आहे हे नि:संशय. पण त्याचा अस्मिता वगैरेसाठी उपयोग करणे हास्यास्पद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अगदी मान्य..

हाडक्या
Fri, 01/23/2015 - 15:46 नवीन
अगदी मान्य.. फार काय पण आपल्याच देशात at least केरळमध्ये तरी कित्येक हिंदू कुटुंबे आवडीने गोमांस खातात. खात्रीने सांगतोय कारण पद्मनाभन मंदीराच्या ब्राह्मण वारसदाराने बनवलेली मस्तपैकी केरला बीफ करी खाल्ली आहे. आणि इतर केरळीयांकडून हे जाणून घेतलंय की तिकडे बीफ खाणे हा मोठ्ठा मुद्दा नाहीये.
अर्थातच, मांस / गोमांस खावे की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आणि हक्क आहे हे नि:संशय. पण त्याचा अस्मिता वगैरेसाठी उपयोग करणे हास्यास्पद आहे.
याच्याशी बाडिस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

बादवे, बीफ म्हणजे गायीचेच

बॅटमॅन
Fri, 01/23/2015 - 15:49 नवीन
बादवे, बीफ म्हणजे गायीचेच असते असे नाही ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

बीफ : पूर्ण वाढ झालेल्या गाय

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 01/23/2015 - 17:06 नवीन
बीफ : पूर्ण वाढ झालेल्या गाय अथवा बैलाचे मांस. वील (Veal) : गाईच्या वासराचे मांस. कॅराबीफ (carabeef) : म्हैस अथवा रेड्याचे मांस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

वील आणि कॅराबीफ या संज्ञा

बॅटमॅन
Fri, 01/23/2015 - 17:13 नवीन
वील आणि कॅराबीफ या संज्ञा माहिती नव्हत्या. गाय-बैल व म्हैस-रेडा या चारांपैकी कुणाचेही मांस म्हणजे बॉफ असे अगोदर समजत होतो. आता उलगडा झाला. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

+१ .. हेच म्हणायला आलो होतो.

हाडक्या
Fri, 01/23/2015 - 17:19 नवीन
+१ .. हेच म्हणायला आलो होतो. बादवे, भारतात बीफ मध्ये गाईपेक्षा बैल जास्त मिळतात असे ऐकून आहे ( प्रत्यक्ष विदा नाही आणि अनुभवही नाही). गाई उपयोगी असतात म्हणून खाटकाकडे लवकर नाही पोचत. बैल आजकाल ट्रॅक्टर वगैरेमुळे लगेच पोचतात. आता बैलगाड्यांच्या शर्यती बंद झाल्या की तर Veal मध्येही त्यांचा टक्का अजून वाढेल.) पाश्चिमात्य देशात मात्र या बाबतीत "गाय-बैल समानता" आहे. :) व्यक्तिशः मी फक्त भारताबाहेर बीफ खाल्लय. भारतात बीफ न खाण्याचे कारण या प्राण्यांची निवड फक्त "अन्य उपयुक्तता संपल्यावर" आणि नकोसे झाल्यावर अशी होत असल्याने आणि बोकड अथवा कोंबडा जसा खाद्य-प्राणी म्हणून (पशु-शेती) वाढवला जातो तशी होत नसल्याने दर्जा बाबत शंकाच आहेत. बाकी मांसाहाराबाबत एक धागा हवा राव. अजून हरिण वगैरे चघळायला येतील मग.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

बाकी मांसाहाराबाबत एक धागा

प्रसाद गोडबोले
Fri, 01/23/2015 - 18:22 नवीन
बाकी मांसाहाराबाबत एक धागा हवा राव
एकदा रानडुकराची शिकार करुन बेत करावा काय हाडुकराव ;) ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

बेकायदेशीर

कपिलमुनी
Fri, 01/23/2015 - 18:32 नवीन
रानडुकराची शिकार करणे बेकायदेशीर आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

शेतात घुसलेल्या रानडुकराची

प्रसाद गोडबोले
Fri, 01/23/2015 - 18:53 नवीन
शेतात घुसलेल्या रानडुकराची शिकार करणे बेकायदेशीर नाही फक्त शिकार केरायच्या आधी पोलिसांना कळवावे की रानडुक्करे शेतात घुसुन नासाडी करीत आहेत , लोकांच्या जिवाला धोखा आहे . मग शिकार करावी . शिकार केली की वनविभागाला व्यवस्थित कळवावे , मग ते येवुन व्यवस्थित पंचनामा वगैरे करतात आणि रानडुकराला खड्डा वगैरे खणुन पुरतात आणि निघुन जातात . ते निघुन गेले की लगेच त्याला परत बाहेर काढावे आणि वजन करुन वाटण्या बिटण्या करुन पुढील बेत करावा !! असा विधी आजवर ऐकत आलो आहे , दुर्दैवाने कधी प्रत्यक्ष पहाण्याचा अनुभवण्याचा योग आलेला नाही . हमेरिकेत गेल्यावर एकदा तरी बिग गेम हंटिंग करायचा मानस आहे तिकडे इतके सव्यापसव्य करावे लागत नसावेत , स्टेट परमिट घेतले की झाले !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

एवढा सव्यपसव्य कुणी करायला

हाडक्या
Fri, 01/23/2015 - 19:19 नवीन
एवढा सव्यपसव्य कुणी करायला सांगितलाय.. ? इथे आंग्लदेशात venison (शिकारीचे मटण) मिळते जे की नेहमी हरिण असते, ते आपले घ्यावे आणि खुश रहावे. बाकी तुम्ही हे आधी कधी केलेत आणि खाल्लेत की आपले नुसतेच शब्द ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

इथे आंग्लदेशात venison

प्रसाद गोडबोले
Fri, 01/23/2015 - 19:33 नवीन
इथे आंग्लदेशात venison (शिकारीचे मटण) मिळते जे की नेहमी हरिण असते, ते आपले घ्यावे आणि खुश रहावे.
श्या: 'विकत घेवुन' खाण्यात काय मजा . शिकार ती शिकारच ;) तुर्तास नुसतेच शब्द आहेत हो ... येतो एकदा आंग्ल देशात.... मग जावुयात मृगयेला !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

शब्दच काय.. बर्र..

हाडक्या
Fri, 01/23/2015 - 20:06 नवीन
शब्दच काय.. बर्र.. :) या या .. आमाला पण मृगया करायला आवडेल हो, ती पण मृगाचीच. पण इथे रानटी हरणं मारायला बंदी आहे. पाळीव हरणांचे पदार्थ हाटिलात मिळतात. बादवे, भारतात रानडुकराच्या शिकारीबद्दल तुम्हास एवढे कसे माहीत असा प्रश्न पडलाय ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

कोकणात तर रानडुकराची शिकार

खटपट्या
Fri, 01/23/2015 - 23:15 नवीन
कोकणात तर रानडुकराची शिकार सर्रास होते. आणि पोलीसही येत नाहीत. (तसे तर बोलावल्यावरही पोलीस येत नाहीत कोकणात :) ) पोलीस येउन मेलेल्या डुकराला गाडतात हे माहीत नव्हते. कोकणातले पोलीस तर वाटा घेउन जातील :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

पोलिस गाडत नाहीत सहसा..

हाडक्या
Sat, 01/24/2015 - 18:42 नवीन
पोलिस गाडत नाहीत सहसा.. त्यांना ही लॉजिकल कल्पना अस्ते आता काय बेत असणार ते. मग बर्‍याचदा ते चिरीमिरी, वाटा किंवा मग पार्टीचा लाभ घेणे प्रेफर कवाटा, ते पण अगदीच त्यांच्यापर्यंत पोचले तर. तुमचे शेत असेल, तुमचे गाव असेल तर पोलीस पण तुमचेच असतात इकडून तिकडून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

खरं आहे... म्हटलं आहेच ना की,

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 01/23/2015 - 01:49 नवीन
खरं आहे... म्हटलं आहेच ना की, कुठे शोधिशी रामेश्वर अन् कुठे शोधिशी काशी । हृदयातिल भगवंत राहिला हृदयातून उपाशी ॥
  • Log in or register to post comments

+१.कुठे शोधिशी रामेश्वर अन्

रेवती
Fri, 01/23/2015 - 01:51 नवीन
+१. कुठे शोधिशी रामेश्वर अन् कुठे शोधिशी काशी । हृदयातिल भगवंत राहिला हृदयातून उपाशी ॥ किती वर्षांनी वाचले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

आणि हे दुसरे उदाहरण

प्रमोद देर्देकर
Fri, 01/23/2015 - 10:01 नवीन
आणि हे दुसरे उदाहरण "देव देर्‍यात नाही देव नाही देवालयी" या गाण्यातल्या या ओळी

देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना दावे देव आपणात आहे, शिर झुकवोनिया पाहे

गदिमांना अभिवादन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अगदी खरे

केदार-मिसळपाव
Fri, 01/23/2015 - 20:20 नवीन
गदिमांना अभिवादन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

होय दर्दूकाका!

रेवती
Fri, 01/23/2015 - 20:51 नवीन
होय दर्दूकाका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

आवडला आणि पटला पण . लग्न

स्रुजा
Fri, 01/23/2015 - 03:07 नवीन
आवडला आणि पटला पण . लग्न झाल्यावर आई आम्हाला घेऊन कोल्हापूर ला गेली होती , तिथे जाई पर्यंत गर्दी , उन , रजा असले विचार मनात येत होते. त्यात नवरा पक्का नास्तिक त्याच्या मते हे कर्मकांडांच स्तोम ( पण पन्हाळा बघायला म्हणून साहेब यायला तयार झाले होते ). ते एक डोक्यात नसतं टेन्शन. दुपारी १२ च्या दरम्यान पोहोचलो मंदिरात , पार्किंग ची शोधा शोध करून आत गेलो , लाईन होतीच बऱ्यापैकी . पण आमचा नंबर आला आणि आरती ची वेळ झाली. त्या दिवशी गाभाऱ्यात फक्त बायकांना प्रवेश होता आरतीच्या वेळेला , आई मी आणि बहिण असं तिघींना गुरुजी आत घेऊन गेले , आत सगळ्या बायका होत्या . आत गेलो , आरती सुरु झाली आणि तो माहोल; तो गाभारा; देवीचा मुखवटा बघून अक्षरशः तिघींचे डोळे एका च वेळी भरून आले . का ? ते अजून ही कळलं नाही पण खूप खूप समाधान वाटून गेलं . तेन्व्हापासून कोल्हापूर आवडीचं मंदिर झालं आहे. तुमच्या गुहागरच्या आठवणीने ही आठवण ताजी झाली . जाता जाता : बिना गूरुजी सत्यनारायण कसा करायचा? इथले गुरुजी पूजा सांगायचे २०० $ घेतात , दक्षिणा आणि सामग्री अलग . एवढ्यात देव अक्खा भेटेल . म्हणून विचारते आहे. शिवाय मराठी गुरुजी नाही कुणी इथे.
  • Log in or register to post comments

२००$ ? काय संगताय काय?

मंदार कात्रे
Fri, 01/23/2015 - 03:40 नवीन
२००$ ? काय संगताय काय? मीही येतो तिकडे. एक मराठी गुरुजी मिळेल तुम्हाला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

रच्याकने , कोकणात शक्यतो

मंदार कात्रे
Fri, 01/23/2015 - 03:42 नवीन
रच्याकने , कोकणात शक्यतो सर्वत्र चांगलेच अनुभव येतील मुवि जी. मीदेखील इन्जिनीयरिंग पूर्ण होण्याआधी अर्धवेळ पुरोहितच होतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार कात्रे

कोकणात शक्यतो सर्वत्र चांगलेच अनुभव येतील.....

मुक्त विहारि
Fri, 01/23/2015 - 04:14 नवीन
एक गणपती-पुळे सोडले तर कोकणात "देवस्थाने आणि भटजी" ह्यांचा अनुभव उत्तम आहे.चिपळूणची विंध्य-वासिनी असो किंवा पावस किंवा मार्लेश्र्वेर किंवा वेळणेश्र्वेर..बहूतेक ठिकाणी भटजींचा अनुभव उत्तम आला आहे.जी दक्षिणा द्याल त्यात समाधान मानतात आणि कुठेही हपापले-पण नाही. गणपती-पुळ्याला १९७२ पासून दरवर्षी जात असल्याने सध्या तरी गणपती-पुळे इथे न जायचा निर्णय घेतला आहे. एक पिकनिक स्पॉट म्हणून गणपती-पुळे उत्तम. चिपळूणला असतांना बर्‍याच वेळा गेलो आहे.पाहुणे मंदिरात आणि आम्ही समुद्र-किनार्‍यावर. त्यांना मंदिरात देव भेटत असेल ही कदाचित, पण मला मात्र सुर्य-देव घरी जाता-जाता सुंदर रंगी-बेरंगी खेळ दाखवायचा. "गणपती-पुळ्यातील गणपती-दर्शन---> उत्कर्ष की र्‍हास?" हा पण एक काथ्या-कुट होवू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार कात्रे

>>"गणपती-पुळ्यातील गणपती

स्पंदना
Fri, 01/23/2015 - 05:59 नवीन
>>"गणपती-पुळ्यातील गणपती-दर्शन---> उत्कर्ष की र्‍हास?" हा पण एक काथ्या-कुट होवू शकतो. >> या पेक्षा भारी काथ्या त्र्यबंकेश्वर मंदिर दर्शनाचा होउ शकतो. आणि कुटायच म्हंटल तर मी त्या त्रंबकेश्वरच्या व्यव्स्थापनाला, चांगल उखळात घालुन कुटेन!! *aggressive*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

त्रंबकेश्वरच्या व्यव्स्थापनाला, चांगल उखळात घालुन कुटेन!!

मुक्त विहारि
Fri, 01/23/2015 - 06:12 नवीन
ह्या मंदिराबाबतीत आम्ही नशीबवान. एका पुजार्‍याने एक नवा पैसा न घेता, मागच्या दरवाज्याने प्रवेश दिला. असो, देवाची मर्जी. पण तिथला एकूण रागरंग बघता परत गेलो नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

अहो १५ वर्षापूर्वी त्या

स्पंदना
Fri, 01/23/2015 - 06:24 नवीन
अहो १५ वर्षापूर्वी त्या मंदिराच्या फरसबंदीवर एक कोपरा गाठुन गप्प बसलो होतो. सारं मंदिर भोवताली फिरुन पाह्यलं होतं. तेथुन दिसणारा मागचा गोदावरीचा उगम असलेला डोंगर डोळेभरुन पाह्यला होता, आणि पायाखालुन झुळ्झुळ वाहणारं पाणी अनुभवलं होतं. या मंदिराच्या छताच्या तर मी खंप्लीट प्रेमात होते. काय उरलय आता तेथे? भिकार व्यवस्थापन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

त्र्यंबकेश्वर!

पैसा
Fri, 01/23/2015 - 12:28 नवीन
त्र्यंबकेश्वराला त्या पुजार्‍यांच्या कैदेतून मुक्ती कधी मिळणार? मी आणि अपर्णा धडपडत तिथे पोचलो. रांगेत उभं राहण्याएवढा वेळ नव्हता. बाहेर देवडीवर बोर्ड लावलेला की पुजार्‍यांच्या माणसाला २०० रुपये द्या आणि लवकर दर्शन घ्या. फुकट २०० रुपये देण्यापेक्षा म्हटलं देवळाच्या आवारातून देवाचं लांबून दर्शन घेऊ आणि ते शिल्पसमृद्ध देऊळ बाहेरून तरी मनापासून बघू. कसलं नि काय! :( देवळाचा प्रांगणाचा मुख्य दरवाजा आणि मागचा दरवाजा दोन्ही दरवाज्यांवर पुजार्‍यांचे गुंड उभे होते. आम्ही आवाज चढवला पण त्यांनी प्रांगणात जाऊ दिलं नाही ते नाहीच. अपशब्दही वापरले. फक्त आम्ही बायका असल्याने धक्काबुक्की केली नाही इतकंच. पोलीस कुठेही नव्हते. देवळापासून एक किमि अंतरावर गाडी ठेवावी लागते. तिथे स्वस्तात दर्शन करवून देऊ असे बोर्ड आहेत. गाडी चोरीला जायची भीती आहे असे ही ऐकायला मिळाले. एवढ्या लांब जाऊन त्र्यंबकेश्वर काही भेटला नाही. विठोबाला मुक्ती मिळाली. असे आणखी किती देव पुजार्‍यांच्या विळख्यात अडकले आहेत तो देवच जाणे! याच्या उलट अनुभव शिर्डी आणि कोल्हापूरला आला. शिर्डीला व्यवस्था उत्तम आहे आणि व्यवस्थापनाचे लोकही नम्रपणे वागतात. परवा पुण्याहून येताना मी आणि प्रीतमोहर कोल्हापूरला गेलो होतो. अंबाबाईच्या दर्शनाला पुन्हा रांग होती. पण दुसर्‍या दरवाज्याने आत जाऊन लांबून देवीचे दर्शन घेऊन सहज बाहेर पडता येते. सामान ठेवायला मोठे लॉकर्स तासावारी भाड्याने देवळाच्या व्यवस्थापनाकडून मिळतात. चपला ठेवायचे पैसे अपेक्षित नाहीत. खांद्यावरच्या बॅगा आणि मोबाईल आत न्यायला बंदी नाही. एकूण मनसोक्त देऊळ बाहेरून पाहता येतं, आणि फोटोही काढता येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

येस्स

सविता००१
Fri, 01/23/2015 - 12:43 नवीन
कोल्हापूर द बेस्ट. मस्तच आहे. त्र्यंबकेश्वर बद्द्ल अतीव सहमत. तिथे आम्ही मैत्रिणी मैत्रिणीच गेलो होतो तरीही धक्कबुक्की होतीच. व्यवस्थित आवाज चढवला आणि नीट वागा म्हणून सांगितलं तेव्हा आमच्यापुरती तरी गुर्मी उतरली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

कोल्हापुरला दर्शन घ्यायची

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 01/23/2015 - 12:49 नवीन
कोल्हापुरला दर्शन घ्यायची योग्य वेळ म्हणजे काकड आरती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

>>कोल्हापुरला दर्शन घ्यायची

सूड
Fri, 01/23/2015 - 15:08 नवीन
>>कोल्हापुरला दर्शन घ्यायची योग्य वेळ म्हणजे काकड आरती.
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

१५ दिवसांपूर्वीच

उदय के'सागर
Fri, 01/23/2015 - 14:42 नवीन
१५ दिवसांपूर्वीच त्र्यंबकेश्वरला जाणं झालं, देव-दर्शनासाठी नाही पण काही नातेवाईंकाकडे जाण्यासाठी. गावात शिरता शिरताच त्या पार्किंगच्या इथला कलकलाट. तुम्हाला गावात गाडी नेता येत नाही, जरी मग देवदर्शनासाठी जात नसून नातेवाईकाकडे जायचं असेल तरीही. मग पार्कींग ची जी जागा होती, बापरे.. अशक्या चिचकुळ्या दगडांचं ते मैदान्, वाटलं गाडीचे टायर फुटतील. कश्याही गाड्या लावलेल्या, पार्कींग करण्यासाठी कूणी मार्गदर्शकही नाही. एवढ्या गर्दीत आणि तिथे फुगेवाले, भुट्टेवाले आणि इतर फेरीवाले - क-ह-र!!! एवढं करून कशीतरी गाडी पार्क करून, पायी चालायला सुरुवात केली (विनावाहन रस्त्यावर) तर नुसत्या माणसांची ही अशक्य गर्दी, रस्ते छोटे आणि घाण तर... अगं आई गं.... विचारू नका. गाडीतून उतरल्या उतरल्या पहिलंच पाऊल माझं एका कागदी द्रोणावर पडलं त्यात समोस्याची गोड चटणी असावी ती माझ्या पायावर सांडली, फ्लोटर मधून पायात शिरलं ते सगळं आणि तसाच चिकट पाय घेत चालावं लागलं पाणी मिळेपर्यंत, संताप नुसता. रस्त्यावर जनावरं कुठेही बसलेली, त्यांची घाण इतस्ततः.. खड्डे, त्यात साचलेलं पाणी त्यावर घोंघवाणारे किडे आणि त्याच्याच बाजूला खाण्याचे दुकानं आणि रमत-गमत खाणारे लोक. पर्यटक म्हणून किंवा भक्तगण म्हणून जे जातात ते एक-दोन फार्फार तर आठवडाभरासाठी तिथे जातात पण तिथले स्थानिक लोक कसे रहातात देव जाणे कि ते फक्त पैसा कमावतात त्यामुळे ह्या गोष्टींकडे त्याचं दुर्लक्ष असतं? हे सगळं त्र्यंबकेश्वराचं रुप पाहून वाटलं ईट्स वर्स्ट प्लेस ऑन प्लानेट अरे ज्या देवाच्या भक्तीने ओढीने तुम्ही जाता, त्याच्या दारात येउन असली घाण करायची लाज नाही का वाटत? ज्याला मानता त्याची तरी कदर करा, ही कसली भक्ती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अब समझा? मै इतनी गुस्सा क्युं

स्पंदना
Fri, 01/23/2015 - 16:59 नवीन
अब समझा? मै इतनी गुस्सा क्युं हुं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय के'सागर

कोल्हापूर बेश्ट हे तर खरंच..

असंका
Fri, 01/23/2015 - 17:31 नवीन
कोल्हापूर बेश्ट हे तर खरंच...पण फोटो नाही काढता येत. एखाद्या वेळी पोलीस दुर्लक्ष करतात एवढंच.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

वेरी ब्याड

hitesh
Sat, 01/24/2015 - 10:20 नवीन
बॅक डोअर बॉय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

>>कोकणात शक्यतो सर्वत्र

सूड
Fri, 01/23/2015 - 16:43 नवीन
>>कोकणात शक्यतो सर्वत्र चांगलेच अनुभव येतील मुवि जी.
अगदी!! आमच्या घरी जो येतो पुजा सांगायला तो मूळ गुहागरचा आहे. गेली जवळजवळ पाच-सहा वर्षे येतोय, पण दक्षिणा अमुक इतकी दे असं कधीही म्हटलेला नाही. भटजी कोब्रा असतील तर सांगितल्या वेळेला आणि तारखेला काहीही करुन हजर होतात हा आतापर्यंतचा अनुभव आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार कात्रे

तर काय ! आम्हाला वाटलंच होतं

स्रुजा
Fri, 01/23/2015 - 04:07 नवीन
तर काय ! आम्हाला वाटलंच होतं की थोडं महाग असेल म्हणजे ५० $ वगैरे. सामग्री वेगळी . त्याची तयारी होती आमची . २०० ऐकून च सर्द झालो. इथे जिथे मानवी हस्तक्षेप किंवा सहकार्य हवंय ते सगळंच महाग आहे पण साधारण ५०-६० $ तासाच्या हिशेबाने तुम्हाला ते सहकार्य मिळतं . आम्ही निघालो मग तिथून कसं बसं थातूर मातुर कारणं देत , आम्ही म्हणजे काय मीच. नवरा तिथे जणू भिंती बघायला आला होता. तुम्ही येताय ? या न ! ओळख करून देते मराठी मंडळात तुमची . बाकी तुम्ही पण २०० च घेणार असाल तर मधुरा म्हणते ती सीडी आणा हो प्लीज :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार कात्रे

आमच्या इथले गुर्जी

रेवती
Fri, 01/23/2015 - 07:13 नवीन
आमच्या इथले गुर्जी वास्तूशांतीला $१२५ पहिल्या दोन तासासाठी, जर यजमानाने टैमपास केला तर दोन तासापुढील प्रत्येक तासाला $१००. या धाकाने सगळे यजमान जय्यत तयारी ठेवतात, व पटापट आवरतात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

बाकी

केदार-मिसळपाव
Fri, 01/23/2015 - 20:26 नवीन
अश्या धाकात केलेल्या पुजेचे थोडे नवल वाटले. आजकाल हेच चाललेय घरोघरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

कर्मकांडं टाळा, सदवर्तनावर भर द्या.

प्रभाकर पेठकर
Fri, 01/23/2015 - 11:31 नवीन
मी नास्तिक नाही. पण कर्मकांडांचा मी तीव्र विरोधक नक्कीच आहे. सत्यनारायण, गृहशांती, देवस्थान भेटी, वार्‍या आदी मी कधीच केलं नाही. बायको (अंध)श्रद्धावान आहे. तिच्या आग्रहाखातिर सोलापूर, पंढरपूर, आळंदी, जेजूरी, तुळजापूर, शिर्डी वगैरे ठिकाणी भेटी दिल्या पण देवस्थान परिसराची अस्वच्छ्ता, पुजारी-पुजेच्या सामानाचे विक्रेते, 'दलाल' आदींनी अत्यंत निराशाजनक अनुभव दिला आणि माझी नास्तिकता टोकाला पोहोचली. आस्तिक-श्रद्धावान विचारवंतांनी ह्यावर अनेकदा माझ्याशी वाद घालूनही मी बधत नाही पाहिल्यावर 'तूझी मतं तुझ्याजवळ, आमची मतं आमच्याजवळ' अशा वाक्याने वाद वादाचा समारोप करून माझे मुद्दे पटत असल्याचे स्विकारणे टाळले आहे. असो. हल्ली मी वादही घालत नाही. सत्यनारायण, गणेश स्थापना, गृहशांती आणि इतर अनेक शुभ कार्यांप्रमाणेच श्राद्ध-पक्ष, अस्थिविसर्जन वगैरे कार्यही मी टाळतो. माझ्या मृत्यूनंतर देहदान करण्याबाबतही मी माझ्या बायको-मुलाजवळ बोललो आहे. माझे स्वतःचेही कुठलेच 'दिवस' कार्य करायची नाहीत असा माझा आग्रह आहे. जी शुभकार्य करणे सर्वसामान्यपणे लोकांना 'आवडते' त्यातली कुठलीच मी आजतागायत केलेली नाहीत आणि करणार नाही. माझं कांहीही नुकसान झालेलं नाही. होमहवन, सत्यनारायण, भागवतसप्ताह, रोजची पूजाअर्चा वगैरे वगैरे करून आर्थिक स्पर्धेत इतरांवर अन्याय, दैनंदिन खोटारडेपणा, स्वार्थ, गैरव्यवहार करणारी अनेक माणसे फार जवळून मी पाहीली आहेत. (नीट परिक्षण केल्यास आपल्या सर्वांनाच ती दिसतील, कांही दिव्यदृष्टी लागत नाही). माणसांच्या वृत्तीतील हे वैगुण्य, विरोधाभास मला अधिकाधिक नास्तिक (त्यांच्या दृष्टीने) बनवितो. असो. कर्मकांडं टाळा, सदवर्तनावर भर द्या. तुम्हाला कुठल्याही देवस्थानाची, भडजींची, मोठमोठ्या दक्षिणांची कधी गरजच भासणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

१००% सहमत काका.

खटपट्या
Fri, 01/23/2015 - 11:48 नवीन
१००% सहमत काका. कुलदैवत असल्यामुळे तुळजापूरला थोडा नाखुशीनेच गेलो होतो. पण देवळाच्या बाहेर घाण आणि डुकरे बघून उबग आला. त्यात हातात भेट्वस्तू घेउन फिरणारे फेरीवाले मागे लागत होते. मग त्यांच्यावरच राग काढायचे ठरवले. जो कोणी फेरीवाला येईल त्याला सांगायचो, "यावर तुमचे पोट आहे ना मग इथे जास्तीत जास्त लोक यावेत म्हणून तुम्हाला हा परीसर स्वच्छ ठेवावासा नाही वाटत?" यावर प्रत्येक जण "कुठून आलं हे यडं आमाला शानपना शीकवायला?" या अविर्भावात बघायला लागला. शेवटी ही माझी इथली शेवटची फेरी असे घरच्याना सांगून तिथून काढता पाय घेतला. --संपूर्ण नास्तिकतेकडे झूकत चाललेला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

चायला घरातल्या देवघरात देव

टवाळ कार्टा
Fri, 01/23/2015 - 11:49 नवीन
चायला घरातल्या देवघरात देव नसतात का ते सुट्टीवर गेलेले असतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

घरातलं देवघर माझ्यासाठी

खटपट्या
Fri, 01/23/2015 - 11:55 नवीन
घरातलं देवघर माझ्यासाठी नाहीये, मी कधीच मनोभावे हात जोडले नाहीत. उगाच खोटे कशाला सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

नतमस्तक व्हावे असे व्यवस्थापन...

प्रभाकर पेठकर
Fri, 01/23/2015 - 13:02 नवीन
खटपट्या, अहो, फेरीवाल्यांनाच काय, मी तिथल्या व्यवस्थापक्/विश्वस्तांना लेखी तक्रार दिली होती. त्या काऊंटरवरच्या माणसाकडे पाहिल्यावर तो म्हणाला, 'काय लागेल ते लिहा, साहेब. कोणी वाचत नाही ही तक्रारवही.' त्याच्या चेहर्‍यावरचा आत्मविश्वास कौतुकास्पद होता. त्यापुढे जाऊन मी तिथल्या जिल्हाधिकार्‍याकडेही तक्रार पाठविली. आजतागायत कांही उत्तर/कारवाई/कार्यवाही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

'काय लागेल ते लिहा, साहेब.

हाडक्या
Fri, 01/23/2015 - 17:30 नवीन
'काय लागेल ते लिहा, साहेब. कोणी वाचत नाही ही तक्रारवही.' त्याच्या चेहर्‍यावरचा आत्मविश्वास कौतुकास्पद होता.
हा हा हा .. हे भारी होतं काका. हेच आपल्या देशाचं दुखणं आहे. सर्वसामान्यतः लोकच इतके भ्रष्ट आहेत की सरकारला काय नावे ठेवायची ? पण ही अस्वच्छता लोकांच्या धार्मिक भावना कशा दुखवत नाही हे कोडेच आहे. शिकले सवरलेले लोक यापासून (म्हणजे तथाकथित धर्म, कर्मकांडे, संस्कृती इ.) दूर का जाताहेत ह्याचा मात्र याच स्वयंघोषित धर्म-रक्षकांना बोध होत नाही आणि मग मॅकालेपासून ते आजकालच्या पिढीपर्यंत सगळ्याचे उद्धार मात्र होत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

आणि हे अख्ख्या देशभरच होतं

बॅटमॅन
Fri, 01/23/2015 - 17:38 नवीन
आणि हे अख्ख्या देशभरच होतं असंही नाही बरंका...दक्षिणेतली देवळं बरी स्वच्छ टापटीप असतात एकदम? मग बाकीच्यांना काय धाड भरलीये? वायझेड साले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा