Skip to main content

देवस्थाने आणि भटजी....

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 23/01/2015 01:15 या दिवशी प्रकाशित केले.
मुळात माझे आणि देवाचे नाते फारच घट्ट. मी मागावे, हट्ट करावा आणि त्याने द्यावे, हा आमच्या दोघां मधला अलिखित नियम.देवाच्या दरबारात मध्यस्थाची गरज नसते, हा माझा अनुभव आणि आमच्यापेक्षा आमच्या बायकोचे देव जास्त ऐकतो, हा दुसरा अनुभव. आमच्या वडीलांचे आणि आईचे मात्र देवाशी फार काही पटत नाही.तसे दोघेही फिरायला वगैरे जातात, पण मुद्दाम जेजुरी किंवा आंबिजोगाईला जात नाहीत. आमचे लग्न झाले आणि लग्नाच्या वेळी समजले की, आमची बायको फार धार्मिक.(तसे लग्ना आधीच थोडी-फार कल्पना आली होती.पण लग्ना नंतर शिक्का-मोर्तब झाले.) आमचे कुलदैवत म्हणजे जेजूरी.लग्ना आधी एकदा जावून आलो होतो.पण तिथला बाजार बघून मला परत तिथे पावूल ठेवू नये, असेच वाटत होते. लग्ना नंतर परत एकदा जेजूरीला भेट द्यावी लागणार होती.बायकोचा तसा हट्ट पण होताच.लग्ना नंतर वेळ-काळ बघून मी आणि बायको, जावून आलो.तिला पण माझ्या सारखाच अनुभव (पुजार्‍यांचे पैसे काढणे) आल्याने, ती म्हणाली, "हे नक्की देवस्थान आहे की, पुजार्‍यांसाठी टांकसाळ?" असो, पुढे नौकरी बदलल्याने, चिपळूणला गेलो.सहज म्हणून गुहागरला गेलो.छान समुद्र-किनारा आणि बाजूलाच मंदिर.का कुणास ठावूक, पण मंदिरात अभिषेक करायची, मनापासून इच्छा झाली.सकाळ असल्याने मंदिरात चौकशी केली. भटजी म्हणाले,"बसा.करू या अभिषेक.आता ही बॅच संपली, की नंतर तुमचाच नंबर." मी, " अहो, पण माझ्या कडे पुजेचे सामान किंवा पीतांबर तर सोडाच.जानवे पण नाही." गुरुजी,"ते होईल हो.तुम्ही बसा तर खरे." जेजूरीचा अनुभव असल्याने, हा भटजी आता किमान ५०१/- रु. तरी काढणार्,ह्यांत शंका न्हवती. एक अर्ध्या तासातच आधीच्या मंडळींचा अभिषेक झाला, आणि आमचा नंबर लागला. गुरुजींनी मस्त पीतांबर नेसवले आणि आत गाभार्‍यात गेलो. जानवे घातले आणि मस्त साग्रसंगीत पुजा झाली. दक्षिणा विचारली. भटजी,"अभिषेक करून तुम्हाला समाधान वाटले का?" मी,"हो." भटजी,"मग तुम्हाला योग्य वाटेल ती दक्षिणा द्या.मला ५/- दिलेत तरी चालतील." योग्य ती दक्षिणा दिली आणि एकच ठरवले, परत जर कधी अभिषेक करावासा वाटला तर गुहागरलाच जायचे. डिस्क्लेमर : देव देवालयांत नसून आपल्याच मनांत असतो, ह्यावर माझा ठाम विश्र्वास असल्याने, मी शक्यतो घरच्या कुठल्याच कार्याला भटजी बोलवत नाही.आमच्या घरी सुपारीचाच गणपती असतो आणि आमच्या सत्यनारायणाला भटजीची आवश्यकता नसते."
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 45289
प्रतिक्रिया 204

प्रतिक्रिया

In reply to by स्वामी संकेतानंद

काही स्वामी लोक लोकांना लाथा घालतात आणि लोक त्यातच खुश असतात!

In reply to by स्वामी संकेतानंद

आता तुम्हीच सांगताय तर आशाला तुमच्या आश्रमात येताना बरोबर आणणे धोक्याचे आहे हे पटले आहे ! :) ;) +D

In reply to by कंजूस

पीर पावायला गेलो नव्हतो वो, त्याला भेटायला गेलो होतो.. च्यायला, पहिल्या वाक्यातच तसा स्पष्ट उल्लेख असूनही कळत नाही लोकांना..

दैवी शेंचुरी.

In reply to by बॅटमॅन

आता (इथे आणि क्रिकेटमध्ये पण) शेंचुरीत काय एक्साईटमेंट राहीली नाही राव. कालची कोकरं पण करून जातात शेंचुर्‍या.. ;)

देवळात फार वेळा जात नाही. दरवर्षी नियमाने गोंदवले येथील श्रीमहाराजांचे समाधी मंदीर व नंतर श्रीरामाच्या मंदीरात दर्शनाला जातो. दोन्ही मंदीरात खूप शांत व समाधानी वाटते.

कोकणातल्या डेरवण या ठिकाणी मागच्या आठवड्यात जाणे झाले.हा अनुभव या चर्चेत इतरांनी लिहिलेल्या अनुभवांपेक्षा वेगळा आहे तरीही लिहितो.आमची शाळेत असतानाही त्या ठिकाणी सहल गेली होती.त्या गोष्टीला खूप वर्षे झाल्यामुळे तिथे बघितलेल्या काही गोष्टी लक्षात नव्हत्या. त्या तिथे गेल्यावर परत समजल्या. एक तर तिथे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील घटनांवरील पुतळ्यांबरोबरच कुणा वालावलकर महाराजांची समाधीही आहे. सर्वप्रथम बाहेरच एक बोर्ड लावला आहे.त्यावर कुठले कुठले नियम लिहिले आहेत.त्यातील महत्वाचा नियम म्हणजे स्त्रियांना वयोमानानुसार फ्रॉक किंवा साडी ही वेशभूषा असेल तरच समाधीच्या तिथे प्रवेश दिला जाईल!! म्हणजे मी जीन्स घालून गेलो तरी त्या महाराजांना चालणार पण हिलरीने साडीच नेसली पाहिजे ही सक्ती. हे काही मला पटले नाही.असो त्यावर आणखी लिहितोच.दुसरे म्हणजे नियमांमध्ये शांतता राखा, गडबड गोंधळ करू नका इत्यादी सूचना होत्याच.सगळ्यात मजा होती शेवटच्या सुचनेत--"हे नियम मान्य नसल्यास इथे यायची तसदी घेऊ नये". म्हणजे हा प्रकार पुणेरी पाट्यांच्या तोंडात मारेल असा झाला.अर्थातच सगळ्या सुचना आम्ही आत जायच्या आत वाचल्या नाहीत आणि शेवटच्या सुचनेचीच थोडी टवाळी केली. ते पुतळे बघून झाल्यानंतर आणखी एक ठिकाण होते तिथे जायला आम्ही निघालो तेव्हा तिथे जायच्या रस्त्यावर बसलेल्या एका जाडसर स्त्रीने हिलरीने साडी नेसली नसल्यामुळे आत प्रवेश नाही हे सांगितले.आम्ही विचारले की आत नक्की काय आहे?त्यावर कळले की तिथे आत वालावलकर महाराजांची समाधी आहे.एक तर वालावरकर महाराज हे नाव मी आयुष्यात दुसऱ्यांदा ऐकले.कदाचित शाळेत असताना आमची सहल गेली होती त्यावेळी ते नाव ऐकले असेल ही शक्यता गृहित धरून दुसऱ्यांदा असे लिहितो.हे महाराज कोण होते किंवा ते खरोखर चांगले होते की नाही याविषयी मला काहीच माहित नव्हते. ज्या माणसाविषयी काही माहित नाही त्याची समाधी बघण्यात काय कपाळ इंटरेस्ट असणार? आणि समजा हे महाराज कोण हे माहित असते तरी तिथे जावेसे वाटायची शक्यता अगदी शून्य होती.उंटाच्या लहान आतड्याची लांबी किती असते हे समजून घेण्यात मला जितका इंटरेस्ट आहे त्यापेक्षाही कमी इंटरेस्ट या असल्या महाराजांच्या समाध्या वगैरे बघण्यात मला आहे.त्यामुळे आत जाऊ देणार नसाल तर नका देऊ, हू केअर्स असे म्हणत आम्ही तिथून निघालो. आमची शाळेची सहल गेली होती त्यावेळी त्या समाधीच्या तिथे बघितले ते आठवले.तिथे एक ८-१० वर्षे वयाच्या मुलाला गळ्यात वीणा घालून "श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ" असे विविध सुरांमध्ये म्हणायला उभे केले होते.तिथे त्या कामासाठी चार मुले ठेवली आहेत म्हणे आणि चोवीस तास हा जप सतत चालू असतो असे आम्हाला तिथे सांगितले होते ते आठवले.८-१० वर्षे वयाच्या मुलांकडून दररोज सरासरी सहा तास हे काम करून घेणे हा प्रकार मला तरी अजिबात हजम झालेला नव्हता.आणि मला असे काहीतरी करायला न लागता शाळेत जायला मिळते म्हणून किती सुदैवी आहे हे त्यावेळी समजले. (वालावलकर महाराजांच्या भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या नसाव्यात अशी अपेक्षा.पण तिथे बघितलेली सत्य परिस्थिती लिहिली आहे).

In reply to by क्लिंटन

भावना दुखावल्या तर कशाला घाबरता.. आप-भक्तांच्या भावना दुखावल्या तर घाबरत नाही मग इथे कशाला घाबरायचं? चूक आहे आणि चूक वाटलं तर किमान इथे तरी नक्की मांडले पाहिजे.. उगा नसत्या हळव्या अस्मितांच्या भितीने ढिश्क्लेमर कशाला द्यायचे ??

In reply to by हाडक्या

याचाच अर्थ माझ्यासाठी आआप समर्थकांच्या भावनांपेक्षा वालावलकर महाराजांच्या भक्तांच्या भावना अधिक महत्वाच्या आहेत :) असो. डेरवणला बघितलेला प्रकार विशेषत। त्या मुलांकडून २४ तास जप म्हणून घेणे मला तरी अजिबात आवडले नव्हते. जे चूक ते चूकच. आणि इतकेच काय तर गावाचा उल्लेखही 'श्रीक्षेत्र डेरवण' असा केलेलाही खटकलाच. हे वालावलकर महाराज जे कोणी असतील त्यांना भगवंताच्या पंगतीत नेऊन बसविणे कितपत योग्य आहे?

In reply to by क्लिंटन

याचाच अर्थ माझ्यासाठी आआप समर्थकांच्या भावनांपेक्षा वालावलकर महाराजांच्या भक्तांच्या भावना अधिक महत्वाच्या आहेत
हा हा हा ! इथे आप समर्थक औषधाला देखील उरले नाहीत असे वाटतेय, तरी कित्ती कित्ती ते बदडायचं म्हणतो मी. बच्चों की जान लोगे क्या क्लिंटन साब.. ? असो,
चूक ते चूकच. आणि इतकेच काय तर गावाचा उल्लेखही 'श्रीक्षेत्र डेरवण' असा केलेलाही खटकलाच. हे वालावलकर महाराज जे कोणी असतील त्यांना भगवंताच्या पंगतीत नेऊन बसविणे कितपत योग्य आहे?
हे एवढेच म्हणायचे होते.. :)

In reply to by क्लिंटन

"अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे भक्त होते.वालावलकरांचा मुंबईस्थित बिझनेस होता. त्या पैशातून काही समाजोपयोगी काम करावे, ह्या उद्देशाने त्यांनी डेरवणला हॉस्पीटल आणि शिवसुष्टीला मदत केली." अशी ऐकीव माहिती आहे. बादवे, डेरवण हॉस्पीटल मात्र उत्तम होते.मला स्वतःला त्या हॉस्पीटलचा २ वेळा फार चांगला अनुभव आला.चॅरिटेबल ट्रस्टचे हॉस्पीटल कसे असावे, ह्याचा उत्तम नमुना, म्हणजे डेरवण हॉस्पीटल. अर्थात सध्याची परिस्थिती माहीत नाही.

In reply to by मुक्त विहारि

हो बाजूलाच हॉस्पिटलही आहे आणि नक्कीच ते समाजपयोगी काम आहे. आक्षेप आहे तो देणगीदाराची समाधी वगैरे करून महाराजीकरण करण्यास आणि मुख्य म्हणजे खेळणे-शाळेत जायचे वय असलेल्या मुलांकडून जप म्हणण्यासारखे काम करून घेण्यास.

In reply to by क्लिंटन

क्लिंटन साहेब आपले सर्व लिखाण संपूर्ण सत्य आणि पटण्यासारखे असले तरी एक सत्य हेही आहे कि "चमत्काराशिवाय नमस्कार नाही". बर्याच वेळेस सार्वजनिक कार्यास निधी उपलब्ध करून देण्यासाठी अशा चमत्काराचे पाठबळ घ्यावे लागते. त्यातून एखादे स्वामी जिवंत नसतील तर त्यांच्या बद्दल वलय निर्माण करणे जास्त सोपे जाते. रच्याकने-- मला २६ जानेवारी, १५ ऑगस्ट रोजी किंवा पंडित नेहरून्पासून खालपर्यंत सर्व राजकारण्यांचे शाळकरी मुलांना गणवेष घालून झेंडे हलविण्यासाठी रस्त्यात तासंतास उभे करणे डोक्यात जाते. डिस्क्लेमर -- मी अजून डेरवण ला गेलो नाही. आणि तेथे वालावलकर स्वामी आहेत हे मला आजच कळले. मी कोणत्याही स्वामींचा भक्त नाही.

In reply to by सुबोध खरे

"चमत्काराशिवाय नमस्कार नाही". बर्याच वेळेस सार्वजनिक कार्यास निधी उपलब्ध करून देण्यासाठी अशा चमत्काराचे पाठबळ घ्यावे लागते. त्यातून एखादे स्वामी जिवंत नसतील तर त्यांच्या बद्दल वलय निर्माण करणे जास्त सोपे जाते.
शक्य आहे. आपला समाजच असा म्हटल्यावर अशा काही गोष्टी करणे गरजेचे असावेही.पण तरीही माझ्यासारख्याला त्यातल्या बर्‍याच गोष्टी खटकल्याच.

In reply to by क्लिंटन

आणि मुख्य म्हणजे खेळणे-शाळेत जायचे वय असलेल्या मुलांकडून जप म्हणण्यासारखे काम करून घेण्यास." मान्य...१००% मान्य पण..... मी त्याच भागात होतो आणि २ वेळा तिथल्याच हॉस्पीटल मध्ये जायला लागले, म्हणून थोडे सांगू शकतो. मला पण आधी हाच आक्षेप होता, पण त्या निमीत्ताने घरातला एक खाणारा कमी होतो, हे वास्तव पण स्वीकारायला हवे. असो, आज मला किंवा माझ्या मुलांना खायची भ्रांत नाही, म्हणून मी असे लिहू शकतो, पण उद्या जर त्या मुलांच्या पालकांच्या जागी मी असतो तर, मी पण माझ्या मुलांना नक्कीच पाठवले असते. पापी पेट बरेच काही करायला भाग पाडते, पण त्या पोटात पापाचा पैसा जात नाही ना, इतकेच आपल्या हातात नक्की असते. एक मात्र नमूद करावेसे वाटते, ह्या निमित्ताने आपल्याशी दिलखुलास चर्चा करता आली.नाहीतर तसे तुम्ही चानस देतच नाही.

In reply to by मुक्त विहारि

आज मला किंवा माझ्या मुलांना खायची भ्रांत नाही, म्हणून मी असे लिहू शकतो, पण उद्या जर त्या मुलांच्या पालकांच्या जागी मी असतो तर, मी पण माझ्या मुलांना नक्कीच पाठवले असते.पापी पेट बरेच काही करायला भाग पाडते, पण त्या पोटात पापाचा पैसा जात नाही ना, इतकेच आपल्या हातात नक्की असते.
पालकांच्या बाजूने विचार केला तर त्यांचे बरोबरच आहे.पण या संस्थेला खरोखरच चार मुलांना मद्त करायची असेल तर त्यांना "श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ" असे म्हणायला लावण्यापेक्षा एखाद्याचे खरोखरच चांगले करायचे असेल तर इतर अनेक खरोखरचे उपयोगी मार्ग उपलब्ध आहेत हे माहित नाही की माहित असूनही ते त्याकडे दुर्लक्ष करत आहेत हे कळायला मार्ग नाही.
ह्या निमित्ताने आपल्याशी दिलखुलास चर्चा करता आली.नाहीतर तसे तुम्ही चानस देतच नाही.
:)

In reply to by क्लिंटन

तिथे पण एक जण एकतारी वर हा जप म्हणत असतो. त्यामुळे तीच प्रथा डेरवणला पण असावी. "एखाद्याचे खरोखरच चांगले करायचे असेल तर इतर अनेक खरोखरचे उपयोगी मार्ग उपलब्ध आहेत हे माहित नाही की माहित असूनही ते त्याकडे दुर्लक्ष करत आहेत हे कळायला मार्ग नाही." सहमत.

In reply to by क्लिंटन

इतर अनेक खरोखरचे उपयोगी मार्ग उपलब्ध आहेत हे माहित नाही की माहित असूनही ते त्याकडे दुर्लक्ष करत आहेत हे कळायला मार्ग नाही.
संस्था स्थापकांच्या मते स्वामी समर्थ नामस्मरण हा अत्यंत खात्रीचा आणि आवश्यक उपाय असावा.

In reply to by रेवती

केरळात पद्मनाभस्वामीच्या देवळात गेलो तेव्हा माझा मुलगा तीन वर्षांचा होता. त्याला पण लुंगी नेसायला लावली होती.

In reply to by रेवती

@लहान मुलांना तरी यातून वगळायला हवे. >> ह्हं...!!! कसले वगळणार हे धर्म-शास्त्र वाले!? अहो..ज्या देवळामठांमधे लोकर/मोजे चालत नाहीत..तिथे कडाक्याच्या थंडित तान्ह्या मुलांचेही काढायला लावतात.. हे डोळ्यांनी पाहिले आहे. आता या मुद्द्यावर (कुणिही...) सोवळं म्हणजे स्वच्छता! हे वादात केलं जाणारं (अत्यंत खोटारडं) समर्थन-लाऊन पहा..! सगळा अंधळा-समजुत-दार पणा एका फटक्यात उघडा पडेल! :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

लोकर आणि रेशीम दोन्ही प्राणिज. मग रेशीम चालतं आणि लोकर नाही असं का? (आता रेशीम एखादेवेळी नैसर्गिक मिळेल, पण लोकर बहुधा सिंथेटिक असते.) दुसरी गोष्ट, धूतवस्त्र चालतं ना सोवळं म्हणून? खरं तर तेच बरं. वर्षानुवर्षं न धुतलेलं सोवळं, त्यात कसरी, झुरळं भरलेली असतात, वास घालवायला त्यात डांबर गोळ्या घालतात, ते कसलं आलंय पवित्र कर्माचं?

In reply to by पैसा

रेशीम तयार करताना रेशमाचे ककून त्याच्या आता रेशीमकीडा जिवंत असतानाच उकळत्या पाण्यात टाकायचे असतात, म्हणजे सलग धागा मिळतो. थोडक्यात रेशमी वस्त्रे घालणे म्हणजे हजारो रेशीमकीड्यांना हालहाल करून मारणे. देवाच्या दॄष्टीने हे पवित्र कार्य आहे बरे.

In reply to by स्वामी संकेतानंद

आणि असे पवित्र कार्य करणारे लोक एरवी णॉणव्हेज खाणार्‍यांकडे कुणी पतित असावेत असे पाहतात. त्यांना विचारायला पायजे, त्या किड्यांच्या जागी तुम्हांला उकळून ठार मारले तर चालेल का? अल्गद देवाघरी जाल. जन्ममृत्यूच्या फेर्‍यातली एक स्टेप तरी जरा शॉर्ट होईल.

In reply to by क्लिंटन

६-७ वर्षांपूर्वी डेरवणला गेलो होतो. तुम्ही म्हणता ती समाधी दिसली नाही. बहुतेक ती शिवसृष्टीला लागून असलेल्या शेजारच्या परीसरात असावी. ते दार बंद होते. त्यामुळे तिथे जाता आले नाही. शिवसृष्टी बर्‍यापैकी बोअरिंग होती. सर्वत्र मावळ्यांचे रंगीबेरंगी पुतळे, मूर्ती आणि त्यांचे एकसारखे रंग व तोंडवळे. त्यामुळे बघून २-३ मिनिटातच कंटाळा आला. एकंदरीत गेलो नसतो तरी काही बिघडलं नसतं.

In reply to by क्लिंटन

क्लिन्टन साहेबांनी लिहिले आहे म्हणजे खरेच असणार ! पण समर्थ संप्रदायात डेरवण च्या कामाचे कौतुक होत असते. या दासनवमीला ( १३ फेब्रु ला) तिथले आमंत्रण आहे ... तेव्हा ऑखो-देखा-हाल बघायला मिळेलच ! मला तिथल्या मुलांशी बोलण्यात जास्त विन्त्रेस्ट आहे.

In reply to by विटेकर

मला तिथल्या मुलांशी बोलण्यात जास्त विन्त्रेस्ट आहे.
आणि तुमचे अनुभव वाचण्यात मला :) ही मुले त्या महाराजांच्या समाधीच्या तिथे आहेत.यावेळी मी समाधीच्या तिथे गेलो नाही (कारण ते हिलरीला तिथे जाऊ देत नव्हते) तर असा एक मुलगा मी शाळेत असताना सहल गेली होती त्यावेळी बघितला होता आणि समाधीच्या तिथले अनुभव पूर्वीचे आहेत.मधल्या काळात काही फरक झाले असल्यास कल्पना नाही.बहुदा अशा प्रथा एकदा चालू झाल्या की बंद केल्या जात नाहीत त्यामुळे फार अपेक्षा नाही पण तरीही लहान मुलांना असे जप म्हणायला लावणारी प्रथा त्यांनी बंद केली असेल तर अती उत्तम.

मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे आणि इथली महालक्ष्मी, सिद्धीविनायक, लालबागचा राजा वगैरे देवस्थानं हे सिद्ध करतात. लोक बोरिवली-दहिसरवरुन सोमवारी रात्री चालत येतात मंगळवारच्या सिद्धीविनायक दर्शनाला. अंगारिका असेल तर विचारायची सोयच नाही. लालबागच्या राजाला गणेशोत्सवात आणि महालक्ष्मीला नवरात्रात तोबा गर्दी असते. धर्म हा खरा Recession -proof व्यवसाय!

In reply to by बोका-ए-आझम

काय हवे ते डायरेक्ट गणपतीला सांगा की, उगाच मध्ये त्या उंदराची लुडबूड कशाला?

श्रद्धेचा बाजार झालाय, मंदीरात भटजी लुटतात वगेरे खरे आहे. पण हा एक बाजार आहे म्हणूनच याला स्वीकारले तर काय वाइट आहे. हा एक फार मोठा उद्योग आहे. कुणी जरी कधी Business of Faith याचा अभ्यास केला तर नक्कीच डोळे दिपवून टाकणारे आकडे समोर येतील. लाखो लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतो. पुजारी, भटजी, फुलवाला, प्रसादवाला, हॉटेलवाला, खेळणी विकनारा, ऑटोवाला असे कितीतरी रोजगार आहेत आणि तेही Unskilled. दुसऱ्या कुठल्याही उद्योगात इतक्या मोठ्या प्रमाणात किमान कौशल्याचा रोजगार निर्माण होत नाही. कॅशचा व्यवहार हा प्रकार सोडला तर कुठेही काहीही बेकायदेशीर नाही. कुणीही तुम्हाला गनपॉइंटवर देवळात या किंवा अभिषेक करा असे म्हणत नाही. बाजार म्हटल कि फक्त आणि फकत Transaction असत तेंव्हा हे सार स्वीकारणे सोप जात. दुसरा मुद्दा असा की काही देवस्थान फार दुर्गम भागात आहेत आणि देवस्थान नसती तिथे फारस काही नसत. कोण कशाला रामेश्वरमला जात होत. फारच झाल तर सरकारने तिथपर्यंत जायला पूल केला असता. तेही शक्यता कमीच. पण समुद्रावरुन रेल्वे पूल कधीच नाही. जास्तीत जास्त कुण्या मोठ्या माणसाने त्या कवरत्ती सारखे पंचतारांकित हॉटेल बांधले असते आणि काही मोजकी माणसे तिथे गेली असती. कदाचित सौंदर्य टिकले असते पण तेही थोड्या लोकांसाठीच.

In reply to by मित्रहो

ज्या प्रमाणात, ज्या दर्जाचे कष्ट केले जातात त्या प्रमाणात फळ मिळावे हे अर्थशास्त्राच्या दृष्टीने हिताचे असते. देवाला अभिषेक करण्याचे ५०० रुपये दिले ह्या व्यवहारात नक्की घडले काय? कुणी तरी एका भांड्यात पाणी घेतले, ते एका आकार दिलेल्या दगडावर ओतले आणि ओतताना काहीबाही मंत्र म्हटले. ते पाणी यथावकाश गटारात वाहून गेले. ह्यातील कुठल्या कामाला ५०० रुपयाला न्याय देईल इतके कष्ट लागले असतील का? मला वाटत नाही. अशा प्रकारे अवाच्यासवा खर्च म्हणजे ज्याने ते खर्चलेले आहेत त्याची लूट आणि ज्याने मिळवले आहे त्याची आयती कमाई. हीच गोष्ट नारळ, हार, तुरे, पूजेची सामग्री, प्रसाद वगैरेबद्दल. काही अपवाद सोडल्यास ह्या गोष्टींचा दर्जा सुमार असतो. ह्यातल्या अनेक गोष्टी पुन्हा पुन्हा वापरून त्यांचे मूल्य कमी केले जाते मात्र विकत घेणार्‍याला तेवढेच पैसे मोजावे लागतात. एक म्हणजे इथे मुक्त स्पर्धा नाही. कुणी वाट्टेल तो येऊन दुकान उघडू शकत नाही, अभिषेकाचा ठेका घेऊ शकत नाही. वंशपरंपरागत पद्धतीने ही कामे वाटली जातात. संस्थान वा ट्रस्ट ठरवते की हे धंदे कुणी करायचे. तेव्हा हे भेदभावावर आधारित आहे. त्यामुळे काही मूठभर लोकांना असा हमखास स्वस्तात कमाई करून देणारा धंदा हे अर्थशास्त्राच्या दृष्टीने चांगले नाही. बेकायदा म्हणाल तर पूजेत एकदा वापरलेली फुले आणि नारळ पुन्हा पुन्हा वापरणे नैतिकदृष्ट्या योग्य आहे का? आपले आणि देवस्थानाचे स्थानमहात्म्य वापरून विविध सेवा व वस्तूंकरता अवाच्या सवा दर आकारणे न्याय्य आहे का? भाविकांना सोयी सुविधा न पुरवता त्यांना गृहित धरून त्यांना नाडणे, लुटणे हे योग्य आहे का? कधीतरी त्या देवस्थानाला येणारा भाविक कायदेशीर व्यवहार, तक्रार, भांडणे ह्या भानगडीत पडणार नाही हे माहित असल्यामुळे त्यांची अडवणूक करून आपले उखळ पांढरे करणे हे बेकायदा नाही का? दुसरा विचार असा की ह्या प्रकारात किती ऊर्जा व्यर्थ दवडली जाते ते पहा. टनावारी झेंडूची फुले आणि नारळ कुठेतरी पिकत असणार. त्या शेतात ती पिके लावण्याचा खर्च, पाणी, खत, तोडणी हा खर्च, वाहतुकीचा खर्च. आणि ह्या पदार्थांचे होते काय? फुले उकिरड्यात, नारळ फोडलाच तर पाणी गटारात आणि कदाचित खोबरे प्रसाद म्हणून. तर बहुतांश ऊर्जा ही पुन्हा कचर्‍यात जमा होते. हे चांगले आहे काय? ह्या झेडू ऐवजी अन्य खाद्य पिके लावली असती तर लोकांची अन्नाची गरज भागली असती. नारळ खाद्य म्हणून वापरले असते तर कदाचित जास्त अन्न उपलब्ध झाले असते. पण निव्वळ पूजेकरता हे प्रकार वापरणे हे व्यर्थ आहे. ऊर्जेचा अपव्यय आहे.

In reply to by हुप्प्या

हुप्प्या, तुम्ही अतिशय सूचक मुद्दे मांडलेले आहेत. मला कधीतरी या सर्व्हिसच्या विषयावर लिहायला याचा उपयोग होणार आहे. :)

In reply to by हुप्प्या

माझ्या अनुभवानुसार तरी वस्तूची किंमत Mat Cost+Labor Cost+S&G+Profit अशा साध्या गणितावर नसते. एक साधी पाण्याची बॉटल बाहेर १५ ला मिळते, स्टेशनवर कधी कधी १५ ला तर कधी २० ला. ट्रेनच्या आत हमखास २० आणि पंचतारांकित हॉटेलात १६९ रुपयाला मिळते. साऱ्याच गोष्टीत लक्झरी टॅक्स नसतो. आधी IRCTC चे टिकट घेतले तर एसी टिकीटाचे ६० आणि स्लीपरचे ४० असा घरी पाठवायचा दर होता. आजही असाच काहीसा नियम आहे. कोणी बंगलोर, हैद्राबाद किंवा चैन्नेइ या सारख्या शहरात मराठी भटजी शोधून त्याला सत्यनारायणाला बोलावले तर तो कसा २५१ रुपयात येइल. थोडा विचार केला तर इतर मुद्दे बाकी उद्योगांना काही ना काही प्रमाणात लागू होतातच. असो. आपण वाद घातल्याने काही हा प्रश्न सुटनार नाही. Let's agree to disagree.

In reply to by मित्रहो

राजकारण्यांपासून ते शिक्षकांपर्यन्त प्रत्येकाने भ्रष्टाचार करायचा आणि भटजी नी काय घोडे मारले आहे ? त्यांना पोट-पाणी नाही का ?

In reply to by विटेकर

वा वा वा. इतरांनी गाय मारली म्हणून भटजीही वासरू मारूदे तर. ते मारूनच्या मारून वर बाजारूपणा मिरवायला मोकळे. मान गये.

In reply to by बॅटमॅन

गोमांस खाणार्‍या लोकांसाठी ही तर आनंदाची बातमी आहे ना ! आता गायी बरोबर वासरुपण खायला मिळणार ना ? आणि तुम्हाला भटजी लोक अक्षता देऊन घरी बोलावायला येतात का ? की या बाबांनो आमच्या तीर्थक्शेत्री? आणि आले तरी तुमची सदसदविवेक बुद्धी जागृत ठेवा ना !

In reply to by विटेकर

राजकारण्यांपासून ते शिक्षकांपर्यन्त प्रत्येकाने भ्रष्टाचार करायचा आणि भटजी नी काय घोडे मारले आहे ? त्यांना पोट-पाणी नाही का ?
अत्यंत चुकिचे विधान! आणि मनोमन असहमती! भ्रष्टाचार आणि अश्या प्रकारची वरकमाई अथवा गैरवर्तन याचं समर्थन होऊच शकत नाही! हे पोटापाण्याच्या कमाईच्या कितीतरी पुढे गेलेले लोक असतात. मग ते तिर्थक्षेत्रांसारख्या ठिकाणी असोत्,अथवा सर्वसामान्य समाजात पौरोहित्य करणारे माझ्यासारखे असोत. यजमानाला यथायोग्य दक्षिणा सांगून झाल्यावरंही अनेक प्रकारची मोहजालं निर्माण करून ,भावनिक फसवाफसवी करून केल्याजाणार्‍या कचकून कमाईला तुंम्ही काय म्हणाल??? बंगले/गाड्या/विदेशातले प्रवास झाले. अप्रामाणिक वजनदार मंडळींशी ओळखि वाढवून झाल्या. मनोविकृत धार्मिक संस्थांशी संबंध प्रस्थापित करून तिकडेही भरपूर शेती-करून झाली. तरिही ही घाणेरडी भूक शमत नाही..अशीही मंडळी पुरोहितांमधे आहेत. तोंडामधे धार्मिक परिभाषेचा चाळा,मनात फक्त नोटांचा-गाळा..वेशभूषाही अगदी साध्या सत्शील दिसण्यापासून ते भपकेबाजपणा पर्यंतची सगळी! आणि हे सर्व धार्मिक साजशृंगारफक्त आणि फक्त पैशासाठी करणारी मंडळी आमच्यात आहेत. यांनाही तुंम्ही सोडून देणार का?????? समांतरः- माझ्यासारखा माणूसंही या कामात धंदेवाइकपणा वापरतो,पण ते फक्त स्वतःची कुठल्याही प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून! (यापूर्वी ती भरपूर झालेलिही आहे,म्हणून सध्याच्या काळात हे न अवडणारं पाऊल मलाही उचलावं लागत आहे.तरिही मी त्याला मर्यादा घालून घेतलेल्या आहेतच!)

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रामाणिक आणि मोलाचा प्रतिसाद ! केवळ स्वतःची फसवणूक न होण्यासाठी खबरदारी घेण्यात काहीच अनैतीक किंवा अधार्मिक नाही. उलट तसे न करणे अयोग्य आहे... कारण अश्या परिस्थितीचा उपयोग धूर्त लोक अनैतीक फायदा घेण्यासाठी करतात.

In reply to by नाखु

एखादा व्यवसाय व्यवसाय म्हणून स्वीकारल्यानंतर , व्यवसाय म्हणून येणार्‍या आव्हानाना सामोरे जावेच लागते. पौराहित्य व्यवसाय म्हणून करत असू तर त्या व्यवसायाचे प्रचलित नियम पाळावेच लागतील. कारण व्यवसाय आहे म्हणजे स्पर्धा आहे आणि त्यातील व्यवहार म्हणून चालणारी लांडी - लबाडी देखील आली. जर तुम्ही तसे करत नसाल तर तुम्ही "व्यवसाय" करत नाही ! जसे धर्मादाय दवाखाने असतात तसेच धर्मादाय पौराहित्य ! आणि ज्याला भक्ति / उपासना/ साधना करायची आहे त्याने पौराहित्य कशाला करायला हवे ? माझा मुद्दा इतकाच की , जगभराची पापे आम्ही करून येणार आणि एखादी पूजा / अभिषेक द्वारे त्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणार, या देवाण घेवाणी मध्ये पुरोहीताने मात्र पैसा कमावता कामा नये , ही अपेक्षा गैर आहे ! बहुतांशी पूजा - अर्चा या सकाम उपासना स्वरुपातच असतात, हा साधा व्यवहार आहे , तुम्ही मला पैसे द्या , त्याबदल्यात मी तुमच्या पापाचे परिमार्जन करतो/ झाले आहे असे जाहीर करतो, तुमच्या डॉन स्कूल टाईप शाळा भरमसाठ फी घेऊन मुलाला शिक्षण दिले असे जाहीर करतात , तेव्हा तुम्ही करतात त्याचे व्याल्यु ऑडीट? मग पुरोहितांसाठीच का ? व्हाय धिस डबल स्टंन्डर्ड ?

In reply to by विटेकर

घरोघरी जसे फ्यामिली डोक्टर असतात तसे घरोघरी पुरोहित / ज्योतिषी/ महन्त / महाराज असतात , तुमच्या सम्यसेवर त्यांचा तोडगा असतो... ते मग कालसर्पयोग शांती महाअभिषेक / गोदाने - सवर्णदाने सांगतात / खडे - रत्ने सांगतात . या उपासना कुठे पूर्ण करुन घ्यायच्या ते सांगतात.. तसे त्यांचे लागे - बांधे असतात.. कदाचित कमिशन ही असेल. आत्मूस गुरुजी , ही काळाची गरज आहे !!! मागणी तशी पुरवठा हा व्यवहराचा साधा नियम आहे ! आम्ही अनीतीने पैसा मिळवणार मग त्याचे परिमार्जन काय ? किती सोपा उपाय आहे हा ? आम्ही कसा ही पैसा कमावू पण पुरिहितांनी मात्र नीतीनेच वागले पाहीजे ही अपेक्षा गैर आहे. एकेका धंद्याचे दिवस असतात हो ! एकेकाळी वकिलांचे होते आता पुरिहितांचे आणि आय टी हमालांचे आहेत . चालायचेच, कालाय तस्मै नमः !

In reply to by विटेकर

तीर्थे धोण्डा पाणी ! असे आमच्या संतानी ठ्णाणा करून सांगितले , वारीला चालत जाऊन शिखराचे दर्श्न घेऊन परतायचे असे साम्गितले आहे , त्याचा कोण सारासार विचार करते ? व्यर्थ भार रामावरी घालू नये ! असे समर्थांनी सांगितले पण देव म्हणजे देव (Give) हे काही आमच्या डो़kयातून जात नाही ! उलट फलश्रुती देणार्‍या सत्यनारायणाच्या पूजा आणि संतोषीमातेची व्रते प्रचंड लोकप्रिय ! कारण सिम्पल ! गिव अन्ड टेक !

In reply to by विटेकर

हे खूप आवडले ! कानाखाली की काय म्हणतात ना तसे ;) :) माझा मुद्दा इतकाच की , जगभराची पापे आम्ही करून येणार आणि एखादी पूजा / अभिषेक द्वारे त्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणार, या देवाण घेवाणी मध्ये पुरोहीताने मात्र पैसा कमावता कामा नये , ही अपेक्षा गैर आहे ! बहुतांशी पूजा - अर्चा या सकाम उपासना स्वरुपातच असतात, हा साधा व्यवहार आहे , तुम्ही मला पैसे द्या , त्याबदल्यात मी तुमच्या पापाचे परिमार्जन करतो/ झाले आहे असे जाहीर करतो, तुमच्या डॉन स्कूल टाईप शाळा भरमसाठ फी घेऊन मुलाला शिक्षण दिले असे जाहीर करतात , तेव्हा तुम्ही करतात त्याचे व्याल्यु ऑडीट? मग पुरोहितांसाठीच का ? व्हाय धिस डबल स्टंन्डर्ड ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मुद्दा तर बिनतोड आहे. जर हा मुद्दा अजून ताणायचा तर देवस्थानांनी अजून चांगल्या सोयीसुविधा पुरवल्या पाहिजेत. हा व्यवसाय पूर्ण ग्राहककेंद्री करण्याचे पोटेन्शिअलही आहे यात.

In reply to by बॅटमॅन

शेगांवकरांनी सकारात्मक पावले उचलली ! व केव्हडी गर्दी होते तिथे ? कधी पैसे कमी पडतात त्यांना ? उलट अन्य तीर्थांच्या ठिकाणी त्यांचीच सोय चांगली असते! अध्यात्माचा उत्तम व्यवसाय करता येतो ! आणि सुखनैव पैसे ही कमावता येता, किती उदाहरणे सांगू? पुढच्या काही वर्षात भारत एक अध्यात्मिक पर्यट्न केन्द्र म्हणून उदयाला येईल,

In reply to by विटेकर

आध्यात्मिक पर्यटन केंद्रासाठीचे इंटर्नल मार्केट हजारो वर्षे जुने आहे भारतात. एकही फॉरेनर आला नाही असे मानले तरी त्यामुळे या मार्केटात वट्ट फरक पडत नाही. प्रश्न इतकाच आहे की एरवी धर्माच्या नावे गळे काढणार्‍यांनी किमान स्वच्छता आणि बेसिक सोयी जरा चांगल्या पुरवल्या तर त्यांना सगळेच दुवे देतील. चार पैशे जास्त घेतले तरी चालेल, पण सोयींत हयगय नको. हिंदूंना या बाबतीत ख्रिश्चन आणि मुसलमानांपासून शिकण्यासारखे बरेच आहे.

In reply to by विटेकर

तुमच्या या सकारात्मकतेला मी ही ना म्हणत नाही.. पण टेबलाखालच्या कमाईचे आणि आरेरावी गुंडगिरी भ्रष्टाचार लांड्यालबाड्या श्टाइलची एजंट गणिका सर्व्हिस सेवा...मला कदापिही मान्य होणार नाही.. तुमच्या पहिल्या समर्थनाचा सर्व रोख तसा होता,म्हणून आक्षेप नोंदविला. :)

त्र्यंबकेश्वरच्या गर्दीत, भर गाभाऱ्यात माझ्या सात महिन्याच्या गर्भवती पत्नीस बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस महिलेकडून धक्काबुक्की झाली. आम्ही जाम राडा केला. पण त्या लोकांना (विश्वस्त, बंदोबस्तावरील वरिष्ठ आणि रांगेतले लोक) यांना काही म्हणजे काहीच वाटले नाही. वरील तिघांवर तर कधीच विश्वास नव्हता पण त्या क्षणापासून देव आणि देवळे यांच्यावरून कायमचा विश्वास उडाला. जो देव भक्तांची अशी हेळसांड डोळ्यांदेखत बघतो आणि काही करत नाही तो देवच नाही. तेंव्हापासून त्र्यंबकेश्वर आम्हास दुरावला तो कायमचा. मंदिरातल्या पिढीजात पुजाऱ्यापैकी कोणीतरी आमचे अगदी जवळचे नातेवाईक आहेत. त्यांची कुबडी न वापरता एक सामान्य भाविक म्हणून स्वच्छ मानाने दर्शनास गेलो. चांगलाच दृष्टांत मिळाला. आयुष्याचे सार्थक झाले. मंदिरात सोने, द्रव्य दानकर्त्या भाविकांबद्दल, ते यथेच्छ उधळणाऱ्या पुजारी विश्वस्त वैगेरे लोकांबद्दल, उगाच रांगा लावून गर्दी करणाऱ्या सुजन सुशिक्षित भाविकांबद्दल, मंदिर आणि भोवतालच्या व्यवस्थेच्या उडालेल्या बोजवाऱ्या बद्दल आम्हांस काहीही खंत खेद नाही. जे चालले आहे ते उत्तमच आहे. जशी प्रजा तशी व्यवस्था त्यामुळे जिथे आपल्याला पटत नाही तिथे आम्ही जात नाही आणि उगाच आजकाल त्रागा करून घेत नाही. मंदिरांबद्दल ज्या कुणी मिपा सदस्यांनी हळहळ किंवा चिंता व्यक्त केली ती त्यांच्या मंदिर व त्यातल्या देवतांशी असलेल्या हृदयस्थ बंधनातून, हे देव आपले होते आहेत ह्या भावनेतून. पण आज खरच देव आपले राहिले नाहीत. देवाने खरच अशी परिस्थिती आणून खरे भक्त कोण आणि ढोंगी कोण याची ओळख पटावी याची चांगली व्यवस्था केली. बायबल मध्ये जसे जजमेंट डे ला खऱ्या आणि खोट्या अनुयायांची ओळख देव करेल असे सांगितले ते काही अगदीच खोटे नाही म्हणा. त्याची प्रचीती येत आहे. अध्यात्माच्या माझ्या अभ्यासावर मला इतकाच कळले कि प्रत्येक जण वेगवेगळ्या पायरीवर आहे. देवपूजा, कर्मकांडे, नवस सायास, बुवाबाजी ह्या सगळ्या पायऱ्या आपल्या ओलांडून झाल्यात आता आत्मज्ञानाच्या दिशेने पुढच्या पायऱ्यांवर आगेकूच सुरु आहे. कालांतराने त्याही पायऱ्या थोतांड वाटू लागतील आणि कुठल्यातरी जन्मात मोक्ष मिळेल. त्यामुळेच इतर पायऱ्यांवर असलेल्या देवभोळ्या प्रजेबद्दल काही सुख दु:ख वाटत नाही. त्यांचाही प्रवास चाचपडत चालू आहे, आपलाही प्रवास चाचपडत चालू आहे.

पण कम्युनिस्ट लोक देवळात जातातच कशाला ?

कशाला देवळात जातात लोक? एवढं सगळं करुन देव पावणार आणि नाही गेलात तर कोपणार वगैरे वाटुच कसं शकतं? एवढा बिनडोकपणा उघड उघड डोळ्याला दिसत नाही का?

In reply to by बॅटमॅन

मी तर देवळावरची शिल्पे आणि आतली रचना बघण्यासाठी जाते. त्र्यंबकेश्वरला ते सुद्धा बघायला दिलं नाही दळभद्री लोकांनी.

In reply to by पिलीयन रायडर

पब्लीकने तेव्हढा कॉमनसेन्स वापरला असता तर त्यातल्या "कॉमन" शब्दावर किती उपकार झाले असते.