मुळात माझे आणि देवाचे नाते फारच घट्ट.
मी मागावे, हट्ट करावा आणि त्याने द्यावे, हा आमच्या दोघां मधला अलिखित नियम.देवाच्या दरबारात मध्यस्थाची गरज नसते, हा माझा अनुभव आणि आमच्यापेक्षा आमच्या बायकोचे देव जास्त ऐकतो, हा दुसरा अनुभव.
आमच्या वडीलांचे आणि आईचे मात्र देवाशी फार काही पटत नाही.तसे दोघेही फिरायला वगैरे जातात, पण मुद्दाम जेजुरी किंवा आंबिजोगाईला जात नाहीत.
आमचे लग्न झाले आणि लग्नाच्या वेळी समजले की, आमची बायको फार धार्मिक.(तसे लग्ना आधीच थोडी-फार कल्पना आली होती.पण लग्ना नंतर शिक्का-मोर्तब झाले.)
आमचे कुलदैवत म्हणजे जेजूरी.लग्ना आधी एकदा जावून आलो होतो.पण तिथला बाजार बघून मला परत तिथे पावूल ठेवू नये, असेच वाटत होते.
लग्ना नंतर परत एकदा जेजूरीला भेट द्यावी लागणार होती.बायकोचा तसा हट्ट पण होताच.लग्ना नंतर वेळ-काळ बघून मी आणि बायको, जावून आलो.तिला पण माझ्या सारखाच अनुभव (पुजार्यांचे पैसे काढणे) आल्याने, ती म्हणाली, "हे नक्की देवस्थान आहे की, पुजार्यांसाठी टांकसाळ?"
असो,
पुढे नौकरी बदलल्याने, चिपळूणला गेलो.सहज म्हणून गुहागरला गेलो.छान समुद्र-किनारा आणि बाजूलाच मंदिर.का कुणास ठावूक, पण मंदिरात अभिषेक करायची, मनापासून इच्छा झाली.सकाळ असल्याने मंदिरात चौकशी केली.
भटजी म्हणाले,"बसा.करू या अभिषेक.आता ही बॅच संपली, की नंतर तुमचाच नंबर."
मी, " अहो, पण माझ्या कडे पुजेचे सामान किंवा पीतांबर तर सोडाच.जानवे पण नाही."
गुरुजी,"ते होईल हो.तुम्ही बसा तर खरे."
जेजूरीचा अनुभव असल्याने, हा भटजी आता किमान ५०१/- रु. तरी काढणार्,ह्यांत शंका न्हवती.
एक अर्ध्या तासातच आधीच्या मंडळींचा अभिषेक झाला, आणि आमचा नंबर लागला.
गुरुजींनी मस्त पीतांबर नेसवले आणि आत गाभार्यात गेलो.
जानवे घातले आणि मस्त साग्रसंगीत पुजा झाली.
दक्षिणा विचारली.
भटजी,"अभिषेक करून तुम्हाला समाधान वाटले का?"
मी,"हो."
भटजी,"मग तुम्हाला योग्य वाटेल ती दक्षिणा द्या.मला ५/- दिलेत तरी चालतील."
योग्य ती दक्षिणा दिली आणि एकच ठरवले, परत जर कधी अभिषेक करावासा वाटला तर गुहागरलाच जायचे.
डिस्क्लेमर : देव देवालयांत नसून आपल्याच मनांत असतो, ह्यावर माझा ठाम विश्र्वास असल्याने, मी शक्यतो घरच्या कुठल्याच कार्याला भटजी बोलवत नाही.आमच्या घरी सुपारीचाच गणपती असतो आणि आमच्या सत्यनारायणाला भटजीची आवश्यकता नसते."
वाचने
45289
प्रतिक्रिया
204
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपल्या बुवांची (अतृप्त आत्मा)
In reply to आवडला आणि पटला पण . लग्न by स्रुजा
ऐका सत्य नारायणाssssची कथा!!!
In reply to आपल्या बुवांची (अतृप्त आत्मा) by हाडक्या
तुमच्या वरच्या लेखाकडे शीर्षक
In reply to ऐका सत्य नारायणाssssची कथा!!! by अत्रुप्त आत्मा
ओके मुवी काका
@ मूवी तुम्हाला अभिषेक कसा
प्रतिसाद हलकाच न घेता, माझी भुमिका मांडत आहे...
In reply to @ मूवी तुम्हाला अभिषेक कसा by देशपांडे विनायक
कस्तूरी कुन्डल बसे, मृग ढूढै
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }देवस्थानाचे संस्थान झालेले
पैसे कमावण्यातही एकेका
बारा ज्योतिर्लिँगांपैकी एक
In reply to पैसे कमावण्यातही एकेका by कंजूस
ब्राह्मण नसाल तर बहुतेक
In reply to बारा ज्योतिर्लिँगांपैकी एक by सतिश गावडे
तोच तर मुद्दा आहे !!
In reply to ब्राह्मण नसाल तर बहुतेक by हाडक्या
तुमचा मित्र ब्राह्मण आहे हे
In reply to तोच तर मुद्दा आहे !! by प्रसाद गोडबोले
+१
In reply to तुमचा मित्र ब्राह्मण आहे हे by स्वामी संकेतानंद
सत्यनारायणाची पूजा घालताना
त्यातला नारायण सत्य असेल तर
In reply to सत्यनारायणाची पूजा घालताना by सतिश गावडे
सत्य कंडिशनल असते तर.
In reply to त्यातला नारायण सत्य असेल तर by अजया
देव, पूजा याबाबतीत सत्य
In reply to सत्य कंडिशनल असते तर. by सतिश गावडे
ताई...
In reply to देव, पूजा याबाबतीत सत्य by अजया
सहमत
In reply to ताई... by मुक्त विहारि
मुवि,तुमच्यासारखेच सत्यनारायण
In reply to ताई... by मुक्त विहारि
गुहागरला आमची कुलदेवी आहे
माझ्या धाग्याची जाहिरात करुन
In reply to गुहागरला आमची कुलदेवी आहे by कॅप्टन जॅक स्पॅरो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }जाता जाता :- तुळजाभवानी
In reply to माझ्या धाग्याची जाहिरात करुन by मदनबाण
"मंदिर संस्थाने" हा अतिशय कमी
In reply to जाता जाता :- तुळजाभवानी by सतिश गावडे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }वरचा दुर्गादेवी लेख वाचला.
In reply to माझ्या धाग्याची जाहिरात करुन by मदनबाण
उफराट्या गणपतीपुढे थोड्या
In reply to वरचा दुर्गादेवी लेख वाचला. by कंजूस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }हो तेचं मंदिर हे. बागेतली
In reply to वरचा दुर्गादेवी लेख वाचला. by कंजूस
उफराट्या गणपतीपुढे थोड्या
In reply to वरचा दुर्गादेवी लेख वाचला. by कंजूस
गुहागर एसटी स्टँडकडुन
In reply to उफराट्या गणपतीपुढे थोड्या by के.पी.
गुहागर एसटी स्टँडकडुन
In reply to गुहागर एसटी स्टँडकडुन by कॅप्टन जॅक स्पॅरो
आमच्या प्रतिसादावर आपल्या
In reply to माझ्या धाग्याची जाहिरात करुन by मदनबाण
भरपुर मंदिरात जाणं झालयं
आम्च्या गुर्जींचा धंदा
बिंधास्त र्हावा.....
In reply to आम्च्या गुर्जींचा धंदा by टवाळ कार्टा
८०० प्रतिसाद पुरले नाहित काय
तसे नाही हो....
In reply to ८०० प्रतिसाद पुरले नाहित काय by अनुप ढेरे
तुळजा भवानी मंदिर
तुम्ही दिलेल्या साडीचे पुढे
In reply to तुळजा भवानी मंदिर by सविता००१
टका....
In reply to तुम्ही दिलेल्या साडीचे पुढे by टवाळ कार्टा
इथे पुढे काय होणार
In reply to तुम्ही दिलेल्या साडीचे पुढे by टवाळ कार्टा
उत्तम साड्या हव्या असतील तर...
In reply to इथे पुढे काय होणार by सविता००१
मुवि,
In reply to उत्तम साड्या हव्या असतील तर... by मुक्त विहारि
गोव्याला जाउन
In reply to उत्तम साड्या हव्या असतील तर... by मुक्त विहारि
गोव्याला जाउन साडी खरेदीत
In reply to गोव्याला जाउन by कपिलमुनी
@ह्या सगळ्या साड्या देवीचा
In reply to उत्तम साड्या हव्या असतील तर... by मुक्त विहारि
माहित असलं तरीही इतकं
In reply to इथे पुढे काय होणार by सविता००१
देवीला आलेले नारळ/साड्या
जेपी यांच्या प्रतिसादाच्या
लेख आवडला
इथे झोडा की
In reply to लेख आवडला by क्लिंटन
असाच अनुभव अजमेर शरीफ ला आलाय
असाच अनुभव फतेहपूर सीक्रीला
In reply to असाच अनुभव अजमेर शरीफ ला आलाय by दादा पेंगट
अगदी असाच अनुभव मला पण
In reply to असाच अनुभव फतेहपूर सीक्रीला by पैसा
१७
In reply to अगदी असाच अनुभव मला पण by सुबोध खरे
१२+३+२?
In reply to १७ by प्रसाद गोडबोले
खरं तर १८
In reply to १२+३+२? by सूड
@१२+३+२+१ ! >> __/\__
In reply to खरं तर १८ by प्रसाद गोडबोले
हे १७...१८ काय आहे?
In reply to @१२+३+२+१ ! >> __/\__ by अत्रुप्त आत्मा
हे काय प्रकरण आहे? १७ काय?
In reply to १७ by प्रसाद गोडबोले
आम्हाला आमची दैवते पावेनात
मी काय म्हणतो...
In reply to आम्हाला आमची दैवते पावेनात by कंजूस
स्वामीजी
In reply to मी काय म्हणतो... by स्वामी संकेतानंद
आमचा देव कर्म! कर्म करा,
In reply to स्वामीजी by पैसा
हत्तेरे की!
In reply to आमचा देव कर्म! कर्म करा, by स्वामी संकेतानंद
खड्ड्यात जावा?
In reply to हत्तेरे की! by पैसा
(No subject)
In reply to खड्ड्यात जावा? by बॅटमॅन
ह्या
In reply to खड्ड्यात जावा? by बॅटमॅन
(No subject)
In reply to ह्या by केदार-मिसळपाव
अहो ताई!
In reply to हत्तेरे की! by पैसा