देवस्थाने आणि भटजी....
मुळात माझे आणि देवाचे नाते फारच घट्ट.
मी मागावे, हट्ट करावा आणि त्याने द्यावे, हा आमच्या दोघां मधला अलिखित नियम.देवाच्या दरबारात मध्यस्थाची गरज नसते, हा माझा अनुभव आणि आमच्यापेक्षा आमच्या बायकोचे देव जास्त ऐकतो, हा दुसरा अनुभव.
आमच्या वडीलांचे आणि आईचे मात्र देवाशी फार काही पटत नाही.तसे दोघेही फिरायला वगैरे जातात, पण मुद्दाम जेजुरी किंवा आंबिजोगाईला जात नाहीत.
आमचे लग्न झाले आणि लग्नाच्या वेळी समजले की, आमची बायको फार धार्मिक.(तसे लग्ना आधीच थोडी-फार कल्पना आली होती.पण लग्ना नंतर शिक्का-मोर्तब झाले.)
आमचे कुलदैवत म्हणजे जेजूरी.लग्ना आधी एकदा जावून आलो होतो.पण तिथला बाजार बघून मला परत तिथे पावूल ठेवू नये, असेच वाटत होते.
लग्ना नंतर परत एकदा जेजूरीला भेट द्यावी लागणार होती.बायकोचा तसा हट्ट पण होताच.लग्ना नंतर वेळ-काळ बघून मी आणि बायको, जावून आलो.तिला पण माझ्या सारखाच अनुभव (पुजार्यांचे पैसे काढणे) आल्याने, ती म्हणाली, "हे नक्की देवस्थान आहे की, पुजार्यांसाठी टांकसाळ?"
असो,
पुढे नौकरी बदलल्याने, चिपळूणला गेलो.सहज म्हणून गुहागरला गेलो.छान समुद्र-किनारा आणि बाजूलाच मंदिर.का कुणास ठावूक, पण मंदिरात अभिषेक करायची, मनापासून इच्छा झाली.सकाळ असल्याने मंदिरात चौकशी केली.
भटजी म्हणाले,"बसा.करू या अभिषेक.आता ही बॅच संपली, की नंतर तुमचाच नंबर."
मी, " अहो, पण माझ्या कडे पुजेचे सामान किंवा पीतांबर तर सोडाच.जानवे पण नाही."
गुरुजी,"ते होईल हो.तुम्ही बसा तर खरे."
जेजूरीचा अनुभव असल्याने, हा भटजी आता किमान ५०१/- रु. तरी काढणार्,ह्यांत शंका न्हवती.
एक अर्ध्या तासातच आधीच्या मंडळींचा अभिषेक झाला, आणि आमचा नंबर लागला.
गुरुजींनी मस्त पीतांबर नेसवले आणि आत गाभार्यात गेलो.
जानवे घातले आणि मस्त साग्रसंगीत पुजा झाली.
दक्षिणा विचारली.
भटजी,"अभिषेक करून तुम्हाला समाधान वाटले का?"
मी,"हो."
भटजी,"मग तुम्हाला योग्य वाटेल ती दक्षिणा द्या.मला ५/- दिलेत तरी चालतील."
योग्य ती दक्षिणा दिली आणि एकच ठरवले, परत जर कधी अभिषेक करावासा वाटला तर गुहागरलाच जायचे.
डिस्क्लेमर : देव देवालयांत नसून आपल्याच मनांत असतो, ह्यावर माझा ठाम विश्र्वास असल्याने, मी शक्यतो घरच्या कुठल्याच कार्याला भटजी बोलवत नाही.आमच्या घरी सुपारीचाच गणपती असतो आणि आमच्या सत्यनारायणाला भटजीची आवश्यकता नसते."
वर्गीकरण
प्रतिक्रिया
.
बरं
पटलं. हिंदुधर्मात अशी काही
हिंदुधर्मात अशी काही मतं
अगदी गोमांससुध्दा >> याबाबत
इंडोनेशियाच्या बाली
अगदी गोमांससुध्दा >> याबाबत साशंक पण बाकी सग्ळे बरोबरइंडोनेशियाच्या बाली प्रांतामध्ये ८०% पेक्षा जास्त जनता हिंदू आहे. तेथिल जनता गोमांस खाते, सणासुदीला तर नक्कीच (भारतात कोंबडी-मटण खाल्ले जाते तसेच). फक्त पुजारी मंडळी (ब्राच्मन) गोमांस खात नाहीत. अनेक संप्रदाय आणि चार वर्ण असले तरी त्या सर्वांत रोटीबेटी व्यवहार सहजपणे होतात. बालीत हिंदू धर्म भारतातून गेला. मात्र गेल्या काही शे वर्षांच्या इंडोनेशियाच्या मुस्लिमीकरणाच्या प्रक्रियेने ते बेट सर्व बाजूंनी मुस्लिम समाजाने वेढले गेले आणि त्याचा भारतिय हिंदू समाजाशी संपर्क तुटला होता. हा इतिहास पाहता जातीव्यवस्थेची, शाकाहाराची आणि विषेशतः गोमांस न खाण्याची रुढी सुरू होण्यापूर्वी भारतातल्या हिंदू धर्माची काय परिस्थिती असावी याचा ठोकळ अंदाज बालीवरून यावा. बाकी प्राचीन भारतिय साहित्यात गोमांस खाण्याचेच नव्हे तर यज्ञाच्या कोणत्या प्रकारच्या पुरोहितांना यज्ञात बळी दिलेल्या पशूंचा (यात गायीबैलही होते) कोणता भाग द्यावा याचेही नियम नमूद केलेले आहेत. अवांतर : अर्थातच, मांस / गोमांस खावे की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आणि हक्क आहे हे नि:संशय. पण त्याचा अस्मिता वगैरेसाठी उपयोग करणे हास्यास्पद आहे.अगदी मान्य..
बादवे, बीफ म्हणजे गायीचेच
बीफ : पूर्ण वाढ झालेल्या गाय
वील आणि कॅराबीफ या संज्ञा
+१ .. हेच म्हणायला आलो होतो.
बाकी मांसाहाराबाबत एक धागा
बेकायदेशीर
शेतात घुसलेल्या रानडुकराची
एवढा सव्यपसव्य कुणी करायला
इथे आंग्लदेशात venison
शब्दच काय.. बर्र..
कोकणात तर रानडुकराची शिकार
पोलिस गाडत नाहीत सहसा..
खरं आहे... म्हटलं आहेच ना की,
+१.कुठे शोधिशी रामेश्वर अन्
आणि हे दुसरे उदाहरण
देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना दावे देव आपणात आहे, शिर झुकवोनिया पाहे
गदिमांना अभिवादन.अगदी खरे
होय दर्दूकाका!
आवडला आणि पटला पण . लग्न
२००$ ? काय संगताय काय?
रच्याकने , कोकणात शक्यतो
कोकणात शक्यतो सर्वत्र चांगलेच अनुभव येतील.....
>>"गणपती-पुळ्यातील गणपती
त्रंबकेश्वरच्या व्यव्स्थापनाला, चांगल उखळात घालुन कुटेन!!
अहो १५ वर्षापूर्वी त्या
त्र्यंबकेश्वर!
येस्स
कोल्हापुरला दर्शन घ्यायची
>>कोल्हापुरला दर्शन घ्यायची
१५ दिवसांपूर्वीच
अब समझा? मै इतनी गुस्सा क्युं
कोल्हापूर बेश्ट हे तर खरंच..
वेरी ब्याड
>>कोकणात शक्यतो सर्वत्र
तर काय ! आम्हाला वाटलंच होतं
आमच्या इथले गुर्जी
बाकी
कर्मकांडं टाळा, सदवर्तनावर भर द्या.
१००% सहमत काका.
चायला घरातल्या देवघरात देव
घरातलं देवघर माझ्यासाठी
नतमस्तक व्हावे असे व्यवस्थापन...
'काय लागेल ते लिहा, साहेब.
आणि हे अख्ख्या देशभरच होतं