Skip to main content

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 15/01/2015 03:24 या दिवशी प्रकाशित केले.
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

वाचने 367191
प्रतिक्रिया 1423

प्रतिक्रिया

In reply to by टवाळ कार्टा

हॅ.हॅ.हॅ... ;) तू हे वाचणार हे माहित होतच बरं का ! ;) बाकी हे टोचुन घेण्याचा प्रकार पाहुन झाल्यावर पाखरं काहीही म्हणजे काहीही करु शकतात याची खात्री मात्र पटली !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- स्वाईन फ्लूचा कहर, देशात 624 बळी, राज्यात बळींचा आकडा 72 वर

In reply to by सूड

"हे" म्हणजे अगदी छोटीशी मेटल पीन असते जी टोचुन घेण्याचे धाडस ही फडफडणारी पाखरं करतात. हा पिअर्सिंग मधला नविन प्रकार आहे असे कळले !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- स्वाईन फ्लूचा कहर, देशात 624 बळी, राज्यात बळींचा आकडा 72 वर

In reply to by मदनबाण

हल्लीच एक नविन पिअर्सिंगचा प्रकार कळला आहे ! हे पिअर्सिंग फक्त पाखरंच करुन घेतात ! काय एक एक उध्योग !
अशी पाखरे लय डेरिंगबाज अस्तात ;)

In reply to by स्रुजा

sex या विषयाबद्दल पण तेच , नैसर्गिक गरज मुलांची आणि मुलींची वेगळी कशी ? अपेक्षा पण वेगळी कशी असणार ? आता तो अनुभव एकमेकांबरोबर घेतल्याशिवाय आणि अनेकदा घेतल्याशिवाय परस्परपूरक आहेत का हे समजणं अवघड आहे पण मुलाचं टक्कल जर एखादी साठी टर्न ऑफ असेल तर त्यांचा अनुभव सुंदर बनण्याची शक्यता किती तरी पटीने कमी होते . अशा वेळी मुलीने टकलावरून नाकारलं एव्हड्या चांगल्या मुलाला असं म्हणणं एकांगी ठरू शकतं . वैवाहिक जीवनाचा पाया जर शारीरिक नातं असेल तर त्याला कमी का लेखायचं ? मुलींच्या अशा अपेक्षा असतात आणि त्या रेटण्या इतक्या किंवा त्यावरून एखादा मुलगा नाकारण्या इतक्या आता त्या धाडसी झाल्या आहेत हे चांगलंच आहे न? घरच्यांच्या दबावाला किंवा असं कसं नाही म्हणायचं म्हणून एखादीने केलं लग्न आणि नाही ती समरस होऊ शकली तर आयुष्यभर दोघं नाखूष . त्यापेक्षा हे बर नाही का ? मुली आता बोलून दाखवतात आणि त्यांच्या अपेक्षा वाढल्यात असं म्हणण्यापेक्षा जी मुलगी अशा वातावरणात वाढून सुद्धा तुमच्याशी लग्न करायला तयार असेल ती अगदी मनापासून तयार आहे यात दिलासा नाही का वाटत ? किंबहुना तो तसा वाटण्याइतकं प्रगल्भ आता मुलांनी आणि समाजानी पण व्हायला हवं .
वाहव्वा!!! :Happy: एव्हढं कात्रण हायस्कूल/कॉलेजच्या कामविषयाच्या अभ्यासक्रमाचा विषयभाग बनवावं अश्या तोडीचं आहे. क्लासिक वन! :Happy:

In reply to by टवाळ कार्टा

सगळ्यांचे मनापासून धन्यवाद , बाकी कौतुक करताना मिपाकर कधी हातचं राखून करत नाही हे खरं. :) हा धागा वाचनमात्र होईल म्हणून ही घाईने आधी आभार मानून घेते . स्वॅप्स यांचा प्रतिसाद पण आवडला .

In reply to by अत्रुप्त आत्मा

पण मुलाचं टक्कल जर एखादी साठी टर्न ऑफ असेल तर त्यांचा अनुभव सुंदर बनण्याची शक्यता किती तरी पटीने कमी होते . अशा वेळी मुलीने टकलावरून नाकारलं एव्हड्या चांगल्या मुलाला असं म्हणणं एकांगी ठरू शकतं
लग्नानंतर एकदोन वर्षातच टक्कल पडलं तर लगेच टर्न ऑफ होणार का? आजकाल केस रुजवूनही मिळतात. टकलावरुन नाकारणं एकांगीच आहे.

In reply to by बॅटमॅन

आमच्या घरी तर तिशीतच टक्कल पडायची परंपरा आहे. हे सगळ वाचून माझे आधीच कुरळे असलेले केस आणखी कुरळे झाले राव!! ;)

In reply to by टवाळ कार्टा

मी मला जे योग्य वाटतं ते बोलतो. अमका तमका आमच्या सो कॉल्ड कंपूतला आहे म्हणून त्याला उगा चान चान कमेंटी लिहीणं जमत नाही. जे वाटलं ते लिहून टाकतो, उगा पंक्तिप्रपंच नाही.

In reply to by पैसा

काही कन्क्लुजने ^_~ लग्नाळू मुली मिपावर कमी आहेत! आहेत त्यातल्या काहींनी जमवली असू शकतील! न जमवलेल्या पण जमण्याबाबत काॅन्फिडंट असलेल्या पाॅपकाॅर्न घेऊनच बसल्या असतील!

In reply to by अजया

कन्क्लुजन असं आहे की. १. मिपावरील सर्व विवाहित स्त्रियांनी पैसा, घर वगैरे न पाहता नवऱ्याचा स्वभाव व कर्तृत्वावर विश्वास ठेवून लग्न केले २. सर्वांचे नवरे अर्थातच कर्तृ्त्ववान असल्याने सगळ्यांची नंतर घरे, पैसे, परदेशप्रवास वगैरे झाले. ३. त्यामुळे अविवाहित मुलांनी शक्यतो मिपावरच काही जमतंय का ते पाहावं.

In reply to by आजानुकर्ण

या धाग्यावर लग्नाळू मुलींचे प्रतिसाद जास्त का नाहीत याबद्दल कन्क्लुजन पायजे! बादवे, मी लग्न केलं तेव्हा नवर्‍याजवळ त्याच्या मालकीचा एक प्लेस्टिकचा जग आणि २ कप होते. चमच्यापासून सगळं आम्ही दोघांनी पैसे साठवून विकत घेतलं. आमच्याकडे स्वतःचे घर, गाडी काय सायकल पण नव्हती. कर्तृत्व कोणाचं याबद्दल कोणतेही वाद किंवा भलत्या कल्पना नाहीत. कारण आम्ही दोघांनीही २५ वर्षे नोकर्‍या केल्या. आणि बास झालं असं वाटलं तेव्हा सोडून दिल्या!

In reply to by पैसा

पैसा ताई तुमचा प्रेम विवाह होता. असे म्हणतात कि दोघात प्रेम असलं कि चिंचेच्या पानावरही झोप येते. बघून करायचं तर कफल्लक माणसाशी किंवा टिनपाट मुलीशी कोण लग्न करेल हो?

In reply to by पैसा

हो पण आता दिवस वेगळे आहेत. खरेदीदाराला मार्केटमध्ये भरपूर चॉईसेस उपलब्ध आहेत. ओनली स्काय इज द लिमिट. त्यात आता शिक्षणापासून नोकरीपर्यंत सर्वोत्तमच पाहिजे असाही हट्ट सगळीकडे धरला जातो. लग्नाच्या बाजारातही सर्वोत्तमच जोडीदार पाहिजे हा आग्रहही त्यातूनच आलाय. सर्वोत्तम जोडीदार म्हणजे ज्याच्याकडे इतरांपेक्षा चांगली नोकरी, इतरांपेक्षा मोठे घर, इतरांपेक्षा जास्त पैसा वगैरे निकष. जर ते डील जमलं नाही तर थोडी किंमत उतरवून पाहायची जुळतंय का ते. जोपर्यंत हे मॅचप होत नाही तोपर्यंत घासाघीस चालतेच.

In reply to by पैसा

मी लग्न केलं तेव्हा नवर्‍याजवळ त्याच्या मालकीचा एक प्लेस्टिकचा जग आणि २ कप होते.
आमच्या कडे तर तेही नव्हते . आजकाल प्लॅस्टीकचे कप फुकट देतात चकना द्या की राव असे म्हणले तर चकन्याच्या फरसाणच्या २-३ पुड्या ही मिळतात =))

In reply to by आजानुकर्ण

१. मिपावरील सर्व विवाहित स्त्रियांनी पैसा, घर वगैरे न पाहता नवऱ्याचा स्वभाव व कर्तृत्वावर विश्वास ठेवून लग्न केले २. सर्वांचे नवरे अर्थातच कर्तृ्त्ववान असल्याने सगळ्यांची नंतर घरे, पैसे, परदेशप्रवास वगैरे झाले.
लहान पणी सगळेच क्रीकेट खेळतात पण २००-३०० मुलेच काहीतरी बनतात. पण फक्त सचिन तेंडुलकरचे उदाहरण घेउन फक्त क्रिकेट खेळा हा सल्ला देण्यासारखे आहे.

"Naked" Wedding for Poor Chinese Couples आपल्या शेजारी देशामध्ये हा (नेकेड वेडींग - कृपया शब्दशः अर्थ घेऊ नये) नवा प्रकार सुरू झाला आहे. हा प्रकार आपल्याकडे आल्यास बरे होईल.

माझ्यामते तरी, १)तो व्यसनी नसावा. २)माझ्याइतका किंवा माझ्यापेक्षा जास्त शिकलेला असावा, पण कमी नको. ३)कामाव्यतिरिक्त इतर छंदांची जोपासना करणारा असावा. आणि त्याची आर्थिक परिस्थिती, कमीतकमी ते छंद पूर्ण करता येतील अशी असावी. नाहीतर अस नको व्हायला की, फोटोग्राफीची आवड आहे, पण कॅमेराच नाही. यात पण शिक्षणाचा मुद्दा एवढ्या साठी "होता" की शिक्षण व्यक्तीला प्रघल्भ करते. पण लग्न या गोष्टीकडे सीरियसली पाहायला लागल्यापासून उच्च शिक्षण घेतलेल्या माठ लोकांची उदाहरणे बरीच दिसली आजुबाजूला. अजुन एक पैसा तै एकदा म्हणल्याप्रमाणे "क्लिक" व्हायला हवा.. ;)

In reply to by आजानुकर्ण

आणि सहजीवन .. आणि अपेक्षा.. आणि काय काय.. गुरुवर्य आले तर चर्चा संपून संवाद सुरु होईल हे मात्र नक्की. ;)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रत्येक मीपाकराने आपापली कर्मकहाणी प्रेमकहाणी/लग्नकहाणी लीहा. १००० होतात की नाही बघा.

लग्न ही दोन व्यक्तींच्यापुरतीच मर्यादित असावी अशी खासगी गोष्ट आहे हे माझे मत. व्यक्तिस्वातंत्र्य महत्त्वाचे आणि सर्वोच्च आहे. लग्न केलं किंवा नाही केलं, नुसतेच एकत्र राहिले, लग्न काही वर्षांतच मोडलं, परत दुसर्‍या जोडीदारांशी जुळलं, अशी दोन-दोन, तीन-तीन लग्ने एकेकाची होऊ लागतील. त्यात काही गैर नाही आणि संस्कृतीचा म्हणा किंवा समाजाचा म्हणा, हा अटळ प्रवास होणार आहे. तस्मात्, लग्न ही कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यातली अत्यावश्यक आणि महत्त्वाची घटना आहे हा हट्टाग्रह आपण सोडून दिला तर बरेच प्रश्न सुटतील. आपल्याला काय करायचंय बाकीचे काय करताहेत किंवा त्यांना काय वाटतंय याच्याशी? जग गेलं खड्ड्यात. आपण जगू आपल्या धुंदीत. जोपर्यंत आपल्या हातून काही बेकायदेशीर घडत नाही किंवा कुणावर अन्याय होत नाही तोपर्यंत जगाची पर्वा करत बसू नये. लग्न करा अथवा नका करू. अगर हव्या तितक्या वेळा मोडा आणि करा. आपल्या मुलांनाही त्यांच्या १५-१६ व्या वर्षापासूनच स्वावलंबी जगायला शिकवा. त्यांच्या आयुष्याची मशागत करण्याचा आपला अट्टाहास प्रत्यक्षात त्यांची वाट लावत असतो. मुलांचे भविष्य त्यांचे त्यांना घडवू द्या. तुम्ही तुमच्या वृद्धापकाळाची सोय सर्वात आधी लावा. बस, इत्यलम्!

In reply to by एस

हे करायलाही तत्वतः काही विरोध असून नये. पण... आणि हा एक फार मोठा पण आहे... "दर कृतीला आणि दर कृतीच्या अभावालाही फायदे तोटे हे असतातच; ते डोळसपणे स्विकारायची तयारी हवी." इतकेच, बस :)

In reply to by एस

स्वॅप्स हे आयडियल आहे. सभोवतालची परिस्थिती नेहमीच तशी नसते.. नेहमीच तशी रहात नाही. तुम्ही ज्या समाजात राहता, त्यांची समग्र सामुहिक भुमिका नक्कीच विचारात घ्यावी लागते. तुमच्या आधीच्या प्रतिसादाला अनुमोदन अगदी डब्बल अनुमोदन पण एक्कांच्या "पण" सोबत. :)

In reply to by हाडक्या

तुम्ही ज्या समाजात राहता, त्यांची समग्र सामुहिक भुमिका नक्कीच विचारात घ्यावी लागते.
बरोबर आहे. स्वातंत्र्यवादी सकारात्मक सुधारणा असे ज्यास म्हणता येईल तशी भूमिका स्वत:च्या जीवनात घेणे हे दोन प्रकारे करता येते. एक म्हणजे क्रांतीसारखा बेधडक आणि जाज्ज्वल्य उपाय स्वीकारणे किंवा दोन पावले पुढे - एक पाऊल मागे असा मृदू पण ठाम कार्यक्रम राबवणे.

In reply to by एस

@स्वॅप्स तयारी म्हणण्यापेक्षा हिंमत पाहिजे. जग हे हिंमतीवर झुकवले जाते. केवळ काही काळाकरिता दाखविलेल्या हिंमतीपुरता हा प्रश्न मर्यादित राहत नाही... त्याचा आवाका त्यापेक्षा कितीतरी मोठा आहे.. सद्याच्या समाजात तसा निर्णय घेण्याचे अनेक परिणाम असू शकतात. त्यातले महत्वाचे काही असे : १. ही हिंमत केवळ हा निर्णय घेण्यार्‍यांनी आयुष्यभर (किंवा त्याच्या नशिबाने त्याअगोदर समाज बदलला तर तोपर्यंत) दाखवावी लागेल. ते समाजातच राहत असल्यामुळे, हे सर्व करण्यात त्यांना बर्‍याच शक्तीचा, मानसिक त्रासाचा आणि कदाचित आर्थिक नुकसानीचा ताण सहन करण्याची तयारी ठेवावी लागेल. २. याउप्पर, जर अश्या जोडप्याने मुलांना जन्माला घालायचे म्हटले तर त्या मुलांनाही लहान वयापासून समाजाचा विरोध सहन करावा लागेल. जोडपे मनाने कितीही हिंमतीचे असले तरी ती बालके तशी मनोधारणा घेऊन जन्माला येणार नाहीत आणि त्यांना ती परिस्थिती खडतर वाटेल हे आजही खात्रीपूर्वक सांगता येईल. शिवाय ज्या निर्णयामुळे त्यांना त्रास सहन करावा लागणार आहेत तो त्यांचा नाही / त्यांचे मत जमेस धरून घेतलेला नसणार आहे. ३. जर अश्या मुलांच्या वयात येण्याच्या काळापर्यंत समाजातील परिस्थिती जोडप्याच्या निर्णयाला अनुकूल झालेली नसली तर अजून समस्या उभ्या राहणार आहेत. एखादी गोष्ट तत्वतः मान्य असणे आणि तिचे तात्काळ व दूर्गामी परिणामांना तोंड देणे या अत्यंत भिन्न गोष्टी आहेत. जगाला हिमतीवर झुकणारे मानव विरळा जन्माला येतात... आणि समाजाकडून होणारा तीव्र त्रास सहन करणे ते टाळू शकत नाहीत.

In reply to by योगी९००

मुविंचे अभिनंदन तर आहेच पण एक गोष्ट जाणवली की खुद्द ते नुसता धागा काढून गायब आहेत. प्रतिसादांत फारसे कुठे दिसत नाहीत. मुवि, शोभत नाही हो एका कट्टासम्राटाला हे! :)

In reply to by जेपी

एक तर रात्रपाळी सुरु आहे आणि चर्चा इतकी सुंदर आहे की, ह्या चर्चेला गालबोट न लागलेलेच उत्तम, ह्या द्रुष्टीने चर्चेचा आनंद घेत आहे.

In reply to by मुक्त विहारि

धागाकर्त्याने २० प्रतिसाददेखील न देता, कोणीही घसा न ताणता, कोणाचीही अक्कल न काढता, कोणत्याही प्रकारचा अप्रिय वाद न निर्माण करता, धागा ७०० ला गवसणी घालतोय. मिपाच्या इतिहासात एकमेव अशी घटना असेल ही. (परत कधी घडेल असे वाटत पण नाही) :)

In reply to by हाडक्या

मला म्हणायचे होते की मुवींचे फ्यॅन्स मिपाभर पसरले आहेत (संपादकांपासून ते डुआयडींपर्यंत) :)

एक सत्यवचनी धगधगती काडी : मोठी बहिण सुस्थळी पडली असेल तर धाकट्या बहिणीचे लग्न जमवताना प्रत्येक बाबतीत जिजुंशी तुलना केली जाते. जिजुंचा पगार, घर, गाडी, फोरीन ट्रीप्स सासु सासरे, सासर्-माहेर यातील अंतर वगैरे वगैरे आणि अश्या धाकट्या बहिणी बरीच चांगली स्थळे नाकारताना पाहील्या आहेत. मोठी, धाकटी साली नसलेला :( - सौंदाळा

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

बहिणीच्या नवर्‍याला जीजू म्हणणं हेही प्रचंड डोक्यात जातं. चार लाथा घालाव्याशा वाटतात असे शब्द बोलणारे लोक्स पाहिले की.

In reply to by बॅटमॅन

+१ सहमत आमचा मेव्हणा जिजु, जिजु करायला लागला तेव्हा सरळ त्याला मला नावाने बोलाव सांगितले तरीपण जिजुचे पालुपद चालुच, मग बायकोला सांगुन त्याच्या मुसक्या आवळल्या ;) आता मेव्हणा सौंदाळादादा (अरे दादा) म्हणतो, ते ठिक वाटते.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

उत्तम केलेत. माझ्या बहिणींच्या नवर्‍यांना मीही सरळ नावाने हाक मारतो. असली नॉर्दिंडियन स्टाईल आजिबात आवडत नाही.