Skip to main content

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 15/01/2015 03:24 या दिवशी प्रकाशित केले.
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

वाचने 367426
प्रतिक्रिया 1423

प्रतिक्रिया

३०० अहो मुवि.... उठा, उठा आता (तरी) !

जेप्याने काही सत्कार केला नाही ३००+ चा!! सर्व लग्नेच्छुक मुलामुलींच्या काळजाला हात घालणार्या धाग्याची तीन शंभरी भरल्याबद्दल मुविंचा सत्कार करण्यात येत आहे.पाचशेसाठी आगावु शुभेच्छा!!

In reply to by अजया

सगळे संपादक दुष्ट आहेत. ५०० प्रतिसाद आजवर एकदाही करू दिलेले नाहीत. अगदी त्या इंच इंच वाल्या धाग्यावरही ४७४ च प्रतिसाद आहेत. अजून २६ प्रतिसादांनी काय झालं असतं? अच्रत मेले :(

In reply to by बॅटमॅन

हा आपी. लैच दुश्ट ग्यांग हाय. त्या स्पावड्याच्या धाग्यावर डॉक विंजीनेराइरुध्द आवाज ऊठवू देत नैत. आयटीवाल्याइरुध्द आवाज उठवू देत नैत. काय क्रावं ब्रं अमी ग्रिबांनी. :( :(

In reply to by कोमल

:) कित्ती दिवसांनी तुझी कमेंट. एकदमच राग आला वाटतं!! ;)

In reply to by सविता००१

खिक्क.. नै ग तै.. कंटाळलेले जरा इतकचं! ;)

हा धागा वाचल्यानंतर एक विचार चमकुन गेला. मालकांना विनंती " मिपा वधु-वर सुचक मंडळ" अशी उपशाखा चालु करावी. किमान आमच्या टक्याचा तर फायदा होईल. *wink* *blum3* *biggrin* =)) :-( :-)

In reply to by सूड

'आमच्या' म्हटल आहे, 'आमचा' अस नाही.. *beee* अवांतर-धाग्याची 400 कडे वाटचाल सुरु झाली. जरा पारंपारीक टोटके द्यावे म्हणतो मुली पटवायचे.

धागाकर्त्याने हे ध्यानी घ्यावे प्रतिसाद सख्या हे यात कुठे ओलावा कोठून मुली-परी जोडीदार मिळावा घालूनी व्यर्थ ही धाग्याची चारोळी वाहिल्या तुजला प्रेमाने चार - ओळी संम ने ध्यानात घ्यावे .. हा धागा आम्ही ५०० वर नेणारच !! नेणार नेणार नेणार हा धागा पाचशेवर करणार करणार करणार नवा विक्रम मिपावर संपादकांनी ठेवावीत काही काळ डोई गहाण तरच ठरेल काश्मिरासम हा ही धागा महान आंतरजालीय इतिहासात एक नवे सुवर्ण पान संपादकानी लिहू द्यावे आम्हांसाठे हे एक पान "अच्रत बावलत" येऊन गेले , सहमत झाले + एकने अजून येतील थांबा थोडे "बाडिस" आणि "रच्याकने" जटील आहे खरी समस्या उत्तर याचे नसेच एक कुणास ठाऊक? उत्तर याचे वर्गमूळातील वजा एक - धागा कर्त्यास समर्पित

आमचे पूर्वज कि नै , लै लै शहाणे ! बालविवाह हा या समस्यांवरील उपाय आहे ! ( म्हणजे १० पोरा व्हायला पुरेसा वेळ पण मिळेल )

In reply to by कपिलमुनी

पूर्वीच्या गोष्टी फारच छान होत्या हो.. बालविवाह, राक्षसविवाहाला मान्यता, द्विभार्या प्रतिबंधक कायदा नसणे, स्वयंवरासारखे वेळखावू नसलेले प्रकार.. बाकी सध्या पण स्वयंवर असतं तर एकाच दिवशी आठ आठ स्वयंवरं अटेन्ड करता करता नवर्‍या मुलांचा पिट्टा पडला असता.

गाडी, बायको आणि मोबाईल च्या बाबतीत एक मित्र म्हणतो की प्रत्येकाला नेहमी वाटते की थोडा और रुक जाता तो अच्छा / लेटेस्ट मॉडेल मिल जाता. पण हे अनुभव बघितल्यावर वाटते आपले जुने मॉडेलच चांगले !

In reply to by धर्मराजमुटके

अहो, जेव्हापासून हे स्मार्ट-फोन, स्मार्ट-कार आणि स्मार्ट-पोरी झालेत ना तेव्हापासून असेच वाटतेय की गड्या अपुला जुना फोन बरा, जुनी कार बरी आणि ... (सुज्ञास अधिक सांगणे न लगे) :)

In reply to by हाडक्या

स्मार्ट-फोन, स्मार्ट-कार आणि स्मार्ट-पोरी
पोरं स्मार्ट कधी होणार गॉड ओन्ली नोज!! -देवरुखकर मास्तर बटाट्याची चाळ.

In reply to by हाडक्या

आतापर्यंत नोकीया आशा ३०२ चा क्वेर्टी की वाला फोन वापरत होतो. स्मार्टफोन घेतला पण वापरायला फारच कटकटीचा वाटतो. एकतर पहिले कवर उघडा, नंतर पासवर्ड टाका, नंतर उंगल्या करुन हवे ते फंक्शन निवडा. शिंची कटकट. जुनाच फोन बरा असे वाटायला लागलेय.

In reply to by धर्मराजमुटके

मी दोन मोबाईल फोन ठेवतो. एक म्युझीक साठी (कीबोर्ड वाला), दुसरा फोन म्हणून (स्मार्ट फोन). स्मार्ट फोन खरेच तापदायक आहे पण त्याचे फंक्शन कीबोर्ड फोन मध्ये नाहीयत. बाकी या उदाहरणाचा लग्नाशी संबंध जोडू नये.

In reply to by काळा पहाड

पण माझ्यासारख्या स्मार्ट नसलेल्या माणसाचे काम साध्या मोबाईलवर चालून जाते. माझ्या आधीच्या नोकीया फोनमधे मेल, व्हाटसअप आणि कॉलींग हे मला हवे असलेले सगळे फीचर्स होते. पण दुर्दैवाने तो पडला. आता बाजारात क्वेर्टी फोन मिळतच नाहित. Blackberry घ्यावा तर त्याला Blackberry सर्विस घ्यावी लागतेय. आता आमच्यासारख्या स्मार्ट नसलेल्या माणसांनी काय करावे ?

In reply to by धर्मराजमुटके

स्मार्ट व्हा कि! कोण नको म्हणतय. एकदा स्मार्ट फोन वापरून पहा त्याचा किती फायदा आहे ते.

सध्या लग्न हा विषय उभयातांसाठी "दोन मनाचे मिलन","एक पवित्र रिश्ता" वगैरे राहिलेला नसून निव्वळ एक डील राहिलेले आहे. (हे माझ वैयक्तिक मत आहे.) रग्गड पैसा, स्वताचे घर (तेही व्यवस्थित मोठे बरं का), काही बाबतीत दोन-चारचाकी हि सर्व लग्नासाठी लागणारी भांडवलं आहेत. ज्या पामराकडे ह्यातील काही नाही (किवा एखादं भांडवल नाही) तो सध्या नालायक ठरत आहे लग्नाच्या बाजारात. मग मुलाचे/मुलीचे आई-वडील किवा मुलगा/मुलगी स्वतः कितीही सुस्वभावी वगैरे असले तरी त्याला काहीही किंमत नाही. वरील सर्व अनुभव मुलगी आणि मुलगा दोघांच्या बाबतीतले सध्या अगदी जवळून बघतो आहे नात्यात म्हणून बिनधास्त लिहिलंय एवढ. अगदी मुलींच्या बाबतीत सुधा काही वर कुटुंबांकडून वरील अपेक्षा थोड्या फार प्रमाणात केल्या जातात सध्या. बाकी माझ लग्न झालेलं आहे आणि अतिशय सुस्वभावी पत्नी आहे माझी, माझ्या आई आणि पत्नी मध्ये आई-मुली सारख नात आहे. जर का मुलगा १५-२० हजार कमावत असेल आणि तो बारावीच शिकला असेल तर त्याने लग्न करूनच नये का?

In reply to by मेघनाद

अहो पहिल्यापासनंच ते डील आहे. उगीच दोन मनांचे मीलन वगैरे सुधीर फडके-अरूण दाते ष्टाईलच्या मध्यमवर्गीय भावगीती कल्पना आहेत. पूर्वी राजेरजवाडे आपला गोतावळा वाढवण्यासाठी लग्नं करत. शिवाजीराजांनीही लग्ने करुन वेगवेगळ्या ठिकाणी सोयरीक केलीच की. त्याच्याकडे तसंच बघायचं. बाकी माझंही लग्न झालेलं आहे आणि अतिशय सुस्वभावी पत्नी आहे माझी, माझ्या आई आणि पत्नी मध्ये सासू-सुनेसारखं नात आहे.

In reply to by मेघनाद

मेघनाद साहेब १०-१२००० मिळवणार्याला सुद्धा बायको मिळतेच. पण सुंदर, सुस्वभावी, सुशील, भरपूर कमावणारी अशी मुलगी कशी मिळेल? दोन दात पुढे असलेली अंमळ आडव्या अंगाची अशी मिळते. आता तुमची अपेक्षा जर दीपिका पदुकोणची असेल तर कसे चालेल? किंवा हिडींबा आणि शूर्पणखा असलेल्या जॉन अब्राहमशी लग्न करण्याची अपेक्षा करतात बरेच दिवस सायडिंगला पडल्यावर गपचूप जॉनी लिव्हरशी लग्न करतात नाहीतर आजकाल चांगली मुलं आहेतच कुठे म्हणून समस्त पुरुषजातीला शिव्या देत स्त्री मुक्तीचे गोडवे गातात. बर्याच वेळेला दोन्ही बाजू हे ध्यानात घेत नाहीत. म्हणून हा असा प्रश्न उभा राहतो. मुद्दा पुढे रेटण्यासाठी जर अतिशयोक्ती केली आहे. परंतु संसार चांगला होण्यासाठी दोघात सामन्जस्य असणे जास्त आवश्यक आहे. बाकी रूप पैसा कुटुंब इ सर्व गोष्टी दुय्यम आहेत.

In reply to by सुबोध खरे

खरे साहेब अगदी हेच म्हणायचय मला पण. समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, त्याचे गुण-दोष ह्याला प्राधान्य देणे जास्ती आवश्यक वाटत मला लग्नाच्या बाबतीत. पैसा आणि प्रतिष्ठा नक्कीच महत्वाची आहे पण त्याचा अतिरेक होऊ नये अस मला वाटत.

In reply to by मेघनाद

खरे साहेब मला साहेब म्हणताय आणी वर साहेब म्हणून नका म्हणताय. कि आजकाल आम्ही "कुणालाही" साहेब म्हणतो तसे "खरे साहेब" म्हटले आहे

अरे पोरांनो , ती मातोंडकरांची उर्मिला आहे बघ रे लग्नाची ! हवा असेल तर यांना विचारून शब्द टाकते ;)

In reply to by कपिलमुनी

मुनिवर तेवढं जरा बसुंच्या बिपाशाकडे शब्द टाका की माझ्यासाठी. किमानपक्षी आपल्या मराठमोळ्या ताम्हनकरांच्या सईला विचारा (लग्नं झालं तिचं :( )

याचे वर्गमूळातील वजा एक ... या माझ्या प्रतिसादावर एक ही उपप्रतिसाद आला नाही त्याबद्दल णिषेद ! " जुन्या सदस्यांसाठी मिपा संकेतस्थळ अडचणीचे ठरत आहे काय ? " असा धागा काढण्याच्या विचारात आहे. . . . . . . . जिथे कोणतेच "संकेत" पाळले जात नाहीत त्याला "संकेतस्थळ" का म्हणावे ? याचा खुलासा होईल का ?

लग्न ही एक अत्यंत गंभीर बाब आहे, थिल्लरपणा करायची नव्हे ! त्यामुळे दोन माणसे , दोन कुटूम्बे आणि समस्त समाजाचा फायदा अथवा तोटा होत असतो याचे सहभागी मंडळीनी भान ठेवायला हवे. डॉक्टर साहेब म्हणतात ते खरेच आहे , रुप, पैसा, शरिर यष्टी, प्रतिष्ठा या अत्यंत दुय्यम बाबी आहेत. आयुष्याच्या पर्फोर्मन्सचा ग्राफ सरळ रेषेत वर जात नाही .. सतत खाली-वर होतो , त्यावेळी डो़के जागेवर ठेऊन समंजसपणे साथ देणारा जोडीदार असणे ही लग्नाची उपलब्धी असली पाहीजे. हा करार नसून समर्पण आहे. असे समर्पण करणारा जोडीदार असेल तरच लग्न यशस्वी होते. ते परस्पर समर्पण जितके अधिक तितके लग्न अधिक यशस्वी! रुप पैसा,प्रतिष्ठा, नोकरी , मुले-बाळे , रुप या सार्‍या बाबी खरोखर अत्यंत गौण आहेत. ( मी समर्पण हा शब्द वापरला ... त्याग नाही ! त्यागा मध्ये मी त्याग करतो / करते ही भावना असते , समर्पणात मी- तू हे द्वैत रहात नाही ) ३०-३५ वर्षे संसार केल्यावरही मुला-मुलींच्या आई- बापाना ( विशेषतः आयांना ) हे समजत नाही हेच फार मोठ्ठे आश्चर्य वाटते मला ! आणि मी करून दाखवीनच या अविर्भावाने आया लेकीचा संसार करायला सरसावतात आणि विवेक आणि स्वास्थ्य हरवून बसतात. आपल्या पूर्वसुरींनी फार जाणीवपूर्वक शब्दरचना केली आहे - "लोपा-मुद्रा !" असे समर्पण असेल तर आयुष्य यशस्वी होणारच !

In reply to by विटेकर

सग्गळे हेच्च बोलतात हो...पण जर खरोखर असा प्रयत्न करायला गेलो तर समोरच्याची पारख कशी करावी याची काही चेकलिस्ट आहे का? अवांतर - अशी चेकलिस्ट मी बनवायच्या प्रयत्नात आहे...जर कोणी आधी बनवली असेल (बहुतेक "प्रगो" किंवा "प्रसाद१९७१" यांनी आधीच बनवली आहे) तर प्लीज मला व्यनीतून पाठवावी...यावर १ लेख लिहून मिपावर प्रकाशीत करायचा विचार आहे

In reply to by टवाळ कार्टा

ट का शेट हि पारख कशी करावी याला दुर्दैवाने नक्की कोणतेच आडाखे नाहीत. बायकोचा/ नवर्याचा स्वभाव कसा आहे यावर होणारा संसार किती सुखाचा होईल ते अवलंबून असते. पण स्वभाव कसा पारखायचा? आपण दुसरी व्यक्तीची पारख किती चांगली करू शकतो यावर हे अवलंबून असते. बर्याच वेळेस बाकी इतर माणसे मुलगा/ मुलगी बघायला येतात त्यांचे प्रांजळ मत या कार्यक्रमा नंतर घ्यावे. कारण एक महत्त्वाचा भाग म्हणजे मुलगा/ मुलगी हे त्यावेळी त्यांचा दाखवण्याचा सर्वात महत्त्वाचा मुखवटा घालून आलेले असतात. ( हीच गोष्ट प्रेमविवाहातहि सत्य आहे) जोवर प्रत्यक्ष लग्न होत नाही तोवर खरे स्वभावाचे पैलू समजत नाहीत. त्यामुळे मुलगा/ मुलगी जे बोलतात ते फार बारकाईने आणि काळजीपूर्वक ऐकावयास पाहिजे.छिद्रान्वेषी असणे यावेळेस फायद्याचे ठरते. आपल्याला मुलगी नोकरी न करणारीच हवी असेल आणि मुलीचा रोख तसा नसेल तर स्पष्टपणे या गोष्टी बोलणे आवश्यक आहे. मुळात बहुसंख्य मुलामुलींना नक्की काय हवे आहे हेच स्पष्ट नसते. मुलगा/ मुलगी बरी वाटली म्हणून लग्न केले तर आयुष्य "बरे" जाईल त्यापेक्षा चांगले नाही. चेकलिस्ट हि प्रत्येकाने स्वतःला हवी तशी बनवणे आवश्यक आहे दुसर्याला आवडेल अशा मुलीशी (/ मुला) तुम्ही लग्न कराल काय? पण काही मुद्दे ठरवणे आवश्यक आहे यात १) MUST HAVE २) SHOULD HAVE ३) WOULD BE DELIGHTED TO HAVE असे ठरवावे. यात मुद्दा १ मध्ये तडजोड नाही हा केक आहे मुद्दा २ हे आईसिंग आहे आणी मुद्दा ३ म्हणजे वरची चेरी. तुम्हाला तिन्ही मिळाले तर सोन्याहून पिवळे. बापरे लिहिता लिहिता फारच लिहून गेलो असो. BEST OF LUCK.

In reply to by सुबोध खरे

u hit bulls eye
काही मुद्दे ठरवणे आवश्यक आहे यात १) MUST HAVE २) SHOULD HAVE ३) WOULD BE DELIGHTED TO HAVE असे ठरवावे
एक्झक्टली मी हेच बनवले आहे...पण नुकतेच २-३ अनुभव असे आलेत की आपणच जास्त प्रश्न विचारणारे, जास्त अपेक्षा असणारे ठरतो...ते सुध्धा very well educated मुलीकडून तिला अपेक्षा विचाराव्या तर १० पैकी ८ वेळा "we should feel connection" असे उत्तर येते (ज्यात काहीच चुकीचे नाही) पण "हे connection चे feeling आहे की नाही हे कसे ठरवणार ग तु" असे विचारले तर "माहीत नाही...बघू" असे उत्तर येते headbang

In reply to by टवाळ कार्टा

"we should feel connection"
अशा व्यक्तींच्या पत्रिकेत नेपच्युन स्ट्राँग असतो 'म्हणे'.

कुणाचा सत्कार करावा ?

डॉक्टर साहेबांशी बाडीस ! १. हा फार विवादास्पद विषय आहे पण पत्रिका जुळत असेल तर शक्यतो स्वव्हाव जुळतात असा वैयक्तिक अनुभव आहे . पण हा ठोकताळा आहे कन्फर्मेटरी टेस्ट नव्हे ! २. प्रेमविवाह नसेल तर शक्यतो घरी पसंत असलेलीच मुलगी करावी. ९९% घरात आपण कसे आहोत आणि आपल्याला नेमके काय चालेल/ आवडेल हे आपल्यापेक्षा आपल्या आईला अधिक चांगले समजत असते. घरच्यांच्यात मतभेद असतील तर आ़ईचे ऐकावे.अर्थात अपवाद असू शकतील. ३. प्रेम विवाह नसेल तर - शक्यतो मुलगी जातीतीलच करावी. परजातीतील केली तर फार बिघडत नाही पण काही वेळा कंगोरे त्रास देतात,त्याची तयारी हवी. रोजच्या जगण्याच्या त्रासात तो एक जादाचा त्रास होऊ शकतो. पण स्मूथ गोईन्ग हवे असेल तर जातीतील करावी. किमान काही संस्कार - विचारपद्धतीमध्ये समानता असण्याची शक्यता असते. अर्थात यात ही ठोकताळाच आहे. कन्फर्मेटरी टेस्ट नव्हे. त्याशिवाय डो़क्टर साहेबांनी सांगितलेल्या टेस्ट आहेतच ! त्याचे परिंमाणदेखील ठोस असायला हवेत.आपण पुरेसे होमवर्क केलेले असायला हवे. चांगला स्वभाव म्हणजे नेमका कसा ? याची आपली संकल्पना पुरेशी स्पष्ट हवी. ( आपण बरे आपले बरे असा जोडीदार ही काहींसाठी चांगला तर काहिसाठी "एकलकोण्डा" असू शकतो. तर मिळून मिसळून असणारा खेळ्कर अथवा लाऊड असू शकतो ) आपल्याला आयुष्यात नेमके काय मिळवायचे आहे याची आपली यादी आणि त्याची टाईमलाइन ( मिशन स्टेट्मेन्ट) ही निश्चित असायली हवी. त्याचे चार आयाम स्तीफन कोवे ने सांगितले आहेत ( मी / माझा व्यवसाय / माझे कुतुम्ब/ समाज-देवकारण-अध्यात्म) म्हणजे तसे घडेलच असे नाही पण काही एक निश्चिती हवी आणि हे सगळे मोकळे पनाने बोलण्याची पारदर्शकता हवी. म्हणजे समजा तसे घडले नाही तर एकमेकासोबत उभे राहण्याची तयारी असते. आणि कधीकधी एका क्षणात हे सगळे घडून जाते .. अक्षरशः शब्दावाचून कळले सारे ..! माझ्याबाबतीत असेच झाले थोडेसे ! रितसर पोहे खाणे झाल्यावर मंडळी आम्हाला दोघांना तिथेच सोडून पांगली. मी माझा पूर्ण परिचय करून दिला ( त्या काळात खूप मुलाखती दिल्या नोकरी साठी त्यामुळे त्याची बर्‍यापैकी तयारी होती ) १५ मिनिटे मीच बोलत होतो अखंड ! मग लक्षात आले ती काहीच बोलत नाही .. म्हनून म्हंट्ले .. तुझ्याबद्दल काहीतरी सांग .... , म्हणाली , "सांगण्यासारखे इतके काही नाहीच माझ्याकडे .. मी फारच सामान्य आहे !" " तरी पण काहीतरी असेलच ना ? काही खास आवड वगैरे ? ... " तसे खास नव्हे पण मला पाठांतराची आवड आहे .. " "अरे वा ! काय काय पाठ आहे ? " "गीता १८ अध्याय " "पण १२ वा / १५ वा पाठ करतात , माझाही १२ वा पाठ आहे , १८ वा का पाठ केलात ?" " तसं नव्हे , माझे १ ते १८ पाठ आहेत, शिवाय श्री सूक्त, शनीमहात्म्य, शिवलिलामृत ..वगैरे ...." मी जागेवरून उडालो .. स्वतःलाच शाबासकी दिली , म्ह्ट्ले लेका लकी आहेस .. घे चान्स . संभाषण संपले , पुढच्या १८ दिवसात डो़क्यावर अक्षता ! निवड चुकली (असे अजून मला तरी ) वाटत नाही !

In reply to by विटेकर

तुम्हाला खरोखर लॉटरी लागली मग...पण १०० पैकी किती जणांना एका भेटीतच असा अनुभव येईल जाता जाता १ निरिक्षण...तुमच्या बाबतीत कदाचित तुमच्या मुलीकडून कमी अपेक्षा होत्या म्हणून पटकन सूर जुळले :)

In reply to by टवाळ कार्टा

अरेंज मॅरेज हा जुगारच आहे.. ह्याचं फार भयानक उदाह्रण कालच पाहिलय.. १ महिना झालाय लग्नाला आणि घटस्फोट घ्यायचा म्हणुन मुलगी अचानक घरातुन निघुन गेली, काहिही न साम्गता सवरता.. का तर दुसरा मुलगा आवडतो (जो तिला आधीच स्पष्ट नाही म्हणाला आहे..) एवढं धाडस लग्नाआधी दाखवलं असतं तर एका मुलाच आयुष्य बरबाद नसतं झालं.. आणि हो मुलगा आयटी मधला, भरभक्कम पगार आणि होम लोन उसगावात जाऊन आल्याने "निल" केलेला आहे..

In reply to by पिलीयन रायडर

अगदी अश्शीच केस (१ महिन्यात घटस्फोटाची) प्रेमविवाहाबाबत माझ्या मित्राचीच झाली आहे. लग्नाला १ महिना झाला आणि घट्स्फोट!! अजुन हा मित्र ताळ्यावर आला नाही, फोन बंद / उचलत नाही, फेसबुक अकाउंट डिलीट केले आहे. नक्की काय झालय कळायला मार्ग नाही. माझ्या अजुन एका डॉक्टर मित्राचा (माझा शाळामित्र) प्रेमविवाहानंतर ६ महिन्यात घटस्फोट झाला, मागच्या वर्षी त्याचे दुसरे लग्न झाले. आधीचे लग्न आंतरजातीय (ब्राह्मण - मराठा) होते. क्षुल्लक कारणावरुन भांडण होऊन घटस्फोट झाला असे तो म्हणाला. माझ्या मते प्रेमविवाहात आधीच ओळख असल्यामुळे काही केसेसमधे जोडीदारावर हक्क गाजवण्याची प्रवृत्ती येते लग्नाशी सगळे गुडी गुडी, ग्गोग्गोड असल्यामुळे आधी मस्त असते पण नंतर एकत्र राहायची वेळ येते तेव्हा खटके उडाले तर ताणुन धरण्याचा स्वभाव अजिबात नसतो आणि अशा क्षुल्लक भांडणांची निष्पत्ती घटस्फोटात होते. मात्र अ‍ॅरेंज मॅरेजमधे लग्नानंतर लगेचच कडाक्याची भांडणे होत नाहीत जोडीदाराच्या बर्‍याच गोष्टी पटल्या नाहीत तरी बरेच जण सबुरीचे धोरण घेतात एकमेकांना ओळखत-आजमावत असतात आणि या काळातच भांडणे विरुन (म्हणजे कडवट्पणा न राहणारे भांडण ;)) एकमेकांबद्दल प्रेम / आदर वाढीला लागतो. या स्टेजनंतर साधारणतः पुढे वैवाहिक आयुष्यात कितीही भांडणे झाली तरी विशेष काही बिनसत नाही अर्थात तुम्ही वर सांगितलेली केस तर आता अरेंज मॅरेजमधे इतकी कॉमन झाली आहे की दर १०/१५ लग्नांमधुन एकदा तरी अशी घटना ऐकायला मिळतेच.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

इथे तर अरेंज मॅरेज ऐवजी लवमॅरेज बरे हे मान्य झाले होते. आता तुम्ही लवमॅरेजचे काही प्रश्न उपस्थित केले. मजा आहे.

In reply to by आजानुकर्ण

सौदाळ्याच्या आणि सरंग्याच्या दृष्टीकोनात फरक हा असणारच ना! :) सौंदाळ्या, कृ. ह. घेणे!

In reply to by विटेकर

ह्या सगळ्या प्रश्नाची उतारे शोधणे सोपे नाय ... बर्याचदा स्वतःचा स्वतःवर अभ्यास नसतो ... बर्याचदा आपण दुनिया (इतरांचे स्वभाव) पाहिलेली नसते ... काही तरी रामबाण एकाच उपाय हवा ... Love at First Site वगैरे ... कूछ कूछ होता ही वगैरे ?

अखेर, ३६८ प्रतिसादांनंतर धागा थंड पडाला का ? वधु आणि वरांच्या (आणि त्यांच्या मित्रमंडळी व नातेवाईकांच्या) अपेक्षा फकस्त ३६८ प्रतिसादात मांडून झाल्या काय ? अर्रे उठा ... जागे व्हा... *diablo*

काही कॉम्प्रमाईज न करण्याची तत्त्वे सोडली तर बाकी बायकोचे ऐकले की लग्न टिकण्याची शक्यता बरीच जास्त असते. Women and cats will do as they please, and men and dogs should relax and get used to the idea.

In reply to by टवाळ कार्टा

चॉईस आहे. एक तर लग्न टिकावे असे वाटण्यासाठी बैल होऊ शकता किंवा लग्न मोडावे असे वाटण्यासाठी गाढव. :p

In reply to by टवाळ कार्टा

ट का शेट बायका नवर्याचे पहिल्या वर्षात पाणी जोखतात. नव्या नवलाईत नवरे पण बायकांच्या तालावर नाचतात. एकदा बायकोने पाणी जोखले आणि डोक्यावर बसली कि परत उतरत नाही. तेंव्हा उगाच पहिल्या वर्षात बायकोला जास्त खुश करायला जाऊ नका. आपला सी आर/ एप्रेजल वगैरे लक्षात ठेवा. जोवर बायकोचा पर्फ़ोर्मन्स चांगला येत नाही तोवर जास्त लाड केलेत तर बायको डोक्यावर बसलीच. मग तुमचा नंदीबैल व्हायला वेळ लागणार नाही.मग मान कितीही हलवा बायको डोक्यावरून उतरत नाही

In reply to by सुबोध खरे

अरारारा.. अत्यंत स्त्रीद्वेष्टा प्रतिसाद.. णिशेध .. णिशेध .. अगदी त्रिवार णिशेढ ..!!

In reply to by सूड

अहो सूड भौ,
बायका नवर्याचे पहिल्या वर्षात पाणी जोखतात. नव्या नवलाईत नवरे पण बायकांच्या तालावर नाचतात. एकदा बायकोने पाणी जोखले आणि डोक्यावर बसली कि परत उतरत नाही. तेंव्हा उगाच पहिल्या वर्षात बायकोला जास्त खुश करायला जाऊ नका. आपला सी आर/ एप्रेजल वगैरे लक्षात ठेवा. जोवर बायकोचा पर्फ़ोर्मन्स चांगला येत नाही तोवर जास्त लाड केलेत तर बायको डोक्यावर बसलीच. मग तुमचा नंदीबैल व्हायला वेळ लागणार नाही.मग मान कितीही हलवा बायको डोक्यावरून उतरत नाही
हे डॉक ना सांगायला काय होतय, त्यांची गाडी आता पाचवा गिअर टाकून निवांत चालली आहे. आमचे लग्ना नंतरचे पहिलेच वर्ष आहे आणि बायको पण मिपावर आहे. आता तिने हे वाचून असा विचार केला की हेच vice versa पण लागू होते (आणि लागु करुयात) तर झालेच की कल्याण हो...!! ;) समजले ? म्हणून अशा विचारांचा मुळातच णिशेढ करायला हवाय आणि आम्ही तो सर्व ताज्या ताज्या लगीन झालेल्यांच्या वतीने करतो आहोत..

In reply to by सुबोध खरे

सर हे माहीत आहे (बर्याच मित्राचे अनुभव बघितले आहेत ;) ) माझ्याकडे तर अजुन वाईट परिस्थिती आहे...माझ्या आई-बाबांना मुलगी हवी होती त्यामुळे घरात ३ विरुध्ध १ असा मामला असणार भविष्यात :(

In reply to by टवाळ कार्टा

टका !! थोडं स्वानुभवावरुन सांगतोय की लग्नाचे दुसरे नाव अ‍ॅडजस्ट्मेंट आहे. लग्न अ‍ॅरेंज असो वा प्रेमविवाह, दोघांना स्वतःमधे बदल करावेच लागणार. "हा मी असा आहे, पटलंतर बघ" हा पवित्रा मतभेदाचं कारण होवू शकतो.

In reply to by खटपट्या

१००% मान्य पण कोणत्या मुद्द्यांवर अ‍ॅडजस्ट्मेंट करू शकतो आणि कोणत्या नाही हे मुलाला आणि मुलीला क्लीअर असावे"च"

In reply to by सुबोध खरे

एक जोडपे हनिमूनला माउंट अबूला जाते. अर्थातच दोघेजण आपापल्या मित्रमैत्रिंणींचे सल्ले घेऊनच. साईट च्या टुअरमध्ये पहिल्या पॉइंटला मुलगी बसमधून उतरत नाही म्हणून तोही तिच्याजवळ बसून राहतो. दुसऱ्या पॉइंटलाही तेच होते. तिसऱ्याला तो म्हणतो तू बस, मी पॉइंट पाहून येतो, मला आबू पाहाचय.

हा डस्टबिनवाला डायलॉग गेले दोनएक वर्ष फेसबुक वर वाचते आहे . फार फेमस आहे हा मुलीचा डायलॉग ( कित्येक मुलीनी अस म्हटलंय अस म्हटलं जात) खरच का हो ? :)