Skip to main content

जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 07/01/2015 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
२०१५ साल उजाडलं तेच अर्थव्यवस्थेत खळबळ घेवुन . काल ( ६ जानेवारी २०१५) रोजी सेन्सेक्स तब्बल ८५० अंशांनी घसरलाय , तेलाच्या किमती गडगडल्या आहेत , रशियन रुबलही संकटात आहे . एकुणच सर्व अर्थव्यवस्था अस्थिर आहे , प्रचंड वोलाटालिटी आहे मार्केट मधे . आता ह्या सार्‍याकडे दुर्लक्ष करुन आपल्याला चालणार नाही . Ignorance is actually not a bliss . ह्या आर्थिक घडामोडी नकळत आपल्या जीवनावर प्रभाव पाडत आहेत म्हणुनच ह्यांच्या कडे नीट आणि बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे मला वाटते . "प्रपंची पाहिजे सुवर्ण | परमार्थी पंचीकरण "| असं समर्थांनी स्पष्ट सांगुन ठेवले आहे , प्रपंचात पैशाकडे ( सोन्याकडे) लक्ष ठेवणे गरजेचे आहे . ह्या धाग्यावर जागतिक आर्थिक घडामोडींची चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे . लिन्क सह बातमी दिल्यास अधिक उपयुक्त ठरेल :) अवांतर : १) अर्थव्यवस्थेतील बरेचसे शब्द इंग्रजी असतात व त्यांचे मराठी प्रतिशब्द फार गंभीर असतात म्हणुन इथे मराठीचा हट्ट धरु नये ही नम्र विनंती . २) अर्थ्कारण , समाजकारण आणि राजकारण हे हातात हात घालुन चालत असतात त्यामुळे चर्चा तिकडे जाण्याचे शक्यता आहे तरीही अति विषयांतर करुन फोकस डायव्हर्ट करु नये ही विनंती . शेवटी पैशाचा मामला आहे , नो एक्स्क्युज .

"एकामेका सहाय्य करु | अवघे होवु श्रीमंत || "

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 216498
प्रतिक्रिया 513

प्रतिक्रिया

अपडेट :- US Mortgage Rates Drop To Their Lowest Levels Since May 2013 Can subprime auto loans crash the financial system? Politics Risk Tripping Up Greece on Debt Relief Published on Feb 11, 2014 Published on Jul 15, 2014

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तुम से मिलकर, ना जाने क्यों... { Pyar Jhukta Nahin }

In reply to by अर्धवटराव

खालचा व्हिडीयो पाहुन युएस कॉलेज पास आउटवाल्यांची अवस्था पाहुन भयाण वाटले ! :(

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तुम से मिलकर, ना जाने क्यों... {Pyar Jhukta Nahin }

In reply to by नगरीनिरंजन

मग शेवटी चर्चेचे फलित काय? फलित अजुन दिसायचे आहे ? ओक्के... वाट पाहुया... इथे घाई कोणाला आहे ? तसही हा अपडेट्ससाठी काढलेला धागा आहे, त्यामुळे जसे जसे अपडेट दिले जातील तस तसे परिस्थीती काय आणि कसे वळण घेइल ते कळत जाइल...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तुम से मिलकर, ना जाने क्यों... {Pyar Jhukta Nahin }

In reply to by मदनबाण

मला वाटलं आपल्यावर काय परिणाम होईल आणि त्यातून नफा कसा कमवता येईल आणि अवघे कसे श्रीमंत होतील या दिशेने चर्चा करण्याचा प्रस्तावकांचा हेतू आहे म्हणून विचारले. बाकी व्हायचे ते झाल्यावर सगळ्यांना कळेलच.

In reply to by नगरीनिरंजन

यातून नफा कसा कमवता येईल आणि अवघे कसे श्रीमंत होतील या दिशेने चर्चा करण्याचा प्रस्तावकांचा हेतू आहे म्हणून विचारले. जे लोक स्टॉक मार्केट मधे अकांउट ठेवुन आहेत त्यांच्यासाठी संधी आहे ! शॉर्ट सेलिंग करुन नफा कमवता येउ शकतो... तसेच प्रसाद१९७१ यांनी या प्रतिसादात सांगितल्या प्रमाणे ऑप्शनचा वापर करुन निफ्टी सेल केल्यास { मार्केट खाली जाताना..} त्यातुन नफा मिळवया येउ शकेल असे वाटते. {नक्की ऑप्शन कसे वर्कआउट होते ते ठावुक नाही.} बाकी ऑनलाईन ट्रेडिंग गेम अकाउंट बनवुन त्यावर प्राक्टीस करुन रिअ‍ॅलीटी मधे तो अनुभव वापरुन नफा कमवण्याचा प्रयत्न करता येउ शकेल असे वाटते. कोणी ऑप्शन वर मार्गदर्शन करणारा असेल तर मी स्वतः शिकण्यास तयार आहे. :) मला दे दना दन पैसा मिळाला तर हवाच आहे ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तुम से मिलकर, ना जाने क्यों... {Pyar Jhukta Nahin }

In reply to by मदनबाण

प्रसाद१९७१ यांचा प्रतिसाद वरच्या प्रतिक्रियेत द्यायचा राहिला... प्रसाद१९७१

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तुम से मिलकर, ना जाने क्यों... {Pyar Jhukta Nahin }

In reply to by नगरीनिरंजन

इथे कोणी पैसे वाटायला बसले नाहीये ... इथे माहीतीची देवघेव होईल त्यातुन कुणी कसा आणि किती फायदा कमवायचा हे ज्याचे त्याने ठरवावे , आता उदाहरणच द्यायचे झाले तर गेल्या आठवड्यात सेन्सेक्ष ८०० पॉईट्स नी घसरला होता एका दिवसात आणि आज परत जवळपास आधीच्या लेव्हलला पोहचला २८६०० वगैर . अर्थात ज्यांनी पैसा हुंतवला असता त्यांना २७८०० वर एका आठवड्यात ८०० इतका नफा मिळाला असता अर्थात २.८६% एकाआठवड्यात . आता तुम्हीच एका वर्शाचे ५२ आठवडे ह्या हिशेबाने किती पर अ‍ॅनम किती रिटर्न मिळाले ह्याचे गणित करा ..... जमत असेल तर

In reply to by प्रसाद गोडबोले

आज २१ जान आहे म्हणुन एक आठवड्यापूर्वीचा १४ जान चा दिवस घेतो. कोणी जर १४ जान ला ८३०० चा कॉल घेतला असता तर समजा १०० रुपयानी मिळाला असता. आज त्याचा भाव ४४० आहे. एका आठवड्यात चौपट. फक्त २५ चा एक लॉट घेतला तर २५०० गुंतवणुक आणि आज ११००० वापस.

In reply to by प्रसाद गोडबोले

इथे कोणी पैसे वाटायला बसले नाही
ते दिसतंच आहे चर्चाप्रस्तावावरुन. :-)
एका वर्शाचे ५२ आठवडे ह्या हिशेबाने किती पर अ‍ॅनम किती रिटर्न मिळाले ह्याचे गणित करा .... जमत असेल तर
गणित जमो न जमो. या चर्चेतून नक्की काय माहिती मिळाली किंवा निष्कर्ष निघाला हे तुम्हाला सांगणे जमत नाहीय का? मार्केट कधी पडणार वगैरे तर इथे कोणी सांगितलेले नाही आणि कधीतरी पडेल हे तर शेंबडं पोरगं पण सांगेल. :-) आरबीआयने रेट कट केल्यावर किंवा इसीबीने क्युई जाहीर केल्यावर मार्केट पुन्हा चढेल हे सगळ्यांनाच कळतं त्यासाठी चर्चेचे गुऱहाळ कशाला एवढंच विचारायचं आहे. आणि हो..शुद्ध लिहा ब्वॉ.

In reply to by नगरीनिरंजन

तुम्हाला कोणी अक्षता घेवुन निमंत्रण देण्यासाठी आलं होतं का चर्चेत सहभागी व्हा म्हणुन ? ज्यांना माहीतीचा फायदा करुन घ्यायचाय ते करुन घेताहेत , मी माझे परसनल फायनान्स जाला वर उघड करत नाही पण तरीही सांगतो नुकतेच मी पुढील दोन वर्शात अमेरिकेच्या आर्थिक स्थितीचा माझ्यावर काय परिणाम होईल ह्याचे सिम्युलेशन बेस्ड मॉडेल तयार केले आहे , "ह्याचा पी.एच.डी थेसीस होवु शकेल" असा सीनीयर लेव्हल वरुन शेराही मिळाला आहे नुकताच .
गणित जमो न जमो.
ह्यावरुन सरळच कळतय की तुम्हाला गणित जमत नाहीये ते !!
या चर्चेतून नक्की काय माहिती मिळाली किंवा निष्कर्ष निघाला हे तुम्हाला सांगणे जमत नाहीय का?
धागा नीट वाचा : ह्या धाग्यावर जागतिक आर्थिक घडामोडींची चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे . धागा चर्चेसाठी काढलाय , निष्कर्शांसाठी नाही .
त्यासाठी चर्चेचे गुऱहाळ कशाला एवढंच विचारायचं आहे.
गुर्हाळाचं तुम्हाला बिल पडतय का ? इच्छा नसल्यास तुम्ही इग्नोर मारा , कोणीही चर्चा वाचाच अशी तुम्हाला सक्ती केलेली नाहीये . जरा एकदा http://misalpav.com/about_misalpav हे वाचा , इथे स्पष्ट लिहिलय की मिसळपाव डॉट कॉम हे मराठी माणसाच्या अभिव्यक्तीचे मुक्त व्यासपीठ आहे. चर्चा कोणती करायची अन कोणती करायची नाही हे संपादक ठरवतील त्याचा मक्ता तुमच्या कडे दिल्याचे इथे लिहिले नाहीये .
आणि हो..शुद्ध लिहा ब्वॉ.
धागा परत नीट वाचा : १) अर्थव्यवस्थेतील बरेचसे शब्द इंग्रजी असतात व त्यांचे मराठी प्रतिशब्द फार गंभीर असतात म्हणुन इथे मराठीचा हट्ट धरु नये ही नम्र विनंती . इथे अर्थव्यवस्थे बद्दल चर्चा चालु आहे , कोणी कादंबरी लिहित नाहीये , कितीही अशुध्द लेखन होवुदे आर्थिक गणित कळल्याशी मतलब ... ( पण तुम्हाला ते कळतय असे दिसत नाहीये .) अवांतर : तुमचा द्रुष्टीकोन एकुणच स्कोर सेटलिंग चा दिसत आहे , स्कोर सेटल करायचा असल्यास इतर धाग्यांवर करणे , इतक्या चांगल्या चर्चेवर न शोभते सभामध्ये हंसमध्ये बको यथा होवु नका !

In reply to by प्रसाद गोडबोले

चर्चा निष्कर्ष काढायला नाही हे वाचून आनंद वाटला. असो. पीएचडीसाठी शुभेच्छा! स्कोर सेटल करायला तुम्ही आधी माझ्यावर स्कोरतर केला पाहिजे ना! चर्चेतून नक्की काय मिळालं हे विचारायचा हक्क मला आहे तुम्ही उत्तर द्यायचं बंधन नव्हते. मुळात चर्चाप्रस्तावकाने चर्चेला दिशा देणे, शॉर्टटर्म, लाँगटर्म परिणाम व उपाय वगैरे विचार न मांडता नुसतं चर्चा टाकून गायब होणे आणि त्याबद्दल प्रश्न विचारणार्‍याला उगाच वाकड्यात घेणे ही तुमची चर्चेची व्याख्या असेल तर असो.
न शोभते सभामध्ये हंसमध्ये बको यथा होवु नका !
हे वाचून जी.एं.ची विदूषक नावाची गोष्ट आठवली.

In reply to by नगरीनिरंजन

धन्यवाद! आम्हालाही असं म्हणायचा चान्स द्या की.
इतका अभ्यासु धागा काढला आहे त्यावर इतकया जाणकारांनी मते दिली आहेत जागतिक अपडेट्स दिले आहेत . दुसर्‍याचे कौतुक करायला मनातुन आधीचे पुर्वग्रह बाजुला सारावे लागतात ते जमत असेल तर एकदा करुन पहा . धागा नीट वाचा . आज ची स्टॉक मुव्हमेन्ट पहा . तुमच्या पोर्ट फोलियोविषयी आखाडे बांधा , इथल्या लिन्क वापरुन अभ्यासस्पुर्वक हिशोब करुन संपत्ती वाढवा . आम्ही हे आधी पासुनच करत आहोत ( आणि म्हणुनच धागा काढला आहे ) ज्यांना हे माहीत आहे ते आमची प्रगती उत्तम प्रकारे जाणताहेत , वरच नाही का तुम्हाला सांगितलं की सिम्यउलेशन मोडेल्स बद्दल अतिषय उत्तम फीडब्यॅक आला आहे ते ! बघा , जर पुर्वग्रह आणि अहंकार दुर करता आला तर आमची प्रगती दिसेल आणि मग मनाचा कद्रुपणा नसेल तर अभिनंदनही करता येईल ! असो . फार वेळ घालवला तुमचे भले करण्यात . आता जरा पैसाचे बोलु http://economictimes.indiatimes.com/markets/stocks/news/nifty-likely-to… सेन्सेक्स ३०००० जाईल असा अंदाज वर्तवत आहेत लोकं ! डॉलर मधील पैसा काढुन भारतीय मार्केटात टाकावा असा विचार करत आहे ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

धागा नीट वाचा
तुम्ही वाचला आहे ना मग झालं. पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि नेत्रदीपक प्रगतीबद्दल अभिनंदन!

या युरोअमेरीकन क्रायसीसचे भारतावर शॉर्टटर्म अन लाँगटर्म काय परिणाम होणार? सध्या गुंतवणू़क कशात करावी?

In reply to by पाषाणभेद

युरोअमेरीकन क्रायसीसचे भारतावर शॉर्टटर्म अन लाँगटर्म काय परिणाम होणार? माझ्या मते तरी आपली अर्थ व्यवस्था युरोपवर मोठ्या प्रमाणात अवलंबुन नाही, पण एक्स्पोर्ट,आयटी यांना फटका बसु शकेल असा कयास आहे, यावर अजुन विचार करायला हवा. सध्या गुंतवणू़क कशात करावी? मी काही तज्ञ नाही, पण एकंदर जालावर या संदर्भात जितक्या बातम्या आणि व्हिडीयोज पाहिलेत त्यातल्या अनेक तज्ञांनी / बिजनेसमन्सनी सोन्यात / चांदीत गुंतवणुक करण्यावर भर द्वावा असे मत प्रदर्शित केलेले दिसले.तसेच फायद्यात असलेल्या गुंतवणुकीतुन बाहेर पडुन कॅश मधे बसणे चांगले असाही विचार दिसतो. न्यूज अपडेट :- Labor Department {US} on Friday announced national unemployment in December had fallen to 5.6 percent, its lowest level since June 2008. संदर्भ :- Labor Department Oil Holds Losses as China Growth Fails to Spur Demand Confidence Economic recession likely in Alberta this year, says Conference Board of Canada Report: Hezbollah Nearing Bankruptcy

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- माध्यमांपुढील आव्हाने

In reply to by टवाळ कार्टा

आधी केलेली गुंतवणूक कधी सोडवावी? आता हे मी कसे सांगावे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- माध्यमांपुढील आव्हाने

In reply to by मदनबाण

अर्र्र...म्हणजे मला विचारायचे होते की...जर आधीच मुचुअल फंडात गुंतवणूक केलेली असेल आणि वर उल्लेखलेल्याप्रमाणे आर्थीक संकट येणार असेल तर गुंतवणूक काढून घेण्यासाठी योग्य वेळ कशी निवडावी

In reply to by टवाळ कार्टा

जर आधीच मुचुअल फंडात गुंतवणूक केलेली असेल आणि वर उल्लेखलेल्याप्रमाणे आर्थीक संकट येणार असेल तर गुंतवणूक काढून घेण्यासाठी योग्य वेळ कशी निवडावी बुडबुडा कधी फुटेल ते सांगता येइल का ? पण बुडबुडा फार मोठा झाला आहे आणि आधीच्या बुडबुड्यांपेक्षा हा अधिक मोठा झालेला आहे... त्याप्रमाणे आराखडे बांधावेत. Federal Reserve is involved in what he calls "the greatest gamble in the history of finance," via a sustained effort to stimulate the economy by printing money on a trillion-dollar scale. इति :- James G. Rickards { Rickards' first book, Currency War } Currency war अपडेट :- Currency war in Europe takes another twist as Danes cut rate to -0.2% Swiss lose battle in currency war Currency Wars Come Alive as Central Banks Worldwide Make their Decisions Pressing Bond Yields

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- माध्यमांपुढील आव्हाने

In reply to by टवाळ कार्टा

म्युचुअल फंड रिडीम करायला एक-दोन दिवस लागतात असे वाटते. त्यामुळे मार्केट पडण्याच्या आधी एक-दोन दिवस गुंतवणूक सोडवणे योग्य होईल.

अत्यंत उत्तम चर्चा चालू आहे! बरीच माहिती कळली. मदनबाण साहेब आपले GK आणि त्याचा आवाका पाहून थक्क झालो. _/\_

वरीललेखाप्रमाणे अमेरीकेने तेलाचे उत्पाद्न वाढवले. पण खनिज तेलाचे उत्पाद्न वाढवले, तरी त्या प्रमाणात तेल शुध्यीकरणाचे प्रकल्प उभे राहील्याचे जाणवत नाही. त्यामुळे शेल ओईलचे उत्पाद्नाचे आकडे फसवे वाटतात. त्यामूळे पूर्वी अमेरीकेने तेलाचे साठे करुन ठेवले व आता वापरात आणत आहे, असे वाटते.

न्यूज अपडेट :- Wall Street banks slash FIFTY THOUSAND jobs and reduce bonuses and expenses as profits continue to dry up 50,000 Wall Street jobs cut काही रोचक माहिती :- http://www.macroaxis.com/invest/ratio/BAC--Probability-Of-Bankruptcy Based on latest financial disclosure 60% of Bank of America Corporation are shares owned by institutions. This is 165.88% higher than that of the Financial sector, and 852.9% higher than that of Money Center Banks industry, The Shares Owned by Institutions for all stocks is 298.29% lower than the firm. http://www.macroaxis.com/invest/ratio/JPM--Probability-Of-Bankruptcy Based on latest financial disclosure 75% of JPMorgan Chase Co are shares owned by institutions. This is 232.02% higher than that of the Financial sector, and 1089.95% higher than that of Money Center Banks industry, The Shares Owned by Institutions for all stocks is 397.38% lower than the firm.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- माध्यमांपुढील आव्हाने

व्हेनाज्युवेएलाची अर्थव्यवस्था कोसळल्यात जमा ! Long lines for milk and tampons are sinking Venezuela’s government Venezuela’s economic collapse owes a debt to China जाता जाता :- रशियाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याने रशियन पर्यंटकांचे गोव्यात येणे कमी झाले ! संदर्भ :- Falling Russian currency to hurt Goa tourism

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }


सध्या जालावर Baltic Dry Index खाली पडल्यामुळे अनेक चर्चांना उत आला आहे ! { मागच्या रिसेशनच्या काळात सुद्धा हा इंडेक्स इतका खाली कोसळला नव्हता म्हणे ! } त्यात ग्रीस युरोझोन मधुन बाहेर पडणार का ? यावरही अख्य्या जगाच्या नजरा टिकुन आहेत ! १६ तारीख ही क्रिटीकल ठरेल काय ? सौदी राजे अब्दुल्ला यांच्या निधना { वरती लिंक दिली आहे. } नंतर अचानक ऑइल प्राईज मधे चढाव आला ! परंतु ते २० डॉलर प्रति बॅरल इतके खाली येण्याची शक्यता आहे असे वर्तवले जात आहे ! काही दुवे :- Baltic Dry Index fall is mainly due to oil, commodity price slump Citi: Oil Could Plunge to $20, and This Might Be 'the End of OPEC' Nobody Understands Debt

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }

In reply to by मदनबाण

! परंतु ते २० डॉलर प्रति बॅरल इतके खाली येण्याची शक्यता आहे असे वर्तवले जात आहे !
२० ... आर यु किडिंग मी ? ओह माय गॉड !!!

ग्रीस ची दहशत ही फक्त युरोझोनलाच नसुन संपूर्ण जगाला आहे ! कारण ग्रीस बाहेर पडलाच तरच लगेच नविन प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे आता पुढे कोण ? ब्रीटन मधे जी काय उलथा-पालथ होतेय त्यावरुन असे वाटते की जणु या लोकांनी ग्रीस बाहेर पडणार याची खात्री बाळगुन पावले उचलण्यास सुरुवात केली आहे ! ग्रीस मधे सध्या निवडुन आलेल सरकार हे डाव्या विचारसरणीच { Syriza party } असुन जमेल तितक्या पद्धतीने / अटींनी ते पैसा ओढण्याचा प्रयत्न करतील ! काही दुवे :- Britain must prepare for Greece triggering a new eurozone crisis, Cameron warns after talks with Bank of England, Treasury and Foreign Office Germany rejects Greece's demands for $11 billion of Second World War reparations सध्या 65 trillion dollars in derivatives च्या बबल बद्धल वाचण्याचा प्रयत्न करतो आहे ! त्याचा पिडीएफ दुवा देउन ठेवतो :- Amounts outstanding of OTC foreign exchange derivatives यात पहिल्या कोष्टकातील जुन २०१४ ची Notional amounts outstanding युरो व्हॅल्यू पहा. किती बबल वाचावेत किती फुटणार याची चिंता वहावी ? :(

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }

ग्रीस क्रायसीस अपडेट :- Greek bailout talks fail to make progress – as it happened Greece bailout talks: No agreement in Brussels चायना Debt न्यूज :- China’s increase in debt is massive and unsustainable

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- O Ramji Bada Dukh Deena... { राम लखन }

ग्रीस क्रायसिस अपडेट :- Germany rejects Greek loan request Eurozone to discuss vital Greece bailout proposal Quests for a ‘new union’ as the eurozone crisis deepens Economic indebtedness may cause another crash, warns Wolf

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- HTTP/2 finished, coming to browsers within weeks HTTP/2 Frequently Asked Questions

In reply to by अनुप ढेरे

आता आहे त्या बातम्यात काय विवेचन द्यावे ? असो... विचारणा केल्या बद्धल धन्यवाद ! सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे Fed इंटरेस्ट रेट वाढवणार का ? पण सध्या तरी तशी होण्याची काहीच चिन्हे नाहीत ! मार्केट सुद्धा या बद्धलच्या बातम्यांवर डोळे लावुन बसले आहे.अनेक तज्ञांच्या मते ही Fed ची बोलबच्चनगिरी आहे आणि त्यांना जर रेट वाढवायचे असते तर त्यांनी त्याची वाट पाहिली नसती, तसेच हा दर वाढ करण्याची वाट बघण्यात Fed ने इतका वेळ घालवला की आता रेट हाइक करण्याची वेळ सुद्धा कधीच निघुन गेली आहे.फेडची अवस्था बिकट असुन ते या वर्षात QE4 आणतील असे काही तज्ञांचे मत आहे. अधिक इकडे :- Federal Reserve minutes indicate no rush to raise interest rates ‘Simple’ interest rate hike would mean ‘Yikes!’ The Federal Reserve Is Making A Big Mistake { 9/20/2013 }

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- HTTP/2 finished, coming to browsers within weeks HTTP/2 Frequently Asked Questions

ऑइल न्यूज अपडेट :- CORRECTED-UPDATE 12-Oil falls 2 pct on glut worries; heating oil up on tight supply UPDATE 6-Oil rebounds above $59 after Libya's largest field shuts चायना बबलची बरीच चर्चा जालावर आहे... आशियातला सगळ्यात श्रीमंत माणुस Li Ka-shing ज्यांना चीनचा वॉरन बफेट असे देखील संबोधले जाते, ते २०१३-२०१४ पासुन सातत्याने चीन च्या रिअल इस्टेट मधली त्यांची गुंतवणुक निकालात काढत आहेत ! यावरुन चीन मधे यापुढे काय होणार आहे याचा अंदाजा यावा ! एक दुवा :- 'China's Warren Buffett' Selling Off His China Assets

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- स्टॉप दॅट ! { Gambler }

अपडेट फ्रॉम FED :- Yellen Fights Back as Lawmakers Intensify Push to Rein In Fed Semiannual Monetary Policy Report to the Congress इथे Janet L. Yellen म्हणतात की :- The Committee is confident that it has the tools it needs to raise short-term interest rates when it becomes appropriate to do so and to maintain reasonable control of the level of short-term interest rates as policy continues to firm thereafter आता अमेरिकेची अर्थव्यवस्था जर पूर्वपथावर आली असेल तर इंटरेस्ट रेट वाढवण्या बाबत फेड फक्त शाब्दिक खेळ का खेळतय ? जून मधे रेट वाढवले जातील अश्या बातम्या अनेक दिवसांपासुन असताना देखील Yellen काय म्हणते ? The FOMC's assessment that it can be patient in beginning to normalize policy means that the Committee considers it unlikely that economic conditions will warrant an increase in the target range for the federal funds rate for at least the next couple of FOMC meetings. म्हणजे मिटींग मिटींग खेळुन सुधा रेट हाईक बद्धल काहीच करायचे नाही... येणार्‍या काळात Yellen ची स्टेटमेंट्स वाचण्यासारखी असतील हे मात्र नक्की...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राती... अर्ध्या राती... असं सोडुन जायाचं न्हाय ! ;) { बेLa }

In reply to by मदनबाण

आता अमेरिकेची अर्थव्यवस्था जर पूर्वपथावर आली असेल तर इंटरेस्ट रेट वाढवण्या बाबत फेड फक्त शाब्दिक खेळ का खेळतय ? जून मधे रेट वाढवले जातील अश्या बातम्या अनेक दिवसांपासुन असताना देखील Yellen काय म्हणते ? The FOMC's assessment that it can be patient in beginning to normalize policy means that the Committee considers it unlikely that economic conditions will warrant an increase in the target range for the federal funds rate for at least the next couple of FOMC meetings. म्हणजे मिटींग मिटींग खेळुन सुधा रेट हाईक बद्धल काहीच करायचे नाही... येणार्‍या काळात Yellen ची स्टेटमेंट्स वाचण्यासारखी असतील हे मात्र नक्की... The use of the word "patient" signals that the Fed would wait at least two more meetings before considering a rate hike. येलन यांचा "patient" हा शब्द प्रयोग फारच चर्चेत आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- China's Q1 growth expected to slow to 7%

In reply to by मदनबाण

वरच्या किंवा तत्सम संदर्भांत "be patient" हा शब्दप्रयोग औपचारीक भाषेतला "उशीर होईल" किंवा अगदी "विसरा" असे सांगायला वापरला जाणारा कोडवर्ड आहे :)

Bank of International Settlements: Oil price fall exacerbated by hedging and energy firms' debt: http://www.reuters.com/article/2015/02/07/us-oil-prices-bis-idUSKBN0LB0UF20150207 While the recent OPEC decision not to cut production “has been key to the fall”, other factors could have exacerbated it, the BIS said. These included increased indebtedness in the oil sector in recent years.


ज्या Baltic Dry Index चा उल्लेख मी आधी इथे केला होता, त्या बद्धलचा उत्तम दुवा :- Why You Shouldn't Worry About The Baltic Dry Index Hitting A 29 Year Low

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मुत्सद्दीमोहाचे मोल

@ननि ऑइल संदर्भात वाचताना जालावर बर्‍याचवेळी पडत्या ऑइल प्राईजमुळे डेरिव्हेटिव्ह चा धोका जास्त असल्याचे समजते... असाही एक मत प्रवाह आहे की ही पडत्या काळ्या सोन्याची किंमतच येणार्‍या क्रायसिसचा ट्रिगर पॉइंट ठरु शकतो... Plummeting Oil Prices Could Destroy The Banks That Are Holding Trillions In Commodity Derivatives Oaktree’s Marks Says Oil Decline May Ignite Debt Crisis David Morgan: Oil Derivatives Explosion Double 2008 Sub-Prime Crisis Current Oil Crisis More Dangerous Than You Think

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Balam Pichkari... { Yeh Jawaani Hai Deewani }

In reply to by मदनबाण

होना! हाय यिल्ड डेट्पैकी ३०% डेट फ्रॅकिंग कंपन्यांचं आहे बाँड मार्केट्मध्ये असं म्हणतात. या फ्रॅकिंग कंपन्यांची प्राईस हेजेस संपल्यावर डिफॉल्ट्सचा जो धडाका चालू होईल त्यापुढे सबप्राईम नंतरचा क्रेडिट क्रंच किरकोळ वाटेल म्हणतात. कोणकोणत्या बँकांचा बळी जाईल कोण जाणे?

In reply to by नगरीनिरंजन

ओपेकने तेलाचे भाव खाली आणणे आणि ते जरूर तेवढा वेळ खाली ठेवणे यांचा मुख्य उद्देश पुरेश्या फ्रॅकिंग कंपन्यांचे दिवाळे वाजेवून ओपेकचे तेलक्षेत्रातले वर्चस्व परत प्रस्थापित करणे हाच दिसतो आहे. अमेरिकन फ्रॅकिंग कंपन्यांव्दारे तेलउद्योगावर औद्योगिक आणि आर्थिक नियंत्रण आणण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नाला अयशस्वी करण्यासाठीचे हे पाऊल दिसत आहे. त्यामुळेच दुसर्‍या फळीतले ओपेक सभासद जबर नुकसान होत असताना अजूनही गप्प आहेत. रशिया, इराण आणि ईसीस हे त्यातले अमेरिकेला व काही अरेबिक ओपेक सभासदांना स्वगतार्ह असलेले पण केवळ अनुषंगिक बळी दिसत आहेत. मुख्य गम्मत म्हणजे रशिया आणि इराण सुरुवातीच्या आरडाओरडीनंतर गप्प झालेले आहेत... यामागे पडद्यामागचे राजकारण असण्याची दाट शक्यता आहे !