✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण

प
प्रसाद गोडबोले यांनी
Wed, 01/07/2015 - 13:37  ·  लेख
लेख
२०१५ साल उजाडलं तेच अर्थव्यवस्थेत खळबळ घेवुन . काल ( ६ जानेवारी २०१५) रोजी सेन्सेक्स तब्बल ८५० अंशांनी घसरलाय , तेलाच्या किमती गडगडल्या आहेत , रशियन रुबलही संकटात आहे . एकुणच सर्व अर्थव्यवस्था अस्थिर आहे , प्रचंड वोलाटालिटी आहे मार्केट मधे . आता ह्या सार्‍याकडे दुर्लक्ष करुन आपल्याला चालणार नाही . Ignorance is actually not a bliss . ह्या आर्थिक घडामोडी नकळत आपल्या जीवनावर प्रभाव पाडत आहेत म्हणुनच ह्यांच्या कडे नीट आणि बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे मला वाटते . "प्रपंची पाहिजे सुवर्ण | परमार्थी पंचीकरण "| असं समर्थांनी स्पष्ट सांगुन ठेवले आहे , प्रपंचात पैशाकडे ( सोन्याकडे) लक्ष ठेवणे गरजेचे आहे . ह्या धाग्यावर जागतिक आर्थिक घडामोडींची चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे . लिन्क सह बातमी दिल्यास अधिक उपयुक्त ठरेल :) अवांतर : १) अर्थव्यवस्थेतील बरेचसे शब्द इंग्रजी असतात व त्यांचे मराठी प्रतिशब्द फार गंभीर असतात म्हणुन इथे मराठीचा हट्ट धरु नये ही नम्र विनंती . २) अर्थ्कारण , समाजकारण आणि राजकारण हे हातात हात घालुन चालत असतात त्यामुळे चर्चा तिकडे जाण्याचे शक्यता आहे तरीही अति विषयांतर करुन फोकस डायव्हर्ट करु नये ही विनंती . शेवटी पैशाचा मामला आहे , नो एक्स्क्युज .

"एकामेका सहाय्य करु | अवघे होवु श्रीमंत || "

वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
अर्थकारण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
बातमी

प्रतिक्रिया द्या
214763 वाचन

💬 प्रतिसाद (513)

प्रतिक्रिया

तेल आणखी खाली जाईल हा आशावाद

विजुभाऊ
Wed, 01/07/2015 - 14:45 नवीन
तेल आणखी खाली जाईल हा आशावाद आहे. मात्र भारता सारख्या देशाने अशा परिस्थितीत तेलाचे साठे वाढवून ठेवणे योग्य. तसेच देशांतर्गत डिझेल पेट्रोल च्या किमती कमी न करता त्यातून मिळालेल्या पैशातून सरप्लस गंगाजळीची वाढवणे हे योग्य. भारता सारख्या देशाला रशिया सारख्या मित्राला अन्नाच्या बदल्यात तेल असा एक मदतीचा ऑप्शन उपलब्ध होउ शकतो.
  • Log in or register to post comments

कुठेतरी वाचल्याचे आठवते आहे..

टवाळ कार्टा
Wed, 01/07/2015 - 14:49 नवीन
कुठेतरी वाचल्याचे आठवते आहे...भारत या परिस्थितीचा सकारात्मक उपयोग करुन तेल साठवून ठेउ शकत नाही कारण आपल्याकडे ती क्षमता नाहिये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

हे घ्या...

अनुप ढेरे
Wed, 01/07/2015 - 15:21 नवीन
http://www.thehindu.com/business/Economy/cheap-oil-and-strategic-reserves/article6668277.ece
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मार्केट विशेष्तः तेल अजुन

मदनबाण
Wed, 01/07/2015 - 14:55 नवीन
मार्केट विशेष्तः तेल अजुन खाली जाणार असे माझे स्पेक्युलेशन आहे ४०$ प्रति बॅरल पर्यंत भाव खाली जाउ शकतील असे सध्या तरी वाटते...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,करंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)
  • Log in or register to post comments

ऑइल प्राइज पडत असताना... ही

मदनबाण
Wed, 01/07/2015 - 15:02 नवीन
ऑइल प्राइज पडत असताना... ही वेगळीच बातमी ! Despite plunging oil prices, Gulf on brink of boom

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,फरंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)
  • Log in or register to post comments

कच्च्या तेलाच्या किमतीबद्दल

मी_आहे_ना
Wed, 01/07/2015 - 15:07 नवीन
हा सप्तरंग मधला लेख पहा "कच्च्या तेलाचं पक्कं राजकारण"
  • Log in or register to post comments

@ मी_आहे_ना

मदनबाण
Wed, 01/07/2015 - 15:24 नवीन
@ मी_आहे_ना वाहह सुंदर दुवा ! :) बाकी कोण कशाचा आनंद आणि उत्सव साजरा करेल ते सांगता येत नाही ! मागच्या वर्षी जेव्हा अमेरिकेचे Debt $18 Trillion वर पोहचणार होते, त्या आधी तो क्षण एन्ज्यॉय करण्यासाठी चीन मधले नागरिक बिजींग मधल्या Tiananmen Square मधे पोहचले होते, युएस Debt क्लॉक पहायला ! Image removed.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,फरंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी_आहे_ना

दुवा चांगला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 01/07/2015 - 17:04 नवीन
धन्स. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी_आहे_ना

रोचक चर्चा. चांगली माहिती

शिद
Wed, 01/07/2015 - 16:12 नवीन
रोचक चर्चा. चांगली माहिती मिळतेय.
  • Log in or register to post comments

बाँड मार्केट अपडेट :-Global

मदनबाण
Wed, 01/07/2015 - 16:50 नवीन
बाँड मार्केट अपडेट :- Global corporate bond issuance hits record $7 trillion in 2014

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,फरंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)
  • Log in or register to post comments

आपण काय करावे?

कपिलमुनी
Wed, 01/07/2015 - 17:51 नवीन
या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य लोकांनी काय करावे ? ( तेल विकत घ्यावे हा सल्ला नको ;) ) घर , गुंतवणूक , कर्ज , नोकरी आणि व्यवसाय या संदर्भात चर्चा करू या .
  • Log in or register to post comments

वाचतोय. तेलाचा उतरणारा भाव

कंजूस
Wed, 01/07/2015 - 18:43 नवीन
वाचतोय. तेलाचा उतरणारा भाव आणि शेअर मार्केट हातात हात घालून जाणार आहे असं दिसतंय.
  • Log in or register to post comments

मंदीमधे काही संधी दडलेल्या

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 01/07/2015 - 18:51 नवीन
मंदीमधे काही संधी दडलेल्या असतीलचं ना? त्यांचीही चर्चा होऊन जाउ दे.
  • Log in or register to post comments

मंदीमध्ये "पैसा कमावण्याशिवाय

नगरीनिरंजन
Wed, 01/07/2015 - 20:37 नवीन
मंदीमध्ये "पैसा कमावण्याशिवाय आयुष्यात दुसरे काही अर्थपूर्ण असू शकते का" यावर विचार करण्याची संधी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

पैसा कमावण्याशिवाय आयुष्यात

प्रसाद गोडबोले
Wed, 01/07/2015 - 21:11 नवीन
पैसा कमावण्याशिवाय आयुष्यात दुसरे काही अर्थपूर्ण असू शकते का
कॉलिंग प्रवचनकार प्यासारामबुवा चोपु ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

आय.टी

चिरोटा
Wed, 01/07/2015 - 19:30 नवीन
आय.टीतली घडामोड. ईतके दिवस घडा होते. आता मोड चालू झाली आहे. टी.सी.एस. २५००० लोकांना काढता आहेत अशी बातमी आहे. तेथे काम करणार्या काही मित्रांनी त्यास दुजोरा दिला आहे. १०-१५ वर्षांचा अनुभव असणारे 'मॅनेजर्स' बरेच महिने बेंचवर होते/आहेत.
  • Log in or register to post comments

सामान्य लोकांनी सध्या स्टॉक

काळा पहाड
Wed, 01/07/2015 - 19:47 नवीन
सामान्य लोकांनी सध्या स्टॉक मार्केट पासून दूरच रहावं. तेल जर उसळलं तर व्होलॅटिलिटी आणखी वाढेल. अर्थात मी अर्थतज्ञ नाही. कॉमन सेन्स नं सांगतोय. अवांतरः अर्थात हे सांगण्यापुरतं. आजच मी बँकिंग शेअर्स घेतले आहेत.
  • Log in or register to post comments

सामान्य लोकांनी सध्या स्टॉक

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 01/07/2015 - 19:56 नवीन
सामान्य लोकांनी सध्या स्टॉक मार्केट पासून दूरच रहावं.... आणि ....अर्थात हे सांगण्यापुरतं. आजच मी बँकिंग शेअर्स घेतले आहेत. आपण असामान्य आहोत हे सांगायचा हा प्रयत्न आहे की काय असा प्रश्न पडलाय ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

छान चर्चा चालली आहे.ज्ञानात

अजया
गुरुवार, 01/08/2015 - 07:23 नवीन
छान चर्चा चालली आहे.ज्ञानात भर पडते आहे! विशाखा पाटील यांचा अभ्यासपूर्ण प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments

मस्त चर्चा चालु आहे. लगे रहो.

पिंपातला उंदीर
गुरुवार, 01/08/2015 - 09:22 नवीन
मस्त चर्चा चालु आहे. लगे रहो. आम्च्यसर्ख्या अर्थ नीरक्षर लोकाना पण थोडे थोडे कलत आहे
  • Log in or register to post comments

४०$ प्रति बॅरल पर्यंत भाव

मदनबाण
गुरुवार, 01/08/2015 - 09:39 नवीन
४०$ प्रति बॅरल पर्यंत भाव खाली जाउ शकतील असे सध्या तरी वाटते... बघुया किती वेळात हा भाव खाली येतो ते... दुवा :-Brent crude oil price dips below $50 a barrel लेटेस्ट अपडेट ऑन ऑइल :- Oil Firms’ New Dilemma: Save, or Borrow More? How $50 Oil Changes Almost Everything

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-Yalgaar
  • Log in or register to post comments

अभ्यासपूर्ण चर्चा

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 01/08/2015 - 09:44 नवीन
या धाग्यावरची चर्चा वाचून ज्ञानात बरीच भर पडली. इंधनाच्या किमती कमी होण्यामुळे हायब्रीड व इलेक्ट्रिक कार्सची मागणी घटण्याची शक्यता वाटते. त्याचा वाईट परिणाम म्हणजे त्या क्षेत्रातले संशोधनही मंदावू शकते.
  • Log in or register to post comments

अपडेट फ्रॉम रशिया...Russia

मदनबाण
गुरुवार, 01/08/2015 - 10:34 नवीन
अपडेट फ्रॉम रशिया... Russia Sees Major Threats from NATO, US

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-Yalgaar
  • Log in or register to post comments

न्यूज फ्रॉम Fed...Fed Warns

मदनबाण
गुरुवार, 01/08/2015 - 10:50 नवीन
न्यूज फ्रॉम Fed... Fed Warns on Global Growth Fears

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-Yalgaar
  • Log in or register to post comments

बॉन्ड मार्केट अपडेट :-Bond

मदनबाण
गुरुवार, 01/08/2015 - 12:03 नवीन
बॉन्ड मार्केट अपडेट :- Bond Market Warns Of Recession Investors to take hit as 1st default for Chinese bond market looms

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-Yalgaar
  • Log in or register to post comments

खफ वर ज्या चायनिज घोस्ट सिटीज

मदनबाण
गुरुवार, 01/08/2015 - 12:14 नवीन
Image removed. खफ वर ज्या चायनिज घोस्ट सिटीज बद्धल लिहल्र होत आणि ज्या चायनिज रिअल इस्टेटचा बबल फुटण्याच्या मार्गावर आहे असं म्हंटल होत त्याच प्रत्यंतर वरच्या चायना दुव्यात दिसुन येत आहे ! काही दिवसांनी हीच गोष्ट चायनीज बँक्स बद्धल ऐकायला मिळाली तरी नवल वाटणार नाही !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-Yalgaar
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

म्हणूनच मला आपल्याकडेही किती

नगरीनिरंजन
गुरुवार, 01/08/2015 - 12:27 नवीन
म्हणूनच मला आपल्याकडेही किती नवे फ्लॅट न विकता पडून आहेत या बद्दल उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

वाकड बिकड एरीआमध्ये बरेच

अनुप ढेरे
गुरुवार, 01/08/2015 - 13:42 नवीन
वाकड बिकड एरीआमध्ये बरेच फ्लॅट रिकामे असतात आजकाल अस ऐकलं आहे. विशेषत: ३ बीएचके. पण किमती कमी करत नाहीत बिल्डर लोक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

६.४ कोटी रीकामे फ्लॅट हे मला

प्रसाद१९७१
गुरुवार, 01/08/2015 - 13:17 नवीन
६.४ कोटी रीकामे फ्लॅट हे मला फार्फार अतिशयोक्तीचे उदाहरण वाटते. एक फ्लॅट ची कॉस्ट ५० लाख रुपये पकडली तर ५ ट्रीलीयन डॉलर ची कॉस्ट येतीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

हरकत नाही... टाईमपास म्हणुन २

मदनबाण
गुरुवार, 01/08/2015 - 13:32 नवीन
हरकत नाही... टाईमपास म्हणुन २ वर्षापूर्वीचे हे व्हिडीयो पाहुन मनोरंजन करुन घ्या...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-Yalgaar
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

विशेष म्हणजे लोकांनी ही घरे

नगरीनिरंजन
गुरुवार, 01/08/2015 - 16:39 नवीन
विशेष म्हणजे लोकांनी ही घरे खरेदी करुन ठेवली आहेत आणखी किंमती वाढतील म्हणून. खरंच मूर्खपणाला व लोभीपणाला अंत नाही म्हणतात ते अगदी खरंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

नगरी निरन्जन चीन आणि भारत

विजुभाऊ
गुरुवार, 01/08/2015 - 12:38 नवीन
नगरी निरन्जन चीन आणि भारत यांच्यात तुलना नको. भारतात सरकार स्वतः घरे बाम्धत नाही किंवा बिल्डरांच्या भानगडीत पडत नाही. चीन मधे खाजगी बिल्डराना सरकारची मदत मिळते. आपल्या कडे फ्लॅट पडून राहिले म्हणून त्यांच्या कीमती कमी होणार नाहीत. कारण जसजसा काळ जाईल तसतसे फ्लॅट वरील कर्ज वाढत जाईल आणि बिल्डरचे प्रॉफिट कमीकमी होत जाईल. थोड्या काळाने हे मार्जीन शून्य होईल. म्हणून बील्डर आणखी दर वाढवतील. ब्यांकानी रीकव्हरी करायला म्हणून अशी कर्जे असलेले फ्लॅट विकले तरीही किमती कमी होतील असे नव्हे. फ्लॅट ही टॅन्जीबल अ‍ॅसेट असल्याकारणाने त्याची किम्मत ठरावीक मर्यादेत कायम राहील ती एकदम शून्य किंवा शून्यवत होणार नाही.
  • Log in or register to post comments

फ्लॅटची किंमत कमी होईल किंवा

नगरीनिरंजन
गुरुवार, 01/08/2015 - 12:50 नवीन
फ्लॅटची किंमत कमी होईल किंवा शून्यवत होईल (आणि मग मी घेईन ;-) ) अशा विचाराने मला उत्सुकता नाहीय. भारत आणि चीनच्या समाजात बरचसं साम्य आहे. दोन्हीकडे सोने व रयल इस्टेट या पारंपारिक गुंतवणुकीचे आकर्षण आहे. दोन्हीकडे लोकांना मुलगे हवे असतात वगैरे. आर्थिक बाबतीतही चीनमधे मॅन्युफॅक्चरिंग बूममुळे व आपल्याकडे आयटी व सर्व्हिस इंडस्ट्री बूममुळे मध्यमवर्गीयांच्या हाती बक्कळ पैसा खुळखुळायला लागला आहे. चीनमध्ये सरकार बिल्डरांना मदत करते हे खरे असले आणि आर्थिक स्टिम्युलस म्हणून अनेक इमारतीबांधून ठेवल्या आहेत हे खरे असले तरी भारतात बिल्डर लोकांनीही मागणी पाहून भरपूर घरे बांधली आहेत. दोन्हीकडे परिणाम मात्र एकच आहे. उच्चमध्यमवर्गीय व श्रीमंत लोकांकडे एकापेक्षा अधिक घरे आणि इतरांना मात्र साधे एक घरही परवडत नाही. शिवाय चीनमध्ये सरकार बिल्डरांना मदत करते तसे ते वेळ पडल्यास रिकामे फ्लॅट्स लोकांना द्यायची सक्तीसुद्धा करु शकते. भारतात सरकार मध्ये पडत नाही (अर्थात अप्रत्यक्षपणे राजकारणी बिल्डरांना मदत करतात हे उघड गुपित आहे) आणि तुम्ही म्हणता तसे पडून राहिले तरी फ्लॅट्सच्या किंमती कमी होणार नसल्याने कमी उत्पन्न गटातल्या लोकांना घर घेणे दुरापास्तच राहणार. याचीच मला फक्त शहानिशा करायची आहे म्हणजे मग भारताच्या प्रगतीबद्दल पुन्हा गर्वगीत गायला मी मोकळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

तेलाच्या किंमती फार काळ खाली

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 01/08/2015 - 12:45 नवीन
तेलाच्या किंमती फार काळ खाली राहिल्या तर होणारे आर्थिक-राजकिय परिणाम : अ : अमेरिकेला आवडणारे परिणाम : १. रशिया, इराण, व्हेनेझुएला आणि इतर राजकिय दृष्ट्या विरोधी तेलउत्पादक देशातील राजवटींचे आर्थिक खच्चिकरण : सौदी अरेबिया, कुवेत आणि काही प्रमाणात अबू धाबी सोडून इतर कोणत्याही देशाला $५० च्या खाली असलेले तेलाचे दर आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाहीत... अगदी अमेरिकेलाही... पण हा धक्का सहन करण्याची अमेरिकेची तयारी असावी असेच दिसते. त्याशिवाय ओपेकचे नेते असलेले सौदी अरेबिया आणि युएई हे देश "भाव कमी झाले तरी तेलउत्पादन कमी करणार नाही" असा पवित्रा घेऊ शकले नसते. शिवाय, काही काळ कमी होणार्‍या उत्पन्नाची झळ सोसण्याची ताकद (गेल्या दशक दोन दशकातल्या उच्च तेल किंमतींमुळे जमा झालेल्या पुंजींमूळे {सॉव्हरिन फंड}) त्यांच्या अर्थव्यवस्थेत आहे. अमेरिकन तेलकंपन्यांना हा धक्का तितका सुसह्य होणार नाही हे खरे असले तरी अमेरिकेचा जागतिक प्रभाव गेल्या दशकाभरात इतका कमी झाला आहे की ते याबाबतीत फार काही करु शकतील काय याबाबत साशंकता आहे. २. ISIS चे आर्थिक खच्चिकरण : इराक आणि विषेशतः कुर्दीस्तानमधील तेल काळ्याबाजारात मूळ किमंमतीपेक्षा कमी भावाने विकून मिळवलेल्या पैश्याच्या बळावर ISIS ताकतवर झाली आहे. जेव्हा तेलाचे भाव $१०० च्या वर होते तेव्हा काळ्याबाजारात ISIS ने ते $६०-७० ने विकून भरपूर पैसे मिळवले आहेत. आता भाव $५० च्या खाली गेल्याने त्यांचा या मार्गाने येणारा पैशाचा ओघ आटला आहे. आ : सौदी अरेबिया, कुवेत आणि अबू धाबी या प्रमूख ओपेक देशांना आवडणारे परिणाम : १. अपारंपारिक उर्जेसाठी केले जाणार्‍या प्रयत्नांना पडणारी खीळ : गेल्या दशकात अपारंपारिक उर्जेच्या संशोधनांत जगभर मोठ्या प्रमाणात खर्च केला गेला आहे. पण अजूनही हे उर्जास्त्रोत खनिज तेलापेक्षा महागडे आहेत आणि खूपसे सरकारी मदतीवर (सबसिडी) अवलंबून आहेत. तेलाचे भाव वर असताना ($१००-१४०/बॅरल) हा सर्व खर्च योग्य होता. असेच संशोधन चालू राहिले आणि एखादा आर्थिक दृष्ट्या सक्षम अपारंपारिक स्त्रोत सापडला तर खनिज तेलाचे जागतिक अर्थिक-राजकिय महत्व एकदम कमी होईल. हे जेवढे ओपेकला नको आहे तेवढेच अमेरिकेतील धनाढ्य तेल कंपन्यांनाही नको आहे. ८०च्या दशकात तेलाचे दर पडल्याने शेल ऑईल एक्स्ट्रॅक्शन संशोधन आणि उद्योगीकरणाला खीळ पडली होती. अपारंपारिक उर्जा स्त्रोत भविष्यातले प्रतिस्पर्धी होऊ शकतात पण शेल ऑईल एक्स्ट्रॅक्शन हा जरी अपारंपारिक स्त्रोत नसला तरी पारंपारिक क्रूड तेल उत्पादकांचा सर्वात मोठा आणि आता औद्योगिक स्वरूपात आस्तित्वात असलेला प्रतिस्पर्धी स्त्रोत आहे. तेलाचे भाव $६०च्या खाली जाणे त्याला अत्यंत हानीकारक आहे. २. ओपेक सदस्य नसणार्‍या तेलउत्पादकांचे बुडीत जाणारे तेल उद्योग : गेल्या शतक दोन शतकांत वाढलेल्या तेलाच्या किंमतींमुळे; $५० पेक्षा जास्त उत्पादनखर्च असलेले आणि म्हणून आधी अव्यवहार्य असलेले अनेक प्रकल्प फायदेशीर झाले होते. आता तेलाची किंमत बराच काळ $५०च्या आसपास राहिल्यास ते परत घाट्याचे होतील आणि त्यांची यंत्रसामुग्री वर्षभर बंद राहिल्यास ते कायमचे बंद होण्याचा धोका आहे. असे झाल्यास काही काळाने तेलव्यवसायावर परत ओपेकचे प्रभुत्व प्रस्थापित होईल. ३. इराणचे आर्थिक खच्चीकरण : हे जेवढे राजकिय कारणांसाठी अमेरिकेला आवडेल तेवढेच शिया इराणचे आर्थिक खच्चीकरण मध्यपूर्वेतल्या सुन्नी तेलउत्पादकांना धार्मिक-राजकिय-आर्थिक कारणांसाठी आवडेल हेवेसांन. इ : जागतिक (यात अमेरिका व प्रमुख ओपेक देशही आलेच) दुष्परिणाम : १. जागतिक आर्थिक मंदी : तेलाच्या व्यापाराने मिळालेला अतिरिक्त पैसा जागतिक अर्थव्यवस्थेत सहजपणे आणि बर्‍याचश्या सुसह्य अटींवर फिरत असतो, ते बंद/कमी झाल्याने जागतिक अर्थव्यवस्थेवर ताण येईल. हाती खेळणारा पैसा कमी झाल्याने अर्थातच मालाची मागणी कमी होऊन जागतिक मंदीचे सावट येईल. यात उत्पादक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या (मुख्यतः चीन, जपान आणि इतर प्रधान ओद्योगिक देश) देशांना जेवढा फटका बसेल तेवढाच सेवा क्षेत्रात मुसंडी मारणार्‍या/मारू इच्छिणार्‍या भारतासारख्या देशानांही बसेल. युरोपियन समुदायावरही अगोदरपासून असलेले आर्थिक तंगीचे परिणाम अजून गडद होतील... सद्या ग्रीस युरोपिय समुदायातून बाहेर पडण्याची चिन्हे दिसत आहेत. जर तसे झाले तर, त्याच्या मागे रांगेत असलेल्या इतर काही देशांची त्या दिशेची वाटचाल अधिक वेगाची होऊ शकते. याचे सर्व जगाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी दुष्परिणाम होतील. २. आर्थिक कोंडीमुळे झालेले राजकिय परिणाम : (अ) रशिया आपली आर्थिक कोंडी हातावर हात ठेऊन पहाणार नाही याची लक्षणे आताच दिसू लागली आहेत. रशियाने त्याबाबतीत ब्युगुल फुंकायला सुरुवात केली आहे हे मदनबाण यांनी आधीच दिलेल्या दुव्यावर दिसून येईल. (आ) इराणही हातावर हात राखून बसणारा देश नाही. त्यामुळे भिंतीला पाठ टेकल्यावर हे देश कोणत्या उघड / गुप्त कारवाया करतील हे भविष्यात फार जवळून पहावे लागेल. असो. अजून बरेच आहे. पण, सद्या इतकेच पुरे.
  • Log in or register to post comments

सुंदर अत्यंत सुंदर प्रतिसाद

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 01/08/2015 - 14:11 नवीन
सुंदर अत्यंत सुंदर प्रतिसाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

+१

प्रचेतस
गुरुवार, 01/08/2015 - 19:50 नवीन
हेच म्हणतो. याखेरीज इतरही प्रदीप, ननि यांचेही प्रतिसाद आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अत्यंत माहितीपूर्ण प्रतिसाद.

शिद
गुरुवार, 01/08/2015 - 21:01 नवीन
अत्यंत माहितीपूर्ण प्रतिसाद. धन्यवाद.
अजून बरेच आहे. पण, सद्या इतकेच पुरे.
या विषयावर एखादा स्वतंत्र लेख लिहा. आम्ही आहोत वाचायला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

विश्लेषण आवडले. (या विषयावरचे

विशाखा पाटील
गुरुवार, 01/08/2015 - 21:49 नवीन
विश्लेषण आवडले. (या विषयावरचे नगरीनिरंजन, खटपटया इत्यादीचे प्रतिसादही आवडले.) किमती कमी झाल्यामुळे आयातदार देशांना तात्कालिक फायदा होत असला, तरी दीर्घकाळाच्या दृष्टीने त्याचे विपरीत परिणाम होतील, हे लक्षात आले. धन्यवाद! दुसरे असे, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका खंडातल्या अनेक देशांमध्ये तेलक्षेत्रात गुंतवणुकीला नुकतीच सुरूवात झाली आहे, तिच्यावरही परिणाम होईल. आणि पुन्हा काही देशांचीच तेलावरची मक्तेदारी टिकून राहील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

गोल्डमन साक

अनिरुद्ध.वैद्य
Sat, 09/12/2015 - 07:15 नवीन
गोल्डमन साकच्या नव्या अंदाजानुसार तेल २०$ पर्यंत जाऊ शकेल. त्याशिवाय इजिप्तमध्ये मोठी ओईलफिल्ड सापडलीय. त्याचाही परिणाम पडेलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

गोल्डमन साक

अनुप ढेरे
Sat, 09/12/2015 - 13:51 नवीन
हॅहॅहॅ. तेल १४०$ असताना २००$ वर जाइल सांगणारे हेच होते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

इकॉनॉमी वर अंदाज वर्तवणे हे

काळा पहाड
Sat, 09/12/2015 - 16:30 नवीन
इकॉनॉमी वर अंदाज वर्तवणे हे त्यांचं काम आहे. हे काम उपलब्ध माहिती वापरून केलं जातं. त्यावेळच्या परिस्थितीनुसार त्यांनी तो अंदाज वर्तवला होता. परिस्थिती कधीही बदलू शकते आणि त्यामुळे तो अंदाज वैध राहीलच असं नाही. उपलब्ध राजकीय, आर्थिक आणि परिस्थितीजन्य माहितीचा वापर करून कमॉडिटीच्या भावात होणारे बदल सांगणं हे काही गणितं वापरून केलं जातं. ते पत्रिका बघून भविष्य सांगत नाहीयेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

त्यामुळे तो अंदाज वैध राहीलच

अनुप ढेरे
Sat, 09/12/2015 - 18:19 नवीन
त्यामुळे तो अंदाज वैध राहीलच असं नाही.
हेच सांगतोय. ते अंदाज विश्वासार्ह नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

ओबामा आणि ऑटो इन्डस्ट्रीचा

मदनबाण
गुरुवार, 01/08/2015 - 13:08 नवीन
ओबामा आणि ऑटो इन्डस्ट्रीचा बेल-आउट पर्याय... एकंदर फोर्ड ची चांगलीच लागलेली दिसतेय ! Obama promotes auto industry bailout as a policy that worked Ford Australia hits 48-year low in second strongest car market on record

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-Yalgaar
  • Log in or register to post comments

आधीच रिसेशन सहन करणार्‍या

मदनबाण
गुरुवार, 01/08/2015 - 13:40 नवीन
आधीच रिसेशन सहन करणार्‍या जपान मधुन अपडेट :- Record-Low Japanese Mortgage Rates Seen Luring Back Buyers बाकी जर्मनी सुद्धा रिसेशनच्या जवळ चालला / पोहचणार असल्याच्या बातम्या आहेत...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-Yalgaar
  • Log in or register to post comments

ऑइल प्राइज आणि त्याचे पडसाद

मदनबाण
गुरुवार, 01/08/2015 - 13:58 नवीन
ऑइल प्राइज आणि त्याचे पडसाद ! Who wins, who loses as oil prices plummet?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-Yalgaar
  • Log in or register to post comments

अमेरिकेला आत्ताच ९/११ च्या

मदनबाण
गुरुवार, 01/08/2015 - 16:11 नवीन
अमेरिकेला आत्ताच ९/११ च्या सौदी कनेक्शची आठवण आलेली दिसतेय ! Saudi connection? Lawmakers up pressure on Obama to release secret 9/11 documents रशिया-चीन भाई भाई Russian Debt Safer Than U.S.? So Says China Rating House Dagong शेख आणि ओपेक... Sheiks vs. Shale: the Future of O.P.E.C. आपल्यासाठीची बातमी :- Qatar Airways keen to buy stake in IndiGo

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;) :-Yalgaar
  • Log in or register to post comments

मदनबाणसाहेब आपण अर्थ -

आनन्दा
गुरुवार, 01/08/2015 - 18:59 नवीन
मदनबाणसाहेब आपण अर्थ - पत्रकारितेमध्ये आहात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

नाही हो... माझ्याकडे तर फारच

मदनबाण
गुरुवार, 01/08/2015 - 22:37 नवीन
नाही हो... माझ्याकडे तर फारच त्रोटक माहिती आहे ! पण असे का विचारलेत ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- हो जाता है कैसे प्यार... ;):-Yalgaar
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

तुमचा जागतिक इकॉनॉमीचा

आनन्दा
Fri, 01/09/2015 - 12:20 नवीन
तुमचा जागतिक इकॉनॉमीचा चांगलाच अभ्यास आहे, तो छंद म्हणून आहे की व्यवसाय म्हणून तेव्हढे बघायचे होते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

थोडो-फार वाचले तेच... अभ्यास

मदनबाण
Fri, 01/09/2015 - 12:26 नवीन
थोडो-फार वाचले तेच... अभ्यास असा नाही... छंद म्हणा... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- O Humdum Suniyo Re... :- Saathiya
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा