Skip to main content

जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 07/01/2015 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
२०१५ साल उजाडलं तेच अर्थव्यवस्थेत खळबळ घेवुन . काल ( ६ जानेवारी २०१५) रोजी सेन्सेक्स तब्बल ८५० अंशांनी घसरलाय , तेलाच्या किमती गडगडल्या आहेत , रशियन रुबलही संकटात आहे . एकुणच सर्व अर्थव्यवस्था अस्थिर आहे , प्रचंड वोलाटालिटी आहे मार्केट मधे . आता ह्या सार्‍याकडे दुर्लक्ष करुन आपल्याला चालणार नाही . Ignorance is actually not a bliss . ह्या आर्थिक घडामोडी नकळत आपल्या जीवनावर प्रभाव पाडत आहेत म्हणुनच ह्यांच्या कडे नीट आणि बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे मला वाटते . "प्रपंची पाहिजे सुवर्ण | परमार्थी पंचीकरण "| असं समर्थांनी स्पष्ट सांगुन ठेवले आहे , प्रपंचात पैशाकडे ( सोन्याकडे) लक्ष ठेवणे गरजेचे आहे . ह्या धाग्यावर जागतिक आर्थिक घडामोडींची चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे . लिन्क सह बातमी दिल्यास अधिक उपयुक्त ठरेल :) अवांतर : १) अर्थव्यवस्थेतील बरेचसे शब्द इंग्रजी असतात व त्यांचे मराठी प्रतिशब्द फार गंभीर असतात म्हणुन इथे मराठीचा हट्ट धरु नये ही नम्र विनंती . २) अर्थ्कारण , समाजकारण आणि राजकारण हे हातात हात घालुन चालत असतात त्यामुळे चर्चा तिकडे जाण्याचे शक्यता आहे तरीही अति विषयांतर करुन फोकस डायव्हर्ट करु नये ही विनंती . शेवटी पैशाचा मामला आहे , नो एक्स्क्युज .

"एकामेका सहाय्य करु | अवघे होवु श्रीमंत || "

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 216498
प्रतिक्रिया 513

प्रतिक्रिया

चीनने काल युवान मध्ये २% मुल्यकपात केली आहे. याचे जागतीक व्यापारावर दूरगामी परिणाम शक्य आहेत. याला उपाय म्हणुन इतर राष्ट्रे त्यांच्या आयातकरांत वाढ करू शकतात. देशोदेशीच्या शेअरमार्केट्स मध्ये घसरण झाली आहे. भारतात याघडीला सेंसेक्स २६० आणि निफ्टी ८५ ने खाली आहे.

उत्तम माहिती संकलन आहे. धन्यवाद!

आज देखील युवान मधे कपात करण्यात आली आहे { ज्याचा दुवा वरच्या प्रतिसादात लेटेस्ट म्हणुन दिला आहे.} आपल्या चलनावर आणि अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम :- Rupee depreciates against US dollar China devalues yuan; here's how it may impact India Yuan devaluation to hit Indian exporters, rupee to remain under pressure How the Chinese Yuan devaluation will impact India? How China's Devaluation of Renminbi Impacts India China's yuan devaluation worries Indian industry करंन्सी वॉर संबंधी काही व्यंगचित्रे :- P1 P2 P3 वाचनिय दुवे :- Q&A China devalues the yuan: What you need to know Why has China devalued its currency now and what impact will it have? Two big reasons why China devalued its currency मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- ये परदा हटा दो, जरा मुखड़ा दिखा दो... :- Ek Phool Do Mali

In reply to by मदनबाण

कार्टून झकास! पण युआन अन डॉलरच्या भांडाभांडीत आपलं रूपड कुठशीक असेल कोणास ठाऊक! बाळबोध प्रश्न: बाकी युआनची किंमत कमी झाली तर चायनाला तेल महाग पडायचं का? आणि त्याचा परिणाम उत्पादनावर होणार का?

१२ ऑगस्टला रात्री 23:30 hrs च्या सुमारास चीन मधे मोठा ब्लास्ट झाला ! हा ब्लास्ट एव्हढा मोठा होता की सॅटॅलाईटने सुद्धा तो टिपला गेला. चीनच्या ब्लॉगर्सच्या मते या ब्लास्टची तुलना त्यांना हिरोशिमाच्या स्फोटाशी कराविशी वाटली. या बद्धल सातत्याने बातम्या येत आहेत आणि व्हिडीयोज सुद्धा.आत्ता पर्यंत या स्फोटात १०४ जण ठार झाल्यीची माहिती आहे. अधिक इकडे :-China blast zone evacuated over contamination fear; 104 dead China Tianjin blasts: Evacuations as sodium cyanide found

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Media Censorship: Is China trying to cover up coverage of Tianjin blasts?

In reply to by मदनबाण

वरील दोन्ही व्हिडीयोज भितीदायक आहेत, कॄपया पाहणार्‍यांनी भान ठेवावे...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Media Censorship: Is China trying to cover up coverage of Tianjin blasts?

ब्लास्ट इमेज अपडेट :- १} सॅटेलाईड व्हूव्ह :- P1 P2 २} ड्रोन व्हूव्ह :- P3 ३} डिटेल कोअर साईट व्हूव्ह :- P5 ४} कंप्लीट साईट व्हूव्ह :- P4 ५ } सॅटॅलाईट साईट व्हूव्ह बिफोर ब्लास्ट / आफ्टर ब्लास्ट :- P6 चीनची सध्याची स्थिती :- प्रॉपर्टी बबल ब्लास्ट + इक्विटी मार्केट बबल ब्लास्ट + टायफुन डिझास्टर + करंन्सी डिव्हॅल्युएशन +Tianjin बिगब्लास्ट !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Media Censorship: Is China trying to cover up coverage of Tianjin blasts?

Tianjin बिगब्लास्ट अपडेट :- या ब्लास्टमुळे झालेले परिणाम :- १} Tianjin पोर्ट हा जगातल्या सगळ्यात १० व्यस्त बंदरांमधे मोजला जातो, आणि या ब्लास्टमुळे या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. २} कंटेनर यार्ड / वेअर हाउस / स्टोरेज साईट्स प्रभावित झालेल्या असल्याने बंदरातील वाहतुकीवर परिणाम ३} Tianjin मधे चीनचा Tianhe-1A हा सुपर कॉम्प्युटर लोकेटेड आहे, आणि सध्या तो खबरदारी म्हणुन बंद करण्यात आला आहे. या सुपर कॉम्प्युटरच्या इमारतीला नुकसान झाल्याच्या बातम्या आहेत. { ताज्या बातमी नुसार हा सुपर कॉम्प्युटर परत ऑप्रेशनल झाला आहे.} ४} Toyota आणि John Deere या कंपन्यांनी या ठिकाणचे त्यांचे काम काही काळासाठी थांबवले आहे. ५} मल्टी बिलियन इन्सुरन्स क्लेम्स आता प्रोसेस करावे लागतील. अधिक इकडे :- China blasts may cost over $1.50 billion for insurance firms More Ships Are Moored Off Tianjin Port After Deadly Blasts Firms Gauge Impact of Devastating Explosions at Tianjin Port Blast at Tianjin forces China to shut down supercomputer Tianhe-1A थोडक्यात चीनला हा ब्लास्ट बिलियन्स मधे नुकसान करुन गेला आहे ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :-Live: PM Narendra Modi interacts with Indian workers at ICAD PM Modi in UAE: Abu Dhabi has deep pockets, but will it loosen purse strings for India?


वर्ल्ड इकॉनॉमी अपडेट :- Doomsday clock for global market crash strikes one minute to midnight as central banks lose control The Bloomberg Global Commodity index, which tracks the prices of 22 commodity prices, fell to levels last seen at the beginning of this century. China's stock market is crashing again Moody's issues downbeat forecast for world economic growth Are Illinois public universities doomed? Decades in the making, pension crisis is now Illinois utility assistance gets cold shoulder during budget crisis Chicago Schools Demand $500 Million Bailout From State Competing Proposals to Bail Out Chicago Public Schools The near $1-trillion rise in U.S. student loan debt Other View: Our next crippling crisis: Student loan debt Anxiety over US student debt heightens Navient adds to fears on US student debt द डॉक्युमेंट्री दॅट यू शुड वॉच... Under the Dome जाता जाता :- In the search of infinite growth & luxurious life... we have ruined our earth and our future as well. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Study: We've wiped out half the world's wildlife since 1970 :(

अपडेट :- U.S. oil falls towards $40 on global glut Kazakhstan Is the Latest Oil-Curse Casualty Kazakh currency plunges as government floats it over oil price Eight signs a global market crash is imminent as central banks lose control Yuan devaluation breaks last line of global economic defence, warns top economist FTSE 100 falls into correction territory amid global economy fears Markets are falling around the world as growth fears wallop stocks, oil U.S. Lacks Ammo for Next Economic Crisis Brazil's Rousseff warns commodity slump to burden global economy - paper China smartphone sales fall for first time - Gartner RBI chief Rajan warns of risks from yuan devaluation Currency devaluation raises question on China's strength, says Rajan Fannie, Freddie Risk-Transfer Bonds Give Investors a Scare Again Wall Street slumps at the open on global growth worries Chevron starts layoffs in Covington as oil price slides Renault-Nissan to cut around 1,000 jobs at Chennai plant U.S. Steel to Close Alabama Blast Furnace, Cut 1,100 Jobs Wood Group cuts 5,000 jobs on oil price fall U.S. Lacks Ammo for Next Economic Crisis Index of U.S. Leading Economic Indicators Unexpectedly Declines Nigeria on The Edge of Currency Crisis – FDC Vietnam devalues dong currency, matching Beijing's yuan move जाता जाता :- ग्रीसला विसरलात काय ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Salt 'N' Pepa - Whatta Man 1994 (feat. En Vogue)

प्रीव्हू ऑफ ग्लोबल मेल्ट डाउन... सगळे न्यज चॅनल आता कोसळलेला बाजार आणि चीन या दोनच गोष्टीं बद्धल बोलत आहेत, परंतु... फेड बाबतीत मात्र मौन पाळुन आहेत याची गंमत वाटते... पुढचा महिना अर्थातच सप्टेंबर... नेहमी प्रमाणेच चेअर पर्सन जेनेट येलेने रेट हाईक करेल का ? हा चघळुन चोथा झालेल्या प्रश्नाला परत सामोर्‍या जातील... त्या सुद्धा चीनकडे बोट दाखवतील असा अंदाज वाटतो. परंतु रेट हाईक बद्धल काय ? समजा रेट हाईक कोणत्याही परिस्थीतीत झालीच तरी ती फार कमी वेळ टिकेल आणि फेडला ती परत मागे घ्यावी लागेल... फेड आता अश्या कॉर्नरला अडकला आहे की कोणताही निर्णय त्यांनी घ्यावा आणि तो अंगाशी यावा. जगभरातील बाजार आणि त्यांची चलने कोसळत आहेत, बर्‍याच काळा पासुन अनेक इकॉनॉमिक इंडिकेटर्स आणि चार्ट सातत्याने २००९ च्या कालखंडाकडे बोट दाखवत आहे, त्यावेळी जी स्थिती होती तशी किंवा त्यापेक्षाही खराब स्थिती सध्या असल्याचे समजुन येत आहे, मग फ्लॅश क्रॅश झाला तर त्याचे नवल का वाटावे ? चीनचे स्टॉक मार्केट सातत्याने कोसळत आहे आणि चीनी सरकारने या मार्केटचा ताबा घेणेच वॉर्निंग साईन होती. चीनच्या मार्केट सावरणाच्या नादात चीन ने बिलियन्स अ‍ॅड केले ते सुद्धा वाइप आउट झाले तरी सुद्धा अजुन त्यांचे डोके ताळ्यावर आलेले दिसत नाही आणि पेंशन फंडाचे ९७ बिलिय्न्स मार्केट मधे ओतण्याची तयारी चालवली आहे { हारणारा जुगार्‍याला पुढाच्या डावात आपणच जिंकु असा भ्रम निर्माण होतो, आणि मग तो त्याच्या जवळची प्रत्येक वस्तू जुगारात लावतो... चीनची स्थिती मला अशीच काहीशी वाटते...} इतर दुवे :- Russian ruble collapses to 7-month low on weak oil prices Chinese whispers turn into a scream with Australian sharemarket likely to fall further Oil hits 6-1/2-year low on China and oversupply Rajan was right on QE: 'Currency crisis behind market woes' China OKs pension funds to pour $97B into market China fears wipe 230 billion euros off leading European shares Collective student loan debt altering entire U.S. economy Student loan debt: America's next big crisis School-Loan Reckoning: 7 Million Are in Default Fed Credibility Test Looms as Market Doubts September Rate Rise The Fed looks set to make a dangerous mistake कोणी म्हणे सप्टेंबर कोणी म्हणे ऑक्टोबर, तर कोणी म्हणे २०१६.... पाहुया. जाता जाता :- पीटरचा व्हूव्ह मला अजुनही योग्य वाटतो. अवांतर :- बराच काळ इथे प्रतिसाद देताना माझ्या लक्षात आलेले आहे, की प्रतिसादात दिलेले अनेक व्हिडीयो यू-ट्यूब वरुन अडवले गेले आहेत, तेव्हा जो पर्यंत ते अव्हेलेबल आहेत तो पर्यंत पाहुन घ्या.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Junkie XL, Elvis Presley - A Little Less Conversation (Elvis vs JXL) ft. Elvis Presley

In reply to by अर्धवटराव

युद्धजन्य परिस्थीती म्हणावी काय? नाही, चीन मधे बिग ब्लास्ट झाल्यावर पहिल्यांदाच चीन सरकारने त्यांच्या नागरिकांना निदर्शने करण्यास परवानगी दिली. चीन मधे सरकारची दडपशाही चालते, परंतु तिथल्या शेअर मार्केट मधे चीन सरकारच्या सांगण्या वरुन आणि सरकारच्याच जाहिरात बाजीला भूलुन तेथील लोकांनी त्यांच्याकडे होता नव्हता तेव्हडा सर्व पैसा शेअर मार्केट मधे लावला, बाजार कोसळला आणि लोकांची कष्टाची संपत्ती स्वाहा झाली. सध्या चीन सरकारला आर्थीक आघाडीवर लक्ष देताना जनक्षोभ उसळण्याची भिती जास्त वाटत आहे, त्यामुळे तिथले नागरिक काय करतील त्यावर बरेच काही अवलंबुन असेल. चीनच्या आर्थीक आणि इतर परिस्थीती बद्धल अधिक जाणुन घ्यायचे असेल तर वरच्या एका प्रतिसादातील डॉक्तुमेंट्री पहावी, इंग्रजी सबटायटल्स आहेत. ताज्या घडामोडी :- आजच्या मेल्ट डाउनमुळे आपल्या बाजारातली गुंतवणूकदारांची ७ लाख कोटीची संपत्ती स्वाहा झाली ! आणि फंडामेंटल्सच्या नावाने हे स्टॉक घ्या ते स्टॉक घ्या असे म्हणणार्‍यांची तोंडे कायमची पोळली गेली. संदर्भ :- Markets' crash wipes out Rs 7 lakh crore in investor wealth युरोपियन मार्केट ने २००८ नंतर आजचा सगळ्यात मोठा लॉस पाहिला आहे. संदर्भ :- European stocks dive, eye worst day since 2008 इतर दुवे :- FTSE 100 loses £104 billion in value in one day as China stock slide prompts global selloff China fears wipe quarter of a trillion euros off Europe's blue-chips 'Black Monday': Global Stocks Have Lost $5 Trillion Since China's Yuan Devaluation 1 trillion yuan might be deployed to prevent a stock market meltdown in China China's 'debt termites' Why the Dow crashed 1,000 points in 4 minutes this morning New York Stock Exchange invokes Rule 48 as stocks plunge NYSE Deploys Measures to Ensure Orderly Trading Dow, S&P 500 Suffer Largest Intraday Drop Since 2011 Here’s what it takes to trigger stock-market circuit breakers Households just saw $1.8 trillion in wealth vanish जाता जाता :- अमेरिकेचे दिवाळे निघण्याची शक्यता असताना ओबामा मामा गोल्फ खेळण्यातच रमतात... संदर्भ :- Obama has played more than 1,100 hours of golf as president — here's what that looks like

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Junkie XL, Elvis Presley - A Little Less Conversation (Elvis vs JXL) ft. Elvis Presley

In reply to by मदनबाण

आणि फंडामेंटल्सच्या नावाने हे स्टॉक घ्या ते स्टॉक घ्या असे म्हणणार्‍यांची तोंडे कायमची पोळली गेली.
मला वाटत आहे की मार्केट अजुनही सुस्थितीतच आहे पण ऑक्टोबर डिसेंबर पर्यंत शॉक बसेल , तेव्हा कॅश होल्ड करणेच उत्तम . शिवाय प्रत्येक शेयरची मिनिमम ट्रेडेबल कोस्ट काय असेल ह्याचे अ‍ॅनालिसिस करता येईल ( २००८ चा डेटा वापरुन_) पहातो काहि करता येते का ते !!

In reply to by प्रसाद गोडबोले

कोणत्याही मार्केटसाठी फ्लॅश क्रॅश चांगला नसतो. ते चांगल्या बाजाराचे चिन्ह नव्हे ! आता म्युचलफंड रिडंम्शन लोड वाढेल काय याचा विचार करतोय... काही प्रमाणत लॉस बूक करणारेही असतील... त्यामुळे फक्त पहात राहण्या पलिकडे सध्या काही करु शकत नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बच के रेहना रे बाबा... :- Pukar

In reply to by मदनबाण

त्यामुळे फक्त पहात राहण्या पलिकडे सध्या काही करु शकत नाही.
आज एका फॉरेक्स ट्रेड मधे प्रॉफीट बुक करु पहात होतो पण काही बावळ्ट टेक्निकल लोकांच्या टेक्निकल रीजन्स ने उद्यावर पोस्टपोन झाले :(((( खरेच बर्‍याच लोकांन्ना ऑपॉर्चुनिटी कॉस्ट नावाचा प्रकार माहीत नाहीये .

शेअर बाजार गडगडला की अमुक लक्ष कोटींची संपत्ती पाण्यात गेली अशा आशयाच्या बातम्या येतात. मे २००४ मध्ये लोकसभा निवडणुकीत रालोआचा पराभव झाल्यावरही शेअर बाजार गडगडला होता अन अशाच बातम्या आल्या होत्या. माझ्यासारख्या अर्थ अडाण्याला असा प्रश्न पडतो की एक दिवस मार्केट डाउन झालं म्हणून संपत्ती मातीमोल कशी काय होते? जे स्टॉक्स आज खूप खाली गेले आहेत ते काही महिन्यांतच कालच्या पातळीवर येतील. कदाचित काही वरही जातील. तर काही अडखळत राहतील. पण जोवर ज्या कंपन्यांमध्ये गुंतवणुक केली आहे त्या दिवाळखोर होत नाहीत तोवर संपत्ती मातीमोल कशी काय होईल. संपत्ती मातीमोल होण्याची उदाहरणे मी अमेरिकेत जवळून पाहिली आहेत. मी अमेरिकेत नवा असताना जिथे काम करत होतो ती बँक दिवाळखोर झाली. तिथे जे पूर्णवेळ कर्मचारी होते त्यांच्या नोकर्‍या तर गेल्याच अन त्यांचे जे एम्प्लॉयी स्टॉक ऑप्शन्स (वर्षानुवर्षे पगारातून पैसे कापले जाऊन बाजारभावापेक्षा थोड्या कमी किमतीत घेतलेले कंपनीचे स्टॉक्स) होते त्यांची किंमत शून्य झाली.

In reply to by श्रीरंग_जोशी

बाळबोध उत्तर-(पण चुकिचे नाही.)- संपत्तीत गुंतवणुक हा मोठा भाग अस्तो. गुंतवणूक जर १० रु.ची केली तर १० रु. ची संपत्ती झाली. जेव्हा मार्केट कोसळते तेव्हा ही गुंतवणुक १० र. वरून ९/८/७ वर येते, आणि संपत्ती कमी होते. प्रेशर चे कारण-एक उदाहरण- या संपत्तीच्या आधारावर तारणी कर्जेही घेतली असतात. कर्जदार अशा वेळी तगादे सुरु करतो की कर्ज आणि तारण यांच्यातील गुणोत्तर बिघडले असून ते मर्यादेत आणा- एक तर अजून तारण द्या किंवा थोड्या/सगळ्या कर्जाची परतफेड करा. ह्याने एक प्रकारची अनिश्चितता येते.

In reply to by असंका

हा तर्क मान्य आहेच पण बर्‍याच बाबतीत काही दिवस थांबल्यास हे नुकसान भरून निघणारच असते. तसेच ज्यांना शक्य आहे त्यांनी नव्याने गुंतवणूक करून भरपूर नफा कमवण्याची ही संधी असते. मला प्रश्न असा पडतो की लगेच संपत्ती स्वाहा झाली किंवा मातीमोल झाली असे का म्हंटले जाते?

In reply to by अमेरिकन त्रिशंकू

म्हणून तर लगेच एवढी मोठी संपत्ती मातीमोल झाली असे निष्कर्ष कसे काढले जातात याबाबत औत्सुक्य आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

अशा खोट्या बातम्या देऊन शेअर बाजाराला बदनाम करायच, दुसरं काय? सोन्याचे भाव पडतात तेव्हा अशा बातम्या येत नाही. तेव्हा खरेदीस उत्तम संधी असे सांगितले जाते.

In reply to by मार्मिक गोडसे

??? "दुसरे विकतात तेव्हा आपण (पडत्या भावात) शेअर विकत घ्यावे आणि दुसरे (चढत्या भावात) विकत घेत असतात तेव्हा आपण शेअर विकावे." हे वॉरेन बफे तत्व तर जगजाहीर आहे !... आणि सतत घोकले जातेही ! ...फक्त त्याची अंमलबजावणी करण्यासाठी लागणारे काळीज कमी लोकांकडे असते इतकेच !

In reply to by श्रीरंग_जोशी

शेअर बाजारात, आत्ता माझी गुंतवणूक काढून घेतली तर हातात किती पैसे येतील हेच एकमेव सत्य असते... गुंतवणूकीची भविष्यातली किंमत हा केवळ अंदाज असतो, खरा फायदा तोटा नव्हे. शेअर बाजारातला फायदा-तोटा खालील सोप्या गुणोत्तराने ठरविला जातो. गुंतवणूकीतला आत्ताचा फायदा / तोटा = (गुंतवणूकीची बाजारात आत्ता मिळणारी किंमत) - (गुंतवणूक करण्याच्या वेळेस बाजारात टाकलेली रक्कम) म्हणूनच, काही मिनिटांच्या फरकाने केलेल्या व्यवहारामुळे फायद्याऐवजी तोटा किंवा तोट्याऐवजी फायदा होऊ शकतो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

संपूण शेअर बाजारातला फायदा-तोटा* = (सर्व शेअर्सची मिळून काल मिळू शकणारी रक्कम) - (सर्व शेअर्सची मिळून आत्ता मिळू शकणारी रक्कम) * यातला तोटा म्हणजे काल शक्य असणारा फायदा मिळवण्याची संधी आत्ता हातून निघून गेली असेच नाही काय ? ====== हा आणि वरचा प्रतिसाद संधी व्यवस्थापनाचा (ऑपॉर्चुनिटी मॅनेजमेंटच्या) दृष्टीकोनातून पहावा, म्हणजे मुद्दा जास्त स्पष्ट होईल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

डॉ. साहेब ...अगदी परफे़क्ट....!! फक्त थोडं गुंतागुंतीचं असल्याने, अजून थोडा विस्तार करू का यावर...?

२०१२ साली यू-ट्यूबवर अपलोड झालेली ही डॉक्युमेंट्री सध्या असलेल्या परिस्थीची पार्श्वभूमी समजुन घेण्यासाठी उपयुक्त आहे. काही काळा पूर्वी मी चीन चे सिमेंट कंझंप्शन पाहिले होते, ते पाहुन धक्का बसला होता ! P1 संपूर्ण मानवी इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणात आणि इतक्या वेगात कधीच बांधकाम झालेले नाही ! जितके सिमेंट अमेरिकेने १०० वर्षात वापरले त्या पेक्षा जास्त चीन ने ३ वर्षात वापरले. ;) बिल गेट्स तुम्हा सर्वांना ठावूक असेल, त्यांच्या ब्लॉगवर त्यांनी यावर जून २०१४ साली एक सुंदर लेख लिहला आहे ! संदर्भ :- Have You Hugged a Concrete Pillar Today? जाता जाता :- आज इकॉनॉमिक टाईम्स मधे Shemitah वर लेख आला आहे, बर्‍याच काळा पासुन जालावर या विषयावर देखील चर्चा चालु आहे. ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- How Shemitah, end of Jewish calendar cycle, spooks market

In reply to by मदनबाण

वरच्या प्रतिसादात Shemitah उल्लेख केला आहे त्यावरचा एक सुंदर व्हिडीयो :- मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- How Shemitah, end of Jewish calendar cycle, spooks market

In reply to by मदनबाण

वरचा व्हिडीयो... पाहिल्या नंतर मला गंमत वाटली ती म्हणजे... यातल्या बर्‍याचश्या गोष्टी माझ्या लिखाणात आल्या आहेत ! या सर्व गोष्टी मी बर्‍याच काळा पासुन वाचल्या आहेत आणि ऐकल्या आहेत... मध्यंतरीच्या काही प्रतिसाद देखील मार्टीन आर्मस्ट्रॉगचा व्हिडीयो सुद्धा दिला आहे. अगदी Shemitah बद्धलच्या लिंक्स सुद्धा नजरेत आल्या होत्या आणि हल्लीच ७ या आकड्या बद्धल च्या काही माहितीच्या लिंक्स डोल्या समोर आल्या होत्या आणि आज हे सगळं Shemitah च्या व्हिडीयोत पाहुन किंचीतचस नवल देखील वाटलं... ;) गेले ६ महिने मी सातत्याने याच एका विषयावर पोस्ट करत आहे, पाहुया पुढे काय होते ते... ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- How Shemitah, end of Jewish calendar cycle, spooks market

In reply to by मदनबाण

बुवाबाजी, अंधश्रद्धा, फसवणुक वगैरे बाबतीत सर्वात आधुनीक देश आम्हा अडाण्यांच्या लायनीत, ते ही दो कदम पुढे बघुन गार गार वाटलं :)

In reply to by अर्धवटराव

हा.हा.हा... आयएमएफ च्या हेड Christine Lagarde या तर चक्का न्यूमरॉलॉजीची भाषा करतात हे पाहुनच आश्चर्य वाटले ! ;) बाकी या कॅलेंडरची बातमी नीट वाचल्यावर क्षणभर मला २०१२ साल आणि मायन कँलेंडरच्या बातम्या आणि चर्चांनी भरुन गेलेले इंटरनेट विश्व आठवले होते. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aisa Jaadu Dala Re... ;) :- Khakee

In reply to by अस्वस्थामा

हा.हा.हा... संगीत ऐकणे याचा सारखा आनंद नाही,आणि त्याच्या सारखे "तणाव" मुक्तीचे इतर साधन नाही ! :) उतार-चढाव हा आयुष्याचाच एक अविभाज्य भाग आहे,आणि या दोन्ही भागात संगीत केवळ आनंदच देते. :) बाकी गाणं आवडलं का नाही ? ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Aashiqui Mein Teri... ;) :- 36 China Town

In reply to by मदनबाण

संगीत ऐकणे याचा सारखा आनंद नाही,आणि त्याच्या सारखे "तणाव" मुक्तीचे इतर साधन नाही ! :) उतार-चढाव हा आयुष्याचाच एक अविभाज्य भाग आहे,आणि या दोन्ही भागात संगीत केवळ आनंदच देते. :)
अर्थात.. त्यात हे गाणं हलकं फुलकं आणि आपल्या हितेसभौंंच्या आवाजतलं असल्याते मूड फ्रेश करणारं आहे यात शंकाच नै..

चीनच्या समस्या भारताचा फायदा ठरू शकतात... http://timesofindia.indiatimes.com/india-best-poised-to-gain-from-globa… चीनच्या अर्थव्यवस्थेत बर्‍याच अंशी पाश्चिमात्य (विषेशतः अमेरिकन) अर्थव्यवस्थांच्या रोगांची लागण झालेली आहे. भारताने त्या बाबतीत बरेच संरक्षक धोरण स्विकारले होते (किंवा परिस्थिती मुळे भारताला तसे करणे भाग पडले होते). मात्र आता त्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेची घोडदौड अडखळू लागत असतानाही भारताची अर्थव्यवस्था वेग पकडू लागली आहे...  .  .

जानेवारी मधे शार्ली हेब्दो प्रकरण झाल्यावर... मी लिहले होते :- पॅरिस अ‍ॅटक... इट इज जस्ट अ बिगिनिंग... जस्ट हॅव टु वॉच व्हॉट नेक्स्ट अनफोल्डस ! टिंग-टाँग :- French intelligence fears Islamist 'missile strike on airliner' or 9/11-style attack Army prepares for civil unrest as Islamist threat grows amid fears of September 11-style attack or missile strike on passenger airliner बाकी चीन चे U.S. Treasuries विकणे मला बरेच चिंताजनक वाटते... कारण जर चीन U.S. Treasuries सेल ऑफ करतोय, तर ते विकत कोण घेणार ? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न ! तसेच चीन U.S. Treasuries कट करतोय म्हंटल्यावर याचा ग्लोबल इंपॅक्ट होउन बाकीचे देश याच मार्गी लागण्याची देखील भिती वाटते.चीनच्या मागो माग सौदी अरेबिया सुद्धा U.S. Treasuries सेल आउट करतील असे वाटते कारण त्यांची आर्थीक अवस्था बिकट झाली आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aisa Jaadu Dala Re... ;) :- Khakee

चीन मधे परत एक केमिकल ब्लास्ट झाल्याच्या बातम्या येत आहेत ! P1 Explosion reportedly rocks second chemical plant in China जसे अपडेट्स मिळतील तसे त्याचे डिटेल्स इथे देण्याचा प्रयत्न करीन...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Hussain AlJassmi - Boshret Kheir | 2014

आत्ताच माझे जालावर शोध चालु असताना इकडे लक्ष गेले :- Cheney: Another, deadlier 9/11 could happen here बहुतेक आता या विषयावर कमेंट पोस्टींग सुरु आहे असं दिसते... या चर्चे मागचा संदर्भ जालावर शोधला असता इथे मिळाला :- Dick Cheney predicts US will suffer a terrorist attack 'far deadlier' than 9/11 before the decade is ove फेड क्युई - ४ आणेल या चर्चांनी आता जोर पकडला आहे... पण क्युई - ४ आणण्यासाठी काही तरी कारण पाहिजे नाही ? कारण अमेरिकेची अर्थव्यवस्था तर प्रगतीपथाकडे चालली आहे म्हणे ! मग असे काय केले की त्या प्रगती पथावरुन खाली येउन क्युई - ४ चे समर्थन करता येइल ? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Halke Gaadi Haako... { Folk Fusion by Neeraj Arya's Kabir Cafe - Official Video }

बाय बाय डॉलर... :- इति व्लादिमीर पुतिन Putin says dump the dollar सध्या वेगवेग्ळ्या प्रकायचे क्रायसिस पहायला मिळत आहेत... त्यात मायग्रंट क्रायसिस / रेफ्युजी क्रायसिसची भर पडली आहे.युरोपमधे,मेक्सीको बॉर्डर,व्हेनाज्युएला...इं. Euro dream over as border controls return in face of tidal wave of EU migrants Europe Rethinks the Schengen Agreement EU refugee crisis: Father describes the moment his children Aylan and Galip slipped away - latest सध्या जगात सध्याच्या काळात अनेक वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळे घटनाक्रम घडत चालले आहेत, अगदी उदा. ध्यायचच झाल तर जपान मधे जपानी लोकांनी प्रधानमंत्री Abe यांच्या सिक्युरिटी बिल ला जोरदार विरोध केला आहे. यावर अधिक इथे :- Huge protest in Tokyo rails against PM Abe's security bills चीनच्या परेड मधे पुतिन उपस्थीत तर चीनच्या नौदलाची जहाजे चक्क अलास्का मधे ! तर काही दिवसांपूर्वीच पोलंड मधे नाझी काळातली सोन्याने भरलेली ट्रेन सापडल्याचा बातम्या आल्या... मग विचार आला की काही काळापूर्वी जर्मनीच्या सोन्या विषयी आणि अमेरिकेच्या सोन्या विषयी काही प्रतिसाद दिले होते.... तू-नळीवर शोध घेतला आणि एक व्हिडीयो सापडला ! ज्यांना सोने, सध्याची सोन्याची { निदान भारतातली } किंमत यात रस असेल आणि येणारा क्रायसिस जाणुन घ्यायचा असेल त्यांनी हा व्हिडीयो अवश्य पहावा ! मग Marc Faber चे नाव सध्या चर्चेत असल्याने त्यांची मुलाखत वाचली... त्यांची मते आणि भाष्य मी तू-नळीवर बर्‍याच काळा पासुन पाहत आणि ऐकत आलो आहे. China slowdown to hit India; EMs better bet than US: Faber मग परत टाळक्यात सोन्याचा विचार आल्यावर तू-नळीवर परत शोध घेतला... वेगवेगळे घटनाक्रम वेगाने घडत आहेत... जितके घटनाक्रम मला इथे देता येतील तितके मी देण्याचा प्रयत्न करीन...कारण ते बरेच आहेत.... जाता जाता :- ज्यांचे लक्ष सोन्यावर आहे त्यांनी डॉलरकडे लक्ष ध्यावे... डॉलर वरती =सोने खाली आणि डॉलर खाली = सोने वर. बाकी हा धागा "७" तारखेलाच सुरु झाला आहे बरं... ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Bandish The Fusion - Subhen Chatterjee - Fusion Band KARMA

मदनबाणसाहेब, एक विनंती आहे. आता याच धाग्याचे व्हर्जन -२ सुरु करावे. काय झाले आहे, ५०० प्रतिसादांमधून नवीन प्रतिसाद शोधणे कठीण होत आहे. धन्यवाद.

@ आनन्दा... सगळे अपडेट्स हे धाग्याच्या शेवटीच देत आहे,त्यामुळे प्रत्येक नविन प्रतिसाद शेवटीच दिसेल. एक विनंती... ते माझ्या नावाच्या मागे "साहेब"लावु नका... नुसतेच नावाने संबोधल्यास "आनंद" वाटेल. :) @ खेडूत धन्यवाद... :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Nain Se Nain || Raga Rocks || Raga Boyz

डिस्क्लेमरः मी शेअर मार्केट मधील तज्ज्ञ नाही. ही खालची माझी मते असून त्यात सुधारणा करणार्‍याचे स्वागत असेल.
हा तर्क मान्य आहेच पण बर्याच बाबतीत काही दिवस थांबल्यास हे नुकसान भरून निघणारच असते. तसेच ज्यांना शक्य आहे त्यांनी नव्याने गुंतवणूक करून भरपूर नफा कमवण्याची ही संधी असते. मला प्रश्न असा पडतो की लगेच संपत्ती स्वाहा झाली किंवा मातीमोल झाली असे का म्हंटले जाते?
बहुतेक लोक असा आडाखा बांधतात की किमती वरच जातील. पण हे काही शाश्वत सत्य नाही. भाव वर जातात आणि खाली पण येतात. जेव्हा तुमचा अंदाज चुकतो तेव्हा तुम्ही नुकसान सोसता. आता कुठल्याही क्षणी तुम्ही किती फायदा किंवा तोटा करून घेऊ शकता हे या गोष्टीवर अवलंबून आहे, की तुम्ही किती रक्कम मार्केटमध्ये गुंतवू शकता. एकदा तुम्ही सगळी रक्कम गुंतवलीत, की भाव कितीही खाली येवो, तुम्हाला त्याचा काहीही फायदा करून घेता येणार नाही. कारण त्यावेळी शेअर खरेदी करायला तुम्हाला पैसा हवा. तो तर तुम्ही सगळा गुंतवलात. हवं तर शेअर विकून तुम्ही पैसे मोकळे करून घेऊ शकता - पण ते तुम्ही कोसळत्या मार्केटमध्ये करू शकत नाही. म्हणजे तुम्ही फक्त बघत बसू शकता कशी गुंतवणुक कमी कमी होतीये ते. आता असा विचार तुम्ही करत आहात की काही दिवस थांबल्यास हे नुकसान भरून निघणारच असते! तर याला काही आधार नाही. अनेक चांगले चांगले वाटलेले शेअर वर - खाली - वर - खाली करत करत शेवटी कायमचे झोपले. त्यातनंही जे वर आले ते इतक्या दीर्घकाळाने वर आले, की ज्यांना मधल्या दिवसात पैशांची गरज होती, त्यांनी नुकसानीत/नगण्य फायद्यात विकून पैसे मोकळे करून घेतले. काही दिवस म्हणजे किती दिवस हे अनिश्चित असल्याने, हे वाक्य नुकसानीत गेलेल्या ट्रेडर किंवा गुंतवणुकदाराला आधार देऊ शकत नाही. माझ्या मते संपत्तीच्या आपल्या काही विशिष्ट कल्पना आहेत, त्याने आप्ल्याला ' हे मातीमोल कसे होउ शकते' असा प्रश्न पडला आहे. संपत्ती म्हणजे आपल्याला नक्की काय अपेक्षित आहे?
हे नुकसान तुम्ही जर शेअर्स विकले तरच होते. अन्यथा हा तोटा फक्त कागदोपत्रीच राहतो.
तसं तर आजकाल सगळंच फक्त कागदोपत्रीच आहे. शेअर्स पण तर कागदच असतात. जोवर विकत नाही तोवर फायदा पण कागदोपत्रीच असतो. आणि पैशाची ज्यांना गरज आहे, ते हे वाक्य वापरून निवांत झोपू शकत नाहीत. त्यांना तो कागदोपत्री असलेला तोटा प्रत्यक्षात आणून पैसे मोकळे करून घ्यावेच लागतात.
सेन्सेशनॅलिझम, बाकी काही नाही.
वरचं उदाहरण परत बघू- अनेक लोक- स्वतःजवळ्चे शेअर बँकेकडे तारण ठेवून त्या आधाराने कर्ज घेतात. जेव्हा मार्केट या पद्धतीने कोसळते, तेव्हा सगळेच शेअर कोसळतात. बँकांकडे तारणाचे हिशेब असतात. किती कर्ज रकमेला किती तारण उपलब्ध आहे, यावरून कर्जातली जोखीम ठरवली जाते. जर तारण कमालीच्या बाहेर कमी झाले, तर जोखीम वाढते- बॅंकेला कधी कधी नुकसानीची तरतुदही करावी लागते. त्याने काही संबंध नसताना बँकेचा नफा कमी होतो. यात सेन्सेशनलिस्ट काय आहे? हे अगदी २+२=४ इतकं साधं सरळ उदाहरण आहे संपत्ती कमी कशी झाली त्याचं. डेरीवेटीव बाजारातलं मार्क टू मार्केट कागदोपत्री नसतं. तुम्हाला रोजच्या रोज नुकसानीतली रक्कम जमा करत रहावी लागते बाजारात. वर मी बॅलन्सशीटमधल्या गुंतवणुकीच्या रकमेचं उदाहरण दिलं होतं, ते पण आहेच. उद्या किमती सुधारतील म्हणुन गुंतवणुकीची उद्याची किंमत मी आजच्या बॅलन्स शीटला घेऊ शकत नाही. मला तिची आजचीच किंमत धरावी लागते माझी गुंतवणुक म्हणुन. त्यामुळे हे सेन्सेशनल असलं तरी वाढवून सांगितलेलं नाही. हे नुकसान खरोखर होतं आणि कधी कधी त्यामुळे लोक आयुष्यातनं उठतात.
अशा खोट्या बातम्या देऊन शेअर बाजाराला बदनाम करायच, दुसरं काय? सोन्याचे भाव पडतात तेव्हा अशा बातम्या येत नाही. तेव्हा खरेदीस उत्तम संधी असे सांगितले जाते.
वरीलपैकी, शेअर बाजाराला बदनाम करू नये या भावनेचा आदर..!! पण सत्य नाकारून काय उपयोग नाही. धोक्यांची जाणीव असायलाच हवी. त्याने बदनाम होण्याचा प्रश्नच येत नाही. सोनं जसं अंगावर मिरवता येतं, तसे शेअर मिरवता येत नाहीत.

In reply to by असंका

सोनं जसं अंगावर मिरवता येतं, तसे शेअर मिरवता येत नाहीत.
तोच तर प्रॉब्लेम आहे ना. सोनं मिरवण्याने कोणाचं काहिही भलं होत नाहि. शेअरमार्केट मधे पैसा टाकला तर निदान व्यापार्‍याला आपला धंदा चालवायला भांडवल मिळतं व त्यातुन पैसा फिरत राहातो. सोन्यात पैसा फ्रीझ होतो. डेड एण्ड.

वरचे प्रतिसाद आवडले, मला सुद्धा माहिती मिळत आहे. सोनं मिरवण्याने कोणाचं काहिही भलं होत नाहि. शेअरमार्केट मधे पैसा टाकला तर निदान व्यापार्‍याला आपला धंदा चालवायला भांडवल मिळतं व त्यातुन पैसा फिरत राहातो. सोन्यात पैसा फ्रीझ होतो. अर्धवटराव सध्या इतकच म्हणेन... जिथे करंन्सी कोलॅप्स होते तिथे सुद्धा सोन्याची "व्हॅल्यू" टिकुन राहते.सोन्याकडे गुंतवणुकी पेक्षा एक प्रकारचा इन्श्युरन्स म्हणुन मी पाहेन. :) आपल्याकडे वेळ असल्यास वरती दिलेला व्हेअर इज द गोल्डन ? हा व्हिडियो जरुर पहा. आता खरे तर जरा वेगळ्या विषयाकडे वळतो... अमेरिका सध्याच्या घडीला कोणत्या हल्ल्याला घाबरते आहे ? कोणा पासुन हा हल्ला त्यांना अपेक्षित आहे ? याचे उत्तर अमेरिका इएमपी हल्ल्याला घाबरुन आहे. इएमपी :- {EMP :- Electromagnetic Pulse } मुख्यत्वे रशिया,चीन,नॉर्थ कोरिया आणि इराण या देशा़ंकडुन मुख्यत्वे धोका आहेच आणि इतर सुद्धा. जगातील आर्थीक घडांमोडीं विषयी जालावर वाचताना हा विषय वाचण्यात आणि ऐकण्यात आला. वरती डिक चेनी यांच्या वक्तव्याचा एक दुवा दिला आहे,आत्ताच त्यांना या बाबतीत या विषयावर {म्हणजे अमेरिकेवर येत्या दशकात हल्ला होइल जो ९/११ पेक्षा ही अधिक घातक असेल,स्मगल्ड न्यूक्लिअर डिव्हाइस... इं.इं} का बोलावेसे वाटले ? असा सहज प्रश्न माझ्या मनात आला.जालावर अमेरिकेवर कोणत्या प्रकारचा हल्ला होउ शकतो याचा इएमपी रिलेटेड शोध घेतला. बातम्या खालील प्रमाणे सापडल्या... Iran endorses nuclear EMP attack on United States The Threat to Melt the Electric Grid WSJ: The Growing Danger of an EMP Attack Iranian EMP attack on U.S. 'Shariah-compliant' Iran Nuclear Deal EMP Attack Fears Mount मग पेंटॅगॉन ने घेतलेला निर्णय पाहिला... Pentagon Moves More Communications Gear into Cheyenne Mountain NORAD Moving Comms Gear Back To Mountain Bunker मग Marc Faber यांच्या विषयी तू-नळीवर ऐकत असतानाच खालील व्हिडीयो देखील दिसला. मग ही बातमी सुद्धा वाचली जी वरती दिलेल्या एका प्रतिसादातील व्हिडीयो मधे देखील आहे... Exclusive: Wary of natural disaster, NY Fed bulks up in Chicago मला यापुढे अश्या काही अजुन घडामोडी होतात का ? हे पाहण्यात रस असेल... :) जाता जाता :- अमेरिकेत ऑपरेशन Jade Helm 15 चालु आहे, हे आपणास ठावूक असेलच...या बद्धल चर्चांना जालावर उत आला आहे,अनेक मते तुम्हाला वाचायला मिळतील. :) मी या बद्धल एक व्हिडीयो पाहिला तो इथे देतो :- दुसरा व्हूव्ह इकडे :- Jade Helm Foreign Occupation Troops Will Soon Be “Detaining” American Citizens in the Southwest

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jai Uttal - Gopala

In reply to by मदनबाण

पण आपल्याकडे दागीने मिरवण्याच्या हौशेपायी सोन्याची किंमत वाढते व त्या कलाकुसरीचा काहिच परतावा मिळत नाहि. शिवाय, देशांतर्गत व्यवस्थेत सोन्याऐवजी पाणि, अपारंपारीक उर्जा, रेल्वे इत्यादी क्षेत्र मुल्यठेव म्हणुन विकसीत करण्याची नितांत गरज आहे.

In reply to by अर्धवटराव

एक चूकदुरुस्ती. आपल्या रीटेल खरेदीमुळे सोन्याची किंमत वाढत नाही. सोन्याची खरेदी आंतरराष्ट्रीय बाजारात देशांकडून आणि स्पेक्युलेटर्स कडून इतक्या मोठ्या प्रमाणावर चालते की आपल्या इतकुश्या रिटेल खरेदीचा त्याच्यावर फारसा परिणाम होत नाही. पण ती खरेदी करण्यासाठी परकीय चलन वापरावं लागतं आणि त्याच्यावर परिणाम होतो.