Skip to main content

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 15/01/2015 03:24 या दिवशी प्रकाशित केले.
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

वाचने 367426
प्रतिक्रिया 1423

प्रतिक्रिया

आपल्या समाजात दुर्दैवाने ' लग्नाचा बाजार ' हाच शब्दप्रयोग वपरला जातो आणि एकदा बाजार म्हणलं की घासाघीस ही आलीच. माझं ठरलेलं लग्न त्या मुलीने मोडलं होतं कारण त्या वेळी अचानक माझी नोकरी गेली. कंपनीच बंद झाली. ही साधारण २००१ ची गोष्ट आहे. त्यानंतर तब्बल ७ वर्षांनी मी लग्न केलं. प्रेमाने पोट भरत नाही आणि कोणीही तुम्हाला गरज असते तेव्हा विचारायला येत नाही हे अत्यंत मोलाचे धडे यातून शिकलो. अजून एक. नातेवाईक फक्त लग्नात जेवायला - फुकटात मिळतं म्हणून येतात. तुम्ही कोणाशी का लग्न करा, त्यांचा उद्देश हा फक्त फुकट जेवण मिळणार आहे हा असतो. त्यामुळे त्यांना काय वाटेल असले विचार करणं हा मूर्खपणा आहे.

In reply to by बोका-ए-आझम

नातेवाईक फक्त लग्नात जेवायला - फुकटात मिळतं म्हणून येतात. तुम्ही कोणाशी का लग्न करा, त्यांचा उद्देश हा फक्त फुकट जेवण मिळणार आहे हा असतो.
अतिअसहमत. दुसर्‍याच्या लग्नात मिरवणं. एकमेकांच्या उखाळ्यापा़खाळ्या काढणं, गॉसिप करणं ई.ई. गोष्टी करणं हे ही सेकंडरी उद्देशही असतातचं की. बाकी ऐकुन वाईट वाटलं.

In reply to by बोका-ए-आझम

नातेवाईक फक्त लग्नात जेवायला - फुकटात मिळतं म्हणून येतात. तुम्ही कोणाशी का लग्न करा, त्यांचा उद्देश हा फक्त फुकट जेवण मिळणार आहे हा असतो. हे तर पूर्वपूरींनी प्राचीन काळातच लिहून ठेवलं आहे... बा बॅटमना, पोतडीतून काढून ते काव्य टाकू शकणार का इथे ?

कन्या वरेयते रूपं माता वित्तं पिता गुणं बांधवः कुलं इच्छन्ति मिष्टान्ने इतरेजनः लग्नाच्या बाजारात कोण काय पाहतो ? मुलगी मुलाचे रूप पाहते आई पैसा किती मिळवतो ते वडील मुलाचे "गुण" बांधव मुलाचे कुळ ( आजकी तारीख मे खानदान ( खानदान कि इज्जत वालं) आणि बाकी सर्व जण मिष्टान्न यावरून काय तो बोध घ्यावा (लोकांना फाट्यावर मारावे)

बाहरचे.. दोन्ही बाजू आहेत पण माझ्या तुटपुंजी अनुभव्-शिदोरी येनप्रकारे: वडीलांचे छत्र वयाच्या ९ व्या वर्षीच हरपले त्यामुळे मीच माझा पालक.
  • माझे स्वतःचे लग्नसमयी वधूसंशोधनात मी निर्व्यसनी आणि वयाच्या पंचवीशीत स्वतःचा फ्लॅट (चिंचवडमध्ये) असणे याची भावी वधू पित्यांचे लेखी काडीमात्र किंमत नाही हेही समजले (उलट लहान बहिणीची व भावाची अर्थात आईचीही जबाबदारी आहे याकडेच ज्यास्त लक्ष होते)त्यामुळे शेवटी बहिणीचे लग्नानंतर ५ वर्षांनी वयाच्या ३३ व्या वर्षी लग्न झाले.
  • लहान बहिणीचे लग्नाकरीता खटपट करावी लागली दुर्दैवाने ज्या हातांनी कन्यादान केले त्याच हातावर तिचे कलेवर ( तिच्या सासरच्या छळामुळे)घेऊन अंतीम विधी करण्याचे दु:ख सहन केले.
  • लहान भावाचे लग्नसमयी वधूसंशोधनात वधू पित्यांचे अपेक्षांचे इमले पाहून हसू येण्यापलिकडे पोहोचलो होतोच.
  • त्याचेही लग्न त्यामुळे ३० नंतरच झाले.
  • परिस्थीतीने शिकवलेले शहाणपण आणि स्वावलंबन यामुळे चिंचवडमध्ये २ बी एच के फ्लॅट आणि स्वतंत्र ६ खोल्यांचा बंगला बनवू शकलो. हे करताना शिक्षणासाठी शाळेतील शिक्षकांची* अज्ञात हातांची,नातेवाइकांपेक्षा फक्त मित्रांची भावनीक मदत आणि सदिच्छा-प्रोत्साहन मिळाल्यामुळेच हे शक्य झाले.
  • नाहीतर सन १९७८ ला पुण्यात शिक्षणासाठी अनवानी दाखल होण्यार्या मुलाला काय भविष्य होते??
  • *शाळेतील वर्गशि़क्षक आणि मुख्याध्यापक मीच माझा पालक आहे हे नेहेमी बजावत असत,आणि व्यक्तीशः लक्ष देत असत, त्यामुळेच आज जो काही मी आहे, त्याचे श्रेय निर्विवाद शाळेला/हितचिंतकाना आहे.

In reply to by नाखु

तुमचे मनापासून अभिनंदन!!

In reply to by पिवळा डांबिस

:(

In reply to by स्पा

त्यांनी इतक्या अडचणींना तोंड देऊन आणि अवघड परीस्थितीवर मात करून यश मिळवलंय म्हणून त्यांचं अभिनंदन केल. माझं काही चुकलं का?

In reply to by पिवळा डांबिस

तुम्हाला प्लस वन द्यायचं होतं काकुस

In reply to by स्पा

ओके

In reply to by पिवळा डांबिस

+१

In reply to by नाखु

सहीच!असले अनुभव येऊनही तुम्ही कडवट झाला नाहीत हे जास्त अभिनंदनीय आहे. ज्यांनी त्या वेळी तुम्हाला नाकारलं त्यांना पश्चात्ताप झाला असेल!

In reply to by नाखु

प्रतिसाद आवडला. तुमच्या बहिणीबद्दल वाचून मात्र वाईट वाटलं. अजूनही हे असे प्रकार चालू आहेत, याला काय म्हणावं! :(

In reply to by नाखु

मी नाखुकाकां कडून सदर हकिगत प्रथम ऐकली,तेंव्हा तिथेच मनातून नमस्कार केलेला होता. आज आदरपूर्वक पुन्हा करतो. :) __/\__ :)

राग मानणार नसाल तर एक बोलु का मुवीकाका ?
एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या.
एकदा मुलाला शिक्षण दिल्यानंतर परत पुढे नोकरी मिळवुन देण्यासाठी फ्लॅट मिळवुन देण्यासाठे जर तुम्हालाच प्रयत्न करावे लागत असतील तर तर तो मुलगा नक्कीच लग्नाला लायक नाहीये . बाकी माझ्या बॅचमधील कित्येक जण २८-२९ वय स्वत्चा स्वकर्त्रुत्वावर घेतलेला फ्लॅट तोही पुणे / पिंपरीचिंचवड भागात , आय १० स्विफ्ट वॅगनार सारखी गाडी शिवाय घरची काहीही जबाबदारी नाही , इन्फोसिस टीसीएस महिन्द्रा सारख्या मोठ्ठ्या कंपनीत नोकरी असे सारे असुनही पोरी नकार देतात हा खरा मोठ्ठा प्रॉब्लेम आहे . माझे वैयक्तिक मत असे की मुळातच लग्न संस्था रीडंडंट आहे पण तरीही , लग्न करायचे ठरल्यास लव्हमॅरेजच करावे मस्त स्वत्च्या कर्तुत्वावर पोरगी पटवावी आणि आलात तर तुमच्यासह , नाहीआलात तर तुमच्याशिवाय आणि विरोध कराल तर विरोध मोडुन मी ह्याच पोरीशी लग्न करणार असे पोरीच्या घरचांना सांगावे ठणकावुन अन मग जोरात लग्न करावे ..... माझ्या एका जवळच्या मित्राने काय फुल्ल्टु फिल्मी पोरीला पळवुन लग्न केलेय नुकतेच ... त्याची आठवण झाली =) ( अर्थात हे सारे करण्यासाठी पोरगी २००% आपल्या बाजुला असावी लागते ह्यासाठी ) अवांतर - मुली कशा पटवाव्यात ह्या वर लेख लिहा ना कोनी तरी

In reply to by प्रसाद गोडबोले

प्र.गो. >>> आंम्ही टुमच्याशी,भरपूर शहमत हाय! :D @अवांतर - मुली कशा पटवाव्यात ह्या वर लेख लिहा ना कोनी तरी. >>>सदर क्रीयमाणाचे संचित,आपल्यापाशी(च) आहे. =)) तेंव्हा हे काम आपल्यापेक्षा दुसरा कोन बरे क्रू शकेल.!? :D

In reply to by अत्रुप्त आत्मा

आता बुवांच्या पुढच्या लेखमालेचा विषय... "गांधर्व विवाहाचा शास्त्रिय विधी आणि चालूरिती... आपलं... चालीरिती". कर्तव्य असणार्‍यांनी तिकडे वाट पहाता पहाता इकडे या लेखाचीही वाट पहावी :) ;) प्रगोसाहेब, होऊन जाउन्द्या. तुम्ही या प्रकल्पाचे प्राईम मुव्हर आहात ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

त्यापेक्षा पुढचा धागा मी काढतो लिविंग रिलेशन शिप नंतर लग्न सगळ्यात सोयीस्कर उपाय स्वानुभवाच्या जोरावर

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रगो...येउंद्या एक फर्मास लेख....त्यातले उपाय उपयोगी पडले तर तुम्हाला पार्टी जंगी...!!! =))

In reply to by प्रसाद गोडबोले

एकदा मुलाला शिक्षण दिल्यानंतर परत पुढे नोकरी मिळवुन देण्यासाठी फ्लॅट मिळवुन देण्यासाठे जर तुम्हालाच प्रयत्न करावे लागत असतील तर तर तो मुलगा नक्कीच लग्नाला लायक नाहीये . यातला नोकरी मुद्दा बरोबर आहे, म्हणजे ती स्वकर्तुत्वावर मिळवावी लागते, पण घर खरच जमेल का ? पुण्याचेच उदाहरण पहा, साधा २ बेडरुमचा फ्ल्याट ५० लाखाच्या पुढे जातोय, पगार ५ लाखापासुन २२ वर्षी सुरु झाला, तरी नुस्ते कर्ज भेटायची लायकी यायला अजून ७ एक वर्ष लागतील, तोपर्यंत तो फ्ल्याट कमीतकमी कोटीच्या वर गेला असेल. कसे गणित सुटणार ? :(

जाणवलेले काही विरोधाभास; काही अतिरेक. १) अतिरेक. एका मुलीने अपेक्षांमध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं होतं. महिना एक लाख 'टेक होम' पगार हवा. आपलं शिक्षण? एम कॉम. कुठल्या तोंडाने??? असो. २) अतिरेक. आणखी एक स्पष्ट अट. 'सेडान किंवा एसयूव्ही' गाडी हवी. म्हणजे मग नवरा बोकड असला तरी हरकत नसावी. ३) विरोधाभास. या एक लाख, एसयुव्ही किंवा टेरेस फ्लॅटच्या अटीवाल्या मुलींकडे (कुणाच्या रुपावर बोलू नये याची जाणीव आहे तरीही) रूप-रंग, संपत्ती, शिक्षण (गुण-दोषांची कल्पना येत नाही त्यामुळे तो उल्लेख टाळतो.) यापैकी काहीच नव्हतं. मग ते फक्त वराकडून मुलाकडूनच अपेक्षित कसं असू शकतं? त्यांनी पगाराची फिगर स्पेसिफाय केली, मुलाने त्यांची फिगर स्पेसिफाय केली तर चालेल का? (करत असतील तर माहीत नाही) म्हणजे क्लियरकट, ३६-२४-३६ हवी. ४) विरोधाभास. एकीकडे समानतेचे गोडवे गाणा-या आपल्या समाजाला, त्यातील मुलींना, मुलाचा पगार मुलीपेक्षा जास्त कसा लागतो? म्हणजे पुरुषाची सुपिरिऑरिटी मान्य आहे नाही का? 'मुलगी आयटीत आहे, बारा पंधरा लाखाचं पॅकेज आहे, आता मुलगा जी एम वगैरेच बघावा लागेल' अरे का? सोयीस्कर इक्वॅलिटी चं हे नमुनादाखल उदाहरण. असो. अशाच बाजू वधूपक्षाच्याही असू शकतील. एकंदरित, हे आजकाल 'डील' झालंय डील. आणि 'फील' गेलाय त्यातला. चेकलिस्ट घेऊन जायचं, टिक टिक टिक. चला. जमलं !

In reply to by वेल्लाभट

एक प्रामाणिक प्रश्न... असल्या काहीच्या काही अपेक्षा ठेवणार्‍या मुलींची (किंवा मुलांचीही) लग्न होतात का? म्हणजे त्यांच्या अपेक्षेमध्ये बसणारी मुलं त्यांना का निवडतील? बाकी मुलाचा पगार मुलीपेक्षा जास्तच हवा ही मागणी मलाही भंपक वाटते.. (आणि बायकोचा पगार आपल्यापेक्षा जास्त आहे हे पचवु शकणारे पुरुष (किंवा सगळं सासरच..) कसे असतील ह्याचं कुतुहल...)

In reply to by पिलीयन रायडर

दोन्ही बाजूने संसाराची गृहीतक तपासून घेण्याची गरज आहे . आधुनिक काळात वावरताना जुनाट मानसिकता जपण्याच्या अट्टाहास सुटला पाहिजे. जास्त शिकलेली व भरपूर कमावणारी मुलगी लग्नाच्या बाजारात चिंतेचा विषय झाल्याची उदाहरणे देखील पहिली आहेत. आता हिला साजेसा मुलगा आमच्या समाजात कुठून शोधायचा असा प्रश्न पालकांना पडतो. ह्या देशात इंदिरेचे कर्तृत्व असलेल्या महिलेच्या नवर्‍यावर फिरोज व्हायची पाळी न येवो असे मनापासून वाटते

In reply to by पिलीयन रायडर

मी नोकरी करतो आणि बायकोचा व्यवसाय आहे आणि तिची प्राप्ती माझ्यापेक्षा जास्त आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. आणि तिच्या यशात माझं काहीही contribution नाही. तिने स्वतःच्या जोरावर हे केलेलं आहे.

In reply to by बोका-ए-आझम

आयला लई नशीबवान आहात कि. आमची बायको भरपूर पैसे मिळवायला लागली तर मी तर निवृत्त होऊन थंड घरी बसेन. म्हणजे आत्ता "मला" पुरतील तितके पैसे तिला मिळतात पण "तिला" पुरतील एवढे नाहीत. आणि नवरा मिळवतो आहे म्हणून ती जास्त कष्ट करीत नाही.

In reply to by सुबोध खरे

पुरुष पुरेसं कमावतात म्हणून बायका 'थंड' घरी बसतात का ? तुम्ही बायका करतात ती कामे करालंच ही अपेक्षा आहे ... - शेखर

In reply to by शेखर काळे

काळे साहेब मी माझ्या मुलांना अन्न भरवण्यापासून, झोपवणे, त्यांचे पार्श्वभाग धुण्यापर्यंत सर्व कामे केली आहेत. मुलांना जन्म देणे आणि दुध पाजणे हे शक्य नाही त्याला माझा नाईलाज आहे.

In reply to by वेल्लाभट

असे अमुक एक रक्कम टेक-होम आणि रेडीमेड सुखसोयी असलेलाच मुलगा पाहिजे असे म्हणणे तितकं बरोबर नाही. पण अजूनही अरेंज म्यारेज पद्धती मध्ये मुलाचे गुण अवगुण, प्रगल्भता आणि मनगटातली ताकद कळायचं बऱ्यापैकी अवघड असतं. मग अशावेळी मुलीने आयुष्य जिथे घालवायचे आहे तिथे किमान आर्थिक स्थैर्य असावे अशी अपेक्षा ठेवली तर काय चूक आहे ? आणि जर ती मुलगी स्वत: कमावती नसेल तर हे स्थैर्य त्या मुलाच्या पगारावरच अवलंबून असतं. अशावेळी शिक्षण आणि सध्याचा पगार याचा अट म्हणून वापर केला जाणे स्वाभाविक आहे. प्रेम विवाह करताना, कुठल्याही अपेक्षा न ठेवता, फक्त त्या मुलाच्या पात्रतेवर विश्वास ठेवून डोळे झाकून लग्न केलेल्या कित्येक जणी मला आहेत.

अपेक्षा मुलांच्या नाही , त्यांच्या आई- बापांच्या वाढल्या आहेत ! २०- २२ वर्षाच्या मुला- मुलीला जोडीदार कसा असावा हे नीट सांगाता येईल , पुढच्या आयुष्यात नेमक्या काय अडचणी येऊ शकतील याचे विज्युयलायजेशन करता येईल इतकी म्याच्युरिटी खरेच असते का हो ? ( मी बुद्धी म्हणत नाही ) आई- बापच मुलांच्या अपेक्शांना नकळत खत-पाणी घालत असतात .... आपली अपुरी स्वप्ने मुलांनी पुरी करावीत , आपण ज्या खस्ता खाल्ल्या त्या मुलांनी खाऊ नयेत , त्यांना नकळत शक्य तर विना कष्टाचे च मिळावे ही अपेक्षा असते आई- बापाची !! त्यात "मुलीची आई" हा कहर आहे ! ल्ग्नाळू मुलांना माझा एक अनाहूत सल्ला आहे .. पुण्यात रहात असाल तर पुण्यातील मुलगी अजिबात करू नका. तुमची सासूच तुमचे घर चालवेल. रोज ऑफिस ला जाताना पाळणाघर/ तिचे माहेर>>> तिचे ऑफीस >>> तुमचे ऑफिस आणि परत येताना याच क्र्माने उलट यावे लागेल .... रोज ...होय रोज ! मुलीच्या संसारात आईची लूड्बूड हा इंडीयन पिनलकोड प्रमाणे दखलपात्र गुन्हा म्हणून जाहीर करावा अशी माझी जाहीर मागणी आहे , वाट लावतात बायका लेकीच्या संसाराची ! सॉरी, अपवाद असतील असे वाटत नाही ! मला आश्चर्य वाटते, साठी नंतर ही या बायकांची संसाराची हौस संपत नाही. मी ( आणि विटुकाकू सुद्धा ) आत्ताच कंटाळलो आहोत ..अजून १४ वर्षे नोकरीची आहेत (पण आम्ही गमतीने १४ वर्षाचा वनवास असेच म्हणतो !) समर्थांनी म्ह्टले आहे .. संसार मुळीचा नासका .... त्यात सुख शोधणे हा मूर्खपणा आहे !

In reply to by विटेकर

मुलीच्या संसारात आईची लूड्बूड हा इंडीयन पिनलकोड प्रमाणे दखलपात्र गुन्हा म्हणून जाहीर करावा अशी माझी जाहीर मागणी आहे , वाट लावतात बायका लेकीच्या संसाराची ! सॉरी, अपवाद असतील असे वाटत नाही !
काका जोक करताय असं धरुन चालते हं...

In reply to by आदूबाळ

मुलीचे आईवडिल अलीकडे मुलीच्या संसारात जरा जास्तच लक्ष घालतात. माझ्या सासूनेही ते घातले. मलाही राग येत असे. आज तीन दशकानी मला असे मात्र अनुभवास आलेय की आमच्या " आई" खरंच जबरा माया़ळू आहेत. त्यांचा तो स्वभावच आहे. पण इतर उदाहरणात असे होण्याचे कारण कदाचित असेही असेल की मुलगा लग्न झाले की भावाचा भाउ न रहाता कोणाचा तरी मेहुणा कोणाचा तरी साडू पयला होतो. तो सासरी जातो मनाने.

In reply to by आदूबाळ

अहो पण किती ते जनरलायजेशन?? आजवर सुना सासरी जाउन रहात होत्या, तेव्हा आयुष्या नवर्‍याच्या आई बरोबर घालवावं लागत होतं.. त्या छळाच्या कथाही भयावहच आहेत.. अशाही मुलींच्या आया आहेत ज्या लेक-जावयाच लेकरु दिवसभर सांभाळतात... मला कळत नाही, एकाच शहरात मुलगा आई-वडीलांना सोडून दुसरं घर करुन राहिला तर न्युज होते.. तिथे मुलगी आई-बापाला सोडून रहातेच ना.. अशा वेळी तिच्या माहेरी भेट देणं ही एवढी चर्चेची गोष्ट कशाला?

In reply to by पिलीयन रायडर

नाही नाही, जनरलायजेशन करण्याचा विचार नव्हता. आपण असल्या कथा ऐकतो तेव्हा त्यात सिलेक्शन बायस असणं स्वाभाविक आहे.

In reply to by आदूबाळ

सिलेक्शन बायस बद्दल सहमत.. पण म्हणुनच बोलताना आपण "हेच आणि असंच असतं" असं नाही ना बोलत.. जगात सगळ्याच प्रकारची माणसं आहेत.. एकच एक गोष्ट खरी असु शकत नाही..

In reply to by पिलीयन रायडर

मुलीच्या संसारात आईची लूड्बूड या वाक्याचा अर्थ " मला हा असा फाटका औरंगजेब मिळाला हो, कध्धी पिक्चर नाही, का भेळ नाही. कधी शिंगणापूर साधी पण विचारले नाही ग तुझ्या बापाने, पण तू नक्की जावैबापूच्या मागे लागुन शिंगापूर तरी करुन घे हो" असा होतो. :)

In reply to by विटेकर

मुलीच्या संसारात आईची लूड्बूड हा इंडीयन पिनलकोड प्रमाणे दखलपात्र गुन्हा म्हणून जाहीर करावा अशी माझी जाहीर मागणी आहे , वाट लावतात बायका लेकीच्या संसाराची ! +१११११११११११११११११११११११११११११११११ खुप जवळुन अनुभव घेतलाय याचा , अजुनही सहन करतोच आहोत अपवादाने का होइना अशा बावळट बायका आहेत जगात ज्याना फक्त मुलगी अन जावई आपल्या ताब्यात कसे राहतील याचीच पडलीये बाकीचे घरचे गेले उडत ! अन मुली पण दिवस्सात ५६ वेळा काय खाल्ल तिथुन तर ते कुणी काय नेसल इतपर्यन्त अपडेट देत राहतात आइला फोनवरुन परत मुलीला सासरचे कुणी काही बोलले तरी ह्यान्च्या धमक्या अमक करु न तमक करु ? अवस्था अशी आहे की कायद्याने मुलीना इतक्या सवलती दिल्यात की हल्ली मुलाना जीव मुठीत धरुन वावराव लागतय :( ( हो मी एक मुलगी असुन हे लिहितेय कारण याचा गैर्वापर मी खुप जवळुन पाहीला आहे आता मुलासाठी कायदे काढावे लागतील असे चित्र आहे असो..... हे फक्त त्या क्याटेगरितल्या म्हैलाकरीता लिहीले आहे अन ते ही स्वानुभवावरुन :( रोष नसावा :)

In reply to by पियुशा

@
अशा बावळट बायका आहेत जगात ज्याना फक्त मुलगी अन जावई आपल्या ताब्यात कसे राहतील याचीच पडलीये बाकीचे घरचे गेले उडत ! अन मुली पण दिवस्सात ५६ वेळा काय खाल्ल तिथुन तर ते कुणी काय नेसल इतपर्यन्त अपडेट देत राहतात आइला फोनवरुन परत मुलीला सासरचे कुणी काही बोलले तरी ह्यान्च्या धमक्या अमक करु न तमक करु ?
>>> या असल्याच सामाजिक प्रश्नांवर काम करणार्‍या अपर्णातै रामतीर्थंकर आहेत. त्यांच्याकडे अश्या भरपूर केसेस सोडविण्यासाठी येत असतात. ती बाईपण अत्यंत चिकाटीने ह्या केसेस सोडविते. मी त्यांच्या भाषणात हेच मुलिंच्या आयांचे सकाळी उठल्यापासून दर अर्ध्यातासाला चौकश्या करणारे फोन कॉल्सचे संभाषणाचे विवरण ऐकले आहे. ते अगदी वरीलप्रमाणेच होते.

In reply to by अत्रुप्त आत्मा

अपर्णातै रामतीर्थंकर
नको नको.. ह्या बाईंच नाव ऐकलं तरी मला गरगरतं.. त्यांचे विचार पटणारे लोक आहेत हे पाहुन तर अजुनच... आईची लुडबुड नको (म्हणजे आता दोन्ही साईडच्या आया नाही बरं का... फक्त मुलीचीच आई... मुलाच्या आईचा हक्क असतो लहानसहान गोष्टीत हस्तक्षेप करण्याचा..) इथवर ठिके.. पण "नवर्‍यासमोर डोकं चालवायचं नाही.. तुम्ही असाल शास्त्रज्ञ, पण घरी आल्यावर पती हाच परमेश्वर.. भाकरी करता येत नसेल तर काय अर्थ तुमच्या जिंदगीला..." असले "महान" विचारही ह्या बाई मांडतात... असो.. पिराबाई... दीर्घ श्वास घ्या...शांत व्हा.. आणि बाईंना विसरुन जा....

In reply to by पिलीयन रायडर

पि.रा. बाई... आपण म्हणताय, ते सगळं आहेच! :) मी त्याबाजुनी नव्हे, तर ..वरिल मुद्याची सत्यता अधोरेखित करण्याकरता आणि करण्यापुरताच त्यांच्या त्या मुद्द्याचा आधार घेतला आहे.

In reply to by पियुशा

मुलाला त्याच्या आई बाबा पासून तोडणार्या सासू पण आहेत ... मुलगा आणि मुलगी विदेशात राहतात तरी कारस्थाने करून मुलगा आणि आई बाबाचे संबंध तोडणारी सासू पाहिली आहे...

मित्रांमधे गप्पा मारता मारता एकाने (एक मुलगी असलेल्या) मजेत काढलेले उद्गार म्हणजे वास्तव आहे असे वाटते: हल्ली एकच मुल जन्माला घालतात बरीच जोडपी, त्यात पण मुलगा झाला तर कसा शिकेल? चांगला शिकला तरी नोकरी चांगली मिळेल का? काही धंदा केला केला तर त्याला भांडवल उपलब्ध करुन द्यावे लागेल, परदेशी स्थाईक झाला तर म्हातारपणी आपल्याला विचारेल का? ईकडेच राहिला तर लग्नापर्यंत त्याला घर वगैरेसाठी आर्थिक मदत करावीच लागेल, सुन कशी मिळेल? आपल्याला कशी वागवेल? ईत्यादी नाना काळज्या आयुष्याच्या वेगवेगळ्या ट्प्प्यावर पोखरतील. त्यापेक्षा एक मुलगी बरी. फक्त एकच गोष्ट नीट करावी लग्न करताना जावई, सासुरवाडी चांगली बघुन द्यावी आणि आपण दोघे खुष व्हावे. बाकी मी पण लग्नाआधी ३-४ मुली बघितल्या पण अवास्तव अपेक्षा असणर्‍या कोणी वाटल्या नाहीत.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

आयला म्हणजे पुरुषभ्रूणहत्या सुरू होणार की काय आता? रोचक आहे. पण सध्या मुलगी म्हणजे काळजी मिटली आणि मुलगा म्ह. काळजी असे आहे खरे.