✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अगदी सोपी 'फिटनेस टेस्ट'

च
चित्रगुप्त यांनी
Sun, 04/28/2013 - 13:56  ·  लेख
लेख
कुणालाही, केंव्हाही, कुठेही पटकन करता येइल, अशी ही फिटनेस टेस्ट: खाली (जमिनीवर) बूड टेकवून बसायचे, आणि कुठेही हात न टेकता, कसलाही आधार न घेता उठून सरळ उभे रहायचे. बस, एवढीच ही टेस्ट आहे. ही अगदी साधी क्रिया देखील कित्येकांना जमत नाही, असे दिसून येते. याची कारणे खालील पैकी असू शकतातः १. लठ्ठपणा, फाजील वजन. २. पाठीचा कणा आणि गुडघे कमकुवत असणे. ३. स्नायूंमधे पुरेशी शक्ती नसणे ४. उदरपटल पुरेसे कार्यक्षम नसणे (उपायः कपालभाती प्राणायाम). या सर्वांवर उपाय म्हणजे योग्य आहार आणि व्यायाम. तुम्ही स्वतः प्रचिती घ्या आणि शक्य असल्यास विविध वयोगटातल्या आणि शारीरिक ठेवणीच्या लोकांकडून ही चाचणी करवून निरिक्षणे सांगा.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
राहणी
विज्ञान
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
शिफारस
माहिती

प्रतिक्रिया द्या
41123 वाचन

💬 प्रतिसाद (97)

प्रतिक्रिया

कुंडलिनी ठेवा !!

सूड
Mon, 04/29/2013 - 21:22 नवीन
कुंडलिनी ठेवा कुंडलिनी!! मिपा जागृत झाल्यागत वाटेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

कुंडलिनी तर नागिणीगत दिसते ना

बॅटमॅन
Tue, 04/30/2013 - 12:30 नवीन
कुंडलिनी तर नागिणीगत दिसते ना हो ;) मग तर मण डॉले मेरा तण डॉले येकदम =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

जल्लां

सूड
Tue, 04/30/2013 - 13:54 नवीन
येवडं डॉलू नका, डॉले पानावतील. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मी ओव्हर वेट आहे तरीपण हे सहज

खबो जाप
Mon, 04/29/2013 - 12:12 नवीन
मी ओव्हर वेट आहे तरीपण हे सहज करू शकतो.
  • Log in or register to post comments

अपात्र!

सर्वसाक्षी
Mon, 04/29/2013 - 12:22 नवीन
आमचे तिर्थरूप - वय वर्षे ८६ हे हा प्रकार सहज करत असल्याने त्यांच्यापुढे मी ही चाचणी देण्यास अपात्र आहे (जरी उत्तिर्ण झालो असलो तरीही)
  • Log in or register to post comments

मेरीट !!

सूड
Mon, 04/29/2013 - 14:01 नवीन
सहज जमल्या गेले आहे... (दोन अ‍ॅब्स पुसटशा दिसू लागलेला) सूड ;)
  • Log in or register to post comments

६ प्याक अ‍ॅब्स दिखनेकेलिये

मालोजीराव
Mon, 04/29/2013 - 14:10 नवीन
६ प्याक अ‍ॅब्स दिखनेकेलिये यही सुभा-शाम २-२ बार किजिये…क्रिपा आनी शुरू होगी - थर्ड Image removed. ऑफ मालोजीबाबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

थर्ड . ऑफ मालोजीबाबा >>> आय

अत्रुप्त आत्मा
Mon, 04/29/2013 - 17:17 नवीन
थर्ड . ऑफ मालोजीबाबा >>> =)) आय आय आय आय आय आय =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

उत्तीर्ण

सानिकास्वप्निल
Mon, 04/29/2013 - 14:19 नवीन
जमले जमले ..हुश्श्श्य :)
  • Log in or register to post comments

...

मी-सौरभ
Mon, 04/29/2013 - 20:22 नवीन
हा पेपर मी ऑप्शन्ला टाकलाय. ;)
  • Log in or register to post comments

पास !

तर्री
Mon, 04/29/2013 - 20:53 नवीन
पास ! अजून एक टेस्ट : डोळे मिटून एक पाय उचलून उभे राहायचे व १० आकडे मोजायचे. जमल्यास दुसरा पाय उचलून हेच टेस्ट करा. ( तेंव्हा पहिला पाय अर्थातच टेकवा ) जर जमले तर शरीर आणि मन ठाकठीक समजायचे.
  • Log in or register to post comments

+१

तिमा
Tue, 04/30/2013 - 13:16 नवीन
एका पायावर कमीतकमी ३० सेकंद उभे रहाता आले पाहिजे, मग डोळे उघडे ठेवले तरी चालेल!(सेकंद मोजण्यासाठी) ही टेस्ट फिजिओथेरपिस्टने सांगितली आहे. ती सोपी वाटली तरी मूळ धाग्याच्या टेस्ट एवढीच कठीण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

कपालभाती हा उपाय फक्त

बाळ सप्रे
Tue, 04/30/2013 - 12:25 नवीन
कपालभाती हा उपाय फक्त उदरपटलासाठी आहे कि पहिल्या ३ मुद्द्यांसाठीदेखिल? सर्व मुद्द्यांसाठी असल्यास - ज्यांना नाही जमलं हात न टेकता उठायला त्यांनी किती दिवस कपालभाती केल्यास जमेल हो चित्रगुप्त ?
  • Log in or register to post comments

कपालभाती म्हणजे कपाळावर भात

स्पंदना
Wed, 05/01/2013 - 05:20 नवीन
कपालभाती म्हणजे कपाळावर भात लावायचा का? मी आज पासुनच करते. तसही लहाण्पणी ताटात काही उरल की डोक्याला थापेन अशी धमकी ऐकुन माहीती आहे. त्यामुळे चालेल कपाल्भाती करायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

वॉटर टेस्ट देखील घेतली.

तुमचा अभिषेक
Wed, 05/01/2013 - 12:02 नवीन
दोन्ही हातात पाण्याचे काठोकाठ भरलेले ग्लास घेतले. जराही न डुचमळता, एकही थेंब न सांडता उठलो, अगदी लयबद्ध शिस्तबद्ध कि काय म्हणतात तसे. येत्या १५ ऑगस्टला आता दिल्लीला परेडला जायलाही हरकत नसावी.. ;)
  • Log in or register to post comments

१५ ऑगस्ट्ला परेड

इरसाल
Wed, 05/01/2013 - 12:33 नवीन
ओ ती २६ जानेवारीला असते.१५ला लाल किल्ल्यावर झेंडा फडकवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक

अरे हो ना, चुकलेच, मी १५

तुमचा अभिषेक
गुरुवार, 05/02/2013 - 10:11 नवीन
अरे हो ना, चुकलेच, मी १५ ऑगस्ट आता आधी येणार असा ढोबळमानाने विचार करून डायलॉग मारला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

जमले ... पास विथ डिस्टिंग्शन

छोटा डॉन
Wed, 05/01/2013 - 19:44 नवीन
एकदम फस्क्लास जमले. उपरोक्त प्रयोग सलग १० वेळा करुन पाहिला, सगळ्याच प्रयत्नात उत्तीर्ण. आयला फिटनेस एवढा सोपा असेल असे वाटले नव्हते ;) तरीही मनात शंका होती म्हणुन जोर-बैठका मारुन पाहिल्या, २०-२० चा सेट आरामात जमला. - (तूर्तास खटाखट फिट)छोटा डॉन
  • Log in or register to post comments

तुमचं काय?

पैसा
Wed, 05/01/2013 - 19:52 नवीन
धागाकर्ते पास की फेल?
  • Log in or register to post comments

ही टेस्ट "चित्रगुप्ता"साठी

बाळ सप्रे
गुरुवार, 05/02/2013 - 10:04 नवीन
ही टेस्ट "चित्रगुप्ता"साठी नाही.. ते फक्त पास झालेल्यांच काय करायचं आणि नापास झालेल्यांचं काय करायचं ते ठरवतात. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अगदीच सहज पास.. पण वर पर्

ऋषिकेश
गुरुवार, 05/02/2013 - 14:31 नवीन
अगदीच सहज पास.. पण वर पर्‍याने विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी थांबलो आहे
  • Log in or register to post comments

धागाकर्ता पास.

चित्रगुप्त
Fri, 05/03/2013 - 12:34 नवीन
धागाकर्ता पास, पण अगदी टुण्णदिशी नाही उठता येत. पण हेही जमले पाहिजेच, म्हणून रोज पहाटे ४-६ कि.मि. चालणे, प्राणायाम, धावणे, पाठीचे व्यायाम वगैरे सुरु केले आहे. परांच्या प्रश्नांच्या उत्तरादखल असे म्हणता येइल, की एकाद्या विषयात पास ३३ वा ४० टक्क्याने होता येत असले, तरी पास झाले याचा अर्थ तो विषय अगदी सांगोपांग अवगत झाला, असे नाही. त्यामुळे बसून हात न टेकता जरी उठता येत असेल, तरी त्याचा अर्थ वजन, पोट, स्नायुंची शक्ती इ.इ. अगदी यथायोग्य आहे, असा होत नाही. विडियोतील मुले जशी अगदी सहजपणे उभी रहात आहे, तसे जमले पाहिजे. ही एक सुटसुटीत, काही विशेष सामग्रीशिवाय, वा विशिष्ट ज्ञानाशिवाय, आकडेमडे, तक्ते इ. शिवाय करता येण्याजोगी चाचणी आहे. वजन, रक्तदाब, कोलेस्टरॉल, इ. साठी असलेल्या तपासण्यांचे वेगणे महत्व आहेच.
  • Log in or register to post comments

अरे वा..जमतंय की.. बाकी काही

पिशी अबोली
Fri, 05/03/2013 - 12:41 नवीन
अरे वा..जमतंय की.. बाकी काही मित्र-मैत्रिणी फेल झाल्यामुळे विशेष आनंद होतो आहे. मला जमतंय म्हटल्यावर आता प्रत्येकाला करायला लावेन नक्की.. :)
  • Log in or register to post comments

पास फेल सोबत

आनंदी गोपाळ
Sat, 05/11/2013 - 13:15 नवीन
वयाचे दशक, व ४० नंतर पंचक लिहिल्यास अधिक चांगली कल्पना येईल.
  • Log in or register to post comments

अगदी सोपी 'फिटनेस टेस्ट'

प्रकाश जनार्दन तेरडे
Sat, 05/11/2013 - 23:26 नवीन
अहो काय राव !!!! सगळेच पास झालो की@@@
  • Log in or register to post comments

ही टेस्ट फारच सोपी आहे. मला

कवितानागेश
Sat, 05/11/2013 - 23:52 नवीन
ही टेस्ट फारच सोपी आहे. मला धक्का बसलाय! या टेस्टप्रमाणे मी एकदम फिट आहे. मी तर लॅपटॉप हातात घेउन पण खालून उठते बसते.
  • Log in or register to post comments

छे:..!

प्रभाकर पेठकर
Sun, 05/12/2013 - 10:19 नवीन
मला तर बनियन काढूनही जमत नाहिए.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

बनियन

प्रसाद गोडबोले
Mon, 12/22/2014 - 18:00 नवीन
बनियन
बनियन चा काय संबंध आहे राव =)))) तुम्ही 'दुसरी कुठली फिटनेस टेस्ट' करुन पहात होता काय पेठकर काका ;) :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

भारी रे मेल्या चवकश्या तुला!!

सूड
Mon, 12/22/2014 - 18:16 नवीन
भारी रे मेल्या चवकश्या तुला!! वशाड मेलो!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

आत्ता या वयात?

टवाळ कार्टा
Mon, 12/22/2014 - 18:56 नवीन
आत्ता या वयात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

यावर्षासाठी कोणती सोप्पी

कंजूस
Mon, 12/22/2014 - 19:05 नवीन
यावर्षासाठी कोणती सोप्पी टेस्ट आहे ?
  • Log in or register to post comments

या वर्षासाठी

चित्रगुप्त
Mon, 12/29/2014 - 18:22 नवीन
या वर्षासाठी कोणती सोप्पी टेस्ट आहे ?
ही घ्या या वर्षासाठीची टेस्टः खालील स्थितीत किमान १५ ते ३० सेकंद स्थिर रहाणे .... बघा करून आणि सांगा. Image removed. हे जमले, की मग आणखी जबरदस्त फिटनेससाठी खालील व्यायाम करा: http://youtu.be/cN0aR3m_0c0
  • Log in or register to post comments

प्लँक्स..

सूड
Mon, 12/29/2014 - 18:25 नवीन
काका, अ‍ॅब्ज चा वर्कआऊट असेल त्यादिवशी ट्रेनर मिनीटभर या स्थितीत राहायला लावतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

खालील स्थितीत किमान १५ ते ३०

प्रसाद गोडबोले
Mon, 12/29/2014 - 18:31 नवीन
खालील स्थितीत किमान १५ ते ३० सेकंद स्थिर रहाणे .... बघा करून आणि सांगा.
स्थिर रहाणे .... ह्म्म .... अवघड आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

ह्म्म्म्म्म

कपिलमुनी
Mon, 12/29/2014 - 18:32 नवीन
कोंची जिम म्हणायची ही ! जॉइन व्हावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

काय सुरेख मुलगी आहे. व्व्वा

प्रसाद१९७१
Mon, 12/29/2014 - 18:34 नवीन
काय सुरेख मुलगी आहे. व्व्वा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

चायला घरी असून पण माझा गणेशा

टवाळ कार्टा
Mon, 12/29/2014 - 20:32 नवीन
चायला घरी असून पण माझा गणेशा झालाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

पाठीचा कणा आणि गुडघे कमकुवत

विवेकपटाईत
Mon, 12/29/2014 - 20:50 नवीन
पाठीचा कणा आणि गुडघे कमकुवत असणे. स्नायूंमधे पुरेशी शक्ती नसणे उदर ही ठीक नाही. बहुतेक ७ प्रकारच्या गोळ्या घेतो, नाव ही लक्षात नाही राहत. सौ.ला लक्षात ठेवावे लागतात. त्याचा परिणाम उदर वर होतोच. शेवटी ४ पैकी ३ विषयांत प्राविण्य सहित नापास...
  • Log in or register to post comments

स्वतःविषयी

चित्रगुप्त
Mon, 12/29/2014 - 21:15 नवीन
मी स्वतः यावर्षी जून महिना अखेर पर्यंत पोटाचा नगारा, जिना चढताना त्रास, 'फिटनेस टेस्ट' मधे नापास, मूळव्याधग्रस्त असा झालेलो होतो. जुलाई पासून दररोज २-३ ग्लास भाज्या आणि फळांचा ताजा रस काढून पीणे, मैदा आणि कणकेचे पदार्थ अगदी कमी खाणे, आणि थोडासा व्यायाम हे सुरू केले. ५-६ दिवसात पोटातून 'कालसर्प बाहेर निघाला, मूळव्याध वीस दिवसात पूर्ण बरी झाली. आता ऊर्जा आणी उत्साह भरपूर वाढलेला आहे, धावत जिना चढू शकतो, पोट आणि वजन बरेच कमी झाले आहे, फिटनेस टेस्ट मधे पास. याबद्दल पुणे-पाताळेश्वर कट्ट्यात माहिती सांगितली होती. त्यानंतर मिपाकर समीर यांनी सात दिवस नुसते जूस प्राशन करण्याचा प्रयोग केला. त्याबद्दल त्यांनी लिहावे, असे सुचवतो. याबद्दल कुणाला माझ्याशी बोलायचे असेल, तर व्यनी करावा.
  • Log in or register to post comments

मी जिंकलो आणि हारलो

कंजूस
Mon, 12/29/2014 - 22:36 नवीन
मी जिंकलो आणि हारलो फुडं बायको येऊन हुबी ऱ्हायली आणि मुलीने फोटो काढला. काहीतरी सन्मान्यजनक आणि माण उंचावेल अशि टेस्ट हाइ का ? शाळेत असतांना पाचवी ते सातवी शाळेत कोणी पाहुणे आले की त्यांना "आमच्याकडे मुलानला योगासनेही शिकवतो" चे मी सांपल होतो मयुरासनही करत असे.
  • Log in or register to post comments

पुन्हा एकदा फेल

चित्रगुप्त
गुरुवार, 03/19/2015 - 10:56 नवीन
अलिकडे जरा जोशात येऊन न झेपण्याइतके धावणे, वेगात चालणे वगैरे केल्याने गुडघे/मांड्या दुखावल्या जाऊन पुन्हा या टेस्टीत नापास झालेलो आहे. आता काही दिवस आराम करून पाय वगैरे ठीक झाल्यावर पुन्हा पास होता येईल, या आशेत आहे.
  • Log in or register to post comments

खाली मांडी धालून बसता येत

कायरा
गुरुवार, 03/26/2015 - 03:21 नवीन
खाली मांडी धालून बसता येत नाही. त्यामुळे टेस्ट मध्ये नापास. खूपच मागे पडले. कपालभाती, चालणे करुन बघू या! पास होण्याचा प्रयत्न करीन.
  • Log in or register to post comments

जमली

सांगलीचा भडंग
Tue, 03/31/2015 - 01:37 नवीन
जमली . मी पास :-)
  • Log in or register to post comments

जमली

सांगलीचा भडंग
Tue, 03/31/2015 - 01:37 नवीन
जमली . मी पास :-)
  • Log in or register to post comments

अहं...

भिंगरी
Tue, 03/31/2015 - 08:53 नवीन
एक गुढगा टेकुन उठले,पण सवय केल्यावर जमेल असं वाटंतय.
  • Log in or register to post comments

२०१५ नंतर आज पुन्हा ही टेस्ट केली, आणि ....

चित्रगुप्त
Sun, 01/29/2023 - 15:48 नवीन
२०१५ नंतर आज पुन्हा ही टेस्ट केली, आणि .... सपशेल नापास. सध्या वय ७१ आहे आणि एकंदरित तब्येत चांगली आहे. कोणतेही औषध घ्यावे लागत नाहीये. परंतु गेली काही वर्षे व्यायाम नियमित केलेला नाही. मात्र सध्या पायी चालणे किमान एक तास तरी होते. आत्ता PLANK करून बघितल्यावर ४५ सेकंद करू शकलो. आता यावर आत्मपरिक्षण आणि नेमके काय करायला हवे हे शोधून ते केले पाहिजे. वजन कमी करणे आणि पायांचे व्यायाम करून स्नायूंची शक्ती वाढवणे गरजेचे आहे असे वाटते. यावर जाणकार मिपाकर योग्य सल्ला देऊ शकतील अशी आशा आहे. प्लँकः Image removed.
  • Log in or register to post comments

खुप छानच.

Bhakti
Sun, 01/29/2023 - 19:00 नवीन
वय ७१ ,वेळ ४५ सेकंद plank PLANK अवघडच आहे मला. अजूनही beginners plank च करते,साईड प्लंकच्या तर नादालाच लागत नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा