✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अगदी सोपी 'फिटनेस टेस्ट'

च
चित्रगुप्त यांनी
Sun, 04/28/2013 - 13:56  ·  लेख
लेख
कुणालाही, केंव्हाही, कुठेही पटकन करता येइल, अशी ही फिटनेस टेस्ट: खाली (जमिनीवर) बूड टेकवून बसायचे, आणि कुठेही हात न टेकता, कसलाही आधार न घेता उठून सरळ उभे रहायचे. बस, एवढीच ही टेस्ट आहे. ही अगदी साधी क्रिया देखील कित्येकांना जमत नाही, असे दिसून येते. याची कारणे खालील पैकी असू शकतातः १. लठ्ठपणा, फाजील वजन. २. पाठीचा कणा आणि गुडघे कमकुवत असणे. ३. स्नायूंमधे पुरेशी शक्ती नसणे ४. उदरपटल पुरेसे कार्यक्षम नसणे (उपायः कपालभाती प्राणायाम). या सर्वांवर उपाय म्हणजे योग्य आहार आणि व्यायाम. तुम्ही स्वतः प्रचिती घ्या आणि शक्य असल्यास विविध वयोगटातल्या आणि शारीरिक ठेवणीच्या लोकांकडून ही चाचणी करवून निरिक्षणे सांगा.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
राहणी
विज्ञान
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
शिफारस
माहिती

प्रतिक्रिया द्या
41123 वाचन

💬 प्रतिसाद (97)

प्रतिक्रिया

पास झालो. (बाळसं धरलेला) गणा

गणपा
Sun, 04/28/2013 - 14:02 नवीन
पास झालो. :) (बाळसं धरलेला) गणा
  • Log in or register to post comments

+१.

बॅटमॅन
Sun, 04/28/2013 - 14:06 नवीन
+१. आम्हीही पास झालो. (बाळसेदार) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

मी नंबर येक

अभ्या..
Sun, 04/28/2013 - 14:47 नवीन
मी तर मेरीटलिस्टात. :) रिपीट परफॉर्मन्समध्ये पण. एकदम फीट न फाइन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

या सर्वांवर उपाय म्हणजे योग्य

प्रकाश घाटपांडे
Sun, 04/28/2013 - 14:06 नवीन
या सर्वांवर उपाय म्हणजे योग्य आहार आणि व्यायाम.
इथच वांधा आहे ना! योग्य म्हणजे काय? ते कुणी व कसं ठरवायचं?
  • Log in or register to post comments

खुप

jaypal
Sun, 04/28/2013 - 14:09 नवीन
आभ्यास केला तेंव्हा कुठे काठावर पास झालो.
  • Log in or register to post comments

थांबा जरा. मला मनाची तयारी

स्पंदना
Sun, 04/28/2013 - 14:33 नवीन
थांबा जरा. मला मनाची तयारी करु द्या. मग बसेन अन उठले तर लिहेन.
  • Log in or register to post comments

फेल!! :')

स्पंदना
Sun, 04/28/2013 - 14:41 नवीन
फेल!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

जमणं शक्यच नाही.

प्रभाकर पेठकर
Sun, 04/28/2013 - 14:41 नवीन
जीवंतपणी पापाचा पाढा 'चित्रगुप्ता' पुढे वाचला गेला. जमणं शक्यच नाही. उगीच खोटं कशाला बोला.
  • Log in or register to post comments

एक शंका :-

परिकथेतील राजकुमार
Sun, 04/28/2013 - 14:55 नवीन
ही अगदी साधी क्रिया करता आली, तर खालील अनुमान काढता येतील काय ? :- १. लठ्ठपणा, फाजील वजन अजीबात नाही. २. पाठीचा कणा आणि गुडघे मजबूत असणे. ३. स्नायूंमधे पुरेशी शक्ती असणे ४. उदरपटल पुरेसे कार्यक्षम असणे
  • Log in or register to post comments

जरा कुठे घटकाभर मनाला बरं

गणपा
Sun, 04/28/2013 - 14:58 नवीन
जरा कुठे घटकाभर मनाला बरं वाटलं तर हे आले लगेच शंकासेन्ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

परा चांदीच्या भांड्यातुन

jaypal
Sun, 04/28/2013 - 15:06 नवीन
पाणी पित जा. शंकेखोर मन शांत होईल ;-)
  • Log in or register to post comments

हम्म

परिकथेतील राजकुमार
Sun, 04/28/2013 - 15:16 नवीन
@ गणपा :- काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच. @जयपा :- दाद्या तू पाणी प्यायचा सल्ला देणे म्हणजे दावूदने दंबूक ऐवजी काठी हातात घेण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

पा.......................स!!!

अत्रुप्त आत्मा
Sun, 04/28/2013 - 15:09 नवीन
Image removed.

पा.......................स!!!

Image removed.
  • Log in or register to post comments

असहमत

आतिवास
Sun, 04/28/2013 - 15:11 नवीन
'अगदी सोपी' या शब्दांशी असहमत :-)
  • Log in or register to post comments

नापास की पास ???

चित्रगुप्त
Sun, 04/28/2013 - 15:36 नवीन
....'अगदी सोपी' या शब्दांशी असहमत.... नापास की पास ???
  • Log in or register to post comments

:-)

आतिवास
Sun, 04/28/2013 - 15:58 नवीन
आत्ता ऑफिसात आहे. करुन सांगते पण 'सोपी' जाणार नाही असा अंदाज आहे :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

विशेष प्राविण्यासह पास....

बाबा पाटील
Sun, 04/28/2013 - 15:59 नवीन
विशेष प्राविण्यासह पास....
  • Log in or register to post comments

जमलं! मी पास..

इनिगोय
Sun, 04/28/2013 - 16:25 नवीन
जमलं! मी पास..
  • Log in or register to post comments

डचमळत डचमळत काठावर पास.

सस्नेह
Sun, 04/28/2013 - 16:30 नवीन
डचमळत डचमळत काठावर पास.
  • Log in or register to post comments

जमल जमल सहज जमल...

अग्निकोल्हा
Sun, 04/28/2013 - 17:04 नवीन
मग हातात सामान घेतलं, पुन्हा जमलं... फिटनेसची खात्रिच झाली.
  • Log in or register to post comments

सहज जमतंय!

प्यारे१
Sun, 04/28/2013 - 17:14 नवीन
सहज जमतंय! -पण तरीही मोटुच प्यारे.
  • Log in or register to post comments

पास

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 04/28/2013 - 17:42 नवीन
थोड इकडं तिकडं कलल्यासारखं झालं पण जमलं. :) पण, आता आरोग्याचे धागे काढत जा राव :( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

आरोग्याचे धागे

चित्रगुप्त
Sun, 04/28/2013 - 22:21 नवीन
चित्रकलेप्रमाणेच आरोग्य हा पण आवडता विषय आहे, पण त्याविषयी अधिकाराने लिहिण्याची कुवत किती, ही शंका, तरी प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज जमलं

चाणक्य
Sun, 04/28/2013 - 17:51 नवीन
पास
  • Log in or register to post comments

अगागा..... अबे कोण म्हणले रे

प्राध्यापक
Sun, 04/28/2013 - 20:19 नवीन
अगागा..... अबे कोण म्हणले रे याला सोपी फीटनेस टेस्ट....ही सोपी तर मग अवघड काय असेल. (स्वगत-बघु जमेल पण दररोज करायला पाहीजे)
  • Log in or register to post comments

काही शंका...

चिगो
Sun, 04/28/2013 - 20:54 नवीन
१. उठतांना पाय मुडपला तर चालतो का? २. उठतांना कललो तर पास की नापास? ३. उठल्यावर मोठा "हुऽ ऽ फ्फ" गेला तर? (ग्रेसनी पास झाल्याची शंका असलेला, मोटू) चिगो
  • Log in or register to post comments

??

सोत्रि
Sun, 04/28/2013 - 20:56 नवीन
पास झालो पण त्याचा अर्थ काय? मी फीट आहे? - (घेरदार पोटाचा) सोकाजी
  • Log in or register to post comments

उत्तीर्ण

श्रीरंग_जोशी
Sun, 04/28/2013 - 20:58 नवीन
सदर शारिरीक क्षमता चाचणी रोचक आहे. अगदी सहजपणे उत्तीष्ठम करून उत्तीर्ण झालो आहे.
  • Log in or register to post comments

मी नापास झालो पण नापास होताना

विसोबा खेचर
Sun, 04/28/2013 - 21:00 नवीन
मी नापास झालो पण नापास होताना आनंद चित्रपटातली 'मौत तू एक कविता है...' ही कविता आठवली आणि नापास होऊनदेखील एकदम डिस्टिंक्शनमध्ये आल्यासारखं वाटलं...! :-)
  • Log in or register to post comments

एकदम

श्रावण मोडक
Mon, 04/29/2013 - 00:34 नवीन
एकदम सोपी. मी मनोमनच केली. पास झालो. मग पुन्हापुन्हा केली, तरीही पासच झालो. अगदी बसमध्ये बसल्याबसल्या केली. ;-)
  • Log in or register to post comments

चितींग?

स्पंदना
Mon, 04/29/2013 - 05:05 नवीन
चितींग? काय श्रामो हे मला पहिला नाही होय सांगायच, मनाने करायचं ते? उगा कंबर उसणली ना माझी!! :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

पास.

रेवती
Mon, 04/29/2013 - 05:59 नवीन
पास.
  • Log in or register to post comments

अनुत्तीर्ण!!!

शुचि
Mon, 04/29/2013 - 06:45 नवीन
अनुत्तीर्ण!!!
  • Log in or register to post comments

स्वता: ला फसवत...

चौकटराजा
Mon, 04/29/2013 - 08:23 नवीन
वय वर्षे ५९ व काही महिने... करून पाहिले. चित्रगुप्त याना अश्विनिकुमार भेटलेले दिसताहेत बहुदा. अटी तंतोतंत पाळल्या तर या वयाला तरी जमत नाही. एका गुढग्यावर शरीराचा भार देऊन मात्र सह्ज उठता येते. ( पण हा फाउल असल्याने चित्रगुप्त महाराज रेड कार्ड दाखविणार बहुदा !! )
  • Log in or register to post comments

पयल्या लंबरात पास

इरसाल
Mon, 04/29/2013 - 09:59 नवीन
ह्या टेस्ट साठी कुठेही हात न टेकता, पंगतीतुन जेवुन उठताना बाजुला डावा हात टेकुन जास्त वेळ गुढगे टेकुन बसलो तर मग दोन्ही हात टेकावे लागतात कधी कधी.
  • Log in or register to post comments

१० बैठका

वेल्लाभट
Mon, 04/29/2013 - 10:20 नवीन
१० बैठका आणि १० डिप्स मारता येणं, ही सुद्धा एक 'फिट' असल्याची पावती मानली जाते असं नेट वर वाचलं होतं.
  • Log in or register to post comments

काय बोलता?

चिगो
Tue, 04/30/2013 - 16:09 नवीन
१० बैठका आणि १० डिप्स मारता येणं, ही सुद्धा एक 'फिट' असल्याची पावती मानली जाते असं नेट वर वाचलं होतं.
चला, कुठूनतरी 'फिट' असल्याचं सर्टीफिकेट मिळाल्याशी मतलब.. (ढेरीवाला पैलवान) चिगो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

पास with distinction

महेश हतोळकर
Mon, 04/29/2013 - 10:25 नवीन
रोज करतो; एका हातात जेवणाचं ताट आणि दुसर्‍या हातात पाण्याचं भांडं घेऊन.
  • Log in or register to post comments

+१

मालोजीराव
Mon, 04/29/2013 - 10:41 नवीन
पास !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश हतोळकर

फेल

सहज
Mon, 04/29/2013 - 10:59 नवीन
सपशेल फेल. मूड ऑफ. मूड ऑफ, फेल झाल्याचा नाही पण मी फेल आणी बायको पास :-(
  • Log in or register to post comments

डरो मत, आगे बढो.

चित्रगुप्त
Mon, 04/29/2013 - 11:51 नवीन
सहजराव, बायको पास हे जास्त महत्वाचे. कारण आता फक्त तुम्हाला स्वतःचीच काळजी घ्यायची आहे. शिवाय तुमची काळजी घेणारी फिट आहे, मग चिंता कसली? वजन, पाठ, गुडघे, स्नायु, उदरपटल यापैकी कोणती बाजू कमकुवत आहे, हे शोधा आणि लागा उद्योगाला - सहा महिन्यात पास व्ह्यायचेच असे ठरवून. नक्की यश मिळेल. तुमच्या प्रयत्नांबद्दल आम्हालापण कळवा.
  • Log in or register to post comments

वरच्या

सहज
Mon, 04/29/2013 - 13:52 नवीन
व्हिडिओ प्रमाणे जमले नाही तरी गुडघे जमीनीवर जोर देउन, हात न वापरता किंवा अन्य कशाचा आधार न घेता जमले तर पास की नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

सहज तसे पास नाही. ते फक्त

ढालगज भवानी
Mon, 04/29/2013 - 17:58 नवीन
सहज तसे पास नाही. ते फक्त स्वतःला फसविणे झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

नवा आयडी बाकी शोभतोय हो !!

सूड
Mon, 04/29/2013 - 18:01 नवीन
नवा आयडी बाकी शोभतोय हो !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढालगज भवानी

हाहाहा .... ते तूपाळ शिर्

ढालगज भवानी
Mon, 04/29/2013 - 18:03 नवीन
हाहाहा .... ते तूपाळ शिर्‍यासारखं सात्विक नाव नको झालय ;) आता या आय डी ने मस्त बोचकारणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

+१.

बॅटमॅन
Mon, 04/29/2013 - 18:04 नवीन
+१. अगदी अगदी ;) अवांतरः त्या नावामागचा इतिहास माहिती आहे का? असल्यास अजूनच मजा वाटेल =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अय्या काय इतिहास आहे?

ढालगज भवानी
Mon, 04/29/2013 - 18:13 नवीन
अय्या काय इतिहास आहे? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

‘ढाल’ म्हणजे निशाण, ‘गज’

ढालगज भवानी
Mon, 04/29/2013 - 18:54 नवीन
‘ढाल’ म्हणजे निशाण, ‘गज’ म्हणजे हत्ती. पेशव्यांच्या सैन्याच्या अग्रभागी हत्तीण असायची, तिचं नाव होतं, ‘भवानी’. त्यावरून ‘ढालगज भवानी’ हा वाक्प्रचार रूढ झाला.
शी!! :-/ परत बदलावसं वाटतय नाव :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आयडीसाठी नावे सुचवा

चित्रगुप्त
Mon, 04/29/2013 - 21:09 नवीन
आता नाव परत बदलून 'लवंगलतिका' 'कुसुमकलिका' 'मधुमालिनी' असलं काही घेणार का? 'आयडीसाठी नावे सुचवा' असा धागाच काढायचा का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढालगज भवानी

खास मराठी म्हणून हे नाव घेतलय

ढालगज भवानी
Mon, 04/29/2013 - 21:13 नवीन
खास मराठी म्हणून हे नाव घेतलय. आगाव लहान मुलींना आपण म्हणतो ना "ढालगज भवानी" तसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा