लेखकचतुरंगयांनी बुधवार, 12/11/2014 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या तीन डावातच दोन डाव निकाली निघालेत यापेक्षा जास्त उत्सुकता ताणणारे अजून काय असू शकते?
आज चौथा डाव मॅग्नुस पांढर्या मोहोर्यांनी खेळणार. कोणती सुरुवात असेल ई४ का अजून काही?
डाव सुरु व्हायला जेम्तेम एक मिनिट आहे चला बघूयात !
अतिशय शार्प वेरिएशन्स असलेली ओपनिंग थिअरी. आनंद त्यातला एक माहिर खेळाडू समजला जातो.
मॅग्नुसचा किल्लेकोट झालाय आनंदचा राजा पुढच्या खेळीत किल्लेकोटात जाईल. ५ मिनिटात ७ खेळ्या झाल्यात. वेग चांगलाच आहे.
सिसिलियन डिफेन्सने डाव सुरु झालाय.
या व्हिडिओ ट्युटोरियलची आठवण झाली.
(बुद्दीबळाविषयी इंटरेस्ट पण मोजकीच माहिती असणार्या माझासारख्यांसाठी ही सिरीजच माहितीपूर्ण आहे)
किल्लेकोट करण्यात वेळ आणि टेंपो दोन्ही न घालवता सरळ मोहोरी पुढे आणण्यावर भर दिलाय म्हणजे त्याची कॉन्फिडन्स लेवेल उत्तम आहे. शिवाय दोन्ही बाजूपैकी कोठेही किल्लेकोट करता येईल अशी शक्यता ठेवली आहे. मेग्नुस शुड कीप गेसिंग!
डायनामिक आहे. आनंदचे वजिराचे प्यादे आय्सोलेटेड आहे. त्याचा जी४ वरचा उंट मॅग्नुसला त्रासदायक ठरायच्या आतच तो हुसकावून लावायला त्याने वजीर एफ १ मधे आणलाय. मॅग्नुसचा रोख हा डाव सोपा करण्याकडे आणि नंतर वजिराचे प्यादे खाण्याकडे असेल. आणि आनंद त्याला संधी मिळू नये यासाठी प्रयत्नशील.
मला नव्यानेच कळालेली माहिती शेअर करतोय. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी.
पटाखाली हुडिनी, कमोडो आणि स्टॉकफिश ही जी नावं आहेत त्यांना इंजिन्स म्हणतात. ते एक एक कॉप्युटर प्रोग्राम्स आहेत जे प्रत्येक खेळी नंतर पटाला अॅनालाईज करत असतात. त्यातून एक आकडा निघतो जो धन(positive) अथवा ऋण असू शकतो. धन आकडा पांढर्याच्या पारड्याला झुकणारा डाव आहे अस दर्शवतो. आकडा ऋण असेल तर डाव काळ्याच्या पारड्यात झुकणारा आहे. जेवढा मोठा आकडा डाव तितका जास्तं त्या पारड्यात झुकला आहे. -३ म्हणजे काळ्याच्या बाजूला झुकला आहे खूप. +३ म्हणजे पांढर्याच्या बाजूला.
प्याद्याचा वजीर होईल अशी धमकी.
कारण या दोन दिग्गजात केवळ वजीर आणि घोड्यानं मात, आणि ते ही सद्य स्थितीत असंभव आहे.
आनंदच्या डी-प्याद्याला बढत शक्य आहे त्यामुळे तो बरोबरी मान्य करणार नाही.
आता खेळानंतरच्या पत्रकारपरिषदेमध्ये खेळीमेळीने डावाचे विश्लेषण सुरु आहे! :)
या परिषदेत पत्रकारांनी डोकेबाज प्रश्न विचारायला बंदी असते की काय कोण जाणे?
मागे एकाने आनंदला विचारले होते "पुढच्या डावात तुझी स्ट्रॅटेजी काय असेल??:
आनंद : "सीरिअसली? डू यू बिलीव दॅट आय शुड डिस्कस धिस हिअर?"
डाव जिंकल्यावर किंवा हरल्यावर आता तुला कसं वाटतंय? हा आणखी एक गाढव प्रश्न, अरे कसं वाटणार?
ऑब्विअस आहे ना?
पण ते एक मस्त मनोरंजन असते यात वाद नाही!
आनंद मस्त खेचतो.. गॅरी कास्पारोव विचित्र पण भारी बोलतो मुलाखतींमधे..
मागे एक हा संवाद पाहिला होता तूनळीवर जिथे ऊत्तम मुलाखतकारालाहि त्याने एकदम निरुत्तर केले होते ..
-पहाटवारा
मित्रांबरोबर संगीताच्या कार्यक्रमाला जाणरे आणि तिथे गेल्यानंतर, पुस्तक वाचनांत दंग होणारे...
असो,
ही सगळी भली मंडळी चर्चा करतात, त्यातल्या खेळीमेळीच्या वातावरणातच आपल्याला रस.
बाद्वे...व्यनि केला आअहे.
प्रतिक्रिया
पट
पट धाग्यात टाकला
In reply to पट by बहुगुणी
सिसिलियन डिफेन्सने डाव सुरु झालाय.
लै भारी
आता मॅग्नुसचा घोडा
या व्हिडिओ ट्युटोरियलची आठवण झाली
सिसिलियन डिफेन्सने डाव सुरु झालाय.या व्हिडिओ ट्युटोरियलची आठवण झाली. (बुद्दीबळाविषयी इंटरेस्ट पण मोजकीच माहिती असणार्या माझासारख्यांसाठी ही सिरीजच माहितीपूर्ण आहे)मस्त चाललाय डाव.
आनंदने
आनंदने
आनंद कॅसल करेल तर शॉर्ट कॅसल
कार्लसन ने पण
अर्र
आनंद ने हत्ती ए-८ ला नेला.
एकुण सगळे घोड्यांवरुन चाली रचत आहेत.
मॅग्नुसच्या उंटाला
सध्या काय
आता स्थिती
चला आता मी पळतो..
आनंद उंट एच-५ खेळला
कार्लसन
मला नव्यानेच कळालेली माहिती
सध्या आकडा -०.१ आहे. थोडासा
In reply to मला नव्यानेच कळालेली माहिती by अनुप ढेरे
आयला असंय काय! धन्यवाद!
In reply to मला नव्यानेच कळालेली माहिती by अनुप ढेरे
युनिट असतं का ते नाही माहित,
In reply to आयला असंय काय! धन्यवाद! by आदूबाळ
मारला घोडा कार्लसन ले
घोड्याच्या मारामारीनंतर उंट आणला आनंदने पटाच्या मध्यभागी
कार्लसन
ड्रा कड़े चालला सामना
आता फक्त एक चान्स असतो तो म्हणजे
In reply to ड्रा कड़े चालला सामना by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अधिकच्या वेळेत
त्या एकमेव थ्रेटवर सगळा गेम होता!
In reply to अधिकच्या वेळेत by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
त्या एकमेव थ्रेटवर सगळा गेम
In reply to त्या एकमेव थ्रेटवर सगळा गेम होता! by संजय क्षीरसागर
ब्रोब्री झाली!!
:)
In reply to ब्रोब्री झाली!! by चतुरंग
काय निकाल लागला मॅचचा?
असेच म्हणतो, हे कसल काय
In reply to काय निकाल लागला मॅचचा? by मुक्त विहारि
आयला ... तुम्ही पण आमच्याच पंथातले दिसताय...
In reply to असेच म्हणतो, हे कसल काय by गणेशा
काय निकाल आहे.
तेच तर कुणी सांगत नाही आहे....
In reply to काय निकाल आहे. by जेपी
बरोबरी झाली
म्हणजे हा डाव बरोबरीत सुटला...
In reply to बरोबरी झाली by बहुगुणी
हो
In reply to म्हणजे हा डाव बरोबरीत सुटला... by मुक्त विहारि
धन्यवाद...