✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ४

च
चतुरंग यांनी
Wed, 11/12/2014 - 17:30  ·  लेख
लेख
पहिल्या तीन डावातच दोन डाव निकाली निघालेत यापेक्षा जास्त उत्सुकता ताणणारे अजून काय असू शकते? आज चौथा डाव मॅग्नुस पांढर्‍या मोहोर्‍यांनी खेळणार. कोणती सुरुवात असेल ई४ का अजून काही? डाव सुरु व्हायला जेम्तेम एक मिनिट आहे चला बघूयात !

Book traversal links for आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ४

  • ‹ आनंद-कार्लसन, सोची २०१४ - डाव ३
  • Up
  • आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ५ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
11976 वाचन

💬 प्रतिसाद (43)

प्रतिक्रिया

पट

बहुगुणी
Wed, 11/12/2014 - 17:34 नवीन
पट.
  • Log in or register to post comments

पट धाग्यात टाकला

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 11/12/2014 - 19:26 नवीन
मनपूर्वक आभार. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

सिसिलियन डिफेन्सने डाव सुरु झालाय.

चतुरंग
Wed, 11/12/2014 - 17:37 नवीन
अतिशय शार्प वेरिएशन्स असलेली ओपनिंग थिअरी. आनंद त्यातला एक माहिर खेळाडू समजला जातो. मॅग्नुसचा किल्लेकोट झालाय आनंदचा राजा पुढच्या खेळीत किल्लेकोटात जाईल. ५ मिनिटात ७ खेळ्या झाल्यात. वेग चांगलाच आहे.
  • Log in or register to post comments

लै भारी

रमताराम
Wed, 11/12/2014 - 17:38 नवीन
लै दिसांनी सिसिलियन चा गेम बघायला मिळतोय.
  • Log in or register to post comments

आता मॅग्नुसचा घोडा

चतुरंग
Wed, 11/12/2014 - 17:43 नवीन
डी५ असा मोक्याचे ठाणे धरुन ठेवायला बघणार. नंतर सी प्यादे पुढे येऊन पटाचा मध्य मजबूत करणार. आनंदचे पर्याय - उंट जी ४ येऊ शकतो, किल्लेकोट करु शकतो.
  • Log in or register to post comments

या व्हिडिओ ट्युटोरियलची आठवण झाली

बहुगुणी
Wed, 11/12/2014 - 17:50 नवीन
सिसिलियन डिफेन्सने डाव सुरु झालाय. या व्हिडिओ ट्युटोरियलची आठवण झाली. (बुद्दीबळाविषयी इंटरेस्ट पण मोजकीच माहिती असणार्‍या माझासारख्यांसाठी ही सिरीजच माहितीपूर्ण आहे)
  • Log in or register to post comments

मस्त चाललाय डाव.

केदार-मिसळपाव
Wed, 11/12/2014 - 17:53 नवीन
बघुया..
  • Log in or register to post comments

आनंदने

केदार-मिसळपाव
Wed, 11/12/2014 - 17:55 नवीन
दोन्ही किल्लेकोट करायची शक्यता जिवंत ठेवलिये. हत्ती येणार लवकर खेळात.
  • Log in or register to post comments

आनंदने

चतुरंग
Wed, 11/12/2014 - 17:56 नवीन
किल्लेकोट करण्यात वेळ आणि टेंपो दोन्ही न घालवता सरळ मोहोरी पुढे आणण्यावर भर दिलाय म्हणजे त्याची कॉन्फिडन्स लेवेल उत्तम आहे. शिवाय दोन्ही बाजूपैकी कोठेही किल्लेकोट करता येईल अशी शक्यता ठेवली आहे. मेग्नुस शुड कीप गेसिंग!
  • Log in or register to post comments

आनंद कॅसल करेल तर शॉर्ट कॅसल

बॅटमॅन
Wed, 11/12/2014 - 17:58 नवीन
आनंद कॅसल करेल तर शॉर्ट कॅसल करेल असे वाटते आहे. तदुपरि- मॅग्नसच्या शेंटस घोड्याची पोझिशन लय महत्त्वाची. तिकडं मारामारी होणार का?
  • Log in or register to post comments

कार्लसन ने पण

केदार-मिसळपाव
Wed, 11/12/2014 - 18:02 नवीन
हत्तीचा मार्ग मोकळा केला. आता त्याला घोड्याच्या बळाने उंट एफ-३ ला आणता येइल.
  • Log in or register to post comments

अर्र

केदार-मिसळपाव
Wed, 11/12/2014 - 18:05 नवीन
त्याने ङ्हो घोडा आणला एफ-३ ला. आनंद ला राजच्या बाजुने सावध व्हावे लागेल. वजीर एच-७ वर रोखला आहे कार्लसन चा.
  • Log in or register to post comments

आनंद ने हत्ती ए-८ ला नेला.

केदार-मिसळपाव
Wed, 11/12/2014 - 18:14 नवीन
राजाला जागा केली आणि इ पट्टा नजरेत आणला.
  • Log in or register to post comments

एकुण सगळे घोड्यांवरुन चाली रचत आहेत.

केदार-मिसळपाव
Wed, 11/12/2014 - 18:28 नवीन
आनंद डी-४ आणि इ-५ वरुन चिंतीत आहे.
  • Log in or register to post comments

मॅग्नुसच्या उंटाला

चतुरंग
Wed, 11/12/2014 - 18:34 नवीन
जी ५ मधे येण्यापासून रोखले आनंदच्या एच ६ खेळीने. आणि ही एक वेटिंग मूव देखील आहे पांढर्‍याचा प्लॅन जाणून घेण्यासाठीची.
  • Log in or register to post comments

सध्या काय

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 11/12/2014 - 18:47 नवीन
परिस्थिति वाटते ?
  • Log in or register to post comments

आता स्थिती

चतुरंग
Wed, 11/12/2014 - 18:54 नवीन
डायनामिक आहे. आनंदचे वजिराचे प्यादे आय्सोलेटेड आहे. त्याचा जी४ वरचा उंट मॅग्नुसला त्रासदायक ठरायच्या आतच तो हुसकावून लावायला त्याने वजीर एफ १ मधे आणलाय. मॅग्नुसचा रोख हा डाव सोपा करण्याकडे आणि नंतर वजिराचे प्यादे खाण्याकडे असेल. आणि आनंद त्याला संधी मिळू नये यासाठी प्रयत्नशील.
  • Log in or register to post comments

चला आता मी पळतो..

चतुरंग
Wed, 11/12/2014 - 18:55 नवीन
रसिकांनी धागा पुढे चालू ठेवा मी दोन तासांनी येऊ शकेन बहुदा. आनंदला शुभेच्छा! :)
  • Log in or register to post comments

आनंद उंट एच-५ खेळला

केदार-मिसळपाव
Wed, 11/12/2014 - 19:01 नवीन
म्हणजे डी-१ वरचा दबाव त्याने अप्रत्यक्ष कायम ठेवलाय. मारामारी टाळतोय सध्या.
  • Log in or register to post comments

कार्लसन

केदार-मिसळपाव
Wed, 11/12/2014 - 19:07 नवीन
आनंद च्या उंटाला मागे ढकलतोय आणि स्वतःचे मोहोरे पुढे आणतोय.
  • Log in or register to post comments

मला नव्यानेच कळालेली माहिती

अनुप ढेरे
Wed, 11/12/2014 - 19:12 नवीन
मला नव्यानेच कळालेली माहिती शेअर करतोय. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी. पटाखाली हुडिनी, कमोडो आणि स्टॉकफिश ही जी नावं आहेत त्यांना इंजिन्स म्हणतात. ते एक एक कॉप्युटर प्रोग्राम्स आहेत जे प्रत्येक खेळी नंतर पटाला अ‍ॅनालाईज करत असतात. त्यातून एक आकडा निघतो जो धन(positive) अथवा ऋण असू शकतो. धन आकडा पांढर्‍याच्या पारड्याला झुकणारा डाव आहे अस दर्शवतो. आकडा ऋण असेल तर डाव काळ्याच्या पारड्यात झुकणारा आहे. जेवढा मोठा आकडा डाव तितका जास्तं त्या पारड्यात झुकला आहे. -३ म्हणजे काळ्याच्या बाजूला झुकला आहे खूप. +३ म्हणजे पांढर्‍याच्या बाजूला.
  • Log in or register to post comments

सध्या आकडा -०.१ आहे. थोडासा

अनुप ढेरे
Wed, 11/12/2014 - 19:14 नवीन
सध्या आकडा -०.१ आहे. थोडासा काळ्याच्या बाजूला झुकलेला डाव आहे आत्ता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

आयला असंय काय! धन्यवाद!

आदूबाळ
Wed, 11/12/2014 - 20:43 नवीन
आयला असंय काय! धन्यवाद! याचं युनिट काय असतं? लिमिट्स/रेंज काय असते?(उदा. -५ ते +५)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

युनिट असतं का ते नाही माहित,

अनुप ढेरे
Wed, 11/12/2014 - 21:42 नवीन
युनिट असतं का ते नाही माहित, पण युनिटची गरज वाटत नाही. गेल्या म्याचमध्ये ४ वगैरे आकडा बघितला आहे. पण पूर्ण रेंज नाही माहिती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

मारला घोडा कार्लसन ले

केदार-मिसळपाव
Wed, 11/12/2014 - 19:29 नवीन
म्हणजे आता मोहरे कमी करतोय तो.
  • Log in or register to post comments

घोड्याच्या मारामारीनंतर उंट आणला आनंदने पटाच्या मध्यभागी

केदार-मिसळपाव
Wed, 11/12/2014 - 19:40 नवीन
अशक्त चाल म्हणतायेत तज्ञ.
  • Log in or register to post comments

कार्लसन

केदार-मिसळपाव
Wed, 11/12/2014 - 19:46 नवीन
हत्ती अथवा घोडा डी-४ आणणार का? किंवा सी-५ खेळणार?
  • Log in or register to post comments

ड्रा कड़े चालला सामना

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 11/12/2014 - 20:36 नवीन
ड्रा कड़े चालला सामना
  • Log in or register to post comments

आता फक्त एक चान्स असतो तो म्हणजे

संजय क्षीरसागर
Wed, 11/12/2014 - 21:10 नवीन
प्याद्याचा वजीर होईल अशी धमकी. कारण या दोन दिग्गजात केवळ वजीर आणि घोड्यानं मात, आणि ते ही सद्य स्थितीत असंभव आहे. आनंदच्या डी-प्याद्याला बढत शक्य आहे त्यामुळे तो बरोबरी मान्य करणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अधिकच्या वेळेत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 11/12/2014 - 21:31 नवीन
तरी निकाल लागेल का ? प्यादे वजीर होईल हीच धमकी आनन्द देईल ?
  • Log in or register to post comments

त्या एकमेव थ्रेटवर सगळा गेम होता!

संजय क्षीरसागर
Wed, 11/12/2014 - 22:36 नवीन
Anand is happy with the result, Carlsen has nothing to be sorry about, and the match is getting more and more exciting!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

त्या एकमेव थ्रेटवर सगळा गेम

रामपुरी
Wed, 11/12/2014 - 22:41 नवीन
त्या एकमेव थ्रेटवर सगळा गेम होता! :) :) :) अवांतर: इंग्लिश वाक्य ChessDom वरुन चोप्य्पस्ते. ज्याचं श्रेय त्याला द्यायला शिका श्री श्री
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

ब्रोब्री झाली!!

चतुरंग
Wed, 11/12/2014 - 22:39 नवीन
आता खेळानंतरच्या पत्रकारपरिषदेमध्ये खेळीमेळीने डावाचे विश्लेषण सुरु आहे! :) या परिषदेत पत्रकारांनी डोकेबाज प्रश्न विचारायला बंदी असते की काय कोण जाणे? मागे एकाने आनंदला विचारले होते "पुढच्या डावात तुझी स्ट्रॅटेजी काय असेल??: आनंद : "सीरिअसली? डू यू बिलीव दॅट आय शुड डिस्कस धिस हिअर?" डाव जिंकल्यावर किंवा हरल्यावर आता तुला कसं वाटतंय? हा आणखी एक गाढव प्रश्न, अरे कसं वाटणार? ऑब्विअस आहे ना? पण ते एक मस्त मनोरंजन असते यात वाद नाही!
  • Log in or register to post comments

:)

पहाटवारा
Wed, 11/12/2014 - 23:17 नवीन
आनंद मस्त खेचतो.. गॅरी कास्पारोव विचित्र पण भारी बोलतो मुलाखतींमधे.. मागे एक हा संवाद पाहिला होता तूनळीवर जिथे ऊत्तम मुलाखतकारालाहि त्याने एकदम निरुत्तर केले होते .. -पहाटवारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

काय निकाल लागला मॅचचा?

मुक्त विहारि
Wed, 11/12/2014 - 22:54 नवीन
आनंद जिंकला की बरोबरी? आम्हाला फक्त निकालाशी मतलब.
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो, हे कसल काय

गणेशा
गुरुवार, 11/13/2014 - 00:04 नवीन
असेच म्हणतो, हे कसल काय बोलतात कळतच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

आयला ... तुम्ही पण आमच्याच पंथातले दिसताय...

मुक्त विहारि
गुरुवार, 11/13/2014 - 00:32 नवीन
मित्रांबरोबर संगीताच्या कार्यक्रमाला जाणरे आणि तिथे गेल्यानंतर, पुस्तक वाचनांत दंग होणारे... असो, ही सगळी भली मंडळी चर्चा करतात, त्यातल्या खेळीमेळीच्या वातावरणातच आपल्याला रस. बाद्वे...व्यनि केला आअहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

काय निकाल आहे.

जेपी
गुरुवार, 11/13/2014 - 04:46 नवीन
काय निकाल आहे.
  • Log in or register to post comments

तेच तर कुणी सांगत नाही आहे....

मुक्त विहारि
गुरुवार, 11/13/2014 - 04:57 नवीन
असो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

बरोबरी झाली

बहुगुणी
गुरुवार, 11/13/2014 - 04:57 नवीन
दोघांनाही १/२ गुण मिळाला. ४ डावांनंतर प्रत्येकी २ गुण (दोन बरोबरीत सुटले, दोघांनी प्रत्येकी १ डाव जिंकला)
  • Log in or register to post comments

म्हणजे हा डाव बरोबरीत सुटला...

मुक्त विहारि
गुरुवार, 11/13/2014 - 05:00 नवीन
असेच ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

हो

बहुगुणी
गुरुवार, 11/13/2014 - 05:06 नवीन
हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

धन्यवाद...

जेपी
गुरुवार, 11/13/2014 - 06:36 नवीन
धन्यवाद...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा