Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by माम्लेदारचा पन्खा on गुरुवार, 10/23/2014 - 17:01
लेखनविषय (Tags)
मुक्तक
तंत्र
गुंतवणूक
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा
समीक्षा
बातमी
अनुभव
माहिती
चौकशी
मी, माम्लेदारचा पंखा, राहणार ठाणे असे नमूद करतो की दि. १८ ऑक्टोबर २०१४ रोजी नंदी पलेस डोंबिवली येथे संध्याकाळी ७. ३० च्या दरम्यान काही व्यक्ती कट्ट्यासंदर्भात एक गुप्त बैठक करणार आहेत अशी खबर मिळाल्यामुळे मी तिथे साध्या वेशात उपस्थित राहायचे ठरवले. गावठी कट्टे निवडणुकीच्या काळात डोंबिवली कल्याण पट्ट्यात खात्रीलायकरीत्या उपलब्ध असल्यामुळे सावधगिरी म्हणून सदर नमूद ठिकाणी काही गडबड झाल्यास परिस्थिती नियंत्रणाखाली आणणे गरजेचे असल्यामुळे आजूबाजूला किती पोलिसबळ उपलब्ध आहे ह्याची माहिती घेण्यासाठी मी ठरलेल्या वेळेआधी अर्धा तास सदर ठिकाणी पोहोचलो आणि पाहणी केली . सव्वा सातच्या आसपास माझ्या भ्रमणध्वनीवर एक फोन आला आणि रहस्यमय आवाजात "मी कट्ट्याचा आयोजक मुक्त विहारी बोलतोय" असे ते म्हणाले तेव्हा प्रमुख संशयित हीच व्यक्ती असावी ह्याची खात्री पटली. मी गेटवर उभा राहून टेहाळणी करत असता एका एफझी या दुचाकीवरून एक मजबूत बांध्याची आणि एक मध्यम बांध्याची अश्या दोन व्यक्ती माझ्यासमोर आल्या. चौकशीअंती त्यांनी त्यांची नावे अनुक्रमे विनोद १८ आणि मुक्त विहारी अशी सांगितली. अजून एक व्यक्ती नामे टवाळ कार्टा तिथे येणार असल्याचे कळले. अंडरवर्ल्ड मधील लोक हे आपली नावे अशीच ठेवत असल्यामुळे त्यांना त्यांची ओळख लपवणे सोपे जाते. आम्ही नंदी पलेसमध्ये आत जाणार इतक्यात एक काळा शर्ट घातलेली व्यक्ती तिथे आली. सदर व्यक्तीने आपणच टवाळ कार्टा आहे अशी ओळख करून दिली. आजवरच्या माझ्या अनुभवात असे टोपण नाव घेतलेला साधा आणि शांत चेहरा आढळून आलेला नसल्याने थोडे बिचकायला झाले. सर्वांनी आपण इंजिनियर असल्याचे सांगितले. त्यानंतर ह्या "मिपा" टोळीची अधिक माहिती करून घेण्यासाठी मी त्यांच्याबरोबर आत गेलो. एक चांगले टेबल पाहून आम्ही तिथे स्थानापन्न झालो. त्यानंतर लगेचच मुक्त विहारी ह्यांनी नवीन घर विकत घेतलेले असल्यामुळे आजची पार्टी मी देत आहे असे जाहीर केले. मेनू कार्ड पाहून दोन बाटल्या बियर आणि चकणा याची ऑर्डर दिली गेली. मी नॉनवेज खाणारा तसेच बियर पिणारा नाही असे मी जाहीर केले म्हणून माझ्यासाठी सिंड्रेला नावाचे पेय मागवण्यात आले . विनोद १८ वगळता इतर व्यक्तींनी त्यांची नॉनवेजला हरकत नसल्याचे सांगितले. त्यानुसार प्रोन्स कोळीवाडा आणि बेबी कॉर्न पकोडा असे पदार्थ मागवण्यात आले. उपस्थित लोकांमध्ये सुरु असणारे संभाषण मी ऐकत होतो. त्या दरम्यान त्यांचेमध्ये प्यारे १, कंजूस, सुहास झेले, रामदास काका आणि प्रमोद देर्देकर यांची नावे घेण्यात आली तसेच पुढील मे २०१५ मध्ये दीपक कुवेत ही व्यक्ती भारतात येत असल्याचेही कळले याचच अर्थ ह्या टोळीचे हस्तक देशोदेशी पसरलेले असून त्यांचा शोध घेण्यासाठी इंटरपोलची मदत घ्यावी लागेल असे जाणवले . डॉ खरे ही व्यक्ती कट्ट्याला उपस्थित राहणार आहे असे कळल्यावर मी थोडा चपापलो कारण डॉक्टर वगैरे बुद्धीजीवी वर्गातील लोक सहसा अश्या कट्ट्यांना हजेरी लावताना आम्ही कधीच पाहिलेले नाही. पेशंट म्हणून अनेकदा डॉक्टर समोर बसलो आहे पण एका डॉक्टरशी अशा ठिकाणी काय बोलावे ह्याची माहिती नसल्याने थोडी गडबड उडाली. त्यानंतर विनोद १८ आणि मुक्त विहारी ह्यांनी नोकरीनिमित्त परदेशी कसे जावे ह्याबाबत टवाळ कार्टा यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर सौदी अरबीया मध्ये राहण्याचे अनुभव मुक्त विहारी ह्यांनी कथन केले. दरम्यानच्या काळात कुठून तरी विषय भाजपा आणि संघ तसेच इतर राजकीय पक्ष यावर पोहोचला. विनोद १८ आणि मुक्त विहारी ह्यांनी ह्यावरची आपली मते हिरीरीने मांडायला सुरुवात केली आणि एका बाजूला बियरचे ग्लास रिकामे होत होते. सदर ठिकाणी अगोदरच मोठ्या आवाजात कुठल्या तरी लहान मुलाच्या वाढदिवसाची पार्टी सुरु होती आणि त्यात भर म्हणून हॉटेलचे गझल गायक आपली तबला पेटी घेऊन घसा खाकरत गझला गाऊ लागले परंतु जमलेल्या टोळीच्या मंडळींनी त्याहीपेक्षा मोठ्या आवाजात शिरा ताणून आपले म्हणणे मांडणे सुरूच ठेवले परंतु अगदीच अशक्य झाल्यावर त्यांनी हॉटेल म्यानेजरला पाचारण केले आणि आवाजाची पातळी खाली आणण्याचा इशारा दिला पण गझल गायकाने शेवटपर्यंत आमची सुखेनैव साथ दिली. साधारण सव्वा आठच्या सुमारास एक प्रफुल्लीत चेहऱ्याचे व्यक्तिमत्व आमच्या टेबलकडे येताना दिसले. तेच डॉ खरे आहेत असे मुक्त विहारी ह्यांनी सांगितले. डॉ खरे यांच्याबरोबर एक तरतरीत व तेजस्वी चेहऱ्याचा पोरगेलासा तरुण तिथे आला . तो स्पा उर्फ स्पावड्या असल्याचे कळले. हळूहळू गप्पा रंगू लागल्या आणि त्या संध्याकाळी तिथे उपस्थित असणाऱ्या व्यक्ती ह्या केवळ नवीन विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी जमलेल्या असून त्यांचा कोणताही असामाजिक हेतू नाही हे लक्षात आले. दरम्यानच्या काळात बियरची मोजणी करण्याचे काम केव्हाच बाजूला पडले होते आणि माझ्या डाव्या हाताला बसलेल्या मुक्त विहारी ह्यांनी कायमस्वरूपी धुनी पेटवली होती. ह्याचे कारण विचारले असता सौदी अरेबियामध्ये ह्या मुलभूत गरजांवर बंधने येत असल्याचे त्यांनी जड अंतकरणाने सांगितले. पुन्हा एकदा सिंड्रेलाला बैठकीत बोलावले गेले आणि सामिष निरामिष स्टार्टरसुद्धा मागवले गेले . जमलेल्या लोकांनी आपापल्या भ्रमणध्वनित टोळीतील इतर सदस्यांची छायाचित्रे काढली आणि ती प्रकाशित करू असे आश्वासन दिले. थोडा वेळ झाल्यावर स्पाने मला निघायला लागेल असे सांगितले. तो गेल्यानंतर उरलेल्या लोकांनी आपापल्या व्यवसायाचे बरेवाईट अनुभव सांगायला सुरुवात केली. त्यातूनच विषयाला विषय फुटत गेला आणि मैफिल रंगत गेली. सरतेशेवटी दाबून भरलेल्या पोटांमध्ये सिझलर हा प्रकार उतरला आणि मैफिल अंतापर्यंत पोचली असे वाटत असतानाच मुक्त विहारी आणि विनोद १८ यांनी पुन्हा एक बियर येऊ दे अशी इच्छा प्रकट केली आणि तिलाही आसरा दिला. एव्हाना घड्याळात ११. ३० ची वेळ झाली होती. कोण कसे जाणार ह्याची चर्चा करता करता टवाळ कार्टा याने माझ्या दुचाकीवरून येण्याचे मान्य केले. डॉ. नी एफझी आपल्या ताब्यात घेऊन विनोद १८ ह्यांना मागे बसवले आणि प्रमुख आयोजक मुक्त विहारी ह्यांनी प्रायोजित केलेल्या ह्या कट्ट्याबद्दल त्यांचे आभार मानून दोन्ही दुचाक्या नंदी पलेसच्या बाहेर आल्या व आपापल्या मार्गाला लागल्या. कट्ट्याच्या काळात पुढील अनेक कट्ट्यांची आखणी केली गेली असून योग्य वेळ येताच ते जाहीर केले जाईल . मी ह्या कट्ट्याचा सदस्य होण्याचे मान्य व कबूल केले असून कट्ट्याच्या वाढीसाठी योग्य ते प्रयत्न केले जातील ह्याची हमी देतो. तरी दि १८ ऑक्टोबर रोजी डोंबिवली येथे घडलेल्या कट्ट्याचा हा पंचनामा लिहिण्यात येत आहे . मिपाटोळीतील प्रत्येक सदस्याला त्याची एक स्थळप्रत सूचना व टिपण्णी साठी आज दि २३ ऑक्टोबर २०१४ रोजी मिपा संस्थळ येथे देण्यात येत आहे. सही माम्लेदारचा पन्खा
  • Log in or register to post comments
  • 29074 views

प्रतिक्रिया

Submitted by मोहनराव on Fri, 10/24/2014 - 18:37

Permalink

लय भारी पंचनामा!!

लय भारी पंचनामा!!
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 10/24/2014 - 19:55

Permalink

मस्त व्रुतांत...

ह्याला म्हणातात डोंबोली कट्टा.... आमच्या कट्ट्याला हजेरी न लावता पण कंजूस ह्यांनी फोटू डकवलेच... एक-मेका सहाय्य करू. अवघे धरू सुपंथ...
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Sun, 10/26/2014 - 22:50

In reply to मस्त व्रुतांत... by मुक्त विहारि

Permalink

कलियुगात अशी मैत्री फक्त

कलियुगात अशी मैत्री फक्त डोंबिवलीकर दाखवू शकतात असे माझे निरीक्षण वजा मत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by भाते on Fri, 10/24/2014 - 20:03

Permalink

अरेरे!

कुठे नेऊन ठेवला आहे कट्टा मिपाचा? खादाडीचा एकही फोटो नाही? :( सगळ्या बश्या रिकाम्या आणि अर्धे पेले रिकामे! तेसुध्दा मिपा कट्टा आयोजक आणि नियमित कट्टेकरी असताना? जळजळ होणारे खादाडीचे फोटो टाकल्याशिवाय मिपा कट्टा पुर्ण होत नाही! किमान ती 'सिंड्रेला' तरी दाखवायची होती! :) फोटो बहुदा शेवटीला कट्टा संपताना काढला असावा असा दाट संशय आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by माम्लेदारचा पन्खा on Fri, 10/24/2014 - 20:46

In reply to अरेरे! by भाते

Permalink

नाही हो...हा मध्यावधी फोटो आहे....

इनो नसल्यामुळे जळजळ करायला लावणारे फोटो काढले नाहीत... आणि तसेही इथे कोणीही दुष्काळग्रस्त कट्टेकरी नसल्याने खाऊचे फोटो कटाप !
  • Log in or register to post comments

Submitted by माम्लेदारचा पन्खा on Fri, 10/24/2014 - 20:47

In reply to अरेरे! by भाते

Permalink

नाही हो...हा मध्यावधी फोटो आहे....

इनो नसल्यामुळे जळजळ करायला लावणारे फोटो काढले नाहीत... आणि तसेही इथे कोणीही दुष्काळग्रस्त कट्टेकरी नसल्याने खाऊचे फोटो कटाप !
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 10/24/2014 - 23:05

In reply to अरेरे! by भाते

Permalink

कुठे नेऊन ठेवला आहे कट्टा

कुठे नेऊन ठेवला आहे कट्टा मिपाचा? खादाडीचा एकही फोटो नाही? Sad सगळ्या बश्या रिकाम्या आणि अर्धे पेले रिकामे! तेसुध्दा मिपा कट्टा आयोजक आणि नियमित कट्टेकरी असताना? जळजळ होणारे खादाडीचे फोटो टाकल्याशिवाय मिपा कट्टा पुर्ण होत नाही! किमान ती 'सिंड्रेला' तरी दाखवायची होती! Smile फोटो बहुदा शेवटीला कट्टा संपताना काढला असावा असा दाट संशय आहे.
जीधर हम खाने बैठते है...उधर भरी हुई डिश २ मिनीटमे खाली हो जाती है ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देर्देकर on Fri, 10/24/2014 - 20:24

Permalink

ट्का म्हणे झालो पावन

ट्का म्हणे झालो पावन स्पाडुरंग तो प्रकटला , सतेज कांती अंगी तरतरी नंदी पॅलेस तो उजळला, स्वेतपत्रध्रुम्रपानगंडिका अन पक्षीतीर्था समावेत अजब तो चैतन्य सोहळा रंगला अजब तो चैतन्य सोहळा रंगला
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 10/24/2014 - 20:27

In reply to ट्का म्हणे झालो पावन by प्रमोद देर्देकर

Permalink

खल्लास !!

खल्लास !! =))))
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Fri, 10/24/2014 - 20:42

In reply to खल्लास !! by सूड

Permalink

कटटयाला न जाता, एव्हढे का

कटटयाला न जाता, एव्हढे का चेकाळता? बाकी तुमच्या या प्रतिसादाच्या निमित्ताने मिपावर अजून एक जिवाभावाच्या मित्रांची जोडी आहे असे जाणवते.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 10/24/2014 - 21:01

In reply to कटटयाला न जाता, एव्हढे का by सतिश गावडे

Permalink

मिपावर अजून एक जिवाभावाच्या मित्रांची जोडी आहे

+ १... अवघे मिपाच एका कुटुंबासारखे आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Fri, 10/24/2014 - 21:12

In reply to मिपावर अजून एक जिवाभावाच्या मित्रांची जोडी आहे by मुक्त विहारि

Permalink

ड्वाले पानावले. तो

ड्वाले पानावले. तो कोल्ड्रींगचा गलास द्या मना.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 10/24/2014 - 22:03

In reply to ड्वाले पानावले. तो by सतिश गावडे

Permalink

ड्वाले पानावले.

ह्या बाकी खरा !!
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Sat, 10/25/2014 - 00:39

In reply to मिपावर अजून एक जिवाभावाच्या मित्रांची जोडी आहे by मुक्त विहारि

Permalink

आजपासून मुविकाकान्ना मिपाचे

आजपासून मुविकाकान्ना मिपाचे नविन भासं म्हणावे असा प्रस्ताव मांडतो.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 10/24/2014 - 21:02

In reply to कटटयाला न जाता, एव्हढे का by सतिश गावडे

Permalink

>>बाकी तुमच्या या

>>बाकी तुमच्या या प्रतिसादाच्या निमित्ताने मिपावर अजून एक जिवाभावाच्या मित्रांची जोडी आहे असे जाणवते. हो आहे. तुमच्याकडे इनो आहे, की पाठवू?? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Fri, 10/24/2014 - 21:11

In reply to >>बाकी तुमच्या या by सूड

Permalink

इनोची आवश्यकता नाही दादा.

इनोची आवश्यकता नाही दादा. माझी जळजळ होत आहे असा समज का बरे झाला तुमचा? तुमच्या प्रतिसादाच्या निमित्ताने अजून एकाच्या "जिवाभावाच्या" मित्रांच्या जोडीची आठवण झाली. जी फॉर जिवाभावाचा. :)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 10/24/2014 - 22:04

In reply to इनोची आवश्यकता नाही दादा. by सतिश गावडे

Permalink

>>जी फॉर जिवाभावाचा कळ्ळं !!

>>जी फॉर जिवाभावाचा कळ्ळं !!
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 10/24/2014 - 21:03

In reply to ट्का म्हणे झालो पावन by प्रमोद देर्देकर

Permalink

@ पम्या....

मस्त काव्य...
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 10/24/2014 - 22:46

In reply to ट्का म्हणे झालो पावन by प्रमोद देर्देकर

Permalink

(No subject)

=))
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Fri, 10/24/2014 - 21:43

Permalink

त्या संध्याकाळी तिथे उपस्थित

त्या संध्याकाळी तिथे उपस्थित असणाऱ्या व्यक्ती ह्या केवळ नवीन विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी जमलेल्या असून त्यांचा कोणताही असामाजिक हेतू नाही हे लक्षात आले.
अर्रर्रर्र... म्हणजे तुम्हाला त्यांची कोड ल्यांग्वेज कळली नाही असं दिसतंय. तुमच्यासारख्या मुरब्बी शीआयडीचा या लोकांनी अगदीच ट्र्याफिक पोलिस मामा केला की बरोब्बर! पंचनाम्याच्या ष्टाइलमधला लेख भारी आवडला हेवेसांनलगे.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Fri, 10/24/2014 - 22:49

Permalink

अन्गाशी!!

अन्गाशी!! आता कसं फोटु बगून गार्गार झालो. माप आनि टका यांचे दर्शन होउन, अजी म्या धन्य जाहलो.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Fri, 10/24/2014 - 23:09

In reply to अन्गाशी!! by खटपट्या

Permalink

राजापूरकर...

अन्गाशी!!
हा शब्द हांगाशी (मुळ शब्द बहुतेक हांग आश्शी - आता कसं) असा आहे. उगाच काहितरी अंगाशी चिकटवू नका. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 10/24/2014 - 23:32

In reply to राजापूरकर... by सतिश गावडे

Permalink

चला नदीकाठचं वारं लागलं

चला नदीकाठचं वारं लागलं म्हणायचं !! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Sat, 10/25/2014 - 03:27

In reply to राजापूरकर... by सतिश गावडे

Permalink

हान्गाशी !!

हान्गाशी !!
  • Log in or register to post comments

Submitted by मनिमौ on Fri, 10/24/2014 - 23:16

Permalink

छान

+१११॑
  • Log in or register to post comments

Submitted by स्पार्टाकस on Sat, 10/25/2014 - 02:26

Permalink

लय झ्याक...!!!

लय झ्याक...!!!
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Sat, 10/25/2014 - 05:30

Permalink

काही उणीवा पंचनाम्यातील..

मुक्त विहारी यांचा उल्लेख मुखिया बिहारी उर्फ कट्टा डॉन असा हवा ! तसेच नंदी प्यालेस हे डोंबोली टेशनाचा उतरेस किती मीटर्स वगैरे मीटर फुटातील माहिती पंचनाम्यात आवश्यक. नक्की किती नंबरचे टेबल मिपा ग्यांगने पकडले. बिअरच्या किती बाटल्या रिचवल्या असे तपशील गाळून पंचनाम्यात मुद्दाम लूपहोल ठेवण्यात आली की काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sat, 10/25/2014 - 09:59

Permalink

मुक्त विहारी यांचा उल्लेख

मुक्त विहारी यांचा उल्लेख मुखिया बिहारी उर्फ कट्टा डॉन असा हवा
+१
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Sat, 10/25/2014 - 13:49

In reply to मुक्त विहारी यांचा उल्लेख by टवाळ कार्टा

Permalink

प्रचंड सहमत...

चौराकाका (खरं तर म्हातारा असं लिहायची खुप इच्छा होते. ;) ) केव्हा केव्हा असा सिक्सर मारतात की चेंडू सीमापार जातो.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Sun, 10/26/2014 - 14:22

In reply to प्रचंड सहमत... by सतिश गावडे

Permalink

म्हणजे

केव्हा केव्हा असा सिक्सर मारतात की चेंडू सीमापार जातो. आरं तिज्या मारी म्हणजे सीमापार चेडू न जाणारा सिक्सर कधी कधी म्हातारा मारतो असा याचा अर्थ होतो. कंच्या परकारचा शिक्सर हाय वो हा गावडेसाहेब ? आम्हाला तर फकस्त दोराच्या पलिकड जाणारा शिक्सरच ठाव हाय !
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Sun, 10/26/2014 - 16:02

In reply to म्हणजे by चौकटराजा

Permalink

गडबड झाली...

ते चेंडू "सीमापार जातो" च्या ऐवजी "प्रेक्षकांच्या बैठक व्यवस्थेत जातो" असे वाचावे. "चेंडू सीमापार गेला" असं कुठंतरी वाचलं असणार मी. मला स्वतःला क्रिकेटमध्ये काडीइतकाही रस नाही. :)
  • Log in or register to post comments

Submitted by माम्लेदारचा पन्खा on Sun, 10/26/2014 - 16:33

In reply to गडबड झाली... by सतिश गावडे

Permalink

स गा....हे वर लिहिलेलं

ऊर्दूतल्या "तशरीफ" चं भाषांतर नसावं अशी आशा व्यक्त करतो...
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sun, 10/26/2014 - 17:29

In reply to स गा....हे वर लिहिलेलं by माम्लेदारचा पन्खा

Permalink

आणखी कोणत्या भाषेत "तशरीफ" हा

आणखी कोणत्या भाषेत "तशरीफ" हा शब्द आहे??? :)
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on Sat, 10/25/2014 - 18:23

Permalink

बिना पोटपूजा (डिनर) हे मुंबे

बिना पोटपूजा (डिनर) हे मुंबे वाले कट्टा कसा काय करतात, रात्री ११.३० पर्यंत उपाशी कसे काय राहिले, (नुसत्या स्टार्टर वर) हे तंत्र कसं जमल. आमाला नाय जमणार असल्या कट्या मंदी येण. मुंबे ला कुणा नातलगा कडे जेवायला जाऊ नका का म्हणता आता कळले. *crazy* *CRAZY* :crazy:*crazy* *CRAZY* :crazy:
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sun, 10/26/2014 - 00:00

In reply to बिना पोटपूजा (डिनर) हे मुंबे by विवेकपटाईत

Permalink

आमची खादाडी ७:३० pm ते ११:३०

आमची खादाडी ७:३० pm ते ११:३० pm सुरुच होती रच्याकने....तुमी पुण्याचे का? :P
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक.कुवेत on Sun, 10/26/2014 - 19:25

Permalink

हा हा हा

कट्टा आणि आणि त्याचा नव्या अवतारातला वृत्तांत एकदम फर्मास जमलाय. नंदि पॅलेस आणि तिथलं वर्णन वाचून मागच्या कट्ट्याच्या सुखद आठवणी एका क्षणात डोळ्यासमोरुन तरळून गेल्या.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 10/26/2014 - 20:41

In reply to हा हा हा by दिपक.कुवेत

Permalink

कधी येताय...

मस्त महिनाभर कट्टा करू.....
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sun, 10/26/2014 - 21:59

In reply to कधी येताय... by मुक्त विहारि

Permalink

स्टॉक मिळाला वाट्टे

स्टॉक मिळाला वाट्टे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 10/26/2014 - 22:29

In reply to स्टॉक मिळाला वाट्टे by टवाळ कार्टा

Permalink

अरे बाबा

दिपक आणि मी एकाच पेय-कुळातले.... आम्हाला स्टॉकची कय गरज?
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sun, 10/26/2014 - 22:38

In reply to अरे बाबा by मुक्त विहारि

Permalink

(No subject)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार कात्रे on Sun, 10/26/2014 - 23:23

Permalink

लै भारी

लै भारी पन्चनामा डब्बल लै भारी फटु
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 10/27/2014 - 14:03

Permalink

९८

९८
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 10/27/2014 - 14:08

Permalink

९९

९९
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 10/27/2014 - 14:15

In reply to ९९ by मुक्त विहारि

Permalink

१००

१००
  • Log in or register to post comments

Submitted by माम्लेदारचा पन्खा on Mon, 10/27/2014 - 14:21

In reply to १०० by अत्रुप्त आत्मा

Permalink

चेंडू हातानं उचलून दोरी पार....

१०१.... बुवा.... दक्षिणा घ्या....
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Mon, 10/27/2014 - 15:08

In reply to चेंडू हातानं उचलून दोरी पार.... by माम्लेदारचा पन्खा

Permalink

शिंच्यानो, नुसते आकडे काय

शिंच्यानो, नुसते आकडे काय लिहिता प्रतिसादात? धाग्यावर अवांतर करुन प्रतिसादांची संख्या कशी वाढवावी हे काय आता तुम्हाला नव्याने शिकवायला हवे का?
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 10/27/2014 - 16:39

In reply to चेंडू हातानं उचलून दोरी पार.... by माम्लेदारचा पन्खा

Permalink

@दक्षिणा घ्या.... >>>

@दक्षिणा घ्या.... >>> दीर्घायुष्य मस्तू।। दक्षिणा: पांतू बहुधेयं चास्तु।। ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Mon, 10/27/2014 - 16:46

In reply to @दक्षिणा घ्या.... >>> by अत्रुप्त आत्मा

Permalink

इथेही यमक जुळवले.

इथेही यमक जुळवले.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 10/27/2014 - 16:47

In reply to इथेही यमक जुळवले. by सतिश गावडे

Permalink

अगदी अगदी...फक्त ते 'तू' ऐवजी

अगदी अगदी...फक्त ते 'तू' ऐवजी 'तु' पाहिजे सर्वत्र.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Mon, 10/27/2014 - 16:52

In reply to अगदी अगदी...फक्त ते 'तू' ऐवजी by बॅटमॅन

Permalink

मस्तु म्हणजे "म: अस्तु" का?

मस्तु म्हणजे "म: अस्तु" का? तसं असेल तर म: चा अर्थ काय?
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com