✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

डोंबिवली कट्टा पंचनामा

म
माम्लेदारचा पन्खा यांनी
गुरुवार, 10/23/2014 - 17:01  ·  लेख
लेख
मी, माम्लेदारचा पंखा, राहणार ठाणे असे नमूद करतो की दि. १८ ऑक्टोबर २०१४ रोजी नंदी पलेस डोंबिवली येथे संध्याकाळी ७. ३० च्या दरम्यान काही व्यक्ती कट्ट्यासंदर्भात एक गुप्त बैठक करणार आहेत अशी खबर मिळाल्यामुळे मी तिथे साध्या वेशात उपस्थित राहायचे ठरवले. गावठी कट्टे निवडणुकीच्या काळात डोंबिवली कल्याण पट्ट्यात खात्रीलायकरीत्या उपलब्ध असल्यामुळे सावधगिरी म्हणून सदर नमूद ठिकाणी काही गडबड झाल्यास परिस्थिती नियंत्रणाखाली आणणे गरजेचे असल्यामुळे आजूबाजूला किती पोलिसबळ उपलब्ध आहे ह्याची माहिती घेण्यासाठी मी ठरलेल्या वेळेआधी अर्धा तास सदर ठिकाणी पोहोचलो आणि पाहणी केली . सव्वा सातच्या आसपास माझ्या भ्रमणध्वनीवर एक फोन आला आणि रहस्यमय आवाजात "मी कट्ट्याचा आयोजक मुक्त विहारी बोलतोय" असे ते म्हणाले तेव्हा प्रमुख संशयित हीच व्यक्ती असावी ह्याची खात्री पटली. मी गेटवर उभा राहून टेहाळणी करत असता एका एफझी या दुचाकीवरून एक मजबूत बांध्याची आणि एक मध्यम बांध्याची अश्या दोन व्यक्ती माझ्यासमोर आल्या. चौकशीअंती त्यांनी त्यांची नावे अनुक्रमे विनोद १८ आणि मुक्त विहारी अशी सांगितली. अजून एक व्यक्ती नामे टवाळ कार्टा तिथे येणार असल्याचे कळले. अंडरवर्ल्ड मधील लोक हे आपली नावे अशीच ठेवत असल्यामुळे त्यांना त्यांची ओळख लपवणे सोपे जाते. आम्ही नंदी पलेसमध्ये आत जाणार इतक्यात एक काळा शर्ट घातलेली व्यक्ती तिथे आली. सदर व्यक्तीने आपणच टवाळ कार्टा आहे अशी ओळख करून दिली. आजवरच्या माझ्या अनुभवात असे टोपण नाव घेतलेला साधा आणि शांत चेहरा आढळून आलेला नसल्याने थोडे बिचकायला झाले. सर्वांनी आपण इंजिनियर असल्याचे सांगितले. त्यानंतर ह्या "मिपा" टोळीची अधिक माहिती करून घेण्यासाठी मी त्यांच्याबरोबर आत गेलो. एक चांगले टेबल पाहून आम्ही तिथे स्थानापन्न झालो. त्यानंतर लगेचच मुक्त विहारी ह्यांनी नवीन घर विकत घेतलेले असल्यामुळे आजची पार्टी मी देत आहे असे जाहीर केले. मेनू कार्ड पाहून दोन बाटल्या बियर आणि चकणा याची ऑर्डर दिली गेली. मी नॉनवेज खाणारा तसेच बियर पिणारा नाही असे मी जाहीर केले म्हणून माझ्यासाठी सिंड्रेला नावाचे पेय मागवण्यात आले . विनोद १८ वगळता इतर व्यक्तींनी त्यांची नॉनवेजला हरकत नसल्याचे सांगितले. त्यानुसार प्रोन्स कोळीवाडा आणि बेबी कॉर्न पकोडा असे पदार्थ मागवण्यात आले. उपस्थित लोकांमध्ये सुरु असणारे संभाषण मी ऐकत होतो. त्या दरम्यान त्यांचेमध्ये प्यारे १, कंजूस, सुहास झेले, रामदास काका आणि प्रमोद देर्देकर यांची नावे घेण्यात आली तसेच पुढील मे २०१५ मध्ये दीपक कुवेत ही व्यक्ती भारतात येत असल्याचेही कळले याचच अर्थ ह्या टोळीचे हस्तक देशोदेशी पसरलेले असून त्यांचा शोध घेण्यासाठी इंटरपोलची मदत घ्यावी लागेल असे जाणवले . डॉ खरे ही व्यक्ती कट्ट्याला उपस्थित राहणार आहे असे कळल्यावर मी थोडा चपापलो कारण डॉक्टर वगैरे बुद्धीजीवी वर्गातील लोक सहसा अश्या कट्ट्यांना हजेरी लावताना आम्ही कधीच पाहिलेले नाही. पेशंट म्हणून अनेकदा डॉक्टर समोर बसलो आहे पण एका डॉक्टरशी अशा ठिकाणी काय बोलावे ह्याची माहिती नसल्याने थोडी गडबड उडाली. त्यानंतर विनोद १८ आणि मुक्त विहारी ह्यांनी नोकरीनिमित्त परदेशी कसे जावे ह्याबाबत टवाळ कार्टा यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर सौदी अरबीया मध्ये राहण्याचे अनुभव मुक्त विहारी ह्यांनी कथन केले. दरम्यानच्या काळात कुठून तरी विषय भाजपा आणि संघ तसेच इतर राजकीय पक्ष यावर पोहोचला. विनोद १८ आणि मुक्त विहारी ह्यांनी ह्यावरची आपली मते हिरीरीने मांडायला सुरुवात केली आणि एका बाजूला बियरचे ग्लास रिकामे होत होते. सदर ठिकाणी अगोदरच मोठ्या आवाजात कुठल्या तरी लहान मुलाच्या वाढदिवसाची पार्टी सुरु होती आणि त्यात भर म्हणून हॉटेलचे गझल गायक आपली तबला पेटी घेऊन घसा खाकरत गझला गाऊ लागले परंतु जमलेल्या टोळीच्या मंडळींनी त्याहीपेक्षा मोठ्या आवाजात शिरा ताणून आपले म्हणणे मांडणे सुरूच ठेवले परंतु अगदीच अशक्य झाल्यावर त्यांनी हॉटेल म्यानेजरला पाचारण केले आणि आवाजाची पातळी खाली आणण्याचा इशारा दिला पण गझल गायकाने शेवटपर्यंत आमची सुखेनैव साथ दिली. साधारण सव्वा आठच्या सुमारास एक प्रफुल्लीत चेहऱ्याचे व्यक्तिमत्व आमच्या टेबलकडे येताना दिसले. तेच डॉ खरे आहेत असे मुक्त विहारी ह्यांनी सांगितले. डॉ खरे यांच्याबरोबर एक तरतरीत व तेजस्वी चेहऱ्याचा पोरगेलासा तरुण तिथे आला . तो स्पा उर्फ स्पावड्या असल्याचे कळले. हळूहळू गप्पा रंगू लागल्या आणि त्या संध्याकाळी तिथे उपस्थित असणाऱ्या व्यक्ती ह्या केवळ नवीन विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी जमलेल्या असून त्यांचा कोणताही असामाजिक हेतू नाही हे लक्षात आले. दरम्यानच्या काळात बियरची मोजणी करण्याचे काम केव्हाच बाजूला पडले होते आणि माझ्या डाव्या हाताला बसलेल्या मुक्त विहारी ह्यांनी कायमस्वरूपी धुनी पेटवली होती. ह्याचे कारण विचारले असता सौदी अरेबियामध्ये ह्या मुलभूत गरजांवर बंधने येत असल्याचे त्यांनी जड अंतकरणाने सांगितले. पुन्हा एकदा सिंड्रेलाला बैठकीत बोलावले गेले आणि सामिष निरामिष स्टार्टरसुद्धा मागवले गेले . जमलेल्या लोकांनी आपापल्या भ्रमणध्वनित टोळीतील इतर सदस्यांची छायाचित्रे काढली आणि ती प्रकाशित करू असे आश्वासन दिले. थोडा वेळ झाल्यावर स्पाने मला निघायला लागेल असे सांगितले. तो गेल्यानंतर उरलेल्या लोकांनी आपापल्या व्यवसायाचे बरेवाईट अनुभव सांगायला सुरुवात केली. त्यातूनच विषयाला विषय फुटत गेला आणि मैफिल रंगत गेली. सरतेशेवटी दाबून भरलेल्या पोटांमध्ये सिझलर हा प्रकार उतरला आणि मैफिल अंतापर्यंत पोचली असे वाटत असतानाच मुक्त विहारी आणि विनोद १८ यांनी पुन्हा एक बियर येऊ दे अशी इच्छा प्रकट केली आणि तिलाही आसरा दिला. एव्हाना घड्याळात ११. ३० ची वेळ झाली होती. कोण कसे जाणार ह्याची चर्चा करता करता टवाळ कार्टा याने माझ्या दुचाकीवरून येण्याचे मान्य केले. डॉ. नी एफझी आपल्या ताब्यात घेऊन विनोद १८ ह्यांना मागे बसवले आणि प्रमुख आयोजक मुक्त विहारी ह्यांनी प्रायोजित केलेल्या ह्या कट्ट्याबद्दल त्यांचे आभार मानून दोन्ही दुचाक्या नंदी पलेसच्या बाहेर आल्या व आपापल्या मार्गाला लागल्या. कट्ट्याच्या काळात पुढील अनेक कट्ट्यांची आखणी केली गेली असून योग्य वेळ येताच ते जाहीर केले जाईल . मी ह्या कट्ट्याचा सदस्य होण्याचे मान्य व कबूल केले असून कट्ट्याच्या वाढीसाठी योग्य ते प्रयत्न केले जातील ह्याची हमी देतो. तरी दि १८ ऑक्टोबर रोजी डोंबिवली येथे घडलेल्या कट्ट्याचा हा पंचनामा लिहिण्यात येत आहे . मिपाटोळीतील प्रत्येक सदस्याला त्याची एक स्थळप्रत सूचना व टिपण्णी साठी आज दि २३ ऑक्टोबर २०१४ रोजी मिपा संस्थळ येथे देण्यात येत आहे. सही माम्लेदारचा पन्खा
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
तंत्र
गुंतवणूक
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा
समीक्षा
बातमी
अनुभव
माहिती
चौकशी

प्रतिक्रिया द्या
29074 वाचन

💬 प्रतिसाद (110)

प्रतिक्रिया

पंचनामा मस्त आहे

टवाळ कार्टा
गुरुवार, 10/23/2014 - 17:49 नवीन
पंचनामा मस्त आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

फोटू

कपिलमुनी
गुरुवार, 10/23/2014 - 17:33 नवीन
संशयित इसमांचे फोटो वाँटेड म्हणून छापावेत . अशी विनंती
  • Log in or register to post comments

पंचनाम्याचे फटू कुठे आहेत?

यसवायजी
गुरुवार, 10/23/2014 - 17:37 नवीन
पंचनाम्याचे फटू कुठे आहेत?
  • Log in or register to post comments

सहमत

चिंतामणी
Fri, 10/24/2014 - 13:23 नवीन
फटूशिवाय रिपोर्ट टाकल्याबद्दल सं.मं.ने कारवाई करावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

क्या बात हैं

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 10/23/2014 - 17:57 नवीन
आजवर इतके वृत्तांत वाचले पण या वृत्तांताचा अंदाज काही निराळाच :-) . फटु येऊद्या.
  • Log in or register to post comments

कट्टा

हरकाम्या
गुरुवार, 10/23/2014 - 17:57 नवीन
फोटु टाकल्याशिवायय्हा पंचनामा " ग्राह्य " धरला जाणार नाही.याची पंख्याने नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments

फटु आमच्याकडं न्हायती....

माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 10/23/2014 - 18:01 नवीन
स्पावड्या धाव रे.... फटु लाव रे....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरकाम्या

तुझ्या "ते" चे कित्ती गुन गाव

टवाळ कार्टा
गुरुवार, 10/23/2014 - 18:24 नवीन
तुझ्या "ते" चे कित्ती गुन गाव रे...मोब्ल्यातल्यां फोटुंचे दर्शन धाव रे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

झक्कास लिहिलंय.

आदूबाळ
गुरुवार, 10/23/2014 - 18:04 नवीन
झक्कास लिहिलंय. तरी "असामी" आणि "नग" हे दोन खास पंचनामा फेम शब्द नसल्याने णिषेढ.
  • Log in or register to post comments

व्हय...

माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 10/23/2014 - 18:07 नवीन
पन हा पोलिस पाट्लाने पंचनामा हाय....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

पंचनामा आवडला

बहुगुणी
गुरुवार, 10/23/2014 - 18:07 नवीन
पण हल्ली व्हिडिओ रेकॉर्डेड पंचनामा आवश्यक आहे म्हणे, तो केला असेलच, येऊ देत; तो या टोळीबाहेर जाणार नाही याची टोळीवाले काळजी घेतीलच!
  • Log in or register to post comments

हा हा हा. झकास फटाके, तडतड्या

रेवती
गुरुवार, 10/23/2014 - 18:07 नवीन
हा हा हा. झकास फटाके, तडतड्या, फुलबाज्या........
  • Log in or register to post comments

भारीच. आता फोटो येऊ द्या

सतिश गावडे
गुरुवार, 10/23/2014 - 18:50 नवीन
भारीच. आता फोटो येऊ द्या प्रतिसादांमध्ये.
  • Log in or register to post comments

काही खबरे येताहेत या भीतीने

कंजूस
गुरुवार, 10/23/2014 - 19:09 नवीन
काही खबरे येताहेत या भीतीने सराईत गुंडांनी टांग मारली की काय ?
  • Log in or register to post comments

गुंडांचे "सरदार"तर आलेले

टवाळ कार्टा
गुरुवार, 10/23/2014 - 19:16 नवीन
गुंडांचे "सरदार"तर आलेले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

झकास

निनाद मुक्काम …
गुरुवार, 10/23/2014 - 19:16 नवीन
झकास
  • Log in or register to post comments

पंचनामा आवडला!

भाते
गुरुवार, 10/23/2014 - 19:55 नवीन
पंचनाम्याचा शाब्दिक मजकुर आवडला. संशयितांच्या फोटोशिवाय पंचनामा ग्राह्य धरण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. :) मुक्तविहारी, नविन घरापध्दल हार्दिक अभिनंदन. नविन घर डोंबिवलीतच आहे ना? मिपाचा एक महत्वाचा मध्यवर्ती डोंबिवलीकर आणि कट्टा नियोजन अधिकारी कमी व्हायला नको! :)
  • Log in or register to post comments

मस्त पंचनामा. तेव्हढं

शिद
गुरुवार, 10/23/2014 - 19:57 नवीन
मस्त पंचनामा. तेव्हढं कट्ट्याला हजर असलेल्या संशयितांचे फोटो डकवून मिपाकरांना उपकृत करा.
  • Log in or register to post comments

कट्ट्याला "संशयित" नाही तर

टवाळ कार्टा
गुरुवार, 10/23/2014 - 20:11 नवीन
कट्ट्याला "संशयित" नाही तर "पंच" होते "पंच"नामा करायला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद

(No subject)

शिद
गुरुवार, 10/23/2014 - 22:32 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हाहा ,साॅलिड ईष्टाईल मधला

स्पा
गुरुवार, 10/23/2014 - 20:02 नवीन
हाहा ,साॅलिड ईष्टाईल मधला व्रुतांत, मान गये मा.प. ;-) बाय द वे फोटो विनोद यांच्या मोबिल मध्ये आहेत, मी फक्त क्लिक केलेले :-D
  • Log in or register to post comments

आरारारा....

माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 10/23/2014 - 20:05 नवीन
सगळ्या टोळीबांधवांना णम्र इणंती की फटुसाठी स्पावड्या ह्यांस संपर्क करा वा. स्पाराव....करा बुवा काहीतरी... समन्स बजावलय सगळ्यांनी !
  • Log in or register to post comments

अरं द्येवा..... ईनोदराव....!

माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 10/23/2014 - 20:08 नवीन
आता कुटं शोदायचं त्यास्नी?.... फटु फटु करत बसलेत की वो सगळे हकडं !
  • Log in or register to post comments

आवडला..

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 10/23/2014 - 20:11 नवीन
कार्यबाहुल्ल्यामुळे कट्ट्याला हजेरी लावता आली नाही ह्याची मनाला आवश्यक तेवढी खंत आहेच. कट्टा वृत्तांताचा (आय मीन, पंचनाम्याचा) नवा अविष्कार कौतुकास्पद आहे. मुविंचा मुक्काम किती दिवस भारतात आहे?
  • Log in or register to post comments

मस्त कट्टा वृत्तांत.

प्रचेतस
गुरुवार, 10/23/2014 - 20:22 नवीन
मस्त कट्टा वृत्तांत.
  • Log in or register to post comments

पंचनामा आवड्ला.

खेडूत
गुरुवार, 10/23/2014 - 20:33 नवीन
पंचनामा आवड्ला. त्ये फटुवाल्याना जरा हुड्का की पट्पट!
  • Log in or register to post comments

फोटो ??

सूड
गुरुवार, 10/23/2014 - 21:27 नवीन
फोटो ??
  • Log in or register to post comments

पंचनाम्याचे पुरावे म्हणून

पिंगू
गुरुवार, 10/23/2014 - 22:01 नवीन
पंचनाम्याचे पुरावे म्हणून फोटो असावेत हा नियम आहे. तेव्हा पंचनामा असा ग्राह्य धरता येणार नाही.. :) होऊ दे खर्च, येऊ दे फोटो..
  • Log in or register to post comments

फोटो आल्याशीवाय प्रतिक्रिया

खटपट्या
गुरुवार, 10/23/2014 - 22:11 नवीन
फोटो आल्याशीवाय प्रतिक्रिया देनार नाय !!
  • Log in or register to post comments

लै भारी इष्टाईलमधला

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 10/23/2014 - 23:10 नवीन
लै भारी इष्टाईलमधला कट्टापंचनामा जंक्शन आवडला आहे जाहीर करण्यास आम्हाला मनापासून आनंद होत आहे. *ok* प्रंतू फोटूचा पुरावा दाबून ठेवल्याने कोर्ट नाराज आहे... तो पुरावा त्वरीत सादर करून वाचकांना जळवावे असा आदेश कोर्ट देत आहे. *dirol*
  • Log in or register to post comments

फर्मास पंचनामा ! माम्लेदारचा

चौथा कोनाडा
गुरुवार, 10/23/2014 - 23:13 नवीन
फर्मास पंचनामा ! माम्लेदारचा पन्खा यांची ही स्टायल लैच आवडली. हा झणझणीत कट्टावृतांत खाऊन आय मीन वाचून दिवाळी सत्कारणी लागली !
  • Log in or register to post comments

मस्त

नंदन
गुरुवार, 10/23/2014 - 23:23 नवीन
पंचनामा आवडला. फोटूही येऊद्या शक्य झाल्यास.
डॉ खरे यांच्याबरोबर एक तरतरीत व तेजस्वी चेहऱ्याचा पोरगेलासा तरुण तिथे आला . तो स्पा उर्फ स्पावड्या असल्याचे कळले
स्पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती! :)
  • Log in or register to post comments

अगागागागा --/\--

स्पा
Fri, 10/24/2014 - 08:03 नवीन
अगागागागा --/\--
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

रत्नकिळ फांकती प्रभा!!

सूड
Fri, 10/24/2014 - 10:36 नवीन
एकच नंबर !! =)))) उजवाडच पडलो असणार थंय!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

लई भारी!

बोका-ए-आझम
गुरुवार, 10/23/2014 - 23:24 नवीन
लई भारी!
  • Log in or register to post comments

लई भारी!

बोका-ए-आझम
गुरुवार, 10/23/2014 - 23:24 नवीन
लई भारी!
  • Log in or register to post comments

हाहा!

पैसा
गुरुवार, 10/23/2014 - 23:35 नवीन
मस्त लिहिलंय! फोटो घेऊन ते शिवराम गोविंद कुठं फरारी झालंय त्याला आधी हुडका!
  • Log in or register to post comments

@तसेच पुढील मे २०१५ मध्ये

अत्रुप्त आत्मा
Fri, 10/24/2014 - 00:55 नवीन
@तसेच पुढील मे २०१५ मध्ये दीपक कुवेत ही व्यक्ती भारतात येत असल्याचेही कळले >>> नोंद घेतली आहे. बरेच दिवस या क्यालरी किलरा'स आम्ही शोधत आहोत! आपला आ'भारी:--- आत्मू खादाड! सब(फ़ूड) इन्सपेक्टर... वडगाव पोलिस स्टेशन,पुणे हद्द.
  • Log in or register to post comments

@तसेच पुढील मे २०१५ मध्ये

अत्रुप्त आत्मा
Fri, 10/24/2014 - 00:55 नवीन
@तसेच पुढील मे २०१५ मध्ये दीपक कुवेत ही व्यक्ती भारतात येत असल्याचेही कळले >>> नोंद घेतली आहे. बरेच दिवस या क्यालरी किलरा'स आम्ही शोधत आहोत! आपला आ'भारी:--- आत्मू खादाड! सब(फ़ूड) इन्सपेक्टर... वडगाव पोलिस स्टेशन,पुणे हद्द.
  • Log in or register to post comments

@तसेच पुढील मे २०१५ मध्ये

अत्रुप्त आत्मा
Fri, 10/24/2014 - 00:55 नवीन
@तसेच पुढील मे २०१५ मध्ये दीपक कुवेत ही व्यक्ती भारतात येत असल्याचेही कळले >>> नोंद घेतली आहे. बरेच दिवस या क्यालरी किलरा'स आम्ही शोधत आहोत! आपला आ'भारी:--- आत्मू खादाड! सब(फ़ूड) इन्सपेक्टर... वडगाव पोलिस स्टेशन,पुणे हद्द.
  • Log in or register to post comments

तीन तीन येळा टंकून कशाला

खटपट्या
Fri, 10/24/2014 - 05:22 नवीन
तीन तीन येळा टंकून कशाला कॅलरी घालवताय !! आँ !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

दूसरा मार्ग काय मग!?

अत्रुप्त आत्मा
Fri, 10/24/2014 - 06:54 नवीन
दूसरा मार्ग काय मग!? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

@डॉ खरे यांच्याबरोबर एक

अत्रुप्त आत्मा
Fri, 10/24/2014 - 06:58 नवीन
@डॉ खरे यांच्याबरोबर एक तरतरीत व "तेजस्वी चेहऱ्याचा पोरगेलासा तरुण" तिथे आला >>> खिक्क!
  • Log in or register to post comments

लेखन स्टाइल आवडली

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 10/24/2014 - 08:48 नवीन
पंचनाम्याचे पुरावे टाका नस्ता मी पंचनामा गायब करून टाकीन पुन्हा म्हणू नका पंचनाम्याचा कागद इथे तर ठेवला होता म्हणून ! -दिलीप बिरुटे (मंडल निरीक्षक)
  • Log in or register to post comments

साला टकलू शकीलने सही बताया था

पाषाणभेद
Fri, 10/24/2014 - 08:57 नवीन
साला टकलू शकीलने सही बताया था. ऐसे कट्टेकुट्टे मे मत जाते जा. लोगबाग अपनेजे धंदेमेके लोगोंका पंचनामा करते है. जो बी कुच खाते पिते है उसका पटू इंटरनेटपे डालते है. ऐसा अगर रहेगा तो अपनी पैचान सबको हो जायेगी ना बाप. इसलिये ऐसे कट्टेकुट्टेमे मै जाताच नई. आपभी जरा सोचो अउर अपने पैचानमेके कट्टेमेच जानेका क्या?
  • Log in or register to post comments

कट्टा अन रिपोर्ट उत्तम.

गवि
Fri, 10/24/2014 - 10:55 नवीन
कट्टा अन रिपोर्ट उत्तम. या मेल्या स्पावड्याला दरेक कट्ट्याला लवकर निघून कुठे जायचे असते ते विश्वेश्वरच जाणे..
  • Log in or register to post comments

विनोद १८ मुद्देमालासकट

टवाळ कार्टा
Fri, 10/24/2014 - 13:59 नवीन
विनोद १८ मुद्देमालासकट बेपत्ता आहेत...
  • Log in or register to post comments

....मी आहे इथेच...........

विनोद१८
Fri, 10/24/2014 - 14:28 नवीन
.....काल फोटो डकवणे जमले नाही...मुविंना फोन केला....ते आज दिसतील, थोड्याच वेळात.
  • Log in or register to post comments

आमची आवर्जुन आठवण

प्रमोद देर्देकर
Fri, 10/24/2014 - 18:32 नवीन
आमची आवर्जुन आठवण काढल्याबद्दल धन्यवाद. @ ट.का . तु महाराष्ट्र विद्यालयात होता का?
  • Log in or register to post comments

नाय बा

टवाळ कार्टा
Fri, 10/24/2014 - 22:46 नवीन
नाय बा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा