✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

न्यूयॉर्क आणि वॉशिंटन डी सी मधे कट्टा करूया का?

च
चित्रगुप्त यांनी
Wed, 09/17/2014 - 20:06  ·  लेख
लेख
नमस्कार. पुढील एका महिन्याच्या कालावधीत (२० आक्टोबर पर्यंत) न्यूयॉर्क आणि वॉशिंटन डीसी मधे कट्टा करूया का? कोण कोण मिपाकर या दोन्ही शहरात आहेत? मी सध्या आल्बनीमधे आहे, आणि खास म्युझियम्स बघण्यासाठी या दोन्ही शहरांचा आठवडाभराचा प्रवास करण्याचा बेत करत आहे. कट्ट्याचे वेळी एकाद्या म्यूझियमची सफर करू शकतो, किंवा अन्य कुठेतरी मोकळ्या जागी जमू शकतो, आणि पुरेसा वेळ असल्यास मी तैलरंगात निसर्गचित्रणाचे प्रात्यक्षिक करू शकतो. माझा इथला फोनः ५१८ ८३१ १७९१. .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
संस्कृती
कला
समाज
जीवनमान
प्रवास
देशांतर
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
बातमी
माहिती
चौकशी
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
20086 वाचन

💬 प्रतिसाद (81)

प्रतिक्रिया

ब्रुकलिन आर्ट म्युझियमम

चित्रगुप्त
गुरुवार, 09/18/2014 - 20:23 नवीन
@लौंगी मिर्ची: ब्रुकलिन आर्ट म्युझियममधे पण करू शकतो कट्टा. जेवण्याचे बघू कुठेतरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लौंगी मिरची

कट्ट्याला शुभेच्छा!

समीरसूर
गुरुवार, 09/18/2014 - 10:45 नवीन
हा कट्टा रंगणार असं दिसतंय. मजा करा. कट्ट्याला शुभेच्छा! :-) म्युझियम्स बघणे, पार्कात फिरणे, बोचरी थंडी, आरामात खाणे-पिणे...मजा येणार या कट्ट्याला...
  • Log in or register to post comments

हिरवटांनी हिरव्यांसाठी

प्यारे१
गुरुवार, 09/18/2014 - 13:21 नवीन
हिरवटांनी हिरव्यांसाठी काढलेला धागा! ;)
  • Log in or register to post comments

हिरवटच

चित्रगुप्त
गुरुवार, 09/18/2014 - 20:52 नवीन
पिकलं पान होऊ तेंव्हाही आम्ही हिरवटच राहणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

तुम्ही हलकं घेणार ह्याची

प्यारे१
गुरुवार, 09/18/2014 - 21:19 नवीन
:) तुम्ही हलकं घेणार ह्याची खात्री असल्यानंच टंकलेलं तसं. बाकी जुन्या कट्ट्याच्या लिंक्स वरुन वृत्तांत वाचले. मराठी माणसं एकत्र होती की तेव्हा. पुलाखालून नि वरुनही बहुत पानी बहून गेलेलं जाणवलं. असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

मराठी माणसं एकत्र होती की तेव्हा.

मुक्त विहारि
Fri, 09/19/2014 - 03:23 नवीन
अज्जुनही आहेत. या एकदा आमच्या डोंबोलीला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हिरवा

पिवळा डांबिस
गुरुवार, 09/18/2014 - 21:49 नवीन
ऋतु हिरवा, ऋतु बरवा... प्यारेला ईनो भरवा, प्यारेला ईनो भरवा, हिरवा... ऋतु हिरवा... ऋतु हिरवा, ऋतु बरवा || :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

=))

प्यारे१
गुरुवार, 09/18/2014 - 22:00 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

धन्यवाद

भाते
गुरुवार, 09/18/2014 - 22:36 नवीन
चित्रगुप्त काका, हा धागा काढल्यापध्दल धन्यवाद. त्यानिमित्ताने मिपाचे अनेक जुने कट्टावृत्तांताचे दुवे एकाच धाग्यावर मिळाले. आणखी कट्टावृत्तांताचे दुवे येतील अशी आशा आहे. सर्वांनी एकत्र भेटा, गप्पा मारा, खादाडी करा. सविस्तर आणि सचित्र कट्टा वृत्तांत मात्र न विसरता टाका. :)
  • Log in or register to post comments

न्यूयॉर्क

येडा अण्णा
Fri, 09/19/2014 - 18:14 नवीन
न्यूयॉर्क मध्ये केल्यास मी येवु शकतो. मी सध्या जर्सी सिटि मध्ये रहातो.
  • Log in or register to post comments

चित्रगुप्त काका, दिल्लीत

विवेकपटाईत
Fri, 09/19/2014 - 21:05 नवीन
चित्रगुप्त काका, दिल्लीत परतल्यावर आपण पुन्हा महाराष्ट्र सदनात कट्टा करू या. अमेरिकेतल्या गोष्टी ही ऐकायला मिळतील आणि सदनातले जेवणाचा दर्जा किती सुधारला हे ही कळेल.
  • Log in or register to post comments

सॉरी

पिवळा डांबिस
Sat, 09/20/2014 - 10:02 नवीन
चित्रगुप्त काका, तुमच्या अंमळ सिरियस धाग्याचे पूरग्रस्त काश्मीर केल्याबद्दल सॉरी.... पण कॅलीफोर्नियनांच्या कट्टाक्षमतेलाच चॅलेंज झाल्यामुळे नाविलाज जहाला!!! तुम्ही समजू शकाल म्हणुन लिहितोय, आमचा लाडका मिपाकर मिथन्या भोईर अजूनही मिपावर असता तर म्हणाला असता, "इचिभनं, जल्लां सगलां काय नांवानच हाय! दादूस, आयकान काय घेतंस, हान तुझ्यायला!!" :) गेले ते प्रांजळ आणि निर्मळ दिवस!! :(
  • Log in or register to post comments

सफेद घरातील कट्टा

शशिकांत ओक
Sun, 09/21/2014 - 23:11 नवीन
प्रधानमंत्री नमो वाशिंग्टनच्या सफेद घरात पाहुणचार घ्यायला ओबामा काकांच्या निमंत्रणाला मान देऊन कट्टा करायला जातायत त्यातच हात धुवून घ्यायला काय हरकत आहे?
  • Log in or register to post comments

पानिपत

चित्रगुप्त
Mon, 09/22/2014 - 06:20 नवीन
धाग्याचे पानिपत बघून आता भारतात परतल्यावर पानिपतासच कट्टा करवा म्हणतो.
  • Log in or register to post comments

कॅलिफोर्निया कट्टा प्लॅनिंग

नंदन
Wed, 09/24/2014 - 09:36 नवीन
(स्वगतः कॅलिफोर्निया जरा उदासच आहे का या बाबतीत)
ह्या स्वगताने व्यथित होऊन पिडांकाकांनी या शनिवारी मला फोन केला. "बघ रे, हे लोक काय लिहून राह्यलेत!" - इति काका. "हं, एखादा सकल कॅलिफोर्निया कट्टा प्लॅन करायला हवा खरा." - माझाही दुजोरा. "बरं, पण फोनवर कुठे हे ठरवायचं? घरी ये, गप्पा मारू आणि मग ठरवू काय ते!" त्याप्रमाणे संध्याकाळी मी काकांच्या घरी पोचलो. कॅलिफोर्निया पीठाधीशांनी तोवर जय्यत तयारी केली होतीच. Image removed. अभीष्ट चिंतुनि आम्ही त्यांचे भिडवियले काठः Image removed. आता अनायासे भेटलोच आहोत तेव्हा इतर गजालींना सुरूवात झाली. अमेरिकेची आर्थिक आघाडी, राज्यात येऊ घातलेल्या निवडणुका, मराठी संकेतस्थळांचा उदय (आणि काहींचा अस्तही), सध्या काहीच न लिहिणारे आणि काहीच्या काही लिहिणारे आयडी, पेठकरकाका-स्वातीताई-गणपा या ज्येष्ठ सदस्यांच्या पाककृती, आजकाल गाजणारे धागे यावर मग गप्पा रंगल्या. चखण्याने आणि एका बाटलीने तळ गाठला, तेव्हा मात्र वाट पाहत असणार्‍या सावजी चिकनकडे वळलो. चिकन आणि सोबतच्या दोन भाज्या इतक्या फक्कड झाल्या होत्या की इतका वेळ बडबडणारे आम्ही शांत बसून केवळ खाद्यसाधनेत मग्न झालो. दुसर्‍या दिवशी सकाळी गावात भटकून येऊनही आगामी कॅलिफोर्निया कट्ट्याच्या प्लॅनिंगला सुरूवात न झालेली पाहून काकांनी त्या विषयाला तोंड फोडलं. बे एरिया, बेकर्सफिल्ड, लॉस एंजेलिस परिसर आणि सॅन डिएगो या परिसरातील मिपाकरांनी एकत्र येऊन जंगी कॅलिफोर्निया कट्टा करायला हवा, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. मी यावर काही बोलणार तोच काकूंकडून जेवणाची वर्दी आली. सकाळचा वाफाळत्या साबुदाणा खिचडीचा नाश्ता अंमळ उशीराच झाला होता, तेव्हा साधंसंच काहीतरी करायचं म्हणून काकूंनी सोड्याची खिचडी केली होती. सोबत उगीच तोंडीलावणं म्हणून चार तळलेल्या बांगड्याच्या फोडी. कोकणी पद्धतीचं जेवण म्हणून फणसाची भाजी. इथे फॉलचे वेध लागलेत तेव्हा भोपळ्याची ताकातली कोशिंबिर. ती आवडेल न आवडेल म्हणून काकडीची कोशिंबिर. शेवटी पुरणपोळी आणि घरगुती तूप. म्हटलं ना, अगदी साधंसं जेवण हो! Image removed. जेवणानंतर खरं तर बसून नीट प्लॅनिंग करायचं होतं, पण आता पुढल्या आठवड्याची तयारी आणि एल.ए.चं कुप्रसिद्ध ट्रॅफिक या चिंता मला भेडसावू लागल्या होत्या. शेवटी, "आपण दोघंच कुठे हे ठरवण्यात पुरे पडणार काका? नवीन सदस्यांना सॅन लुईस ओबिस्पो किंवा तत्सम मध्यवर्ती ठिकाण आणि सोयीचा वीकेंड ठरवून भेटायला सांगू. हाकानाका! टेक्ससमधले काही लोक उगाच 'दुष्काळ, दुष्काळ!' म्हणून बोंबलताहेत, त्यांनाही आवतण धाडू." अशी मखलाशी करून काकांचा निरोप घेतला. निघताना 'अरे, हाही एक कॅल-कट्टाच झाला की' असं माझ्या लक्षात आलं :). तर त्याचाच हा आपला छोटेखानी वृत्तांत! (चित्रगुप्त यांची क्षमा मागून)
  • Log in or register to post comments

आवरा ! लईच साधा की ओ कट्टा हा

अनुप ढेरे
Wed, 09/24/2014 - 11:32 नवीन
आवरा ! लईच साधा की ओ कट्टा हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

चखना आन साधंसच जेवण लई आवडलं

विलासराव
Wed, 09/24/2014 - 11:49 नवीन
चखना आन साधंसच जेवण लई आवडलं बॉ आपल्याला. पण अजुनही तुम्ही साधं पाणी न पिता रंगीत पाणीच पिता याचं नवलही वाटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

कट्टा वृत्तांत.

प्रभाकर पेठकर
Wed, 09/24/2014 - 20:51 नवीन
कट्टा वृत्तांत थेट मनाला भिडला हो. आम्ही आलो होतो तेंव्हा नाही कोणी केले असले कट्टे-बिट्टे. असो. पुढच्या वेळी ठरवून करू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

कारण

पिवळा डांबिस
Fri, 09/26/2014 - 02:26 नवीन
आम्ही आलो होतो तेंव्हा नाही कोणी केले असले कट्टे-बिट्टे.
कारण तुमची गल्ली चुकली पेठकरकाका!! :) डाव्या किनार्‍यावर आला असतांत नक्की केला असता कट्टा!!
असो. पुढच्या वेळी ठरवून करू.
नक्की! उत्तर असो वा दक्षिण, आमचा कॅलिफोर्नियनांचा एकदा पाहुणचार तर बघा!!! "मस्त संत्री खाऊ! वाळ्याचे तट्टेगिट्टे लावून पडले राहू आरामात!!!" :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

हा खरा कट्टा.

चित्रगुप्त
Fri, 09/26/2014 - 20:31 नवीन
हिप हिप हुर्रे....
वाळ्याचे तट्टेगिट्टे लावून पडले राहू आरामात!!!"
....हा खरा कट्टा.... बाकी वो खानापीना चलताईच र्हैता. "पडे रहो" हाच आमचा शुभ-संदेश आहे. "पडले राहणे" हेच सर्व सुखाचे आगरू. जीवनाचे इतिकर्तव्य. आमचे सर्व खास मित्र याच "पडे रहो" संप्रदायाचे पायिक आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

भोपळ्याची कोशिंबीर, फणसाची

सूड
Wed, 09/24/2014 - 22:08 नवीन
भोपळ्याची कोशिंबीर, फणसाची भाजी, पुरणपोळ्या....आहाहा!! मुंबैकरानो-पुणेकरांनो (हे दोन्ही मांडवाचे वर्‍हाडी असलं की असं होतं) चला बघू करा एखादा कट्टा प्लान पटापट !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

अरे वा!

एस
Wed, 09/24/2014 - 22:15 नवीन
पिडांकाका अंमळ बारीक झालेत! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

वा वा वा, झकास

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 09/25/2014 - 07:24 नवीन
निशब्द!! अखिल कॅलिफोर्निया + टेक्सास कट्ट्याला शुभेच्छा. बाकी अ‍ॅरिझोनामध्ये पण काही मिपाकर राहतात असे ऐकले आहे :smile: .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

आयला, हे कधी आलं इथं!!!

पिवळा डांबिस
Fri, 09/26/2014 - 02:22 नवीन
आयला, हे कधी आलं इथं!!! सर्व संबंधितास खुलासा करण्यात येतो की हा कट्टा नव्हता. ही कट्टा प्लान करण्यासाठी घेतलेली बैठक होती. पण बैठकीत भाग घेणार्‍यांचे डोळे पेंगुळल्यामुळे बैठकीत कोणताही निर्णय ठरला नाही!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

चित्रगुप्तांच्या नोंदीतून

शशिकांत ओक
Mon, 09/29/2014 - 09:13 नवीन
चित्रगुप्तांच्या नोंदीतून निरटलेला कट्टा? मित्रा, कट्यावर मोदींच्या अमेरिका भेटीतील भाषणाचा गैर भारतीय लोकांवर काय प्रभाव पडला? कुठे काही वाचनात किंवा चर्चमधे आले तर वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

चर्च म्हणजे चर्चा करण्याची जागा

चित्रगुप्त
Mon, 09/29/2014 - 20:49 नवीन
@ शशिकांत ओकः:
चर्चमधे आले तर वाचायला आवडेल.
"चर्च म्हणजे चर्चा करण्याची जागा" हे पुनांचे विधान आठवून सद्गदीत झालो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

ओ बा मा

शशिकांत ओक
Mon, 09/29/2014 - 22:09 नवीन
चित्रगुप्त, काकांनी ओबामा ला बालपणात ओ, बाबा - माये एकत्रितरीतिने म्हणायला आवडे. मग अम्मा का लाडला म्हणून तिने ओबामा असे नाव ठेवून त्याचा लाड पुरवला... म्हणतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

पहिल्यावहिल्या कट्ट्याचे फोटो पाहता

दिपक.कुवेत
Tue, 09/30/2014 - 14:20 नवीन
डांबिस काका अंमळ बारीक (सडपातळ नाहि!!!) झाल्यासारखे दिसत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

उत्तम !

विटेकर
Wed, 09/24/2014 - 10:11 नवीन
छान , सचित्र वृत्तांत ! रच्याकने , या चित्रगुप्तांच्या कटट्याला यायचे असेल तर कोथरुड वरुन किती लांब पडेल? मी सहसा संध्याकाळी बाहेर पडत नाही , नळस्टॉपवर हल्ली फार गर्दी असते , ३-३ सिग्नल थांबावे लागते ! शक्यतो दुपारी ४ ची वेळ ठेवा.
  • Log in or register to post comments

हुम्म

इरसाल
Fri, 09/26/2014 - 17:18 नवीन
मी पीत नसल्याने टीपॉयच्या खाली असलेल्या पीत चित्र सॉरी काळंचित्र असलेल्या बुकावर माझ सगळं लक्ष होतं ;)
  • Log in or register to post comments

टेक्सास मध्ये कट्टा ?

स्पार्टाकस
Sun, 09/28/2014 - 11:14 नवीन
कुठे ? कधी?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा