✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मलई!

अ — अत्रुप्त आत्मा, Fri, 09/05/2014 - 17:00
.........................आत्मूज जिल्बी भांडार......................... जिल्बी क्रमांकः- ............. अशीच!* =)) (*-चे.पु.वर आमच्या-पाठी :p दुर्बिण घेऊन फिरणार्‍या एका मित्राच्या आग्रहास्तव,सदर जिल्बी तळायला :D सोडत आहोत!यथायोग्य आस्वाद घ्यावा. आणि आकारापेक्षा चविशी सलगी साधावी...ही विणम्र विणंती! =)) ..) सदर जिल्बीमधे:- व्यवसायात नविन पडलेल्या,किंवा वर्षानुवर्ष नविनच राहिलेल्या एका विक्रेत्याची कैफियत मांडायचा प्रयत्न केला आहे. हा विक्रेता नवेपणात असताना ग्राहकाला खरोखर हिताचा सल्ला देऊन विक्री करायला जात असतो.पण काहि ग्राहक..ही अशी एक अजब चीज असतात,की त्यांना तोंडांनी सत्य हा शब्द उच्चारायचा असतो,आणि व्यवहारात सर्व असत्य स्वतःच्या पदरी पाडून घेऊन पवित्र व्हायचं असतं. आमच्या मते अश्या ग्राहकांना जे हवं असतं , ते सत्य/असत्य नसून फक्त त्यांना-हवं..तेच असतं! मग एरवी ते काहिही का असेना? व्यावसाइकाला/विक्रेत्याला हीच गिर्‍हाइकं , अर्थशास्त्राचा एक वेगळा आयाम शिकवत असतात. आणि मग मूळचा कोणी कित्तीही का प्रामाणिक असेना,त्याला ह्या ग्राहकांसाठी..त्यांच्यापुरतं का होइ ना, दंभाची शाल अंगावर पांघरून हुबं र्‍हावं लागतं..थोडक्यात आपण खानावळ चालवत असू,तर अश्या ग्राहकांच्या दृष्टीनी आपण अन्नदानाचं पवित्र कार्य करत आहोत,असा (त्यांचा) लाडका ग्रह (ते जेवेपर्यंत!) मनाशी घट्ट बाळगावा लागतो. कारण अश्या ग्राहकांना,आपण अन्नविक्रेते आहोत हे पटतच नसतं.(म्हणूनच तर ते "अन्नदान" असा पवित्र शब्द वापरतात.) त्यांच्या मते आपण अन्नविक्रेते नसून,फक्त अन्न बनवायची मजुरी(त्यांना वाटते ती! :-/ ) घेतली पाहिजे... शेवटी अश्यांकडूनंही मजुरीचं मोल त्यांच्याच पवित्र भाषेत बोलूनच वसूल करावं लागत असतं. असो! आता तांब्यात अजुन पिठ न भरत बसता..तो जड जाहलेला आहे तोवरच ही जिल्बी तळायला घेतो...कशी लागली जरूर सांगा. :) ===========

मलई!

आधी धंदा असतो चिवडा नंतर त्याची होते भेळ तेंव्हा मिळायची करवंटी आता....मलई खायची वेळ! सुरवातीचे दिवस ते गिर्‍हाईकांची..हां जी! हां जी! नंतर केवळ जीं..हां! जीं..हां! "कोणती देऊ भाजी..ताजी!???" दोन काळ..एक बदल कोणता खरा म्हणायचा खेळ!? कमी फरसाण..वा..जास्त कुरमुरे हिलाच म्हणावं लागतं भेळ! विक्रेत्याला सत्य नेहमी अर्ध(च) सांगायला शिकवतात ग्राहक. त्याला हवं- ते..दिलं! तरच तुंम्ही सेवा वाहक! अर्थशास्त्राचा शास्त्रीय अर्थ मनःस्थितीला असतो धरून. पिंप तेच-भाव वेगळा! हवा द्या..अगर,पाणी भरून! चला.....लै प्रवचन दिलं जातो आता सरळ सरळ...! परत थोडी मलाई खायचीये वाट बघतोय-पुढचा नारळ! =)) https://lh4.googleusercontent.com/-rzEbHMMMBzs/VAmcdjFq1jI/AAAAAAAAGWs/AFCWHT-a9ng/w531-h581-no/my%2Bfone%2B302.jpg =========== अत्रुप्त

प्रतिक्रिया द्या
9581 वाचन

💬 प्रतिसाद (25)

अत्ता मी पयला

प्रचेतस
Fri, 09/05/2014 - 17:06 नवीन
=)) अत्ता मी पयला =))
  • Log in or register to post comments

अरे वा!

पैसा
Fri, 09/05/2014 - 17:31 नवीन
कुरकुरीत जिल्बी! कवितेच्या नावात मलई वाचून आशेने धावत आले होते, साय आणि वहिनी वगैरे कवितेचा सीक्वेल आहे का काय म्हणून!
  • Log in or register to post comments

@ साय आणि वहिनी वगैरे कवितेचा

अत्रुप्त आत्मा
Fri, 09/05/2014 - 17:37 नवीन
@ साय आणि वहिनी वगैरे कवितेचा सीक्वेल आहे का काय म्हणून!>>> =)) हा लिल्या मंजे ना! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

साय आणि मलईचे कॉपीराईट

सूड
Fri, 09/05/2014 - 17:47 नवीन
साय आणि मलईचे कॉपीराईट घेतलंनीतशे दिसतात दोन्ही भावांनी मिळून !!
  • Log in or register to post comments

हो ना !

सस्नेह
Fri, 09/05/2014 - 22:34 नवीन
अगदी ताक आणि भान्ड्यासहित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मलई, साय, ताक,

प्यारे१
Fri, 09/05/2014 - 22:41 नवीन
मलई, साय, ताक, काही शब्द मिस्सींग का आहेत बरे? दूध, साय/मलई, विरजण, दही, ताक, भांडं, लोणी, तूप, बेरी असा क्रम हवा ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

आधी ताक आन भांड,

जेपी
Fri, 09/05/2014 - 17:53 नवीन
आधी ताक आन भांड, नंतर साय, आता मलई. दुदु राहिल की. =))
  • Log in or register to post comments

दुदु आहेच की. फक्त त्यानंतर

बॅटमॅन
Fri, 09/05/2014 - 18:22 नवीन
दुदु आहेच की. फक्त त्यानंतर अगोबा येतो ;) दु.दु. अगोबा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

-

कवितानागेश
Fri, 09/05/2014 - 19:48 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

(No subject)

सूड
Fri, 09/05/2014 - 20:15 नवीन
=))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

कमी फरसाण..वा..जास्त कुरमुरे

विवेकपटाईत
Fri, 09/05/2014 - 20:12 नवीन
कमी फरसाण..वा..जास्त कुरमुरे हिलाच म्हणावं लागतं भेळ! मजा आली, तसं फोटूतिल मलाई जास्त आवडली.
  • Log in or register to post comments

पहिला प्रति साद!

अत्रुप्त आत्मा
Fri, 09/05/2014 - 22:48 नवीन
पहिला प्रति साद! ;-) धन्यवाद हो पटाईत काका! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

खूप आर्थपूर्ण, सामाजिक,

खटपट्या
Fri, 09/05/2014 - 22:59 नवीन
खूप आर्थपूर्ण, सामाजिक, व्यावसायिक कविथा हाये ही, अही अही अही
  • Log in or register to post comments

ही आमची कविथा...

बॅटमॅन
Sat, 09/06/2014 - 01:50 नवीन
ही आमची कविथा... आमचा हिच्यावर फार जीव? कविथा प्रेमी इ.इ.इ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

(No subject)

खटपट्या
Sat, 09/06/2014 - 02:28 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

वा वा वा

श्रीरंग_जोशी
Fri, 09/05/2014 - 23:18 नवीन
वा वा वा, फारच खुसखुशीत, चुरमुरीत व लज्जतदार कविता. खूप आवडली. तसा मी कविता वाचणे टाळतो पण अ.आ. यांची कविता नक्की वाचतो.
  • Log in or register to post comments

लैच

सुहास झेले
Fri, 09/05/2014 - 23:35 नवीन
लैच :)
  • Log in or register to post comments

कायच कळ्ळं नै की ओ!

रेवती
Fri, 09/05/2014 - 23:48 नवीन
कायच कळ्ळं नै की ओ!
  • Log in or register to post comments

वल्लीला विचारा, तो बुवांच्या

सूड
Sat, 09/06/2014 - 00:28 नवीन
वल्लीला विचारा, तो बुवांच्या कवितांचा फ्यान आहे. त्याला समजलं असेल. त्याच्यादृष्टीने ग्रेसनंतर गूढ आणि गहन काव्य करणारे म्हणजे अत्रुप्त'जी आत्माच'जी..;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मलई युक्त जिलबी आवडली...

मुक्त विहारि
Sat, 09/06/2014 - 00:14 नवीन
आजकाल , भेळेत चुरमुरे जास्त अन फरसाण कमी, ही गोष्ट लक्षांत आणून दिल्याबद्दल बुवांना एक अम्रुततुल्य लागू.
  • Log in or register to post comments

"काव्यरस:" मध्ये भूछत्री

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 09/06/2014 - 00:52 नवीन
"काव्यरस:" मध्ये भूछत्री असूनही कवितेत आणि फटूत मलईचाच बोलबाला असल्याने भूछत्रीने जोर्दार णिषेध कळवायला सांगितला आहे ! =))
  • Log in or register to post comments

अगोबा sss दुदुबाsss ...

जेपी
Sat, 09/06/2014 - 07:08 नवीन
अगोबा sss दुदुबाsss ... अगोबा sss दुदुबा sss... काढतो कळ... वल्लिदा आत्मुचा करतो छळ... .. ..हायला आमलाबी जमायल की हळुहळु
  • Log in or register to post comments

फक्कड कविता आत्मुस.

स्पंदना
Sat, 09/06/2014 - 16:24 नवीन
फक्कड कविता आत्मुस. हिला जिल्बी म्हणनं मला तरी नाही जमणार. मस्त लिहिलयं तुम्ही
  • Log in or register to post comments

.

पोटे
Mon, 09/08/2014 - 11:36 नवीन
:(
  • Log in or register to post comments

मलई खायला... उशीर झायला...

माम्लेदारचा पन्खा
Mon, 09/08/2014 - 14:59 नवीन
वाट बघतोय नारळवाला....
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा