Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by समीरसूर on Tue, 09/02/2014 - 14:11
एक बालाजी/साई बाबा/हनुमान/शंकर/वैष्णोदेवी यांचे मंदिर उभारायचे. हा सगळ्यात सोपा मार्ग. देव नॅशनल (इंटरनॅशनल) अपील असणारा हवा. प्रदेशिक देवांच्या मंदिरात कमाई फारशी नाही. म्हणूनच दत्त, खंडोबा, स्वामी समर्थ आदी मंदिरे इतकी श्रीमंत नाहीत. स्टार लेव्हलचा देव असला की मंदिर आपसूकच ग्लॅमरस बनते. उद्घाटनाला एखादा सेलिब्रिटी बोलवायचा. भरपूर जाहिरात करायची. हळूच 'नवसाला पावणारा' अशी बातमी सोडून द्यायची. दगडूशेठ गणपती हा पूर्वी (९० च्या दशकात) नवसाला पावणारा म्हणून फेमस नव्हता. गेल्या १०-१२ वर्षात जोरदार मार्केटिंग करून त्याला हे बिरूद मिळाले आहे. त्यासाठी बिझनेस डेवलपमेंट ऑफीसर्स नेमायचे. त्यांना क्लायंट्स आणायला सांगायचे आणि त्यावर ५% कमिशन द्यायचे. काही मोठी माणसे भक्त म्हणून नेमायची. गरज पडल्यास दान पेटीतला कट त्यांना द्यायचा. मंदिरात चविष्ट असा प्रसाद अहोरात्र ठेवायचा. जसा तिरुपती बालाजीचा लाडू प्रसिद्ध आहे तसलं काहीतरी स्पेशल ठेवायचं. ब्रँड डेवलप करण्यात प्रसाद मोठी भूमिका बजावतो. काजूकतली किंवा पिस्ता बर्फी असा तगडा प्रसाद ठेवायचा. आंडू-पांडू साखरफुटाणे वगैरे नाही ठेवायचे. सुरुवातीचा खर्च गुंतवणूक म्हणून नेटाने करत रहायचा. मंदिरासाठी सुरुवातीला कुठेतरी आडवळणाला ५०० स्क्वे. फू. जागा पुरेशी आहे. नंतर ती आपसूकच वाढत जाते. सगळ्या मिपाकरांनी मिळून दहा-दहा हजार रुपये काढले तर असे एक छानसे मंदिर सहज उभे राहू शकते. गुंतवणुकीच्या प्रमाणात मंदिराच्या उत्पन्नाचा शेअर वाटून घेण्याचे ठरवून टाकायचे. मंदिरात छान-छान भजने सतत चालू ठेवायची. एक दिवा/धुनी सतत पेटत ठेवायचे. समोर एका सुरेख बोर्डावर त्याची कपोलकल्पित कहाणी लिहायची. "श्री ---- यांच्या या पवित्र देवळाच्या बांधकामासाठी पाया खोदतांना या जागेवर जमिनीच्या आठ फूट खाली एक पुरातन समई सापडली. समई बाहेर काढताच ती तेवत असल्याचा भास सगळ्यांना झाला. नंतर त्या समईची विधीवत पूजा करून ज्योत पेटवण्यात आली. समईमधले तेल संपले तरी समई अखंड तेवत असते. ही श्री ---- यांची किमया! त्यांच्या या कृपेचा प्रसाद आपणा सर्वांवर अखंड बरसत राहो ही प्रार्थना!" अशी ष्टोरी लिहिली की मंदिर फेमस व्हायला वेळ लागणार नाही. अशी समई सापडेल अशी व्यवस्था पाया खोदण्याच्या आधी करून ठेवावी. अजून एखादे वैशिष्ट्य डेवलप केल्यास ब्रँड व्हॅल्यू कैक पटीने वाढेल. उदाहरणार्थ १००१ वेळा विशिष्ट मंत्राचा जप पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात उपाशीपोटी बसून केल्यास घरातल्या सगळ्यांचे आरोग्य चांगले राहते किंवा उपास करून देवाचे दर्शन घेतल्यानंतर अन्नदान केल्यास घरादाराला बरकत राहते वगैरे वैशिष्ट्य हळूहळू एस्टॅब्लिश करत जायचे. त्यासाठी सुरेख अभिनय करणारे भोळे भक्त वाटणारे एजंट्स नेमायचे. मंत्र नवीन शोधून काढायचा. नेहमीच्या मंत्रामुळे भक्त इंप्रेस होतीलच असे नाही. मिळणारे फळ मोघम ठेवायचे. म्हणजे आरोग्य चांगले राहील किंवा बरकत राहील वगैरे. तात्काळ मिळणारी स्पेसिफिक फळे मेनु मध्ये ठेवू नयेत. अशी फळे न मिळाल्यास लोकांचा विश्वास उडण्याचा धोका असतो. अशा ष्टोर्‍या प्रसिद्ध झाल्या की मग मस्त ब्रँड तयार होईल. अधून-मधून धार्मिक कार्यक्रम घेत रहायचे. सेलिब्रिटीजना बोलवत रहायचे. अगदी सुरेखा पुणेकर, बाबासाहेब पुरंदरे, राजकुमार तांगडे, सई ताम्हणकर, राखी सावंत, परिणीती चोप्रा, पूनम पांडे, माधुरी पुरंदरे, सुधीर गाडगीळ, अतुल पेठे, भाई वैद्य (थोडा निराळा कार्यक्रम ठेवून), मेधा पाटकर, भैय्युजी महाराज, सैफ अली खान, जेनेलिया डिसुझा, मानसी नाईक, बाबा आढाव, शमसुद्दीन तांबोळी, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, सिंधूताई सपकाळ, सुरेश कलमाडी, अनिल शिरोळे, जितेंद्र आव्हाड असे सगळ्यांना बोलवायचे. कुठलाच भेदभाव ठेवायचा नाही. दहा वर्षात आपण सगळे मर्सिडीझ मधून फिरत असू. मला 'नोकरी बदलायची आहे' असं आर्जव टाकण्याची गरज पडणार नाही. :-) एकच अडचण आहे; हे सगळं करण्यासाठी जे मन लागतं ते कुठून मिळवायचं? बाकी सब तो चुटकी में अरेंज हो जायेगा... :-)
  • Log in or register to post comments
  • 35517 views

प्रतिक्रिया

Submitted by प्यारे१ on Tue, 09/02/2014 - 17:54

Permalink

सगळेच ज्येष्ठ सुटलेत की !

सगळेच ज्येष्ठ सुटलेत की ! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 09/02/2014 - 18:11

In reply to सगळेच ज्येष्ठ सुटलेत की ! by प्यारे१

Permalink

आण्भव, आण्भव, हेला आण्भव

आण्भव, आण्भव, हेला आण्भव म्हंतात... हात कुटं... उगाच नाय डोस्क्याचे केस पाढरे झाले / गेले =))
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 09/02/2014 - 18:13

In reply to आण्भव, आण्भव, हेला आण्भव by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

आजपत्तुर 'मट्रेलाईज' का न्हाय

आजपत्तुर 'मट्रेलाईज' का न्हाय क्येला म्हन्तो मी?
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 09/02/2014 - 18:20

In reply to आजपत्तुर 'मट्रेलाईज' का न्हाय by प्यारे१

Permalink

हे असं एकदम होत नसतं. एनर्जी,

हे असं एकदम होत नसतं. एनर्जी, पैसा इन्व्हेस्ट करणारे लोक्स एकाचवेळी भेटायला नकोत का? आत्ताही सगळे एकत्र आलेत ही देवाचीच कृपा!
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 09/02/2014 - 18:27

In reply to हे असं एकदम होत नसतं. एनर्जी, by रेवती

Permalink

हांग आश्शी, हे म्हंजे

हांग आश्शी, हे म्हंजे आण्भवाचे बोल ! गोष्टिची येळकाळ याय्ला लाग्ती, मंग ती व्हती, तवर न्हाय. हात कुटं प्यारेजी ?!
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 09/02/2014 - 18:34

In reply to हांग आश्शी, हे म्हंजे by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

मर्दानु पन मेण मुद्दा र्

मर्दानु पन मेण मुद्दा र्‍हायला की. जागा कुनाची ढापाची? शेरात तर काय आता जागा मिळाची न्हाय. एकांदा 'माळ' गाटावा लागंन. दोन चार एकर तरी जागा लागनार. कुटनं आनायची गा?
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Tue, 09/02/2014 - 19:19

In reply to मर्दानु पन मेण मुद्दा र् by प्यारे१

Permalink

प्यारे काका ,हामची दानपत्तर

प्यारे काका ,हामची दानपत्तर करुन देवतो. पण प्राब्लेम हाय. लातुरात याव लागेल+ मला मन्दिराच्या हुत्पनात 10 टक्का पायजे+मला विश्वस्त मनुन घ्या पायजे.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Tue, 09/02/2014 - 18:19

Permalink

मी मंदीरातला श्टोर्‍या

मी मंदीरातला श्टोर्‍या साम्गणारा बुवा होतो. पेठकर काकाना शिन्यर बुवा बनवु या.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 09/02/2014 - 18:52

Permalink

लय झ्याक पिल्यान ह्हाय

लय झ्याक पिल्यान ह्हाय
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Tue, 09/02/2014 - 20:10

Permalink

मंदीरा भोवति मिपा सदस्यांचे

मंदीरा भोवति मिपा सदस्यांचे पुतळे उभारावेत अशी णम्र सुचना आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on Tue, 09/02/2014 - 20:33

In reply to मंदीरा भोवति मिपा सदस्यांचे by अविनाशकुलकर्णी

Permalink

अवांतरः बलसाड येथे एका

Image removed. अवांतरः बलसाड येथे एका मंदीराबाहेर ह्या पुतळ्यांचे दर्शन झालं होतं.
  • Log in or register to post comments

Submitted by आतिवास on Tue, 09/02/2014 - 21:54

Permalink

कल्पना(विलास) मस्त आहे.

कल्पना(विलास) मस्त आहे. फक्त मंदिरासाठी 'मध्यवर्ती' जागा कोणती यावर मिपाकरांचं एकमत होईल याची कुणीतरी हमी घ्या, म्हणजे झालं ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 09/02/2014 - 23:28

In reply to कल्पना(विलास) मस्त आहे. by आतिवास

Permalink

ह्या मंदिरासाठी मध्यवर्ती ठिकाणाची गरज नसते...

लोकं पार दिवे आगारापासून ते बद्रीनाथापर्यंत जातात..
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Tue, 09/02/2014 - 22:08

Permalink

हा हा...

मजा आली. गणपतीची सुद्धा चलत्ती आहे. त्याला कुठलासा राजा बनवून टाकायचा. लालबागच्या राज्याएव्हडं पद्धतशीर मार्केटींग कुठं बघितलं नाही. सामना आणि लोकसत्ता वाल्यांचा फेवरेट देव. आतातर लोकसत्ता उघडला की कोपर्‍यात राज्याच्या लाइव्ह आरतीचा विडिओ सुरू होतो. दोन-चार केबीच्या बातम्यावाचण्यासाठी पेपर उघडला तर मेग्याबायटी विडिओ लाउन फुकट ब्यांडविद्थ जाळतात. :(
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Wed, 09/03/2014 - 09:55

In reply to हा हा... by दादा कोंडके

Permalink

गणेश गल्ली आणि लालबागचा राजा

लालबागच्या राज्याएव्हडं पद्धतशीर मार्केटींग कुठं बघितलं नाही.
अगदी! आमच्या ल्हानपणी सगळ्यात फेमस होता तो गणेश गल्लीचा गणपती. लालबागच्या गणपतीला फार कुणी जात नसे. नंतर त्यांनी काय मार्केटिंग केले ठाऊक नाय, पण गेल्या १०-१२ वर्षांत लालबागचा गणपती लै म्हंजे लैच फेमस झाला!
  • Log in or register to post comments

Submitted by समीरसूर on Wed, 09/03/2014 - 10:17

In reply to गणेश गल्ली आणि लालबागचा राजा by सुनील

Permalink

बरोबर

तीच तर्‍हा पुण्यातल्या दगडूशेठ गणपतीची. ९० च्या दशकात मी दगडूशेठ गणपतीला त्या भागात कधी गेलो तर जात असे. अगदी मूर्तीजवळ जाऊन दर्शन घेता येत असे. लोकं तिकडे गेलो तर दर्शन घ्यावे अशा पद्धतीने दर्शन घेत असत. मोठे हार, किलो किलो पेढे, नारळांची माळ, महागड्या मिठाया वगैरे घेऊन खास दर्शनासाठी कुणी तेथे जात असल्याचे स्मरत नाही. पुण्याबाहेरही हा गणपती अगदीच मोजक्या लोकांना माहित होता. आमच्या गावाकडे तर कुणालाच माहित नव्हता. पण साधारण २००० पासून या गणपतीचे मार्केटिंग इतके जबरदस्त केले गेले की आज तिथे दर्शन घेण्यासाठी जायचे म्हणजे अंगावर काटा येतो. चतुर्थीच्या दिवशी किमान दोन तास वाट बघावी लागते. भक्त मिठायांचे पुडे, मोठे मोठे पाच-पाचशे रुपयांचे हार वगैरे घेऊन लांब रांगेत तिष्ठत उभे राहतात. कारण काय तर अचानक गेल्या १२-१५ वर्षात दगडूशेठ गणपती हा 'नवसाला पावणारा' हुकुमी देव बनलेला आहे. 'नवसाला पावणारा' ही पदवी मिळाली की मग भक्त गर्दी करणारच. कसा काय झाला हा बदल? 'लालबागचा राजा' मी लहानपणी ऐकला नव्हता. एवढंच काय अगदी १९९५-१९९९ पर्यंत पुण्यात राहून मला 'लालबागचा राजा' माहित नव्हता. नंतर काय चमत्कार घडला आणि तो एकदम स्टार गणपती झाला. आता शेकडो कोटींची मालमत्ता आहे या गणपतीची. तीच तर्‍हा मुंबईच्या सिद्धिविनायकाची. गेल्या १५-२० वर्षात सिद्धिविनायकाचे नशीब पालटले. कुठे जातात हे शेकडो कोटी रुपये आणि शेकडो किलो सोनं-चांदी? कुठल्या चांगल्या लोकोपयोगी कामात सढळ हाताने हा पैसा वापरला जातो? एक-दोन फुटकळ कामे वगळता (ती ही समाजाच्या आणि सरकारच्या दबावाखाली येऊन) ही संस्थाने असं काय भरीव सामाजिक काम करतात? समाजाचा ही संस्थाने इतकी मोठी श्रीमंत झाल्याने काय फायदा होतो? आणि हे फक्त हिंदू मंदिरांच्या बाबतीत घडतेय असं अजिबात नाही. दर्गे आणि मस्जिदींच्या बाबतीत देखील असेच घडते आहे. किंबहुना या ठिकाणी काय शिकवले जाते याबद्दल शंका यावी अशा पद्धतीने दर्गे, मस्जिदी, मदरसे यांच्या संख्येत आणि संपत्तीमध्ये वाढ होते आहे. पुण्यात लकडी पुलाजवळ एक छोटेखानी दर्गा होता. आजच्या घडीला तिथे टोलेजंग मस्जिद उभी आहे. एकेका गावात जिथे पूर्वी १-२ मस्जिदी असत तिथे आता भव्य अशा स्वरुपाच्या ४-५ मस्जिदी आणि मदरसे आहेत. अजमेरचा दर्गा एक असेच उदाहरण. चित्रपटातले तारे तिथे जायला लागल्यापासून हा दर्गा तिरुपती बालाजी, शिर्डी यांच्या रांगेत जाऊन बसलाय. सामान्यांचे छोटे छोटे प्रश्न सुटत नाहीत आणि बड्या सिनेस्टार्सचे नवस कसे काय खात्रीने पूर्ण होतात? अजूनही आपण मंदिरे-मस्जिदींच्या संख्येवरून आपली भक्ती जोखू लागलो तर मग यातून काय साध्य होणार आहे हा फार मोठा प्रश्न आहे. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Wed, 09/03/2014 - 15:51

In reply to बरोबर by समीरसूर

Permalink

समाजाला गरज आहे का?

ही संस्थाने असं काय भरीव सामाजिक काम करतात? समाजाचा ही संस्थाने इतकी मोठी श्रीमंत झाल्याने काय फायदा होतो? त्यांच्या ह्या तथाकथित समाजकार्याची समाजाला खरोखर गरज आहे का? सरकार आपले कर्तव्य का नाही बजावत? गरीबांसाठी शिक्षण, वैद्यकिय सेवा, पिण्याच्या पाण्याची आणि सार्वजनिक शौचालयांची सोय सरकारने करायची आहे. देवस्थानांना ही नसती उठाठेव कोणी सांगितली आहे? ज्या मंदिर व्यवस्थापनाचा गैरव्यवहार, आर्थिक किंवा भक्तांना मिळणारी वागणूक, सिद्ध होतो ती ती देवस्थाने बरखास्त करून टाकावीत. देणग्या, वस्तू आणि पैसा, नियंत्रित कराव्यात. भ्रष्टाचार निपटून काढावा.
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Wed, 09/03/2014 - 21:29

In reply to समाजाला गरज आहे का? by प्रभाकर पेठकर

Permalink

बरोबर.

देवस्थानांना ही नसती उठाठेव कोणी सांगितली आहे?
पण अशी मदत करून उपकाराच्या ओझ्याखाली लोकांना ठेवलं की यांच्या विरोधात कुठं काही खुट्ट झाली ही लोकं तयार होतात. अगदी जीव द्यायला तयात होतात. लोकशाहीत ही प्रचंड ताकद असते. एक समांतर उदाहरण म्हणून सत्यसाई हॉस्पिटल. त्यांची अब्जावधीची बेकायदा संपत्ती आहे. पण त्यातले काही लाख कोटी खर्च करून त्या इस्पितळात गरीब लोकांचे मोफत इलाज होतात. आणि कुठल्याही पेशंटला ऑपरेशन टेबलावर घेण्याआधी त्या ऑपरेशनची सक्सेस प्रोबॅबिलिटी ९५% पेक्षा जास्त असेल ही खात्री करतात जेणेकरून पेशंट दगाउन नसती आफत येउ नये. उद्या सरकारने काही कारवाई करायची ठरवलीच तर ही लोकं हजारो लोकं जीव द्यायला तयार होतील.
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार दिलीप जोशी on गुरुवार, 09/04/2014 - 10:40

In reply to बरोबर. by दादा कोंडके

Permalink

पुरावा काय

पुरावा काय
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on गुरुवार, 09/04/2014 - 10:53

In reply to गणेश गल्ली आणि लालबागचा राजा by सुनील

Permalink

दिल्लीत ही विकासपुरी येथे

दिल्लीत ही विकासपुरी येथे लालबागचा देखावा उभा केला आहे. गल्लीते दिल्ली पर्यंत कीर्ती पोहोचली.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Wed, 09/03/2014 - 00:01

Permalink

ही तर देवाचीच कृपा झाली

ही तर देवाचीच कृपा झाली म्हणायची... जरा कुठे मी म्हणाले, पैशाची फार गरज आहे, तर इतक्या आयड्या!! =))
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Wed, 09/03/2014 - 06:33

Permalink

मला आलरेडी सपान पडलंय...

मला आलरेडी सपान पडलंय....धम्याला पुरावा मागा. तेंव्हा आद्य माता म्हणुन मी स्वतःला घोषित करत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Wed, 09/03/2014 - 07:28

Permalink

गणपतीचा उत्सव चालू असतानाच

गणपतीचा उत्सव चालू असतानाच नेमकं दैवतांच्या आणि मंदिरांच्या चेष्टेला ऊत का येतो हे समजत नाही. महान भग्वद्गीतेत सांगितलेल्या भक्तीयोगासारख्या पवित्र हिंदू परंपरांची टिंगल केल्याशिवाय या सुडोसेक्युलर विचारजंतींना आपलं पुरोगामित्व सिद्धच करता येत नाही. आपल्या हिंदूसंस्कृतीतल्या उगवत्या देवालयांबद्दल असले गलिच्छ विचार मांडलेले पाहून एक मिपाकर म्हणून मला शरम वाटली.
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Wed, 09/03/2014 - 09:08

In reply to गणपतीचा उत्सव चालू असतानाच by राजेश घासकडवी

Permalink

ह्याला

ह्याला म्हणतात सुसंस्कृत प्रतिसाद. दैवतांची वा मंदिरांची कुणी पाकिस्तानी लोकांनी वा युरोपियनांनी टिंगल केली तर मात्र आपण वस्कन अंगावर जायचे."कोण कुठला तू?", "तुझे सामाजिक कामगिरी काय?" "जोड्याने हाणला पहिजे" "तिथल्या तेथे ठेचला पाहिजे" असे प्रतिसाद द्यायचे. समीरसूरच्या जागी कुणी सलमानसूर असता तर असे प्रतिसाद नक्कीच आले असते.
  • Log in or register to post comments

Submitted by समीरसूर on Wed, 09/03/2014 - 09:40

In reply to गणपतीचा उत्सव चालू असतानाच by राजेश घासकडवी

Permalink

जाऊ द्या हो...

घासकडवीसाहेब, जाऊ द्या, एवढं टेंशन नका घेऊ. सगळीकडे एग्झॅक्टली असंच चालू आहे. थोडी अतिशयोक्ती असेल कदाचित पण लालबागचा राजा, प्रभादेवीचा सिद्धिविनायक, शिर्डी अशा ठिकाणी नेमकं हेच चालू आहे. जे वास्तवात आहे तेच थोडे अतिरंजित करून लिहिले आहे इतकेच. लिखाणात उपहास आहे हे आपल्या लक्षात आले असेलच. देवांची, देवळांची टिंगल करण्याचा हेतू अजिबात नाही. असेल तर फक्त देवालयांच्या नावाखाली जो गलिच्छ बाजार मांडला गेलाय त्यावर प्रकाश टाकण्याचा क्षीण प्रयत्न आहे. देवांची टिंगल हा मुख्य विचार असता तर 'देऊळ' (आणि 'ओह माय गॉड' देखील)चित्रपट एवढा गाजला नसता आणि राष्ट्रीय पातळीवरची पारितोषिके त्यास मिळाली नसती. आपल्या देवाच्या आणि भक्तीच्या संकल्पना थोड्या तपासून बघायला पाहिजेत. आणि हे मस्जिद, चर्च इत्यादींच्या बाबतीतही तंतोतंत लागू पडतं. नुसती मंदिरे, मस्जिदी, चर्चेस उभारून देव कळला असता तर जगात देव-धर्मावरून इतकी अमाप हिंसा घडलीच नसती.
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on Wed, 09/03/2014 - 10:18

In reply to जाऊ द्या हो... by समीरसूर

Permalink

लिखाणात उपहास आहे हे आपल्या

लिखाणात उपहास आहे हे आपल्या लक्षात आले असेलच
अहो घासकडवींचासुद्धा गुगली होता तो !!
  • Log in or register to post comments

Submitted by समीरसूर on Wed, 09/03/2014 - 10:22

In reply to लिखाणात उपहास आहे हे आपल्या by बाळ सप्रे

Permalink

मग ठीक आहे :-)

लक्षातच आले नाही बघा. बुद्धीचा देव आम्हाला विसरलाच त्याला काय करणार? :-)
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार दिलीप जोशी on गुरुवार, 09/04/2014 - 10:42

In reply to लिखाणात उपहास आहे हे आपल्या by बाळ सप्रे

Permalink

तरी ते बरोबरच होते

तरी ते बरोबरच होते
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार दिलीप जोशी on गुरुवार, 09/04/2014 - 10:41

In reply to जाऊ द्या हो... by समीरसूर

Permalink

देऊळ' (आणि 'ओह माय गॉड' देखील

देऊळ' (आणि 'ओह माय गॉड' देखील)चित्रपट एवढा गाजला नसता >> गाजला,चालला नाही ;)
  • Log in or register to post comments

Submitted by समीरसूर on गुरुवार, 09/04/2014 - 11:39

In reply to देऊळ' (आणि 'ओह माय गॉड' देखील by मंदार दिलीप जोशी

Permalink

'ओह माय गॉड' हिट होता

'ओह माय गॉड' ५० कोटीपेक्षा जास्त व्यवसाय करून गेला आणि ते ही परेश रावल सारखा चरित्र अभिनेता मुख्य भूमिकेत असतांना. रणबीर कपूरचा 'बर्फी' त्याच दरम्यान 'ओएमजी' पेक्षा किंचित जास्त व्यवसाय करून गेला होता. 'ओएमजी' बजेटच्या मानाने चिक्कार चालला आणि लोकांना त्यात दाखवलेले पटले देखील. आपल्याकडे फक्त अंमलात आणतांना लोकांची अडचण होते. देवाची भीती ही एकच भावना त्यांना निरर्थक प्रथांमध्ये अडकवून ठेवते. भक्तीपेक्षा भीती जास्त पॉवरफुल आहे आपल्याकडे. म्हणून तथाकथित बाबा-बुवांचं फावतं. सत्य साईबाबांचे ढोंग तर सगळ्या जगाला माहित होते. आणि एका संताला का हवी एवढी संपत्ती? का हवं फाइव्ह स्टार आयुष्य? त्यांचे ते चमत्कार जत्रेतला साधा जादुगार देखील करू शकेल असे होते. त्यांच्यापेक्षा तो कष्ट करून पोट भरणारा साधा जादुगार जास्त पूजनीय आहे. आसाराम गेलाच ना तुरुंगात? नित्यानंदची लागलीच ना वाट? मागे इस्कॉनचा कुणी तरी पॉवरफुल साधू जर्मनीमध्ये बलात्काराच्या घटनेत सापडला होता. आपल्या इथल्या मूर्ख जनतेच्या मूर्खपणाचा फायदा घेऊन हे लबाड लांडगे मुजोर होतात आणि स्वतःला देव समजतात. निर्मल बाबा, राधे माँ वगैरे भोंदू त्याच लायनीतले. अनिरुद्ध बापू स्वतःला देव समजतो. असे शक्य आहे का? कुणी माणूस कसा काय देव असू शकेल? मग देव असेल तर सगळ्यांची दु:खे चुटकीसरशी दूर का नाही करू शकत? दहशतवाद नष्ट का नाही करू शकत? फक्त जे भक्त त्यांचेच भले करणार असा विचार करतो का खरा देव? भक्त मग तो किती का भ्रष्टाचारी, व्याभिचारी, क्रूर असे ना, त्याचं हा बाबा भलंच करणार असं काही आहे का या लबाडांचं तत्व? हा निव्वळ ढोंगीपणा आहे. आणि त्याला कारणीभूत आपल्या इथले मूर्ख लोकं आहेत. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Wed, 09/03/2014 - 09:56

In reply to गणपतीचा उत्सव चालू असतानाच by राजेश घासकडवी

Permalink

बाडिस

;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 09/03/2014 - 12:14

In reply to गणपतीचा उत्सव चालू असतानाच by राजेश घासकडवी

Permalink

ओ आमचा प्रतिसाद आहे तो

ओ आमचा प्रतिसाद आहे तो ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार दिलीप जोशी on गुरुवार, 09/04/2014 - 10:41

In reply to गणपतीचा उत्सव चालू असतानाच by राजेश घासकडवी

Permalink

अनुमोदन

अनुमोदन
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Wed, 09/03/2014 - 08:37

Permalink

मिपाकरांचे मंदिर आले तर ...

मिपाकरांचे मंदिर आले तर बाहेर रोशनीचा पुतळा बसावावा लागेल. मंदिरात बल्लावाचार्याची मूर्त स्थापावी लागेल. अध्यात्मवाद्यांची (सं)कीर्तन जुगलबंदी ठेवावी लागेल मंडपात. जय मिपा जय मिपा मस्तंय रे मिपा वर्गणी नाही म्हणूनी फुकटच्या गप्पा.... जय मिपा..... अशी आरती.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 09/03/2014 - 14:11

In reply to मिपाकरांचे मंदिर आले तर ... by चौकटराजा

Permalink

आणि आरती म्हणून मोकलाया आणि

आणि आरती म्हणून मोकलाया आणि भांडे या दोन्ही कविता त्यांबरोबरच्या प्रतिसादांसकट छापून वाटाव्यात.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Wed, 09/03/2014 - 14:16

In reply to आणि आरती म्हणून मोकलाया आणि by बॅटमॅन

Permalink

भांडे

लिंक द्या हो ! मिसली ती कविता :(
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 09/03/2014 - 15:06

In reply to भांडे by कपिलमुनी

Permalink

www.misalpav.com/node/23240

www.misalpav.com/node/23240
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 09/03/2014 - 14:17

In reply to आणि आरती म्हणून मोकलाया आणि by बॅटमॅन

Permalink

आय ऑब्जेक्ट.

आय ऑब्जेक्ट. आपल्याला देऊळ काढायचंय हा मोटो फिक्स आहे. हास्यक्लब नाही. =))
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Wed, 09/03/2014 - 14:45

In reply to आय ऑब्जेक्ट. by प्यारे१

Permalink

फक्त

मुख्य मूर्ती रोशनीची. उजव्याबाजूला मधुबालाची एक मूर्ती,डाव्या बाजुला किशोर कुमारची मूर्ती हवी कमरेवर हात ठेवून. काकड आरतीऐवजी आर.डी.ची गाणी.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 09/03/2014 - 15:05

In reply to आय ऑब्जेक्ट. by प्यारे१

Permalink

चुकलात तुम्ही. आमच्या देवळात

चुकलात तुम्ही. आमच्या देवळात हास्य थेरपी करून मिळेल हे अ‍ॅडिषनल क्रेडिट मिळेल ते का घालवायचं?
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 09/03/2014 - 15:14

In reply to चुकलात तुम्ही. आमच्या देवळात by बॅटमॅन

Permalink

आयला, खरंच्च की. अ‍ॅडीशनल

आयला, खरंच्च की. अ‍ॅडीशनल मेम्बरं. अ‍ॅडीशनल डोनेशन. डालरा डालरा....
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on Wed, 09/03/2014 - 09:32

Permalink

मंदीर गावाबाहेर वगैरे केल्यास

मंदीर गावाबाहेर वगैरे केल्यास भव्यदिव्य वगैरे करावे लागते.. खूप इंव्हेस्ट्मेंट करावी लागेल.. मध्यवस्तीत एखादा कोपरा बळकावून छोट्याश्या घुमटीपासून सुरुवात करावी.. मग मांडव वगैरे घालून हळूहळू हातपाय पसरावेत..
  • Log in or register to post comments

Submitted by समीरसूर on Wed, 09/03/2014 - 12:22

In reply to मंदीर गावाबाहेर वगैरे केल्यास by बाळ सप्रे

Permalink

नो नीड

पुण्यात अजूनही रेडीमेड देवळे आहेत ज्यांचे उत्तम मार्केटिंग करता येऊ शकेल. थोडी फार ब्रँड व्हॅल्यू या देवळांना ऑलरेडी आहेच. उदा. जिलब्या मारुती, सोन्या मारुती, त्रिशुंडी गणपती, नवश्या मारुती, पत्र्या मारुती. एक कुठलेतरी मंदिर घ्यायचे आणि आपला मार्केटिंग प्लॅन तयार करून अंमलात आणायचा. जागेचा मोठा प्रश्न उभा राहिल हे मात्र खरे. या मंदिरांतले देव स्वतःच त्या त्या ठिकाणच्या गर्दीला कंटाळलेले आहेत. :-) श्वास गुदमरतो त्या गर्दीत. तोडा अड्जेस कर्ना पडेगा...
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Wed, 09/03/2014 - 14:05

In reply to नो नीड by समीरसूर

Permalink

नवश्या मारूतीचं पद्धतशीर

नवश्या मारूतीचं पद्धतशीर मार्केटिंग पलिकडच्या मंगल कार्यालयवाल्यांकडून चालू आहे. कल्जि क्रु नये.
  • Log in or register to post comments

Submitted by समीरसूर on Wed, 09/03/2014 - 14:12

In reply to नवश्या मारूतीचं पद्धतशीर by आदूबाळ

Permalink

शनि-शिंगणापूरचं चालू आहे तसं

'शनि शत्रु नही, मित्र है' हे फेसबुक पेज शनि - शिंगणापूरचं मार्केटिंग करतं; तसंच दिसतंय नवश्या मारुतीचं. चांगलं आहे. उसके घर देर है, अंधेर नही. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by समीरसूर on Wed, 09/03/2014 - 14:15

In reply to नवश्या मारूतीचं पद्धतशीर by आदूबाळ

Permalink

शनि

'शनि शत्रु नही, मित्र है' हे फेसबुक पेज शनि - शिंगणापूरचं मार्केटिंग करतं; तसंच दिसतंय नवश्या मारुतीचं. चांगलं आहे. उसके घर देर है, अंधेर नही. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 09/03/2014 - 14:15

In reply to नो नीड by समीरसूर

Permalink

तोडा अड्जेस कर्ना पडेगा...

तोडा अड्जेस कर्ना पडेगा...
अहो, एकदा का मार्केटिंग यशस्वी झालं तर तोडाच काय, पाटल्या-बिल्वर-चेन-अंगठ्या, झालंच तर बिस्किटे सग्गळं सग्गळं अ‍ॅडजेस करू, हाकानाका.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Wed, 09/03/2014 - 12:45

Permalink

अजून

१. भिकार्‍यांच्या टोळीला कॉण्ट्रक्ट द्यावा लागेल २. माजोरडे पुजारी ३. दर्शनाला लागणारी रांग (त्यासाठी देवाला दुपारी झोपवा, सकाळ संध्याकाळ कपडे बदला.) ४. चेंगरा-चेंगरी ५. सोशल मीडिया चा वापर याने "मिपाद्वार देवस्थान" चांगलेच फेमस होइल ४.लहान मुलांसाठी चा स्पेशल देवाची सध्या वानवा आहे , सटवाई , जिवती ई. त्यांची मंदीरे नहियेत फारशी.. त्यांना स्कोप द्यावा.. आणि देवी असल्याकारणाने साड्या, दागिने यांची मिळकत वाढते
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Wed, 09/03/2014 - 14:09

In reply to अजून by कपिलमुनी

Permalink

लहान मुलांसाठी चा स्पेशल

लहान मुलांसाठी चा स्पेशल देवाची सध्या वानवा आहे
हां ये बात! असं सुपरस्पेशलायझेशन पायजे. पेडोआर्थोडेंटिस्ट (लहान मुलांच्या हिरड्यांचा डागदर) असतो तसं खास लहान मुलांसाठी पेशल देव हवाच.
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on Wed, 09/03/2014 - 15:26

In reply to अजून by कपिलमुनी

Permalink

आयला माझी आयडीया चोरलीत...

भिकार्‍यांच्या टोळीला कॉण्ट्रक्ट द्यावा लागेल हेच लिहायला आलो होतो...भिकारी पण आपलेच ठेवावेत...!! बाकी किर्तनकार म्हणून जीभौ ना विचारावे काय?
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com