एक बालाजी/साई बाबा/हनुमान/शंकर/वैष्णोदेवी यांचे मंदिर उभारायचे. हा सगळ्यात सोपा मार्ग. देव नॅशनल (इंटरनॅशनल) अपील असणारा हवा. प्रदेशिक देवांच्या मंदिरात कमाई फारशी नाही. म्हणूनच दत्त, खंडोबा, स्वामी समर्थ आदी मंदिरे इतकी श्रीमंत नाहीत. स्टार लेव्हलचा देव असला की मंदिर आपसूकच ग्लॅमरस बनते. उद्घाटनाला एखादा सेलिब्रिटी बोलवायचा. भरपूर जाहिरात करायची. हळूच 'नवसाला पावणारा' अशी बातमी सोडून द्यायची. दगडूशेठ गणपती हा पूर्वी (९० च्या दशकात) नवसाला पावणारा म्हणून फेमस नव्हता. गेल्या १०-१२ वर्षात जोरदार मार्केटिंग करून त्याला हे बिरूद मिळाले आहे. त्यासाठी बिझनेस डेवलपमेंट ऑफीसर्स नेमायचे. त्यांना क्लायंट्स आणायला सांगायचे आणि त्यावर ५% कमिशन द्यायचे. काही मोठी माणसे भक्त म्हणून नेमायची. गरज पडल्यास दान पेटीतला कट त्यांना द्यायचा. मंदिरात चविष्ट असा प्रसाद अहोरात्र ठेवायचा. जसा तिरुपती बालाजीचा लाडू प्रसिद्ध आहे तसलं काहीतरी स्पेशल ठेवायचं. ब्रँड डेवलप करण्यात प्रसाद मोठी भूमिका बजावतो. काजूकतली किंवा पिस्ता बर्फी असा तगडा प्रसाद ठेवायचा. आंडू-पांडू साखरफुटाणे वगैरे नाही ठेवायचे. सुरुवातीचा खर्च गुंतवणूक म्हणून नेटाने करत रहायचा. मंदिरासाठी सुरुवातीला कुठेतरी आडवळणाला ५०० स्क्वे. फू. जागा पुरेशी आहे. नंतर ती आपसूकच वाढत जाते. सगळ्या मिपाकरांनी मिळून दहा-दहा हजार रुपये काढले तर असे एक छानसे मंदिर सहज उभे राहू शकते. गुंतवणुकीच्या प्रमाणात मंदिराच्या उत्पन्नाचा शेअर वाटून घेण्याचे ठरवून टाकायचे. मंदिरात छान-छान भजने सतत चालू ठेवायची. एक दिवा/धुनी सतत पेटत ठेवायचे. समोर एका सुरेख बोर्डावर त्याची कपोलकल्पित कहाणी लिहायची. "श्री ---- यांच्या या पवित्र देवळाच्या बांधकामासाठी पाया खोदतांना या जागेवर जमिनीच्या आठ फूट खाली एक पुरातन समई सापडली. समई बाहेर काढताच ती तेवत असल्याचा भास सगळ्यांना झाला. नंतर त्या समईची विधीवत पूजा करून ज्योत पेटवण्यात आली. समईमधले तेल संपले तरी समई अखंड तेवत असते. ही श्री ---- यांची किमया! त्यांच्या या कृपेचा प्रसाद आपणा सर्वांवर अखंड बरसत राहो ही प्रार्थना!" अशी ष्टोरी लिहिली की मंदिर फेमस व्हायला वेळ लागणार नाही. अशी समई सापडेल अशी व्यवस्था पाया खोदण्याच्या आधी करून ठेवावी.
अजून एखादे वैशिष्ट्य डेवलप केल्यास ब्रँड व्हॅल्यू कैक पटीने वाढेल. उदाहरणार्थ १००१ वेळा विशिष्ट मंत्राचा जप पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात उपाशीपोटी बसून केल्यास घरातल्या सगळ्यांचे आरोग्य चांगले राहते किंवा उपास करून देवाचे दर्शन घेतल्यानंतर अन्नदान केल्यास घरादाराला बरकत राहते वगैरे वैशिष्ट्य हळूहळू एस्टॅब्लिश करत जायचे. त्यासाठी सुरेख अभिनय करणारे भोळे भक्त वाटणारे एजंट्स नेमायचे. मंत्र नवीन शोधून काढायचा. नेहमीच्या मंत्रामुळे भक्त इंप्रेस होतीलच असे नाही. मिळणारे फळ मोघम ठेवायचे. म्हणजे आरोग्य चांगले राहील किंवा बरकत राहील वगैरे. तात्काळ मिळणारी स्पेसिफिक फळे मेनु मध्ये ठेवू नयेत. अशी फळे न मिळाल्यास लोकांचा विश्वास उडण्याचा धोका असतो.
अशा ष्टोर्या प्रसिद्ध झाल्या की मग मस्त ब्रँड तयार होईल. अधून-मधून धार्मिक कार्यक्रम घेत रहायचे. सेलिब्रिटीजना बोलवत रहायचे. अगदी सुरेखा पुणेकर, बाबासाहेब पुरंदरे, राजकुमार तांगडे, सई ताम्हणकर, राखी सावंत, परिणीती चोप्रा, पूनम पांडे, माधुरी पुरंदरे, सुधीर गाडगीळ, अतुल पेठे, भाई वैद्य (थोडा निराळा कार्यक्रम ठेवून), मेधा पाटकर, भैय्युजी महाराज, सैफ अली खान, जेनेलिया डिसुझा, मानसी नाईक, बाबा आढाव, शमसुद्दीन तांबोळी, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, सिंधूताई सपकाळ, सुरेश कलमाडी, अनिल शिरोळे, जितेंद्र आव्हाड असे सगळ्यांना बोलवायचे. कुठलाच भेदभाव ठेवायचा नाही.
दहा वर्षात आपण सगळे मर्सिडीझ मधून फिरत असू. मला 'नोकरी बदलायची आहे' असं आर्जव टाकण्याची गरज पडणार नाही. :-)
एकच अडचण आहे; हे सगळं करण्यासाठी जे मन लागतं ते कुठून मिळवायचं? बाकी सब तो चुटकी में अरेंज हो जायेगा... :-)
वाचने
35844
प्रतिक्रिया
165
मिसळपाव
प्रतिक्रिया
आयला, खरंच्च की. अॅडीशनल
In reply to चुकलात तुम्ही. आमच्या देवळात by बॅटमॅन
मंदीर गावाबाहेर वगैरे केल्यास
नो नीड
In reply to मंदीर गावाबाहेर वगैरे केल्यास by बाळ सप्रे
नवश्या मारूतीचं पद्धतशीर
In reply to नो नीड by समीरसूर
शनि-शिंगणापूरचं चालू आहे तसं
In reply to नवश्या मारूतीचं पद्धतशीर by आदूबाळ
शनि
In reply to नवश्या मारूतीचं पद्धतशीर by आदूबाळ
तोडा अड्जेस कर्ना पडेगा...
In reply to नो नीड by समीरसूर
अजून
लहान मुलांसाठी चा स्पेशल
In reply to अजून by कपिलमुनी
आयला माझी आयडीया चोरलीत...
In reply to अजून by कपिलमुनी
खिक. जीभौंची कीर्तने कशावर
In reply to आयला माझी आयडीया चोरलीत... by योगी९००
बाळासाहेब सप्रे यांच्याशी
मंदिरासाठी ह्व्या असलेल्या
चला
हा धागा आठवण्याचे कारण काल
हीहीही
In reply to हा धागा आठवण्याचे कारण काल by रेवती
(No subject)
In reply to हीहीही by कवितानागेश
माऊली!
In reply to हीहीही by कवितानागेश
महान उपाय. बघता बघता इथं इतके
In reply to हीहीही by कवितानागेश
जबर्या
In reply to हीहीही by कवितानागेश
हाहाहा
In reply to हा धागा आठवण्याचे कारण काल by रेवती
(माझ्या एका मित्राने मी
In reply to हाहाहा by समीरसूर
(माझ्या एका मित्राने मी व्हॉट्सअॅपला 'फालतू' म्हटलं म्हणून माझ्याशी कट्टी घेतली आहे. Smile कशालाही कुणालाही शिव्या घाला; व्हॉट्सअॅपला शिव्या घालाल तर कित्येक जणांचा राग ओढवून घ्याल अशी परिस्थिती आहे आजकालची. असो. लोकं व्हॉट्सअॅपसाठीच जगतात आजकाल.)उगाच नाय फेसबुकवाल्या मारक झुकरबर्गनं व्हॉट्सअॅप १९ बिलियन (तेच ते १९ वर नऊsssssssss शुन्ये ! ;) ) मोजून विकत घेतलं :)हाहाहा
In reply to हा धागा आठवण्याचे कारण काल by रेवती
व्हॉट्सअॅप
In reply to हाहाहा by समीरसूर
हेच म्हणते आणि म्हणूनच मी
In reply to व्हॉट्सअॅप by कपिलमुनी