एक बालाजी/साई बाबा/हनुमान/शंकर/वैष्णोदेवी यांचे मंदिर उभारायचे. हा सगळ्यात सोपा मार्ग. देव नॅशनल (इंटरनॅशनल) अपील असणारा हवा. प्रदेशिक देवांच्या मंदिरात कमाई फारशी नाही. म्हणूनच दत्त, खंडोबा, स्वामी समर्थ आदी मंदिरे इतकी श्रीमंत नाहीत. स्टार लेव्हलचा देव असला की मंदिर आपसूकच ग्लॅमरस बनते. उद्घाटनाला एखादा सेलिब्रिटी बोलवायचा. भरपूर जाहिरात करायची. हळूच 'नवसाला पावणारा' अशी बातमी सोडून द्यायची. दगडूशेठ गणपती हा पूर्वी (९० च्या दशकात) नवसाला पावणारा म्हणून फेमस नव्हता. गेल्या १०-१२ वर्षात जोरदार मार्केटिंग करून त्याला हे बिरूद मिळाले आहे. त्यासाठी बिझनेस डेवलपमेंट ऑफीसर्स नेमायचे. त्यांना क्लायंट्स आणायला सांगायचे आणि त्यावर ५% कमिशन द्यायचे. काही मोठी माणसे भक्त म्हणून नेमायची. गरज पडल्यास दान पेटीतला कट त्यांना द्यायचा. मंदिरात चविष्ट असा प्रसाद अहोरात्र ठेवायचा. जसा तिरुपती बालाजीचा लाडू प्रसिद्ध आहे तसलं काहीतरी स्पेशल ठेवायचं. ब्रँड डेवलप करण्यात प्रसाद मोठी भूमिका बजावतो. काजूकतली किंवा पिस्ता बर्फी असा तगडा प्रसाद ठेवायचा. आंडू-पांडू साखरफुटाणे वगैरे नाही ठेवायचे. सुरुवातीचा खर्च गुंतवणूक म्हणून नेटाने करत रहायचा. मंदिरासाठी सुरुवातीला कुठेतरी आडवळणाला ५०० स्क्वे. फू. जागा पुरेशी आहे. नंतर ती आपसूकच वाढत जाते. सगळ्या मिपाकरांनी मिळून दहा-दहा हजार रुपये काढले तर असे एक छानसे मंदिर सहज उभे राहू शकते. गुंतवणुकीच्या प्रमाणात मंदिराच्या उत्पन्नाचा शेअर वाटून घेण्याचे ठरवून टाकायचे. मंदिरात छान-छान भजने सतत चालू ठेवायची. एक दिवा/धुनी सतत पेटत ठेवायचे. समोर एका सुरेख बोर्डावर त्याची कपोलकल्पित कहाणी लिहायची. "श्री ---- यांच्या या पवित्र देवळाच्या बांधकामासाठी पाया खोदतांना या जागेवर जमिनीच्या आठ फूट खाली एक पुरातन समई सापडली. समई बाहेर काढताच ती तेवत असल्याचा भास सगळ्यांना झाला. नंतर त्या समईची विधीवत पूजा करून ज्योत पेटवण्यात आली. समईमधले तेल संपले तरी समई अखंड तेवत असते. ही श्री ---- यांची किमया! त्यांच्या या कृपेचा प्रसाद आपणा सर्वांवर अखंड बरसत राहो ही प्रार्थना!" अशी ष्टोरी लिहिली की मंदिर फेमस व्हायला वेळ लागणार नाही. अशी समई सापडेल अशी व्यवस्था पाया खोदण्याच्या आधी करून ठेवावी.
अजून एखादे वैशिष्ट्य डेवलप केल्यास ब्रँड व्हॅल्यू कैक पटीने वाढेल. उदाहरणार्थ १००१ वेळा विशिष्ट मंत्राचा जप पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात उपाशीपोटी बसून केल्यास घरातल्या सगळ्यांचे आरोग्य चांगले राहते किंवा उपास करून देवाचे दर्शन घेतल्यानंतर अन्नदान केल्यास घरादाराला बरकत राहते वगैरे वैशिष्ट्य हळूहळू एस्टॅब्लिश करत जायचे. त्यासाठी सुरेख अभिनय करणारे भोळे भक्त वाटणारे एजंट्स नेमायचे. मंत्र नवीन शोधून काढायचा. नेहमीच्या मंत्रामुळे भक्त इंप्रेस होतीलच असे नाही. मिळणारे फळ मोघम ठेवायचे. म्हणजे आरोग्य चांगले राहील किंवा बरकत राहील वगैरे. तात्काळ मिळणारी स्पेसिफिक फळे मेनु मध्ये ठेवू नयेत. अशी फळे न मिळाल्यास लोकांचा विश्वास उडण्याचा धोका असतो.
अशा ष्टोर्या प्रसिद्ध झाल्या की मग मस्त ब्रँड तयार होईल. अधून-मधून धार्मिक कार्यक्रम घेत रहायचे. सेलिब्रिटीजना बोलवत रहायचे. अगदी सुरेखा पुणेकर, बाबासाहेब पुरंदरे, राजकुमार तांगडे, सई ताम्हणकर, राखी सावंत, परिणीती चोप्रा, पूनम पांडे, माधुरी पुरंदरे, सुधीर गाडगीळ, अतुल पेठे, भाई वैद्य (थोडा निराळा कार्यक्रम ठेवून), मेधा पाटकर, भैय्युजी महाराज, सैफ अली खान, जेनेलिया डिसुझा, मानसी नाईक, बाबा आढाव, शमसुद्दीन तांबोळी, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, सिंधूताई सपकाळ, सुरेश कलमाडी, अनिल शिरोळे, जितेंद्र आव्हाड असे सगळ्यांना बोलवायचे. कुठलाच भेदभाव ठेवायचा नाही.
दहा वर्षात आपण सगळे मर्सिडीझ मधून फिरत असू. मला 'नोकरी बदलायची आहे' असं आर्जव टाकण्याची गरज पडणार नाही. :-)
एकच अडचण आहे; हे सगळं करण्यासाठी जे मन लागतं ते कुठून मिळवायचं? बाकी सब तो चुटकी में अरेंज हो जायेगा... :-)
वाचने
35844
प्रतिक्रिया
165
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा ... मागे मी आणि एक
छ्या... विकत घेतलेल्या
In reply to हा हा हा ... मागे मी आणि एक by सुहास झेले
हौ!
In reply to छ्या... विकत घेतलेल्या by आदूबाळ
हा हा हा
In reply to हौ! by पैसा
असा प्रकार खरोखर घडला आहे
In reply to हौ! by पैसा
नाही रे क खटपट्या पण विचारुन
In reply to असा प्रकार खरोखर घडला आहे by खटपट्या
चमत्काराशिवाय नमस्कार नाही
In reply to नाही रे क खटपट्या पण विचारुन by प्रमोद देर्देकर
आणखी ऐक …
In reply to छ्या... विकत घेतलेल्या by आदूबाळ
सौजन्यः Wikipedia
In reply to आणखी ऐक … by पगला गजोधर
हे सगळं करण्यासाठी जे मन
हे सगळं करण्यासाठी जे मन लागतं ते कुठून मिळवायचं?च्च्च्च्च्च ! असा विचार केलात तर मग तुम्ही चलाख आस्तिक कसे बनणार ? आणि ते नाही बनलात तर आस्तिकतेच्या आधारे धनदंडगे कसे बनणार ?? मला तर तुमची काळजी वाटायला लागलीय ;) :)आयडिया!
In reply to हे सगळं करण्यासाठी जे मन by डॉ सुहास म्हात्रे
अंमलबजावणी करण्यासाठी
In reply to आयडिया! by समीरसूर
चलाख आस्तिक आणि चलाख नास्तिक
In reply to अंमलबजावणी करण्यासाठी by मृत्युन्जय
आता आधी जुनी समई शोधणं आलं..
खोदा म्हणजे सापडेल.
In reply to आता आधी जुनी समई शोधणं आलं.. by कवितानागेश
पितळेची समई चिखलात लोळवा आणि
In reply to आता आधी जुनी समई शोधणं आलं.. by कवितानागेश
अस होय?
ग्यारंटी देतो कुणी ही फिरकणार
कोणत्या विदाच्या आधारे तुम्ही
In reply to ग्यारंटी देतो कुणी ही फिरकणार by विवेकपटाईत
कोणत्या विदाच्या आधारे तुम्ही
In reply to कोणत्या विदाच्या आधारे तुम्ही by धन्या
जमतो जमतो
In reply to कोणत्या विदाच्या आधारे तुम्ही by विवेकपटाईत
हल्ली
मंदिर स्टार्ट-अप सारखे मसजिद
In reply to हल्ली by माईसाहेब कुरसूंदीकर
मंदिर स्टार्ट-अप सारखे मसजिद स्टार्ट-अप,चर्च स्टार्ट-अप असाही विचार करता येईल.तुम्ही कोठून (कुठल्या देशातून) पैसा खेचू शकाल त्यावर हे अवलंबून आहे ;)यावरुन व्यंकटेश माडगूळकरांची
.
फक्त मूर्तीवरचा प्राईस ट्याग
In reply to . by पोटे
ठ्ठो =))
In reply to फक्त मूर्तीवरचा प्राईस ट्याग by आदूबाळ
आणी हो
In reply to . by पोटे
एका रिकाम्या जागेवर हिरवी
एवढे करण्यापेक्षा दाढी करणे
In reply to एका रिकाम्या जागेवर हिरवी by मंदार दिलीप जोशी
सुंदर ललनांचे ISIS काय करत
In reply to एवढे करण्यापेक्षा दाढी करणे by नानासाहेब नेफळे
नित्यानंद,आसारामने काय केले
In reply to सुंदर ललनांचे ISIS काय करत by मंदार दिलीप जोशी
तुम्ही काय केले ते पण तुम्ही
In reply to नित्यानंद,आसारामने काय केले by नानासाहेब नेफळे
मला काही रोल आहे का रेवतीताई;
In reply to एवढे करण्यापेक्षा दाढी करणे by नानासाहेब नेफळे
"पहुंचे हुए बाबा" म्हणुन
In reply to मला काही रोल आहे का रेवतीताई; by विलासराव
हे तर राहीलंचः
In reply to मला काही रोल आहे का रेवतीताई; by विलासराव
सगळे फोटू भारी आहेत! तुम्ही
In reply to हे तर राहीलंचः by विलासराव
नक्कीच ! दाढीवाले आणि
In reply to सगळे फोटू भारी आहेत! तुम्ही by रेवती
म्हणुन्च तर ईतके फोटो टाकले
In reply to नक्कीच ! दाढीवाले आणि by डॉ सुहास म्हात्रे
"सिनीयर अॅडव्हायजरी बाबा" या
In reply to म्हणुन्च तर ईतके फोटो टाकले by विलासराव
पर्फेक्ट!
In reply to "सिनीयर अॅडव्हायजरी बाबा" या by काळा पहाड
चला विलासराव ! काय म्हणता ?
In reply to "सिनीयर अॅडव्हायजरी बाबा" या by काळा पहाड
मी विचारता विचारता CEO ची
In reply to चला विलासराव ! काय म्हणता ? by डॉ सुहास म्हात्रे
शुभकार्याला मुहुर्ताची गरज
In reply to चला विलासराव ! काय म्हणता ? by डॉ सुहास म्हात्रे
आइईशप्पत...आता १ मौलवी पण
In reply to शुभकार्याला मुहुर्ताची गरज by विलासराव
ज्यास्त करू नका.. खेड्यातले
In reply to आइईशप्पत...आता १ मौलवी पण by टवाळ कार्टा
मग जरा बाजुला बसवु...मार्केट
In reply to ज्यास्त करू नका.. खेड्यातले by काळा पहाड
हा सेफ मार्ग आहे.
In reply to एका रिकाम्या जागेवर हिरवी by मंदार दिलीप जोशी
कोण पुढाकार घेणार आहे ते
मिपाकडे जबरदस्त म्यान (आणि
आयला खरंच की!
In reply to मिपाकडे जबरदस्त म्यान (आणि by आदूबाळ
अय बॅट्या
In reply to आयला खरंच की! by बॅटमॅन
नाही नाही. सातवाहनच प्राचीन
In reply to अय बॅट्या by इरसाल
हो आता "नो-वारी" आलीय...
In reply to नाही नाही. सातवाहनच प्राचीन by बॅटमॅन
अगदी अगदी
In reply to हो आता "नो-वारी" आलीय... by आदूबाळ
चुकुन प्यारे लाल असे वाचले
In reply to नाही नाही. सातवाहनच प्राचीन by बॅटमॅन
शिलालेखात सिंधू संस्कृतीची
In reply to आयला खरंच की! by बॅटमॅन
हाहाहाहा, एकच नंबर =)) =))
In reply to शिलालेखात सिंधू संस्कृतीची by डॉ सुहास म्हात्रे
अवांतर-बॅट्या खफ वर तुझ्या
In reply to हाहाहाहा, एकच नंबर =)) =)) by बॅटमॅन
अवांतर- आयला मी नाय काय केलं
In reply to अवांतर-बॅट्या खफ वर तुझ्या by जेपी
सिंधू + ब्राह्मी + इजिप्शियन
In reply to हाहाहाहा, एकच नंबर =)) =)) by बॅटमॅन
हाहाहा, अगदी अगदी
In reply to सिंधू + ब्राह्मी + इजिप्शियन by डॉ सुहास म्हात्रे
सिधम | रञो सातवाहननं
In reply to हाहाहा, अगदी अगदी by बॅटमॅन
गोमिकस वाल्गुदस गामे गोथमं
In reply to सिधम | रञो सातवाहननं by प्रचेतस
खी खी खी.
In reply to गोमिकस वाल्गुदस गामे गोथमं by विजुभाऊ
ॐ स्वस्ति |
In reply to सिधम | रञो सातवाहननं by प्रचेतस
मूळ शिलालेख...
In reply to ॐ स्वस्ति | by बॅटमॅन
पाय लागू सरजी... _/\_
In reply to मूळ शिलालेख... by डॉ सुहास म्हात्रे
छे, छे ! हा शिललेख १०,०००
In reply to पाय लागू सरजी... _/\_ by बॅटमॅन
पुरातन वैदिक संस्कृतीचा
In reply to छे, छे ! हा शिललेख १०,००० by डॉ सुहास म्हात्रे