Skip to main content

मंदिर काढा..

लेखक समीरसूर यांनी मंगळवार, 02/09/2014 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
एक बालाजी/साई बाबा/हनुमान/शंकर/वैष्णोदेवी यांचे मंदिर उभारायचे. हा सगळ्यात सोपा मार्ग. देव नॅशनल (इंटरनॅशनल) अपील असणारा हवा. प्रदेशिक देवांच्या मंदिरात कमाई फारशी नाही. म्हणूनच दत्त, खंडोबा, स्वामी समर्थ आदी मंदिरे इतकी श्रीमंत नाहीत. स्टार लेव्हलचा देव असला की मंदिर आपसूकच ग्लॅमरस बनते. उद्घाटनाला एखादा सेलिब्रिटी बोलवायचा. भरपूर जाहिरात करायची. हळूच 'नवसाला पावणारा' अशी बातमी सोडून द्यायची. दगडूशेठ गणपती हा पूर्वी (९० च्या दशकात) नवसाला पावणारा म्हणून फेमस नव्हता. गेल्या १०-१२ वर्षात जोरदार मार्केटिंग करून त्याला हे बिरूद मिळाले आहे. त्यासाठी बिझनेस डेवलपमेंट ऑफीसर्स नेमायचे. त्यांना क्लायंट्स आणायला सांगायचे आणि त्यावर ५% कमिशन द्यायचे. काही मोठी माणसे भक्त म्हणून नेमायची. गरज पडल्यास दान पेटीतला कट त्यांना द्यायचा. मंदिरात चविष्ट असा प्रसाद अहोरात्र ठेवायचा. जसा तिरुपती बालाजीचा लाडू प्रसिद्ध आहे तसलं काहीतरी स्पेशल ठेवायचं. ब्रँड डेवलप करण्यात प्रसाद मोठी भूमिका बजावतो. काजूकतली किंवा पिस्ता बर्फी असा तगडा प्रसाद ठेवायचा. आंडू-पांडू साखरफुटाणे वगैरे नाही ठेवायचे. सुरुवातीचा खर्च गुंतवणूक म्हणून नेटाने करत रहायचा. मंदिरासाठी सुरुवातीला कुठेतरी आडवळणाला ५०० स्क्वे. फू. जागा पुरेशी आहे. नंतर ती आपसूकच वाढत जाते. सगळ्या मिपाकरांनी मिळून दहा-दहा हजार रुपये काढले तर असे एक छानसे मंदिर सहज उभे राहू शकते. गुंतवणुकीच्या प्रमाणात मंदिराच्या उत्पन्नाचा शेअर वाटून घेण्याचे ठरवून टाकायचे. मंदिरात छान-छान भजने सतत चालू ठेवायची. एक दिवा/धुनी सतत पेटत ठेवायचे. समोर एका सुरेख बोर्डावर त्याची कपोलकल्पित कहाणी लिहायची. "श्री ---- यांच्या या पवित्र देवळाच्या बांधकामासाठी पाया खोदतांना या जागेवर जमिनीच्या आठ फूट खाली एक पुरातन समई सापडली. समई बाहेर काढताच ती तेवत असल्याचा भास सगळ्यांना झाला. नंतर त्या समईची विधीवत पूजा करून ज्योत पेटवण्यात आली. समईमधले तेल संपले तरी समई अखंड तेवत असते. ही श्री ---- यांची किमया! त्यांच्या या कृपेचा प्रसाद आपणा सर्वांवर अखंड बरसत राहो ही प्रार्थना!" अशी ष्टोरी लिहिली की मंदिर फेमस व्हायला वेळ लागणार नाही. अशी समई सापडेल अशी व्यवस्था पाया खोदण्याच्या आधी करून ठेवावी. अजून एखादे वैशिष्ट्य डेवलप केल्यास ब्रँड व्हॅल्यू कैक पटीने वाढेल. उदाहरणार्थ १००१ वेळा विशिष्ट मंत्राचा जप पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात उपाशीपोटी बसून केल्यास घरातल्या सगळ्यांचे आरोग्य चांगले राहते किंवा उपास करून देवाचे दर्शन घेतल्यानंतर अन्नदान केल्यास घरादाराला बरकत राहते वगैरे वैशिष्ट्य हळूहळू एस्टॅब्लिश करत जायचे. त्यासाठी सुरेख अभिनय करणारे भोळे भक्त वाटणारे एजंट्स नेमायचे. मंत्र नवीन शोधून काढायचा. नेहमीच्या मंत्रामुळे भक्त इंप्रेस होतीलच असे नाही. मिळणारे फळ मोघम ठेवायचे. म्हणजे आरोग्य चांगले राहील किंवा बरकत राहील वगैरे. तात्काळ मिळणारी स्पेसिफिक फळे मेनु मध्ये ठेवू नयेत. अशी फळे न मिळाल्यास लोकांचा विश्वास उडण्याचा धोका असतो. अशा ष्टोर्‍या प्रसिद्ध झाल्या की मग मस्त ब्रँड तयार होईल. अधून-मधून धार्मिक कार्यक्रम घेत रहायचे. सेलिब्रिटीजना बोलवत रहायचे. अगदी सुरेखा पुणेकर, बाबासाहेब पुरंदरे, राजकुमार तांगडे, सई ताम्हणकर, राखी सावंत, परिणीती चोप्रा, पूनम पांडे, माधुरी पुरंदरे, सुधीर गाडगीळ, अतुल पेठे, भाई वैद्य (थोडा निराळा कार्यक्रम ठेवून), मेधा पाटकर, भैय्युजी महाराज, सैफ अली खान, जेनेलिया डिसुझा, मानसी नाईक, बाबा आढाव, शमसुद्दीन तांबोळी, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, सिंधूताई सपकाळ, सुरेश कलमाडी, अनिल शिरोळे, जितेंद्र आव्हाड असे सगळ्यांना बोलवायचे. कुठलाच भेदभाव ठेवायचा नाही. दहा वर्षात आपण सगळे मर्सिडीझ मधून फिरत असू. मला 'नोकरी बदलायची आहे' असं आर्जव टाकण्याची गरज पडणार नाही. :-) एकच अडचण आहे; हे सगळं करण्यासाठी जे मन लागतं ते कुठून मिळवायचं? बाकी सब तो चुटकी में अरेंज हो जायेगा... :-)

वाचने 35844
प्रतिक्रिया 165

प्रतिक्रिया

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

वर एक्कासाहेबांनी जो मूळ खर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रा शिलालेख दिलाय तो खर्रर्रर्रर्रर्ररंतर मीच आमच्या गुहेत प्रागैतिहासिक काळात रंगवून ठेवलेल्या भित्तीचित्राचे वर्णन आहे. हे बघा! Pre-Historic Cave Paintings पहा, ते डावीकडे गुहेतील घाटदार शिल्पे पाहून 'युरेका! युरेका!' करणारे वल्लीशेठ आणि उजवीकडे तो ब्रूस वेन आणि त्याचा तेव्हा उलिसाच असणारा अंगरखापण दिसतोय... म्हणूनच आजपर्यंत ह्या हरप्पावाल्यांची लिपी वाचता आलेली नाही. भयंकर म्हणजे भयंकर अशुद्ध लिहायचे हो तेव्हापण. आणि अक्षरपण काय ती गिचमिड. स्वतः दिवसातून चारचारदा अंघोळ करीत बसायचे सार्वजनिक ठिकाणी. पण अक्षर काही सुधारणार नाहीत शिंचे. ;-)

In reply to by एस

तरीच ! मी हेच म्हणत होतो की अजून शास्त्रज्ञांनी (की मिपासंमंने) प्राचीन गुहांत सापडलेल्या जीवाश्मांतल्या डीएनए पासून अजून एखादी आयडी बनवण्याची आयडिया कशी नाय केली ? =))

In reply to by टवाळ कार्टा

ते शेपूट आहे. उत्क्रांती होत असतानाही काहीकाही जणांची शेपटं तशीच राहिली होती, याचे पुरावे. मग त्यांनी त्यांचे स्वतंत्र कंपू - आपलं टोळ्या बनवल्या आणि सुखेनैव बागडू लागले. :-))

In reply to by प्रचेतस

इतका गंभीर धागा आणि त्यावर हे असे अवांतर पाहून एक मिपाकर म्हणून आज शरम वगैरे वाटली.

In reply to by पैसा

बाकी शरम वगैरें वाटण्यासाठी आधीं मिंपाकर वैग्रें व्हायला लागतें असें पितळ्यांच्या दुकानात रांगेत हुभे असतानां कानांवर पडलें काल! आमच्या अश्मयुगात असें काहीं नव्हतें हों. कलयुग आहें कलयुग तुम्हांला सांगतों बघा.

In reply to by एस

बरोबरे तं मं. वाटलंच अश्मयुगाच्या गोष्टी करताय म्हणजे पुण्यपत्तनातले पेठीय दिसताँय. तेव्हाचे नमुने अजून आहेत तिथे.

In reply to by पैसा

तेव्हासुद्धा शाखा कुठेच नसायच्या आणि तांब्यापितळेची भांडीसुद्धा रांगेत उभी राहूनच घ्यायला लागायची माहितीये का! ;-)

In reply to by प्यारे१

फक्त तेव्हा अंगावर बाल्दी ओतून हाः हूः हॅः हहहोः असे हुडहुडून झाल्यावर लगेच "कोण होता रे तो च्यालेंज करणारा मला?" अशी डरकाळी फोडून हातात धनुष्यबाण घेऊन च्यालेंजरच्या मागे लागत असत. ते पहा, ते खाली दिसतंय बघा.

छ्या! मनाबिनाचा विचार नै करायचा! तो केला की निम्मी कामं रखडतात. मी भोळ्या भक्तिणीचा रोल करायला तयार आहे. ज्यांना भक्ताचा रोल करायचाय व भोळा भाव चेहर्‍यावर आणता येत नाही त्यांना अपर्णाकडून मेकपून घ्यायचं. सानिकेकडून प्रसादाची रेशिपी मिळेल. मृणालिनीला प्रसादाचं कॉन्ट्रॅक्ट द्यायचं. उदा. प्रसादाची उकड इन कुकी कप विथ अ डॉलप ऑफ बटर. माझ्याकडील आजोसासूबाईंची पितळ्याची मोठी समई जमिनीत पुरण्यापासून ते पुन्हा जमिनीतून काढेपर्यंत मी देईन. त्याची काळजी करू नका. काही मिपाकरणी मस्त कपडे शिवतात. त्यांना देवळाबाहेर बसणार्‍या साधूंचे भगवे कपडे शिवण्यास सांगावे. बघता बघता मंदीर मोठे होईल.

In reply to by जेपी

नक्कीच! विश्वस्तांना व्हॉलंटीअर वर्क म्हणून रुद्राक्ष माळा (एका मिपाकारांच्या प्ल्याष्टीकच्या कारखान्यात तयार केलेल्या) घालून अठवड्याला किमान ३ तास भजन करायला लागेल. वर्क अवर्स फ्लेक्सीबल आहेत. भजनाच्या चाली य शिनेमाच्या गाण्यावरून तयार केलेल्या असतील. काही मिपाकवींना भजने पाडण्यासाठी बशीवले आहे. नुकतेच तयार होऊन आलेल्या भजनाच्या दोन ओळी ऐकवते. चाल: टू स्टेटस शिनेमातील इसकी उसकी गाणे. गणपतीचे भजन. शिवजी का पुत्तर, है नाम लंबोदर, दुष्टांना देतो, मार लै लै, हे गाताना हसू आल्यास कामाच्या वेळात १५ मिनिटांनी वाढ केली जाईल. हसू न येण्यासाठी वर्कशॉप्स वेळोवेळी घेतली जातात त्यांना हजेरी लावणे बंधनकारक नसले तरी कामाच्या दृष्टीने उपकारक आहे.

In reply to by रेवती

रेवती, मी काय करु..? अंगात आणवून सांगु का की देवी म्हणतेय मला वर काढा...हां, आता डोईवरचे केस थोडे वाढवावे लागतिल.

In reply to by स्वप्नांची राणी

हे बघा, अभ्यास वाढवा. अंगात येणारी स्थानं असतील तर तुम्हाला हायक्लास, आयटी आणि श्रीमंत परप्रांतीय ह्यांना मुकावं लागेल. दे डोण्ट अटेण्ड सच प्लेसेस यु सी. दॅट्स सो ग्रोस.

In reply to by स्वप्नांची राणी

एकतर तुम्हाला नाव बदलावे लागेल स्वराताई! नाव, जे अम्मा, माता, देवी याला जोडल्याल भक्तीरसात बुडवून वाळवायला घातल्यासारखे वाटेल ते चालेल. किटीपार्टीजमध्ये आपल्याला हल्ली दृष्टांत होतो, अध्यात्मिक विचार वगैरे बोलून दाखवावे. त्याने वातावरण निर्मीती होते. आपल्या घरच्या किटीपार्टीत फक्त फळांचे तुकडे, वेगळाली ज्युसेस हाच आहार ठेवावा. इथपर्यंत पोहोचलात की आपण कतारमधील एका हाटेलात पुढील चर्चेला भेटू.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

होय तर! या प्रॉजेक्टात पदे पटकन भरली जातात. एक खुर्ची पकडून ठेवणे व आपली सोय करणे गरजेचे असते. ;)

In reply to by रेवती

एक खुर्ची पकडून ठेवणे व आपली सोय करणे गरजेचे असते. आणी त्याबरोबरच आपल्या साथीदाराला असलेल्या पगाराच्या तिप्पट पगारावर आणतापण येते नी मग जबर्दस्त लॉबी पण बनवता येते ;)

In reply to by प्यारे१

आण्भव, आण्भव, हेला आण्भव म्हंतात... हात कुटं... उगाच नाय डोस्क्याचे केस पाढरे झाले / गेले =))

In reply to by प्यारे१

हे असं एकदम होत नसतं. एनर्जी, पैसा इन्व्हेस्ट करणारे लोक्स एकाचवेळी भेटायला नकोत का? आत्ताही सगळे एकत्र आलेत ही देवाचीच कृपा!

In reply to by रेवती

हांग आश्शी, हे म्हंजे आण्भवाचे बोल ! गोष्टिची येळकाळ याय्ला लाग्ती, मंग ती व्हती, तवर न्हाय. हात कुटं प्यारेजी ?!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मर्दानु पन मेण मुद्दा र्‍हायला की. जागा कुनाची ढापाची? शेरात तर काय आता जागा मिळाची न्हाय. एकांदा 'माळ' गाटावा लागंन. दोन चार एकर तरी जागा लागनार. कुटनं आनायची गा?

In reply to by प्यारे१

प्यारे काका ,हामची दानपत्तर करुन देवतो. पण प्राब्लेम हाय. लातुरात याव लागेल+ मला मन्दिराच्या हुत्पनात 10 टक्का पायजे+मला विश्वस्त मनुन घ्या पायजे.

कल्पना(विलास) मस्त आहे. फक्त मंदिरासाठी 'मध्यवर्ती' जागा कोणती यावर मिपाकरांचं एकमत होईल याची कुणीतरी हमी घ्या, म्हणजे झालं ;-)

मजा आली. गणपतीची सुद्धा चलत्ती आहे. त्याला कुठलासा राजा बनवून टाकायचा. लालबागच्या राज्याएव्हडं पद्धतशीर मार्केटींग कुठं बघितलं नाही. सामना आणि लोकसत्ता वाल्यांचा फेवरेट देव. आतातर लोकसत्ता उघडला की कोपर्‍यात राज्याच्या लाइव्ह आरतीचा विडिओ सुरू होतो. दोन-चार केबीच्या बातम्यावाचण्यासाठी पेपर उघडला तर मेग्याबायटी विडिओ लाउन फुकट ब्यांडविद्थ जाळतात. :(

In reply to by दादा कोंडके

लालबागच्या राज्याएव्हडं पद्धतशीर मार्केटींग कुठं बघितलं नाही.
अगदी! आमच्या ल्हानपणी सगळ्यात फेमस होता तो गणेश गल्लीचा गणपती. लालबागच्या गणपतीला फार कुणी जात नसे. नंतर त्यांनी काय मार्केटिंग केले ठाऊक नाय, पण गेल्या १०-१२ वर्षांत लालबागचा गणपती लै म्हंजे लैच फेमस झाला!

In reply to by सुनील

तीच तर्‍हा पुण्यातल्या दगडूशेठ गणपतीची. ९० च्या दशकात मी दगडूशेठ गणपतीला त्या भागात कधी गेलो तर जात असे. अगदी मूर्तीजवळ जाऊन दर्शन घेता येत असे. लोकं तिकडे गेलो तर दर्शन घ्यावे अशा पद्धतीने दर्शन घेत असत. मोठे हार, किलो किलो पेढे, नारळांची माळ, महागड्या मिठाया वगैरे घेऊन खास दर्शनासाठी कुणी तेथे जात असल्याचे स्मरत नाही. पुण्याबाहेरही हा गणपती अगदीच मोजक्या लोकांना माहित होता. आमच्या गावाकडे तर कुणालाच माहित नव्हता. पण साधारण २००० पासून या गणपतीचे मार्केटिंग इतके जबरदस्त केले गेले की आज तिथे दर्शन घेण्यासाठी जायचे म्हणजे अंगावर काटा येतो. चतुर्थीच्या दिवशी किमान दोन तास वाट बघावी लागते. भक्त मिठायांचे पुडे, मोठे मोठे पाच-पाचशे रुपयांचे हार वगैरे घेऊन लांब रांगेत तिष्ठत उभे राहतात. कारण काय तर अचानक गेल्या १२-१५ वर्षात दगडूशेठ गणपती हा 'नवसाला पावणारा' हुकुमी देव बनलेला आहे. 'नवसाला पावणारा' ही पदवी मिळाली की मग भक्त गर्दी करणारच. कसा काय झाला हा बदल? 'लालबागचा राजा' मी लहानपणी ऐकला नव्हता. एवढंच काय अगदी १९९५-१९९९ पर्यंत पुण्यात राहून मला 'लालबागचा राजा' माहित नव्हता. नंतर काय चमत्कार घडला आणि तो एकदम स्टार गणपती झाला. आता शेकडो कोटींची मालमत्ता आहे या गणपतीची. तीच तर्‍हा मुंबईच्या सिद्धिविनायकाची. गेल्या १५-२० वर्षात सिद्धिविनायकाचे नशीब पालटले. कुठे जातात हे शेकडो कोटी रुपये आणि शेकडो किलो सोनं-चांदी? कुठल्या चांगल्या लोकोपयोगी कामात सढळ हाताने हा पैसा वापरला जातो? एक-दोन फुटकळ कामे वगळता (ती ही समाजाच्या आणि सरकारच्या दबावाखाली येऊन) ही संस्थाने असं काय भरीव सामाजिक काम करतात? समाजाचा ही संस्थाने इतकी मोठी श्रीमंत झाल्याने काय फायदा होतो? आणि हे फक्त हिंदू मंदिरांच्या बाबतीत घडतेय असं अजिबात नाही. दर्गे आणि मस्जिदींच्या बाबतीत देखील असेच घडते आहे. किंबहुना या ठिकाणी काय शिकवले जाते याबद्दल शंका यावी अशा पद्धतीने दर्गे, मस्जिदी, मदरसे यांच्या संख्येत आणि संपत्तीमध्ये वाढ होते आहे. पुण्यात लकडी पुलाजवळ एक छोटेखानी दर्गा होता. आजच्या घडीला तिथे टोलेजंग मस्जिद उभी आहे. एकेका गावात जिथे पूर्वी १-२ मस्जिदी असत तिथे आता भव्य अशा स्वरुपाच्या ४-५ मस्जिदी आणि मदरसे आहेत. अजमेरचा दर्गा एक असेच उदाहरण. चित्रपटातले तारे तिथे जायला लागल्यापासून हा दर्गा तिरुपती बालाजी, शिर्डी यांच्या रांगेत जाऊन बसलाय. सामान्यांचे छोटे छोटे प्रश्न सुटत नाहीत आणि बड्या सिनेस्टार्सचे नवस कसे काय खात्रीने पूर्ण होतात? अजूनही आपण मंदिरे-मस्जिदींच्या संख्येवरून आपली भक्ती जोखू लागलो तर मग यातून काय साध्य होणार आहे हा फार मोठा प्रश्न आहे. असो.

In reply to by समीरसूर

ही संस्थाने असं काय भरीव सामाजिक काम करतात? समाजाचा ही संस्थाने इतकी मोठी श्रीमंत झाल्याने काय फायदा होतो? त्यांच्या ह्या तथाकथित समाजकार्याची समाजाला खरोखर गरज आहे का? सरकार आपले कर्तव्य का नाही बजावत? गरीबांसाठी शिक्षण, वैद्यकिय सेवा, पिण्याच्या पाण्याची आणि सार्वजनिक शौचालयांची सोय सरकारने करायची आहे. देवस्थानांना ही नसती उठाठेव कोणी सांगितली आहे? ज्या मंदिर व्यवस्थापनाचा गैरव्यवहार, आर्थिक किंवा भक्तांना मिळणारी वागणूक, सिद्ध होतो ती ती देवस्थाने बरखास्त करून टाकावीत. देणग्या, वस्तू आणि पैसा, नियंत्रित कराव्यात. भ्रष्टाचार निपटून काढावा.

In reply to by प्रभाकर पेठकर

देवस्थानांना ही नसती उठाठेव कोणी सांगितली आहे?
पण अशी मदत करून उपकाराच्या ओझ्याखाली लोकांना ठेवलं की यांच्या विरोधात कुठं काही खुट्ट झाली ही लोकं तयार होतात. अगदी जीव द्यायला तयात होतात. लोकशाहीत ही प्रचंड ताकद असते. एक समांतर उदाहरण म्हणून सत्यसाई हॉस्पिटल. त्यांची अब्जावधीची बेकायदा संपत्ती आहे. पण त्यातले काही लाख कोटी खर्च करून त्या इस्पितळात गरीब लोकांचे मोफत इलाज होतात. आणि कुठल्याही पेशंटला ऑपरेशन टेबलावर घेण्याआधी त्या ऑपरेशनची सक्सेस प्रोबॅबिलिटी ९५% पेक्षा जास्त असेल ही खात्री करतात जेणेकरून पेशंट दगाउन नसती आफत येउ नये. उद्या सरकारने काही कारवाई करायची ठरवलीच तर ही लोकं हजारो लोकं जीव द्यायला तयार होतील.

In reply to by सुनील

दिल्लीत ही विकासपुरी येथे लालबागचा देखावा उभा केला आहे. गल्लीते दिल्ली पर्यंत कीर्ती पोहोचली.

ही तर देवाचीच कृपा झाली म्हणायची... जरा कुठे मी म्हणाले, पैशाची फार गरज आहे, तर इतक्या आयड्या!! =))

मला आलरेडी सपान पडलंय....धम्याला पुरावा मागा. तेंव्हा आद्य माता म्हणुन मी स्वतःला घोषित करत आहे.

गणपतीचा उत्सव चालू असतानाच नेमकं दैवतांच्या आणि मंदिरांच्या चेष्टेला ऊत का येतो हे समजत नाही. महान भग्वद्गीतेत सांगितलेल्या भक्तीयोगासारख्या पवित्र हिंदू परंपरांची टिंगल केल्याशिवाय या सुडोसेक्युलर विचारजंतींना आपलं पुरोगामित्व सिद्धच करता येत नाही. आपल्या हिंदूसंस्कृतीतल्या उगवत्या देवालयांबद्दल असले गलिच्छ विचार मांडलेले पाहून एक मिपाकर म्हणून मला शरम वाटली.

In reply to by राजेश घासकडवी

ह्याला म्हणतात सुसंस्कृत प्रतिसाद. दैवतांची वा मंदिरांची कुणी पाकिस्तानी लोकांनी वा युरोपियनांनी टिंगल केली तर मात्र आपण वस्कन अंगावर जायचे."कोण कुठला तू?", "तुझे सामाजिक कामगिरी काय?" "जोड्याने हाणला पहिजे" "तिथल्या तेथे ठेचला पाहिजे" असे प्रतिसाद द्यायचे. समीरसूरच्या जागी कुणी सलमानसूर असता तर असे प्रतिसाद नक्कीच आले असते.

In reply to by राजेश घासकडवी

घासकडवीसाहेब, जाऊ द्या, एवढं टेंशन नका घेऊ. सगळीकडे एग्झॅक्टली असंच चालू आहे. थोडी अतिशयोक्ती असेल कदाचित पण लालबागचा राजा, प्रभादेवीचा सिद्धिविनायक, शिर्डी अशा ठिकाणी नेमकं हेच चालू आहे. जे वास्तवात आहे तेच थोडे अतिरंजित करून लिहिले आहे इतकेच. लिखाणात उपहास आहे हे आपल्या लक्षात आले असेलच. देवांची, देवळांची टिंगल करण्याचा हेतू अजिबात नाही. असेल तर फक्त देवालयांच्या नावाखाली जो गलिच्छ बाजार मांडला गेलाय त्यावर प्रकाश टाकण्याचा क्षीण प्रयत्न आहे. देवांची टिंगल हा मुख्य विचार असता तर 'देऊळ' (आणि 'ओह माय गॉड' देखील)चित्रपट एवढा गाजला नसता आणि राष्ट्रीय पातळीवरची पारितोषिके त्यास मिळाली नसती. आपल्या देवाच्या आणि भक्तीच्या संकल्पना थोड्या तपासून बघायला पाहिजेत. आणि हे मस्जिद, चर्च इत्यादींच्या बाबतीतही तंतोतंत लागू पडतं. नुसती मंदिरे, मस्जिदी, चर्चेस उभारून देव कळला असता तर जगात देव-धर्मावरून इतकी अमाप हिंसा घडलीच नसती.

In reply to by मंदार दिलीप जोशी

'ओह माय गॉड' ५० कोटीपेक्षा जास्त व्यवसाय करून गेला आणि ते ही परेश रावल सारखा चरित्र अभिनेता मुख्य भूमिकेत असतांना. रणबीर कपूरचा 'बर्फी' त्याच दरम्यान 'ओएमजी' पेक्षा किंचित जास्त व्यवसाय करून गेला होता. 'ओएमजी' बजेटच्या मानाने चिक्कार चालला आणि लोकांना त्यात दाखवलेले पटले देखील. आपल्याकडे फक्त अंमलात आणतांना लोकांची अडचण होते. देवाची भीती ही एकच भावना त्यांना निरर्थक प्रथांमध्ये अडकवून ठेवते. भक्तीपेक्षा भीती जास्त पॉवरफुल आहे आपल्याकडे. म्हणून तथाकथित बाबा-बुवांचं फावतं. सत्य साईबाबांचे ढोंग तर सगळ्या जगाला माहित होते. आणि एका संताला का हवी एवढी संपत्ती? का हवं फाइव्ह स्टार आयुष्य? त्यांचे ते चमत्कार जत्रेतला साधा जादुगार देखील करू शकेल असे होते. त्यांच्यापेक्षा तो कष्ट करून पोट भरणारा साधा जादुगार जास्त पूजनीय आहे. आसाराम गेलाच ना तुरुंगात? नित्यानंदची लागलीच ना वाट? मागे इस्कॉनचा कुणी तरी पॉवरफुल साधू जर्मनीमध्ये बलात्काराच्या घटनेत सापडला होता. आपल्या इथल्या मूर्ख जनतेच्या मूर्खपणाचा फायदा घेऊन हे लबाड लांडगे मुजोर होतात आणि स्वतःला देव समजतात. निर्मल बाबा, राधे माँ वगैरे भोंदू त्याच लायनीतले. अनिरुद्ध बापू स्वतःला देव समजतो. असे शक्य आहे का? कुणी माणूस कसा काय देव असू शकेल? मग देव असेल तर सगळ्यांची दु:खे चुटकीसरशी दूर का नाही करू शकत? दहशतवाद नष्ट का नाही करू शकत? फक्त जे भक्त त्यांचेच भले करणार असा विचार करतो का खरा देव? भक्त मग तो किती का भ्रष्टाचारी, व्याभिचारी, क्रूर असे ना, त्याचं हा बाबा भलंच करणार असं काही आहे का या लबाडांचं तत्व? हा निव्वळ ढोंगीपणा आहे. आणि त्याला कारणीभूत आपल्या इथले मूर्ख लोकं आहेत. :-)

मिपाकरांचे मंदिर आले तर बाहेर रोशनीचा पुतळा बसावावा लागेल. मंदिरात बल्लावाचार्याची मूर्त स्थापावी लागेल. अध्यात्मवाद्यांची (सं)कीर्तन जुगलबंदी ठेवावी लागेल मंडपात. जय मिपा जय मिपा मस्तंय रे मिपा वर्गणी नाही म्हणूनी फुकटच्या गप्पा.... जय मिपा..... अशी आरती.

In reply to by चौकटराजा

आणि आरती म्हणून मोकलाया आणि भांडे या दोन्ही कविता त्यांबरोबरच्या प्रतिसादांसकट छापून वाटाव्यात.

In reply to by प्यारे१

मुख्य मूर्ती रोशनीची. उजव्याबाजूला मधुबालाची एक मूर्ती,डाव्या बाजुला किशोर कुमारची मूर्ती हवी कमरेवर हात ठेवून. काकड आरतीऐवजी आर.डी.ची गाणी.