सुतक
गणपती विद्येची देवता.विघ्न दूर करणारा.त्याचा आज पासून १० दिवस उत्साहात सर्वत्र साजरा होणारा उत्सव. आमच्या घरात दिवाळी इतक्या उत्साहाने नाही होत जितका दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतो.
गणपती आज बसणार तोच आमची ऑस्ट्रेलिया ला असलेल्या चुलत चुलत आज्जी वारल्या . चुलत आज्जी म्हणजे आजोबांची चुलत भावजय. त्याच दहा दिवस सुटक पाळायच असा आदेश घरातल्या मोठ्यांकडून आले. सुटक पाळायच म्हणजे गणपती मूर्ती च्या जवळ जायचा नाही . गणपती दुसर्याकडून बसवून घ्यायचाय़. य़ा निमित्तानं बर्याच गुरुजी लोकांची मते घेतली. एक गुरुजी तर म्हणाले गणपतीच बसवू नका तरकाही म्हणाले गणपती दुसर्याचा हातून बसवावा व १० दिवस देवाची रोजची पूजा आरती दुसर्यांकडून करून घ्यावि. आमच्या चुलत चुलत आजी राहायला ऑस्ट्रेलिया ला असल्यामुळे त्यांचे दिवस त्यांचे जवळचे नातेवाईक तिकडेच करणार आहेत. तर या निमित्ताने मला पडलेले काही प्रश्न.
१. सुतक family tree मध्ये कोणत्या लेवेल पर्यंत पाळावे लागते ?
२. सुतकाच्या दिवसात काय काय नियम पाळावेत आणि ते गरजेचे आहेत का ?
३. उलट सुलट काही करू नका असे मोठे सांगतात,पण जर गणपती विघ्नेश्वर आहे तर त्याची पूजा अर्चा करण्याने, त्याचे स्वागत करण्याने विघ्न कशी काय निर्माण होऊ शकतील ?
ह्या गोष्टीत किती तत्थ्य आहे ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तुमच्या विचाराने तुम्हाला
+१
सुतक जुण्या काळातले विचार
१००+ होतील???
टैमिंग चुकलंय.
कोणाला कशाचं तर बोडकीला
या अशा केसेसमध्ये बरेच लोक
सोपी आयडीया आहे
स्वतंत्र साहेब
काही उत्तरे
+१
काही क्रेडीट स्त्रियांना ही देण्याचा प्रयत्न करतो आहे.
उत्तम प्रतिसाद
मुळात दु:ख झालंय का? झालं
सुतकाचे नियम पंचांगात
शेवटी गणपती बसवला का नाही?
मला लहानपणी सूतकताई या
आमच्याकडे त्याला
गरुड पुराणातिल प्रेतकांड प्रमाणे
धाग्याचा विषय...
तुम्हाला जे योग्य वाटेल ते