Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by संपादक मंडळ on Tue, 08/19/2014 - 14:30
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
कला
जीवनमान
तंत्र
मौजमजा
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
सद्भावना
शुभेच्छा
विरंगुळा
नमस्कार! १९ ऑगस्ट १८३९ ला पॅरिसमधे छायाचित्रणकलेची अधिकृतरीत्या सुरुवात झाली. या घटनेला आज १७५ वर्षे होत आहेत. या निमित्ताने मिपावर छायाचित्रणाची स्पर्धा घ्यावी असा एक प्रस्ताव श्री सर्वसाक्षी यांच्याकडून आला आहे. मिपावर अनेक गुणी कलाकार, छायाचित्रकार आहेत. मिपा सदस्य-स्पर्धकांना कोणताही एक विषय देऊन एकच एक स्पर्धा घेण्यापेक्षा स्पर्धामालिका सुरू करावी असा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वात पहिल्या स्पर्धेचा विषय मानवनिर्मित स्थापत्य हा आहे. नव्या, जुन्या, प्राचीन, अर्वाचीन इमारती आणि स्थापत्य यांची तुम्ही काढलेली छायाचित्रे इथे या धाग्यावर प्रकाशित करावीत ही विनंती. आजपासून आणखी ७ दिवस, म्हणजे २६ तारखेपर्यंत प्रत्येकी ३ छायाचित्रे प्रकाशित करू शकता. त्यानंतर ७ दिवसपर्यंत सगळे मिपा सदस्य परीक्षक म्हणून या चित्रांना १,२,३ असे अनुक्रमांक देतील. मतांची सरासरी काढून अंतिम निर्णय या धाग्यावर प्रकाशित केला जाईल. स्पर्धेचे अन्य नियमः १)प्रत्येकजण ३ चित्रे अपलोड करू शकतो. २)सर्व सदस्य मतदान करणार असल्याने संपादकही सदस्य म्हणून स्पर्धेत भाग घेऊ शकतात. ३)पहिल्या भागानंतर यापुढेही अन्य विषय घेऊन ही स्पर्धा सुरू राहील. यात सदस्यही विषय सुचवू शकतात. ४)छायाचित्राचा exif data शक्यतो असावा. ५)ह्या शिवाय छायाचित्र कुठे काढलेले आहे, ठिकाणाची थोडक्यात ओळख आदि माहिती चित्रासोबत द्यावी. ६)प्रोसेसिंग वैगरे केले आहे का याची माहिती द्यावी. ७)फक्त मोबाईलवरून काढलेल्या फोटोंसाठी स्वतंत्रपणे स्पर्धा घेण्यात येईल. पाहिजे तर अशी छायाचित्रे या स्पर्धेतही भाग घेऊ शकतात, पण क्रमांकाबद्दल अंतिम निर्णय मिपा सदस्यांचा असेल. ८)स्पर्धेच्या विजेत्यांना प्रशस्तीपत्रके ईमेल करण्यात येतील. स्पर्धेत जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करण्यास हातभार लावावा ही विनंती. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!
  • 102143 views

प्रतिक्रिया

Submitted by स्पा on Fri, 08/22/2014 - 10:26

Permalink

अप्रतिम फोटो येतायत

अप्रतिम फोटो येतायत सहीच . वेल्लाभट चा पायऱ्यांचा फोटू कहर आलाय वल्लीचा perspective सहीये अतिवास - मझार ए शरीफ अप्रतिम . चिंतामणी काकांनी पुलाचा टाकलेला फोटो खूप आवडला , रिफ्लेक्शन जबर पडलंय kohalea ह्यांनी HDRI चा झकास प्रयोग केलाय बोका - हुमायून मकबरा, खल्लास आलाय , लायटिंग आवडले एक्का काकांनी टाकलेला शेवटचा फोटो धडकी भरवणारा आहे किल्लेदारांचा इसा खान टोम्ब पण मस्त आहे :)

Submitted by खटपट्या on Fri, 08/22/2014 - 11:10

Permalink

चिंतामणी यांचा पुलाच्या फोटो

चिंतामणी यांचा पुलाच्या फोटो मधील आकाश जबरी दिसतंय किल्लेदार यांचे दोन्ही फोटो कहर आहेत सागर पराडकर यांचे फोटो अजूनही दिसत नाही आहेत निकाल काही लागो मी या सर्व फोटोंचे प्रिंट आउट काढणार, जमल्यास फ्रेम करणार.
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 08/22/2014 - 12:06

Permalink

मस्तच... सर्व स्पर्धकांना

मस्तच... सर्व स्पर्धकांना शुभेच्छा ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisis

Submitted by पैसा on Fri, 08/22/2014 - 12:16

In reply to मस्तच... सर्व स्पर्धकांना by मदनबाण

Permalink

का ब्वा!

तू नाही का फोटो देत?
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 08/22/2014 - 12:20

In reply to का ब्वा! by पैसा

Permalink

प्रयत्न करतो... सध्या

प्रयत्न करतो... सध्या कामाच्या ओझ्या खाली गाडलो गेलो आहे. सवड मिळालीच तर नक्की टाकेन. :) आता जरा आठवभरात येउन जाउन वाचलेल्या लेखांसाठीचा प्रतिक्रिया देण्याचा कोटा पुर्ण करतो आहे. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisis

Submitted by प्रचेतस on Fri, 08/22/2014 - 12:59

Permalink

एकसे एक भारी फोटो टाकलेत

एकसे एक भारी फोटो टाकलेत सदस्यांनी. मतदान लै अवघड करून ठेवलेय.

Submitted by गणपा on Fri, 08/22/2014 - 13:39

Permalink

आहाहा !

आहाहा ! एकाहुन एक सुंदर प्रकशचित्रं या निमित्ताने पहायला मिळतायत. सर्व स्पर्धकांना ऑल द बेस्ट. अन मायबाप मिपाकर परिक्षकांना शुभेच्छा. (त्यांना खरच याची गरज लागणारे) ;)

Submitted by इनिगोय on Fri, 08/22/2014 - 13:43

Permalink

चंगळ! चंगळ!! चंगळ आहे अगदी..

चंगळ! चंगळ!! चंगळ आहे अगदी.. खटपट्याशी सहमत. सगळेच फोटो संग्रही ठेवण्यासारखे आहेत.

Submitted by nishant on Fri, 08/22/2014 - 14:23

Permalink

माझ्याही काहि entries

Duomo, Florence, Italy. Image removed. Camera NIKON D7000 Lens 18.0-105.0 mm f/3.5-5.6 Focal Length 105mm Exposure 1/500 secs F Number f/8 ISO 100 Camera make NIKON CORPORATION Photo processed in Lightroom 4.4 Krakow market hall, Poland. Image removed. Camera NIKON D7000 Lens 18.0-105.0 mm f/3.5-5.6 Focal Length 21mm Exposure 10 secs F Number f/8 ISO 100 Camera make NIKON CORPORATION Photo processed in Lightroom 4.4 Sea link, Mumbai. Image removed. Camera NIKON D7000 Lens 18.0-105.0 mm f/3.5-5.6 Focal Length 45mm Exposure 1/80 secs F Number f/8 ISO 100 Camera make NIKON CORPORATION Photo processed in Lightroom 4.4

Submitted by आतिवास on Fri, 08/22/2014 - 14:34

Permalink

अनेक फोटो इतके छान आहेत की

अनेक फोटो इतके छान आहेत की तीन निवडताना इतर अनेकांवर अन्याय होणार. म्हणून मतदान न करण्याचा पर्याय निवडला जाईल बहुधा :-) अवांतर : त्यामुळे खरं तर स्पर्धा आणि परीक्षा हव्यात का? निदान प्रौढांच्या राज्यात? इतके सुंदर फोटो पाहायला मिळाले या निमित्ताने; हे पुरेसं नाही का?

Submitted by सुधीर on Fri, 08/22/2014 - 15:46

In reply to अनेक फोटो इतके छान आहेत की by आतिवास

Permalink

अगदी माझ्या मनातले बोललात!

धागा डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. तीन फोटो निवडणं कठीणच दिसतेय.

Submitted by अजया on Fri, 08/22/2014 - 15:57

Permalink

जबरदस्त फोटो.

पोलंड,क्रॅको मार्केटहाॅल फोटो कातिल आहे.

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 08/22/2014 - 19:37

Permalink

सर्वच फोटो जब्बरदस्त.

हा सुंदर म्हणु की तो असं झालं आहे, कोणाला तरी मतदान करण्यापेक्षा कोणावर अन्याय होईलच म्हणुन फक्त आस्वाद घेईन. नो वोटींग. :) -दिलीप बिरुटे

Submitted by कवितानागेश on Sat, 08/23/2014 - 06:07

In reply to सर्वच फोटो जब्बरदस्त. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

+१

नो वोटिन्ग.

Submitted by बाळ सप्रे on Fri, 08/22/2014 - 20:42

Permalink

हे माझ्याकडून

हे माझ्याकडून जुनं महाबळेश्वर Image removed. टाउन हॉल - शेफिल्ड Image removed. स्वामीनारायण मंदीर - लंडन Image removed.

Submitted by पैसा on Sat, 08/23/2014 - 09:46

In reply to हे माझ्याकडून by बाळ सप्रे

Permalink

खूप छान!

पहिले दोन विशेष आवडले.

Submitted by प्रचेतस on Sat, 08/23/2014 - 10:27

In reply to हे माझ्याकडून by बाळ सप्रे

Permalink

पहिला फोटो महाबळेश्वरातल्या

पहिला फोटो महाबळेश्वरातल्या कृष्णामाई मंदिराचा आहे. प्रत्यक्षात ते एक शिवमंदिर आहे. ५००० वर्षांपूर्वीचे मंदिर असे तिकडे म्हणतात एकंदरीत बांधकामाच्या शैलीवरून १३ व्या शतकातील आहेतसे दिसते. मंदिरांच्या भिंतीवर असलेली नाग आणि गरुडाची शिल्पे रोचक आहेत.

Submitted by सानिकास्वप्निल on Sat, 08/23/2014 - 12:03

In reply to हे माझ्याकडून by बाळ सप्रे

Permalink

शेवटून दोन

शेवटून दोन आवडले खासकरून आमच्या शेफिल्डच्या टाऊनहॉलचा जास्तं ;)

Submitted by समर्पक on Sat, 08/23/2014 - 12:20

Permalink

छायाचित्र

स्थापत्यविशेषः चॅपेल् ऑन द रॉक् विषयी एका 'जगातील सर्वात सुंदर चर्च' अशा नावाच्या लेखात मी पहिल्यांदा वाचले. आणि त्याप्रमाणेच ही जागा खरंच खूप सुंदर आहे. जुन्याचे जुनेपण अधिक खुलवण्यासाठी पिवळ्या फ़ोर्ड मस्टॅंग् चे प्रयोजन (विरोधाभासप्रयोग). छायाचित्रविशेषः उन्हात या गाडीचा रंग फार पांढरट होतो (bleach effect), त्यामुळे योग्य प्रमाणात ढगाळ वातावरण मिळेपर्यंत तीनदा जाणे झाले. छायाचित्रविवरणः Canon EOS REBEL T3i f/18 1/200 ISO-1600 70mm Image removed. स्थापत्यविशेषः हे कोणाचे घर आहे महिती नाही पण गूगल मॅप वर स्नोबोर्डिंग् स्लोप् शोधताना सापडले. गर्द झाडीतला बंगला जाम आवडला, विशेषतः फ़रशीची नक्षी, जणू आकाशातून चांगले दिसावे याच हेतूने बांधले आहे... https://maps.google.com/maps/@39.1917166,-106.8336454,93m/data=!3m1!1e3 छायाचित्रविशेषः त्या बंगल्यावरून पॅराग्लायडिंन्ग् करत काढलेला हा फोटो आहे. त्यामुळे बरेचसे श्रेय योग्य प्रमाणात आणि योग्य दिशेने असलेल्या वा-याला जाते. छायाचित्रविवरणः Canon PowerShot S5 IS f/4 1/640 ISO=80 30mm Image removed. स्थापत्यविशेषः रामेश्वरला जाताना समुद्रावरील हा सेतू. छायाचित्रविशेषः रेल्वेतून काढलेला हा फोटो आहे. मला आवडण्याचे कारण म्हणजे १/३ नियम अगदी काटेकोर पणे पालन झालेला आहे (१/३ पाणी, २/३ आकाश्) छायाचित्रविवरणः Canon PowerShot S5 IS f/4 1/640 ISO=80 6mm Image removed.

Submitted by पैसा on Sat, 08/23/2014 - 13:16

In reply to छायाचित्र by समर्पक

Permalink

जबरदस्त!

तिन्ही फोटो क्लासिक!

Submitted by राघवेंद्र on Sun, 08/24/2014 - 07:33

In reply to छायाचित्र by समर्पक

Permalink

वाव मस्त !!!

तिनही फोटो मस्त आहे.

Submitted by खटपट्या on Sun, 08/24/2014 - 11:23

In reply to छायाचित्र by समर्पक

Permalink

तिनीही फोटो कहर आलेत

तिनीही फोटो कहर आलेत

Submitted by बोका on Sat, 08/23/2014 - 13:35

Permalink

हंपी येथील विहिर

हंपी येथील पायर्‍यांची विहिर मूळ रंगीत चित्र काळेपांढरे केले. रेषा आणि आकारांना उठाव देण्यासाठी कॉन्ट्रास्ट जास्त वाढवला . अनावश्यक भाग कातरला. Image removed. कॅनन EOS 1000D लेन्स - टॅमरॉन 17-50mm @ 17mm 1/500, f/7.1, आयएसओ 200

Submitted by सानिकास्वप्निल on Sat, 08/23/2014 - 14:53

Permalink

हे माझ्याकडून

नीड नदीवरचा रेल्वे व्हायाडक्ट (पूल) - Knaresborough Castle मधून टिपलाय. Image removed. Camera- Canon EOS 550D F-stop- f/5 Exposure Time - 1/500 sec ISO - 100 Focal Length - 55mm Flash Mode - No Flash Post processing - Picasa आर्सेलरमित्तल ऑर्बिट - ऑलिंपि़क पार्क, स्ट्रॅटफोर्ड. Image removed. Camera - Canon EOS 550D F-stop - f/4.5 Exposure Time - 1/4 sec ISO-2000 Focal length- 21mm Flash Mode - No Flash Post processing - Picasa Heage पवनचक्की १७९७ मध्ये बांधली व २००२ मध्ये पुनर्स्थापना केली. Heage पवनचक्की - चेस्टरफिल्ड रोड, बेल्पर Image removed. Camera - Canon EOS 550D F-stop - f/5 Exposure Time - 1/640sec ISO -100 Focal Length - 18mm Flash Mode - No Flash Post processing - Picasa

Submitted by एस on Sat, 08/23/2014 - 18:05

Permalink

सर्वच फोटो एकसे एक

क्या बात है. नुसतीच छायाचित्रे नव्हे, तर त्यामुळे कित्येक ठिकाणांचीही ओळख होत आहे. धन्यवाद.

Submitted by संजय क्षीरसागर on Sat, 08/23/2014 - 21:25

Permalink

सानिकास्वप्निल यांना परदेशी बनावटाचे फोटो टाकल्यामुळे

(समर्पकासमवेत, त्यांचा रामेश्वरचा फोटो इथे ठेवून) वेगळ्या विभागात हालवण्यात यावे. आणि दोघांना विजयी घोषित करुन मग स्पर्धा घ्यावी असे सुचवतो.

Submitted by सानिकास्वप्निल on Sat, 08/23/2014 - 21:59

In reply to सानिकास्वप्निल यांना परदेशी बनावटाचे फोटो टाकल्यामुळे by संजय क्षीरसागर

Permalink

नियम*

संक्षी भारताबाहेरच्या स्थळांचे फोटो टाकू नयेत असा नियम दाखवाल का कृपा करून?

Submitted by अजया on Sat, 08/23/2014 - 22:33

In reply to नियम* by सानिकास्वप्निल

Permalink

मस्त फोटो,सानिका.

परदेशी बनावट? बरेच फोटो आहेत की आधीही आलेले परदेशातल्या वास्तुंचे!!

Submitted by प्यारे१ on Sat, 08/23/2014 - 22:55

In reply to नियम* by सानिकास्वप्निल

Permalink

तै तै, सर तुम्हाला विजयी

तै तै, सर तुम्हाला विजयी घोषित करत आहेत हो! म्हणजे तुम्ही ऑलरेडी जिंकला आहात असं म्हणतात ते. ग्लास अर्धा भरलाय म्हणा. (मोदी असाल तर अर्धा पाण्यानं अर्धा हवेनं असा पूर्ण भरला म्हणा) बी+ ;)

Submitted by प्यारे१ on Sat, 08/23/2014 - 22:04

In reply to सानिकास्वप्निल यांना परदेशी बनावटाचे फोटो टाकल्यामुळे by संजय क्षीरसागर

Permalink

किती घाई किती घाई सर?

किती घाई किती घाई सर? अवांतरः ह्यासाठी साईपदयात्रा कराव्यात. श्रद्धा आणि मुख्यत्वे 'सबुरी' जमते. ;)

Submitted by संजय क्षीरसागर on Sat, 08/23/2014 - 23:46

In reply to किती घाई किती घाई सर? by प्यारे१

Permalink

सद्यस्थितीत, सानिकाबैंनी आमचा प्रतिसाद `सबुरीनं' वाचला नाहीये

हे निदर्शनास आणून देतो.

Submitted by प्यारे१ on Sun, 08/24/2014 - 01:48

In reply to सद्यस्थितीत, सानिकाबैंनी आमचा प्रतिसाद `सबुरीनं' वाचला नाहीये by संजय क्षीरसागर

Permalink

त्यांचा प्रश्न चुकीचा नव्हता.

त्यांचा प्रश्न चुकीचा नव्हता. बाकी आपण घाई करता आहात/ नेहमीच असता असं निदर्शनास आणून देतो. ह्यानंतरचा प्रतिसाद साहजिकच आपण टाकणार आहात नि तो ह्या विषयाबाबतचा शेवटचा असेल.

Submitted by संजय क्षीरसागर on Sun, 08/24/2014 - 02:10

In reply to त्यांचा प्रश्न चुकीचा नव्हता. by प्यारे१

Permalink

घाई आणि अ‍ॅप्रिसिएशन यातला फरक आपल्याला कळला नाही

हे निदर्शनास आणून देण्याची गरज नाही.

Submitted by प्यारे१ on Sun, 08/24/2014 - 23:45

In reply to घाई आणि अ‍ॅप्रिसिएशन यातला फरक आपल्याला कळला नाही by संजय क्षीरसागर

Permalink

मी पामर. चूकच झाली. तुम्ही

मी पामर. चूकच झाली. तुम्ही कुठे... मी कुठे??

Submitted by जातवेद on Sat, 08/23/2014 - 21:40

Permalink

माझा सहभाग

१. तोक्यो मधिल राजाचा महाल EXIF: Canon EOS 550D - F/४.५ - १/२००० - ISO१०० - -१.५ EV - ४०mm Image removed. २. लोटस टेंपल, दिल्ली EXIF: Canon EOS 550D - F/५.६ - १/३५० - ISO१०० - -०.५ EV - १८mm Image removed. ३. ताज महाल, आग्रा EXIF: Canon EOS 550D - F/८ - १/४५ - ISO१०० - -०.५ EV - २४mm Image removed.

Submitted by संजय क्षीरसागर on Sat, 08/23/2014 - 23:42

In reply to माझा सहभाग by जातवेद

Permalink

ताजमहालच्या फोटोबद्दल तुम्हाला, इंडियन विभागात प्रथम क्रमांक,

तोक्योमधल्या राजमहालाबद्दल परदेशी-वास्तु फोटो विभागात (पुन्हा) पहिला क्रमांक (विभागून), आणि दोन्ही मिळून असलेल्या संयुक्त स्पर्धेत अंतिम विजयी घोषित करतांना मला आनंद होत आहे!

Submitted by जातवेद on Mon, 08/25/2014 - 20:27

In reply to ताजमहालच्या फोटोबद्दल तुम्हाला, इंडियन विभागात प्रथम क्रमांक, by संजय क्षीरसागर

Permalink

धन्यवाद

बाकी परिक्षक ठरवतीलच. बघु :)

Submitted by पैसा on Sat, 08/23/2014 - 21:57

Permalink

जबरदस्त!

सगळे सुंदर फटु!

Submitted by जातवेद on Sat, 08/23/2014 - 22:03

Permalink

एक सुचना

सर्वांनी १,२,३ क्रमांक देण्याऐवजी, चढते क्रमांक द्यावेत म्हणजे बाकिच्यांना मत द्यायला सोपे पडेल. उदा. सदस्य क्र. १ फोटो - १, २, ३ सदस्य क्र. २ फोटो - ४, ५, ६ अर्थात आता बरेच फोटो आलेत त्यामुळे हे सध्यापुरते तरी शक्य नाही.

Submitted by खेडूत on Sat, 08/23/2014 - 22:26

Permalink

नमस्कार! तीन माझेही...

Image removed. केरळ मधील हाउसबोट Image removed. लंडन येथील टॉवरब्रिज. हा उघडून बोट जाताना पहायला मजा येते. पुलावरचं ट्राफिक तेव्हढा वेळ दोन्हीकडे थांबून रहातं Image removed. कोलोझीयम: रोम- इटली येथील क्रीडा प्रेक्षागृह क्यामेरा: सोनी डी एस सी डब्ल्यू ३५ कसलेही पोस्ट प्रोसेसिंग केलेले नाही

Submitted by वेल्लाभट on Sat, 08/23/2014 - 23:01

Permalink

काय जबरा फोटो येताय्त राव!

काय जबरा फोटो येताय्त राव!
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sun, 08/24/2014 - 10:23

Permalink

इंदूर

१} राजवाडा Image removed. माहिती इथे :- http://en.wikipedia.org/wiki/Rajwada २} राजवाड्यातील आतील भाग,त्यावेळी त्या जागेचे काम चालु होते असं पुसटस आठवतय. Image removed. ३} मार्तण्ड मंदिर,जूना राजवाडा {शिवालय} प्रवेश द्वार :- Image removed. कॅमेरा :- निकॉन पी-१०० * कोणतेही इमेज प्रोसेसिंग केले नाही, फक्त फोटो कंप्रेस केले आहेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मेरा ही जलवा... :- Wanted

Submitted by संजय क्षीरसागर on Sun, 08/24/2014 - 11:30

In reply to इंदूर by मदनबाण

Permalink

दुसरा फोटो सोडता

कॅमेर्‍याचा अँगल जमलेला नाही.

Submitted by सूड on Mon, 08/25/2014 - 21:01

In reply to दुसरा फोटो सोडता by संजय क्षीरसागर

Permalink

तुम्हाला सग्गळ्यातलं सग्गळं

तुम्हाला सग्गळ्यातलं सग्गळं कळतं नै?? नवलच हो!!

Submitted by असंका on Tue, 08/26/2014 - 12:55

In reply to इंदूर by मदनबाण

Permalink

आपले तीनही फोटो वेगात खाली

आपले तीनही फोटो वेगात खाली स्क्रोल केले तर जवळ जवळ आल्यासारखे वाटतात. आणि वायसे वर्सा. त्यातल्या त्यात तिसरा फोटोत तर फारच.
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sun, 08/24/2014 - 12:29

Permalink

१} पहिल्या फोटोत प्रवेशद्वारा

१} पहिल्या फोटोत प्रवेशद्वारा सकट अख्खी वास्तु एका फ्रेम मधे घेण्याचा प्रयत्न केला आहे, हा भाग रहदारीचा आहे, त्यामुळे वाहने फोटोच्या फ्रम मधे न येता फोटो काढण्याचा प्रयत्न केला होता. राजवाड्या समोरच एक बाग आहे, त्यावरील कठड्यावर चढुन हा फोटो काढला आहे. या दुव्यावरचा फोटो पाहुन मी काय सांगतोय ते नीट समजेल :- http://pixeldo.com/showcase/00aerials/rajwadaaerial/rajwada.jpg ३) या फोटोत समोर असलेल्या गणपती बाप्पाला नजरे समोर ठेवुन फोटो काढला आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मेरा ही जलवा... :- Wanted

Submitted by संजय क्षीरसागर on Sun, 08/24/2014 - 20:37

In reply to १} पहिल्या फोटोत प्रवेशद्वारा by मदनबाण

Permalink

त्यामुळे वाहने फोटोच्या फ्रम मधे न येता फोटो काढण्याचा

प्रयत्न केला होता.
ताजमहाल भोवती इतकी गर्दी असून देखिल, केवळ त्याच्यावरच नज़र खिळून राहाते आणि ती गर्दी जाणवत सुद्धा नाही.
फोटोत समोर असलेल्या गणपती बाप्पाला नजरे समोर ठेवुन फोटो काढला आहे
त्यामुळे प्रवेशद्वाराची भव्यता झाकोळली आहे.

Submitted by चित्रगुप्त on Sun, 08/24/2014 - 15:38

Permalink

तीन दृष्ये

१. पॅरिस मधील सीन नदीचे एक दृष्य. हा फोटो मुख्यतः ढगाळ आकाश आणि उन्ह-सावलीचा खेळ हे टिपण्यासाठी घेतला होता. उजवीकडील झाडाची पाने फोटोत यावीत म्हणून बराच खटाटोप करावा लागला होता, कारण नेमक्या ठिकाणी उभे राहणे कठीण होते. डावीकडील उंच मनोरावाली इमारत १०व्या ते १४व्या शतकात राजवाडा, नंतरच्या काळात तुरुंग म्हणून वापरात होती. Image removed. कॅमेरा: कॅनन पॉवरशॉट एस ९५. (अगदी डावीकडील इमारत जरा गडद केली आहे). २. मोहाक नदीच्या तीरावरील एक घर (क्लिफ्टन पार्क, न्यूयॉर्क राज्य). झाडाच्या लहान-मोठ्या फांद्यांचे जंजाळ, रापलेले गवत, आणि त्यातून अस्फुट दिसणार्‍या लाकडी घराचे खांब-कठडे, या सर्वांमुळे या दृष्याला लाभणारा झिरझिरीत- भंगुर पोत, हा या चित्राचा मुख्य विषय. Image removed. कॅमेरा: कॅनन पॉवरशॉट एस ९५. ३. फॉन्तेनब्लू प्रासाद, फ्रान्स. नेपोलियनच्या आवडत्या या प्रासादाची इमारत आणि तिचे थरथरते प्रतिबिंब, डावी-उजवीकडील एकमेकांना तोलून धरणारी गडद झाडे, खालची अंधारातली जमीन, उजवीकडली जुनी रोमन मूर्ती आणि कलता झाडाचा बुंधा, या सर्वातून जाणवणारी 'स्थिरतेतली गतिमानता' हा या चित्राचा विषय. Image removed. कॅमेरा: कॅनन पॉवरशॉट एस ९५. (हे तिन्ही फोटो मी विकिमीडिया कॉमन्स वर टाकले आहेत).

Submitted by संजय क्षीरसागर on Sun, 08/24/2014 - 20:28

In reply to तीन दृष्ये by चित्रगुप्त

Permalink

पहिल्या फोटोनं वेड लावलं आहे!

आणि दुसर्‍या फोटोत, साध्याशा विषयाला चित्रकाराची नज़र लाभली आहे. तिसर्‍या फोटोत मात्र अनेक कल्पना एका फोटोत बसवतांना, नेपोलियनच्या प्रासादाची भव्यता हरवल्यासारखी वाटते आहे.

Submitted by किल्लेदार on Sun, 08/24/2014 - 22:27

Permalink

माझी फायनल एन्ट्री ….

Image removed. इब्राहीम रोजा , बिजापूर कॅनन ४५० D , लेन्स १८-५५. खरं तर हम्पी चा पाषाण रथ टाकायचा होता फायनल एन्ट्री म्हणून पण हा फोटो जमून गेला आहे एखाद्या रेसिपी सारखा. हम्पी चे फोटोज नंतर कधितरी ………

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com