Skip to main content

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा

लेखक संपादक मंडळ यांनी मंगळवार, 19/08/2014 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! १९ ऑगस्ट १८३९ ला पॅरिसमधे छायाचित्रणकलेची अधिकृतरीत्या सुरुवात झाली. या घटनेला आज १७५ वर्षे होत आहेत. या निमित्ताने मिपावर छायाचित्रणाची स्पर्धा घ्यावी असा एक प्रस्ताव श्री सर्वसाक्षी यांच्याकडून आला आहे. मिपावर अनेक गुणी कलाकार, छायाचित्रकार आहेत. मिपा सदस्य-स्पर्धकांना कोणताही एक विषय देऊन एकच एक स्पर्धा घेण्यापेक्षा स्पर्धामालिका सुरू करावी असा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वात पहिल्या स्पर्धेचा विषय मानवनिर्मित स्थापत्य हा आहे. नव्या, जुन्या, प्राचीन, अर्वाचीन इमारती आणि स्थापत्य यांची तुम्ही काढलेली छायाचित्रे इथे या धाग्यावर प्रकाशित करावीत ही विनंती. आजपासून आणखी ७ दिवस, म्हणजे २६ तारखेपर्यंत प्रत्येकी ३ छायाचित्रे प्रकाशित करू शकता. त्यानंतर ७ दिवसपर्यंत सगळे मिपा सदस्य परीक्षक म्हणून या चित्रांना १,२,३ असे अनुक्रमांक देतील. मतांची सरासरी काढून अंतिम निर्णय या धाग्यावर प्रकाशित केला जाईल. स्पर्धेचे अन्य नियमः १)प्रत्येकजण ३ चित्रे अपलोड करू शकतो. २)सर्व सदस्य मतदान करणार असल्याने संपादकही सदस्य म्हणून स्पर्धेत भाग घेऊ शकतात. ३)पहिल्या भागानंतर यापुढेही अन्य विषय घेऊन ही स्पर्धा सुरू राहील. यात सदस्यही विषय सुचवू शकतात. ४)छायाचित्राचा exif data शक्यतो असावा. ५)ह्या शिवाय छायाचित्र कुठे काढलेले आहे, ठिकाणाची थोडक्यात ओळख आदि माहिती चित्रासोबत द्यावी. ६)प्रोसेसिंग वैगरे केले आहे का याची माहिती द्यावी. ७)फक्त मोबाईलवरून काढलेल्या फोटोंसाठी स्वतंत्रपणे स्पर्धा घेण्यात येईल. पाहिजे तर अशी छायाचित्रे या स्पर्धेतही भाग घेऊ शकतात, पण क्रमांकाबद्दल अंतिम निर्णय मिपा सदस्यांचा असेल. ८)स्पर्धेच्या विजेत्यांना प्रशस्तीपत्रके ईमेल करण्यात येतील. स्पर्धेत जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करण्यास हातभार लावावा ही विनंती. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!

वाचने 102618
प्रतिक्रिया 182

प्रतिक्रिया

१. अहमदाबाद जवळ असलेली अडालज ही भव्य विहीर. aa अडालज की बावड़ी (गुजराती : अडालजनी वाव) एक सीढ़ीदार कुँआ (बावड़ी) है जो गुजरात के अडालज नामक गाँव में है। दूर-दराज से बड़ी संख्या में लोग इस कुएं को देखने आते रहते हैं। वास्तव में यह एक बड़े भवन के रूप में निर्मित है। भारत में इस तरह के कई सीड़ीनुमा कूप हैं. (मला अत्ताच कळलंय की पुण्याजवळ निंब येथे अशीच एक, बहुदा याच्याहून भारी विहीर आहे शिवकालीन. तेंव्हा ती बघायला जायचंय आता.) फोटोबाबतः कॅमेरा - कॅनन पॉवरशॉट एस एक्स २२० एचएस शटरस्पीड - १/६४० अ‍ॅपर्चर - एफ ४.० आयएसओ - २०० पोस्ट प्रोसेसिंग - लेव्हल अ‍ॅडजस्टमेंट, ब्राईटनेस/कॉन्ट्रास्ट २. सटाणा येथील मांगी-तुंगी या जुळ्या शिखरांकडे जाणा-या पाय-या. ४०००+ पाय-या चढून या शिखरांवर जाता येतं. a मांगी - तुंगी हा महाराष्ट्रातील एक किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात भिलवड गावानजीक हा किल्ला उभा आहे. हे एक जैन तीर्थक्षेत्रदेखील असून, तेथे चढून जाण्यासाठी सुमारे चार हजारांहून अधिक पायऱ्या आहेत. फोटोबाबतः कॅमेरा - कॅनन पॉवरशॉट एस एक्स २२० एचएस शटरस्पीड - १/८०० अ‍ॅपर्चर - एफ ४.० आयएसओ - १०० पोस्ट प्रोसेसिंग - लेव्हल अ‍ॅडजस्टमेंट, ब्राईटनेस/कॉन्ट्रास्ट ३. जिनिवा, स्वित्झर्लंड येथील एक गल्ली. दोनही बाजूंना उत्तमोत्तम स्विस शैलीतल्या इमारती, त्यांवरची नक्षी, सजावट इत्यादी. aa Geneva (/dʒɨˈniːvə/; French: Genève, is the second most populous city in Switzerland (after Zürich) and is the most populous city of Romandy, the French-speaking part of Switzerland. Situated where the Rhône exits Lake Geneva, it is the capital of the Republic and Canton of Geneva. फोटोबाबतः कॅमेरा - ऑलिंपस एफई २० शटरस्पीड - १/२५ अ‍ॅपर्चर - एफ ३.१ आयएसओ - १२५ पोस्ट प्रोसेसिंग - लेव्हल अ‍ॅडजस्टमेंट, ब्राईटनेस/कॉन्ट्रास्ट

हायला एक सो एक आहेत मिपा वर !! बहुतेक पहिले, दुसरे आणि तिसरे पारितोषिक विभागून द्यावे लागणार :)

छायाचित्रे अप्रतीम येताहेत. डावंउजवं करणं खरोखरच अवघड जाणार आहे. :-)

१.फ्रान्समधील इटाम्स गावातील चर्चचा दरवाजा: 20141404 (21) २.आएफेल टॉवरवरुन काढलेला फोटो: 20142004 (32) ३.आळंदीरोडवरील साईमंदिर परिसरात असलेला स्तंभ : IMG_0679

मीता, kohalea तुम्ही अजून फोटो देऊ शकता. वेल्लाभट आणि स्वैर, खूपच छान फोटो! स्वैर, पहिला फोटो तर जबरदस्त आवडला!

दिल्लीतील माझे आवड्ते ठिकाण. पर्यटक फारसे नसतात आणि सुंदर परिसर. (अवांतर - मकबरा, कबर, थडगे सारे एकच का ?) h कॅनन EOS 1000D लेन्स - टॅमरॉन 17-50mm @ 17mm 1/400, f/6.3, आयएसओ 200

स्वित्झर्लंड मधील अपेन्त्सेल कौंटिमधील स्टाईन गावातील चीझ फॅक्ट्रीच्या मगील खास अपेंत्सेलर हाउस Appnzellar House लेक कोन्स्टान्झ किंवा बोडेन्झे मधील 'मायनाउ' बेटावरील संस्थानिकाचा राजवाडा Mainau Palace व्हिएन्नाच्या सुप्रसिद्ध 'ऑपेरा हाउस'चे अंतरंग Opera House Vienna धन्यवाद

In reply to by sagarparadkar

स्वित्झर्लंड मधील अपेन्त्सेल कौंटिमधील स्टाईन गावातील चीझ फॅक्ट्रीच्या मगील खास अपेंत्सेलर हाउस http://s1383.photobucket.com/user/sagarparadkar/media/AppenzellerHouse_… लेक कोन्स्टान्झ किंवा बोडेन्झे मधील 'मायनाउ' बेटावरील संस्थानिकाचा राजवाडा http://s1383.photobucket.com/user/sagarparadkar/media/MainauPalace_zpsa… व्हिएन्नाच्या सुप्रसिद्ध 'ऑपेरा हाउस'चे अंतरंग http://s1383.photobucket.com/user/sagarparadkar/media/OperaHouseVienna_… स्वित्झर्लंड्च्या लुझर्न मधील जनरल पोस्ट ऑफिसची इमारत http://s1383.photobucket.com/user/sagarparadkar/media/LucernPostOffice_…

In reply to by sagarparadkar

मूळ प्रतिसादात अपलोड केलेत. मात्र ३ च फोटो देता येतील. त्यामुळे चौथा टाकला नाही. तो हवा असेल तर आहे त्यापैकी एखादा काढावा लागेल. फोटो सुरेख!

माझे पण तीन फोटो... १. कंबोडियातिल बांतीय श्रेइ मंदिरातील एक कोरीवकाम :  २. चीन मधिल लेशान येथिल बसलेल्या बुद्धाचे शिल्प :  ३. शांघाईच्या पर्ल टॉवरच्या काचेच्या जमिनीतून दिसणारा टॉवरचा स्तंभ व शेजारच्या मोठ्या चौकात असलेल्या उंच वर्तुळाकार पादचारी मार्गासह इतर परिसर :  (कॅमेरा: Soni DSC-TX7)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

फोटोंच्या विषयांबद्दल थोडी माहिती: १. बांतेय श्रेई मंदिर : १० व्या शतकातले बांधकाम. २. लेशान बुद्ध : बांधकाम इ स ७१३ ते ८०३ पर्यंत. मूर्तीची उंची ७१ मीटर (२३३ फूट). ३. पर्ल टॉवर : उद्घाटन इ स १९९४ मध्ये. एकूण उंची ४६८ मीटर (१५३५ फूट). काचेची जमीन असलेल्या पर्यावेक्षक सज्जेची उंची २५९ मीटर (८५० फूट)

याबाबतीत माझा सॉलीड गोंधळ व्ह्यायला लागलायं. त्यापेक्षा प्रत्येक सदस्याला शंभर मार्कांचा कोटा द्या म्हणजे हात सैल सोडता येईल.

Gol Gumbaz गोल गुम्बज, बिजापूर. second largest dome in the world. कॅनन ४५० डी , १८-५५. HDR प्रोसेसिंग

अप्रतिम फोटो येतायत सहीच . वेल्लाभट चा पायऱ्यांचा फोटू कहर आलाय वल्लीचा perspective सहीये अतिवास - मझार ए शरीफ अप्रतिम . चिंतामणी काकांनी पुलाचा टाकलेला फोटो खूप आवडला , रिफ्लेक्शन जबर पडलंय kohalea ह्यांनी HDRI चा झकास प्रयोग केलाय बोका - हुमायून मकबरा, खल्लास आलाय , लायटिंग आवडले एक्का काकांनी टाकलेला शेवटचा फोटो धडकी भरवणारा आहे किल्लेदारांचा इसा खान टोम्ब पण मस्त आहे :)

चिंतामणी यांचा पुलाच्या फोटो मधील आकाश जबरी दिसतंय किल्लेदार यांचे दोन्ही फोटो कहर आहेत सागर पराडकर यांचे फोटो अजूनही दिसत नाही आहेत निकाल काही लागो मी या सर्व फोटोंचे प्रिंट आउट काढणार, जमल्यास फ्रेम करणार.

In reply to by पैसा

प्रयत्न करतो... सध्या कामाच्या ओझ्या खाली गाडलो गेलो आहे. सवड मिळालीच तर नक्की टाकेन. :) आता जरा आठवभरात येउन जाउन वाचलेल्या लेखांसाठीचा प्रतिक्रिया देण्याचा कोटा पुर्ण करतो आहे. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisis

आहाहा ! एकाहुन एक सुंदर प्रकशचित्रं या निमित्ताने पहायला मिळतायत. सर्व स्पर्धकांना ऑल द बेस्ट. अन मायबाप मिपाकर परिक्षकांना शुभेच्छा. (त्यांना खरच याची गरज लागणारे) ;)

चंगळ! चंगळ!! चंगळ आहे अगदी.. खटपट्याशी सहमत. सगळेच फोटो संग्रही ठेवण्यासारखे आहेत.

Duomo, Florence, Italy. d1 Camera NIKON D7000 Lens 18.0-105.0 mm f/3.5-5.6 Focal Length 105mm Exposure 1/500 secs F Number f/8 ISO 100 Camera make NIKON CORPORATION Photo processed in Lightroom 4.4 Krakow market hall, Poland. m1 Camera NIKON D7000 Lens 18.0-105.0 mm f/3.5-5.6 Focal Length 21mm Exposure 10 secs F Number f/8 ISO 100 Camera make NIKON CORPORATION Photo processed in Lightroom 4.4 Sea link, Mumbai. b1 Camera NIKON D7000 Lens 18.0-105.0 mm f/3.5-5.6 Focal Length 45mm Exposure 1/80 secs F Number f/8 ISO 100 Camera make NIKON CORPORATION Photo processed in Lightroom 4.4

अनेक फोटो इतके छान आहेत की तीन निवडताना इतर अनेकांवर अन्याय होणार. म्हणून मतदान न करण्याचा पर्याय निवडला जाईल बहुधा :-) अवांतर : त्यामुळे खरं तर स्पर्धा आणि परीक्षा हव्यात का? निदान प्रौढांच्या राज्यात? इतके सुंदर फोटो पाहायला मिळाले या निमित्ताने; हे पुरेसं नाही का?

पोलंड,क्रॅको मार्केटहाॅल फोटो कातिल आहे.

हा सुंदर म्हणु की तो असं झालं आहे, कोणाला तरी मतदान करण्यापेक्षा कोणावर अन्याय होईलच म्हणुन फक्त आस्वाद घेईन. नो वोटींग. :) -दिलीप बिरुटे

हे माझ्याकडून जुनं महाबळेश्वर OldMahabaleshwar टाउन हॉल - शेफिल्ड Sheffield स्वामीनारायण मंदीर - लंडन SwamiNarayanMandirLondon

In reply to by बाळ सप्रे

पहिला फोटो महाबळेश्वरातल्या कृष्णामाई मंदिराचा आहे. प्रत्यक्षात ते एक शिवमंदिर आहे. ५००० वर्षांपूर्वीचे मंदिर असे तिकडे म्हणतात एकंदरीत बांधकामाच्या शैलीवरून १३ व्या शतकातील आहेतसे दिसते. मंदिरांच्या भिंतीवर असलेली नाग आणि गरुडाची शिल्पे रोचक आहेत.

In reply to by बाळ सप्रे

शेवटून दोन आवडले खासकरून आमच्या शेफिल्डच्या टाऊनहॉलचा जास्तं ;)

स्थापत्यविशेषः चॅपेल् ऑन द रॉक् विषयी एका 'जगातील सर्वात सुंदर चर्च' अशा नावाच्या लेखात मी पहिल्यांदा वाचले. आणि त्याप्रमाणेच ही जागा खरंच खूप सुंदर आहे. जुन्याचे जुनेपण अधिक खुलवण्यासाठी पिवळ्या फ़ोर्ड मस्टॅंग् चे प्रयोजन (विरोधाभासप्रयोग). छायाचित्रविशेषः उन्हात या गाडीचा रंग फार पांढरट होतो (bleach effect), त्यामुळे योग्य प्रमाणात ढगाळ वातावरण मिळेपर्यंत तीनदा जाणे झाले. छायाचित्रविवरणः Canon EOS REBEL T3i f/18 1/200 ISO-1600 70mm स्थापत्यविशेषः हे कोणाचे घर आहे महिती नाही पण गूगल मॅप वर स्नोबोर्डिंग् स्लोप् शोधताना सापडले. गर्द झाडीतला बंगला जाम आवडला, विशेषतः फ़रशीची नक्षी, जणू आकाशातून चांगले दिसावे याच हेतूने बांधले आहे... https://maps.google.com/maps/@39.1917166,-106.8336454,93m/data=!3m1!1e3 छायाचित्रविशेषः त्या बंगल्यावरून पॅराग्लायडिंन्ग् करत काढलेला हा फोटो आहे. त्यामुळे बरेचसे श्रेय योग्य प्रमाणात आणि योग्य दिशेने असलेल्या वा-याला जाते. छायाचित्रविवरणः Canon PowerShot S5 IS f/4 1/640 ISO=80 30mm स्थापत्यविशेषः रामेश्वरला जाताना समुद्रावरील हा सेतू. छायाचित्रविशेषः रेल्वेतून काढलेला हा फोटो आहे. मला आवडण्याचे कारण म्हणजे १/३ नियम अगदी काटेकोर पणे पालन झालेला आहे (१/३ पाणी, २/३ आकाश्) छायाचित्रविवरणः Canon PowerShot S5 IS f/4 1/640 ISO=80 6mm

हंपी येथील पायर्‍यांची विहिर मूळ रंगीत चित्र काळेपांढरे केले. रेषा आणि आकारांना उठाव देण्यासाठी कॉन्ट्रास्ट जास्त वाढवला . अनावश्यक भाग कातरला. stepwell कॅनन EOS 1000D लेन्स - टॅमरॉन 17-50mm @ 17mm 1/500, f/7.1, आयएसओ 200

नीड नदीवरचा रेल्वे व्हायाडक्ट (पूल) - Knaresborough Castle मधून टिपलाय. . Camera- Canon EOS 550D F-stop- f/5 Exposure Time - 1/500 sec ISO - 100 Focal Length - 55mm Flash Mode - No Flash Post processing - Picasa आर्सेलरमित्तल ऑर्बिट - ऑलिंपि़क पार्क, स्ट्रॅटफोर्ड. . Camera - Canon EOS 550D F-stop - f/4.5 Exposure Time - 1/4 sec ISO-2000 Focal length- 21mm Flash Mode - No Flash Post processing - Picasa Heage पवनचक्की १७९७ मध्ये बांधली व २००२ मध्ये पुनर्स्थापना केली. Heage पवनचक्की - चेस्टरफिल्ड रोड, बेल्पर . Camera - Canon EOS 550D F-stop - f/5 Exposure Time - 1/640sec ISO -100 Focal Length - 18mm Flash Mode - No Flash Post processing - Picasa

क्या बात है. नुसतीच छायाचित्रे नव्हे, तर त्यामुळे कित्येक ठिकाणांचीही ओळख होत आहे. धन्यवाद.

(समर्पकासमवेत, त्यांचा रामेश्वरचा फोटो इथे ठेवून) वेगळ्या विभागात हालवण्यात यावे. आणि दोघांना विजयी घोषित करुन मग स्पर्धा घ्यावी असे सुचवतो.

In reply to by संजय क्षीरसागर

संक्षी भारताबाहेरच्या स्थळांचे फोटो टाकू नयेत असा नियम दाखवाल का कृपा करून?

In reply to by सानिकास्वप्निल

परदेशी बनावट? बरेच फोटो आहेत की आधीही आलेले परदेशातल्या वास्तुंचे!!

In reply to by सानिकास्वप्निल

तै तै, सर तुम्हाला विजयी घोषित करत आहेत हो! म्हणजे तुम्ही ऑलरेडी जिंकला आहात असं म्हणतात ते. ग्लास अर्धा भरलाय म्हणा. (मोदी असाल तर अर्धा पाण्यानं अर्धा हवेनं असा पूर्ण भरला म्हणा) बी+ ;)

In reply to by संजय क्षीरसागर

किती घाई किती घाई सर? अवांतरः ह्यासाठी साईपदयात्रा कराव्यात. श्रद्धा आणि मुख्यत्वे 'सबुरी' जमते. ;)

In reply to by संजय क्षीरसागर

त्यांचा प्रश्न चुकीचा नव्हता. बाकी आपण घाई करता आहात/ नेहमीच असता असं निदर्शनास आणून देतो. ह्यानंतरचा प्रतिसाद साहजिकच आपण टाकणार आहात नि तो ह्या विषयाबाबतचा शेवटचा असेल.

१. तोक्यो मधिल राजाचा महाल EXIF: Canon EOS 550D - F/४.५ - १/२००० - ISO१०० - -१.५ EV - ४०mm Tokyo Palace २. लोटस टेंपल, दिल्ली EXIF: Canon EOS 550D - F/५.६ - १/३५० - ISO१०० - -०.५ EV - १८mm Lotus Temple ३. ताज महाल, आग्रा EXIF: Canon EOS 550D - F/८ - १/४५ - ISO१०० - -०.५ EV - २४mm Taj Mahal

In reply to by जातवेद

तोक्योमधल्या राजमहालाबद्दल परदेशी-वास्तु फोटो विभागात (पुन्हा) पहिला क्रमांक (विभागून), आणि दोन्ही मिळून असलेल्या संयुक्त स्पर्धेत अंतिम विजयी घोषित करतांना मला आनंद होत आहे!

सगळे सुंदर फटु!

सर्वांनी १,२,३ क्रमांक देण्याऐवजी, चढते क्रमांक द्यावेत म्हणजे बाकिच्यांना मत द्यायला सोपे पडेल. उदा. सदस्य क्र. १ फोटो - १, २, ३ सदस्य क्र. २ फोटो - ४, ५, ६ अर्थात आता बरेच फोटो आलेत त्यामुळे हे सध्यापुरते तरी शक्य नाही.

A केरळ मधील हाउसबोट B लंडन येथील टॉवरब्रिज. हा उघडून बोट जाताना पहायला मजा येते. पुलावरचं ट्राफिक तेव्हढा वेळ दोन्हीकडे थांबून रहातं C कोलोझीयम: रोम- इटली येथील क्रीडा प्रेक्षागृह क्यामेरा: सोनी डी एस सी डब्ल्यू ३५ कसलेही पोस्ट प्रोसेसिंग केलेले नाही