✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा

स
संपादक मंडळ यांनी
Tue, 08/19/2014 - 14:30  ·  लेख
लेख
नमस्कार! १९ ऑगस्ट १८३९ ला पॅरिसमधे छायाचित्रणकलेची अधिकृतरीत्या सुरुवात झाली. या घटनेला आज १७५ वर्षे होत आहेत. या निमित्ताने मिपावर छायाचित्रणाची स्पर्धा घ्यावी असा एक प्रस्ताव श्री सर्वसाक्षी यांच्याकडून आला आहे. मिपावर अनेक गुणी कलाकार, छायाचित्रकार आहेत. मिपा सदस्य-स्पर्धकांना कोणताही एक विषय देऊन एकच एक स्पर्धा घेण्यापेक्षा स्पर्धामालिका सुरू करावी असा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वात पहिल्या स्पर्धेचा विषय मानवनिर्मित स्थापत्य हा आहे. नव्या, जुन्या, प्राचीन, अर्वाचीन इमारती आणि स्थापत्य यांची तुम्ही काढलेली छायाचित्रे इथे या धाग्यावर प्रकाशित करावीत ही विनंती. आजपासून आणखी ७ दिवस, म्हणजे २६ तारखेपर्यंत प्रत्येकी ३ छायाचित्रे प्रकाशित करू शकता. त्यानंतर ७ दिवसपर्यंत सगळे मिपा सदस्य परीक्षक म्हणून या चित्रांना १,२,३ असे अनुक्रमांक देतील. मतांची सरासरी काढून अंतिम निर्णय या धाग्यावर प्रकाशित केला जाईल. स्पर्धेचे अन्य नियमः १)प्रत्येकजण ३ चित्रे अपलोड करू शकतो. २)सर्व सदस्य मतदान करणार असल्याने संपादकही सदस्य म्हणून स्पर्धेत भाग घेऊ शकतात. ३)पहिल्या भागानंतर यापुढेही अन्य विषय घेऊन ही स्पर्धा सुरू राहील. यात सदस्यही विषय सुचवू शकतात. ४)छायाचित्राचा exif data शक्यतो असावा. ५)ह्या शिवाय छायाचित्र कुठे काढलेले आहे, ठिकाणाची थोडक्यात ओळख आदि माहिती चित्रासोबत द्यावी. ६)प्रोसेसिंग वैगरे केले आहे का याची माहिती द्यावी. ७)फक्त मोबाईलवरून काढलेल्या फोटोंसाठी स्वतंत्रपणे स्पर्धा घेण्यात येईल. पाहिजे तर अशी छायाचित्रे या स्पर्धेतही भाग घेऊ शकतात, पण क्रमांकाबद्दल अंतिम निर्णय मिपा सदस्यांचा असेल. ८)स्पर्धेच्या विजेत्यांना प्रशस्तीपत्रके ईमेल करण्यात येतील. स्पर्धेत जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करण्यास हातभार लावावा ही विनंती. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
कला
जीवनमान
तंत्र
मौजमजा
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
सद्भावना
शुभेच्छा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
102142 वाचन

💬 प्रतिसाद (182)

प्रतिक्रिया

मिसळपाव वर? एकच आहे.

असंका
Wed, 08/20/2014 - 15:35 नवीन
मिसळपाव वर? एकच आहे.
↩ प्रतिसाद: पैसा

ओ पैतै,

प्रमोद देर्देकर
Wed, 08/20/2014 - 12:21 नवीन
ओ पैतै, अगोदरच्या जुन्या धाग्यात एकदा मिपावर डकवलेली, छा.चि. पुन्हा एकवार डकवली तर चालतीलय काय?

चालेल की!

पैसा
Wed, 08/20/2014 - 12:25 नवीन
जास्तीत जास्त ३. आणि ती तुम्ही काढलेली हवीत.
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

मस्त फोटो .छान सुरूवात .

कंजूस
Wed, 08/20/2014 - 12:31 नवीन
मस्त फोटो .छान सुरूवात .

शिंदे यांची छत्री- पुणे.

चिंतामणी
Wed, 08/20/2014 - 13:13 नवीन
Image removed.

माझी प्रवेशीका.

चिंतामणी
Wed, 08/20/2014 - 13:29 नवीन
Image removed. श्री क्षेत्र माहूली येथील कृष्णा नदीवरील पूल. Image removed. शिंदे छत्री- पुणे Image removed. श्री क्षेत्र माहूली येथील शिव मंदीर

दुसर्‍या फोटोला बक्षीस मिळालच

बाळ सप्रे
Wed, 08/27/2014 - 16:18 नवीन
दुसर्‍या फोटोला बक्षीस मिळालच पायजे !!
↩ प्रतिसाद: चिंतामणी

१) विपश्यना पॅगोडा ईगतपुरी

विलासराव
Wed, 08/20/2014 - 13:30 नवीन
१) विपश्यना पॅगोडा ईगतपुरी Image removed. २) आनंदसागर उद्यान शेगाव Image removed. ३) आदर्श मुंबई. Image removed.

स्थापत्यछायाचित्रणाची अप्रतीम उदाहरणे

एस
Wed, 08/20/2014 - 13:44 नवीन
हे वाचा मस्त प्रतिमा आहेत इथे.

मस्त!

पैसा
Wed, 08/20/2014 - 13:45 नवीन
पैजारबुवा. आतिवास, चिंतामणी, विलासराव सगळ्यांचे फोटो उत्तम आहेत!

वा!मजा येते आहे एक से बढकर एक

अजया
Wed, 08/20/2014 - 14:14 नवीन
वा!मजा येते आहे एक से बढकर एक फोटो बघायला.

मस्त उपक्रम

अविनाश पांढरकर
Wed, 08/20/2014 - 14:53 नवीन
मस्त उपक्रम

थोडक्यात माहिती लिहा असेपण

असंका
Wed, 08/20/2014 - 15:52 नवीन
थोडक्यात माहिती लिहा असेपण आहे हो...फोटो बरोबर माहिती पण लिहा ना आपले चान्स वाढवण्यासाठी!

फरीयाबाग ,अहमदनगर

मीता
Wed, 08/20/2014 - 18:10 नवीन
Image removed. २. Image removed.

पुढील फेर्‍यांसाठी विषयांची सुचवणी

श्रीरंग_जोशी
Wed, 08/20/2014 - 21:10 नवीन
  • निसर्ग उदा. डोंगर, जलाशये इ.
  • व्यक्तिचित्रे
  • शहरे / गर्दीची ठिकाणे
  • गड, किल्ले

धन्यवाद!

पैसा
Wed, 08/20/2014 - 21:25 नवीन
आणखीही नावीन्यपूर्ण विषय सुचतील तसे नोंद करून ठेवा!
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

पुढील फेर्‍यांसाठी विषय

चित्रगुप्त
Wed, 08/20/2014 - 23:44 नवीन
पुढील फेर्‍यांसाठी सुचवल्या जाणार्‍या विषयांसाठी एक नवीन धागा काढावा, ज्यात विविध विषय एकाच ठिकाणी साचवता येतील. मला सुचणारे विषयः १. निरागस २. प्रयत्न ३. माझी आवडती वस्तु ४. सावल्या ५. बिंब-प्रतिबिंब ६. मूर्तीकला ७. सौंदर्य ८. वृद्ध्त्व ९. विचित्रता १० फुरसतीचे क्षण
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

अमेरीकेतील Idaho राज्यातील Snake नदी वरील पूल

अनुप कोहळे
Wed, 08/20/2014 - 21:40 नवीन
Image removed. ISO-100 Shutter speed - 1/200, 1/800, 1/100 लेन्स १४ मि. मि. हे छायाचित्र माझे खूप आवडीचे आहे. ३ प्रतिमांचे प्रोसेसिंग Lightroom ह्या प्रणाली मधे करून Photomatix ह्या प्रणाली मधे HDR तयार केले आहे. आशा आहे कि तुम्हाला सुद्धा हे छायाचित्र आवडेल.

वाह

श्रीरंग_जोशी
Wed, 08/20/2014 - 21:44 नवीन
अप्रतिम. शक्य असल्यास आपल्या चित्रांचा माहितीसकट वेगळा धागा काढावा ही विनंती.
↩ प्रतिसाद: अनुप कोहळे

निव्वळ अप्रतिम - सूर्य

सूर्य
Fri, 08/22/2014 - 10:30 नवीन
निव्वळ अप्रतिम - सूर्य
↩ प्रतिसाद: अनुप कोहळे

पुलाची सावली प्रोसेसिंगमधे काढली असती तर

संजय क्षीरसागर
Fri, 08/22/2014 - 11:24 नवीन
फोटो बहारदार झाला असता.
↩ प्रतिसाद: अनुप कोहळे

सुंदर

सुधीर
Fri, 08/22/2014 - 15:40 नवीन
प्रोसेसिंग शिवाय असलेले मूळ छायाचित्र पाहण्याचाही मोह होत आहे.
↩ प्रतिसाद: अनुप कोहळे

या फोटोला बक्षीस मिळालच पायजे

बाळ सप्रे
Wed, 08/27/2014 - 16:16 नवीन
या फोटोला बक्षीस मिळालच पायजे !!
↩ प्रतिसाद: अनुप कोहळे

मी काढलेले निवडक तीन फोटो

वेल्लाभट
Wed, 08/20/2014 - 21:40 नवीन
१. अहमदाबाद जवळ असलेली अडालज ही भव्य विहीर. Image removed. अडालज की बावड़ी (गुजराती : अडालजनी वाव) एक सीढ़ीदार कुँआ (बावड़ी) है जो गुजरात के अडालज नामक गाँव में है। दूर-दराज से बड़ी संख्या में लोग इस कुएं को देखने आते रहते हैं। वास्तव में यह एक बड़े भवन के रूप में निर्मित है। भारत में इस तरह के कई सीड़ीनुमा कूप हैं. (मला अत्ताच कळलंय की पुण्याजवळ निंब येथे अशीच एक, बहुदा याच्याहून भारी विहीर आहे शिवकालीन. तेंव्हा ती बघायला जायचंय आता.) फोटोबाबतः कॅमेरा - कॅनन पॉवरशॉट एस एक्स २२० एचएस शटरस्पीड - १/६४० अ‍ॅपर्चर - एफ ४.० आयएसओ - २०० पोस्ट प्रोसेसिंग - लेव्हल अ‍ॅडजस्टमेंट, ब्राईटनेस/कॉन्ट्रास्ट २. सटाणा येथील मांगी-तुंगी या जुळ्या शिखरांकडे जाणा-या पाय-या. ४०००+ पाय-या चढून या शिखरांवर जाता येतं. Image removed. मांगी - तुंगी हा महाराष्ट्रातील एक किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात भिलवड गावानजीक हा किल्ला उभा आहे. हे एक जैन तीर्थक्षेत्रदेखील असून, तेथे चढून जाण्यासाठी सुमारे चार हजारांहून अधिक पायऱ्या आहेत. फोटोबाबतः कॅमेरा - कॅनन पॉवरशॉट एस एक्स २२० एचएस शटरस्पीड - १/८०० अ‍ॅपर्चर - एफ ४.० आयएसओ - १०० पोस्ट प्रोसेसिंग - लेव्हल अ‍ॅडजस्टमेंट, ब्राईटनेस/कॉन्ट्रास्ट ३. जिनिवा, स्वित्झर्लंड येथील एक गल्ली. दोनही बाजूंना उत्तमोत्तम स्विस शैलीतल्या इमारती, त्यांवरची नक्षी, सजावट इत्यादी. Image removed. Geneva (/dʒɨˈniːvə/; French: Genève, is the second most populous city in Switzerland (after Zürich) and is the most populous city of Romandy, the French-speaking part of Switzerland. Situated where the Rhône exits Lake Geneva, it is the capital of the Republic and Canton of Geneva. फोटोबाबतः कॅमेरा - ऑलिंपस एफई २० शटरस्पीड - १/२५ अ‍ॅपर्चर - एफ ३.१ आयएसओ - १२५ पोस्ट प्रोसेसिंग - लेव्हल अ‍ॅडजस्टमेंट, ब्राईटनेस/कॉन्ट्रास्ट

हायला एक सो एक आहेत मिपा वर !

खटपट्या
गुरुवार, 08/21/2014 - 00:05 नवीन
हायला एक सो एक आहेत मिपा वर !! बहुतेक पहिले, दुसरे आणि तिसरे पारितोषिक विभागून द्यावे लागणार :)

चित्रे दिसत नाहीत हो वेल्लाभट....

किल्लेदार
गुरुवार, 08/21/2014 - 10:23 नवीन
चित्रे दिसत नाहीत हो वेल्लाभट....

अरेच्चा !

वेल्लाभट
गुरुवार, 08/21/2014 - 10:47 नवीन
मला तर दिसतायत हो. बघा जरा अ‍ॅड्रेस बार च्या खाली काही पिवळी लाल पट्टी येतेय का एरर वाली?.....
↩ प्रतिसाद: किल्लेदार

अवघड हय ब्वॉ...

एस
गुरुवार, 08/21/2014 - 11:13 नवीन
छायाचित्रे अप्रतीम येताहेत. डावंउजवं करणं खरोखरच अवघड जाणार आहे. :-)

मी काढलेले तीन फोटो

स्वैर
गुरुवार, 08/21/2014 - 13:48 नवीन
१.फ्रान्समधील इटाम्स गावातील चर्चचा दरवाजा: Image removed. २.आएफेल टॉवरवरुन काढलेला फोटो: Image removed. ३.आळंदीरोडवरील साईमंदिर परिसरात असलेला स्तंभ : Image removed.

मीता, kohalea तुम्ही अजून

पैसा
गुरुवार, 08/21/2014 - 17:50 नवीन
मीता, kohalea तुम्ही अजून फोटो देऊ शकता. वेल्लाभट आणि स्वैर, खूपच छान फोटो! स्वैर, पहिला फोटो तर जबरदस्त आवडला!

हुमायून चा मकबरा

बोका
गुरुवार, 08/21/2014 - 20:37 नवीन
दिल्लीतील माझे आवड्ते ठिकाण. पर्यटक फारसे नसतात आणि सुंदर परिसर. (अवांतर - मकबरा, कबर, थडगे सारे एकच का ?) Image removed. कॅनन EOS 1000D लेन्स - टॅमरॉन 17-50mm @ 17mm 1/400, f/6.3, आयएसओ 200

तुम्ही अजून दोन फोटो टाका

संजय क्षीरसागर
गुरुवार, 08/21/2014 - 22:35 नवीन
हा तर मस्तच आहे!
↩ प्रतिसाद: बोका

एकदम मस्त !! पोस्ट्कार्ड फोटो

खटपट्या
गुरुवार, 08/21/2014 - 23:36 नवीन
एकदम मस्त !! पोस्ट्कार्ड फोटो !! वास्तू परफेक्ट मधोमध आलीय !!
↩ प्रतिसाद: बोका

युरोपातले चार फोटो

sagarparadkar
गुरुवार, 08/21/2014 - 21:32 नवीन
स्वित्झर्लंड मधील अपेन्त्सेल कौंटिमधील स्टाईन गावातील चीझ फॅक्ट्रीच्या मगील खास अपेंत्सेलर हाउस Image removed. लेक कोन्स्टान्झ किंवा बोडेन्झे मधील 'मायनाउ' बेटावरील संस्थानिकाचा राजवाडा Image removed. व्हिएन्नाच्या सुप्रसिद्ध 'ऑपेरा हाउस'चे अंतरंग Image removed. धन्यवाद

फोटो छान आहे

पैसा
गुरुवार, 08/21/2014 - 21:37 नवीन
पण लोकाना अ‍ॅक्सेस दिला नाहीये बहुतेक, कारण शेअर होत नाहीये. आणि इथे दिसतही नाही.
↩ प्रतिसाद: sagarparadkar

पहिला फोटो आवडला

संजय क्षीरसागर
Sat, 08/23/2014 - 11:02 नवीन
पण कॅमेर्‍याचा अँगल खास वाटला नाही.
↩ प्रतिसाद: पैसा

आणखी एक प्रयत्न

sagarparadkar
Fri, 08/22/2014 - 19:27 नवीन
स्वित्झर्लंड मधील अपेन्त्सेल कौंटिमधील स्टाईन गावातील चीझ फॅक्ट्रीच्या मगील खास अपेंत्सेलर हाउस http://s1383.photobucket.com/user/sagarparadkar/media/AppenzellerHouse_zps1b3ee1be.jpg.html लेक कोन्स्टान्झ किंवा बोडेन्झे मधील 'मायनाउ' बेटावरील संस्थानिकाचा राजवाडा http://s1383.photobucket.com/user/sagarparadkar/media/MainauPalace_zpsaca4309a.jpg.html व्हिएन्नाच्या सुप्रसिद्ध 'ऑपेरा हाउस'चे अंतरंग http://s1383.photobucket.com/user/sagarparadkar/media/OperaHouseVienna_zps45d75f5b.jpg.html स्वित्झर्लंड्च्या लुझर्न मधील जनरल पोस्ट ऑफिसची इमारत http://s1383.photobucket.com/user/sagarparadkar/media/LucernPostOffice_zps2e91a371.jpg.html
↩ प्रतिसाद: sagarparadkar

अपलोड केले

पैसा
Fri, 08/22/2014 - 21:40 नवीन
मूळ प्रतिसादात अपलोड केलेत. मात्र ३ च फोटो देता येतील. त्यामुळे चौथा टाकला नाही. तो हवा असेल तर आहे त्यापैकी एखादा काढावा लागेल. फोटो सुरेख!
↩ प्रतिसाद: sagarparadkar

माझे पण तीन फोटो...

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 08/21/2014 - 21:50 नवीन
माझे पण तीन फोटो... १. कंबोडियातिल बांतीय श्रेइ मंदिरातील एक कोरीवकाम : Image removed. २. चीन मधिल लेशान येथिल बसलेल्या बुद्धाचे शिल्प : Image removed. ३. शांघाईच्या पर्ल टॉवरच्या काचेच्या जमिनीतून दिसणारा टॉवरचा स्तंभ व शेजारच्या मोठ्या चौकात असलेल्या उंच वर्तुळाकार पादचारी मार्गासह इतर परिसर : Image removed. (कॅमेरा: Soni DSC-TX7)

बुद्ध एकदम जबरदस्त.. अफाट..

गवि
Fri, 08/22/2014 - 11:45 नवीन
बुद्ध एकदम जबरदस्त.. अफाट..
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

असेच म्हणतो

प्रशांत
Fri, 08/22/2014 - 12:58 नवीन
+१ शांघाईच्या पर्ल टॉवर सुद्धा भारीच
↩ प्रतिसाद: गवि

फोटोंच्या विषयांबद्दल थोडी

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 08/22/2014 - 12:03 नवीन
फोटोंच्या विषयांबद्दल थोडी माहिती: १. बांतेय श्रेई मंदिर : १० व्या शतकातले बांधकाम. २. लेशान बुद्ध : बांधकाम इ स ७१३ ते ८०३ पर्यंत. मूर्तीची उंची ७१ मीटर (२३३ फूट). ३. पर्ल टॉवर : उद्घाटन इ स १९९४ मध्ये. एकूण उंची ४६८ मीटर (१५३५ फूट). काचेची जमीन असलेल्या पर्यावेक्षक सज्जेची उंची २५९ मीटर (८५० फूट)
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

तीन मार्क कुठल्या कुठल्या फोटोंना द्यायचे

संजय क्षीरसागर
गुरुवार, 08/21/2014 - 22:33 नवीन
याबाबतीत माझा सॉलीड गोंधळ व्ह्यायला लागलायं. त्यापेक्षा प्रत्येक सदस्याला शंभर मार्कांचा कोटा द्या म्हणजे हात सैल सोडता येईल.

बरोबर !!

खटपट्या
गुरुवार, 08/21/2014 - 23:38 नवीन
बरोबर !!
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

माझा पण एक........

किल्लेदार
गुरुवार, 08/21/2014 - 23:59 नवीन
Image removed. गोल गुम्बज, बिजापूर. second largest dome in the world. कॅनन ४५० डी , १८-५५. HDR प्रोसेसिंग

जुना फोटो आहे. चांगल्या

किल्लेदार
Fri, 08/22/2014 - 00:06 नवीन
जुना फोटो आहे. चांगल्या रीसोल्युशन चा सापडला नाही.
↩ प्रतिसाद: किल्लेदार

इसा खान टोम्ब … दिल्ली

किल्लेदार
Fri, 08/22/2014 - 00:17 नवीन
Image removed. इसा खान टोम्ब … दिल्ली

आयला, आणखी एक फोटो टाका

संजय क्षीरसागर
Fri, 08/22/2014 - 10:07 नवीन
तुम्हाला विजयी घोषित करुन टाकू!
↩ प्रतिसाद: किल्लेदार

.

सूर्य
Fri, 08/22/2014 - 10:32 नवीन
दोन्ही फोटो खुप छान. - सूर्य.
↩ प्रतिसाद: किल्लेदार

सुर्य , तुझ्या ईन्ट्रीची वाट

सुहास..
Fri, 08/22/2014 - 10:34 नवीन
सुर्य , तुझ्या ईन्ट्रीची वाट बघतोय ...
↩ प्रतिसाद: सूर्य
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा