Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by आदूबाळ on Mon, 07/28/2014 - 19:40
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती
विरंगुळा
हा धागा प्रथम उघडला तेव्हा त्यावर एकही प्रतिसाद आला नव्हता. थोडासा वाचताच लक्षात आलं - बंदे में है दम! लहानग्या सचिनचा पहिला कव्हर ड्राईव्ह पाहून रमाकांत आचरेकरांना काय वाटलं असेल? मिसरूडही न फुटलेल्या खन्नाच्या हातची पहिली मिसळ खाऊन पहिलं गिर्‍हाईक पार्श्वभागी हात लावून बोंबललं असेल तेव्हा रामनाथ उपहारगृहाच्या तत्कालीन मालकांना मिसळीच्या लालजर्द तर्रीत भविष्य दिसलं असेल का? आम्हाला दिसलं. हा धागा इतिहास घडवणार याची खूणगाठ आम्ही मनातल्या उपरण्यास बांधली. खरडफळ्यावर तसं लिहूनही आलो. पण मिपांकरांतले अर्क मिपाकर खफवर नांदत असल्याने त्यांनी अर्थातच आमची भविष्यवाणी फाट्यावर मारली. मला दीडशेची अपेक्षा होती. पण बघता बघता चारशाचा पल्ला गाठला गेल्यावर मी दंग राहिलो. (हो, मी मटाही वाचतो.) हा प्रवास असा झाला a सपाट प्रतलावर चालू झालेला हा धागा दोन-तीन किल्ल्या बसताच सुसाटला. पठारानंतर जिथे चढण सुरू होते, तिथे या किल्ल्या बसल्या. पण नुस्त्या प्रतिसादसंख्येवर काय आहे? वेगही महत्त्वाचा. छत्तीस धावा काढण्यासाठी साठ ओव्हर्स खेळणार्‍या गावसकरांची याद इथे येणे अपरिहार्य आहे. पण याही बाबतीत मंत्राने काश्मीरवर इंचा इंचाने मात केली आहे. a एकूण सत्तेचाळीस मिपाकरांनी या धाग्याला पावन केलं. पण जवळजवळ ऐंशी टक्के प्रतिसाद सत्तेचाळीसपैकी तीस टक्के मिपाकरांनी दिले. विल्फ्रेडो परेटोच्या (अत्रुप्त?) आत्म्याला शांती द्यायचं काम मिपाकरांनी केलं याबद्दल त्यांचे अभिनंदन. a तर कोण आहेत हे टाप ट्वेंटी? a पण एकटा माणूस कोणाला आणि किती प्रतिसाद देणार? दूजेविण अनुवादु करायला माऊली पाहिजे. आपुलाचि वाद आपणांसि हे ब्रीद मिपाचं नव्हे. लॉरेल-हार्डी, टॉम अँड जेरी, चिप आणि डेल, गेलाबाजार काळू-बाळू तर हवेतच. नाहीतर वग रंगणार कसा? a चर्चा कुदवणं हा सांघिक खेळ असला, तरी वेळेवर काडी टाकायला महत्त्व आहे. गेलेली वेळ आणि सरलेला वारा परतून येत नाही असं एक सुवचन आहे. (किंवा असलंच काहीतरी. नक्की आठवत नाही.) तर वर सन्मानपूर्वक उल्लेख झालेल्या या आयड्यांनी चर्चेच्या नेमक्या कुठल्या टप्प्यावर योगदान दिलं? आपले गुण नेमके कधी उधळले? a
************************************
खफवर मौताई आणि प्रगो यांच्याशी गफ्फा मारताना हे सुचलं. (दोघांचीही नावं वरच्या गुणवत्ता यादीत आहेत हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलंच असेल.) सर्वांनी हलकेच घ्यावे. (जड घेतलेत तरी हरकत नाही. फाट्यावर मारले जाईल.) सांख्यकीशास्त्र आणि तदानुषंगिक विषयांत आमचे शिक्षण कमी असल्याने हे कंट्री अ‍ॅनालिसीस गोड मानून घ्यावे. कोणाला अजून अभ्यास करायचा असल्यास कळवणे. जय हिंद. जय महाराष्ट्र.
  • Log in or register to post comments
  • 30243 views

प्रतिक्रिया

Submitted by यशोधरा on Mon, 08/04/2014 - 13:02

In reply to सं. मं. ने असो वा तुम्ही, by श्रीगुरुजी

Permalink

श्रीगुरुर्जी अणि संक्षी, एक

श्रीगुरुर्जी अणि संक्षी, एक वेगळा धागा काढायचा का तुमचे ऐसपैस प्रतिसाद वाचायला? हे असे नीट वाचता येत नाहीत. मस्तपैकी एंटरटेनमेंट होईल. मी देऊ काढून? *good*
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Mon, 08/04/2014 - 13:07

In reply to श्रीगुरुर्जी अणि संक्षी, एक by यशोधरा

Permalink

तुमचा मानाची गौराई व्हायचा

तुमचा मानाची गौराई व्हायचा विचार दिसतोय. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sat, 08/02/2014 - 14:21

In reply to बघा प्रकाश पडतोयं का! by संजय क्षीरसागर

Permalink

आदूबाळ,

आदूबाळ, या धाग्याचेही विश्लेषण करण्याची सुवर्णसंधी येताना दिसतेय. निदान त्या नवीन धाग्यात तरी 'सर्वज्ञांना' मानाच्या गणपतीत स्थान मिळू देत. नाहीतर त्यांना आयुष्यात वैफल्य येऊन त्यांचं फ्रस्ट्रेशन इतरांवर निघायचं.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Sat, 08/02/2014 - 16:57

In reply to बघा प्रकाश पडतोयं का! by संजय क्षीरसागर

Permalink

थँक यु सर. पण सर मला शेपूट

थँक यु सर. पण सर मला शेपूट नाहीये. तुम्हाला आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sat, 08/02/2014 - 23:01

In reply to थँक यु सर. पण सर मला शेपूट by प्यारे१

Permalink

नक्की का?

पण सर मला शेपूट नाहीये.
http://en.wikipedia.org/wiki/Coccyx हे विकिबाबा काय वेगळंच सांगतायत! *secret*
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Sat, 08/02/2014 - 23:14

In reply to नक्की का? by पैसा

Permalink

त्या माकडहाडासाठी 'विकी'ची

त्या माकडहाडासाठी 'विकी'ची मदत घ्यावी लागते होय??????? याल्लाह, उठा ले रे बाबा. :(
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sat, 08/02/2014 - 23:24

In reply to त्या माकडहाडासाठी 'विकी'ची by प्यारे१

Permalink

मग!

मी सांगितलं की तुम्ही म्हणणार पुरावे दाखवा, म्हणून आधीच विकिची साक्ष काढली.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sun, 08/03/2014 - 15:15

In reply to नक्की का? by पैसा

Permalink

माकडहाड (Coccyx) म्हणजे

माकडहाड (Coccyx) म्हणजे आपल्या पूर्वजांमध्ये असलेया आणि आता नाहिश्या झालेल्या शेपटीचा अवशेष. माणसातली खरी शेपटी ही अशी असते... Image removed. . Image removed. (दोन्ही फोटो विकिबाबाच्या सौजन्याने) ही झाली खर्र्या शारिरीक शेपटीची खर्री शास्त्रिय गोष्ट. बाकी इथल्या इतर शेपटींबाबत आमी अज्ञानी आणि वाचनमात्र आहोत हे किलियर करत हावोत, तेची नोंद घेवावी आशी णम्र इणंती.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Sun, 08/03/2014 - 15:26

In reply to माकडहाड (Coccyx) म्हणजे by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

शेपूट असावं तर असं. पण ती खरी

शेपूट असावं तर असं. पण ती खरी शेपूट आहे? मनातलं: सिंहकटी भारीच्च आहे. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by हाडक्या on Sat, 08/02/2014 - 17:31

In reply to बघा प्रकाश पडतोयं का! by संजय क्षीरसागर

Permalink

दुसर्‍या महानुभावांनी,

दुसर्‍या महानुभावांनी, निवडीचा इतका वाईड स्पेक्ट्रम असतांना `हाडूक' उचललं आहे, हे लक्षात आलं तरी खूप होईल.
बाकी तुमचे चालू द्या पण आम्हाला हा टोमणा असेल तर एवढेच सांगतो की आम्ही 'श्रीमंत छत्रपती' किंवा 'विवेकानंद' असे नाव घेतले असते तर तुम्ही अशीच भाषा वापरली असती का ? लोकांचे दिसणे, नव, आडनाव (त्यावरून येणारी जात), सामाजिक उतरंडीतले आर्थिक-सामाजिक स्थान असल्या फालतू गोष्टींवरून त्यांना जोखणारे आणि त्यांच्या मतांना पाहणारे अशांना फाट्यावर मारण्यासाठी आमचा असला आडनिडा आयडी आहे आणि अस्तित्व, सत्य आदी मोठमोठ्या बाता मारणारे तुम्ही पण त्यातलेच निघालेले पाहून आजवर असलेला तुमच्याबद्दल उरला सुरला आदर देखील राहिला नाही असे म्हणावेसे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Sat, 08/02/2014 - 18:05

In reply to दुसर्‍या महानुभावांनी, by हाडक्या

Permalink

तुमचा अभ्यास फरच कमी पडतोय

तुमचा अभ्यास फरच कमी पडतोय हाडक्या. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Sat, 08/02/2014 - 18:23

In reply to तुमचा अभ्यास फरच कमी पडतोय by कवितानागेश

Permalink

गप्राव!

गप्राव! सारखं आपलं आब्ब्यास आब्ब्यास. आब्ब्यास ह्यो भ्रम हाय!
  • Log in or register to post comments

Submitted by हाडक्या on Mon, 08/04/2014 - 22:12

In reply to गप्राव! by प्यारे१

Permalink

काय काय भ्रम आहे हेच कळेनासं

काय काय भ्रम आहे हेच कळेनासं झालंय राव.. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Tue, 08/05/2014 - 00:49

In reply to गप्राव! by प्यारे१

Permalink

प्रावले काका , मला त्या भ्रम

प्रावले काका , मला त्या भ्रम धाग्याची लिन्क द्या ना राव लय शोधुनही सापडला नाय ...की तो धागा हाच एक ब्रम होता ?
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 07/31/2014 - 14:43

In reply to आणि विश्लेषणाची निरर्थकता by संजय क्षीरसागर

Permalink

सर,

सर, एक गंभीर प्रश्न विचारतोय. बहुतांश सगळ्याला आपण निरर्थक म्हणता. नक्की काय सार्थ आहे ते मज निरोपावे. मी लाख सांगेन पण घंटाचंदा तुला समजणार नाही असा तुमचा प्रतिसाद असेल कदाचित पण तरीही सांगाच्च असा आग्रह आहे. ज्यांना समजेल त्यांना समजेल. दोन पाच वर्षांनी खरंच माझ्या बुद्धीची वाढ झालीच तर मलाही कळेल. तर.... व्हॉट्स रियली मीनिंगफुल ऑर वर्थ?
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 07/31/2014 - 15:02

In reply to सर, by प्यारे१

Permalink

घंटाचंदा आत्ता उपरती झाली

घंटाचंदा आत्ता उपरती झाली तुला
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 07/31/2014 - 15:06

In reply to घंटाचंदा आत्ता उपरती झाली by स्पा

Permalink

ळॉळ.

=))
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 07/31/2014 - 15:40

In reply to घंटाचंदा आत्ता उपरती झाली by स्पा

Permalink

हो स्पा सर.

हो स्पा सर.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on गुरुवार, 07/31/2014 - 16:56

In reply to सर, by प्यारे१

Permalink

हे म्हणजे मेंढरानी सिंव्हाला

हे म्हणजे मेंढरानी सिंव्हाला विचारण्यासारखे झाले, 'जंगलचा राजा कोण?' =))
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 07/31/2014 - 20:15

In reply to हे म्हणजे मेंढरानी सिंव्हाला by कवितानागेश

Permalink

वाल्याचा वाल्मिकी झाला, तो

वाल्याचा वाल्मिकी झाला, तो अंगुलिमाल माणसं मारणं सोडू शकला, पतित पावन झाला परंतु.... इस्स मिपा पे किसी को माफी नही मिलती अयसा लग रहा हय! जरा कुठं थोरांचं मार्गदर्शन घ्यावं म्हटलं की आलेच्च :-/ *fool* का? असं का?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Sat, 08/02/2014 - 00:52

In reply to वाल्याचा वाल्मिकी झाला, तो by प्यारे१

Permalink

वाल्याचा वाल्मिकी झाला, तो

वाल्याचा वाल्मिकी झाला, तो अंगुलिमाल माणसं मारणं सोडू शकला, पतित पावन झाला
आवल्यांचा आवळा झाला की कदाचित माफी मिळेल असा अंदाज आहे ! *biggrin* अ.ह.घ्या
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on गुरुवार, 07/31/2014 - 12:10

In reply to :-) by आतिवास

Permalink

+१

अगदी! सर्वात पुढे, महाराष्ट्र माझा. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on गुरुवार, 07/31/2014 - 12:46

Permalink

सुंदर !

आदुबाळ ह्यांचे अभिनंदन ! अतिषय सुंदर अ‍ॅनालिसीस ! शेवटचे दोन चार्ट्स , एक्सेल मधे कशे काढले हे खुप विचार करुन गुगल करुनही लक्षात आले नाही , त्याबद्दल सविस्तर बोलुच :) डॅटा एक्सेल्स शेयर करण्याबाबर व्यनि पाठवला आहे :)
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on गुरुवार, 07/31/2014 - 14:28

In reply to सुंदर ! by प्रसाद गोडबोले

Permalink

पार्टनरशिप चार्ट

पार्टनरशिप चार्ट मूळ डेटा वापरून एकापाठोपाठच्या प्रतिसादांचा "डमी डेटा" बनवला. उदा. प्रगो आदूबाळ स्पा सूड असे एकापाठोपाठ एक चार प्रतिसाद असतील तर कॉन्केटिनेट वापरून प्रगो - आदूबाळ आदूबाळ - स्पा स्पा - सूड असा डमी डेटा बनला. मग पिव्होट चार्ट मारला. गुणवंतांची गुणवत्ता चार्ट गुणवंतांचे प्रतिसाद दुसर्‍या सीरीजमध्ये घेतले, आणि एक्स अ‍ॅक्सिस तोच ठेवून पहिल्या (सर्वात वरच्या) ग्राफवर ही दुसरी सीरीज प्लॉट केली. वेगळे उठून दिसण्यासाठी सीरीजचे रंग बदलले.
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on गुरुवार, 07/31/2014 - 14:44

In reply to पार्टनरशिप चार्ट by आदूबाळ

Permalink

जबराट_/\_

जबराट_/\_ ह्यावर एक सविस्तर लेख येऊद्या...आमचा कस्टमर मध्येच अश्या मागण्या करत असतो पण कॉग्नोस(रीपोर्टिंग टुल) मध्ये. एक्सेलमध्ये होते तर कॉग्नोसमध्ये पण हवंय म्हणे.
  • Log in or register to post comments

Submitted by विटेकर on गुरुवार, 07/31/2014 - 15:07

Permalink

सलाम

तुमच्या चिकाटीला !
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 07/31/2014 - 16:43

Permalink

सॉलिड विश्लेषण!

आमहाला एवढं नक्की कळलं की भरपूर प्रतिसाद असलेला धागा काढायचा असेल तर आधी एक देव धर्म इ बद्दल विषय निवडावा. आणि मग बॅटमॅन, प्रगो, संक्षी, प्यारे, धन्या यांना काळवेळ बघून पिना माराव्यात. आमच्या घरचे ब्रॉडबँड बंद असल्याने या गमतीजमतीत भाग घेता आला नाही याबद्दल अतिषय विषण्ण मनाने मानाच्या गणपतींचे आणि काड्या टाकणार्‍यांचे अभिनंदन करत आहे. या विषयांवर आवडीने लिहिणार्‍या अर्धवटराव, मृगनयनी यांची अनुपस्थिती या धाग्यावर जाणवली.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 07/31/2014 - 16:52

In reply to सॉलिड विश्लेषण! by पैसा

Permalink

बघा बघा लोकहो, शेवटी कर्ता

बघा बघा लोकहो, शेवटी कर्ता करविता 'वेगळाच' असतो हे सगळ्यांना मान्य करावंच लागेल. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 07/31/2014 - 16:57

In reply to बघा बघा लोकहो, शेवटी कर्ता by प्यारे१

Permalink

घ्या!

खर्‍याचा जमाना नाही राहिला आजकाल! (आम्हाला पण मटा मराठी येते)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 07/31/2014 - 17:02

In reply to घ्या! by पैसा

Permalink

खरंय.

खरंय. बाकी डॉ. खरेंचे खरोखर मनापासून आलेले प्रतिसाद नाहीत दिसले हल्ली. खरे आहेत आपलं बरे आहेत ना? ;) (हलकं घ्या सर)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on गुरुवार, 07/31/2014 - 17:20

In reply to खरंय. by प्यारे१

Permalink

डॉ़क्टर खरे

"मी बोटीवर होतो तेव्हा असले वाद विवाद व्हायचे नाहीत मिपावर " असा प्रतिसाद अपेक्षित होता काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 07/31/2014 - 17:23

In reply to डॉ़क्टर खरे by प्रसाद गोडबोले

Permalink

खिक्क !!

*mosking*
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 07/31/2014 - 17:30

In reply to डॉ़क्टर खरे by प्रसाद गोडबोले

Permalink

ठ्ठो =))

ठ्ठो =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Sun, 08/03/2014 - 17:56

In reply to डॉ़क्टर खरे by प्रसाद गोडबोले

Permalink

(No subject)

=))
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 07/31/2014 - 17:00

In reply to सॉलिड विश्लेषण! by पैसा

Permalink

आमहाला एवढं नक्की कळलं की

आमहाला एवढं नक्की कळलं की भरपूर प्रतिसाद असलेला धागा काढायचा असेल तर आधी एक देव धर्म इ बद्दल विषय निवडावा. आणि मग बॅटमॅन, प्रगो, संक्षी, प्यारे, धन्या यांना काळवेळ बघून पिना माराव्यात.
छान पाकृ. वीकांताला करून पाहीन!
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 07/31/2014 - 17:02

In reply to आमहाला एवढं नक्की कळलं की by बॅटमॅन

Permalink

झालं

प्रथमग्रासे मक्षिकापात. वीकांताला केलीली पाकृ सोमवारपर्यंत खपत नाय.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 07/31/2014 - 17:05

In reply to झालं by पैसा

Permalink

अहो, लेख लेख मे लिखा है

अहो, लेख लेख मे लिखा है प्रतिसादक का नाम. टेण्षण नका घेऊ.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on गुरुवार, 07/31/2014 - 17:22

In reply to सॉलिड विश्लेषण! by पैसा

Permalink

मग बॅटमॅन, प्रगो, संक्षी,

मग बॅटमॅन, प्रगो, संक्षी, प्यारे, धन्या यांना काळवेळ बघून पिना माराव्यात.
आमचा बेन्चयोग संपाला आहे माते ! आता काम सुरु ! मुक्तपीठ मोड ऑन : बी १ ची डॉक्युमेन्ट गोळा करत आहे सध्या ! मुक्तपीठ मोड ऑफ :ड
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on गुरुवार, 07/31/2014 - 20:48

In reply to मग बॅटमॅन, प्रगो, संक्षी, by प्रसाद गोडबोले

Permalink

मुक्तपीठ मोड ऑन : बी १ ची

मुक्तपीठ मोड ऑन : बी १ ची डॉक्युमेन्ट गोळा करत आहे सध्या ! मुक्तपीठ मोड ऑफ :ड
बी १ चे काय त कौतुक. आमच्या डोंबीवलीत घरास एक याप्रमाणे पोरं एच १ वर जातात.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 07/31/2014 - 22:00

In reply to मग बॅटमॅन, प्रगो, संक्षी, by प्रसाद गोडबोले

Permalink

भो वत्स

तुजप्रत कल्याण डोंबोली असो. लौकरच तुलाही हिरवा माज असल्याचे सांगता यावे यासाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Fri, 08/01/2014 - 22:20

Permalink

कोणाला अजून अभ्यास करायचा असल्यास कळवणे- हात वर केला आहे !

कंट्री अ‍ॅनालिसीस गोड मानून घ्यावे. कोणाला अजून अभ्यास करायचा असल्यास कळवणे.
आदूबाळजी, कोण कै म्हणो, आम्ही आपला अ‍ॅनालिसीस लै आवडून घेतला आहे. बरं झाल आम्ही योगायोगाने धागा उघडून बघीतला. आपला एक उद्देश कदाचित विरंगुळा असला तरी, आम्ही आपल्या अ‍ॅनालिसीसच्या भावी स्कोपकडे अत्यंत आशेने बघतो. संवादक्षम मराठी संकेतस्थळांच्या विवीध धागाचर्चात सहभागी होणार्‍या मंडळींचे मुख्य एरीआ ऑफ इंटरेस्ट/सब्जेक्ट्स कोणते असतात, सहभागाच्या मागच्या मुख्य प्रेरणा कोणत्या असतात इत्यादी प्रकारचे अधीक खोलवर खीस पाडून विश्लेषण आणि अभ्यास उपलब्ध करून दिल्यास आम्ही आपले अत्यंत अभारी असू. सधारणतः १०० च्यावर प्रतिसाद गेलेल्या सर्वच मराठी संकेतस्थळांवरील धाग्यांचा अभ्यास या निमीत्ताने सुरु होऊ शकल्यास हवा आहेच (अर्थात आपल्या सवडी नुसार). मराठी विकिपीडियावरील मराठी संकेतस्थळे हा लेख शीळा झाल्याची पैतैंची नेहेमी तक्रार असते. आपल्या अ‍ॅनालिसीसचा ज्ञानकोशीय उल्लेखनीयता प्राप्त होणारा उपयूक्त भाग संदर्भा सहीत उचलण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करू.
  • Log in or register to post comments

Submitted by आतिवास on Sat, 08/02/2014 - 09:04

Permalink

शीळा?

मराठी संकेतस्थळे हा लेख शीळा झाल्याची शीळा??
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 08/02/2014 - 12:12

In reply to शीळा? by आतिवास

Permalink

शिंळा =शींळा= शिळा= शीळा

शिंळा =शींळा= शिळा= शीळा (तथाकथीत शुद्धलेखन विषयक काँमेंट असल्यास फां.मा.)
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sat, 08/02/2014 - 20:10

In reply to शीळा? by आतिवास

Permalink

मैलाचा दगड म्हणायचं असेल

मैलाचा दगड म्हणायचं असेल त्यांना ;)
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 08/02/2014 - 21:23

In reply to मैलाचा दगड म्हणायचं असेल by यशोधरा

Permalink

'मैला'ला र्‍हस्व दीर्घ नै तरी

'मैला'ला र्‍हस्व दीर्घ नै तरी दोन-तीन अर्थ होतात का नै.:) कै समजायच ते क्वांट्येक्स्टवर समजत पण काय..... जाऊ द्या पा...नां फा. मा. इज द बेस्ट प्वालिसी.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 08/02/2014 - 21:37

In reply to 'मैला'ला र्‍हस्व दीर्घ नै तरी by माहितगार

Permalink

मंत्रचळेपणाचा अनुभव ?

मंत्रचळेपणाचा अनुभव ?
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 08/04/2014 - 13:21

In reply to मैलाचा दगड म्हणायचं असेल by यशोधरा

Permalink

तथाकथित शुद्धलेखन?

तथाकथित शुद्धलेखन? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Mon, 08/04/2014 - 16:11

In reply to तथाकथित शुद्धलेखन? by बॅटमॅन

Permalink

हं, होय तसंच, तरीपण या

हं, होय तसंच, तरीपण या धाग्यावर हि विषयांतरीत चर्चा वाढवायची नाहीए, वेगळ्या धाग्याच्या रुपाने काळाच्या ओघात लिहिनच तेव्हा चर्चा करुयात. तेव्हा आमचा या धाग्यापुरता या विषयास तुर्तास पुर्णविराम.
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Sat, 08/02/2014 - 13:00

Permalink

निर्वाण !

यवढा बारीक अभ्यास करून धाग्याचा 'कूट' केलेला पाहून श्रीश्री आदुबाळ यांना 'मिपा-धागे-कूट्शिरोमणी' हा किताब देणेची शिफारस करणेत येत आहे.. *biggrin*
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sat, 08/02/2014 - 14:22

Permalink

आदूबाळ,

आदूबाळ, या धाग्याचेही विश्लेषण करण्याची सुवर्णसंधी येताना दिसतेय. निदान त्या नवीन धाग्यात तरी 'सर्वज्ञांना' मानाच्या गणपतीत स्थान मिळू देत. नाहीतर त्यांना आयुष्यात वैफल्य येऊन त्यांचं फ्रस्ट्रेशन इतरांवर निघायचं.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com