Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Mon, 07/07/2014 - 13:13
कां कोण जाणे पण परत उंबरठा बांधायची हिंमतच होत नाहीये ---- न जाणो ती अंगणातली फुलदाणी घरात परत आलीचं नाही तर?! ---- मग वाटतं बरं झालं उंबरठा वाहून गेला कच्चाच होता नाहीतरी ---- तुझी डायरी तेवढी बाहेर काढून वाचायची अनिवार इच्छा होतेय किमान ती अलमारी तरी शांत होईल... एकदाची ! ---- देवघरासमोरच्या समईत तेल घातले वाटले ज्योतीची घालमेल थांबेल पण... ---- काल नाही समजले पण त्या उंबरठ्याबरोबर "शुभ - लाभ" लिहीलेल्या रांगोळीच्या ओळीही वाहून गेल्या हे आज लक्षात आले ---- पावसाची वाट बघतोय काल रात्रीपासून पडलाचं नाहीये ---- तुझी डायरी वाचतांना कां कोण जाणे सारखं धुक दाटतयं डोळ्यांसमोर ---- बरं झालं उंबरठा वाहून गेला कच्चाच होता नाहीतरी |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (०७/०७/२०१४) उंबरठा नसलेले घर - १

Submitted by एस on Mon, 07/07/2014 - 13:17

Permalink

हेलावून टाकणारी कविता

हा भाग पहिल्या कवितेपेक्षा जास्त छान आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on Mon, 07/07/2014 - 16:52

In reply to हेलावून टाकणारी कविता by एस

Permalink

अगदी हेच आणि असच.

अगदी हेच आणि असच.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Mon, 07/07/2014 - 13:21

Permalink

जब्र्यादस्त

जब्र्यादस्त
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Mon, 07/07/2014 - 13:29

Permalink

तू लई बेक्कार हायेस मिक्या.

तू लई बेक्कार हायेस मिक्या. :(
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Mon, 07/07/2014 - 13:57

Permalink

निशब्द !!!

निशब्द !!!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 07/07/2014 - 14:35

Permalink

....

.... :(
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Mon, 07/07/2014 - 16:13

Permalink

पुन्हा एकदा अतिशय सुरेख.

पुन्हा एकदा अतिशय सुरेख.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Mon, 07/07/2014 - 16:36

Permalink

कशाला रे असल काहीतरी जीव घेणं

कशाला रे असल काहीतरी जीव घेणं लिहीतोस मिका. आता उगाच दिवसभर हुरहुर लागुन रहाणार पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Mon, 07/07/2014 - 16:47

Permalink

सुंदर !

सुंदर !
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 07/09/2014 - 14:40

Permalink

हुरहुर लावणारं....तरीही

हुरहुर लावणारं....तरीही मनाच्या एका कोपर्‍याशी मिळतं जुळतं काहीतरी वाचल्यासारखं वाटलं. *good*
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Wed, 07/09/2014 - 23:48

Permalink

चरचरतेय ही कविता.....

चरचरतेय ही कविता.....
  • Log in or register to post comments

Submitted by चाणक्य on गुरुवार, 07/10/2014 - 07:31

Permalink

मस्त रे मिका

काळजाला हात घालणारं लिहीतोस लेका
  • Log in or register to post comments

Submitted by चाणक्य on गुरुवार, 07/10/2014 - 07:32

Permalink

मस्त रे मिका

काळजाला हात घालणारं लिहीतोस लेका
  • Log in or register to post comments

Submitted by अनिदेश on Tue, 07/15/2014 - 09:51

Permalink

पहिल्या कवितेपेक्षा जास्त छान

पहिल्या कवितेपेक्षा जास्त छान...!
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 3605 views

Book traversal links for उंबरठा नसलेले घर - २

  • ‹ उंबरठा नसलेले घर -- १
  • Up

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com