✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

डॉक्टरांच्या हलगर्जीपणाबद्दल :

म
म्हैस यांनी
Wed, 03/05/2014 - 18:23  ·  लेख
लेख
एक ३२ वर्षांचा तरुण छोटंसं kidney stone removal चा operation करायला जातो आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यूला प्राप्त होतो. किती भयानक आहे हे. पुण्याला law college रोड वर असणार्या Prime Surgical Hospital (PSH) च्या डॉक्टरांनी हि कमाल केली आहे . इंद्रजीत चव्हाण पोटाच्या वर डाव्या बाजूला ला kidney stone removal चा ओपेरशन झाला. शुद्धीवर आल्यावर तो उजव्या बाजूला दुखत आहे असं सांगत होता पण डॉक्टरांनी काही नाही operation मुले दुखतंय असं सांगून पेन किलर दिलं. कोणीही नर्स किवा डॉक्टर त्याच्याजवळ थांबायला तयार नवते . अंतर्गत रक्तस्त्रावामुळे त्याच्या हृधायापर्यंत रक्त पोचणं बंद होवून हृदय बंद पडून त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. डॉक्टरांना जबरदस्तीने बोलवून अन्यालाव त्यांनी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये न्यायला सांगितला. पण दुर्दैव असं कि Prime Surgical Hospital मध्ये अम्बुलन्स पण नवती . दिनानाथ मंगेशकर मध्ये न्यायला त्याला तब्बल ५० मिनिटे लागली. तिथे पोचल्यावर पुन्हा त्याच्यावर दुसरं ओपेरतिओन करण्यात आलं. डॉक्टरांनी बाहेर आल्यावर त्याच्या नातेवैकांना काय दाखवलं असेल तर त्याची काढलेली किडनी ... त्यानंतर १० मींनिटातच इंद्रजीत चा मृत्यू झाला. किडनी काढण्याआधी न कोणाला विचारण्यात आलं न कोणाला काही सांगण्यात आलं. पोलिसांनी operation चा video बघितला तर त्यातलं ९ मिन्तांचा विदेओ करप्ट झालेला आहे. अतिशय गरिबीतून , अतिशय कष्टाने वर आलेला इंद्रजीत. विदर्भातल्या गरीब मुलांच्या शिक्षणासाठी झटणारा इंद्रजीत. त्याची पत्नी , आई , लहान भाऊ कोलमडून पडले आहेत . त्याला १ लहान मुलगा आहे. हा सगळा लेखन प्रपंच करण्याचा उद्देश एवढाच कि लोकांमध्ये जागृती करणे. आपला स्वतःच किवा कुटुंबातल्या कोणाचं छोटंसं जरी ओपेरशन असेल तरी काही गोष्टी डॉक्टरांशी बोलून clear कराव्यात. अम्बुलन्स, blood बँक सारख्या सुविधा आहेत का नाही हे बघावं. नसेल तर रिस्क घेवू नये .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
47655 वाचन

💬 प्रतिसाद (181)

प्रतिक्रिया

पोलिस!

साती
Fri, 03/21/2014 - 20:59 नवीन
पोलिस चालकालाच दोषी धरतात हे खरे आहे मात्र न्यायव्यवस्था सगळ्या बाजू तपासल्यानंतर चालकाला शिक्षा ठोठावतेच असे नाही. कित्येकदा चालकही निर्दोष ठरतो कारण अपघात केवळ परिस्थितीजन्य असतो. मात्र बर्याचदा रस्त्यावरचे बघे केवळ चालकालाच दोषी ठरवून तेही मोठ्या गाडीच्या चालकाला दोषी ठरवून बदडतात. तसेच मृत्यूपश्चात बरेच नातेवाईक डॉक्टरला दोषी ठरवून बदडतात. एखाद्याला चौकशीसाठी नेणे म्हणजे तो दोषी असेच नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

डॉक्टरांची चुक आणि नंतर ती

गणपा
गुरुवार, 03/06/2014 - 13:08 नवीन
डॉक्टरांची चुक आणि नंतर ती लपवण्याचा आटापीटा, अश्या कथानकावर बेतलेला 'अंकुर अरोरा मर्डर केस' नावाचा एक छान चित्रपट गेल्यावर्षी येऊन गेला. इच्छुकांनी नक्की पहावा. (असे चांगले चित्रपट केव्हा येतात अन जातात कळतही नाही.) http://www.imdb.com/title/tt2912578/ अवांतरा बद्दल क्षमस्व.
  • Log in or register to post comments

अशा प्रकारचे सिनेमे नाटकं

आनंदी गोपाळ
गुरुवार, 03/06/2014 - 19:06 नवीन
अशा प्रकारचे सिनेमे नाटकं येतच असतात. बातम्याही लोकांना कळत नाहीत कुठे काय झालं त्याच्या! खरंतर डॉक्टर लोक फार मातलेत आजकाल. परवाच कानपूरच्या मेडिकल स्टुडंट्सना मस्त होस्टेलचं गेट बंद करून मारहाण केली तिथल्या पोलीस एसपी अन समाजवादी पार्टीचा आमदार मिळून. चांगला ६०० लोकांचा ताफा नेला होता. २ मुलांना ३र्‍या मजल्यावरून फेकून दिलं खाली. ५-६ मुलांची हाडं तोडलीत काठ्या मारून मस्तपैकी. अहो व्हिडिओ आहेत यूट्यूबवर. बघा: १. https://www.youtube.com/watch?v=OKRVnoOwof8 २. https://www.youtube.com/watch?v=2NXl7Xk5JSs ३. https://www.youtube.com/results?search_query=kanpur+medical+students अजून बरेच आहेत. खरंच असंच तुडवायला हवं डॉक्टर्सना. रूलिंग एमेलेच्या उभ्या गाडीचे दार आतून कुणी उघडल्याने या पैकी दोन मेडीकल स्टूडंट्सची मोटारसायकल त्या दाराला धडकली हे निमित्त झालं होतं. चकाचक गोळीबार केला एम्पीच्या अंगरक्षकांनी आधी. अन पहाटे मस्तपैकी धुतलेत यांना. !@!#@%$#@$ चे डॉक्टर बनून काय उपकार करतात का हे आमच्यावर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

सत्तेच्या नि ताकदीच्या बळावर

प्यारे१
गुरुवार, 03/06/2014 - 19:15 नवीन
सत्तेच्या नि ताकदीच्या बळावर हाणामारी करणारांचा निषेध पण म्हणून ते मेडीकल स्टुडण्ट आहेत म्हणून मारलं असं आपलं म्हणणं असेल तर 'मोठे व्हा'!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

+११११११

बाळ सप्रे
Fri, 03/07/2014 - 12:48 नवीन
+११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

सहमत!

साती
गुरुवार, 03/06/2014 - 19:16 नवीन
सहमत! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

सहमती

साती
गुरुवार, 03/06/2014 - 19:17 नवीन
सहमती आनंदी गोपाळयांच्या प्रतिसादाला आहे, प्यारेजींच्या नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

(No subject)

मंदार दिलीप जोशी
Fri, 03/07/2014 - 15:35 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

राजकारणी नेते, त्यांचे पित्ते

नीधप
Fri, 03/07/2014 - 09:41 नवीन
राजकारणी नेते, त्यांचे पित्ते आणि विकला गेलेला पोलिस फोर्स यांच्या अरेरावीला इतका पाठिंबा देण्याचा निषेध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

आनंदी गोपाळांचा प्रतिसाद

बॅटमॅन
Sun, 03/09/2014 - 13:15 नवीन
आनंदी गोपाळांचा प्रतिसाद औपरोधिक होता असे वाटतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

या धाग्यावर येत असलेले

गणपा
गुरुवार, 03/06/2014 - 14:47 नवीन
या धाग्यावर येत असलेले डॉक्टरांचे प्रतिसाद माहितीत भर घालणारे आणि गैरसमज दुर करणारे आहेत. सातीताई आणि खरे साहेब धन्यवाद.
  • Log in or register to post comments

दुर्दैवाने, गणपा,

आनंदी गोपाळ
गुरुवार, 03/06/2014 - 19:12 नवीन
तुमचा वरचा 'डॉक्टरचीच चूक व दडपण्याचा प्रयत्न'वाल्या सिनेमाचा प्रतिसाद मात्र गैरसमज वाढविणारा होता, हेच खेदाने नमूद करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

वरच्या प्रतिसादात अवांतर आहे

गणपा
Wed, 04/02/2014 - 18:48 नवीन
वरच्या प्रतिसादात अवांतर आहे असं म्हटलंच होतं. त्या प्रतिसादातुन डॉक्टर मंडळी कशी नेहमी चुकीचच वागतात असं मला अजिबात म्हणायचं नव्हतं, तो निष्कर्ष तुम्ही काढुन मोकळे झालात आणि त्यावर उपहासात्म्क प्रतिक्रिया दिली. धाग्याचा विषय डॉक्टरांच्या हलगर्जीपणाबद्दल होता आणि त्यावरुन तो चित्रपट आठवला, 'जो' मला आवडला होता. म्हणुन त्याची लिंक दिली इतकच. असो. पुर्वग्रह करुन घेतला आहेच त्यामुळे अधिक काही बोलत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

अम्बुलन्स, blood बँक सारख्या

सुबोध खरे
गुरुवार, 03/06/2014 - 15:10 नवीन
अम्बुलन्स, blood बँक सारख्या सुविधा आहेत का नाही हे बघावं. नसेल तर रिस्क घेवू नये .
हे विधान अज्ञान जनक आहे. मग सामान्य माणसाने काय करायचे? पंच तारांकित रुग्णालयात जायचे कि सरकारी? मुंबईत १२२ रक्तपेढ्या आहेत यापैकी फक्त चार खाजगी रुग्णालयात रक्तपेढ्या असून (पुण्यात एकही नाही) बाकी सर्व मोठ्या सरकारी अथवा खाजगी रुग्णालयात किंवा सेवाभावी संस्था यांच्या आहेत (ज्यांचा रुग्णालयाशी संपर्क असतो सम्बंध नाही) . दुवा पाहावा http://www.joyfest.in/blood_bank.pdf आपल्या विधानाप्रमाणे मुंबईतील लोकांनी फक्त या चार रुग्णालयात जावे किंवा सरकारी रुग्नालाय्त जावे. मोठ्या खाजगी रुग्णालयात शल्यक्रियेचे दर हे छोट्या खाजगी रुग्णालयाच्या दुप्पट तरी असतात आणि ते मध्यम आणि कनिष्ठ मध्यम वर्गाला सहज परवडणारे नाहीत हि वस्तुस्थिती आहे. रुग्णवाहिका २४ तास सांभाळणे हे खायचे काम नाही. विशेषतः त्याच्या चालकांचे नखरे सांभाळणे (रुग्णवाहिका विकत घेणे हे सोपे आहे ती उभी करण्यासाठी जागा सापडणे हे मुंबईत तरी कर्म कठीण आहे ). लोक रुग्ण वाहिका मागवतात आणि एकदा रुग्ण आतमध्ये बसवला कि पैसे देत नाहीत, आता अर्धेच घ्या नंतर आणून देतो इ इ. चालक गैरहजर असेल तर दुसर्याला बाबापुता करून बोलावून घेणे हि रोजची कटकट असल्यामुळे खाजगी रुग्णालये या फंदात पडत नाहीत. शिवसेना सारख्या राजकीय पक्षाला ते ठेवणे किंवा सांभाळणे शक्य असते. बाकी सेवाभावी संस्था जेथे देणग्यांच्या माध्यमातून या गोष्टी चालवल्या जातात त्यांची गोष्ट वेगळी आहे पण त्यांचे अनुभव काही उत्साहवर्धक नाहीत. रुग्णाला एका किमी ला इतके पैसे लागतील असा रोखठोक हिशेब सांगितल्यास फार वादावादी होते.( इथे आमचा नातेवाईक मारायल टेकला आणि तुम्हाला पैश्याची पडली आहे इतक्या देणग्या येतात ते पैसे कुठे जातात इ.) चालक लोक रुग्णाचे स्ट्रेचर उचलायला तयार होत नाहीत हि रोजची तक्रार असते. तुम्ही त्यांच्यावर जबरदस्ती करू शकत नाही.जबरदस्ती केल्यास ते गैरहजर राहतात/ सोडून जातात. वाहतूक पोलिसांची कटकट( रुग्ण आत नसताना वाहतुकीचे नियम तोडल्यामुळे) केलेला दंड किंवा पावती याची कटकट, रुग्णवाहिका बिघडली त्यातील ऑक्सिजन सिलिंडर रुग्ण घरी घेऊन जातात त्यासाठी एक अजून सहाय्यक ठेवा. रुग्ण आम्हाला एक डॉक्टर( किमान नर्स) बरोबर द्या असा आग्रह धरतात. असे अनेक मुद्दे आहेत.या कोणत्याच लफड्यात पडावे असे खाजगी रुग्णालय किंवा त्यांचे मालक यांना झेपणारे नसते. या लेखामुळे कोणती जागृती झाली/ होणार होती ते कळले नाही. मुळात आपण कोणत्याही गोष्टीबद्दल पूर्ण माहिती नसताना त्याचा न्याय निवाडा करणे हि चुकीची गोष्ट आहे यास्तव तेथे प्रत्यक्ष काय झाले( असावे) हे माहित नसताना मी त्यावर कोणतेही भाष्य करू इच्छित नाही. sitting on judgement of incomplete/ disputed information is bad in eyes of law अशा तर्हेचे इंग्रजी सुभाषित आहे. प्रत्यक्ष काय आहे ते न्यायालयाला ठरवू द्या. एखादा माणूस ऐन तारुण्यात असा जाणे हे अत्यंत दुर्दैवी आहे तरीही अर्धवट माहितीवर जनजागृती करणे हे फारसे बरोबर नाही असे मला वाटते.
  • Log in or register to post comments

सहमत

कवटी
गुरुवार, 03/06/2014 - 17:11 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मस्त

प्रमोद देर्देकर
Fri, 03/07/2014 - 17:08 नवीन
डॉ. नहमी सारखाच सही जवाब १ ++++
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हे अगदी पटणारे आहे

अत्रन्गि पाउस
Tue, 03/11/2014 - 11:56 नवीन
प्रत्यक्ष उदाहरण माहित नसले तरी एकंदर सिस्टीम बघता हे असेच होत असेल हे पटते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

एखादा छोटंसं operation

म्हैस
गुरुवार, 03/06/2014 - 16:46 नवीन
एखादा छोटंसं operation करायला जाताना सुधा जर लोकांना जीव गमवावे लागत असतील तर त्यांनी काय करावा? ज्यांना परवडत त्यांनी रिस्क घेवू नये आणि ज्यांना परवडत नाही अश्यांनी घ्यावी असाच म्हणावं लागेल ना. operation छोटंसं असला तरी worst condition काय होऊ शकते आणि ती झाल्यावर लागणाऱ्या सुविधा हॉस्पिटल मध्ये आहेत कि नाही हे बघू नये असं म्हणायचं का तुम्हाला ? सामान्य माणसांना मोठ्या हॉस्पिटल मध्ये जाण शक्य नाही हे मलाही कळतंय . पण ज्यांना शक्य आहे ते तरी ह्या केस मधून धडा घेवू शकतील म्हणून हा लेख लिहिलंय
नुसती हळहळ व्यक्त करण्यापेक्षा आपण काही मदत करु शकतो का ?
इंद्रजीत आधी आमच्या office मध्ये होतं. आम्ही सर्वांनी आपापला १ दिवसाचा पगार त्याच्या कुटुंबियांना देण्याचा ठरवला आहे. पैसे गोळा करण्याचं काम चालू आहे.
  • Log in or register to post comments

या लेखामुळे कोणती जागृती झाली

म्हैस
गुरुवार, 03/06/2014 - 16:52 नवीन
या लेखामुळे कोणती जागृती झाली/ होणार होती ते कळले नाही. मुळात आपण कोणत्याही गोष्टीबद्दल पूर्ण माहिती नसताना त्याचा न्याय निवाडा करणे हि चुकीची गोष्ट आहे यास्तव तेथे प्रत्यक्ष काय झाले( असावे) हे माहित नसताना मी त्यावर कोणतेही भाष्य करू इच्छित नाही.
तुम्हाला नक्की काय म्हणायचं? तुम्ही डॉक्टर आहात म्हणून इथे सांगितलेली गोष्ट खोटी आहे असं म्हणायचं का तुम्हाला? एवढा जर तुम्हाला वाटत असेल तर स्वतः जावून काही मुलभूत प्रश्न Prime Surgical Hospital च्या त्या डॉक्टर ला का विचारात नाही आहात तुम्ही ? त्याच्यावर सरकारच्या वतीने केस दाखल केली आहे. वकिलांनी सिद्ध त्याला अतिशय मुलभूत प्रश्न विचारले ज्यची उत्तरं डॉक्टरांना देता आली नाही. शेवटी ज्याचा जीव गेला त्याच्या कुटुंबियांना च ते दुखं समजणार ना. तुम्हाला काय त्याची झळ पोचलीये?
  • Log in or register to post comments

अच्छा!

आनंदी गोपाळ
गुरुवार, 03/06/2014 - 18:58 नवीन
अच्छा! म्हणजे तो पेशंट तुमच्या कुटुंबियांपैकी होता का! तरीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस

? डॉक्टर असेही असतात तर!

प्यारे१
गुरुवार, 03/06/2014 - 19:10 नवीन
? डॉक्टर असेही असतात तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

म्हणजे कसे?

आनंदी गोपाळ
गुरुवार, 03/06/2014 - 19:13 नवीन
म्हणजे कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

कुटुंबियांपैकी असला तरच भावना

प्यारे१
गुरुवार, 03/06/2014 - 19:17 नवीन
कुटुंबियांपैकी असला तरच भावना व्यक्त कराव्यात असं म्हणणारे भावनाशून्य...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

शेवटी ज्याचा जीव गेला

आनंदी गोपाळ
गुरुवार, 03/06/2014 - 19:27 नवीन
शेवटी ज्याचा जीव गेला त्याच्या कुटुंबियांना च ते दुखं समजणार ना. तुम्हाला काय त्याची झळ पोचलीये?
हे व आधीची वाक्ये वाचलीत का आपण आवले साहेब? भावना व्यक्त करण्याचा प्रश्नच नाहीये. संयतपणे योग्य माहिती हाती असल्याशिवाय मत प्रदर्शन करणार नाही असे सुबोध खरे यांनी म्हटले आहे. त्यावर म्हैस महोदयांचे इरिटेटिंग उत्तर वाचल्यावर मी तो प्रश्न विचारलेला आहे. म्हैस यांनी कोणती फर्स्ट हँड माहिती घेतली? त्या रुग्णावर काय उपचार केले होते, त्याला आजार काय होता, इत्यादी बाबतींचा टेक्निकल सोडा कोणत्याही प्रकारचा फर्स्ट हँड विदा यांचेपाशी आहे काय? उगा उठ अन झोड डॉक्टरला. काय खाऊ आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

आधी उत्तर लिहून मग तुमचा वरचा

आनंदी गोपाळ
गुरुवार, 03/06/2014 - 19:36 नवीन
आधी उत्तर लिहून मग तुमचा वरचा प्रतिसद वाचला. मोठं व्हायची गरज कुणाला आहे, ते लख्ख समजलं! डॉक्टर्सबद्दल तुमचे मत पूर्वग्रहदूषीत आहेच, हेच तुम्ही सिद्ध केलेत दोन्हीकडे. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

(No subject)

प्यारे१
गुरुवार, 03/06/2014 - 20:26 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

शाब्बास!

आनंदी गोपाळ
गुरुवार, 03/06/2014 - 22:13 नवीन
उत्तर सुचले नाही तर स्मायली टाकायची. मी साती अथवा खरेंसारखा नरम लिहिणारा डॉक्टर नाही. हलकटपणा वाटेल, पण मी दुकान टाकून, तिथे ५५ प्रकारची सरकारी सर्टिफिकेटं, ज्यात शॉप अ‍ॅक्ट लायसन लागू आहे,- लटकवून, 'धंदा' करणारा व्यावसायिक आहे. इथे मी दुकानदार आहे अन तुम्ही ग्राहक. आज फक्त नादुरुस्त शरीर दुरुस्त करण्याचे वर्कशॉप आहे इथे. दुकान. ही वेळ तुम्हीच, अन तुमच्या सरकारने माझ्यावर अन माझ्यासारख्यांवर आणलेली आहे. पदोपदी संशय! ज्या विषयातले शष्प शिक्षण घेतले नाही त्यातली शस्त्रे तुमच्यावर चालवायची परवानगी होम्योपदी अन इतरांना तुमच्या सरकारने दिलेली आहे. काय वाट्टेल त्या नावाखाली काय हवे ते कायदे गळ्यात मारताहेत. इथल्या एका तरी टिनपॉट डॉक-ब्याशर ची औकात अन ऐपत आहे का इथे, की जाऊन बालाजी तांबे वा रामदेव बाबा सारखे लोक जे कोणत्याही डीग्री वा रजिस्ट्रेशन शिवाय करोडो रुपयांचा धंदा करतात, अन तुम्हाला तुमच्या आरोग्यबद्दल चुतिया बनवतात, त्यांना जाब विचारेल? हा म्हैस नामक प्राणी खरेंना विचारतो, की 'त्या डॉक्टरला' जाब विचारला का? अरे हूट! काय संबंध? कोणत्या तोंडाने असले धागे काढून त्या धाग्यांवर प्रतिसादही लिहिता हो तुम्ही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

उत्तर सुचलं नाही म्हणून नाही

प्यारे१
गुरुवार, 03/06/2014 - 22:43 नवीन
उत्तर सुचलं नाही म्हणून नाही तर तुमच्या अ‍ॅटीट्युड मुळे ती स्मायली टाकली होती....! 'नातेवाईक असलं तरच बोलावं' असं आपला प्रतिसाद सुचवतो आहे त्याबद्दलच ते म्हणणं होतं. बाकी स्टुडन्टसवरचा प्रतिसाद नीट वाचला असतात तर समजला असता. चांगल्या डॉक्टर्स बद्दल, त्यांच्या स्कील बद्दल निश्चितच आदर आहे मात्र ह्याचा अर्थ सगळे डॉक्टर चांगले असतात असं नाही. स्टुडन्टसना मारणं निषेधार्हच आहे पण त्या मारण्याचा आत्ताच्या केसशी काय नि कसा संबंध होता हे समजेल का? वडाची साल वांग्याला लावण्यात काय हशील आहे? म्हैसनं जे सुचवलं अथवा जे काही लिहीलं (म्हैस 'म्हैस' आहे, पण तुम्ही डॉक्टर आहात ना?) ते डॉ. खरेंनी व्यवस्थित उत्तर देऊन क्लिअर केलं आहे. असो. वरच्या प्रतिसादात आपण आपल्याच अनेक व्यवसाय बंधूंना अपमानित केलेलं आहे असं वाटत नाही का? सरकार आमचं नि तुमचं काय मग? जाताजाता : हॉस्पिटलमध्ये रुग्णभरती करताना आधी नोकरी कुठं करता, काय शिक्षण, कितीजण काय काय करतात ही 'निरुपद्रवी' माहिती कशासाठी विचारली जाते हे आपणास ठाऊक असेलच ना? ही आणखी एक स्मायली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

म्हैस 'म्हैस' आहे, पण तुम्ही डॉक्टर आहात ना?

आनंदी गोपाळ
गुरुवार, 03/06/2014 - 22:51 नवीन
म्हैस 'म्हैस' आहे, पण तुम्ही डॉक्टर आहात ना?
अगदी अगदी. म्हणून काय वाट्टेल ते ऐकून घेऊ का? ते निरुपद्रवी प्रश्णः माझ्या दुकानात केलेल्या रिपेरिंग जॉबचे पैसे कोण देणारे? इन्शुरन्स कंपनीवाला की दुसरा कुणी? यासाठी ते विचारतो आम्ही. हेच तुमचा मारुती वर्कशॉपवाला विचारतो, किंवा कोपर्‍यावरचा वाणी तुम्हाला उधार देण्याआधी विचारतो. अन खोटी बिले मागायला येणारे तुमच्यापैकीच असतात. लाज वाटते माझ्याच शाळेतला मास्तर बापाच्या ऑपरेशनच्या पैशाची रिएंबर्समेंट मागताना 'अरे बिल वाढव जरा. मलाही थोडे सुटले पाहिजेत' असे सांगतो तेव्हा. मी सरळ हाकलून देतो असल्या गुरुजनांना. प्लस, अमुक जॉब मधे तमुक आजार होऊ शकतात, अशी एक गम्मतही असते. उदा. आयटिमधे असाल तर कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम किंवा कार्पल टनेल सिंड्रोम (हा आरेसाय नाहीच असे अमेरिकन इन्शुरन्स कंपन्ञांनी कोर्टात सिद्ध केलंय बादवे) बाकी माझी अ‍ॅटिट्यूड आधीच क्लियर केलिये मी. 'हलकट' ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

ते आधीच्च ओळखलं होतं म्हणूनच

प्यारे१
गुरुवार, 03/06/2014 - 22:59 नवीन
ते आधीच्च ओळखलं होतं म्हणूनच स्मायली टाकलेली. हाथ मिलाओ! आम्ही पण....हलकटच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

गले मिलो दादा! सिर्फ हाथ

आनंदी गोपाळ
गुरुवार, 03/06/2014 - 23:04 नवीन
गले मिलो दादा! सिर्फ हाथ मिलानेसे क्या होगा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

ता.क.

आनंदी गोपाळ
गुरुवार, 03/06/2014 - 23:03 नवीन
अरे हो! सरकार आमचं अन तुमचं काय मग? याचं उत्तर राहिलं. आज डोकं जरा जास्त तडकलेलं आहे. ते जे कानपूरचे विधायक इर्फान सोलंकी आहेत, त्यांनी स्पष्ट सांगितलंय टीव्हीवर. 'हमे जनताने चुनकर दिया है. डॉक्टरोने नही' हवं तर व्हिडियो डकवतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

पक्षाचे नाव वाचलेत ना

प्यारे१
Fri, 03/07/2014 - 14:11 नवीन
पक्षाचे नाव वाचलेत ना त्यांच्या? स-माजवादी. दुसरी अपेक्षा ती काय करणार? :( बाकी 'दुसरी बाजू' असेल ना काहीतरी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

जाताजाता : हॉस्पिटलमध्ये

मंदार दिलीप जोशी
Fri, 03/07/2014 - 15:45 नवीन
जाताजाता : हॉस्पिटलमध्ये रुग्णभरती करताना आधी नोकरी कुठं करता, काय शिक्षण, कितीजण काय काय करतात ही 'निरुपद्रवी' माहिती कशासाठी विचारली जाते हे आपणास ठाऊक असेलच ना? >> :D :D :D जबराट उत्तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

काय इब्लिस उर्फ डॉक्टर शेखर,

मंदार दिलीप जोशी
Fri, 03/07/2014 - 15:42 नवीन
काय इब्लिस उर्फ डॉक्टर शेखर, इथे पण सुरू का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

इथल्या एका तरी टिनपॉट डॉक

मंदार दिलीप जोशी
Fri, 03/07/2014 - 15:44 नवीन
इथल्या एका तरी टिनपॉट डॉक-ब्याशर ची औकात अन ऐपत आहे का इथे,>> या घाणेरड्या भाषेचा निषेध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

डॉक्टर-रुग्णं संबंध.

प्रभाकर पेठकर
Mon, 03/17/2014 - 15:01 नवीन
ही वेळ तुम्हीच, अन तुमच्या सरकारने माझ्यावर अन माझ्यासारख्यांवर आणलेली आहे.
हा एकतर्फी आरोप आहे. डॉक्टरांच्या व्यवसायातील अपप्रवृत्तींमुळे ह्या विषयाला चालना मिळाली. पूर्वीच्याकाळी (कांही प्रमाणात आजही) डॉक्टरला देव मानणारे लोकं आहेत. स्वार्थी राजकारणी आणि तोडफोड संस्कृतीवाल्यांनी असे कायदे करायला लावून सर्वसामान्य आणि सरळमार्गी रुग्णांची दोन्हीकडून कोंडी केली आहे. दुकानाचा व्यावसायिक दृष्टीकोन समजण्यासारखा आहे तरी पण प्रामाणिकपणे, सचोटीने दुकान चालविता येतेच नं? दुकानातही फसवेगिरी शिरली की नैतिकता रसातळाला जाते. नैतिकता फक्त डॉकटरांकडूनच अपेक्षित आहे असे नाही तर रुग्णांनाही ती बंधनकारक आहे. पण 'ज्ञानी' माणूस 'अज्ञानी' माणसाला हातोहात फसवू शकतो. त्यामुळे 'ज्ञानी' व्यक्तीवर जबाबदारी जास्त येते. तसेच, कानावर येणार्‍या फसवाफसवीच्या अनेक बातम्यांमुळे डॉक्टर-रुग्ण संबंध बिघडताहेत. हल्ली बहुतेक डॉक्टर शल्यक्रिये आधी रुग्णाला/नातेवाईकांना त्यातील धोके समजावून सांगतात आणि हे समजावून सांगितले आहे अशा विधानाचे कागदपत्र करून त्यावर सह्या घेतात. त्यामुळे रुग्णांनी/नातेवाईकांनी शल्यक्रिये आधी डॉक्टरांशी विचारविनिमय करून काय तो निर्णय घ्यावा. त्याहून कांही हलगर्गीपणा झाला असा संशय आला तर कायदेशीर प्रक्रियेस सुरुवात करावी. कायदा हातात घेऊ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

पेठकर काका,

आनंदी गोपाळ
Mon, 03/17/2014 - 20:51 नवीन
पूर्वीच्याकाळी (कांही प्रमाणात आजही) डॉक्टरला देव मानणारे लोकं आहेत.
१. आजच्या काळातही देवासारखे वागणारे "काही" डॉक्टर आहेत. :) प्रमाण "देव मानणार्‍या" लोकांचं कमी होतंय. मग तो देवही देवासारखा वागत नाही, यात काय नवल? अमेरिकन रेड इंडीयन्सबद्दलच्या एका लिखाणात एक इंटरेस्टींग थियरी वाचनात आली होती. 'A god is powerful because of his worshipers. If the number of worshipers is more, the god becomes strong. If that number goes down, the god becomes less powerful, and eventually can be forgotten.' 'पूर्वीचे डॉक्टर देव होते' डॉक्टरला देव म्हणणारे भक्त कमी झाल्याने, डॉक्टरांतलं देवत्व कमी झालंय, हे कृपया लक्षात घ्या. मघाच पासून या धाग्यावर मी तेच सांगतोय. डॉक्टरवरही थोडा विश्वास ठेवलेला बरा असतो. विश्वास नसेल अन मग तो डॉक्टर दुकानदारासारखा वागला, तर तणफण कशाला हविये? २. कन्सेन्ट घ्यायची सिस्टीम पूर्वीपासून आहे हो. आजकालची नाही. ३. या आधीचा एक प्रतिसाद आहे. "ते ते आहेत, तुम्ही डॉक्टर आहात ना?" तसे तुमचे म्हणणे आहे, की एकंदर डॉक्टर्सनी 'समजून घ्यायला हवे' 'त्यामुळे 'ज्ञानी' व्यक्तीवर जबाबदारी जास्त येते.' हे तुमचे वाक्य तसेच वाटले. सर, जबाबदारीने वागूनही या धाग्यावर जे काही सुरू होते ते वाचून डोके तडकले तेव्हा माझ्या भाषेत लिहिणे सुरू केले. कलियुगात तरी लिमिट असते हो जबाबदारीची. >>
कानावर येणार्‍या फसवाफसवीच्या अनेक बातम्यांमुळे
<< चांगल्या बातम्या कानावर कोण घालील? आमच्या आयएमएने जिल्ह्यातल्या गारपीटग्रस्त गावांत हेल्थ कार्ड्स वाटण्याचे ठरविले आहे. वाटप सुरूही झाले आहे ऑलरेडी. येत्या डिसेंबरापर्यंत जेन्युइन लाभार्थींना (सर्व्हे, अन लाभार्थी आयेमेनेच ठरविलेत.) ५०% पैशात तपासणी/उपचार्/ऑपरेशनं करणार आहोत. या साठी पेड न्यूज वापरावी काय? अर्थात यातही फसवाफसवीच दिसली कुणाला तर मी काय करू शकतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

उडदामाजी काळे गोरे.

प्रभाकर पेठकर
Wed, 03/19/2014 - 02:12 नवीन
"ते ते आहेत, तुम्ही डॉक्टर आहात ना?" तसे तुमचे म्हणणे आहे, की एकंदर डॉक्टर्सनी 'समजून घ्यायला हवे' 'त्यामुळे 'ज्ञानी' व्यक्तीवर जबाबदारी जास्त येते.' हे तुमचे वाक्य तसेच वाटले.
आनंदी गोपाळ साहेब, मी, डॉक्टरांनी कोणालाही 'समजून घ्यावे' असे कुठेही म्हंटलेले/सुचविलेले नाही. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की नैतिक जबाबदारी 'ज्ञानी' माणसावर जास्त असते. म्हणजे रुग्णांनी अनैतिक वागावे असा अर्थ नाही. जो एखादा बलवान असतो त्याने आपल्या बळाचा वापर चांगल्या कामासाठी करावा असे नैतिक बंधन त्याच्यावर असते. तो बळाचा वापर दुर्बलावर अत्याचार करण्यासाठी करायला लागला तर ते अनैतिक होते. डॉक्टरांजवळ ज्ञानाचे बळ असते ते त्यांनी सत्कर्मी लावावे एवढीच अपेक्षा आहे. रुग्णाचे नातेवाईक चुकतात, भावनेच्या भराव वाहात जातात मला मान्य आहे. राजकारणी लोकं अशांच्या तप्त भावनांचा, आपली पोळी भाजून घ्यायला, वापर करतात. या धाग्यावर जे काही सुरू होते ते वाचून डोके तडकले तेव्हा माझ्या भाषेत लिहिणे सुरू केले. शल्यचिकित्सकाकडून संयमाची अपेक्षा असते. कारण शल्यक्रियेसाठी त्याला डोके शांत ठेवून काम करावे लागते. तिच वृत्ती त्याला दैनंदिन आयुष्यात वापरावी लागते. ज्या गोष्टी पटत नाहीत त्या सोडून द्या. हाताची सर्व बोटे सारखी नसतात हे मी सांगायला नको. तुमच्या व्यवसायातील कांही व्यक्ती आणि रुग्णांच्या नातेवाईकांमधील कांही व्यक्ती वातावरण कलुषित करण्यास मदत करतात. इथे कोणावरही वैयक्तिक दोषारोप होत नसल्याने संयम बाळगावा. एखाद्या रुग्णाला आलेला वाईट अनुभवही खरा असू शकतो एवढी शक्यता लक्षात घ्यावी. डॉक्टरी व्यवसायातही प्रामाणिक आणि सेवाभावि व्यक्ती आहेत ह्यावर आमचा विश्वास आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

पेठकर काका,

आनंदी गोपाळ
गुरुवार, 03/20/2014 - 23:39 नवीन
तुमच्या संयत व संतुलित लिहिण्याबद्दल मनात संशय कधीच नव्हता व नाही. फक्त तुमच्या लिहिण्याचे बोट धरून इतरांनी वात्रट निष्कर्ष काढू नयेत म्हणून थोडा कडू काढा तुमच्या प्रतिसादाखाली ओतला, इतकेच. बाकी, "शल्यचिकित्सकाकडून संयमाची अपेक्षा असते." ;) हे वाक्य थोडे गमतीचे आहे. तिथे अनेकदा, लौकर बाप दाखव! नाही तर ताबडतोब श्राद्ध कर, अन ते ही ३ सेकंदात! अशी लढाई असते. तेव्हा ऑपरेशन करणार्‍या शल्यचिकित्सकाकडून थंड डोक्याची अपेक्षा म्हणजे, फोडणी तडतडते आहे. पण जरा दमानं घ्या. विचार करा. अन मग ५-७ मिन्टांनी जमलं तर इतर मसाले टाका, कांदा कापायला विसर्ला असाल तर आता तो कापून घ्या... असा इच्चार करणार्‍या बल्लवाचार्यांसारखे आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

ऑपरेशन करणार्‍या

प्रभाकर पेठकर
Fri, 03/21/2014 - 04:00 नवीन
ऑपरेशन करणार्‍या शल्यचिकित्सकाकडून थंड डोक्याची अपेक्षा ....
'थंड डोक्याची अपेक्षा' म्हणजे 'थंड कृतीची अपेक्षा' असा चुकीचा अर्थ आपण घेतला आहे. 'थंड डोक्याने' म्हणजे 'भावनांनी विचलीत न होता' पण आवश्यकता असेल तिथे झटपट तरीही संतुलीत निर्णय घेणण्याची क्षमता असणे.
फोडणी तडतडते आहे. पण जरा दमानं घ्या. विचार करा. अन मग ५-७ मिन्टांनी जमलं तर इतर मसाले टाका, कांदा कापायला विसर्ला असाल तर आता तो कापून घ्या... असा इच्चार करणार्‍या बल्लवाचार्यांसारखे आहे
हे उदाहरण अप्रस्तुत आहे कारण हे 'थंड डोक्याने विचार करण्याचे' नाही तर 'थंड गतीने शारीरिक कृती' करण्याचे आहे. दोन व्यवसायांची तुलना करीत नाहीए पण एखादा पदार्थ बनविताना आम्हालाही त्यासाठी आवश्यक सर्व जिन्नस हाताशी घेऊन आणि ते ज्या क्रमाने वापरायचे आहेत त्या क्रमाने मांडावे लागतात. पुन्हा सांगतो दोन व्यवसायांची ही तुलना नाही. पण चुक झाली तर आमचा पेशंटही 'दगावतो'. असो. कदाचित मिपावर बल्लवाचार्यांना त्यांच्या विषया व्यतिरिक्त इतर विषयांवर मतप्रदर्शनाचा अधिकार नसावा. ह्याने सुदृढ चर्चेचे दरवाजे मात्र बंद होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

नाही. तस नाही म्हणत आहेत ते.

स्पंदना
Fri, 03/21/2014 - 04:07 नवीन
कदाचित मिपावर बल्लवाचार्यांना त्यांच्या विषया व्यतिरिक्त इतर विषयांवर मतप्रदर्शनाचा अधिकार नसावा. ह्याने सुदृढ चर्चेचे दरवाजे मात्र बंद होतात.
ते फक्त वेळेचा अभाव जाण्वुन द्याय्चा प्रय्त्न करताहेत. एकूणच डॉक्टर्सच्या विरोधी सूराने रागावले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

अनुमोदन पेठकर

मंदार दिलीप जोशी
Fri, 03/21/2014 - 09:57 नवीन
अनुमोदन पेठकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

शेवटी ज्याचा जीव गेला

मंदार दिलीप जोशी
Fri, 03/07/2014 - 15:42 नवीन
शेवटी ज्याचा जीव गेला त्याच्या कुटुंबियांना च ते दुखं समजणार ना. >> अनुमोदन. हे मात्र खरे :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस

"आघात " हा विक्रम गोखले आणि

दिव्यश्री
गुरुवार, 03/06/2014 - 20:54 नवीन
"आघात " हा विक्रम गोखले आणि मुक्ता बर्वेचा सिनामा पहा एकदा जरूर . थोडासा अंगावर येतो पण ते ठीक आहे कारण मुळात विषय गंभीरच आहे . विक्रम गोखले आणि मुक्ता या दोघांनी अतिशय सुंदर काम केल आहे. बाकी साती तै आणि डॉ. खरे यांचे प्रतिसाद छान आहेत . चांगली माहिती मिळतेय . :)
  • Log in or register to post comments

>>"आघात " हा विक्रम गोखले आणि

सूड
गुरुवार, 03/06/2014 - 21:43 नवीन
>>"आघात " हा विक्रम गोखले आणि मुक्ता बर्वेचा सिनामा पहा एकदा जरूर. अगदी हेच म्हणायला आलो होतो. सिनेमाचं नाव आठवत नव्हतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री

साहेब

सुबोध खरे
गुरुवार, 03/06/2014 - 20:58 नवीन
साहेब ती मृत व्यक्ती आपला जवळचा नातेवाईक होता हे मान्य करून आणि त्याबद्दल सहानुभूती व्यक्त करूनही मला आपणाला एक प्रश्न विचारावासा वाटतो. कि त्या डॉक्टरानी हलगर्जी पण केला असे आपण कोणत्या आधारावर म्हणत आहात?मुल त्या रुग्णाला आजार कोणता होता आणि त्याची शल्यक्रिया कशासाठी झाली होती त्या शल्यक्रियेनंतर काय गुंतागुंत झाली हे काहीही न विशद करता( कदाचित ते आपणास माहित असेलही पण इथे लिहिलेल्या गोश्वार्यात असे कुठेही दिसत नाही) आपण एक आरोप केलात. त्यात तथ्य असेलही पण कोणताही पुरावा न देता आपण आरोप केलात त्यात दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्याच्यावर दुसरी शल्यक्रिया झाली म्हणजे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुद्धा या गुन्ह्यात सहभागी झाले असे आपले म्हणणे आहे काय? आणि एवढे सगळे पाहूनही आपण म्हणता जागृती करण्यासाठी तर कोणती जागृती आपल्याला अपेक्षित आहे? सर्व रुग्णालयात रुग्णवाहिका सर्व काळ उपलब्ध असल्याच पाहिजेत असा आपला आग्रह आहे काय? "तुम्ही डॉक्टर आहात म्हणून इथे सांगितलेली गोष्ट खोटी आहे असं म्हणायचं का तुम्हाला?" मी असे कुठेही म्हटलेले नाही. "अर्धवट माहितीवर जनजागृती करणे हे फारसे बरोबर नाही असे मला वाटते." यात काय चुकले हे आपण माझ्या अल्पमतीला समजावून सांगाल काय? आपला जवळचा नातेवाईक दगावला त्यामुळे लोकांची सहानुभूती नातेवाईकाला असते याचा सरळ अर्थ तो डॉक्टर कसाई आहे असा लावणे चुकीचे आहे. मी केवळ डॉक्टर आहे म्हणून मी डॉक्टरची बाजू घेणार हेही आपण गृहीत धरून "तुम्हाला काय त्याची झळ पोचलीये?"हे वक्तव्य करणे म्हणजे आम्ही संवेदनाहीन आहोत असा अर्थ आपण कोणत्या आधारावर लावता? मी तो डॉक्टर कसाई आहे असे म्हटले असते तर आपल्याला बरे वाटले असते असाच अर्थ यातून निघतो पण तसे करणे माझ्या सद्सद विवेकबुद्धीला पटणारे नाही. प्रत्येक रुग्णालयात रुग्णवाहिका आणि रक्तपेढी आहे का ? याची खात्री केल्याशिवाय तेथे जाऊ नये हे आपणच म्हणता आहात त्यावर मी वस्तुस्थिती दर्शविणारा दुवा दाखविला आहे यावर आपली माहिती पूर्ण नाही हे मान्य न करता तुम्ही सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करीत आहात हे फारसे बरोबर नाही असेच मला वाटते असो वितंडवाद घालण्यात मला अर्थ वाटत नाही. असो आपली मते आपल्यापाशी.
  • Log in or register to post comments

डॉक्टर लोकं सन्माननीय अपवाद

पाषाणभेद
गुरुवार, 03/06/2014 - 22:22 नवीन
डॉक्टर लोकं सन्माननीय अपवाद सोडले तर चालू या कॅटेगरीत मोडतात. आमचा फॅमेली डॉ. म्हणवणारा डॉक्टर आताशा एमआर कडची औषधे विकत देतो. एकदोन वेळेस मी चालवून घेतले पण आता मी वेळ मिळाला की मुद्दाम सर्दी झाली असे सांगून जातो अन सँपल औषधे दिली की मग झापतो त्याला. साधा डॉक्टरसुद्धा दिवसभराची १०/१२ हजार कमवत असूनही कट प्रॅक्टीस करतात.
  • Log in or register to post comments

पाभेजी,

आनंदी गोपाळ
गुरुवार, 03/06/2014 - 22:39 नवीन
नांव गावासकट डिग्री सांगा. अ‍ॅलोपथीचा डॉक्टर असेल अन सँपलची औषधे विकलीत तर याचे रजिस्ट्रेशन क्यान्सल करायची जबाबदारी माझी. नॉन अ‍ॅलोपअ‍ॅथ डॉक्टरांकडे सँपलची अ‍ॅलोपथी औषधे देणारे कंपनीवाले व एम आर यात जबाबदार आहेत की नाहीत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

डॉ. बी ए ऐम ऐस आहे. सँपलची

पाषाणभेद
गुरुवार, 03/06/2014 - 22:48 नवीन
डॉ. बी ए ऐम ऐस आहे. सँपलची औषधे अ‍ॅलोपॅथेची आहेत. सध्या मी बघतो काय ते. आयएमऐ कडे तक्रार केली तर कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा