Skip to main content

डॉक्टरांच्या हलगर्जीपणाबद्दल :

लेखक म्हैस यांनी बुधवार, 05/03/2014 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
एक ३२ वर्षांचा तरुण छोटंसं kidney stone removal चा operation करायला जातो आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यूला प्राप्त होतो. किती भयानक आहे हे. पुण्याला law college रोड वर असणार्या Prime Surgical Hospital (PSH) च्या डॉक्टरांनी हि कमाल केली आहे . इंद्रजीत चव्हाण पोटाच्या वर डाव्या बाजूला ला kidney stone removal चा ओपेरशन झाला. शुद्धीवर आल्यावर तो उजव्या बाजूला दुखत आहे असं सांगत होता पण डॉक्टरांनी काही नाही operation मुले दुखतंय असं सांगून पेन किलर दिलं. कोणीही नर्स किवा डॉक्टर त्याच्याजवळ थांबायला तयार नवते . अंतर्गत रक्तस्त्रावामुळे त्याच्या हृधायापर्यंत रक्त पोचणं बंद होवून हृदय बंद पडून त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. डॉक्टरांना जबरदस्तीने बोलवून अन्यालाव त्यांनी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये न्यायला सांगितला. पण दुर्दैव असं कि Prime Surgical Hospital मध्ये अम्बुलन्स पण नवती . दिनानाथ मंगेशकर मध्ये न्यायला त्याला तब्बल ५० मिनिटे लागली. तिथे पोचल्यावर पुन्हा त्याच्यावर दुसरं ओपेरतिओन करण्यात आलं. डॉक्टरांनी बाहेर आल्यावर त्याच्या नातेवैकांना काय दाखवलं असेल तर त्याची काढलेली किडनी ... त्यानंतर १० मींनिटातच इंद्रजीत चा मृत्यू झाला. किडनी काढण्याआधी न कोणाला विचारण्यात आलं न कोणाला काही सांगण्यात आलं. पोलिसांनी operation चा video बघितला तर त्यातलं ९ मिन्तांचा विदेओ करप्ट झालेला आहे. अतिशय गरिबीतून , अतिशय कष्टाने वर आलेला इंद्रजीत. विदर्भातल्या गरीब मुलांच्या शिक्षणासाठी झटणारा इंद्रजीत. त्याची पत्नी , आई , लहान भाऊ कोलमडून पडले आहेत . त्याला १ लहान मुलगा आहे. हा सगळा लेखन प्रपंच करण्याचा उद्देश एवढाच कि लोकांमध्ये जागृती करणे. आपला स्वतःच किवा कुटुंबातल्या कोणाचं छोटंसं जरी ओपेरशन असेल तरी काही गोष्टी डॉक्टरांशी बोलून clear कराव्यात. अम्बुलन्स, blood बँक सारख्या सुविधा आहेत का नाही हे बघावं. नसेल तर रिस्क घेवू नये .
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 47899
प्रतिक्रिया 181

प्रतिक्रिया

In reply to by प्यारे१

शेवटी ज्याचा जीव गेला त्याच्या कुटुंबियांना च ते दुखं समजणार ना. तुम्हाला काय त्याची झळ पोचलीये?
हे व आधीची वाक्ये वाचलीत का आपण आवले साहेब? भावना व्यक्त करण्याचा प्रश्नच नाहीये. संयतपणे योग्य माहिती हाती असल्याशिवाय मत प्रदर्शन करणार नाही असे सुबोध खरे यांनी म्हटले आहे. त्यावर म्हैस महोदयांचे इरिटेटिंग उत्तर वाचल्यावर मी तो प्रश्न विचारलेला आहे. म्हैस यांनी कोणती फर्स्ट हँड माहिती घेतली? त्या रुग्णावर काय उपचार केले होते, त्याला आजार काय होता, इत्यादी बाबतींचा टेक्निकल सोडा कोणत्याही प्रकारचा फर्स्ट हँड विदा यांचेपाशी आहे काय? उगा उठ अन झोड डॉक्टरला. काय खाऊ आहे का?

In reply to by प्यारे१

आधी उत्तर लिहून मग तुमचा वरचा प्रतिसद वाचला. मोठं व्हायची गरज कुणाला आहे, ते लख्ख समजलं! डॉक्टर्सबद्दल तुमचे मत पूर्वग्रहदूषीत आहेच, हेच तुम्ही सिद्ध केलेत दोन्हीकडे. धन्यवाद!

In reply to by प्यारे१

उत्तर सुचले नाही तर स्मायली टाकायची. मी साती अथवा खरेंसारखा नरम लिहिणारा डॉक्टर नाही. हलकटपणा वाटेल, पण मी दुकान टाकून, तिथे ५५ प्रकारची सरकारी सर्टिफिकेटं, ज्यात शॉप अ‍ॅक्ट लायसन लागू आहे,- लटकवून, 'धंदा' करणारा व्यावसायिक आहे. इथे मी दुकानदार आहे अन तुम्ही ग्राहक. आज फक्त नादुरुस्त शरीर दुरुस्त करण्याचे वर्कशॉप आहे इथे. दुकान. ही वेळ तुम्हीच, अन तुमच्या सरकारने माझ्यावर अन माझ्यासारख्यांवर आणलेली आहे. पदोपदी संशय! ज्या विषयातले शष्प शिक्षण घेतले नाही त्यातली शस्त्रे तुमच्यावर चालवायची परवानगी होम्योपदी अन इतरांना तुमच्या सरकारने दिलेली आहे. काय वाट्टेल त्या नावाखाली काय हवे ते कायदे गळ्यात मारताहेत. इथल्या एका तरी टिनपॉट डॉक-ब्याशर ची औकात अन ऐपत आहे का इथे, की जाऊन बालाजी तांबे वा रामदेव बाबा सारखे लोक जे कोणत्याही डीग्री वा रजिस्ट्रेशन शिवाय करोडो रुपयांचा धंदा करतात, अन तुम्हाला तुमच्या आरोग्यबद्दल चुतिया बनवतात, त्यांना जाब विचारेल? हा म्हैस नामक प्राणी खरेंना विचारतो, की 'त्या डॉक्टरला' जाब विचारला का? अरे हूट! काय संबंध? कोणत्या तोंडाने असले धागे काढून त्या धाग्यांवर प्रतिसादही लिहिता हो तुम्ही?

In reply to by आनंदी गोपाळ

उत्तर सुचलं नाही म्हणून नाही तर तुमच्या अ‍ॅटीट्युड मुळे ती स्मायली टाकली होती....! 'नातेवाईक असलं तरच बोलावं' असं आपला प्रतिसाद सुचवतो आहे त्याबद्दलच ते म्हणणं होतं. बाकी स्टुडन्टसवरचा प्रतिसाद नीट वाचला असतात तर समजला असता. चांगल्या डॉक्टर्स बद्दल, त्यांच्या स्कील बद्दल निश्चितच आदर आहे मात्र ह्याचा अर्थ सगळे डॉक्टर चांगले असतात असं नाही. स्टुडन्टसना मारणं निषेधार्हच आहे पण त्या मारण्याचा आत्ताच्या केसशी काय नि कसा संबंध होता हे समजेल का? वडाची साल वांग्याला लावण्यात काय हशील आहे? म्हैसनं जे सुचवलं अथवा जे काही लिहीलं (म्हैस 'म्हैस' आहे, पण तुम्ही डॉक्टर आहात ना?) ते डॉ. खरेंनी व्यवस्थित उत्तर देऊन क्लिअर केलं आहे. असो. वरच्या प्रतिसादात आपण आपल्याच अनेक व्यवसाय बंधूंना अपमानित केलेलं आहे असं वाटत नाही का? सरकार आमचं नि तुमचं काय मग? जाताजाता : हॉस्पिटलमध्ये रुग्णभरती करताना आधी नोकरी कुठं करता, काय शिक्षण, कितीजण काय काय करतात ही 'निरुपद्रवी' माहिती कशासाठी विचारली जाते हे आपणास ठाऊक असेलच ना? ही आणखी एक स्मायली :)

In reply to by प्यारे१

म्हैस 'म्हैस' आहे, पण तुम्ही डॉक्टर आहात ना?
अगदी अगदी. म्हणून काय वाट्टेल ते ऐकून घेऊ का? ते निरुपद्रवी प्रश्णः माझ्या दुकानात केलेल्या रिपेरिंग जॉबचे पैसे कोण देणारे? इन्शुरन्स कंपनीवाला की दुसरा कुणी? यासाठी ते विचारतो आम्ही. हेच तुमचा मारुती वर्कशॉपवाला विचारतो, किंवा कोपर्‍यावरचा वाणी तुम्हाला उधार देण्याआधी विचारतो. अन खोटी बिले मागायला येणारे तुमच्यापैकीच असतात. लाज वाटते माझ्याच शाळेतला मास्तर बापाच्या ऑपरेशनच्या पैशाची रिएंबर्समेंट मागताना 'अरे बिल वाढव जरा. मलाही थोडे सुटले पाहिजेत' असे सांगतो तेव्हा. मी सरळ हाकलून देतो असल्या गुरुजनांना. प्लस, अमुक जॉब मधे तमुक आजार होऊ शकतात, अशी एक गम्मतही असते. उदा. आयटिमधे असाल तर कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम किंवा कार्पल टनेल सिंड्रोम (हा आरेसाय नाहीच असे अमेरिकन इन्शुरन्स कंपन्ञांनी कोर्टात सिद्ध केलंय बादवे) बाकी माझी अ‍ॅटिट्यूड आधीच क्लियर केलिये मी. 'हलकट' ;)

In reply to by आनंदी गोपाळ

ते आधीच्च ओळखलं होतं म्हणूनच स्मायली टाकलेली. हाथ मिलाओ! आम्ही पण....हलकटच. :)

In reply to by आनंदी गोपाळ

अरे हो! सरकार आमचं अन तुमचं काय मग? याचं उत्तर राहिलं. आज डोकं जरा जास्त तडकलेलं आहे. ते जे कानपूरचे विधायक इर्फान सोलंकी आहेत, त्यांनी स्पष्ट सांगितलंय टीव्हीवर. 'हमे जनताने चुनकर दिया है. डॉक्टरोने नही' हवं तर व्हिडियो डकवतो...

In reply to by आनंदी गोपाळ

पक्षाचे नाव वाचलेत ना त्यांच्या? स-माजवादी. दुसरी अपेक्षा ती काय करणार? :( बाकी 'दुसरी बाजू' असेल ना काहीतरी ;)

In reply to by प्यारे१

जाताजाता : हॉस्पिटलमध्ये रुग्णभरती करताना आधी नोकरी कुठं करता, काय शिक्षण, कितीजण काय काय करतात ही 'निरुपद्रवी' माहिती कशासाठी विचारली जाते हे आपणास ठाऊक असेलच ना? >> :D :D :D जबराट उत्तर

In reply to by आनंदी गोपाळ

ही वेळ तुम्हीच, अन तुमच्या सरकारने माझ्यावर अन माझ्यासारख्यांवर आणलेली आहे.
हा एकतर्फी आरोप आहे. डॉक्टरांच्या व्यवसायातील अपप्रवृत्तींमुळे ह्या विषयाला चालना मिळाली. पूर्वीच्याकाळी (कांही प्रमाणात आजही) डॉक्टरला देव मानणारे लोकं आहेत. स्वार्थी राजकारणी आणि तोडफोड संस्कृतीवाल्यांनी असे कायदे करायला लावून सर्वसामान्य आणि सरळमार्गी रुग्णांची दोन्हीकडून कोंडी केली आहे. दुकानाचा व्यावसायिक दृष्टीकोन समजण्यासारखा आहे तरी पण प्रामाणिकपणे, सचोटीने दुकान चालविता येतेच नं? दुकानातही फसवेगिरी शिरली की नैतिकता रसातळाला जाते. नैतिकता फक्त डॉकटरांकडूनच अपेक्षित आहे असे नाही तर रुग्णांनाही ती बंधनकारक आहे. पण 'ज्ञानी' माणूस 'अज्ञानी' माणसाला हातोहात फसवू शकतो. त्यामुळे 'ज्ञानी' व्यक्तीवर जबाबदारी जास्त येते. तसेच, कानावर येणार्‍या फसवाफसवीच्या अनेक बातम्यांमुळे डॉक्टर-रुग्ण संबंध बिघडताहेत. हल्ली बहुतेक डॉक्टर शल्यक्रिये आधी रुग्णाला/नातेवाईकांना त्यातील धोके समजावून सांगतात आणि हे समजावून सांगितले आहे अशा विधानाचे कागदपत्र करून त्यावर सह्या घेतात. त्यामुळे रुग्णांनी/नातेवाईकांनी शल्यक्रिये आधी डॉक्टरांशी विचारविनिमय करून काय तो निर्णय घ्यावा. त्याहून कांही हलगर्गीपणा झाला असा संशय आला तर कायदेशीर प्रक्रियेस सुरुवात करावी. कायदा हातात घेऊ नये.

In reply to by प्रभाकर पेठकर

पूर्वीच्याकाळी (कांही प्रमाणात आजही) डॉक्टरला देव मानणारे लोकं आहेत.
१. आजच्या काळातही देवासारखे वागणारे "काही" डॉक्टर आहेत. :) प्रमाण "देव मानणार्‍या" लोकांचं कमी होतंय. मग तो देवही देवासारखा वागत नाही, यात काय नवल? अमेरिकन रेड इंडीयन्सबद्दलच्या एका लिखाणात एक इंटरेस्टींग थियरी वाचनात आली होती. 'A god is powerful because of his worshipers. If the number of worshipers is more, the god becomes strong. If that number goes down, the god becomes less powerful, and eventually can be forgotten.' 'पूर्वीचे डॉक्टर देव होते' डॉक्टरला देव म्हणणारे भक्त कमी झाल्याने, डॉक्टरांतलं देवत्व कमी झालंय, हे कृपया लक्षात घ्या. मघाच पासून या धाग्यावर मी तेच सांगतोय. डॉक्टरवरही थोडा विश्वास ठेवलेला बरा असतो. विश्वास नसेल अन मग तो डॉक्टर दुकानदारासारखा वागला, तर तणफण कशाला हविये? २. कन्सेन्ट घ्यायची सिस्टीम पूर्वीपासून आहे हो. आजकालची नाही. ३. या आधीचा एक प्रतिसाद आहे. "ते ते आहेत, तुम्ही डॉक्टर आहात ना?" तसे तुमचे म्हणणे आहे, की एकंदर डॉक्टर्सनी 'समजून घ्यायला हवे' 'त्यामुळे 'ज्ञानी' व्यक्तीवर जबाबदारी जास्त येते.' हे तुमचे वाक्य तसेच वाटले. सर, जबाबदारीने वागूनही या धाग्यावर जे काही सुरू होते ते वाचून डोके तडकले तेव्हा माझ्या भाषेत लिहिणे सुरू केले. कलियुगात तरी लिमिट असते हो जबाबदारीची. >>
कानावर येणार्‍या फसवाफसवीच्या अनेक बातम्यांमुळे
चांगल्या बातम्या कानावर कोण घालील? आमच्या आयएमएने जिल्ह्यातल्या गारपीटग्रस्त गावांत हेल्थ कार्ड्स वाटण्याचे ठरविले आहे. वाटप सुरूही झाले आहे ऑलरेडी. येत्या डिसेंबरापर्यंत जेन्युइन लाभार्थींना (सर्व्हे, अन लाभार्थी आयेमेनेच ठरविलेत.) ५०% पैशात तपासणी/उपचार्/ऑपरेशनं करणार आहोत. या साठी पेड न्यूज वापरावी काय? अर्थात यातही फसवाफसवीच दिसली कुणाला तर मी काय करू शकतो?

In reply to by आनंदी गोपाळ

"ते ते आहेत, तुम्ही डॉक्टर आहात ना?" तसे तुमचे म्हणणे आहे, की एकंदर डॉक्टर्सनी 'समजून घ्यायला हवे' 'त्यामुळे 'ज्ञानी' व्यक्तीवर जबाबदारी जास्त येते.' हे तुमचे वाक्य तसेच वाटले.
आनंदी गोपाळ साहेब, मी, डॉक्टरांनी कोणालाही 'समजून घ्यावे' असे कुठेही म्हंटलेले/सुचविलेले नाही. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की नैतिक जबाबदारी 'ज्ञानी' माणसावर जास्त असते. म्हणजे रुग्णांनी अनैतिक वागावे असा अर्थ नाही. जो एखादा बलवान असतो त्याने आपल्या बळाचा वापर चांगल्या कामासाठी करावा असे नैतिक बंधन त्याच्यावर असते. तो बळाचा वापर दुर्बलावर अत्याचार करण्यासाठी करायला लागला तर ते अनैतिक होते. डॉक्टरांजवळ ज्ञानाचे बळ असते ते त्यांनी सत्कर्मी लावावे एवढीच अपेक्षा आहे. रुग्णाचे नातेवाईक चुकतात, भावनेच्या भराव वाहात जातात मला मान्य आहे. राजकारणी लोकं अशांच्या तप्त भावनांचा, आपली पोळी भाजून घ्यायला, वापर करतात. या धाग्यावर जे काही सुरू होते ते वाचून डोके तडकले तेव्हा माझ्या भाषेत लिहिणे सुरू केले. शल्यचिकित्सकाकडून संयमाची अपेक्षा असते. कारण शल्यक्रियेसाठी त्याला डोके शांत ठेवून काम करावे लागते. तिच वृत्ती त्याला दैनंदिन आयुष्यात वापरावी लागते. ज्या गोष्टी पटत नाहीत त्या सोडून द्या. हाताची सर्व बोटे सारखी नसतात हे मी सांगायला नको. तुमच्या व्यवसायातील कांही व्यक्ती आणि रुग्णांच्या नातेवाईकांमधील कांही व्यक्ती वातावरण कलुषित करण्यास मदत करतात. इथे कोणावरही वैयक्तिक दोषारोप होत नसल्याने संयम बाळगावा. एखाद्या रुग्णाला आलेला वाईट अनुभवही खरा असू शकतो एवढी शक्यता लक्षात घ्यावी. डॉक्टरी व्यवसायातही प्रामाणिक आणि सेवाभावि व्यक्ती आहेत ह्यावर आमचा विश्वास आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

तुमच्या संयत व संतुलित लिहिण्याबद्दल मनात संशय कधीच नव्हता व नाही. फक्त तुमच्या लिहिण्याचे बोट धरून इतरांनी वात्रट निष्कर्ष काढू नयेत म्हणून थोडा कडू काढा तुमच्या प्रतिसादाखाली ओतला, इतकेच. बाकी, "शल्यचिकित्सकाकडून संयमाची अपेक्षा असते." ;) हे वाक्य थोडे गमतीचे आहे. तिथे अनेकदा, लौकर बाप दाखव! नाही तर ताबडतोब श्राद्ध कर, अन ते ही ३ सेकंदात! अशी लढाई असते. तेव्हा ऑपरेशन करणार्‍या शल्यचिकित्सकाकडून थंड डोक्याची अपेक्षा म्हणजे, फोडणी तडतडते आहे. पण जरा दमानं घ्या. विचार करा. अन मग ५-७ मिन्टांनी जमलं तर इतर मसाले टाका, कांदा कापायला विसर्ला असाल तर आता तो कापून घ्या... असा इच्चार करणार्‍या बल्लवाचार्यांसारखे आहे ;)

In reply to by आनंदी गोपाळ

ऑपरेशन करणार्‍या शल्यचिकित्सकाकडून थंड डोक्याची अपेक्षा ....
'थंड डोक्याची अपेक्षा' म्हणजे 'थंड कृतीची अपेक्षा' असा चुकीचा अर्थ आपण घेतला आहे. 'थंड डोक्याने' म्हणजे 'भावनांनी विचलीत न होता' पण आवश्यकता असेल तिथे झटपट तरीही संतुलीत निर्णय घेणण्याची क्षमता असणे.
फोडणी तडतडते आहे. पण जरा दमानं घ्या. विचार करा. अन मग ५-७ मिन्टांनी जमलं तर इतर मसाले टाका, कांदा कापायला विसर्ला असाल तर आता तो कापून घ्या... असा इच्चार करणार्‍या बल्लवाचार्यांसारखे आहे
हे उदाहरण अप्रस्तुत आहे कारण हे 'थंड डोक्याने विचार करण्याचे' नाही तर 'थंड गतीने शारीरिक कृती' करण्याचे आहे. दोन व्यवसायांची तुलना करीत नाहीए पण एखादा पदार्थ बनविताना आम्हालाही त्यासाठी आवश्यक सर्व जिन्नस हाताशी घेऊन आणि ते ज्या क्रमाने वापरायचे आहेत त्या क्रमाने मांडावे लागतात. पुन्हा सांगतो दोन व्यवसायांची ही तुलना नाही. पण चुक झाली तर आमचा पेशंटही 'दगावतो'. असो. कदाचित मिपावर बल्लवाचार्यांना त्यांच्या विषया व्यतिरिक्त इतर विषयांवर मतप्रदर्शनाचा अधिकार नसावा. ह्याने सुदृढ चर्चेचे दरवाजे मात्र बंद होतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

कदाचित मिपावर बल्लवाचार्यांना त्यांच्या विषया व्यतिरिक्त इतर विषयांवर मतप्रदर्शनाचा अधिकार नसावा. ह्याने सुदृढ चर्चेचे दरवाजे मात्र बंद होतात.
ते फक्त वेळेचा अभाव जाण्वुन द्याय्चा प्रय्त्न करताहेत. एकूणच डॉक्टर्सच्या विरोधी सूराने रागावले आहेत.

In reply to by म्हैस

शेवटी ज्याचा जीव गेला त्याच्या कुटुंबियांना च ते दुखं समजणार ना. >> अनुमोदन. हे मात्र खरे :(

"आघात " हा विक्रम गोखले आणि मुक्ता बर्वेचा सिनामा पहा एकदा जरूर . थोडासा अंगावर येतो पण ते ठीक आहे कारण मुळात विषय गंभीरच आहे . विक्रम गोखले आणि मुक्ता या दोघांनी अतिशय सुंदर काम केल आहे. बाकी साती तै आणि डॉ. खरे यांचे प्रतिसाद छान आहेत . चांगली माहिती मिळतेय . :)

In reply to by दिव्यश्री

>>"आघात " हा विक्रम गोखले आणि मुक्ता बर्वेचा सिनामा पहा एकदा जरूर. अगदी हेच म्हणायला आलो होतो. सिनेमाचं नाव आठवत नव्हतं.

साहेब ती मृत व्यक्ती आपला जवळचा नातेवाईक होता हे मान्य करून आणि त्याबद्दल सहानुभूती व्यक्त करूनही मला आपणाला एक प्रश्न विचारावासा वाटतो. कि त्या डॉक्टरानी हलगर्जी पण केला असे आपण कोणत्या आधारावर म्हणत आहात?मुल त्या रुग्णाला आजार कोणता होता आणि त्याची शल्यक्रिया कशासाठी झाली होती त्या शल्यक्रियेनंतर काय गुंतागुंत झाली हे काहीही न विशद करता( कदाचित ते आपणास माहित असेलही पण इथे लिहिलेल्या गोश्वार्यात असे कुठेही दिसत नाही) आपण एक आरोप केलात. त्यात तथ्य असेलही पण कोणताही पुरावा न देता आपण आरोप केलात त्यात दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्याच्यावर दुसरी शल्यक्रिया झाली म्हणजे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुद्धा या गुन्ह्यात सहभागी झाले असे आपले म्हणणे आहे काय? आणि एवढे सगळे पाहूनही आपण म्हणता जागृती करण्यासाठी तर कोणती जागृती आपल्याला अपेक्षित आहे? सर्व रुग्णालयात रुग्णवाहिका सर्व काळ उपलब्ध असल्याच पाहिजेत असा आपला आग्रह आहे काय? "तुम्ही डॉक्टर आहात म्हणून इथे सांगितलेली गोष्ट खोटी आहे असं म्हणायचं का तुम्हाला?" मी असे कुठेही म्हटलेले नाही. "अर्धवट माहितीवर जनजागृती करणे हे फारसे बरोबर नाही असे मला वाटते." यात काय चुकले हे आपण माझ्या अल्पमतीला समजावून सांगाल काय? आपला जवळचा नातेवाईक दगावला त्यामुळे लोकांची सहानुभूती नातेवाईकाला असते याचा सरळ अर्थ तो डॉक्टर कसाई आहे असा लावणे चुकीचे आहे. मी केवळ डॉक्टर आहे म्हणून मी डॉक्टरची बाजू घेणार हेही आपण गृहीत धरून "तुम्हाला काय त्याची झळ पोचलीये?"हे वक्तव्य करणे म्हणजे आम्ही संवेदनाहीन आहोत असा अर्थ आपण कोणत्या आधारावर लावता? मी तो डॉक्टर कसाई आहे असे म्हटले असते तर आपल्याला बरे वाटले असते असाच अर्थ यातून निघतो पण तसे करणे माझ्या सद्सद विवेकबुद्धीला पटणारे नाही. प्रत्येक रुग्णालयात रुग्णवाहिका आणि रक्तपेढी आहे का ? याची खात्री केल्याशिवाय तेथे जाऊ नये हे आपणच म्हणता आहात त्यावर मी वस्तुस्थिती दर्शविणारा दुवा दाखविला आहे यावर आपली माहिती पूर्ण नाही हे मान्य न करता तुम्ही सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करीत आहात हे फारसे बरोबर नाही असेच मला वाटते असो वितंडवाद घालण्यात मला अर्थ वाटत नाही. असो आपली मते आपल्यापाशी.

डॉक्टर लोकं सन्माननीय अपवाद सोडले तर चालू या कॅटेगरीत मोडतात. आमचा फॅमेली डॉ. म्हणवणारा डॉक्टर आताशा एमआर कडची औषधे विकत देतो. एकदोन वेळेस मी चालवून घेतले पण आता मी वेळ मिळाला की मुद्दाम सर्दी झाली असे सांगून जातो अन सँपल औषधे दिली की मग झापतो त्याला. साधा डॉक्टरसुद्धा दिवसभराची १०/१२ हजार कमवत असूनही कट प्रॅक्टीस करतात.

In reply to by पाषाणभेद

नांव गावासकट डिग्री सांगा. अ‍ॅलोपथीचा डॉक्टर असेल अन सँपलची औषधे विकलीत तर याचे रजिस्ट्रेशन क्यान्सल करायची जबाबदारी माझी. नॉन अ‍ॅलोपअ‍ॅथ डॉक्टरांकडे सँपलची अ‍ॅलोपथी औषधे देणारे कंपनीवाले व एम आर यात जबाबदार आहेत की नाहीत?

In reply to by आनंदी गोपाळ

डॉ. बी ए ऐम ऐस आहे. सँपलची औषधे अ‍ॅलोपॅथेची आहेत. सध्या मी बघतो काय ते. आयएमऐ कडे तक्रार केली तर कसे?

In reply to by पाषाणभेद

पाभेजी, मेडिकल काउन्सिल अ‍ॅलोपथीची व इंडियन मेडिसिनची वेगळी आहे. तशीच होमिओची देखिल. त्यांच्या काऊन्सिलकडे तक्रार करायला हवी. त्या काउसिल्स मोस्टली डिफन्क्ट आहेत, सबब फार काही होणार नाही. सर्व कायदे कानून फक्त अ‍ॅलोपॅथ्स साठी आहेत.. पूर्वी महाराष्ट्र मेडीकल काऊन्सिलकडे नोंदणी नसेल तर महाराष्ट्रात अ‍ॅलोपथी प्रॅक्टिस करता येत नसे. अगदी एम एस्/एमसीएच डिग्री असली तरी. परवाच. एक्झॅक्टली २ दिवसांपूर्वी दिव्य गावित साहेबांनी मंत्रीमंडळाची या सर्वांना अ‍ॅलोपथी करू द्या अशी सहमती मिळवून अध्यादेश काढायची तयारी केलिये. पण ते अवांतर. असो. शुभरात्री!

In reply to by पाषाणभेद

साधा डॉक्टरसुद्धा दिवसभराची १०/१२ हजार कमवत असूनही कट प्रॅक्टीस करतात. दिवसात १० हजार कमावण्यासाठी शंभर रुपये देणारे किमान शंभर रुग्ण तपासायला लागतील.शंभर रुग्ण तपासण्यास प्रेत्येकी पाच मिनिटे धरलीत तर साडे आठ तास न थांबता पूर्ण वेळ रुग्ण तपासायला लागतील. यात फक्त रिपोर्ट दाखवायला आलेले केमिस्ट कडून घेतलेली औषधे तपासुन घ्यायला आलेले रुग्ण धरता येत नाहीत. ( कारण ते पैसे देत नाहीत) किती "साध्या"डॉक्टरांचे हे भाग्य असेल? फार तर दोन टक्के. बाकी ९८ टक्के डॉक्टर किती कमावतात हा संशोधनाचा विषय आहे. डॉक्टर दाबून पैसे कमावतात या इतका गैरसमज दुसरा नसेल. म्हणूनच शहाणी माणसे आजकाल डॉक्टर बनण्याच्या फंदात पडत नाहीत. माझी मुलगी कॉमर्स करते आहे आणि मुलगा अभियांत्रिकीला जायचे म्हणतोय. म्हणूनच मी आनंदात आहे.

In reply to by सुबोध खरे

आमचे पुण्यातील फिजिशियन जनरल तपासणीचे एकावेळचे ३०० रूपये घेतात आणि दिवसभरात भरपूर गर्दी असते त्यांच्याकडे। त्यांच्याकडच्या नर्सेस अतिशय उध्दट आहेत आणि चेहर्यावर अजिबात हास्याची एकहि रेश नसलेल्या आहेत।

In reply to by पक्या

हे मात्र अगदि खरे आहे,या गोष्टिचा मलाही अनुभव आहे.( Orthodontics डॉक्टर बद्द्ल) अगदि ३००-३०० रुपये तपासणी फी द्यायची.वर तिथे गर्दि अफाट. अक्षरश: लाईन असते. हे सगळे चालू असताना, तो डॉक्टर स्वत:च दिलेली दवाखान्याची वेळ न पाळता सर्रास उशिरा येणार! बर,तोवर त्या रिसेप्शनिस्ट/नर्सेस याना काही विचारावे तर अतिशय उद्धटपणे उत्तर देतात. फोन करुन अपॉइन्मेण्ट घ्यायची सोय असते,पण त्याचा फारसा उपयोग होत नाही. कारण तिथे डॉक्टरच्या उपलब्ध वेळेचे आणि येणार्‍या पेशण्ट/त्याना दिलेल्या वेळेचे गणितच चुकलेले असते. मग, हे डॉक्टर एवढे कमवतात, शिकलेले असतात तरी असे का वागतात,वेळेचे मह्त्व कसे काय नाही या लोकाना, या उद्धट रिसेप्शनिस्ट/नर्सेस कसे काय ठेवतात इ. प्रश्न सामान्य जनतेला पडणे साहजिक आहे. सगळेच डॉक्टर असे वागत असतील असे माझे मत नाही.एकाच्या वागण्यावरुन सगळ्याबद्द्ल मत दुषीत करुन घेणे चुकिचेच आहे. पण असे अनुभव येण्याची वारन्वारता वाढू नये अशी अपेक्षा. मला मान्य आहे कि हा प्रतिसाद इथल्या चर्चेशी विसन्गत आहे,पण राहावले नाही म्हणून ट्न्कला. खरे साहेब आपल्या आणि सातीताईच्या प्रतिसादाशी मी सहमत आहे. आपले लेखन आणि प्रतिसाद नेहमीच वाचनीय आणि माहितीपूर्ण असतात त्याबद्द्ल वादच नाही

In reply to by स्मिता चौगुले

बाकी डॉक्टर खरे आणि साति यानी य्ववशित उत्तरे दिली आहेत. पण हा प्रश्न मलाही पडला आहे. सन्गवयास खेद वाटतो की बोर्डावर लिहीलेल्या वेळेला येनारा एकही डॉक्टर पाहीलेला नाही. अर्थात नियमला एखदा अपवाद असेलच पण पहण्यात तरी आलेला नाही.

In reply to by पक्या

साहेब, फिजिशियन हा एम बी बी एस ची साडे पाच वर्षे यानंतर एम डी ची तीन वर्षे असे बारावी नंतर साडे आठ वर्षे शिकलेला असतो. त्याने तीनशे रुपये सुद्धा घेऊ नये असे आपले म्हणणे आहे काय?एक गरीब आणि सेवाभावी डॉक्टर होता अशीच आपल्या कहाण्यांची सुरुवात असते किंबहुना डॉक्टरने सेवाभावी आणि गरीबच असावे अशी समाजाची अपेक्षा असते. आम्ही पैसे कमावणार पण तुम्ही मात्र सेवाभावी असावे.( हीच अपेक्षा शिक्षक/ प्राध्यापकांकडून केली जाते) त्यांच्याकडे गर्दी का असते? हा विचार आपणच करा माझ्या कडे संगणक बिघडल्यास माणूस येतो तो एका वेळेचे साडे तीनशे रुपये घेतो त्याची शैक्षणिक पात्रता कोणती? किंवा माझ्या मायक्रो वेव्ह चा magnatron बिघडलं त्यासाठी आलेल्या इसमाचे साडे चारशे रुपये (आणि magnatron ची किंमत साडे सोळाशे) असे २१०० रुपये मी दिले. एकदा एका न्युरोसर्जन कडे नळ बिघडला म्हणून त्याने प्लंबर ला बोलावले प्लंबर ने नळ दुरुस्त केला आणि आपली फी आठशे रुपये सांगितली(मालाचे पैसे वेगळे)त्यावर न्यूरोसर्जन म्हणाला कि अरे मी न्यूरोसर्जन असूनही मला कोणी इतके पैसे देत नाही त्यावर प्लंबर हसून म्हणाला डॉक्टर जेंव्हा मी न्यूरोसर्जन होतो तेंव्हा सुद्धा मला कोणी एवढे पैसे देत नव्हते. डॉक्टरांकडेच का साध्या मोबाईल दुरुस्तीच्या दुकानात जाऊन पहा तेथील मुली आपल्याशी कशा वागतात ते. एकीला हाकलून दिले तरी दुसरी तुम्हाला तशीच मिळते. हा आपला भारतीय स्थायीभाव आहे.

नव्या सर्जनकडे पेशंट पाठवण्यासाठी कट मागणार्‍या, त्याला ब्लॅकमेल करणार्‍या होमिओ-आयुर्वेद वाल्या जिपड्यांचा यात काहीच वाटा नाही का? सरकारी कारकुंड्याला लाच द्यावी लागली तर सामान्य माणूस बळीचा बकरा. या भिकारचोट जिपड्यांना नाईलाजाने कट द्यावा लागला तर क्वालीफाईड डॉक्टर हरामखोर?? वा रे वा ! तुमच्या जीपीची चिठ्ठी घेऊन जाऊ नका ना स्पेशालिस्टकडे

In reply to by आनंदी गोपाळ

गोपाळराव "मूर्ख लोकांशी वाद घालण्याच्या फंदात पडू नये" असे मार्क ट्वेन म्हणून गेले . कारण त्यांच्या बरोबर वाद घालताना ते तुम्हाला त्यांच्या पातळीपर्यंत खाली खेचतात आणि मग अनुभवाच्या जोरावर तुमच्या वर मात करतात.(“Never argue with stupid people, they will drag you down to their level and then beat you with experience.”)

In reply to by सुबोध खरे

+१०००००००००००००००००००००००००००००००००००००००००० स्वतःचा वेळ्,त्रास ,पैसे वाचवण्यासाठी ,आजाराचे गांभिर्य लक्षात न घेता, अ‍ॅलोपथीची औषधे ती न शिकलेली असताना देणार्या डॉक्टरकडे जाताना यातल्या कोणाच्याही संवेदना जागृत कशा नसतात?

In reply to by सुबोध खरे

असल्या फंदात न पडलेले बरे,तुम्ही कितीही शास्र्तशुद्ध तर्कसंगत मांडणी केली तरी हे प्राणी,त्यांना सोइस्कर अर्थच काढणार्,आणी स्वतःवर वेळ आली की ?? ? जाउ द्या उगाच शब्द वाया जातील.

In reply to by रुस्तम

येथील सगळ्या मेडीकल डॉक्टर असलेल्या सदस्यांबाबतीत आदर आहेच. समाजातील सन्माननिय डॉक्टरांच्या बाबतीतही तो आदर आहेच. प्रश्न डॉक्टर लोकांनी पैसे अकारण घेण्याचा. डॉक्टरकी शिकणे बुद्धीचे काम आहे. त्यात वेळ पैसा भरपूर खर्च होतो. त्यानंतरही हॉस्पीटल (दवाखाना नव्हे) टाकणे आदी खर्चाचे काम आहे. त्याची परतफेड झालीच पाहीजे. पण तो होणारा खर्च वसूल करण्यासाठी केवळ काही डॉक्टरांनी बेकायदेशीर तत्वांचा अवलंब करणे अनुचित आहे. मला सांगा. नुकत्याच जन्माला आलेल्या तान्ह्या बाळांना थोडीतरी काविळ असते. बर्‍याच तान्ह्या बाळांना डॉक्टर काचेच्या पेटीत ठेवण्याचा सल्ला देतात. तो खरोखर गरजेचा असतो? केवळ मायेपोटी शिकलेले आईबापही या गरजेला तयार होतात. डॉक्टरकी शिकतांना सामाजिक विषय (नाव माहीत नाही) अभ्यासाला असतो/ असावा. त्या विषयाला डॉक्टर लोक ५०% जागले तरी भरपूर.

In reply to by पाषाणभेद

अशी एक डिग्री आहे. काचेच्या पेटीत ठेवणार्‍यांच्या डिग्र्या कोणत्या ते पुन्हा तपासून पहा, अशी तुम्हाला पुन्हा विनंती करतो पाभेजी. स्वतःस डॉक्टर म्हणवून 'धंदा' करणार्‍या कुणालाही क्वालिफाईड पोस्टग्रॅज्युएट डॉक्टर समजून त्याच्यकडे जाणार्‍यांची कीव येते, अन असल्यांना दुकाने चालवू देणार्‍या, वरतून त्यांना अ‍ॅलोपथीची औषधे वापरायला ऑफिशियल परवानगी देणार्‍या बिनडोक सरकारी लोकांची चीड! याउप्पर मॉडर्न मेडिसिनमधले पैशाचे रिझर्वेशनवाले प्रायवेट मेडिकल कालेजातले सुपरपदविधर!! हे काढणार सप्ततारांकित हॉस्पिटल्स, अन मग काढणार तुमच्याकडून पैसे. महाराष्ट्राचा आरोग्यमंत्री आजच्या घडीला एमडी मेडीसीन डिग्रीवाला आहे. याला तरी वैयक्तिक रित्या पाडलाच पाहिजे येत्या निवडणुकीत.. महोदय, सरकारी शिक्का वाली एक 'होमिओपदी लै भारी' अशी अ‍ॅड आज टीव्हीवर पाहिली अन डोळे निवले!! अधिक काय बोलावे?

In reply to by पाषाणभेद

नुकत्याच जन्मलेल्या बाळाचे यकृत पूर्ण तयार झालेले नसते त्यामुळे ज्यावेळेस अर्भकाचे हिमोग्लोबीन बदलून मोठ्या माणसाच्या हिमोग्लोबीन मध्ये रुपांतर होते तेंव्हा त्यातून तयार झालेले पित्त शरीरभर पसरून नवजात मुलाला कावीळ होते. हि कावीळ किती आहे ते रक्तातील बिलीरुबीन हे रंगद्रव्य मोजून ठरवली जाते. याची पातळी जर फार वर गेली तर ते मेंदूत शिरून मुल मतीमंद होण्याचा धोका असतो. मुल जितके कमी दिवसांचे तितका हा धोका जास्त असतो. हे बिलीरुबीन कमी होण्यासाठी मुलाला काचेच्या पेटीत ठेवून त्याला अतिनील किरण (अल्ट्रा व्हायोलेट)दिले जातात ज्याने त्या बिलीरुबीनचे विघटन होते. हीच क्रिया सकाळच्या कोवळ्या उन्हात पण होते. परंतु मुल जर कमी दिवसाचे असेल तरमुलाच्या शरीरातून उष्णता निघून जाउन मूल थंड पडण्याचा धोका असतो.शिवाय मुलाच्या श्रीरातून पाणी जौं मूल डिहायड्रेट होण्याचा धोका असतो त्यामुळे काविळ थोडीशीच असेल आणि मुलाचे वजन जर चांगले असेल तर मुलाला कोवळ्या उन्हात धरता येते. पण मूल कमी दिवसाचे किंवा कमी वजनाचे असेल तर मुलाला हा धोका घेता येत नाही.म्हणून मुलाला नियन्तरीत तापमानाच्या पेटीत ठेवले जाते आणि अतिनील किरणाचा उपचार दिला जातो. प्रश्न असा असतो कि आपण मुलाच्या आईवडिलांवर किती विश्वास ठेवू शकता.कि ते सांगितल्याप्रमाणेच करतील. लहान मुलांमध्ये मार्जिन ऑफ सेफ्टी फार कमी असतो आणि मुलाचे डीहायडरेशन झाले कि डॉक्टरला शिव्या घालणारी माणसे कमी नाहीत त्यामुळे डॉक्टर अशा फंदात पडत नाहीत. त्यामुळे सरसकट सर्व डॉक्टर पैश्यासाठी असे करतात हे मानणे चुकीचे आहे. सामाजिक भानाचे म्हणाल तर इंग्रजीमध्ये एक म्हण आहे people get the government they deserve याच लयीत मी म्हणेन people get the doctors they deserve

In reply to by सुबोध खरे

पेडीयाट्रीशियन व गायनॅकोलॉजिस्ट चुकुनही पेशंटच्या बाबातीत धोका स्विकारात नाही कारन चुकुन थोडे जरी कमी जास्त झाले तर अक्षरशः डॉक्टरच्या प्राणांशी गाठ असते,आणी जिव तोडुन प्रयत्न करुन परत वरती फुकटचा मार कोन कशाला खाइल हो,एक तर पेशंट पुर्ण बॅड बने पर्यंत घरी ठेवणारे प्राणी वेगळे असतात आणी पेशंटला काही झाले डॉक्टरची .... मारणारे वेगळेच प्राणी पुढे येतात.मी संघटना लेव्हलवर काम करतो आहे,रुग्न बरा होइ पर्यंत डॉक्टरला देव माणानारे जेंव्हा बिल हातात पडते तेंव्हा अचानक त्यांच्या साठी डॉक्टर कसाई होतो. जवळ पासची कितीतरी रुग्नालये मागच्या १० वर्षात फोडण्यापासुन वाचवावी लागली आहेत.त्यातल्या कमी कमी १० तरी डॉक्टरांनी स्वतःचे व्यवसाय बंद करुन इतर धंदे सुरु केले आहेत. आज सगळेच डॉक्टर शहाणे आहे अश्यातला भाग नाही पण रुग्नाचे सगळेच नातेवाइक साधुसंत आहेत असेही नाही. दर वर्षी सरासरी दिड ते दोन लाखाचा उधारीचा बांबु मला बसतो.तो अश्याच नमुन्यांकरीता गंगार्पण केलेला असतो. तरी एक लक्षात घ्या आपल्या येथे अजुनही डॉक्टर व रुग्नाचे नाते भावनीक लेव्हला आहे त्यात व्यवसायीकता घुसलेली नाही,ज्यादिवशी त्यात १००% व्यवासायिकता येइल त्या दिवशी पासुन खरी मजा येइल.

In reply to by बाबा पाटील

रुग्न बरा होइ पर्यंत डॉक्टरला देव माणानारे जेंव्हा बिल हातात पडते तेंव्हा अचानक त्यांच्या साठी डॉक्टर कसाई होतो.
हे बिल कितीही वाजवी काढले, तरीही, अ‍ॅडमिट करताना 'खर्चाची काळजी करू नका डॉक्टर, पेशंट चांगला झाला पहिजे' असं सांगणारे नमुने, अ‍ॅडव्हान्स जमा करायच्या वेळी सटकतात. अन देणारे टाळाटाळ सुरू करतात. सगळ्यात बेस्ट आयडिया म्हणजे, 'आमचा पेशंट बरा झालाच नाही!' किंवा अमुक त्रास होतोय. जोर जोरात कण्हून दाखवतात ओपीडीत. यावरचे इलाज आहेत, ते मी करतोही ;) * गाडी रिपेयर करायचं बिल, किराणा मालाचं बिल, गाडीचं पेट्रोल, सिनेमाचं तिकिट, घरच्या धुणेभांडेवालीचा पगार, शाळेची डोनेशन, रिक्षावाल्याचे पैसे, एस्टी/लोकल्/बेस्ट्/पीएम्टीचा पास, इंटरनेटचे बिल अन मोबाईलचा टॉकटाईम, दारावरचा भाजीवाला, अन दगड-धोंडे. लोकहो, यांच्यापैकी कोण तुम्हाला २ रुपडके कन्सेशन देते हो? मला तरी देत नाही कुणीच! शिवाय इथे, दर महिना अखेर मला स्टाफचा पगार करावा लागतो. चादरी उशांचे अभ्रे, गाऊन, ड्रेस, ड्रेप धुणार्‍या लाँड्रीवाल्याला पैशांपासून, फोनबिल, लाईटबिल, छापखानावाला, चहावाला, एक ना अनेक बिलं चुकवावी लागतात. अनेक सरकारी 'इन्स्पेक्टर' लोकांना 'शांत' करावे लागते, वरतून बँकवाला छातीवर उभा रहातो, तुमच्या उपचारांसाठी विकत घेतलेल्या लाखो करोडो रुपयांच्या मशिनरी अन ज्या बिल्डिंगला भुलून तुम्ही पायरी चढतात, तिला विकत घेण्याच्या हप्त्यांसाठी.. मी तुम्हाला कन्सेशन दिले, तर तो मला हप्त्यात कन्सेशन देत नाही. हजार खर्च असतात, करावेच लागतात. असे असताना डॉक्टरनेच कन्सेशन द्यावे, चॅरिटी करावी, कारण काय, तर आलेल्या पेशंटच्या 'जिवाचा' प्रश्न आहे! बिचारा आजारी आहे! त्याचं बघायला कुणी नाही!! यार, मी आजारी पाडला का रे तुला? का मी अ‍ॅक्सिडेंट केला तुझा?? अरे भाऊ, मी केल्या कामाचे पैसे मागतोय. चोरी नाही करत. मी मेलो तर माझ्या बायकापोरांकडे पहायला कोण येणारे? तू की तुझे 'नातेवाईक' ज्यांच्या 'संवेदना' मी समजून घ्याव्यात अशी तुमची इच्छा आहे? अन मी केलेल्या खर्चाचं अन कष्टाचं बिल मागू नको तर काय करू? भीक मागायला बसू सारसबागेबाहेर?

In reply to by आनंदी गोपाळ

मी तुम्हाला कन्सेशन दिले, तर तो मला हप्त्यात कन्सेशन देत नाही. विशेषतः या वाक्याला! सगळी सोंगं आणता येतात, पैशाचं आणता येत नाही. आपली लोकं पण गरज सरो वैद्य मरो प्रकारातली आहेत. मला नेहेमी वाटायचं गरज मरो आणि वैद्य मरो अशीच म्हण का आली- गरज सरो आणि सुतार मरो/शिंपी मरो वा इतर कुणी मरो अशी का नाही आली? वैद्यच का? काही वर्ष प्रॅक्टिस केल्यावर याचा उलगडा झाला! वर खरे सरांनी लिहिलं आहे तेच खरं- पीपल गेट द डॉक्टर दे डिझर्व!

In reply to by बाबा पाटील

सहमत आहे. फक्त डॉक्टरनीचं सेवाभावानी काम कराव आणि पैशाची अपेक्षा धरु नये असं म्हणणं बरोबर नाही. हॉस्पिटल मधे तोडफोड करणार्‍यांना त्यांच्यावर वेळ आली की शेवटी डॉक्टरचेच पाय धरावे लागतात हे विसरु नये.

In reply to by आनंदी गोपाळ

१००००००००००००० % सहमत,आमच्या तालुक्यात ९० % bams,mbbs,bhms,bums डॉक्टर्स lab मध्ये,medicine मध्ये cut मागतात.मोठ्या doctor कडे पाठवल्यावर त्याचे कमिशन वेगळेच असते,

In reply to by आनंदी गोपाळ

पण तुमच्यासारखेच ५५ प्रकारची सर्टिफिकेट्स घेऊन तुमच्या सारखाच "धंदा" करतात, मग त्यात "नाईलाजाने कट" द्यावा लागला तर एवढी तडफड कशासाठी? जसा तुमचा "धंदा" तसा त्यांचा ही धंदाच आहे की? आणि ज्यांच्याकडून तुमचा "धंदा" होतो त्यांनाच "भिकारचोट" म्हणायची ही कसली व्यावसायिकता? सरकारी कारकुंड्यांना लाच द्यावी लागते ती लोकं सामान्य लोकं असतात, तुम्ही सामान्य लोकं नाही, डॉक्टर आहात तुम्हाला हे रडगाणं गाता येणार नाही. कट मागणं जर भिकारचोटपणा आहे तर तो देणं सुद्धा तितकाच भिकारचोटपणा आहे, नाही का? (कट न देता न घेता भारतात प्रॅक्टिस केलेला) बाळकराम

In reply to by बाळकराम

साहेबा, रेडिऑलॉजिस्टकडून 'ऑफिशियल रेफरन्स फी' म्हणून चेकने कट आला, याची तक्रार एका अ‍ॅलोपॅथ डॉक्टरने महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिकलडे करण्याचे गट्स दाखविलेत, अन म्हणून हे प्रकरण बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कट मागणारा जीपी हा सिनियर व एस्टॅब्लिश्ड व्यक्ती असतो. नाईलाजाने देणारा, नवी प्र्याक्टीस सुरू करणारा ज्युनियर. ही कारणश्रुंखला तुम्ही विसरलात काय? माझ्याकडे येऊन (मी गेले पाव शतका पेक्षा जास्त काळ ऑपरेशने करीत आहे) एकादा ५-१० वर्षे प्र्याक्टीस करणारा 'एस्टॅब्लिश्ड' देखिल जीपी, कट म्हणून पैसे मागायची हिम्मत करील, असे तुम्हाला वाटते काय? शिवाय, कुणी मागितलेच नाहीत, किंवा मागितले ते देण्यासाठी काही लिव्हरेज वापरले नाही, तर तुम्ही 'औट ऑफ गुडनेस ऑफ युअर हार्ट' म्हणून कुणाला २-५ हजार रुपये कट म्हणून द्याल का हो? मी व्यक्तिशः ५ पैसेही कट देत नाही. पण, अनेक मोठी इस्पितळे, ज्यांचे 'मालक' डॉक्टर्स नसून इतरच असतात, किंवा काही मूर्ख लोक, जे 'पीआरओ' नामक प्रक्रण नोकरीस ठेवतात, ते लोक हा प्रकार करतात, हे मला चांगलेच ठाऊक आहे. त्यांच्या मुस्क्या आवळण्यासाठी काय काय करायला हवे, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ते नक्कीच साध्य होईल, असा विश्वासही आहे.

http://www.youtube.com/watch?v=1Lg0kUtS8ic हा सत्यमेव जयते चा २०१२ चा एपिसोड आहे. ( पहिला प्रसंग तर जरूर पहावा।) हयाचा प्रतिवाद कसा करणार ? की हे ही खोटेच आहे असे समजायचे ? पुण्यातील एक नावाजलेले हॉस्पिटल व तेथील एक एलोपेथी चे नावाजलेले डॉक्टर। ह्यांच्याकडे वडिलांची ट्रीटमेंट चालु होती. त्यावेळी आलेला अनुभव असा होता की आपल्या शंका निरसनासाठी काही प्रश्न त्यांना विचारले तर ते चिडत असत, उत्तर दिले तर चिडून काहितरी उलटेच बोलत जेणेकरून पेशंटने परत काही विचारूच नये. याउलट मला अमेरिकेत आलेला अनुभव असा कि डॉक्टर्स पेशंटच्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित त्याचे समाधान होईपर्यंत देतात. माझ्या मुलीला एकदा तिच्या एका आजारात स्टेरॉइड्स प्रिस्क्राइब केले होते। ती तेव्हा खुपच लहान म्हणजे २ वर्षाचीही नव्हती. त्यामुळे मला स्टेरॉइड्स द्यायला लागू नये असेच वाटत होते. मी त्याना अजुन काही पर्याय आहे का ? स्टेरॉइड्स तिला खुप हेवी तर होणार नाहित ना असे विचारल्यावर स्टेरॉइड्स ची मात्रा लहान मुलांना अगदी कमी प्रमाणात असते , तुम्हाला स्टेरॉइड्स नको असतील तर तुम्ही --- हे हे दुसरे औषध घेऊ शकता. स्टेरॉइड्स घेतले तर काय होईल आणि हे दूसरे औषध घेतले तर काय होईल वगैरे नीट समजावून सांगितले होते। या उलट माझा मुलगा १ महिन्याचा ही नव्हता तेव्हा सर्दी झाली म्हणून त्याला पुण्यातील एका सुप्रसिध्द पेडियाट्रीशन ने एंटीबायोटिक्स दिले होते. त्यानंतर तो नीट खाईना, त्याला ६ व्या महिन्यात अमेरिकेत आणल्यावर लक्षात आले की गम्भीर आजार नसताना इथे बाळांना साध्या सर्दी खोकल्यासाठी कधीच एंटीबायोटिक्स देत नाहीत. इतक्या लहान वयात दिल्या गेलेल्या एंटीबायोटिक्स च्या पूर्ण कोर्स ने त्याच्या पोटाची पार वाट लागली होती. पचन बिघडले होते. अजूनही लिहिण्यासारख्या बरयाच गोष्टी आहेत पण वेळे अभावी शक्य होत नाहीये.

In reply to by पक्या

इथे बाळांना साध्या सर्दी खोकल्यासाठीच काय पण जोवर रक्ताचा किंवा मेंदूतील पाण्याचा रिपोर्ट येत नाही तोवर मेनिन्जायटीससारख्या गंभीर रोगासाठी सुद्धा एंटीबायोटिक्स चालू करीत नाहीत.कारण समोरचा रुग्ण हा आपल्याला कोर्टात खेचणार आहे हे गृहीत धरूनच अमेरिकेत डॉक्टर काम करीत असतात. तेथील डॉक्टर आणि रुग्ण यांचे नाते परस्पर अविश्वासावर आधारलेले आहे. आणि आपल्या बाळाला सर्दी झाली असेल आणि आपण जर बालरोग तज्ञाला दाखवायला गेलात तर त्याची फी १००( ते ३००) डॉलर. रक्त इ च्या तपासण्याचे शंभर आणि औषधांचे शंभर डॉलर असे तीनशे ते पाचशे डॉलर आपल्या खिशातून जातातं. म्हणजे साधी सर्दी अमेरिकेत सहा ते तीस हजार रुपयाला पडते. आपली कंपनी आरोग्याविम्याचे पैसे भरत असल्याने त्याची आपल्याला झळ पोहोचली नसावी पण आपला विमा नसेल तर? पाचशे डॉलर हे एका इंजिनियरच्या तीन दिवसांचा पगार असतो(सामान्य माणसांची गोष्टच सोडा). जर एक रुग्ण भारतात दहा हजार रुपये देणार असेल तर येथील बाल रोग तज्ञ तुमच्याशी अर्धा तास बोलेल आणि एक तास तुमच्या मुलाला खेळवेल सुद्धा. सारांश अमेरिकेची आणि भारताची अशी तुलना चुकीची आहे. बाकी एखादा डॉक्टर उद्धट आहे, नीट बोलत नाही हा स्वभावाचा दोष आहे. त्याच्या कडे तुम्ही जाऊ नका.गोड बोलणार्या डॉक्टर कडेच जा. उद्धटपण अरेरावी यात पुणेरी दुकानदार कोणालाच हार जाणार नाही मग डॉक्टर काय चीज आहे.

In reply to by सुबोध खरे

>>>जर एक रुग्ण भारतात दहा हजार रुपये देणार असेल तर येथील बाल रोग तज्ञ तुमच्याशी अर्धा तास बोलेल आणि एक तास तुमच्या मुलाला खेळवेल सुद्धा. हे एकदम पटलं.

In reply to by सुबोध खरे

>>>> उद्धटपण अरेरावी यात पुणेरी दुकानदार कोणालाच हार जाणार नाही..... ह्या वाक्याची खरंच गरज आहे?

In reply to by प्रभाकर पेठकर

पुण्यातील एक नावाजलेले हॉस्पिटल व तेथील एक एलोपेथी चे नावाजलेले डॉक्टर। ह्यांच्याकडे वडिलांची ट्रीटमेंट चालु होती. डेक्कनच्या आसपास क्लिनिक आहे का त्यांचे? :) ;)

इंद्रजीतची कहाणी खूपच दुर्दैवी होती. पण काही जाणकार सदस्यांमुळे काही माहिती नव्याने कळते आहे. धन्यवाद. सर्वसाधारणपणे रुग्ण बरा झाला नाही तर डॉक्टर किंवा हॉस्पीटलवर खापर फोडून नातेवाईक मोकळे होतात आणि प्रसंगी मारहाणदेखील करतात. एका परिचितांच्या वडिलांना ते आयसीयूमध्ये असतांना मुलाच्या आग्रहामुळे बाहेर आणले आणि जंतूसंसर्ग होऊन त्यांचा मृत्यू झाला. अशा अनेक चुका हट्टी रुग्णदेखील करत असतात. सर्वसाधारणपणे डॉक्टर्स रुग्णाला वाचवण्याचे आणि बरे करण्याचे प्रयत्न प्रामाणिकपणे करत असतात असे वाटते. काही हपापलेले डॉक्टर्स असतात. नानाविध धंदे करून आणि रुग्णांच्या जीवाशी खेळून पैसे कमविण्याची त्यांची खुमखुमी खरंच धोकादायक असते. पण असे डॉक्टर्स फार जास्त नसावेत. आणि साती म्हणतात त्याप्रमाणे डॉक्टर अपयशी ठरत असतील पण गुन्हेगार नाही. कट-कमिशनची प्रथा तर कित्येक दशके चालू आहे. शेवटी तो ही एक व्यवसाय आहे. त्यामुळे व्यावसायिक अपप्रवृत्ती त्या व्यवसायात असणारच...

In reply to by समीरसूर

पण आजकाल बऱ्याचश्या रुग्णालयात चालू झालेली प्रथा अनुभवली - साध्या वार्डात जागा नाही असे दाखवून नवीन रुग्णास थेट आय सी यु मध्ये ठेवतात. माझ्या वडिलांना तसे ठेवले गेले. मी डॉक्टरना सांगितले कि गरज नसताना ठेवले आहे तर आय सी यु चे पैसे तरी लावू नका. तुम्ही फक्त आय सी यु चा पलंग वापरत आहात तेथील विशिष्ठ सेवांचा वडिलांना काहीच उपयोग होत नाही आहे. पण डॉक्टरांनी ऐकून न ऐकल्यासारखे केले आणि शेवटी आय सी यु चेच पैसे लावले.

अवांतर होइल हा प्रतीसाद खरं तर, पण वर जे doctor लोकांनी सांन्गितलय की इतर प्याथी (कस लिहायच कळत नाहीये) वाले आता नेह्मीच्या डाक्टरांची औषधे देउ शकतात. पण या विरुध्ध कोणी आवाज नाही का उठ्वू शकत? जसे तुम्ही डाक्टर लोक. (आता प्रत्येक औषध १० वेळा विचार करुन घेतल पाहिजे. खास करुन लहान मुलांना देताना. )

माझा मुलगा ६ दिवसांचा असताना त्याला रोज तपासायला येणार्‍या डॉक्टरला त्याच्या छातीमधुन "मर्मर" ऐकु आली. म्हणुन त्याने ताबडतोब त्याचा २ डी इको करायला सांगितलं. दुसर्‍या दिवशी सकाळी ६ ला मुंबईला जाताना रस्त्यात थांबुन आमच्या बाळाची तपासणी करायला एक लहान मुलांचे हृदयरोग तज्ञ मिळाले. त्यांनी सांगितलं की मुलाला TAPVC हा आजार आहे. ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल. त्यानंतर मला रोज तो किती दुध पितो हे लिहुन ठेवायला सांगितलं होतं.. सिरिंजनी.. बळजबरी.. तो ५-६ एम्.एल दुध प्यायचा. ९व्या दिवशी त्याला दुसर्‍या हॉस्पिटल मध्ये नेलं आणि NICU मध्ये अ‍ॅडमीट केलं.. तिथं ते त्याला वेगळी ट्रिट्मेंट अशी काही देत नव्हते..पण तो सुरक्षित वातावरणात होता. मी त्याला रोज जाऊन १० मिनिट भेटायचे.. त्यात मला असं जाणवत होतं की माझा मुलगा हळुहळु माझ्या पासुन दुर चालला आहे.. त्याच्या हालचाली मंदावल्या होत्या.. जास्त करुन झोपेतच असायचा.. जागा असला तरी निर्जीव डोळ्यांनी एकटक कुठेतरी बघत असायचा.. हाडं दिसत होती.. दुध फारसं प्यायचा नाहीच.. ओठ घट्ट मिटुन घ्यायचा.. पायावर टिचकी मारली तरी रडायचा नाही.. कदाचित रडण्याचे कष्ट त्याला सहन होत नव्हते.. त्यापेक्षा तो ती टिचकी सहन करायचा.. NICU मध्ये ठेवुन बहुदा डॉक्टर त्याची प्रतिकारशक्ती वाढायची वाट पहात होते.. पण मला जे जाणवत होतं ते बाकी कुणाला का जाणवत नव्हतं ते माहित नाही.. साधारण मुलगा १५ दिवसाचा असताना मी एक दिवस त्याला भेटायला गेले तेव्हा त्याच वेळी त्याचे डॉक्टर (बालरोगतज्ञ) त्याला तपासायला आले.. कुठल्या तरी आंतरिक उर्मीनी मी त्यांना सांगितलं की मला मुलाला इथे ठेवायचं नाही, जिथे ऑपरेशन करायच असेल तिथे न्यायचं आहे.. डॉक्टरांना बहुदा हे आवडलं नाही.. "तुमचा मुलगा इथे सुरक्षित हातात आहे मॅडम.." "असेल.. पण तुम्ही त्याचं ऑपरेशन करणार आहात का? मग सर्जनला पाहु द्या..जर ते म्हणाले की अजुन थांबा तर मी खर्च सहन करायला तयार आहे.. पण जर ते म्हणाले की वेळ निघुन गेली तर??" का कोण जाणे पण मला त्याचा हृदयरोग तज्ञावरही विश्वास नव्हता.. त्यामुळे मी कुणाचच ऐकायला तयार नव्हते.. मला या सगळ्यातलं काय समजतय असा डॉक्टरांचा चेहरा झाला असेल.. किंवा मी आततायीपणा करतेय असंही त्यांना वाटलं असेल.. पण मला माझा मुलगा तातडीनी मुंबईला न्यायला हवा होता.. माझा अवतार पाहुन मुलाला ताबडतोब मुंबईला हलवलं.. तिथुन पुढे अ‍ॅम्बुलन्स, सर्जन, हॉस्पिटल सगळं काही हृदयरोग तज्ञाच्या सल्ल्या प्रमाणेच चालु होतं (अर्थात आम्ही सगळ्या गोष्टींची १०० वेळा चौकशी करुन ठेवली होतीच..) जेव्हा आम्ही कॅशलेस वापरुन ऑपरेशन करणार आहोत असं कळालं तेव्हा हृदयरोगतज्ञाने आधी कॅश भरावी लागेल, नाही तर मुलाला ऑपरेशन टेबलवर घेता येणार नाही असं सांगितलं.. मी त्याला फोन करुन असं का म्हणुन विचारलं तर इन्शुरन्सचा काही भरवसा नसतो असं म्हणे.. "डॉक्टर.. तुम्ही हॉस्पिटले केशिअर आहात का? तुम्ही माझ्या मुलाकडे लक्ष द्या.. तो जेव्हा ऑपरेशन टेबल वर जाईल तेव्हा २.५ लाख रुपये तुम्हाला मिळालेले असतील.. ती माझी जवाबदारी आहे.." गंमत म्हणजे हा माणुस माझ्या मामाच्या हॉस्पिटलमध्येही येतो.. ह्याच मामाचे इन्शुरन्स वाल्या कंपनीच्या मालकाशी मैत्रीचे संबंध आहेत.. आणि पैशाचा काही प्रॉब्लेम झाला तर सगळी रक्कम मी देईन असं मामानी त्याला सांगुनही हा मला असं बोलत होता.. बाकी गरीब पेशंटच काय होत असेल? मुलाला नेल्यावर मला सांगितलं की २-३ दिवसात होईल ऑपरेशन.. तुम्ही ऑपरेशन च्या दिवशी या.. नवर्‍यानी रक्तपेढीत रक्त देण्या बद्द्ल विचारलं तर म्हणे की मुलाचा रक्तगट जो असेल त्या रक्त गटाचे २ जण असु दे.. ते देतील मग रक्त भरुन.. म्हणुन आम्ही पण निवांत राहीलो.. मुलगा दुपारी मुंबईला पोहोचला.. मला रात्री ८ ला फोन आला.. "उद्या सकाळी ८ ला ऑपरेशन आहे.. तुझं रक्त आवश्यक आहे.. ताबडतोब निघ.." झालं असं होतं की जेव्हा मुलाला सर्जननी तपासलं तेव्हा त्यांनी दुसर्‍या दिवशीचं वेळापत्रक बदलुन मुलाला सकाळी ताबडतोब ऑपरेशनला घ्यायला सांगितलं.. आणि एवढ्या लहान मुलाला आईचं रक्त तपासुन मग त्याच्याशी जुळणार रक्त द्यावं लागतं .. त्यामुळे त्याचा न माझा रक्त गट वेगवेगळा असला तरी माझं रक्त आवश्यक होतं.. एवढ्या साध्या गोष्टी हृदयरोगतज्ञाला कळाल्या नाहीत.. रात्रि तातडीनी भाऊ आणि एक मित्र ह्यांना सोबत घेउन, हाताला लागेल ते सामान भरुन, मी आणि आई कारनी निघालो.. १ ला पोहोचलो आणि रक्त दिलं.. दुसर्‍या दिवशी ऑपरेशन झालं.. सर्जन म्हणाले की मुलगा थोडक्यात वाचला.. अजुन १२ तासानी आला असतात तर आम्ही काही करु शकलो नसतो.. (आणि आमचा हृदयरोगतज्ञ म्हणत होता की २-३ दिवस नाही होणार ऑपरेशन..) शिवाय कॅशलेस नी ऑपरेशन झालं.. काहीही त्रास झाला नाही.. इथवर मी धीर धरुन होते.. ऑपरेशन नंतर सर्जननी अतिशय संयत शब्दात माहिती दिली.. नंतर आम्हाला हृदयरोगतज्ञ महाराज भेटले.. त्यांनी एखाद्या हिंदी पिक्चरची स्टोरी सांगावी तसं वर्णन सुरु केलं.. "मग आम्ही छातीवर कट घेतला.. असं रक्त उडालं.. ब्लडप्रेशर एकदम डाऊन.. असल्या ब्लडप्रेशवर तर चिमणी पण जगत नाही....पण तुमचा मुलगा जगला.. झालय ऑपरेशन नीट.. आता अजुन २-३ होल्स आहेत आत मध्ये.." "काय?????? त्याच्या छातीत होल्स पण आहेत..??? मग आताच का नाही त्याचम पण ऑपरेशन केलं???" "तसं नसतं करता येत.." आता मी खरी घाबरले.. नक्की झालय काय माझ्या मुलाला हे कळेना.. पुढे माझ्या लक्षात येऊ लागल्म की अतिरेकी बोलणं हा त्याचा स्वभावच आहे.. बाकी डॉक्टर जेव्हा शांत असतात तेव्ह हा घाबरवुन सोडतो आणि भविष्यात अजुनही महागड्या चाचण्या कराव्या लागतील अशी प्रस्तावना सुरू करतो.. पुढेही ह्या माणसाचा हपापलेपणा सतत दिसत राहिला.. १० इनिटात इको करुन २ मिनिटात औषध देणे एवढाच काय ते तो करायचा.. "माझ्याच हॉस्पिटलमध्ये या.. खुप चाचण्या कराव्या लागतील.." असं म्हणायचा.. मी शेवटी हृदयरोगतज्ञ बदलला.. आता ज्या मॅडम आहेत त्या १/२ तास नीट चर्चा करतात. मुलगा काय खातो.. रुटीन काय आहे, सवयी काय आहेत हे पहातात. कधी रागवतात, चिडुन चिडुन शिव्या घालतात की मुलांना नीट खाऊ घाला... फालतुच्या काही तपासण्या सांगत नाहित.. आणि ज्या सांगतात त्या नक्कीच महत्वाच्या असतात करण त्या कुठेही करा त्यांना फरक पडत नाही, त्यांना रिपोर्ट महत्वाचा असतो.. मला ह्या प्रसंगात ४ डॉक्टर भेटले.. ज्यानी माझ्या मुलाच्या छातीतमी मर्मर डिटेक्ट केली.. ज्यानी हा रोग शोधला.. हृदयरोगतज्ञ ज्यानी हे ऑपरेशन केलं... ज्या सध्या माझ्या मुलाची हृदयरोगतज्ञ म्हणुन काळजी घेत आहेत.. त्यातला एक मुर्ख माणुस सोडला तर बाकी ३ जण माझ्या आयुष्यातले फार महत्वाचे लोक आहेत.. ज्यांनी मुलाचं ऑपरेशन केलं ते तर देव आहेत माझ्या साठी... ज्या बालरोगतज्ञांना मी हटकलं होतं ते आज माझ्या मुलाचे नेहमीचे डॉक्टर आहेत.. त्यांना कदाचित तेवढा अंदाज आला नव्हता माझ्या मुलाच्या तब्येतीचा, पण डॉक्टरही माणुसच आहे.. त्यांचा नुभव नसेल कदाचित एवढा.. पण बाकी ते उत्तम डॉक्टर आहेत.. पण हृदयरोगतज्ञ- त्याला मी माफ करु शकत नाही.. त्याने जे केलं तो हपापलेपणा आणि हलगर्जी होती.. त्यात माझ्या मुलासाठी काहिही काळजी नव्हती.. सरतेशेवटी माझं मत असं झालय की सरसकट सगळेच डॉक्टर वाईट नसतात.. आपल्याला फार कमी कळत असतं डॉक्टरकी मधलं. त्यामुळे लगेच निष्कर्ष काढणं चुक.. शक्यतो आपल्या डॉक्टरवर मनापासुन विश्वास टाकावा. पण माणुस कसा आहे ते आपण ओळ्खायच असतं.. अनेकद हे गट फिलिंग खुप उपयोगी असतं.. डॉक्टरला माणुस म्हणुन पारखुन घेतलं की मग एक डॉक्टर म्हणुन त्याच्यावर निर्धास्त अवलंबुन रहावे.. स्वतःचे डोके चालवु नये.. पण माणुस चुकीचा आहे असं वाटायला लागलं तर मात्र जरुर पाऊल उचलावे.. (लेखा पेक्षा प्रतिसाद मोठा झालाय.. पण आज रहवलं नाही...)

In reply to by पिलीयन रायडर

>>डॉक्टरला माणुस म्हणुन पारखुन घेतलं की मग एक डॉक्टर म्हणुन त्याच्यावर निर्धास्त अवलंबुन रहावे.. स्वतःचे डोके चालवु नये.. पण माणुस चुकीचा आहे असं वाटायला लागलं तर मात्र जरुर पाऊल उचलावे.. हे लाख बोललात.

In reply to by सूड

अवैज्ञानिक असला तरी पिरा तुझे हे वाक्य फार महत्त्वाचे आहे. डॉक्टर चांगला आहे आणि आपली त्याला काळजी आहे हे एकदा रूग्णाला जाणवले की आपोआप पुढच्या गोष्टी सुकर होतात. तो/ ती रागावली तरी आपल्या भल्यासाठी हे जाणवायला लागतं.

In reply to by पिलीयन रायडर

भयानक अनुभवातून गेलात तुम्ही. तरी तुमची प्रतिक्रिया खूपच संयत आहे. [तुरुंगवासातून सुटल्यावर वुडहाऊसला एकदा विचारलं होतं - डू यू हेट जर्मन्स? तो म्हणाला - आय डोंट हेट इन प्लूरल्स. त्याच्या मॅच्युरिटीचं कौतुक वाटलं होतं. आज तुमच्याबद्दल तेच वाटतंय.]

In reply to by आदूबाळ

संयत वगैरे आता हो.. १.५ - २ वर्षापुर्वी जेव्हा हे घडलं तेव्हा मी डोळ्यात रक्त आणुन.. खुन्नस देऊन.. जळजळीत कटाक्ष टाकुन.. टोमणे मारुन त्या डॉक्टरला घाबरवुन सोडला होता.. "माझं पोरगं नाही वाचलं तर तु मेलास.." वगैरे लुक मी त्याला दिले होते.. म्हणजे रुग्णाला काही झालं तर डॉक्टरला मारा असं मी म्हणत नाहीये पण जर सर्जननी प्रय्त्न करुनही मुलगा नसता वाचला तर मी ते सहन केलं असतं, कारण मला त्या माणसावर विश्वास आहे.. पण वेळेल्त गेलो नाही म्हणुन मुलाला काहि झालं असतं तर डॉक्टरचा निष्काळजीपणा म्हणुन मी सटकले असते हे खरच.. परिस्थिती किती गंभीर आहे हे हृदयाच्या डॉक्टरला कळायला हवचं.. त्यासाठी मी बालरोगतज्ञाला माफ करेन.. हृदयरोगतज्ञाला नाही..