✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

डॉक्टरांच्या हलगर्जीपणाबद्दल :

म
म्हैस यांनी
Wed, 03/05/2014 - 18:23  ·  लेख
लेख
एक ३२ वर्षांचा तरुण छोटंसं kidney stone removal चा operation करायला जातो आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यूला प्राप्त होतो. किती भयानक आहे हे. पुण्याला law college रोड वर असणार्या Prime Surgical Hospital (PSH) च्या डॉक्टरांनी हि कमाल केली आहे . इंद्रजीत चव्हाण पोटाच्या वर डाव्या बाजूला ला kidney stone removal चा ओपेरशन झाला. शुद्धीवर आल्यावर तो उजव्या बाजूला दुखत आहे असं सांगत होता पण डॉक्टरांनी काही नाही operation मुले दुखतंय असं सांगून पेन किलर दिलं. कोणीही नर्स किवा डॉक्टर त्याच्याजवळ थांबायला तयार नवते . अंतर्गत रक्तस्त्रावामुळे त्याच्या हृधायापर्यंत रक्त पोचणं बंद होवून हृदय बंद पडून त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. डॉक्टरांना जबरदस्तीने बोलवून अन्यालाव त्यांनी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये न्यायला सांगितला. पण दुर्दैव असं कि Prime Surgical Hospital मध्ये अम्बुलन्स पण नवती . दिनानाथ मंगेशकर मध्ये न्यायला त्याला तब्बल ५० मिनिटे लागली. तिथे पोचल्यावर पुन्हा त्याच्यावर दुसरं ओपेरतिओन करण्यात आलं. डॉक्टरांनी बाहेर आल्यावर त्याच्या नातेवैकांना काय दाखवलं असेल तर त्याची काढलेली किडनी ... त्यानंतर १० मींनिटातच इंद्रजीत चा मृत्यू झाला. किडनी काढण्याआधी न कोणाला विचारण्यात आलं न कोणाला काही सांगण्यात आलं. पोलिसांनी operation चा video बघितला तर त्यातलं ९ मिन्तांचा विदेओ करप्ट झालेला आहे. अतिशय गरिबीतून , अतिशय कष्टाने वर आलेला इंद्रजीत. विदर्भातल्या गरीब मुलांच्या शिक्षणासाठी झटणारा इंद्रजीत. त्याची पत्नी , आई , लहान भाऊ कोलमडून पडले आहेत . त्याला १ लहान मुलगा आहे. हा सगळा लेखन प्रपंच करण्याचा उद्देश एवढाच कि लोकांमध्ये जागृती करणे. आपला स्वतःच किवा कुटुंबातल्या कोणाचं छोटंसं जरी ओपेरशन असेल तरी काही गोष्टी डॉक्टरांशी बोलून clear कराव्यात. अम्बुलन्स, blood बँक सारख्या सुविधा आहेत का नाही हे बघावं. नसेल तर रिस्क घेवू नये .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
47651 वाचन

💬 प्रतिसाद (181)

प्रतिक्रिया

मूळ धाग्यातल्या घटनेबाबत दु:ख

आतिवास
Fri, 03/07/2014 - 15:50 नवीन
मूळ धाग्यातल्या घटनेबाबत दु:ख वाटले. प्रतिसादातून साती, खरे, आनंदी गोपाळ या डॉक्टर मंडळींनी मोलाची भर घातल्याबद्दल त्यांचे आभार. चर्चा वाचतेय आणि नोंद घेते आहे.
  • Log in or register to post comments

वाईट प्रसंग :(

दिव्यश्री
Fri, 03/07/2014 - 15:50 नवीन
http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=437910&boxid=11537921&pgno=1&u_name=0
  • Log in or register to post comments

थोडेफार...

विकास
Fri, 03/07/2014 - 22:49 नवीन
वर एका प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे मूळ प्रस्तावातील प्रसंग अतिशय दुर्दैवी आहे. सर्व प्रतिसाद वाचले असले तरी (साती म्हणाल्या तशी गुन्हेगारी नसेल कदाचीत पण) डॉक्टर आणि वैद्यकीय व्यवस्थेतील मर्यादा जाणवल्या असेच वाटते. कधीकाळी वाचलेले अरूण लिमयेंचे क्लोरोफॉर्म, लाख मोलाचा जीव ते रॉबीन कुकचे कोमा आणि इतर अनेक घटना वाचताना असे नक्की वाटते की अजून बरीच सुधारणा होण्याची गरज आहे. मला स्वतःला भारतातील डॉ़क्टर्सचे चांगले अनुभव आले आहेत. फक्त लहानपणी एका डेंटीस्टकडचा अनुभव सोडल्यास! माहीतीतील एका व्यक्तीस विषबाधा (खरे विष) झाली होती. असे प्रकार अनेकदा खाजगी रुग्णालयात घेत नसल्याने त्या व्यक्तीस सरकारी इस्पितळात न्यावे लागले होते. प्रसंग गंभीर होता, पण त्यातून त्या व्यक्तीस सहीसलामत बाहेर काढल्याचे पाहीले आहे. त्याच बरोबर याच सरकारी इस्पितळात चांगले तज्ञ-उपचारपद्धती असताना देखील एका भाजलेल्या व्यक्तीस खाजगी रुग्णालयात नेल्याने प्राण गेलेला पण दुर्दैवाने पहायला लागले आहे. तरी देखील सर्व डॉक्टर्स म्हणजे हजाम असे म्हणणार नाही. परीस्थिती किंबहूना त्याच्या बरोब्बर विरुद्ध आहे असेच म्हणेन. असो. भारतीय डॉ़क्टर्सना अमेरीकेत देखील मान असलेला पाहीला आहे. वर चर्चेत अमेरीकेसंदर्भात काही भाग आलेला दिसला त्या संदर्भात थोडक्यात आता अमेरीकेत वीमा सर्वांनाच सक्तीचा केला गेला आहे (ओबामाकेअर असे त्याला त्याचे विरोधक उपरोधाने म्हणतात पण आता तेच नाव पडले आहे!). तसे होण्याच्या आधी देखील ज्यांच्याकडे वीमा नसेल अथवा मर्यादीत वीमा असेल अशांना देखील इमर्जन्सी असल्यास कुठ्ल्याही हॉस्पीटलला कायद्याने अ‍ॅडमिट करून ट्रीटमेंट द्यावी लागते. इथे देखील चुका होतात. श्रीदेवीच्या आईच्या मेंदूचे ऑपरेशन हे चुकीच्या भागात केल्याची (कु)प्रसिद्ध गोष्ट या निमित्ताने आठवली. पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे - इथे असलेली व्यवस्था. तंत्रज्ञान म्हणून म्हणत नसून एकूण "लाख मोलाचा जीव" समजणे आणि तसे वागणे. हे डॉ़क्टर्सच नाही तर एकूण व्यवस्थेकडून होते. (अर्थात अपवाद आहेत). मला खरेच कल्पना नाही, म्हणून विचारत आहे... इथे लिहीत असलेल्या डॉक्टर्सना प्रश्न - आपल्याकडे अशा पद्धतीचे ट्रेनिंग दिले जाते का? नुसतेच डॉक्टर्सना नाही तर वॉर्डबॉय पासून वैद्यकीय व्यवस्थेतील प्रत्येक व्यक्तीस? त्यात नुसते तंत्रज्ञानच येत नाही तर वैद्यकीय सेवेसाठी लागणारी वेगळीच हॉस्पिटॅलीटी देखील येते ज्याचा सकारात्मक परीणाम रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांवर होऊ शकतो. अजून एक मुद्दा: मला वाटते आता अमेरीकेत सर्वत्रच फार्मा आणि तत्सम कंपन्यांकडून साधा चहा घेण्यावर डॉक्टर्सना बंदी आहे. आपल्याकडे डॉक्टर्सच्या ज्या कॉन्फरन्सेस निमित्ताने परदेशवार्‍या चालतात त्यात मिंधेपणा होतो असे वाटते का? (परत अपवाद आहेत जे अशा गोष्टींना बळी पडणार नाहीत...)
  • Log in or register to post comments

पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे -

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 03/08/2014 - 23:19 नवीन
पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे - इथे असलेली व्यवस्था. तंत्रज्ञान म्हणून म्हणत नसून एकूण "लाख मोलाचा जीव" समजणे आणि तसे वागणे. हे डॉ़क्टर्सच नाही तर एकूण व्यवस्थेकडून होते. अमेरिकन वैद्यकिय सेवा जगात आदर्श मानली जात नाही. हे वाचायला विचित्र वाटेल. अनेक दशके हा विषय सतत वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्रात चर्चेत आहे. अनेक तज्ञांनी वैद्यकीय क्षेत्रात विश्वासू समजल्या जाण्यार्‍या जर्नल्समध्ये आलेल्या लेखांमधिल माहिती हेच सांगते. वर डॉ खरेंनी म्हटल्याप्रमाणे अमेरिकन वैद्यकिय सेवा ही रुग्ण-डॉक्टर यांच्या परस्पर अविश्वासावर आधारित आहे. त्यामुळे रोगी आपल्यावर खटला भरणार आणि ते शक्य होऊ नये यासाठी सर्व काळजी घेणे हा डॉक्टरच्या व्यवसायाचा एक अविभाज्य घटक आहे. यावरून तेथे "डिफेन्सिव्ह मेडिसिन" असा वाक्प्रचार तयार झाला आहे. कारण एकदा खटला भरला गेला आणि विषेशतः तो हरला तर डॉक्टरच्या व्यवसाय विम्याचा हप्ता इतका वाढतो की डॉक्टरकी सोडून इतर व्यवसाय करणे आर्थिकदृष्ट्या जास्त परवडणारे असते. अर्थातच हे टाळण्यासाठी जर डॉक्टरने कायद्यात बसणार्‍या ग्राहकांच्या बाजूच्या तरतुदींपासून बचावण्यासाठीच्या सर्व खबरदारी घेण्याला आणि डॉक्टरच्या बाजूने असलेल्या सर्व कलमांचा पुरेपूर वापर करण्याला प्राथमिकता दिली तर आश्चर्य काय? मात्र या सर्वामुळे कायद्याने डॉक्टर केवळ एक सेवादाता बनला आहे आणि त्याला अतिगौरवित नीतिमत्तेच्या (glorified morals) आधारवर वेठीला बांधण्याचा अधिकार अमेरिकन रुग्णांनी गमावलेला आहे आणि तेथे कांगावा काम करत नाही, कोर्टात तर नाहीच. हे अमेरिकन रुग्णसुद्धा जाणून आहेत, यात परदेशांतून तेथे स्थलांतरीत झालेले रुग्णही आलेच. याचा सर्वात जास्त परिणाम वैद्यकीय सेवा आश्चर्यकारकरित्या महागडी होण्यात झाला आहे आणि ती अमेरिकन सरकारला डोईजड झालेल्या अनेक खर्चांपैकी एक आहे. ओबामाकेअरला झालेल्या विरोधात हे प्रमुख कारण होते. आजही ओबामा केअर जमेस धरूनही (साधारण गैरसमजाविरुद्ध) सर्व अमेरिकन नागरिकांना वैद्यकिय विम्याचे संरक्षण नाही... येथे (McKinsey: Only 14% Of Obamacare Exchange Sign-Ups Are Previously Uninsured Enrollees) त्याबाबतितली ताजी (८ मार्च २०१४) माहिती वाचायला मिळेल. येथे अनेक विश्वासू वैद्यकीय जर्नल्समधिल दुवे देवून लिहीलेली महिती मिळेल. दुवा मोठा आणि माहितीपूर्ण आहे. वैद्यकीय व्यवस्थापनात रस असणार्‍यांनी मुळातून वाचवा. खाली फक्त दोन महत्वाचे मुद्दे आहेत... Efficiency Preventable deaths ...Between 1990 and 2010, among the 34 countries in the OECD, the US dropped from 18th to 27th in age-standardized death rate. The US dropped from 23rd to 28th for age-standardized years of life lost. It dropped from 20th to 27th in life expectancy at birth. It dropped from 14th to 26th for healthy life expectancy.[4] According to a 2009 study conducted at Harvard Medical School and published by the American Journal of Public Health, lack of health coverage is associated with nearly 45,000 excess preventable deaths annually.[8][82] Since then, as the number of uninsured has risen from about 46 million in 2009 to 48.6 million in 2012, the number of preventable deaths due to lack of insurance has grown to about 48,000 per year.[9] Value for money A study of international health care spending levels published in the health policy journal Health Affairs in the year 2000 found that the United States spends substantially more on health care than any other country in the Organization for Economic Co-operation and Development (OECD), and that the use of health care services in the U.S. is below the OECD median by most measures. The authors of the study conclude that the prices paid for health care services are much higher in the U.S. than elsewhere.[83] While the 19 next most wealthy countries by GDP all pay less than half what the U.S. does for health care, they have all gained about six years of life expectancy more than the U.S. since 1970.[63] हे एक दशकापूर्वीचे आकडे दरवर्षी अधिकधीक डोईजड होत आहेत. दर अमेरिकन बजेटमध्ये हा खर्च कसा भागवायचा याची चिंता असते पण उपाय दृष्टीपथात नाही. ओबामाकेअरने हा खर्च अधिकच वाढवला आहे. Preventable medical errors are the third-leading cause of death in the US हा लेखही डोळे उघडणारा आहे. american healthcare या शब्दांनी गुगलल्यास अधिक माहिती मिळू शकेल. मेडिक टूरीझम हा अनेक बिलीयन डॉलरचा व्यवसाय केवळ पाश्चिमात्य वैद्यकिय सेवा महाग आहे या एकाच कारणावर आधारलेला नाही. पण विस्तार आणि अवांतरभयास्तव त्याबद्दल येथे इतकेच पुरे. वैद्यकिय सेवेच्या बाबतीत सद्या स्कँडिनेव्हियन देशांतील व्यवस्थापन स्पृहणीय समजली जाते. या प्रतिसादाचा उद्येश भारतातील वैद्यकिय व्यवसायाची बाजू घेण्यासाठी नाही तर भारतिय आणि अमेरिकन सेवा दोन्हीं बाजूंबद्दलचे बरेचसे प्रतिसाद "एखाद्या वैयक्तीक अनुभवाच्या सरसकटीकरणावर" आणि "तज्ञाच्या मतापेक्षा केवळ सर्वसामान्य वैयक्तिक आकलनावर" आधारलेले आहेत असे वाटते. यात बर्‍याच प्रमाणात समजुतीचे घोटाळे असू शकतात. उदाहरणार्थः एखाद्या औषधाची अ‍ॅलर्जी कोणाला आणि किती प्रमाणात येईल ते सांगणे शक्य नसते. अश्या अगदी एकसारख्या केसेस मध्ये खालचे दोन्ही अनुभव नोंदले गेलेले आहेतः १. रुग्णाचे समजूतदार नातेवाईक आणि/किंवा त्यांचा विश्वास संपादन करू शकणारा डॉक्टर असल्यासः "डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले पण आपलेच नशीब खराब होते." २. रुग्णाचे तितकेसे समजूतदार नसणारे नातेवाईक आणि/किंवा त्यांचा विश्वास संपादन न करू शकणारा डॉक्टर असल्यासः "डॉक्टराने धडधाकट माणसाला मारले की हो." वैद्यकिय क्षेत्रासारख्या गुंतागुंतीच्या शास्त्रातील सेवेबद्दल दोन्ही बाजू शास्त्रिय पद्धतिने समजावून घेतल्याशिवाय तडक निवाडा करणे (दोन्ही बाजूंसाठी) अन्यायाचे होईल असे वाटते. केवळ म्हणूनच हा लेखनप्रपंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

माझ्या प्रतिसादात मी खालील

विकास
Mon, 03/10/2014 - 19:36 नवीन
माझ्या प्रतिसादात मी खालील दोन मुद्दे मांडले होते. दुद्रैवाने त्याचे उत्तर मिळालेले नाही... मला खरेच कल्पना नाही, म्हणून विचारत आहे... इथे लिहीत असलेल्या डॉक्टर्सना प्रश्न - आपल्याकडे अशा पद्धतीचे ट्रेनिंग दिले जाते का? नुसतेच डॉक्टर्सना नाही तर वॉर्डबॉय पासून वैद्यकीय व्यवस्थेतील प्रत्येक व्यक्तीस? त्यात नुसते तंत्रज्ञानच येत नाही तर वैद्यकीय सेवेसाठी लागणारी वेगळीच हॉस्पिटॅलीटी देखील येते ज्याचा सकारात्मक परीणाम रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांवर होऊ शकतो. अजून एक मुद्दा: मला वाटते आता अमेरीकेत सर्वत्रच फार्मा आणि तत्सम कंपन्यांकडून साधा चहा घेण्यावर डॉक्टर्सना बंदी आहे. आपल्याकडे डॉक्टर्सच्या ज्या कॉन्फरन्सेस निमित्ताने परदेशवार्‍या चालतात त्यात मिंधेपणा होतो असे वाटते का? आपले (भारतातील) डॉ़क्टर्स हे फार्माकंपन्यांकडून आणि तत्सम इतर उद्योगांकडून भेटवस्तू घेत नाहीत असे म्हणायचे आहे का? त्यातून कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट तयार होत नाही असे म्हणायचे आहे का? आपल्याकडे फुकाचे टेस्टींग, ट्रीटमेंट करायला लावणार्‍यांच्या चेन्स नसतात असे म्हणायचे आहे का? कधीकाळी झालेले जेजे हत्याकांड (इंडस्ट्रीयल ग्लिसरीनचा औषधी वापर) हा केवळ अपवाद आहे असे म्हणायचे आहे का? आत्ता याच धाग्यात एक प्रतिसाद वाचला की असे इतर पेशातही होते... पण म्हणून त्या चूका पण प्रकाशात आणायच्या का जीवावर बेतणार्‍या या चुकांना झाकायचे? मला पूर्ण आदर राखून असे म्हणायचे आहे की इथले डॉक्टर्स जणू काही स्वत:वर टिका केली आहे असे घेऊन डिफेन्स करत आहेत. त्याची काही गरज नाही असे वाटते. पण त्यांना देखील आपली व्यवस्था एकदम चिरेबंदी - अर्थात फूलप्रूफ आहे असे म्हणायचे आहे का? ------------ पुढचे सर्व इतर किंचीत अवांतर मुद्यांच्या संदर्भात आहे ---------- मी आधी देखील म्हणल्याप्रमाणे, भारतातील माझा व्यक्तीगत (त्यात जवळचे कुटूंबीय देखील आले) सुदैवाने डॉक्टर्सचा अनुभव चांगला आहे. अमेरीकेबाबत जर वैद्यकीय व्यवस्थेबद्दल बोलले तर ते कुठेतरी व्यक्तीगत घेतले जाते, मग अमेरीकेत खटले कसे होतात, वगैरे पर्यंतच दुर्दैवाने मर्यादीत चर्चा रहाते. केवळ अमेरीकेतील मेडीकल मालप्रॅक्टीस खटल्यांना घाबरून इथले डॉक्टर्स ट्रीटमेंट देतात असे म्हणणे म्हणजे आपल्याकडचे सरसकट सगळे डॉक्टर्स हे डॉक्टर्स नसून हजाम आहेत असे म्हणण्याइतकेच वरकरणी वाटते. हवे असल्यास अमेरीका हे नाव काढा आणि तेथे युके अथवा कॅनडा म्हणा, जेथे खर्‍या अर्थाने पब्लीक हेल्थ केअर सिस्टीम आहे.... तुम्ही मांडलेल्या अमेरीकेसंदर्भातील काही मुद्यांबद्दल किंचीतः आजही ओबामा केअर जमेस धरूनही (साधारण गैरसमजाविरुद्ध) सर्व अमेरिकन नागरिकांना वैद्यकिय विम्याचे संरक्षण नाही... अर्थातच नाही. हा विषय वेगळ्या चर्चेचा होऊ शकतो पण येथे त्या चर्चेत किती उत्साह असू शकेल याबद्दल शंका येते. इतके देत आहेत ते देखील आश्चर्य आहे. इतका खाजगी उद्योग, इन्शुरन्स कंपन्या, रिपब्लीकन्स आणि अगदी काही डेमोक्रॅट्सकडून याला विरोध आहे. तुम्हाला माहीत आहे का माहीत नाही, पण जनतेला हेल्थकेअर मिळणे गरजेचे आहे म्हणून असाच प्रयत्न नजीकच्या भूतकाळात तत्कालीन फर्स्ट लेडी हिलरी क्लिंटन हिने साधारण २१ वर्षांपूर्वी डेमोक्रेटीक मेजॉरीटी असलेल्या अमेरीकन काँग्रेस मधे असे विधेयक/धोरण आणायचा प्रयत्न केला आणि तो या डेमोक्रॅट्सनीच हाणून पाडला. यात केवळ मानवता हा दृष्टीकोन नाही. जेंव्हा वीम्या अभावी वैद्यकीय व्यवस्था उपलब्ध नसते तेंव्हा माणसे अंगावर आजार काढतात. मग शेवटी इमर्जन्सीमधे जावे लागते, जे कायद्याने पैसे-वीमा असोत नसोत, द्यावे लागते. मग शेवटी त्याचा भार हा मेडीकेअर/मेडीकेड या सरकारी फंडांवर आणि खाजगी हॉस्पिटल्सवर पडतो. त्या सर्व संदर्भात, इतक्या वर्षांनंतर ओबामाकेअर ही बदलाची निव्वळ सुरवात आहे. त्यात आता वार्षिक वैद्यकीय चाचणी एकाअर्थी सक्तीची केली आहे आणि त्याचा खर्च विम्यातच अंतर्भूत केलेला आहे. दुसरीकडे नुसतेच प्रिव्हेंटेटीव्ह मेडीसिन नाही तर आहार आणि व्यायाम या संदर्भातून देखील अनेक पॉलिसीज, लोकशिक्षण दिले जात आहे. ते नुसतेच सार्वत्रिक वीमा इतके मर्यादीत नाही. असो. वैद्यकिय सेवेच्या बाबतीत सद्या स्कँडिनेव्हियन देशांतील व्यवस्थापन स्पृहणीय समजली जाते. सहमत. पण या देशाची लोकसंख्या, आकार, देशाचे व्यवस्थापन, कायदेशीर-बेकायदेशीर स्थलांतरीत लोकसंख्या वगैरेचा विचार केल्यास अशी तुलना ही अ‍ॅपल टू ऑरेंज अशी ठरू शकेल. पण अमेरीका आणि भारत हे या प्रश्नांच्या संदर्भात बरेच समान आहेत म्हणून दोन्हीकडे absolute काय व्यवस्था आहेत हे बघण्यापेक्षा पुढे जात असताना स्वतःच्या चुका, करेक्टीव्ह अ‍ॅक्शन्स, देशाच्या म्हणून पॉलीसिज, वैद्यकीय व्यवस्थेतील (निव्वळ डॉक्टर्सचेच नाही) प्रशिक्षण, संशोधन आदी अनेक गोष्टी बघाव्यात असे वाटते. थोडक्यात आत्ता काय कमी-जास्त आहे यावर चर्चा करण्याऐवजी ट्रेंड काय आहे हे बघणे महत्वाचे वाटते. Preventable medical errors are the third-leading cause of death in the US हा लेखही डोळे उघडणारा आहे. हा खाजगी लेख आहे असे वाटले. पण एन आय एच (नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थ) ची वगैरे अधिकृत आकडेवारी तुम्ही म्हणता त्यापेक्षा फार वेगळी असेल असे वाटत नाही. अधिक संशोधन करून चर्चा करू शकेन. पण मुद्दा इतकाच आहे, की बदल काय हवेत, कुठे कमी पडतो आहोत हे येथे पाहीले जात आहे. आपण एक व्यवस्था आणण्यासाठी तसे करायला तयार आहोत का? तसे होत असल्यास चांगलेच आहे. येथे अवश्य सांगावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

१. डॉक्टरांना फार्मा /

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 03/10/2014 - 23:51 नवीन
१. डॉक्टरांना फार्मा / वैद्यकीय उपकरणे विकणार्‍या कंपन्यांकडून मिळणार्‍या भेटी, कॉन्फरन्सला जाण्यासाठी मिळणारी मदत इ बाबतीत सर्वच देशांत नेहमी चर्चा होते. हे प्रकरणाला वरवर वाटते त्यापेक्षा अनेक पदर आहेत... काही चांगले तर काही तद्दन वाईट.एक मात्र खरे की अमेरिकेत हे कायद्याने पूर्णपणे बंद आहे हा गैरसमज आहे. अमेरिकन मेडिकल असोसिएशनचा या संदर्भातला लेख इथे मुळातून वाचू शकाल. पण त्यातल्या सारांशाने दिलेल्या गाईडलाईन्स खालीलप्रमाणे आहेत. GUIDELINES FOR GIFTS FROM INDUSTRY TO PHYSICIANS The ethical considerations discussed above suggest several principles. 1. Any gifts accepted by physicians individually should primarily entail a benefit to patients and should not be of substantial value. Accordingly, textbooks, modest meals and other gifts are appropriate if they serve a genuine educational function. On the other hand, cash payments serve only the physician's personal interest and therefore should not be accepted from industry. A gift which is appropriate because of its contribution to patient care may become inappropriate because of its extravagance. Gifts of minimal value raise fewer concerns and are permissible as long as the gifts are related to the doctor's work (e.g., pens, diaries, books or rulers). 2. Gifts by drug companies to underwrite medical conferences or other professional meetings enhance the ability of academic institutions, professional associations and health care organizations to provide continuing education to physicians. Consequently, such gifts make an important contribution to patient care. Subsidies from industry should not be accepted to pay for the costs of travel, lodging or other personal expenses of physicians attending conferences or meetings, nor should subsidies be accepted to compensate for the physicians' time. Subsidies for hospitality should not be accepted outside of modest meals or social events held as a part of a conference or meeting. It is appropriate for faculty at conferences or meetings to accept reasonable honoraria and to accept reimbursement for reasonable travel, lodging and meal expenses. It is also appropriate for consultants who provide genuine services to receive reasonable compensation and to accept reimbursement for reasonable travel, lodging and meal expenses. Token consulting or advisory arrangements cannot be used to justify compensating physicians for their time or their travel, lodging and other out-of-pocket expenses. The giving of a gift directly to a physician from a company's sales representative may create a personal relationship that could influence the use of the company's products. Accordingly, when a company contributes funds for conferences that are sponsored by academic or other educational institutions, the funds should be given by the company to the conference sponsor who in turn can use the money to reduce the conference's registration fee. Payments to defray the costs of a conference should not be accepted directly from the company by the physicians attending the conference. 3. No gifts should be accepted if there are strings attached. For example, physicians should not accept gifts if they are given in relation to the physician's prescribing practices. 4. Sponsors of continuing medical education conferences have a special responsibility to ensure that gifts are appropriate. The Accreditation Council for Continuing Medical Education has adopted a number of useful guidelines to prevent industry funding for continuing medical education conferences from leading to undue influence by the companies: (a ) responsibility for and control over the selection of content, faculty, educational methods and materials should belong to the accredited sponsors of conferences, (b) presentations must give a balanced view of all therapeutic options, and (c) financial support must be acknowledged in printed announcements and brochures, but reference should not be made to specific products.17 The Task Force on Pharmaceutical Industry/CME Cooperation is currently developing an updated set of guidelines for industry funding of continuing medical education conferences. Some of these guidelines are appropriate for smaller educational meetings and in other educational contexts, for example, when companies support meetings or lectures for medical trainees. 5. Financial support for conferences should be disclosed publicly. Physicians will be able to evaluate the information presented to them more appropriately if they are aware that companies have contributed funds to defray the costs of the presentation. २. ओबामाकेअर : सर्व नागरिकांना वैद्यकिय सेवा सहज मिळावी याबाबत कोणाचेच दुमत असू नये. मात्र अमेरिकन वैद्यकिय सेवेचे फायदा-खर्च गुणोत्तर (बेनेफीट-कॉस्ट रेशो) हे फार खाली गेले आहे. त्यामुळे केवळ सेवेचा आवाका वाढवणे म्हणजे आधिकच कर्जाच्या ओझ्याने पिचलेल्या सरकारवर अधिक अनुत्पादक भर टाकणे आहे. हाच मुद्दा ओबामाकेअरचा विरोध करणार्‍यांचा (त्यात ओबामांच्या पक्षात असलेल्या नेत्यांचाही समावेश) होता/आहे. नुकत्याच ओबामाकेअरचा अभ्यासदौरा करून आलेल्या एका कार्यकारी अधिकार्‍याशी प्रत्यक्ष बोलणे झाले. ते सगळे सार्वजनिक रित्या सांगणासारखे नाही. मात्र अमेरिकन वैद्यकिय सेवेवर होणारा खर्च कमी करण्यात अनेक हितसंबंधांना होणार्‍या धोक्यांमुळे तो कमी करण्याचे प्रयत्न होत नाहीत हे उघड सत्य दोन्ही बाजूस माहित आहे ! त्यामुळे त्याबाबत फारसे होईल असे वाटत नाही. हा प्रकार काहीसा पीडीएस मधली गळती कमी करण्याऐवजी अजून एक अन्नसुरक्षा कायदा आणून प्रचंड गळक्या टाकीत अजून पाणी ओतण्यासारखाच प्रकार आहे असे तज्ञांचे म्हणणे आहे. आणि अमेरिका झाली म्हणून सगळ्याच गोष्टींना उघड विरोध करणे सोपे असते तर एवढी मोठी जागतिक आर्थिक आपत्ती (financial crisis) टळली असती. असो. ३. स्कँडिनेव्हियन वैद्यकिय सेवा: या देशांतिल वैद्यकिय सेवा "क्वालिटी" आणि "बेनेफिट-कॉस्ट रेशो" या दोन्ही बाबतित जागतिक आदर्श समजला जाते. याबाबतीत व्यवस्थापन शास्त्राचा सर्वसाधारण नियम तुमच्या मतापेक्षा वेगळा आहे. जेवढा देश लहान तेवढा "एकॉनॉमीज ऑफ स्केल"चा कमी फायदा मिळतो. म्हणजेच जास्त लोकसंख्येच्या देशात त्याच क्वालिटीची सेवा कमी किमतीत देणे शक्य होते... अर्थात जर उत्तम व्यवस्थापन, कमी राजकारण आणि कमी गळती असली तरच. ४. Preventable medical errors बद्दल संदर्भ म्हणून दिलेला लेख हे कोणाचेह खाजगी मत नाही: "बादवे माझा मूळ मुद्दाच खाजगी मतांचे सरसकटीकरण करू नये हा होता !" Preventable medical errors च्या दुव्याचा पहिला पॅराग्राफ असा आहे: In 1999, Americans learned that 98,000 people were dying every year from preventable errors in hospitals. That came from a widely touted analysis by the Institute of Medicine (IOM) called To Err Is Human. This was the “Silent Spring” of the health care world, grabbing headlines for revealing a serious and deadly problem that required policy and action. IOM ची ओळख "Established in 1970, the IOM is the health arm of the National Academy of Sciences, which was chartered under President Abraham Lincoln in 1863." अशी दिली जाते. ही एक जागतिक स्तरांवर मानली जाणारी, सल्ला देणारी आणि वैद्यकिय मानके तयार करणारी अमेरिकन संस्था आहे. सप्टेंबर १९१३ मध्ये अलेल्या या लेखात १९९९ मध्ये IOM ने प्रसिद्ध केलेल्या पहिल्या धक्कदायक निबंधानंतरही अनेक मान्यवर वैद्यकशास्त्रिय जर्नल्स मध्ये आलेल्या लेखांमध्ये परिस्थिती अजून कशी सुधारली नाही याबाबत विवेचन आहे. Preventable medical errors अशी गुगलविचारणा केल्यास तेथेही मान्यवर वैद्यकिय जर्नल्समधले अनेक लेख सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेले दिसतील. असो. याचा अर्थ भारतात सगळे आलबेल चालले आहे किंवा अमेरिकेत खूप घोळ चालले आहेत असा मुळीच नाही. उडदामाजी काळेगोरे सर्वच ठिकाणी सर्वकाळच असतात... कायद्याचा बडगा प्रबळ असला तर काळेपणा कमी दिसतो... मात्र तेथेही कधी कधी तो "वरवरचा दिखावा" म्हणजे एक प्रकारची रिस्क मॅनेजमेंट टॅक्टीक् असू शकतो. पण माझा मुख्य मुद्दा असा होता की एखाद्या व्यवस्थेची स्तुती अथवा टीका वरवरच्या माहितीने अथवा एका खाजगी अनुभवाचे सरसकटीकरण करून करणे न्यायाचे नाही. सरसकटीकरणाचा दावा करायचा तर त्यामागे योग्य प्रमाणात शास्त्रिय पद्धतिने जमवलेला डेटा असावा. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

इंटरेस्टींग...

विकास
Tue, 03/11/2014 - 06:00 नवीन
एक मात्र खरे की अमेरिकेत हे कायद्याने पूर्णपणे बंद आहे हा गैरसमज आहे. दुव्याबद्दल धन्यवाद. अविश्वास नाही पण मला खात्री नाही. कारण इतकेच की मी स्वत: २०१३ ला बृहन्महाराष्ट्र मंडळाचे (बीएमएम) जे बॉस्टन/प्रॉव्हिडन्सला आधिवेशन झाले त्याच्या प्रमुख समितीतर्फे बीएमएम च्या वैद्यकीय आधिवेशन संयोजन करण्यात होतो. मी एकटाच मॅनेजमेंट प्रमाणे डॉक्टर नसलेला होतो. इतर सर्व प्रथितयश डॉक्टर्स होते. पुर्वीच्या काळात अशा वैद्यकीय आधिवेशनात फार्मा कंपन्या अथवा तत्सम कंपन्यांकडून सहज डोनेशन मिळायचे आणि आत्ता देखील मिळाले असते. पण ते केले गेले नाही कारण मी म्हणल्याप्रमाणे असलेली बंदी. अर्थात हे डॉक्टर्सनीच सांगितले होते. अजून देखील जमल्यास मी काही जणांना विचारून बघेन. कदाचीत रीजनल असेल अथवा एएमएच्या गाईडलाईन्स असल्या तरी कायदेशीर काही बदल झाले असल्यास माहीत नाही. (मला आत्ता पटकन शोधताना मिळालेले नाहीत). बाकी काही उत्तरे... हे प्रकरणाला वरवर वाटते त्यापेक्षा अनेक पदर आहेत... काही चांगले तर काही तद्दन वाईट. माझे (सर्व अपवाद गृहीत धरून) असे स्पष्ट मत आहे की आत्ताच्या घडीस भारताला भ्रष्टाचाराने पोखरले आहे. त्यात डॉक्टर्स देखील आले. त्यामुळे चांगल्या पेक्षा तद्दन वाईटच अधिक असण्याची शक्यता आहे. आणि सामान्य भेटवस्तू घेणे एक आणि परदेशवार्‍यांसाठी पैसे घेणे हे एक. यातील परदेशवार्‍यांसाठी अथवा तत्सम खर्चासाठी कुठलाही पदर समजू शकत नाही. ती लाचच वाटते. परत माझा अनुभवः आम्ही सरकारी नोकरीत व्यवस्थापनात आहोत. आम्हाला वर्षभरात जर कोणी गिफ्ट दिली, मी घेतच नाही, पण ख्रिसमसला वाईन / भेटवस्तू वगैरे तर ते पन्नास डॉलर्सपेक्षा अधिक असता कामा नये हा सरकारी नियम आहे. तोच नियम मी अगदी डिलॉईट सारख्या ठिकाणी काम करणार्‍या ऑडीटर्ससाठीपण बघितला आहे. ते धाब्यावर बसवणारे येथे देखील नक्की असतील. पण मग कायद्याने त्यांना जी शिक्षा होईल ती भयानक असते. एक उदाहरण - मॅसॅच्युसेट्स राज्याचा स्पिकर (#२ पॉवरफूल पोस्ट) याने एका सॉफ्टवेअर कंपनीस कॉन्ट्रॅक्ट देताना स्पेशल ट्रीटमेंट दिली. त्याचा त्याला (निवडणूकफंडास) काहीतरी $५०,०००च्या आसपास फायदा झाला. प्रकरण उघडकीस आले... आज तो दहा वर्षासाठी तुरूंगात आहे. डॉक्टर्सच्या पण अशा केसेस असतील. आपल्याकडे काही वचक आहे असे वाटते का? ओबामाकेअर आणि स्कँन्डेनेविअन देश हा पूर्ण वेगळा विषय आणि अवांतर होत असल्याने येथे लिहायचे टाळतो. हवे असल्यास खरडी करू शकतो. Preventable medical errors बद्दल संदर्भ म्हणून दिलेला लेख हे कोणाचेह खाजगी मत नाही: मी तसे म्हणले नव्हते. पण मला त्यावर संशोधन करायला वेळ नव्हता म्हणून इतकेच म्हणले पण पुढे असे देखील म्हणले होते: पण एन आय एच (नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थ) ची वगैरे अधिकृत आकडेवारी तुम्ही म्हणता त्यापेक्षा फार वेगळी असेल असे वाटत नाही. थोडक्यात सहमतीच दर्शवली होती. आत्ता एन पी आर वर या संदर्भात माहिती मिळवली तर त्यात हा आकडा याहूनही मोठा आहे असेच म्हणलेले आहे. पण या सर्व गोष्टी अमेरीके बद्दल बोलत आहोत. तेथे त्या शोधल्या जातात, त्यावर विचार केला जातो आणि करेक्टीव्ह अ‍ॅक्शन्स घेतल्या जातात. डॉक्टर्सवर आणि हॉस्पिटल्सवर देखील कायदेशीर कारवाई देखील होते. कारण "लाख मोलाचा जीव" धरला जातो. डॉक्टर्सच्या संघटना त्यात ऑफेन्सिव्ह समजत नाहीत... आपल्याकडे काय होते हा प्रश्न आहे. कारण चर्चा विषय हा भारतावर आधारीत आहे. आणि त्यावर मुग गिळणे योग्य नाही असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

विकास साहेब

सुबोध खरे
Tue, 03/11/2014 - 13:40 नवीन
विकास साहेब अमेरिकेचा मुद्दा मी आणला नव्हता किंवा इथली आणी तिथली वैद्यकीय व्यवस्था याची तुलना करण्याचा प्रश्नच नाही. श्री पक्या यांनी त्यांच्या बाळाच्या आजाराच्या वेळेस तेथील डॉक्टर नि कसे व्यवस्थित समजावून सांगितले आणी इथे डॉक्टर कसे वाईट आहेत यावर मी फक्त एवढेच म्हटले कि तुम्ही जर दहा ते तीस हजार रुपये एका भेटीला दिलेत तर बालरोग तज्ञ तुम्हाला अर्धातास सर्व समजून देईलच पण आणखी अर्धा तास बाळाला खेळवेल. अमेरिकेत प्राथमिक आरोग्य सुविधा भारताच्या दसपटीने तरी उत्तम आहे याबद्दल कोणतीही शंका नाही. आपण येथे तुलना मिपावरील लोक जे मध्यम किंवा उच्च वर्गीय आहेत त्यान मिळणाऱ्या सुविधा आणी अमेरिकेतील सुविधा यांची तुलना केली पाहिजे. मुळात भारतात आपण पंधरा वर्षे एखाद्या डॉक्टर कडे काम केले तर आपल्याला आर एम पी हि डिग्री घेऊन व्यवसाय करता येत असे. सुदैवाने ते बंद झाले आहे पण जे लोक अगोदरपासून व्यवसाय करीत आहेत ते अजूनही चालूच आहे. यानंतर आयुष ( आयुर्वेद, युनानी,सिद्ध आणी होमेपदी) या शाखांचे (७५ टक्के) डॉक्टर सुद्धा आधुनिक वैद्यकाची औषधे त्यामध्ये कोणतेही शिक्षण नसताना सर्रास देताना दिसतात.उरलेले २५ टक्के( खरतर बरेच कमी टक्के) आपल्या शाखेचा औषधोपचार करतात. यावर आपल्या कल्याणकारी सरकारने त्यांना आता अधिकृतपणे तसे करण्यस परवानगी दिली आहे. यानंतर येतात ती आधुनिक वैद्यक शास्त्राची महाविद्यालये. सरकारी महाविद्यालये १८१ आणी खासगी महाविद्यालये २०६ आहेत. खासगी महाविद्यालयात सरासरी ८ लाख रुपये दर वर्षाची फी आहे( आणी हि दर वर्षी १० % ने वाढवण्याची परवानगी मिळालेली आहे)म्हणजे ३५ लाख रुपये भरून आपण खाजगी महाविद्यालयातून सेवाभावी डॉक्टर तयार करणार. यानंतर जर त्यांना स्पेशालीस्ट व्हायचे असेल तर तीस लाख( स्कीन चा डिप्लोमा) पासून चार कोटी रुपये (एम डी रेडियोलॉजि) साठी अशी देणगी आहे. यानंतर येतात सरकारी महाविद्यालये- येथे ५० टक्के आरक्षण आहे आणी सदतीस टक्के बारावीच्या गुणावर येथे प्रवेश मिळतो. आता सत्त्याण्णाव आणी सदतीस ची तुलना आपण कशी करणार. म्हणजे मूळ भारतात दर वर्षी ३०००० डॉक्टर आधुनिक वैद्यकाचे (आणी ८ लाख "आयुष"चे तयार होतात.) ३०००० पैकी १४००० खाजगी महाविद्यालयातून. उरलेल्या १६००० मध्ये ८००० राखीव. या ८००० गुणवत्तेवर प्रवेश मिळवणार्यापैकी प्रत्यक्ष किती जणांना डॉक्टर व्हायचे होते आणी किती मुले आई वडिलांच्या इच्छे साठी/ हुशारीमुळे प्रवेश मिळाला म्हणून आलो अशी आहेत. आणी अशा परिस्थिती नंतर किती डॉक्टर एकदा पदवी मिळाल्यावर आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न करतात? हा आहे वैद्यकीय शिक्षणाचा लेखाजोखा. माननीय सर्वोच्च न्यायालयात हि भयावह परिस्थिती मांडल्यावर त्यांनी काय केले? काही नाही. त्यांना हे सांगण्यात आले कि कायद्याचा कोणताही डिप्लोमा नाही किंवा अनुभव असेल तरी आपल्याला कायदेतज्ञ म्हणून व्यवसाय करत येत नाही. पूर्ण एल एल बी होऊन सनद घेतल्याशिवाय जर तो व्यवसाय करता येत नाही तर सामान्य माणसाच्या जीवाशी खेळ असलेली वैद्यक शाखा अशी वार्यावर कशी सोडता येईल.जेथे आर एम पी, डिप्लोमा, आपली सोडून दुसरी पथी याचे कोणतेही ज्ञान नसताना सामान्य माणसाचा जीव धोक्यात घालायला अधिकृत परवानगी कशी देता येते? यावर तुम्ही तुमचे बोला कायदे शिक्षण हा सध्याचा विषय नाही आणी जास्त बोलला तर न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कारवाई का करू नये अशी नोटीस देण्यात येईल आणी तुम्ही म्हणता अमेरिकेशी तुलना? डॉक्टर रुग्णाला बरे करतो हे अर्धसत्य सुद्धा नाही.हे एक पंचमांश सत्य आहे. १) रुग्ण वेळेत डॉक्टर कडे गेला पाहिजे २) डॉक्टर त्या शाखेत तज्ञ असला पाहिजे ३) त्या डॉक्टरचे निदान व्यवस्थित झाले पाहिजे ४) निदान व्यवस्थित होऊनहि त्याच्या वर इलाज व्यवस्थित झाला पाहिजे ५)या सगळ्या गोष्टी बरोबर होऊनहि त्या रुग्णाचा आजार असाध्य नसला पाहिजे( रुग्ण नशीबवान पाहिजे) एवढे सगळे दुवे सांधले गेले तर तो पूर्ण बरा होणार.
म्हणा अखंड कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज श्री राधेश्याम महाराज कि जय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

गैरसमज

विकास
Wed, 03/12/2014 - 00:47 नवीन
अमेरिकेचा मुद्दा मी आणला नव्हता किंवा इथली आणी तिथली वैद्यकीय व्यवस्था याची तुलना करण्याचा प्रश्नच नाही. तुम्ही अथवा इतर कोणी (इस्पिक एक्का सहीत) येथे मुद्दामून अमेरीका हा विषय आणला असे म्हणायचे नव्हते. लिहीण्यामुळे तसे वाटले असल्यास क्षमस्व. बर्‍याचदा समोरासमोर बोलत नसल्याने लिहीण्यातून गैरसमज होऊ शकतो अथवा विषय अधिक भरकटू शकतो, म्हणून तसे म्हणले होते. असो. हा आहे वैद्यकीय शिक्षणाचा लेखाजोखा. हे वास्तव आहे हे नक्कीच. दुर्दैवाने त्यात आश्चर्य वाटले नाही. म्हणून कडक कायदे हवेत आणि नक्की वैद्यकीयसेवा कोणी देयच्या याचे निकष आणि ते पाळणार्‍यांसाठी शिक्षा असणे देखील गरजेचे आहे. मात्र त्यापुढे त्या त्या पद्धतीत म्हणजे जे आयुर्वेदीक वैद्य (वैदू नाही) असतील त्यांनी फक्त त्याच क्षेत्रात काम करणे गरजेचे आहे आणि स्वतःच्या क्षेत्रातले नुसतेच घोटाळे म्हणून नाही तर तृटी समजून दूर करणे गरजेचे आहे. तेच अधुनिक वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्समंडळींना लागू होते. मला नाही वाटत असे आपल्याकडे कुठल्याच क्षेत्रात घडते. वैद्यक क्षेत्राप्रमाणे सिव्हील इंजिनिअरींगमध्ये पण गरज आहे कारण अप्रत्यक्षपणे सिव्हील इंजिनिअरच्या हातात अनेकांचे जीव असतात... पण आज काय अवस्था झाली आहे ते सांगायची गरज नाही. What is not measure, cannot be managed. हे तत्व लागू पडते. वरती इस्पिक एक्का यांनी अमेरीकेत घडणारे lack of preventative care मुळे घडणार्‍या मृत्यूंच्या संख्येबद्दल लिहीले आहे. मी माझा बीएमएम मधील स्पॉन्सरशीपचा अगदी आत्ताचा अनुभव सांगितला आहे. अजून एकः वर सिव्हील इंजिनिअरींग म्हणले म्हणून - अमेरीकन सोसायटी ऑफ सिव्हील इंजिनिअर्स या देशातल्या सगळ्यात जुन्या व्यावसायीक संघटनेने अमेरीकन इन्फ्रास्ट्रक्चरच्या सद्यस्थितीवर संशोधन करून त्याला "D" ग्रेड दिली आहे. आता म्हणून त्याच्याशी आपण आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरची तुलना करू शकतो असे वाटते का? पण परत तो मुद्दा नसून आपली अवस्था काय आहे आणि ती कुठे बदलली पाहीजे ह्यावर सातत्याने बोलले-लिहीले जाते आणि मग त्यावरून धोरणे-नियम केले जातात, हा आहे. फार्माच्या देणग्यांच्या बाबतीत... केवळ उदाहरण म्हणून - रॅनबक्सीवर अमेरीकेत बंदी आणली गेली. आपल्याकडे तीच औषधे अजून चालतात का? जर चालत असतील तर त्याला रॅनबक्सीकडून मिळणारी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्पॉन्सरशीप जबाबदार आहे असे म्हणावे लागेल का? असे प्रश्न उपस्थित होतात. डॉक्टर रुग्णाला बरे करतो हे अर्धसत्य सुद्धा नाही.हे एक पंचमांश सत्य आहे. अधिष्ठान-अहंकार-तशी विविध साधने, वेगळाल्या क्रिया नाना, दैव ते येथ पाचवे. हे तत्वज्ञान म्हणून हे पटते आणि दैव हे २०% असते असे मानायला मी तयार देखील आहे. तरी पण कर्मयोग म्हणून विचार केला तर पेशंट आणि डॉक्टर्सचे असे दोघांच्या वागण्यावरून, एकमेकांवरील विश्वास, सहकार्याने बरेच यश हे हातात येते... (उ.दा. १९७५.. जवळची मराठवाड्यात रहाणारी नातेवाईक. डॉक्टरांकडे अगदी साध्या कारणासाठी गेली. डॉक्टरना मरमर ऐकू आली. पुण्याला पाठवले. पुण्यातल्या हृदरोगतज्ञांनी तपासून मुंबईस. मुंबई हॉस्पिटलमधे यशस्वी शस्त्रक्रीया झाली. यात रुग्णाने/नातेवाईकांनी घाबरून गळून जाउन वेळ लावला नाही. डॉक्टर्स योग्य मिळाले. पुढचे सगळे आहेच. असो,)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सर्वश्री विकास व इस्पिकचा

आनंदी गोपाळ
Mon, 03/17/2014 - 21:19 नवीन
सर्वश्री विकास व इस्पिकचा एक्का, यांचेतील सुरू झालेली व सुबोध खरे यांनी सहभाग नोंदविलेली चर्चा माझ्या वाचनातून सुटली. नीट वाचून लवकरच प्रतिसाद देईन म्हणतो. अनेक रोचक मुद्दे आहेत. तसेच, डॉक बॅशिंग अथवा वर्शिपिंग या दोन अतिरेकी मुद्द्यांपेक्षा वेगळी, व सकारात्मक चर्चा होऊ शकेल असे वाटते. सो, अ‍ॅज सून अ‍ॅज आय गेट टाईम..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

धर्मवीर

ओसामा
Fri, 03/07/2014 - 22:51 नवीन
आमच्या ठाण्यात एक धर्मवीर होते. बहुतेक २००० साली त्यांचे एका छोट्या अपघातात निधन झाले. त्यानंतर कट्टर शिवसैनिकांनी सिंघानिया रुग्णालय जाळून टाकले. सध्या ठाण्यात बरीच रुग्णालये आहेत पण त्यावेळेस खूप लोकांना सिंघानियाचा हाच पर्याय होता. त्यावेळेस ह्या विषयावर बरीच चर्चा झाली (मिपा वर नाही पेपर मध्ये)
  • Log in or register to post comments

आमच्याकडे आमच्या भागातील बोगस

मृगजळाचे बांधकाम
Sun, 03/09/2014 - 11:53 नवीन
आमच्याकडे आमच्या भागातील बोगस doctor शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम करीत असताना एक बोगस doctor वर आम्ही कारवाई ची तयारी सुरु केली,तर त्याच्या वर कारवाई करणे थांबवावे त्याला practice करू द्यावी म्हणून मला आमच्या भागातील काही प्रसिध्द डॉक्टर्स चे फोन आले.नंतर मी चौकशी नंतर असे कळले कि तो बोगस डॉक्टर्स या प्रसिध्द डॉक्टर्स कडे patient पाठवत असे. त्याचे त्याला ३०% cut मिळत असे.
  • Log in or register to post comments

"The truth is always

बिपिन कार्यकर्ते
Sun, 03/09/2014 - 12:39 नवीन
"The truth is always somewhere in between." सगळ्याप्रकारचे लोक सगळीकडे असतात. डॉक्टरच चांगले किंवा पेशंटच चांगले, असं एकांगी काही नसतं. मात्र, प्रत्येक नात्यात एक सिनिअर पार्टनर असतो तसे या नात्यात डॉक्टर हा वडिलधारा असतो. बहुतांश केसेसमधे पेशंट आणि इतर नातेवाईक त्या भावनेतून वावरतानाही दिसतात. त्यामुळे, पेशंटशी कसे वागावे, कशी हँडल करावी परिस्थिती इत्यादींबद्दल डॉक्टरांना काही तरी ट्रेनिंग असावे / असेलही. माझ्या घरात आणि अगदी निकटच्या वर्तुळात बरेच डॉक्टर आहेत. त्यातले बव्हंशी अ‍ॅलोपाथ (सर्जन, एमडी वगैरे आहेत). काही होमिओपाथही आहेत. या सर्वांशी गप्पा मारताना प्रकर्षाने जाणवते ते म्हणजे, आज या व्यवसायात नको तितक्या मालप्रॅक्टिसेस असाव्यात. असो. माझे निरीक्षण अगदी सामान्य आहे आणि माझ्याकडे विदा वगैरेही नाही. पण या लोकांच्या बोलण्यावरून काही लक्षात येते ते एवढेच. मला स्वतःला आलेला एक अनुभव. बावीस वर्षांपूर्वी माझ्या मोठ्या बहिणीला मुलगी झाली. पावसाळ्याचे दिवस होते. मुंबईचा प्रचंड पाऊस बदाबदा कोसळत होता. बाळंतपण सुखरूप झाले. बाळ एकदम मस्त होतं. दवाखान्यात एक बालरोगतज्ञ येत असत. त्या आमच्या इथल्या तशा नाव राखून असलेल्या होत्या. दिवसातून एकदा येऊन सगळ्या बाळांची तपासणी करून त्या जात असत. दुसर्‍या दिवशी आमच्या शेजारी एक नर्सिंगचे पूर्ण शिक्षण घेतलेली एक मुलगी राहत असे ती भेटायला आली. तिने बाळाला बघून, बाळ जरा पिवळे दिसते आहे, पण काही काळजीचे कारण नाही असे होतेच असे म्हणले. माझी आई व आजीही म्हणल्या की हे होतं कधीकधी. बाळकाविळ का असं काही तरी म्हणतात आपल्याकडे त्याला. त्या दिवशी बाळाने दूध प्यायले की उलटी करायला सुरूवात केली. रडूही लागले. पोटाला धक्का लागला की रडायची. बालरोगतज्ञ बाई आल्या. त्यांनी तपासले आणि म्हणल्या, "ताबडतोब एक्सरे वगैरे करावे लागेल. काही तरी गंभीर प्रकार दिसतोय." आम्ही घाबरून गेलो. मात्र, माझ्या मेव्हण्याने आणि वडिलांनी तातडीने बाळाला घेऊन टॅक्सीने एक्सरे क्लिनिक गाठले. संध्याकाळ होऊन चालली होती. एक्सरेचा फोटो लगेच मिळाला. रिपोर्ट नंतर घेऊन जा म्हणले. आम्ही परत दवाखान्यात. बाईंना फोन केला. त्या आल्या. एक्सरे बघून म्हणल्या, 'आतड्याला पीळ अथवा अडथळा (twist or obstruction) आहे. तातडीने ऑपरेशन करावे लागेल. तुम्ही तिला आत्ताच्या आत्ता वाडियाला घेऊन जा.' रात्रीचे ११-१२ वाजत आले होते. भयानक पाऊस होता. आम्ही टॅक्सी करून वाडियाला. तिथे, इमर्जन्सीमधे गेलो. या बाईंनी दिलेले पत्र दाखवले. त्यांची धावपळ झाली आणि एक ड्युटीवरचा ज्युनिअर डॉक्टर (हाउसमन की रजिस्ट्रार म्हणतात तो) आला. त्याने नीट चेकप केला. एक्सरे बघितला. आणि एकदम बोलला, 'इथे का आणलं? कोणी सांगितलं?' आम्ही सगळी कहाणी रिपिट केली. त्यावर तो म्हणला, 'धन्य आहे. अहो हिला पोटात गॅस झालाय आणि हे दिसत आहेत एक्सरे मधे ते गॅस बबल्स आहेत. I really am surprised that an MD has sent you here.' आम्ही चकितच झालो. मग तो म्हणला, 'आता आलाच आहात, तर थांबा. अ‍ॅडमिट करू आपण हिला. सकाळी, आमचे सर येतील तेव्हा तेच काय ते फायनल सांगतील.' म्हणून आम्ही थांबलो. सकाळी ते सर आले. सत्तरीऐंशीचा एक पारशी बुढ्ढा. त्याला बघूनच दिल खुश. पण एकदम कडक आणि बोलायला टोकदार. त्याने तपासले, सगळी कहाणी ऐकली. काही बोलला नाही. थेट त्या बालरोगतज्ञबाईंना फोन लावला. त्या याच्याच विद्यार्थिनी निघाल्या होत्या. फोनवर हासडहासडहासडलं त्या बाईंना. बेक्कार शाळा केली. मग आम्हाला म्हणला, 'आता परत जाऊ नका. आपण हिला इथेच दोन तीन दिवस ठेवू. मग थेट घरीच न्या. काही झालेलं नाहीये हिला. पण इतक्या पावसाचं हिला परत बाहेर हवेवर नेऊ नका. पाहिजे तर आईलाही इथेच आणा.' पुढे सगळं नीट झालं. खर्चही काही आला नाही फार. तो बुढ्ढा बाबाजी रोज दोनदा येऊन राउंड मारायचा. मात्र, इतकं चुकीचं डायग्नोसिस कसं काय झालं हे आश्चर्यच आहे. नंतर आम्ही एकदा त्या बाईंकडे त्यांना सांगायला गेलो की आता बाळ ठीक आहे तर त्यांनी सरांकडुन बसलेल्या फटक्याचा राग आमच्यावर काढला. आम्ही झक मारली आणि आलो असं वाटून घरी परत आलो. सांगायचे तात्पर्य असे की, It happens... from both sides. तरीही, एखादा चांगला डॉक्टर पेशंटला कसं वागवतो, कसं समजावतो आणि त्यामुळे पेशंटला किती उभारी येते वगैरे महत्त्वाचे आहेच. माझ्यापुरते बोलायचे तर, जेव्हा कधी एखाद्या मेडिकल चाचणीचा रिपोर्ट मला समोर दिसतो (माझा किंवा इतरांचा) तेव्हा मी तो स्वतः नीट वाचतो. त्यातल्या बर्‍याच गोष्टी चक्क अगदी सामान्यपणे कळण्यासारख्या असतात. आपण नीट लक्ष देऊन वाचावं फक्त. प्रत्येक आकड्याच्या Min Max लेव्हल्स, रेंज, नॉर्मल म्हणजे काय वगैरे कंसात दिलेले असते. त्यावरून आपल्याला थोडातरी अंदाज येतो. (माझ्या वडीलांना जन्मतःच एक किडनी नाहीये. म्हणजे ती कधी फॉर्मच नाही झाली. ती जागा अक्षरशः रिकामी आहे. त्यांच्या एका आजारपणात त्यांची सोनोग्राफी करावी लागली तेव्हा तो रिपोर्ट मीच आणला होतो. त्यात, उजवी बाजू मोकळी आहे हे वैद्यकिय भाषेत लिहिले होते. ते वाचून आणि थोडासा कॉमन सेन्स वापरून मी घरी 'बाबांना एक किडनी नाहीये' असं बोललो. त्यावेळी, माझी आत्या भयानक रागवली होती माझ्यावर, 'काय मेला अभद्र बोलतो म्हणून'! ;) ) डॉक्टरकडे गेल्यावर त्यांच्याकडून नीट समजून घ्यायचा प्रयत्न करतो. चांगला डॉक्टर असेल तर तो अतिशय व्यवस्थितपणे समजावतोही. अगदी आकृत्या वगैरे काढून. त्याउप्पर अजून समजून घ्यायचं असेल तर मग आजकाल आंतरजालावर खूप काही छान माहिती मिळते. ती समजून घ्यायची. मात्र हे सगळं करताना, 'शेवटी डॉक्टरच तज्ञ आहे. तो म्हणेल ते करायचं. आपली अक्कल फार पुढे न्यायची नाही.' हे भान ठेवायचं. डॉक्टर निवडताना नीट निवडा, पण एकदा का त्याच्या/तिच्याकडे गेलं की मग आपलं डोकं फार चालवू नये. उन्नीसबीस चालायचंच आणि तेवढी तयारी ठेवायचीच मनाची. आपण अलर्ट राहिलं की समोरचाही आपल्याला फसवताना चारवेळा विचार करतो.
  • Log in or register to post comments

इथली झकाझकी जरा थांबल्याची

कवितानागेश
Sun, 03/09/2014 - 13:10 नवीन
इथली झकाझकी जरा थांबल्याची बघून अगदी हेच लिहायला आले होते. प्रॉब्लेम्स्चे कारण आहे अज्ञान आणि आळशीपणा, डॉक्टर आणि पेशंट दोघांचाही. पेशंटला कळत नसेल तर त्याला केस काय आहे ते डॉक्टरनी नीट सांगायला हवं. किंवा डॉक्टर गोंधळ घालतोय/ लपवाछपवी करतोय/ बेपर्वाई आहे असं पाहिल्यास पेशंटनी डॉक्टर बदलावा. मागे काही वर्षांपूर्वी माझ्या मावसबहिणीनी डॉक्टर्स नीट को ऑपरेट करत नाहीयेत हे लक्षात आल्याबरोबर पहिल्या बाळंतपणाच्या वेळेस कळा सुरु झाल्या असताना होस्पिटल बदललं होतं! बदललेल्या हॉस्पिटलमध्ये नॉर्मल डिलिव्हरी झाली. दोघेही सुखरुप होते. ती हे सहज करु शकली कारण तिला स्वतःला नक्की काय होतंय, आणि काय हवय हे तिला व्यवस्थित माहित होतं. कारण नेहमीच्या विश्वासातल्या डॉक्टरांशी सतत संपर्क आणि चर्चा होत होती. माझ्म स्वतःचे ११ वर्षाचे असताना कानचं ऑपरेशन झालं होतं. पोहायला जायचे. त्यातून वॅक्स हार्ड झाला होता. १ महिना ट्रीटमेन्ट घेउनही कान दुखणं आनि रक्त येणं सुरु होतं. कानाचं ऑपरेशन करणं डॉक्टर शक्यतो टाळत होते, कारन जनरल अनेस्थेशिया द्यावा लागेल. त्यानी मी लहान असूनही मला सगळं नीट समजावून सांगितले होते. मीपण नंतर शाळेत जाउन मैत्रिणींना आक्रुत्या वगरै काढून कानाची रचना समजावून सांगितली होती! ;) अनेस्थेशिया द्यायच्या क्षणापर्यंत डॉक्टर्स माझ्याशी बोलत होते आणि काय चाललंय ते सांगत होते.... अर्थात मी खूप प्रश्न विचारत होते म्हणूनच. :) बहुतांश लोकांना विज्ञान/शरीरशास्त्र हा विषय फक्त शाळेत थोडे मार्क मिळवण्यापुरताच माहित असतो. बाकी त्यातले काय ते डॉक्टर बघून घेइल, असा एक बेपर्वाईचा दॄष्टीकोन स्वतःच्याच रोजच्या सतत वापरण्याच्या यंत्राबद्दल- शरीराबद्दल असतो. अज्ञानाचा गैरफायदा कुणालाही सहजच घेता येतो. आपण स्वतः जागे राहिलो, आणि नीट माहिती ठेवली तर आपल्याला कुणीही फसवू शकणार नाही. मग तो डॉक्टर असो की दारावरचा विक्रेता की शेअर ब्रोकर....
  • Log in or register to post comments

डॉक्टर लोक फार माजलेत हे खरं

मराठीच
Sun, 03/09/2014 - 14:17 नवीन
डॉक्टर लोक फार माजलेत हे खरं आहे. हास्पीटल, तिथेच यांच्या बायकोचे पॅथलॅब ,तिथेच पलिकडे यांच्या बापाचे नाहीतर भावाचे मेडीकल, हे सरळ लूट करतात. एका डॉक्टरने मला चारशे रुपायची औषधे दिली ,दहा गोळ्या. मी मित्राला विचारले तर त्याने सांगितले की यांची लिँक असते, कमिशन मिळते .जे औषध ऐंशी रुपायात मिळते ते हे महागड्या ब्रॅन्डचे चारशेचे देतात. दहा दहा कोटींची हॉस्पीटल्स, कॉन्फरन्सच्या नावाखाली फार्मा कंपणीच्या पैशाने 'ऐय्याशी' करायला परदेशात जाणारेही अनेकजण आहेत. यांचे एकेक नाद सांगितले तर चाट पडाल..यांना आता कायदाचा बडगा दाखवलाच पाहीजे.
  • Log in or register to post comments

अगदी अगदी.

सुबोध खरे
Sun, 03/09/2014 - 15:37 नवीन
अगदी अगदी. सगळ्या खाजगी दवाखान्यांचे आणि रुग्णालयांचे राष्ट्रीयीकरण झालेच पाहिजें आणि तेथील डॉक्टरना रोजगारावरच ठेवले पाहिजे. इतकेच नव्हे तर खाजगी औषध कंपन्यांचे सुद्धाराष्ट्रीयीकरण झाले पाहिजें. सर्व औषधे निर्मितीचे हक्क सरकारी कंपन्यांनाच दिले पाहिजेत आणि त्याचे वैद्यकीय प्रचारक, मार्केटींगची माणसे यांना पण रजा दिली पाहिजे म्हणजे या सर्व साट्या लोट्यातून सामान्य माणसाची मुक्तता होईल. सगळे उपचार सरकारी दवाखान्यात आणि सरकारी रुग्णालयातच आणि औषधे पण सरकारीच. म्हणजे कोणाचाच माज नको आणि महागडी औषधेही नकोत आणि पैसेही खर्च व्हायला नकोत. एकदम १०० टक्के पटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठीच

(No subject)

प्यारे१
Sun, 03/09/2014 - 15:48 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

एक डॉक्टर आणि पेशंट ह्यांच

पिलीयन रायडर
Mon, 03/10/2014 - 09:40 नवीन
एक डॉक्टर आणि पेशंट ह्यांच नात कसं असु शकतं आणि जो डॉक्टर जीव वाचवु शकतो, त्याचा स्वतःकडे बघायचा द्रुष्टीकोन कसा असु शकतो... मी डॉ. शिवप्रकाश ह्यांना लिहिलेलं पत्र.. Hello Doctor, You may not recognize me but, every time I look at my son Abeer, he reminds me of you… You did open heart sugary on him for TAPVC on 3rd July 2012...exactly a year ago… for us it is the day when Abeer was re-born… Like any other parents, me and my husband too had many dreams for him right from the moment we knew about my pregnancy. But, just after a week he was born, we had only one dream left.. To see him alive… We were in the happiest period of our life... And life gave us a very cruel truth to live with… Compared to the children born during same week in the hospital, he looked very dull and lifeless. That moment is still burning in my heart. Every passing day his intake reduced and finally we had to shift him to NICU. There he was fed by tube through nose. Which was a horrible sight for any parents to watch, but our misery didn’t end there. I cried like anything when I saw him with that tube. When he was sent to Seven hills Hospital, Mumbai, I felt very helpless. I could not stop crying. However, I did not know that it was last tear that rolled down my cheek because very next day...I met you! The moment I saw you, I cannot explain why, I felt relieved. Your presence is very comforting. Even though you explained high risk associated with sugary, I felt confident. I still remember the last conversation before going to OT, where my husband said “I hope we are in lucky 95%" and you replied, “hum to 100% ke liyehi try karenge". There was doubt in our mind... We had “Hope”…. You had “confidence”. You knew what you were doing. .. I tried looking at animation of open heart sugary for TAPVC. But, I could not watch it for more than 15 sec. I really don't know how you operated that tiny heart... However, that day you saved two lives... I could have never lived without my son... During our stay at Seven Hills, everybody around us told that you are nothing less than “The God”. I would not have believed such “Larger than life” description of anybody... But that day I believed...from bottom of my heart... Today my child sets house on fire for food. He was 2.75kg when born and he lost 0.75 kg after operation. Now, I get warning from his cardiologist that he is a “Healthy Child” and I should watch him for being overweight! I may never be able to put my feelings in words. I just wish that one day my child will be a Heart surgeon like you.. He owes his life to you...! At last I and my husband wish you luck with every little heart you touch... May God give you strength to help those who share same fate as we did a year back!! Regards, डॉ. शिवप्रकाश ह्यांचे उत्तर.. Dear Warm Greetings. Thanks for the touching comments. We are humbled by your words. It is the god's will that we are serving his cause and we are merely instruments in his hands to deliver what he has decided for all of us. It is so pleasing to see the photo of Abeer and it is difficult to believe that the child had obstructed TAPVC. May the god shower the best of the best in his life. Please stay in touch. Dr KSP Dr. Shiva Prakash K MBBS, MS, MCh डॉक्टरला कितीही शिव्या घाला.. स्वार्थी माना.. पण जेव्हा कुणी अत्यंत जवळचं मरणासन्न असतं तेव्हा जगात हा एकच माणुस असतो जो काहीतरी करु शकतो.. तो नेहमी यशस्वी होईलच असं नाही पण तो १००% प्रयत्न तरी करेलच..
  • Log in or register to post comments

आपला अनुभव वाचुन डोळ्यात पाणी

बेकार तरुण
Mon, 03/10/2014 - 14:17 नवीन
आपला अनुभव वाचुन डोळ्यात पाणी आले. आपणहि आठवण ठेवुन आभार मानले हे विशेष.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

हृदयस्पर्शी!

प्यारे१
Mon, 03/10/2014 - 14:33 नवीन
हृदयस्पर्शी! >>>It is the god's will that we are serving his cause and we are merely instruments in his hands to deliver what he has decided for all of us. हम्म्म.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

ह्म्म..

विटेकर
Mon, 03/10/2014 - 15:52 नवीन
पूर्ण चर्चा आणि प्रतिसाद ही वाचले. वास्तविक येथे जे आक्षेप वैद्यकीय व्यवसायावर नोंदविले आहेत , ते कुठल्याही व्यवसायाला जशेच्या तशे लागू होतात. साती आणि डो. सुबोध खरे ( नेहमी प्रमाणे ) यांनी अत्यंत संयत पद्धतीने प्रतिवाद केला आहे. मात्र आनंदी गोपाळ यांचा सूर थोडा तिखट लागला आहे. अजूनही या व्यवसायाला समाजात फार मोठा मान आहे . मेट्रो च्या बाहेरील गावात अजूनही लोक डॉक्टरला देव मानतात ( अर्थात अपवाद आहेतच ) माझा वैयक्तिक अनुभव - माझ्या वडिलांना अ‍ॅटॅक आल्यावर कोल्हापूरच्या एका टिनपाट हॉस्पिटल मध्ये ठेवावे लागले. आम्ही दोघे बंधु पुण्यातून तिथे पोह्चलो , थ्रोम्बोलिसिस करुन सगळे ठिक-ठाक होईपर्यन्त थाम्बणे भागच होते. पहिल्यादिवशी डॉक्टर नीट बोलेचना ! त्यांना बहुधा पेशंट्च्या नातेवाईकांना काही माहीती सांगावी लागते याचा गंध ही नव्हता. त्यातून आम्ही थांबावे अशी काही सोयही नव्हती .. आय सी यू पण धन्य होते.. नावालाच आय सी यू , पडदे टाकून केलेले.. कोणीही आत जाऊ शकत असे.. पण पुढच्या दोन दिवसात तिथल्या स्टाफ ने आम्हाला अक्षरशः जिंकून घेतले. पुण्यात असणार्‍या सुविधा तिथे नव्हत्या पण रुग्णाबद्दल एक अकृत्रिम स्नेहभाव होता पूर्ण रुग्णालयात. पेशंट ची काळजी होती ... आम्हीही नंतर हॉस्पिटलला पत्र लिहिले. त्यानंतर पुण्यात आल्यावर अन्जिओप्लास्टी करताना फरक आणखी स्प्ष्ट झाला. रुग्ण आणि डोक्टर हे एक " नाते " आहे , त्याची जपणूक दोन्ही बाजूनी व्हायला हवी, शेवटी मरण कोणीच चुकवू शकत नाही मात्र डोक्टर चे प्रामाणिक प्रयत्न हा रुग्णाचा अधिकार आहे तर डोक्टरला उचित आदर हे रुग्णाचे आणि नातेवाईकांचे कर्तव्य आहे.
  • Log in or register to post comments

समारोप.

प्रभाकर पेठकर
Wed, 03/19/2014 - 02:42 नवीन
रुग्ण आणि डोक्टर हे एक " नाते " आहे , त्याची जपणूक दोन्ही बाजूनी व्हायला हवी, शेवटी मरण कोणीच चुकवू शकत नाही मात्र डोक्टर चे प्रामाणिक प्रयत्न हा रुग्णाचा अधिकार आहे तर डोक्टरला उचित आदर हे रुग्णाचे आणि नातेवाईकांचे कर्तव्य आहे.
मला वाटते विषयाचा समारोप झाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

फार फार वाईट आहे हे....

वेल्लाभट
Tue, 03/11/2014 - 16:07 नवीन
फार फार वाईट आहे हे.... डॉक्टरकीच्या पदव्या कशाच्या जोरावर मिळतात, या गोष्टीत याचं कारण दडलेलं आहे. आता जर 'अशा' बाबतीत पेशंटच्या नातेवाईकांनी त्या डॉक्टरांना धुतला, तर त्यांचं तरी काय चुकलं म्हणा. असो.
  • Log in or register to post comments

म्हैस

आशु जोग
Tue, 03/11/2014 - 16:46 नवीन
म्हैस हा डॉक्टर कोण होता माहिती मिळवा... त्यापूर्वीच २ आठवडे आम्ही अनुभव घेतला होता... त्यावेळी निष्काळजीपणा जाणवला होता...
  • Log in or register to post comments

डॉक्टर वर फौजदारी झाली आहे अस

पक्या
Wed, 03/12/2014 - 01:27 नवीन
डॉक्टर वर फौजदारी झाली आहे अस एका मित्राच्या ओळखीतल्या डॉक्टरांकडून समजले। त्यांनी त्या डॉक्टर चे नाव ही सांगितले पण ते इथे सांगणे उचित नसेल
  • Log in or register to post comments

संशयीत डॉक्ट्ररबद्दल कायदेशीर

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 03/12/2014 - 11:36 नवीन
संशयीत डॉक्ट्ररबद्दल कायदेशीर कारवाई केली गेली हे उत्तम झाले. आता या केसचा सर्व बाजूने विचार होउन योग्य निकाल लागावा अशी आशा करायला हरकत नाही. हा मार्ग योग्य आहे आणि असे सतत झाले तर दोषी व्यावसाईकांवर आपोआप अंकूश बसायला मदतच होईल. मात्र जसे हॉस्पीटलची नासाधूस करणार्‍या रुग्णाच्या नातेवाईकांच्या एका उदाहरणाने सर्व समाजाला नावे ठेवणे योग्य नाही तसेच एका चुकार डॉक्टरच्या दुर्वतनाने सर्व वैद्यकीय व्यवसायाला दोषी ठरवणे योग्य नाही. विषेशतः सरकारने अनेक नॉन-अ‍ॅलोपेथिक वैद्यकीय व्यवसायीकांना अ‍ॅलोपॅथिचा व्यवसाय करण्यास परवानगी दिल्याने काही अ‍ॅलोपॅथितील अ/अर्ध-शिक्षित व्यावसाईकांना एकाच तराजूत तोलले जाते, हा एक दुर्दैवी विनोद आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

साहेब फौजदारी झाली म्हणजे

सुबोध खरे
Wed, 03/12/2014 - 12:52 नवीन
साहेब फौजदारी झाली म्हणजे गुन्हा दाखल( FIR) केला एवढेच. पूर्ण तपासांती सत्य बाहेर येईलच. पण त्या अगोदरच आपले लोक डॉक्टरला दोषी ठरवून मोकळे झालेले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

धागा अंमळ उशीराच उघडला म्ह्णायचा.

अर्धवटराव
Wed, 03/19/2014 - 04:37 नवीन
मिपाच्या "काश्मिरी" स्वभावाच्या अगदी विपरीत फार छान चर्चा झाली. खरे साहेब, साती मॅडम नेहमीप्रमाणे संयत-मुद्देसुद-स्ट्रेट. गोपाळराव थोडं रागावल्यासारखे वाटले तरिही त्यांची कळकळ आणि मुद्दे बरोबर आहेत. माझ्या वडिलांची दोनदा अँजिओप्लॅस्टी, दोन पोटाचे ऑपरेशन्स (बाकि हेल्थ कंडीशन फार चांगली नसताना. डॉक्टरने अगदी आवष्यक म्हणुन ऑपरेशन केलं होतं... आणि "मी हे ऑपरेशन कुठल्या परिस्थीत केलं हे माझं मलाच माहिती" असे डॉक्टरांचे रिलीफ उद्गार होते. ऑपरेशनच्या रिस्क माहिती असल्याच्या फॉर्मवर मीच सहि केली होती), आणि इतर बरच काहि बाहि झालं आहे. सध्यादेखील तिर्थरूप जेवण कमि आणि औषधच जास्त घेतात असं वाटतं. पण डॉक्टरवरचा भरवसा आणि प्रचंड विलपॉवरच्या भरवश्यावर आमचे पिताश्री अजुनही "बाप" आहेत. आमचे चिरंजीव सुद्धा जन्मल्याबरोबर अ‍ॅडमीट झाले व आठवड्याभराने आईच्या कुशीत परतले. कार्ट्याच्या हृदयातल्या झडपाच उघडल्या नव्हत्या, शरीराला कळलच नव्हतं कि आपण गर्भाशयातुन बाहेर आलोय. मग ते अशुद्ध रक्त मिक्स होणं काय नि काय काय चाललं. बापासारखाच आळशीपणा आणि काय. सौ च्या बाबतीत पण हेच. तिला चार वेगवेगळ्या गायनेक नी चार वेगवेगळी निदानं सांगितली तिच्या प्रॉब्लेमची. आणि प्रत्येकाचा हाच प्रश्न कि दुसर्‍या गायनेकला अक्कल नावाची गोष्ट नाहि काय कि त्याने/तिने अमुक एक निदान करावं/ऑपरेशन सजेस्ट करावं. सांगायचा मुद्दा असा कि या सर्व घडामोडीत आम्हि मेडीकल व्यवसायाचे भले-बुरे दोन्हि रुपं बघितले. मी तरी अजुन म्हणावा तेव्हढा अ‍ॅलर्ट झालो नाहिए, पण सौ बराच अभ्यास करते आरोग्याचा-आहाराचा. मग आम्हि दोघं मिळुन ठरवतो कि एका अमुक डॉक्टरकडे ट्रीटमेंट कंटिन्यु करायची कि नाहि. एकदा ठरलं कि इलाज पूर्ण तिथुनच करतो.
  • Log in or register to post comments

मायबोलीवरील डॉ.सुरेश शिंदे

दिव्यश्री
गुरुवार, 03/20/2014 - 00:02 नवीन
मायबोलीवरील डॉ.सुरेश शिंदे यांचे सगळे लेख एकदा येथील सदस्यांनी वाचावेत अशी आग्रहाची विनंती आहे . बाकी विज्ञान कितीही पुढे गेले तरी त्याला आणि ते पुढे नेणार्याला मानवाला काही मर्यादा आहेत . डॉ.चे अनुभव चांगले आले तर देव नाहीतर दानव , राक्षस ई. अशी सरळ सरळ विभागणी दिसते बर्याच वेळा . पेशंट आपल्या चुका सांगत नाहीत , महत्वाची माहिती लपवून ठेवतात खूप वेळा यात नुकसान पेशंटचेच असते आणि पर्यायाने त्यांच्या जवळच्या माणसांचे . हल्ली लोक सगळा दोष डॉ.वर देऊन मोकळे होतात खूप वेळा पण अस करू नये . मी पण माझी दोन माणसे गमावली आहेत अगदी अद्ययावत हॉस्पिटलमध्ये . शेवटी आपल प्रारब्ध हेच खर आहे . माझ्या काकाच्या वेळेस माझ्या बाबांना खूप लोकांनी सांगितलं डॉ.वर केस करा त्यानेच चुकीच इंजेक्शन दिल , नुकसान भरपाई मागा इथपर्यंत सल्ले दिले होते .त्यावेळी त्यांनी एकंच प्रश्न विचारला सल्ले देणार्यांना कि हे सगळ करून माझा भाऊ मला परत मिळेल काय? डॉ. आयुष्य उधवस्त करून त्यांच्या घरच्यांचे / मुलाबाळांचे शाप मी घेणार नाही आणि केसही करणार नाही .
  • Log in or register to post comments

शोकांतिका ...दवाखाने बनले

दिव्यश्री
Sat, 04/26/2014 - 17:30 नवीन
शोकांतिका ...दवाखाने बनले पैशे छापण्याचे कारखाने . :( http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5160183282999899590&SectionId=28&SectionName=ताज्या बातम्या&NewsDate=20140426&Provider=- वृत्तसंस्था&NewsTitle=मृत महिलेला आठवडाभर ठेवले व्हेंटिलेटरवर
  • Log in or register to post comments

कसं शक्य आहे?

मैत्र
Mon, 04/28/2014 - 11:56 नवीन
मृत व्यक्ती - व्हेंटिलेटरवर सुद्धा राहण्यासाठि तरी जिवंत असायला पाहिजे. जर आधीच श्वास थांबला असेल तर नुसते व्हेंटिलेटर वर ठेवून कसे शक्य होईल? किमान हार्ट रेट तर दाखवला पाहिजे ना मशीन वर? शरीर इतके दिवस टिकणार नाही.. बातमी अपूर्ण वाटते आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा