Skip to main content

कॉफीचं कॅथार्सिस अर्थात चिडचिड-ए-सोमवार

लेखक आदूबाळ यांनी सोमवार, 20/01/2014 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
अरबट कॉफी चरबट कॉफी | कागदाच्या कपात करपट कॉफी || डोक्याची ग्रेव्ही, इनबॉक्सचं मटण | कॅफेनची किक, बुळबुळीत बटण | पहिला ढकलतोय, चारच बाकी | कागदाच्या कपात करपट कॉफी ||१|| परीट घडी, टायचा बावटा | आकड्यांची उसळ, एक्सेल पावटा | बॉस निकम्मा, टीम पापी | कागदाच्या कपात करपट कॉफी ||२|| पायांची घडी, मांडीवर पोट | अप्रेझल मीटिंग, बोका भोट | परफॉर्मन्स मदिरा, रेटिंग साकी | कागदाच्या कपात करपट कॉफी ||३|| गारगिट्ट पोळ्या, बकाबकाबका | सिग्रेटचा धूर, फकाफकाफका | पगार, पीएफ, बोनस टॉफी | कागदाच्या कपात करपट कॉफी ||४||
लेखनविषय:

वाचने 8060
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

In reply to by प्रचेतस

आणि मर्ढेकारी थाट्सुद्धा ! बाकी, इतकी वर्षे कॉफी पितेय पण कधी अरबट चरबट किंवा करपट नाही बॉ लागली. अरभाटच लागली प्रत्येक वेळी !

होई सायंकाळ, ऑफिस खलास| रिचवा रेडवाईन, हातात ग्लास|| रंगबेरंगी ढग, हवेत गारवा| फ्रेश होऊन आता, ऐका मारवा|| डोक्यावरून फिरेल मायेचा हात| वाईट परिस्थिती वर कराल मात|| सुख दु:ख हे असेच येईल अन जाईल| जन्म जन्मांतर हे नाते टिकून राहील|| आपला मिपास्नेही :आयुर्हीत

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार! कमीत कमी ओळींत जास्तीत जास्त चिडचिड ठासण्याच्या नादात थोडी दुर्बोध झाली - तथास्तु यांची सूचना रास्त आहे!

लैच भारी झाले आहे. हे लिहीताना पण हातात "अरबट कॉफी चरबट कॉफी" चाच कप आहे. क्याफिन धोसल्या शिवाय डोक्याची चक्रे फिरतच नाहीत.

मंडे सीकनेस मस्त पकडलाय. बरे झाले सोमवारी सकाळी कविता वाचली नाही...डोक्याची मंडई झाली अस्ती. (कृ. ह. घ्या) अवांतर-- कोणत्यातरी ऐटी कंपनीत काम करता काय?

ना लांबड ना क्रमशः ची जिल्बी सगळ एका झटक्यात (थेट)... "तुमचं आमच सेम असते" अ‍ॅप्रेझल दिंडीतला "वारकरी"

In reply to by चित्रगुप्त

अर्थात आपल्याला समजून घेणाऱ्या प्रिय व्यक्तीचाच !(ती प्रिय व्यक्ती कोण हे प्रत्येकाने आपल्या categery प्रमाणे ठरवावे!)

आवडली.. मर्ढेकरांचे उंदीर "पिपात मेले" आणि आपले "कपात मरताहेत" .. हाच काय तो फरक ! आयुष्य " आयटी" असले तरीही "बेकेलायटी" आहे हेच जास्त खरे आहे ! उत्तम !

आवडली. टाय सूट काढा नि जीन्स शर्ट हेल्मेट घाला. नॉन ऐटी असूनही सहमत. - 'आप बहुत ज़्यादा होपलेस काम कर रहे हो' चं पालुपद सगळ्यांना ऐकवणार्‍या बुडबत पांडेचा सबार्निडेट