कॉफीचं कॅथार्सिस अर्थात चिडचिड-ए-सोमवार
अरबट कॉफी चरबट कॉफी |
कागदाच्या कपात करपट कॉफी ||
डोक्याची ग्रेव्ही, इनबॉक्सचं मटण |
कॅफेनची किक, बुळबुळीत बटण |
पहिला ढकलतोय, चारच बाकी |
कागदाच्या कपात करपट कॉफी ||१||
परीट घडी, टायचा बावटा |
आकड्यांची उसळ, एक्सेल पावटा |
बॉस निकम्मा, टीम पापी |
कागदाच्या कपात करपट कॉफी ||२||
पायांची घडी, मांडीवर पोट |
अप्रेझल मीटिंग, बोका भोट |
परफॉर्मन्स मदिरा, रेटिंग साकी |
कागदाच्या कपात करपट कॉफी ||३||
गारगिट्ट पोळ्या, बकाबकाबका |
सिग्रेटचा धूर, फकाफकाफका |
पगार, पीएफ, बोनस टॉफी |
कागदाच्या कपात करपट कॉफी ||४||
जबरा.
अगदी अगदी !
तुमचं नशीब थोर - मशीनजन्य
छान
वा वा
कविता आवडली .
आवडलं!!
वा आदुबाळा!
मस्तच फ्लो..
मस्त, चिडचिड पोहोचली.
मस्तच!
भावना पोचल्या, अगदी कसं भरभरुन आले!
सोल्लिड.
तुफ्फा....न!
बॉस निकम्मा, टीम पापी |
:-)
सर्व वाचकांचे आणि
लैच भारी झाले आहे. हे
है शाब्बास
कोणत्यातरी ऐटी कंपनीत काम
तुफान
झकास...
मस्त.
मायेचा हात कुणाचा?
सहीच... !!
सुंदर
लय भारी.
मर्ढेकरी बाज पर्फेक्ट पकडलाय.
आवडली.