✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मंदीरांचे व्यवस्थापन राज्य सरकारच्या ताब्यात द्यावे का?

ट
टॉपगिअर्ड फिलोसॉफर यांनी
गुरुवार, 01/16/2014 - 15:24  ·  लेख
लेख
आजच्या वर्तमानपत्रामध्ये पंढरपुर मंदीराचे व्यवस्थापन हे राज्य सरकारच्याच ताब्यात राहील असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राज्य सरकारने अधिनियम करुन १९८५ साली मंदीर व्यवस्थापन ताब्यात घेतले होते. त्याला बडवे व उत्पात या पुजारीं लोकांनी न्यायालयात आव्हान दिले होते. http://divyamarathi.bhaskar.com/article-ht/MAH-WMAH-pandharpur-temple-mangement-work-is-government-badve-utpat-appeal-rejected-by-su-4494499-NO.html अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर मुस्लिमांच्या आणि इंग्रजांच्या राजवटीतही आमचे अधिकार सुरक्षीत होते जे स्वराज्यात काढून घेतले जातात असा पुजारी सेवेकरी लोकांचा सूर आहे. महाराष्ट्र राज्यात अनेक मंदीरे आहेत, जिथे व्यवस्थापनाकडून अनागोंदी कारभार ,भ्रष्टाचार, दर्शनपास, पूजेसाठी व अभिषेकासाठी पुजार्यांकडून करण्यात येणारी सक्ती या सारख्या गोष्टींमुळे भाविक त्रस्त होत असल्याच्या बातम्या आपल्या निदर्शनास येत असतात. परंपरागत हक्क असणारे, पुजेचे मानकरी बर्याचदा स्वतःच मंदीराचे खाजगी मालमत्तेप्रमाणे व्यवस्थापन करताना बघायला मिळते . अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी या मंदीरांचे व्यवस्थापन राज्य सरकारने प्रस्थापीत कायद्यात बदल करुन ताब्यात घ्यावे काय? असे ताबांतर करुन मंदीरे, देवस्थाने यांची परिस्थीती सुधारेल का एवढाच प्रश्न शिल्लक राहतो.....
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
30808 वाचन

💬 प्रतिसाद (203)

प्रतिक्रिया

सचीनजी

अनिरुद्ध प
Fri, 01/17/2014 - 15:25 नवीन
एक प्रष्ण आहे उत्तर मिळण्याची अपेक्षा सुद्धा आहे कुम्भमेळा केव्हा असतो? ज्याच्या साठी सरकार आपल्या सांगण्यापमाणे ईतका खर्च करते,तसेच त्याचा विदा दिलात तर उत्तमच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचीन

सागर वैद्य, एबीपी माझा,

सचीन
Fri, 01/17/2014 - 15:54 नवीन
सागर वैद्य, एबीपी माझा, Monday, 25 November 2013 16:16 नाशिकचा कुंभमेळा नाशिक : नाशिकमध्ये होणऱ्या आगामी कुंभमेळ्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज कोल्हापूरचे संभाजीराजे भोसले यांनी विरोध केलाय. उत्तरप्रदेशातून चित्रविचित्र अवस्थेत येणाऱ्या आणि गांजा पिणाऱ्या साधूंवर दोन हजार कोटी खर्च करण्याऐवजी ते पैसे विधायक कामांवर खर्च करावे असंही संभाजीराजेंनी म्हटलंय.. मराठा आरक्षणासंदर्भात जनजागृती करण्यासाठी काढण्यात आलेली शिवशाहू यात्रा घेऊन रविवारी रात्री संभाजीराजे नाशिकमध्ये आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना संभाजीराजेंनी 2015 साली नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याला विरोध केला. उत्तर भारतातून येणाऱ्या तथाकथित व्यसनींवर पैसे वाया घालण्याऐवजी ते जनतेला उपयुक्त ठरतील अशा विधायक कामांवर खर्च करावे अशी मागणी संभाजीराजेंनी यावेळी केली....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

एक शंका: भांडारकर संस्थेच्या

बॅटमॅन
Fri, 01/17/2014 - 16:03 नवीन
एक शंका: भांडारकर संस्थेच्या नासधुशीला तुमचा पाठिंबा आहे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचीन

सरकार साधुंच्या व्यसनावर दोन हजार करोड खर्च करतं?

अर्धवटराव
Fri, 01/17/2014 - 16:04 नवीन
पुरोगामी सरकारची बदनामी करणारे आंधळे मोदी भक्त कुठल्या थराला जाऊन खोटं बोलतील याचा नेम नाहि. तिकडे ते टॉपगियर पवित्र कुराणाचा संबंध मोठ्या चलाखीने आतंकवादाशी जोडुन राहिले... आणि इकडे हे... चालु द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचीन

सचीनजी

अनिरुद्ध प
Fri, 01/17/2014 - 16:06 नवीन
कोर्टात साक्षीदार म्हणुन नाव काढणार तुम्ही,माझ्या माहीती प्रमाणे कुंभ मेळा हा बारा वर्षातुन एकदा येतो/असतो,आणि विदा द्या असे सांगीतल्या वर एखादी बातमी द्या असे नव्हे भारत स्वतंत्र झाल्या पासुन चा म्हणजे ईतक्या वर्षात किती खर्च झाला याचा अभ्यास उपयोगी पडला असता असो प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचीन

कुंभमेळा बारा वर्षातून एकदा

सचीन
Fri, 01/17/2014 - 16:17 नवीन
कुंभमेळा बारा वर्षातून एकदा येतो म्हणून २००० कोटी खर्च. १२ वर्षातून एकदा येणारा कुंभमेळा नाशिकला १ वर्ष असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

हाज यात्रेचा खर्च काढा की. तो

बॅटमॅन
Fri, 01/17/2014 - 16:21 नवीन
हाज यात्रेचा खर्च काढा की. तो जास्त आहे हे उघडच आहे. कशाला वेस्ट करावे मग सरकारने पैसे हाजवर तरी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचीन

.

उद्दाम
Sat, 01/18/2014 - 11:41 नवीन
हिंदु धर्मातील यात्रा , इतर विधीही स्वखर्चानेच करायचे असतात . असा नक्की लेखी नियम नसला तरी संकेत नक्कीच आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हजयात्रेला जाणा-या

सचीन
Fri, 01/17/2014 - 16:32 नवीन
हजयात्रेला जाणा-या यात्रेकरूंना भारत सरकारतर्फे दिली जाणारी सबसीडी पुढील दहा वर्षात टप्याटप्याने संपवावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.पण कुंभमेळ्यावरील अफाट खर्चाचे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचीन

तो चालूच रहावा असा आदेश आम्ही

मंदार दिलीप जोशी
Fri, 01/17/2014 - 16:38 नवीन
तो चालूच रहावा असा आदेश आम्ही देत आहोत :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचीन

तुम्ही आहात की. करा अ

बॅटमॅन
Fri, 01/17/2014 - 16:38 नवीन
तुम्ही आहात की. करा अ‍ॅप्लिकेशन सर्कारकडे, होऊदे खर्च!!! आम्ही तुमच्या स्तुतिपर चार जिलब्या टाकतो हाकानाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचीन

आवो त्यांची नेमणूक फकस्त

मंदार दिलीप जोशी
Fri, 01/17/2014 - 16:40 नवीन
आवो त्यांची नेमणूक फकस्त ऑनलाईण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

असे तुम्ही

अनिरुद्ध प
Fri, 01/17/2014 - 17:32 नवीन
म्हणताय्,ते सुद्धा २०१५ च्या कुम्भमेळ्या बाबतीत,बरे एक सान्गा हा खर्च कोण करतो?म्हणजे केन्द्र सरकार की राज्य सरकार? आणि जर असेच असेल तर ऑलिम्पिक तसेच ईतर स्पर्धा यावर होणारा खर्च सुद्धा तुमच्यासाठी अनावश्यकच असेलना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचीन

सरकारने खेळाला प्राधान्य दिले

सचीन
Fri, 01/17/2014 - 17:41 नवीन
सरकारने खेळाला प्राधान्य दिले पाहिजे. धर्माला नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

मंग मंदिरे ताब्यात घेऊन

परिंदा
Fri, 01/17/2014 - 18:00 नवीन
मंग मंदिरे ताब्यात घेऊन त्यांच्या व्यवस्थापनाचा खर्च तरी का करावा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचीन

मंदिराचे उत्पन्न अफाट असते.

सचीन
Fri, 01/17/2014 - 18:06 नवीन
मंदिराचे उत्पन्न अफाट असते. व्यवस्थापनाचा खर्च परवडू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिंदा

तुमचे चांगले लोकप्रतिनिधी नमो

टॉपगिअर्ड फिलोसॉफर
Fri, 01/17/2014 - 13:02 नवीन
तुमचे चांगले लोकप्रतिनिधी नमो की कोण त्यांना निवडुन द्या मग...
  • Log in or register to post comments

बरोबर नमो आले तर मंदिरांचे

सचीन
Fri, 01/17/2014 - 14:14 नवीन
बरोबर नमो आले तर मंदिरांचे व्यवस्थापन सुधारू शकते... देशाच्या व्यवस्थापनाबद्दल मात्र शंका आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टॉपगिअर्ड फिलोसॉफर

अहो तुमच्या गुढघ्याला 2014 चे

मंदार दिलीप जोशी
Fri, 01/17/2014 - 14:17 नवीन
अहो तुमच्या गुढघ्याला 2014 चे बाशिंग बांधलेल्या पप्पूला थांबायला सांगितलंय त्याच्या इटालियन मम्मीने. नमोमुळे वीतभर फाटलीये काँग्रेसवाल्यांची. "फाटलेली शिवायला वेळ हवा आहे" या सारख्या निवडणुकांच्या आधी पंतप्रधानपदासाठी कँडिडेट घोषित करण्याची परंपरा काँग्रेसमधे नसल्याची सबब पुढे करत पळ काढलाय. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचीन

केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी

टॉपगिअर्ड फिलोसॉफर
Fri, 01/17/2014 - 14:26 नवीन
केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी यांची पब्लिसीटी हायजॅक केली आहे, आता परत ती कशी मिळवायची यासाठी भाजपचे तरुण म्हातारे चिंतन बैठकीला बसले आहेत .:-P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी

भाजपचे म्हातारे तरुण चिंतन

सचीन
Fri, 01/17/2014 - 14:46 नवीन
भाजपचे म्हातारे तरुण चिंतन बैठकीला बसले तेरी सरकार मात्र काँग्रेसचेच येणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टॉपगिअर्ड फिलोसॉफर

झाली सुरु परत चरा पड्लेली

गब्रिएल
Fri, 01/17/2014 - 15:01 नवीन
झाली सुरु परत चरा पड्लेली रेकाट. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचीन

नमो पंढरपुराचे लोकप्रतिनिधी

मंदार दिलीप जोशी
Fri, 01/17/2014 - 14:10 नवीन
नमो पंढरपुराचे लोकप्रतिनिधी आहेत? :P :D
  • Log in or register to post comments

अरे सचीनजीनी

अनिरुद्ध प
Fri, 01/17/2014 - 15:41 नवीन
उत्तर न देताच पळ काढला काय?
  • Log in or register to post comments

.

उद्दाम
Fri, 01/17/2014 - 15:45 नवीन
सगळी मंदिरे गोदरेज कंपनीला चालवायला द्यावीत ( आणि कुलुपं लावून बंद करावीत. )
  • Log in or register to post comments

तुम्ही कुलुपांची एजन्सी घेतली

मंदार दिलीप जोशी
Fri, 01/17/2014 - 16:24 नवीन
तुम्ही कुलुपांची एजन्सी घेतली आहे का? *mosking*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

का तुमाला कुलुपं फोडायची भारी

टॉपगिअर्ड फिलोसॉफर
Fri, 01/17/2014 - 16:42 नवीन
का तुमाला कुलुपं फोडायची भारी हौस आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी

सर्व मशिदी आणि मदरसे ISI च्या

Dhananjay Borgaonkar
Fri, 01/17/2014 - 16:42 नवीन
सर्व मशिदी आणि मदरसे ISI च्या हवाली ऑफिशियली करावीत. तसेही अनऑफिशियली कधीच त्यांनी ताबा घेतलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

आँ ????

टॉपगिअर्ड फिलोसॉफर
Fri, 01/17/2014 - 16:44 नवीन
आँ ????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar

काय हो गाडी एकदम रिव्हर्स

मंदार दिलीप जोशी
Fri, 01/17/2014 - 16:46 नवीन
काय हो गाडी एकदम रिव्हर्स गिअरात गेली का? :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टॉपगिअर्ड फिलोसॉफर

(No subject)

सचीन
Fri, 01/17/2014 - 17:23 नवीन
*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टॉपगिअर्ड फिलोसॉफर

वर माहितगार यांनी जो

परिंदा
Fri, 01/17/2014 - 16:37 नवीन
वर माहितगार यांनी जो पंढरपूरचा अनुभव दिला आहे, थोडाफार तसाच अनुभव आम्हाला अजमेर दर्ग्याला आला. (हो, आम्ही दर्ग्यातही जातो. हिंदुत्ववादी असुनही) जवळ जवळ १-२ किमीवर गाडी पार्क करायला लागली. ड्रायवर लोकलच होता. त्याने सांगितले सगळे दागदागिने, घड्याळं, पैसे गाडीतच ठेवा. जरुरीपुरते पैसे घेऊन जा. गाडी पार्क केली होती एका घराजवळ. त्यांनी २५० रुपये घेतले. तिथून रिक्षा आणि दर्शन. पर हेड १०० रुपये. मग दर्ग्याजवळ गेल्यावर ठराविक दुकानातूनच फुले आणि चादर घ्यायला लावली. दुसरे फुलवाले अगदी हाताला धरुन ओढत होते. पण पैसे तेवढेच मागत होते. मग बरीच ढकलाढकली करत त्या रिक्षावाल्याने आत समाधीजवळ नेले. गळ्यात एक धागा घातला आणि सोडेच्ना. हा काय प्रकार. त्याने तेव्हा दक्षिणा मागितली. परत १०० रुपये पर हेड दिले. तेव्हा त्याने काही मंत्र म्हणून तो धागा गळ्यात बांधला. (गंडाच बांधला म्हणा ना!) जवळच कुठल्यातरी ट्रस्टच्या ओफिसात नेऊन गरिबांना जेवण देण्यासाठी देणगी द्यायला लावली. मग कसबस गल्लीबोळातून परत रिक्षाने पार्किंग जवळ नेऊन सोडले.
  • Log in or register to post comments

हो...

अत्रन्गि पाउस
Fri, 01/17/2014 - 19:02 नवीन
फत्तेपूर सिक्रीला असाच ७०० /८०० रुपयांना चुना लावला... त्यानिमित्ताने 'भ','ग' आणि 'झ' कारयुक्त अपशब्दांची चांगली उजळणी झाली...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिंदा

फत्तेपूर सिक्रीला असाच ७००

टॉपगिअर्ड फिलोसॉफर
Fri, 01/17/2014 - 19:10 नवीन
फत्तेपूर सिक्रीला असाच ७०० /८०० रुपयांना चुना लावला... त्यानिमित्ताने 'भ','ग' आणि 'झ' कारयुक्त अपशब्दांची चांगली उजळणी झाली...
अशीच ऐनॉटॉमी आणि बायलॉजीकल फंक्शन्स ,बिहेवियर या विषयाची उजळणी अनेक मंदीरातदेखिल होते, हे ही नमूद करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

अगदी सहमत

सचीन
Fri, 01/17/2014 - 19:43 नवीन
अगदी सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टॉपगिअर्ड फिलोसॉफर

असहमत...

अत्रन्गि पाउस
Fri, 01/17/2014 - 21:15 नवीन
म्हणजे आपण 'अनेक' मंदिरात उजळणी करायला जाता कि काय... माझा अनुभव एकदाच आलेला आहे हे नमूद करणे आवश्यक आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टॉपगिअर्ड फिलोसॉफर

नवल नाही

माहितगार
Fri, 01/17/2014 - 19:48 नवीन
स्टॅटीस्टीकली वाईट आणि चांगली माणस सर्वसाधारणतः सर्व जाती धर्म भाषा प्रांत देश यात साधारणतः सारखीच वाटली जात असावीत आपण नेमके कुठे अनुभव घेत असतो ऐकत असतो त्यानुसार स्थल काल आणि वापरलेल्या पद्धती परत्वे थोडा फार फरक पडत असावा. कोणतीही गोष्ट इन्स्टीट्यूशनलाईज झाली असतील शीते तेथे जमतील भूते असा भूतवास चालू होतो. अयोग्य गोष्टीं शोधून त्यांचा विरोध समाजबदल आणि निर्मूलन करताना जाती धर्म भाषा प्रांत या नूसार भेद आणि अपवादही करू नयेत तरच त्यांना सवलत देता आम्हाला का नाही असा आवाज कमी होतो.पण वाईट वागण्यात त्यांना सवलत म्हणून आम्हालाही द्या याचे मात्र हे समर्थन ठरू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिंदा

छोटी अ‍ॅडीशन

माहितगार
Fri, 01/17/2014 - 19:53 नवीन
फेल्यूअर टू आयडेंटीफाय अँड अ‍ॅक्ट हि खरतर सवलत नव्हेच फेल्यूअर इज अ फेल्यूअर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

हा धागा मुद्दामुन

Dhananjay Borgaonkar
Fri, 01/17/2014 - 16:54 नवीन
हा धागा मुद्दामुन चिथवण्यासाठीच काढला गेला आहे हे (लेखकाच्या) प्रतिसादावरुन स्पष्ट होतय. स्वतःच्या खाली काय जळतय ते पहा. यांच्यात उगा येऊन कोणी पण सोम्या गोम्या फतवा काढतो आणि हे खाली मुंडी घालुन स्वःताचं डोकं न चालवाता ऐकतात.हे काय सांगणार आम्हाला.
  • Log in or register to post comments

शंकाच नही..

अत्रन्गि पाउस
Fri, 01/17/2014 - 21:17 नवीन
ह्यात शंका नाहीच....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar

मस्त धागा....

मुक्त विहारि
Fri, 01/17/2014 - 17:39 नवीन
आणि अप्रतिम प्रतिसाद. लगे रहो
  • Log in or register to post comments

+1 करमणुक झाली कालपासुन

जेपी
Fri, 01/17/2014 - 18:02 नवीन
+1 करमणुक झाली कालपासुन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

हेच म्हणतो.....

मुक्त विहारि
Fri, 01/17/2014 - 21:40 नवीन
हे असेच उत्तम धागे वरचे वर निघावेत. बाय द वे आपली भेट कधी होणार? परदेशी माणसांची भेट झाली, पण आपली भेट अद्याप बाकी आहे.जमले तर या डोंबिवलीला. मस्त बियर पिवू आणि सुरेल जूनी हिंदी गाणी ऐकत पडले राहू. (आमंत्रण जरी नागपूरी स्टाइलने असले, तरी यजमान मुंबईकर आहे, हे आपल्या सारख्या मुद्दामहून जास्त विचार न करणार्‍या व्यक्तीला सांगायला नकोच.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

.

उद्दाम
Sat, 01/18/2014 - 11:39 नवीन
आमालाही बोलवा की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

आपण महाभारत वाचले आहे का?

मुक्त विहारि
Sat, 01/18/2014 - 15:45 नवीन
आम्ही तुम्हाला बोलावू शकत नाही. ह्याचे उत्तर महाभारतात दिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

बाय द वे आपली भेट कधी होणार?

जेपी
Sat, 01/18/2014 - 11:30 नवीन
बाय द वे आपली भेट कधी होणार? परदेशी माणसांची भेट झाली, पण आपली भेट अद्याप बाकी आहे.जमले तर या डोंबिवलीला. मस्त बियर पिवू आणि सुरेल जूनी हिंदी गाणी ऐकत पडले राहू. (आमंत्रण जरी नागपूरी स्टाइलने असले, तरी यजमान मुंबईकर आहे, हे आपल्या सारख्या मुद्दामहून जास्त विचार न करणार्‍या व्यक्तीला सांगायला नकोच.) बघु कधि जमतय. :-)
  • Log in or register to post comments

हा़जला दिली जाणारी हजारो

श्रीगुरुजी
Sat, 01/18/2014 - 13:13 नवीन
हा़जला दिली जाणारी हजारो कोट्यावधी रूपयांची प्रत्यक्ष सबसिडी व १२ वर्षातून एकदा येणार्‍या कुंभमेळ्यावरील खर्च यात गफलत होताना दिसत आहे. हाजला जाणार्‍या प्रत्येकाला अत्यंत स्वस्तात (म्हणजे प्रतिमाणशी रू. १२,००० फक्त) विमानाचे जाण्यायेण्याचे तिकीट दिले जाते. पुणे-बंगळूर या ५०० कि.मिं.च्या सव्वा तासाच्या विमानप्रवासाला जाऊनयेऊन १५-१६ हजार रू. लागतात. पण भारतातल्या कोणत्याही कानाकोपर्‍यातून किमान २००० कि.मि. हून अधिक अंतर असलेल्या सौदी मध्ये जाण्यासाठी फक्त १२ हजार रू. लागतात. बाजारभावाने तिकीट काढले तरी किमान ३०००० रू. लागतील. म्हणजे हाजसाठी प्रतिमाणशी किमान १८-२० हजार रू. ची प्रत्यक्ष सबसिडी प्रवाशांना मिळते. याउलट कुंभमेळ्यासाठी देशाच्या कानाकोपर्‍यातून जाणार्‍यांना भाविकांना कोणतीच प्रत्यक्ष सबसिडी मिळत नाही. कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्या शहराची सफाई केली जाते, रस्ते/सांडपाणी व्यवस्था/वीज पुरवठा इ. दुरूस्तीची कामे केली जातात. घाट, नदीकाठचा परिसर साफ करून सुशोभित केला जातो. या इन्फ्रस्ट्रक्चरशी संबंधित कामांचा फायदा अंतिमतः त्या शहरातील नागरिकांनाच होतो. एखाद्या शहरात राष्ट्रपतींची भेट असेल तर त्या निमित्ताने ते ज्या भागात जाणार असतील त्या भागातील रस्त्यांवरील खड्डे बुजवून, रस्ते साफ केले जातात. याचा प्रत्यक्ष फायदा त्या भागातील रहिवाशांनाच होतो. कुंभमेळ्याच्या निमित्ताने केलेल्या विकासकामांचा असाच फायदा होतो. अशी कामे करणे म्हणजे सबसिडी नव्हे. कुंभमेळ्याला जाणार्‍या कोणालाही सरकार स्वतःहून एक रूपया सुद्धा देत नाही. हाजला जाणार्‍यांना प्रत्यक्ष सबसिडी मिळते, पण तशी कोणतीही सबसिडी कुंभमेळ्याला जाणार्‍यांना मिळत नाही. कुंभमेळ्याचा एक अजून फायदा म्हणजे कुंभमेळ्यासाठी अनेक परदेशी पर्यटक भारतात येऊन त्यात सहभागी होतात. अनेक विदेशी वृत्तवाहिन्या कुंभमेळ्याचे चित्रीकरण परदेशात दाखवितात. पर्यटनवाढ हा देखील कुंभमेळ्याचा फायदा आहे. त्यामुळे मुस्लिमांचे लांगूललाचन करण्यासाठी सबसिडीच्या स्वरूपात दिलेली लाच व कुंभमेळ्याच्या निमित्ताने केलेली शहरसुधारणा यात जमीनअस्मानाचा फरक आहे. बाकी तुमचं चालू द्या.
  • Log in or register to post comments

.

उद्दाम
Sat, 01/18/2014 - 14:08 नवीन
यात्रा झाल्याने त्या गावाचा पार उक्किरडा होतो. मंजूर झालेल्या पैशाचा काही क्रिएटिव फारसा होत नाही. वाडी , पंढरपूर बघा म्हणजे समजेल. विमानाचे तिकिट किती हवे हे सरकार ठरवते. आता दिले सरकारने सवलतीत तिकिट तर ते नाकारावे, असेही कुठे पुस्तकात लिहिले नसावे नै का? त्यामुळे उगाचच हजच्या बाबतीत गळे काढू नयेत .. फारच मनस्ताप होत असेल तर पोराला कावड घ्यायला सांगून त्यात बसून हिंदूंनी काशीयात्रा करावी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

.

उद्दाम
Sat, 01/18/2014 - 14:09 नवीन
शहर सुधारणाच करायची असेल तर कुंभमेळ्याचे निमित्त कशाला? आणि जिथे कुंभमेळा भरत नाही, तिथल्या लोकानी काय पाप केले आहे? त्याना नकोत काय सुधारणा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ही बातमी वाचाhttp:/

टॉपगिअर्ड फिलोसॉफर
Sat, 01/18/2014 - 14:39 नवीन
ही बातमी वाचा http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5724976.cms?prtpage=1 - म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात तिसऱ्यांदा सत्ता ग्रहण केलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारने आगामी वषीर्च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजापुरच्या भवानीपासून मालवण तालुक्यातील भराडी देवीपर्यंत सर्व देवस्थानांच्या विकासाकरिता भरीव तरतूद करून देवदेवतांचा कोप होणार नाही याची चोख व्यवस्था केली आहे. याचप्रमाणे नाटककार विजय तेंडुलकर यांच्यापासून निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृती जतन करण्याकरिता तरतूद करण्यात आली आहे. ........ * तुळजापूरच्या भवानीमातेच्या देवस्थानाकरिता विकास प्राधिकरण. आगामी वर्षाकरिता ७५ कोटी रुपयांची तरतूद * संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या जन्मचतु:शताब्दीनिमित्त देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर व पालखी तळ या ठिकाणच्या कामांसाठी १४० कोटी रुपये * शेगाव येथील गजानन महाराजांच्या समाधीस १०० वषेर् पूर्ण होत असल्यामुळे तेथील सोहळ्याकरिता २५० कोटी रुपये. त्यापैकी ६५ कोटींची तरतूद आगामी वर्षात. * तीर्थक्षेत्र पैठणच्या विकासासाठी तुळजापूर, शिडीर्च्या धतीर्वर विकास प्राधिकरण स्थापन करणार. त्यासाठी २०० कोटींचा विकास आराखडा प्रस्तावित. * जेजुरी देवस्थान विकासाकरिता पाच कोटी रुपये * कोकणातील श्री क्षेत्र परशुरामकरिता पाच कोटी, भराडी देवी माता देवस्थानाकरिता दोन कोटी तर श्री क्षेत्र कुणकेश्वरकरिता दोन कोटी रुपये ...................... एवढे पैसे खर्च करुनही हज यात्रेच्या नावाने फुका गळा कशाला काढताय वर धाग्यचा विषय धरुन एवढेच म्हणतो की इतके कोटी या देवस्थांनाना द्यायचे वर यांचीच मनमानी ऐकूण घ्यायचे काय कारण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा