२०१४ च्या निवडणुका जवळ येत आहेत ह्या निवडणुकांचा निकाल हा देशाचे भवितव्य ठरवणारा असेल. देश विकासाच्या दिशेने अजून मोठाली क्षेत्रे काबीज करणार कि धर्माचे राजकारण करत पाकच्या, बांगलादेशाच्या रांगेत जाऊन बसणार. देशाने गेल्या ६६ वर्षात शून्यातून सुरवात करून अफाट प्रगती केली. दुसर्या बाजूला अनेक अडचणी आहेत अफाट लोकसंख्या, भ्रष्टाचार,धार्मिक दंगे,जातीय समस्या, दहशतवाद ,भाषिक वाद, प्रांतवाद ,बुवाबाजी, अंधश्रद्धा, निरक्षरता .दुसरा कुठला देश असता तर ह्या साऱ्यांमध्ये हतबल होवून गेला असता नष्ट झाला असता.
ब्रीटीशांनाही भारताला स्वातंत्र्य तर मिळालेय पण ते कुठपर्यंत टिकवता येईल ह्याबाबत शंका होती .पण आपल्या देशाने ती खोटी ठरवली व देशाचा कारभार यशस्वीरीत्या केल्या. स्वातंत्र्यपूर्व काळात जे महान नेते होते त्यांचे आदर्श नवीन पिढी समोर होते. देशाची भक्कम घटना नि त्या घटनेला न्याय देणारे राज्यकर्ते भारताला लाभले हि आपल्या देशासाठी मोठी सुदैवाची बाब आहे. सत्ताधार्यांकडून काही प्रमाणात घटनेला धाब्यावर बसवण्याचेही प्रयत्न झाले पण ते यशस्वी होवू शकले नाही. भारताची घटना हि योग्य असल्यानेच आणि सुजाण राज्यकर्ते लाभल्यानेच भारताचा विकास झाला. अन्यथा आपला देश हा पाकिस्तानच्या वाटेने कधीच गेला असता.आपण आणि पाकिस्तान एकत्रच स्वतंत्र झालो पण आज पाकिस्तानची अवस्था काय आहे हे साऱ्या जगाला दिसतेय धर्मावर आधारित राजकारण केल्याची विषारी फळे आज तिथली जनता भोगतेय.
आज आपण कॉम्पुटर युगात आहोत हेही राज्याकार्त्यांच्याच दूरदृष्टीचे परिणाम. याचा अर्थ देशात सारे आलबेल आहे असे नव्हे प्रश्न समस्या असायच्याच पण त्याच्याशी धैर्याने मुकाबला करण्यात येत आहे. जगात असा एकही देश नाही जेथे सारे आलबेल असेल. भारत स्वातंत्र्य होवून ६६ वर्षे उलटली ६६ वर्षाचा हा कालावधी मानवी जीवनासाठी मोठा कालावधी वाटत असला तरी देशासाठी हा अत्यंत लहान कालावधी आहे. ह्या इतक्या कमी कालावधीत देश सर्वच क्षेत्रात ज्या वेगाने मुसंडी मारत आहे ते पाहून सर्व भारतीयांचा उर अभिमानाने भरून आला पाहिजे.
देशाच्या विकासाचे नियोजन करण्यात सत्ताधारी पक्षांनी (काही अपवाद वगळता) उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. अजूनही सर्व समस्या सुटलेल्या नाहीत पण पेला अर्धा भरलाय, ह्यात आनंद मानायचा कि अर्धा रिकामा आहे ह्याचे दुखः करत बसायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. दुर्दैवाने बरीच जनता पेला अर्धा रिकामा आहे म्हणून दुख करणारी आहे. देशाच्या विकासातही काही महाभाग भकास काय आहे हे शोधत बसतात. तर आदर्श राज्यकर्ते ते असतात जे भकासातून विकास करून दाखवतात.
२०१४ च्या निवडणुकीत देशात पुढील प्रमाणे स्तिथी येवू शकते व त्यानुसार कोण प्रधानमंत्री बनू शकतो ह्याबद्दलचा हा अंदाज
१)कॉंग्रेसला बहुमत- प्रधानमंत्री-राहुल गांधी किंवा सोनिया गांधी
२)तिसरी आघाडी- ह्यांना बहुमत मिळाले नाही तर कॉंग्रेसच्या पाठींब्याने समविचारी पक्षांचे सरकार येवू शकते -प्रधानमंत्री- मुलायम सिंग यादव
३)मायावतींनी जर उत्तर प्रदेशात ४० जागांपर्यंत मजल मारली तर कॉंग्रेसच्या पाठींब्याने त्याही प्रधानमंत्री बनू शकतात.
प्रादेशिक पक्षांच्या कामगिरीचा ह्या निवडणुकीवर प्रभाव राहील. आप सारखी नवीन पार्टी बरीच मते मिळवू शकते. परंतु सत्तेचे सोपान मात्र कॉंग्रेस किंवा तिसर्या आघाडीकडेच राहतील असे देशातील सध्याचे वातावरण आहे.
भाजपा ह्या निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर राहील अशी चिन्न्ह आहेत परंतु आपच्या राजकारणातील प्रवेशामुळे नि प्रादेशिक पार्ट्यांच्या सध्याच्या वर्चस्वामुळे तिसऱ्या स्थानासाठी भाजपा नि आपमध्ये चुरस राहू शकते.
शेवटी लोकशाही जपणारा, देशाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारा, धर्मनिरपेक्ष, मानवी विकासाची जाण असणारा पक्षच सत्तेवर यावा हीच तमाम भारतीयांची अपेक्षा असेल.
वाचने
22645
प्रतिक्रिया
124
मिसळपाव
प्रतिक्रिया
शुभेच्छा ...
धन्यवाद
In reply to शुभेच्छा ... by छोटा डॉन
धन्यवाद
In reply to धन्यवाद by सचीन
१++++++++++++
In reply to शुभेच्छा ... by छोटा डॉन
सचीन भाऊ कढुन आणखीन एक विडंबन
भाजपा ह्या निवडणुकीत तिसऱ्या
दुरुस्ती
In reply to भाजपा ह्या निवडणुकीत तिसऱ्या by मृत्युन्जय
मिपा सध्ध्या मार्केटिंग साठी
सच्च्चिन...सच्च्चिन...
+१
+१००००...०
In reply to +१ by क्लिंटन
विचार प्रवर्तक लेख....
त्यात त्रिफळाचित व्हायचे कारण
In reply to विचार प्रवर्तक लेख.... by मुक्त विहारि
परफेक्ट....
In reply to त्यात त्रिफळाचित व्हायचे कारण by ग्रेटथिन्कर
देशाचे भले करायचे असेल तर
In reply to परफेक्ट.... by सुहासदवन
पुरोगामी म्हन्जी??
In reply to देशाचे भले करायचे असेल तर by सचीन
ढेरेजी पुरोगामी म्हणजे ठावूक
In reply to पुरोगामी म्हन्जी?? by अनुप ढेरे
स'चीन'जी यांच्या हो ला हो
In reply to ढेरेजी पुरोगामी म्हणजे ठावूक by सचीन
गडे सांगाना पुरोगामी पणा
In reply to ढेरेजी पुरोगामी म्हणजे ठावूक by सचीन
मनोरजंक माहिति
"लालूजी धर्मांधाना
तुमची भाकिते माझ्या नावावर
In reply to "लालूजी धर्मांधाना by होबासराव
राहुल गांधि पंतप्रधान
बहुतांशी सहमत, फक्त..
बरोबर आहे..
In reply to बहुतांशी सहमत, फक्त.. by विकास
विनोद वीर
होबास राव एका प्रतिक्रियेत
In reply to विनोद वीर by होबासराव
अजुन किती विनोदी लिहिणार हो
In reply to विनोद वीर by होबासराव
एखादा हसुन हसुन मेला तर
In reply to विनोद वीर by होबासराव
(No subject)
In reply to एखादा हसुन हसुन मेला तर by यसवायजी
अहो मालक तुम्हि माझी पहिलि
अरेच्च्या उपरोध असा असतो काय!
In reply to अहो मालक तुम्हि माझी पहिलि by होबासराव
बाकी काहिही असुदे....पण काय
In reply to अरेच्च्या उपरोध असा असतो काय! by सचीन
शाब्ब्बास सचिन शेट
In reply to अरेच्च्या उपरोध असा असतो काय! by सचीन
@ चौरा काका
In reply to शाब्ब्बास सचिन शेट by चौकटराजा
अहो भावी घटनाकार आहेत चौरा
In reply to @ चौरा काका by मुक्त विहारि
खरे तर मी माझा वेळ वाया घालवणार न्हवतो पण..चला....
In reply to अहो भावी घटनाकार आहेत चौरा by सचीन
खी खी खी खी खी खी खी खी खी खी
In reply to खरे तर मी माझा वेळ वाया घालवणार न्हवतो पण..चला.... by मुक्त विहारि
आपण अगदी
In reply to अहो भावी घटनाकार आहेत चौरा by सचीन
एकही नया पैसा न घेता
In reply to आपण अगदी by चौकटराजा
मला नाही वाटत कुठल्याही
In reply to एकही नया पैसा न घेता by सचीन
अच्छा ! आस्सं होय ?
In reply to एकही नया पैसा न घेता by सचीन
कोठलेही रिझर्वेशन न मागता ! ?
In reply to अच्छा ! आस्सं होय ? by चौकटराजा
प्रश्नचिन्ह कशाला ?
In reply to कोठलेही रिझर्वेशन न मागता ! ? by सचीन
?
In reply to प्रश्नचिन्ह कशाला ? by चौकटराजा
चौरा मला वाटाते प्रश्न चुकीचा
In reply to प्रश्नचिन्ह कशाला ? by चौकटराजा
अगदी मान्य
In reply to चौरा मला वाटाते प्रश्न चुकीचा by मृत्युन्जय
@ सचीन....
In reply to अरेच्च्या उपरोध असा असतो काय! by सचीन
सत्तेचा स्वीकार केल्यावर...
हुप्प्या तुम्हालाही सोनियांना
In reply to सत्तेचा स्वीकार केल्यावर... by हुप्प्या
लेख मनोरजंक आहे
हैला
नॉस्टर् डंबस
In reply to हैला by विनायक प्रभू
नॉस्टर् डंबस की नॉस्टर् डँबीस
In reply to हैला by विनायक प्रभू
हि चालबाजी चालणार नाहि.
काँग्रेसच सत्तेत यावी.
साऱ्या गोरगरीब,धर्मनिरपेक्ष,
In reply to काँग्रेसच सत्तेत यावी. by संग्राम कदम
प्रधानमंत्री की पंतप्रधान
ब्रिगेड चा फतवाच आहे तसा
In reply to प्रधानमंत्री की पंतप्रधान by निल्या१
ज ब रा
In reply to ब्रिगेड चा फतवाच आहे तसा by लोटीया_पठाण
पंत प्रधान पेक्षा
In reply to ब्रिगेड चा फतवाच आहे तसा by लोटीया_पठाण
देशाच्या विकासाचे नियोजन
कॉंग्रेस वगळता इतर पक्षांचे
In reply to देशाच्या विकासाचे नियोजन by खटपट्या
म्हणजे कोन्ग्रेस ने
In reply to कॉंग्रेस वगळता इतर पक्षांचे by सचीन
जपानचे लोक सज्जन आहेत त्यांनी
In reply to म्हणजे कोन्ग्रेस ने by खटपट्या
जातींचा आणि विकासाचा काय
In reply to जपानचे लोक सज्जन आहेत त्यांनी by सचीन
जातीचा आणि विकासाचा काहीच
In reply to जातींचा आणि विकासाचा काय by खटपट्या
तुमच्या हसण्याला माझी हरकत
In reply to जातीचा आणि विकासाचा काहीच by सचीन
पप्पूच्या निमित्ताने भारताला
>>> पप्पूच्या निमित्ताने
In reply to पप्पूच्या निमित्ताने भारताला by मंदार दिलीप जोशी