२०१४-निवडणुकांची रणधुमाळी
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
२०१४ च्या निवडणुका जवळ येत आहेत ह्या निवडणुकांचा निकाल हा देशाचे भवितव्य ठरवणारा असेल. देश विकासाच्या दिशेने अजून मोठाली क्षेत्रे काबीज करणार कि धर्माचे राजकारण करत पाकच्या, बांगलादेशाच्या रांगेत जाऊन बसणार. देशाने गेल्या ६६ वर्षात शून्यातून सुरवात करून अफाट प्रगती केली. दुसर्या बाजूला अनेक अडचणी आहेत अफाट लोकसंख्या, भ्रष्टाचार,धार्मिक दंगे,जातीय समस्या, दहशतवाद ,भाषिक वाद, प्रांतवाद ,बुवाबाजी, अंधश्रद्धा, निरक्षरता .दुसरा कुठला देश असता तर ह्या साऱ्यांमध्ये हतबल होवून गेला असता नष्ट झाला असता.
ब्रीटीशांनाही भारताला स्वातंत्र्य तर मिळालेय पण ते कुठपर्यंत टिकवता येईल ह्याबाबत शंका होती .पण आपल्या देशाने ती खोटी ठरवली व देशाचा कारभार यशस्वीरीत्या केल्या. स्वातंत्र्यपूर्व काळात जे महान नेते होते त्यांचे आदर्श नवीन पिढी समोर होते. देशाची भक्कम घटना नि त्या घटनेला न्याय देणारे राज्यकर्ते भारताला लाभले हि आपल्या देशासाठी मोठी सुदैवाची बाब आहे. सत्ताधार्यांकडून काही प्रमाणात घटनेला धाब्यावर बसवण्याचेही प्रयत्न झाले पण ते यशस्वी होवू शकले नाही. भारताची घटना हि योग्य असल्यानेच आणि सुजाण राज्यकर्ते लाभल्यानेच भारताचा विकास झाला. अन्यथा आपला देश हा पाकिस्तानच्या वाटेने कधीच गेला असता.आपण आणि पाकिस्तान एकत्रच स्वतंत्र झालो पण आज पाकिस्तानची अवस्था काय आहे हे साऱ्या जगाला दिसतेय धर्मावर आधारित राजकारण केल्याची विषारी फळे आज तिथली जनता भोगतेय.
आज आपण कॉम्पुटर युगात आहोत हेही राज्याकार्त्यांच्याच दूरदृष्टीचे परिणाम. याचा अर्थ देशात सारे आलबेल आहे असे नव्हे प्रश्न समस्या असायच्याच पण त्याच्याशी धैर्याने मुकाबला करण्यात येत आहे. जगात असा एकही देश नाही जेथे सारे आलबेल असेल. भारत स्वातंत्र्य होवून ६६ वर्षे उलटली ६६ वर्षाचा हा कालावधी मानवी जीवनासाठी मोठा कालावधी वाटत असला तरी देशासाठी हा अत्यंत लहान कालावधी आहे. ह्या इतक्या कमी कालावधीत देश सर्वच क्षेत्रात ज्या वेगाने मुसंडी मारत आहे ते पाहून सर्व भारतीयांचा उर अभिमानाने भरून आला पाहिजे.
देशाच्या विकासाचे नियोजन करण्यात सत्ताधारी पक्षांनी (काही अपवाद वगळता) उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. अजूनही सर्व समस्या सुटलेल्या नाहीत पण पेला अर्धा भरलाय, ह्यात आनंद मानायचा कि अर्धा रिकामा आहे ह्याचे दुखः करत बसायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. दुर्दैवाने बरीच जनता पेला अर्धा रिकामा आहे म्हणून दुख करणारी आहे. देशाच्या विकासातही काही महाभाग भकास काय आहे हे शोधत बसतात. तर आदर्श राज्यकर्ते ते असतात जे भकासातून विकास करून दाखवतात.
२०१४ च्या निवडणुकीत देशात पुढील प्रमाणे स्तिथी येवू शकते व त्यानुसार कोण प्रधानमंत्री बनू शकतो ह्याबद्दलचा हा अंदाज
१)कॉंग्रेसला बहुमत- प्रधानमंत्री-राहुल गांधी किंवा सोनिया गांधी
२)तिसरी आघाडी- ह्यांना बहुमत मिळाले नाही तर कॉंग्रेसच्या पाठींब्याने समविचारी पक्षांचे सरकार येवू शकते -प्रधानमंत्री- मुलायम सिंग यादव
३)मायावतींनी जर उत्तर प्रदेशात ४० जागांपर्यंत मजल मारली तर कॉंग्रेसच्या पाठींब्याने त्याही प्रधानमंत्री बनू शकतात.
प्रादेशिक पक्षांच्या कामगिरीचा ह्या निवडणुकीवर प्रभाव राहील. आप सारखी नवीन पार्टी बरीच मते मिळवू शकते. परंतु सत्तेचे सोपान मात्र कॉंग्रेस किंवा तिसर्या आघाडीकडेच राहतील असे देशातील सध्याचे वातावरण आहे.
भाजपा ह्या निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर राहील अशी चिन्न्ह आहेत परंतु आपच्या राजकारणातील प्रवेशामुळे नि प्रादेशिक पार्ट्यांच्या सध्याच्या वर्चस्वामुळे तिसऱ्या स्थानासाठी भाजपा नि आपमध्ये चुरस राहू शकते.
शेवटी लोकशाही जपणारा, देशाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारा, धर्मनिरपेक्ष, मानवी विकासाची जाण असणारा पक्षच सत्तेवर यावा हीच तमाम भारतीयांची अपेक्षा असेल.
प्रतिक्रिया
लेख मनोरजंक आहे
हैला
नॉस्टर् डंबस
नॉस्टर् डंबस की नॉस्टर् डँबीस
हि चालबाजी चालणार नाहि.
काँग्रेसच सत्तेत यावी.
साऱ्या गोरगरीब,धर्मनिरपेक्ष,
प्रधानमंत्री की पंतप्रधान
ब्रिगेड चा फतवाच आहे तसा
ज ब रा
पंत प्रधान पेक्षा
देशाच्या विकासाचे नियोजन
कॉंग्रेस वगळता इतर पक्षांचे
म्हणजे कोन्ग्रेस ने
जपानचे लोक सज्जन आहेत त्यांनी
जातींचा आणि विकासाचा काय
जातीचा आणि विकासाचा काहीच
तुमच्या हसण्याला माझी हरकत
पप्पूच्या निमित्ताने भारताला
>>> पप्पूच्या निमित्ताने
राष्ट्रीय फेकू ऑलंपियाडमध्ये
दैत्यापेक्षा विदुषक बरा!
आता वर दिलेल्या नावांपैकी
लोक एकतर स्वतः अंधळे असतात .
सुखी राहा
पुन्हा एकदा जबरदस्त विनोदी
कालपासून दहावेंदा वाचतोय हा
>>> शेवटी लोकशाही जपणारा,
लोकशाही जपणारा - काँग्रेस,
>>> ह्या सर्व पक्षांचे प्रमुख
मुस्लिमांचे लांगूललाचन म्हणजे
लांगूलचालन म्हणजे साध्या
मुस्लिमांचे लांगूललाचन म्हणजे
@ गुर्जी.. आवो त्ये तुमच्या
गुर्जी तुम्ही विनोदी आहात
माफ करा गुर्जी चुकून बरोबर
>>> पण एक कळले नाही
ते असतील हो ग्रेट थीन्कर
>>> त्यांना नागपूरच्या
इटलीहून येणारे आदेश
उद्या निवडणुकीनंतर ह्याच
>>> उद्या निवडणुकीनंतर ह्याच
उद्या शरद पवारांनी भाजपला
ती पाळी येणारच नाही..
मध्यंतरी भाजपचे एक 'वजनदार'
काहीही...
,भाजप सुरवातिपासुनच
भाजपा हा खरच महाराष्ट्रात
http://maharashtratimes
परत एकदा खोटे...
Pagination