✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

लिवैनरिलेशनितेचे आईस पत्र

ख
खटासि खट यांनी
Tue, 12/03/2013 - 19:30  ·  लेख
लेख
प्रिय आई, प्रत्येक मुलिप्रमाणे मी ही लिवइनरिलेशनशिप (लिइरि) बद्द्ल कोर्टाचा निर्नय आल्यापासुण खुप उत्सुक होते. माझ्या राजकुमारांची स्वप्ने रंगवत होते. पण आज मला जाणिव होते आहे की लिइरि म्ह्णजे फक्त गुलाबी स्वप्ने. लिइरि म्हणजे केवळ तुमच्या लाडक्या व्यक्ति सोबत राहाणे . तर लग्न म्ह्णजे जबाबदार्या, त्याग, कटकटी आणि तडजोडी यांवर अवलंबुन असलेली एक संस्था आहे. मी मला हव्या तितका वेळ झोपु शकते. मला सर्वांच्या आधी उठायची काही एक गरज नाही इन मिन दोघंच घरात. त्याला काही पाहीजे असेल तर तो करून खातो. नाहीतर आम्ही दोघे मिळून हाटेलात जातो. मी गबाळयासारखी घरभर फिरु शकते. समोरच्या बिल्डींगवर तरूण मुलं येऊन बसतात. त्याला एण्जॉय करता येत नाही पण तो काही बोलू शकत नाही. मला एण्जॉय करता येतं मी पण बोलत नाही. मी टापटीप राहाणं गरजेच नाही. वाटेल तितका वेळ लोळू शकते. तुझ्याशि फोनवर बोलायची इच्छाच होत नाहि ........... ए़खाद्या राजकुमारीसारखी मला वागणू़क मीळाली नाहि तर मी याला चल फूट म्हणू शकते. मग दुस-या स्वप्नातला राजकुमार. मला माझ्या घरच्यांची काळजी घेणं गरजेचे नाहि. त्यांना इथं आणणंच अलाऊड नाहि. मी मला हव्या त्या वेळि आणि ठीकाणी मनाला वाटेल तेव्हा जाउ शकते. अगदि तुझ्याकडेहि ........................ पण लिईरित असल्यापासुण इच्छाच झालि नाहि. एकेकदा मी स्वत: ला विचारते , ' का बरं मी लग्न केलं नसेल?'. खुप खुश होते ग मी तुझ्यासोबत.एकेकदा मला तुझ्याकडे यावसं वाटत. खुप गप्पा माराव्याशा वाटतात. पण त्या कोंडवाड्यात तुम्ही दोघांनी काढलेले दिवस आठवून शहारे येतात. अजुणही तुच करतेस ना ? मला घरी यायचं आहे तुझ्या हातचं जेवायला. माझ्या आवडीच्या डीशेस चाखयला. सगळ्या नातेवाइकांना, शेजार्यांना जळवायला. वेगवेगळ्या गोश्टि शेअर करायच्या आहेत. म्हणजे यू सर्टिफिकेटवाल्या गं पण अचानक मला जाणिव झाली कि तु लग्न केल होतंसं ना? माझ्या अंगावर शहारे आले. त्या काळि फक्त लग्न झाल्यावरच मुलं व्हायची ना ? आज इतकी प्रगती झाली कि त्यासाठी लग्नाची गरज नाही. आणि मुलांचीही नाही. कूटुंबा साठी किति फसवणुक केलीस स्वतःची . आहे त्या मधे मन मारत राहिलिस. ना कधि दागिन्यांसाठी हट्ट केलास ना कधि कपड्यांसाठि ........ आपल नविन घर घेतल तेवा आठवतय मला तुझे सगळे दागिने गहाण टाकले होते. आम्हि खुप शिकाव म्हणुन तु आणि पप्पांनि घेतलेले श्रम आजहि आठवतात. तुम्हि दोघांनी स्वतःची ही फसवौक केली नसतीत तर आज माझ्या जवळ जे काहि शहाणपण आहे ते कदाचित नसतं. हे सर्व आठ्वून मी खुप शांत होते आणि मला माझ्या लिवैन्रिलेशनिता असण्याचा अर्थ उमगतो. मुलीच्या शहाणपणा साठि आई सासरि नांदते हेचं खरे. वेळ हे काहि गोश्तिनवर औशध आहे आणि मला खात्रि आहे कि जसा जसा वेळ जाईल तशी तू ही अ‍ॅक्सेप्ट करशील हे सर्व आणी लग्ना शिवायचं आमचं आयुश्यही आवडु लागेल तुला हळु हळू........................................... तू आणि पप्पांनी केलेल्या घोडचुकां बद्द्ल आणि तड्जोडिं बद्द्ल शतशः प्रणाम......... तेच माझ्या साठि प्रेरणा दायि आणि माझे बळ वाडवणारे ठरतात.......................................................
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
शुद्धलेखन
समाज
जीवनमान
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
अभिनंदन
अनुभव
शिफारस
सल्ला
मदत
वाद

प्रतिक्रिया द्या
39412 वाचन

💬 प्रतिसाद (153)

प्रतिक्रिया

सुदिन...

निराकार गाढव
Tue, 12/10/2013 - 09:05 नवीन
ह्म्म्म.... शोकांतिकाच म्हना की... बाकी काय पाईंटावर पाईंट पकडून दावलाय राव; पट्लं बगा यकदम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

लिव्ह इन रिलेशन ला अनेक

खटासि खट
Sat, 12/07/2013 - 23:38 नवीन
लिव्ह इन रिलेशन ला अनेक देशांमधे कायद्याचं संरक्षण आहे. आपल्याकडेही सर्वोच्च न्यायायलाने लिव्ह इन रिलेशनशिपला कायद्याचं संरक्षण देऊ केलं आहे. तसंच काही मार्गदर्शक तत्त्वंही सांगितलेली आहेत. सध्या उच्च वर्गामधे लिव्ह इन रिलेशन संपन्न होतात हे तुमचं निरीक्षण बरोबर आहे. पण विवाहामधे पुरूष ग्वाही देतो किंबा निम्न आर्थिक वर्गात लग्न हा स्त्री ला आधार आहे हे पटलेलं नाही. अनेक स्त्रिया दहा घरची कामं करून किंवा पडेल ती कामं करून घरकाम करतात आणि नवरा त्यांना मारझोड करतो. दारू पितो. त्या महिलाच घर चालवत असतात आणि लग्नाबद्दल स्वतःच्या नशिबाला दोष देताना दिसतात. सुशिक्षित मुली हे सहन करीत नाहीत. लग्न वाईटच आहे असं माझं म्हणणं नाही. लग्नाचे पुरुषाला मिळणारे फायदे इतके अंगवळणी पडले आहेत कि त्याबद्दल विचार केला तरच ते लक्षात येतात. लग्न काय किंवा लिव्ह इन काय सहजीवन हे विश्वासावर आणि दोघांमधल्या नात्यांवर अवलंबून असतं. याच विचाराने काही लोकांना असं वाटलं कि जर हे नातं मजबूत असेल तर मग लग्न वगैरे विधींची किंवा समाजाच्या परवानगीची गरज काय ? हे अर्थात सीरीयस रिलेशनशिप बद्दल आपण बोलतोय. भ्रष्ट आवृत्तीबद्दल नाही. समाज म्हणजे तरी काय ? नवरा मारहाण करत असताना मूग गिळून बसणारा. जर दोघांतलं अंडरस्टँडिंग परफेक्ट असेल तर लग्न केलं काय किंवा लिव्ह इन मधे राहीलं काय फरक पडू नये. पण लग्नामधे ज्या काही अडचणी आहेत त्या म्हणजे काही कारणाने आपलं एकत्र सहजीवन अशक्य आहे हे लक्षात आल्यानंतर दोघांच्या सहमतीने वेगळं होता आलं पाहीजे (कुणावरही अन्याय न करता). लग्नाची अनेक वर्ष एकत्र काढल्यानंतर विभक्त होण्यासाठी कायदेशीर लढे देण्यात काही काळ खर्च व्हावा हे विचारी मनुष्याला पटण्यासारखं नाही. तसंच लिव्ह इन मधे विभक्त झाल्यानंतर मुलांचं काय हा प्रश्न आहे, पण तो घटस्फोट झालेल्या जोडप्यांतही आहेच. एकेकाळी प्रेमविवाह हे पाप समजलं जात होतं. आईवडिलांनी आणि जाणत्या लोकांनी करून दिलेले विवाह हे काहीतरी विचार करूनच केले असतील ना असा युक्तीवाद त्यामागे होता, तो आता कितीतरी मागे पडलाय. तसंच लग्न करूनच एकत्र राहीलं पाहीजे असं कुणाला वाटत नसेल तर त्यांच्या त्या विचारांचा, स्वातंत्र्याचा आदर करायला शिकलं पाहीजे. काळाबरोबर अनेक गोष्टी बदलतात. टाकाऊ बाद होतात. लिव्ह इन काळाच्या कसोटीवर टिकलं नाही तर बाद होईल, पण जर लोकप्रिय झालं तर नैतिक, सामाजिक कायदेही बदलतील. आपल्याला नव्या गोष्टींकडं पाहण्याचा दृष्टीकोण बदलला पाहीजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

तुमच्या विधानात बेसिक काँट्राडिक्शन आहे

संजय क्षीरसागर
Sat, 12/07/2013 - 23:48 नवीन
लग्न काय किंवा लिव्ह इन काय सहजीवन हे विश्वासावर आणि दोघांमधल्या नात्यांवर अवलंबून असतं. याच विचाराने काही लोकांना असं वाटलं कि जर हे नातं मजबूत असेल तर मग लग्न वगैरे विधींची किंवा समाजाच्या परवानगीची गरज काय ?
जर नातं मजबूत असेल तर सेपरेशनच्या प्रोव्हिजनची (`लिव-इन') गरजच नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

सर्वोच्च न्यायालयाने फक्त

सुबोध खरे
Sun, 12/08/2013 - 13:46 नवीन
सर्वोच्च न्यायालयाने फक्त एवढेच म्हटले आहे कि मोठ्या कालावधीच्या लिव्ह इन रिलेशन ला विवाहासारखे धरता येईल.यात फक्त domestic violance खाली कारवाई करता येईल. परंतु यात काही मोठ्या फटी आहेत. एक म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल म्हणजे पूर्ण कायदा नाही. ( कायदा करणे हे न्यायसंस्थेचे काम नाही तर ते लोकसभेचे आहे.) उद्या दुसरे खंडपीठ किंवा पूर्णपीठ या विरुद्ध निकाल देऊ शकते. दुसरे म्हणजे या संबंधातून निर्माण होणार्या संततीला वारसा हक्काचे कोणते फायदे आणि कोणत्या वैयक्तिक कायद्याखाली द्यायचे हे अजून स्पष्ट नाही. शिवाय या संबंधात एखादी व्यक्ती अपंग झाली तर दुसर्या व्यक्तीवर तिच्या पालन पोषणाची जबाबदारी टाकता येईल काय. आणि अशा परिस्थितीत जर त्या दुसर्या व्यक्तीने लग्न केले तर आपोआप ते कायदेशीर राहते आणि लिव्ह इन बाद ठरते. हे म्हणजे आपण एखाद्याला मी तुला घर देतो म्हणून वायदा केलात आणि दुसर्याला परस्पर घर विकून त्याचे कर भरून कागदपत्र पंजीकृत(रजिस्टर) केले तर अगोदरच वायदा आपोआप रद्दबातल ठरतो. अशा परिस्थितीत दुसरी व्यक्ती न घरकी न घाट की अशी राहते. थोड्क्यात हा करार(?) फक्त फायदेशीर ठरतो कायदेशीर नाही. आता लग्नात अशीच परिस्थिती उद्भवली तर काय होते ते पहा. मुलांना बापाच्या(आईच्या)वडिलोपार्जित संपत्तीत कायद्याने वाटा मिळतो. त्यांच्या पोषणाची जबाबदारी सज्ञान होईपर्यंत बापाची(आईची) राहते. बायकोला(नवर्याला) त्यांच्या पूर्व परिस्थितीप्रमाणे आयुष्यभर पोटगी मिळते. थोडक्यात कायदा त्या टाकलेल्या बायकोला( नवर्याला) अगदीच उघड्यावर पडू देत नाही. नवरा बायकोचे पटेल कि न पटेल, यात कायदा काहीच करू शकत नाही परंतु जेंव्हा लग्न विच्छेद होतो तेंव्हा बायको( किंवा नवरा) याला आणि विशेषतः मुलांना त्यातून उघड्यावर येऊ नयेत अशी थोडी तरी सोय कायद्याने केलेली आहे. लिव्ह इन मध्ये असे कोणतेही कायद्याचे संरक्षण आज तरी नाही. त्यांची परिस्थिती आजही "ठेवलेल्या" बाई सारखी आहे. जोवर नवर्याची(किंवा बायकोची) मर्जी आहे तोवर सर्व ठीक. यात प्रश्न पुरुषाचा फारसा येत नाही. कारण तो लिव्ह इन मधुन बाहेर पडला तर त्याच्या बरोबर लग्न करायला किंवा आपल्या मुलीचे लग्न करून द्यायला अनेक बाप तयार होतात परंतु एखादी स्त्री लिव्ह इन मधुन बाहेर पडली तर तिच्याशी लग्न करायला किती पुरुष तयार असतील आणि किती बाप आपल्या मुलाचे तिच्याशी लग्न लावतील? किती जरी समतेचा आव आणला तरी स्त्री पुरुष समानता हि अजून केवळ कागदोपत्री आहे. त्यामुळेच कायदा हा जास्त स्त्रीला झुकते माप देणारा आहे. अजून तरी लिव्ह इन हे उच्च वर्गातील स्वावलंबी स्त्रीचे चोचले म्हणूनच आहेत. पटले तर पटले नाही तर सोडून दिले. लग्न झाले नाही तरी मी स्वतःच्या पायावर उभी आहे कारण माझ्याकडे(माझ्या बापाकडे) भरपूर पैसे आहेत. या बाबतीत मला र धों कर्वे यांनी १९३१ साली लिहिलेले वाक्य आठवते "चरितार्थासाठी बहुतेक स्त्रिया लग्न करतात" तसेच दुसरे वाक्य "कॉलेज हि मुलींची शाळा आणि लग्न याच्या मधील काळ घालवण्याची जागा आहे" दुर्दैवाने आजही हि दोन्ही वाक्ये ८५ % पेक्षा जास्त स्त्रियांमध्ये सत्य आहेत.(१% उच्च वर्ग आणि १४ % मध्यम वर्ग). सध्या इतकेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

सहमत

दिव्यश्री
Sat, 12/07/2013 - 22:43 नवीन
+१ भारी प्रतिसाद डॉक्टर ...
  • Log in or register to post comments

मग?

स्टुपिड
Sat, 12/07/2013 - 23:41 नवीन
खट बुवा/तै लेख आवडला. चर्चा लै मनोरंजक आहे. काय ठरलं शेवटी? कोण जिंकला?
  • Log in or register to post comments

@ मग? कोण जिंकला?

निराकार गाढव
Tue, 12/10/2013 - 09:16 नवीन
ईश्य! हे काय विचारणं झालं? ते सांगायलाच हवं का? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्टुपिड

तै ?

खटासि खट
Sat, 12/07/2013 - 23:45 नवीन
तै ? पुरूषांच्या विरोधात गेलो म्हणून ? अहो भाऊ, असं काही करू नका. जिंकण्या हरण्यासाठी नाहीच काही. चर्चेचा तर कंटाळा येतोय. पण कुणी तुम्ही हे लिहू नका, ते लिहू नका म्हटलं कि सटकते.
  • Log in or register to post comments

...

आशु जोग
Sat, 12/07/2013 - 23:57 नवीन
महाभारतामधेही लिव इन चे संदर्भ आहेत कुणी तरी खोदकाम करा ना ;)
  • Log in or register to post comments

@ महाभारतामधेही लिव इन चे संदर्भ आहेत

निराकार गाढव
Fri, 12/13/2013 - 20:11 नवीन
गुर्जींना इचारा की... त्यांले सम्द्या इषयांमधलं सम्दं कळतं. नायतर या दोनपैकी एक गडी निवडा: १ Image removed. २ https://encrypted-tbn2.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcTO6yNm-F8MB9xAsmSoLJiHvlWmjWszghf-oWevtofQZRl-6KYWTg बगा कोन पसंद पडतंय ते. आनि हो. आमचे गुर्जी चर्मचक्षूंना दिसू शकत नाहीत.... कारण ते "आमचे" गुर्जी हैत ना. हॉ कूSSS हॉ कूSSS हॉ कूSSS... - Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

यालाच 'जान प्रबोधिनी' मराठी

आशु जोग
Sat, 12/14/2013 - 00:25 नवीन
यालाच 'जान प्रबोधिनी' मराठी म्हणतात का !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निराकार गाढव

तयारी.

साती
Sun, 12/08/2013 - 13:23 नवीन
मूळात लिव ईन्मध्ये रहाताना 'लग्न' या संस्थेला आपण नाकारत आहोत त्यामुळे लग्नामुळे येणारे फायदे-तोटे आपण नाकारत आहोत हे मान्य करून तशी तयारी असली पाहिजे. पार्टनरच्या संपत्तीवर अधिकार हवा, पगाराचे - पेंशनचे - रिटायरमेंटचे(पार्टनरच्या) बेनिफिट हवे तर सरळ लग्नच करावे.
  • Log in or register to post comments

वाचते आहे!

पैसा
Sun, 12/08/2013 - 15:05 नवीन
खट-खट बहुतेक गाणं म्हणत बसले असावेत! क्या से क्या हो गया...चाहा क्या..क्या मिला...
  • Log in or register to post comments

सध्याचे 'लिव-इन' चे स्वरूप

कवितानागेश
Sun, 12/08/2013 - 17:05 नवीन
सध्याचे 'लिव-इन' चे स्वरूप मुख्यतः 'एक्स्टेन्डेड बघण्याचा कार्यक्रम' असा आहे असं वाटतंय. काही वर्षे एकत्र राहून बघायचे की खरोखरच एकमेकाम्शी जमू शकतं की नाही. उगाच लग्न करुन संपूर्ण आयुष्य पणाला लावण्यापेक्षा काही वर्षे खर्ची घालू असा विचार कुणी केला तर वाईट काही नाही. कदाचित 'लग्न' या प्रकाराचे गाम्भिर्य कळत असल्यानीच एक्दम घाईघाईनी ते लग्न करत नाहीत! :)
  • Log in or register to post comments

'एक्स्टेन्डेड बघण्याचा

बाळ सप्रे
Mon, 12/09/2013 - 17:51 नवीन
'एक्स्टेन्डेड बघण्याचा कार्यक्रम' - त्यालाच "trial marriage" म्हणत असावेत.. बापरे आणखी कन्फ्युजन !! marriage आणि trial marriage आणि live in अशी तुलना करावी लागणार आता!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

@ पैसातै

खटासि खट
Sun, 12/08/2013 - 17:11 नवीन
@ पैसातै :D गाणं नाही. फक्त एक इग्नोर केला कि कै प्रॉब्लेम नाही. चर्चेची (लिहिण्याची) सवय नाही येवढा येकच प्रॉब्लेम ! @ डॉ खरे साहेब तुमच्याइतकं समजावून सांगता येत नाही. काय म्हणायचंय हे तुम्ही समजावून घेऊ शकाल असं वाटतं. तुम्ही चर्चेचं सार काढलंच आहे. समाज अजून इतका उत्क्रांत झाला नाही. स्त्री देखील जागृत झालेली नाही. नाहीतर मग कुंकू, मंगळसूत्र याचाही वेगळा विचार झाला असता. सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स :- http://www.ndtv.com/article/india/supreme-court-frames-guidelines-for-determining-live-in-relationship-453024 कौटुंबिक हिंसा कायद्याखाली लिव्ह इन रिलेशन मधील स्त्री ला संरक्षण आहेच. पण सातीने म्हटल्याप्रमाणे एकदा लिव्ह इन रिलेशन मधे रहायचं ठरवल्यावर लग्नाला मिळणारे कायदेशीर फायदे कशाला हवेत? आमचं पटतंय तोप्रयंत एकत्र राहू, नाहीतर वेगळे होऊ, त्याबद्दल कुणीच कुणाला दोष द्यायचा नाही हे अंडरस्टँडींग दोन्ही पार्टीचं असल्यावर कायद्याचा विचार येतच नाही. दोन स्वतंत्र व्यक्ती एकमेकांचा आदर करत एकमेकांवर एकत्र राहणे हे लिव्ह इन मधे अपेक्षित आहे. सहजीवनामधेच आपण आनंदाने राहू शकू कि नाही हे कळतं. लिव्ह इन रिलेशन म्हणजे कायमच लग्णाशिवाय राहणे असंही नाही. या जोडप्याला आपण एकत्र राहण्यात काहीच अडचण येणार नाही हे काही वर्षे एकत्र राहील्यावर लक्षात आल्यानंतर ते लग्न देखील करू शकतात. कोर्टाने एका केसचा निकाल देताना पतीच्या त्रासापासून सुटका म्हणून दुस-या व्यक्तीबरोबर (लग्नाशिवाय) एकत्र राहणे यालाही लिव्ह इन रिलेशन मानले आहे. याला स्वैराचार असं झटकन लेबल लावण्याच्या आधी जरा विचार केला तर हा मोठाच दिलासा आहे. बसून खाणा-या नव-यांना ही चपराक तर जुलमाने नांदणा-या स्त्रियांना आनंदी आयुष्यासाठी एक पर्याय आहे. अर्थात एव्हढा मोठा धाडसी निर्णय घेणं जमेलच असं नाही. स्लम एरीयात अशी उदाहरणे दिसतात कि.. फक्त त्याला लिव्ह इन म्हणतात हे त्यांच्या गावीही नसतं आणि त्यामागे वैचारीक भूमिकाही नसते. जेव्हां लग्नाशिवाय एकत्र राहणे या कृतीलाच कायद्याने ओळख (संरक्षण) नव्हे नव्हती तेव्हां आर्थिक व्यवहार, शाळेचा प्रवेश, बिलं, अशा अनेक गोष्टींना तोंड देताना जी अडचण निर्माण होत होती त्यासाठी लग्न करावं लागत होतं. पण अनेक देशात लिव्ह इन रिलेशन हा आता कायदेशीर व्यवहार झालेला असल्याने ही अडचण दूर झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे एक प्रकारे लिव्ह इन रिलेशनला ओळख मिळालेली आहे. म्हणूनच लग्न हा आता ऐच्छिक विषय राहीलाय. लग्नविषयक कायदे हे सामाजिक मान्यतेनुसार बनलेले आहेत. मागेच म्हटल्याप्रमाणे मान्यता बदलतील तसे कायदे हळू हळू बदलत जातील.
  • Log in or register to post comments

साहेब,

सुबोध खरे
Sun, 12/08/2013 - 20:56 नवीन
साहेब, एवढे सगळे काथ्याकूट झाल्यावर त्या दुव्याची शेवटची ओळ हेच सांगते आहे कि त्या स्त्री ला पोटगी हवी आहे आणि त्यासाठीच तिने न्यायालयात खटला दाखल केला. त्यात आमच्यात प्रेम होते आमचे संबंध इतके घट्ट होते हे न्यायालयात तिला सिद्ध करावे लागलेच न? मग हे सर्व दोन जीवांमध्ये आदर प्रेम असेल तर या सर्व गोष्टींची गरज काय असे म्हणण्याचा दांभिकपणा कशाला? ""पण सातीने म्हटल्याप्रमाणे एकदा लिव्ह इन रिलेशन मधे रहायचं ठरवल्यावर लग्नाला मिळणारे कायदेशीर फायदे कशाला हवेत? आमचं पटतंय तोप्रयंत एकत्र राहू, नाहीतर वेगळे होऊ, त्याबद्दल कुणीच कुणाला दोष द्यायचा नाही हे अंडरस्टँडींग दोन्ही पार्टीचं असल्यावर कायद्याचा विचार येतच नाही. दोन स्वतंत्र व्यक्ती एकमेकांचा आदर करत एकमेकांवर एकत्र राहणे हे लिव्ह इन मधे अपेक्षित आहे. सहजीवनामधेच आपण आनंदाने राहू शकू कि नाही हे कळतं."" शेवटी एक गोष्ट सत्य आहे कि स्त्रीला निसर्गाने पुरुषाइतके सशक्त केलेले नाही. शेवटी स्त्री हि मानसिकदृष्ट्या पुरुषात जास्त गुंतत जाते आणि गरोदर पण आणि मातृत्व निसर्गाने लादल्याने शारीरिक दृष्ट्या सुद्धा कमकुवत आहे हे सत्य बहुसंख्य स्त्रीमुक्तीवाद्यानी सुद्धा मान्य केले आहे. मग असे असताना कायदा देत असलेले फायदे नकोत असा मानभावीपणा कशाला. शांतता हवी हे बलवानाने ठरविले तरच होते दुर्बलाने नव्हे. याच न्यायाने जोवर समाजाचे पुरुषप्रधान संस्कृतीचे विचार जोवर बदलून स्त्रीपुरुष समानतेचे विचार रुजत नाहीत तोवर स्त्रियांचे सबलीकरण हे अरण्यरुदनच राहणार. आज पुढारलेल्या समाजातही किती बाप आपली मुलगी कुणाबरोबर "लिव्ह इन" म्हणून राहायला जाते म्हटल्यावर खुशीने तिला निरोप देतील? मी मध्यम किंवा निम्न वर्गाबद्दल बोलतच नाही. मी तरी याला नक्कीच तयार होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

लेखकानं दिलेल्या सुप्रिम कोर्टाच्या लिंकमधे तर अजून मजा आहे!

संजय क्षीरसागर
Sun, 12/08/2013 - 22:54 नवीन
The guidelines include presence of sexual relationship and children which mean, "Marriage like relationship refers to sexual relationship, not just for pleasure, but for emotional and intimate relationship, for procreation of children, so as to give emotional support, companionship and also material affection, caring etc. "Having children is a strong indication of a relationship in the nature of marriage. Parties, therefore, intend to have a long standing relationship. Sharing the responsibility for bringing up and supporting them is also a strong indication." आणि लेखाच्या पहिल्या पानावर, लेखकानं विचारलंय :
खटासि खट - Fri, 06/12/2013 - 15:14 त्या भावनिक जवळीकेपासून स्वातंत्र्य हेच तर लिव-इनच्या पर्यायाच आकर्षण आहे. >> याला काही आधार ? लिव इन रिलेशन मधे मूल नको असतं हे कशाच्या आधारे म्हणत आहात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

लिव्ह इनमध्ये एक पुरूष/स्त्री

अधिराज
Sun, 12/08/2013 - 21:53 नवीन
लिव्ह इनमध्ये एक पुरूष/स्त्री किती स्त्रियां/पुरुषां बरोबर राहू शकतो/शकते यावर काही मर्यादा असते का? जर एखाद्या पुरुषाचे लग्न झाले असेल व तो पुरूष असे लिव्ह इनमध्ये राहत असेल तर त्यावर काही बंधन किंवा शिक्षा आहे का?
  • Log in or register to post comments

लिव्ह इन ही लॉङ्म टर्म सीरीयस

खटासि खट
Sun, 12/08/2013 - 22:05 नवीन
लिव्ह इन ही लॉङ्म टर्म सीरीयस रीलेशन शिप आहे. एकापेक्षा जास्त वगैरे गैरसमज आहेत. असं पाहण्यात आहे का ? अशा गोष्टींना लिव्ह इन रिलेशन म्हणत नाहीत. गूगल सर्च दिला तर व्याख्या मिळू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज

गूगल सर्च दिला तर व्याख्या

अधिराज
Mon, 12/09/2013 - 15:02 नवीन
गूगल सर्च दिला तर व्याख्या मिळू शकते.
हा!हा!हा! अहो गूगलवरूनच उत्तरं मिळवायची असतील तर इथे प्रतिसादांतून चर्चा करण्याचे काहि प्रयोजनच राहणार नाही. माझ्या प्रतिसादातील प्रश्न धागाकर्त्यालाच लागू होतो असं नाहिये, त्यामुळे तुम्हाला माहित नसेल तर त्रास कशाला करून घेताय. ज्यांना माहित आहे ते देतील प्रतिसाद त्यांची इच्छा असेल तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

चर्चा करण्याचे काहि प्रयोजनच

खटासि खट
Mon, 12/09/2013 - 15:54 नवीन
चर्चा करण्याचे काहि प्रयोजनच राहणार नाही.
???
त्यामुळे तुम्हाला माहित नसेल तर त्रास कशाला करून घेताय.
:hz: गूगल सर्च दिला तर..असं त्रास झाल्यासच म्हणतात हे माहीत नव्हतं. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज

विडंबन मस्त झाले आहे!

अधिराज
Sun, 12/08/2013 - 21:54 नवीन
विडंबन मस्त झाले आहे!
  • Log in or register to post comments

एकदा लिव - इन मधे

खटासि खट
Sun, 12/08/2013 - 22:02 नवीन
एकदा लिव - इन मधे राहील्यानंतर पोटगीची अपेक्षाच करू नये. तसा दावा करणे हा दांभिकपणाच आहे. त्याचं समर्थन होऊ शकत नाही. पण त्यावरून लिव्ह इन रिलेशन चुकीचं आहे असं म्हणता येईल असं वाटत नाही. नातेवाईकांच्या दबावामुळेही असे दावे केले जातात. त्याबद्दल काहीच सांगता येत नाही.
लग्नविषयक कायदे हे सामाजिक मान्यतेनुसार बनलेले आहेत. मागेच म्हटल्याप्रमाणे मान्यता बदलतील तसे कायदे हळू हळू बदलत जातील.
हे मी आधी म्हटलेलं आहे. तसंच ज्यांना ते पटलेलं आहे त्यांना तसं जगू द्यावं इतकाच भारतापुरता तरी हा विषय आहे आपल्यापर्यंत हा मुद्दा येईल तेव्हां येईल. पण आपल्या अपत्याने कसं जगावं हे सुद्धा आपणच ठरवावं याबद्दलही प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतील. येणा-या काळात त्यात बरेच बदल होतील हे निश्चित. माझ्याकडे आता काही सांगण्यासारखं नसल्याने मी शीला दीक्षित (राजीनामा).
  • Log in or register to post comments

.चर्चा भरकटतेयं

संजय क्षीरसागर
Sun, 12/08/2013 - 22:39 नवीन
वर अधिराजनं विचारलंय
लिव्ह इनमध्ये एक पुरूष/स्त्री किती स्त्रियां/पुरुषां बरोबर राहू शकतो/शकते यावर काही मर्यादा असते का? जर एखाद्या पुरुषाचे लग्न झाले असेल व तो पुरूष असे लिव्ह इनमध्ये राहत असेल तर त्यावर काही बंधन किंवा शिक्षा आहे का?
हा प्रश्न पुरेसा मार्मिक आहे. लेखकाचं त्यावर उत्तर मजेशिर आहे :
लिव्ह इन ही लॉङ्म टर्म सीरीयस रीलेशन शिप आहे...
लिव-इनमधे कसला आलाय लाँग टर्म आणि सिरियसनेस? त्या गोष्टी नकोत म्हणून तर लिव-इनची आयडिया निघालीये. ....आणि लेखकाला माहितीचा एकच हुकमी सोर्स माहितीये : गुगल सर्च!
  • Log in or register to post comments

आमच्यासारखे असंख्य साधारण

खटासि खट
Sun, 12/08/2013 - 23:58 नवीन
आमच्यासारखे असंख्य साधारण बुद्धी, सामान्य कुवतीचे लोक मजेशीरपणे गूगलवरच विश्वास टाकतात. अतिविद्वान, प्रकांडपंडीत, असामान्य बुद्धीमत्ता असलेले लोक बहुधा संक्षी सर्च देत असावेत... आम्हाला वेळ आहे अजून. त्स्मात आपल्यापासून लांबच आहोत. आपण आपल्यासारख्या प्रकांड पंडिताशी चर्चा करावी हे उत्तम नाही का राहणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मुद्दे संपले की व्यक्तिगत उपहास सुरु होतो

संजय क्षीरसागर
Mon, 12/09/2013 - 09:49 नवीन
त्यामुळे चर्चेचं फलित असं की : लिविन हा निव्वळ टाईमपास आहे आणि विवाह ही एका दीर्घ आणि उत्तम सहजीवनाची संधी आहे. सुखावह वैवाहिक नातं निर्माण न करता येणं हा विवाह-संकल्पनेचा दोष नसून व्यक्तिगत उणीव आहे. ज्या व्यक्ती पारस्पारिक समन्वय निर्माण करु शकत नाहीत त्या लिविन मधे असल्या काय की विवाहात, त्यांना प्रश्न निर्माण होणारच. लिविनची सगळ्यात महत्त्वाची गोची अशीये की एकदा नंबर ऑफ रिलेशनशिप्सचा आकडा वाढला की नात्यातली गुंतागुंत वाढत जाणार. मनाला सारखा बदल हवा असतो त्यामुळे `आधीचा' बरा होता की `पुढचा' बरा असेल यात व्यक्ती सदैव दोलायमान राहणार. त्यात कधीही एकमेकांना बाय करु शकत असल्यानं सध्याच्या नात्यात जरा कुरबुर झाली की जुळवण्यापेक्षा मोडण्याची घाई असणार. आणि त्यावर "सध्याच्या नात्यातली जवळीक" हाच एकमेव उपाय आहे याची कुणाला कधीही कल्पना येणार नाही. अशा तर्हेनं लिविन हा पर्याय स्त्री-पुरुषांना कायम अस्वस्थ ठेवणार. लग्नात काहीही जोखिम नाही. एकदाच परस्परांवर संपूर्ण विश्वास टाकून निर्णय घेतला की मग कोणतीही गोष्ट त्या नात्याला बाधा आणत नाही. ते नातं दिवसेंदिवस गहीरं होत जातं. ती आणि तुम्ही एकरुप होता. एकमेकांचा सहवास बंधन नव्हे तर कंपनी होतो. जगणं धमाल होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

लग्नात काहीही जोखिम नाही.

पिशी अबोली
Mon, 12/09/2013 - 21:04 नवीन
लग्नात काहीही जोखिम नाही. एकदाच परस्परांवर संपूर्ण विश्वास टाकून निर्णय घेतला की मग कोणतीही गोष्ट त्या नात्याला बाधा आणत नाही. ते नातं दिवसेंदिवस गहीरं होत जातं. ती आणि तुम्ही एकरुप होता. एकमेकांचा सहवास बंधन नव्हे तर कंपनी होतो. जगणं धमाल होतं.
तरी इथे बायकांचा अनेक धाग्यांवर 'बिचार्‍या गांजलेल्या नवर्‍यांकडून' उद्धार होतच असतो... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

विवाह या संकल्पनेची आणि पती-पत्नीतील बेबनावाची गल्लत होतेय

संजय क्षीरसागर
Tue, 12/10/2013 - 10:54 नवीन
विवाह काय की लिवीन काय दोन्ही पारस्पारिक मान्यता आहेत. जर एकमेकांबद्दल प्रेम आणि कृतज्ञता असेल तरच संबंध सुखाचे होतील ही उघड गोष्ट आहे. स्वतःच्या वैवाहिक संबंधाविषयी समाधानी नसणं हा पारस्पारिक समन्वयाचा आभाव आहे त्याचा दोष विवाहाच्या संकल्पनेला देता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

लिव-इनमधे कसला आलाय लाँग टर्म

सांजसंध्या
Mon, 12/09/2013 - 18:45 नवीन
लिव-इनमधे कसला आलाय लाँग टर्म आणि सिरियसनेस? त्या गोष्टी नकोत म्हणून तर लिव-इनची आयडिया निघालीये.
ओह ! तुम्ही म्हटलंय म्हणजे बाबा वाक्यं प्रंमाण असंच ना ? आणि त्यासाठी तुम्हाला गूगल वगैरेची गरजच नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

गुगल सर्चनं व्यक्तिगत संबधातल्या गहिर्‍या गोष्टी कशा उलगडतील?

संजय क्षीरसागर
Tue, 12/10/2013 - 11:23 नवीन
लग्न करुन किती टक्के सुखी आहेत आणि लिवीनमुळे किती पर्सेंट आनंदात आहेत या डेटानं युगुलाच्या पारस्पारिक नात्यात कसा फरक पडेल. आपलं नातं आपण निर्माण करतो आणि जपतो. लिवीन ही ट्रायल नाही का? खर्‍या लिवीनची परिणिती सुखी संसारात होणार नाही का? एकदा लिवीनची सवय जडल्यावर सतत संशय (तिची किंवा त्याची मागची लिवीन ब्रेक झाली असेल?) आणि अनकमिटेड रिलेशन्समुळे एकमेकांना समजावून घेण्यापेक्षा, `नाही जुळत गेले उडत' ही वृती कायम राहणार. मी स्वतःचा अनुभव लिहीतो, मंजूर नसेल तर त्याविरुद्ध विचारपूर्वक मत मांडल्यास चर्चा होईल. उपहासानं काही साध्य होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांजसंध्या

खुनाची भिती

चित्रगुप्त
Mon, 12/09/2013 - 18:20 नवीन
सर्व प्रतिसाद वाचले नसल्याने हा मुद्दा कुणी मांडला आहे की नाही, हे ठाऊक नाही, परंतु अमेरिकादि देशात नवर्‍याचा (अथवा बायकोचा) खून करून त्याच्या विम्याची रक्कम मिळवणे, हा प्रकार बरेचदा घडतो, असे डिस्कव्हरी का कोणत्यातरी चॅनेलावर बघितले होते. कायदेशीर लग्न झालेले नसल्यास ती रक्कम स्पाऊसास लाभत नाही, तस्मात लग्नाविना सहजीवन बरे, असे मानले जाते. म्हणजे फायदे घ्या पण धोका टाळा. शिवाय 'आज इधर कल उधर मै किसीकी/किसीका नही' हे लिविन मधे जास्त सोपे.
  • Log in or register to post comments

आज इधर कल उधर मै किसीकी

सांजसंध्या
Mon, 12/09/2013 - 18:50 नवीन
आज इधर कल उधर मै किसीकी/किसीका नही
लग्न झालेल्या जोडप्यात असं काहीच नसतं ना ? सगळेच विवाहीत पुरूष मर्यादापुरुषोत्तम ! लिव्ह इन मधे असा प्रकार उघडकीस आला तर लगेच वेगळं होणं जास्त सोपं आहे. एक नम्र विनंती आहे. माहीती घेऊन बोललं तर सर्वांनाच बरं पडेल, गैरसमजावर आधारीत चर्चा भरकटणारच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

ओ ताई...

शिद
Mon, 12/09/2013 - 18:57 नवीन
माझा एक खोचक प्रश्न... तुम्ही एवढ्या तावातावाने लिव-ईन ला सपोर्ट करत आहात तर जरा फायदे-तोटे पण कळु दे कि या पामरास?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांजसंध्या

माहीती घेऊन बोलणे

चित्रगुप्त
Mon, 12/09/2013 - 18:59 नवीन
या विषयावर खास अमेरिकन, मेक्सिकन आणि फ्रेंच लोकांशी (वयोगट ३० ते ७५) बोलण्यातून मिळालेल्या माहितीतून लिहिले आहे. पै़की एका जोडप्याच्या दहा वर्षांच्या सहजीवनानंतर झालेल्या लग्नातही उपस्थिती लावलेली आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांजसंध्या

@ चित्रगुप्त - गैस नसावा.

सांजसंध्या
Mon, 12/09/2013 - 19:13 नवीन
@ चित्रगुप्त - गैस नसावा. लग्नामधे जोडादाराने केलेली फसवणूक उघडकीला आली तर स्त्री ला मनःस्ताप होत नसेल का ? स्त्री ने फसवणूक केली तर किती नवरे तिला माफ करून लग्न टिकवतात ? लिव्ह इन रिलेशन हे पण सहजीवनच आहे आणि लग्न पण. एकात रूढ अर्थाने सामाजिक / कायदेशीर बंधन नाही. पण जोडीदाराचा विश्वास टिकवणे हे अपेक्षित आहे. वन नाईट स्टँड, एकापेक्षा जास्त जणांशी रिलेशन्स असे मुद्दे वाचले, म्हणून थोडीशी माहीती घेतली तर गैस दूर होतील इतकंच म्हणायचं होतं. मुंबई, पुणे, गोवा अशा ठिकाणी पूर्ण विचारांती लिव्ह इन मधे असणारी जोडपी आहेत. शेवटी पूर्ण विचारांती नसेल तर दोन्हीमधे तोटेच आहेत. मला जाणवलेला ठळक फायदा म्हणजे आपल्याला हव्या त्याच व्यक्तीबरोबर राहणे. लव्ह मॅरेजमधेही हे होतं. पण अ‍ॅरेंज मॅरेज मधे होतं नाही. तरी देखील अ‍ॅरेंज मॅरेज टिकून आहे. पण एक प्रकारे तो जुगार आहे. अशा लग्नात स्त्री ने केलेल्या अनंत तडजोडी सवयीच्या आणि अपेक्षित असल्याने त्याची किंमत नसते. (हा वेगळा विषय आहे असं म्हणता येत नाही).. समारंभपूर्वक लग्न करून नंतर पटले नाही तर प्रचंड मनःस्ताप होतो. त्यातही आईवडिलांनी बघून दिलेलं असल्यास दोष कुणाला देणार ? लिव्ह इन रिलेशन मधे तुम्ही इतरांना दोष देत नाही. पूर्ण विचारांती दोघांचाच निर्णय असल्याने पार्टनर विश्वासपात्र किंवा सहजीवनास अयोग्य निघाला तर पुढचं आयुष्य वेगळं होण्यात शहाणपण असतं. हे मुद्दे वर येऊन गेलेले आहेत. पुन्हा स्टार्ट पासून सुरुवात का करायची ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

सहजीवन - समान सुख-दु:ख.

प्रभाकर पेठकर
Mon, 12/09/2013 - 20:58 नवीन
लग्नामधे जोडादाराने केलेली फसवणूक उघडकीला आली तर स्त्री ला मनःस्ताप होत नसेल का ?
जोडीदाराने फसवणूक केली तर फक्त स्त्रीलाच मनःस्ताप होतो? हे फार एकांगी विधान होईल. एका जोडीदाराने फसवणूक केल्यास दूसर्‍या जोडीदारास नक्कीच मनःस्ताप होतो.
स्त्री ने फसवणूक केली तर किती नवरे तिला माफ करून लग्न टिकवतात ?
अनेक असावेत. माझ्या पाहण्यात दोघे आहेत.
एकात रूढ अर्थाने सामाजिक / कायदेशीर बंधन नाही. पण जोडीदाराचा विश्वास टिकवणे हे अपेक्षित आहे.
जोडीदाराचा विश्वास टिकविणे दोन्ही संस्थांमध्ये आवश्यक आहे. फक्त लिव्ह-इन मध्येच नाही.
शेवटी पूर्ण विचारांती नसेल तर दोन्हीमधे तोटेच आहेत.
सहमत. पण विचारांती म्हणजे काय? एकमेकांचे अंतरंग समजून येण्यास अर्ध आयुष्य निघून जातं. शिवाय माणसाच्या स्वभावातही फरक पडत जातोच. पंचविस-तिसाव्या वयात असलेला स्वभाव पन्नाशीच्या पुढे टिकतोच असे नाही. वैचारिक परिपक्वतेची पातळी बदलत जाते. दीर्घ काळच्या सहवासात एकमेकांना गृहीत धरण्याचे प्रमाण वाढलेले असते. एका सुरक्षित कोषात विचार करायची सवय लागलेली असते. पूर्वीच्याकाळी विशेष न खुपणारे स्वभावदोष (तेंव्हा असणारी सहनशक्ती आणि आशादायी भविष्यावरील भरवसा) शेवटी सहनशक्ती संपल्याने आणि आशावाद फोल ठरल्यावर जास्त खुपू लागतात. पूर्वी नसलेले बेबनाव नव्याने समोर येऊ शकतात.
मला जाणवलेला ठळक फायदा म्हणजे आपल्याला हव्या त्याच व्यक्तीबरोबर राहणे. लव्ह मॅरेजमधेही हे होतं. पण अ‍ॅरेंज मॅरेज मधे होतं नाही.
प्रत्येक अ‍ॅरेंज मॅरेज मधे असे होत नाही? अ‍ॅरेंज मॅरेज मध्ये कोणीच सुखी नसतं? सर्व जोडपी नाईलाजाने एकत्र राहात असतात?
अशा लग्नात स्त्री ने केलेल्या अनंत तडजोडी सवयीच्या आणि अपेक्षित असल्याने त्याची किंमत नसते. (हा वेगळा विषय आहे असं म्हणता येत नाही)..
अर्रर्रर्र..! पुरुषांना तडजोडी कराव्याच लागत नाहीत? प्रचंड गैरसमज.
लिव्ह इन रिलेशन मधे तुम्ही इतरांना दोष देत नाही. पूर्ण विचारांती दोघांचाच निर्णय असल्याने पार्टनर विश्वासपात्र किंवा सहजीवनास अयोग्य निघाला तर पुढचं आयुष्य वेगळं होण्यात शहाणपण असतं.
आणि प्रेमविवाहात? तिथेही निर्णय दोघांचाच असतो. त्यांचेही पुढे न पटल्यास वेगळे होण्यात शहाणपण आहे? जर मुलं झाली असतील तर त्यांचा काय दोष? त्यांना ह्या जगात आणलं कोणी? लिव्ह-इन रिलेशनशिप दोघांपैकी एखादा जोडीदार ह्या जगात उरला नसेल आणि उरलेल्या जोडीदारास एकटेपणा असह्य झाला असेल तर पुनर्विवाह किंवा लिव्ह इन रिलेशनशिप समर्थनिय आहे. पण मुले असतील तर त्यांची मतेही विचारात घ्यावीत. शारीरिक संबंधांचे वय उलटून गेल्यावरही भावनिक गरजेपोटी असे संबंध प्रस्थापित होऊ शकतात आणि टिकूही शकतात. अशा जोडीदाराच्या, आपल्या पश्चात, भविष्याची सोय सामंजस्याने करावी. आपली मुले ते पाहतील अशा भरवशावर राहू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांजसंध्या

अर्रर्रर्र..! पुरुषांना

सांजसंध्या
Tue, 12/10/2013 - 08:12 नवीन
अर्रर्रर्र..! पुरुषांना तडजोडी कराव्याच लागत नाहीत? प्रचंड गैरसमज.
क्काय क्काय असतात या तडजोडी ? प्रगैस दूर करून घ्यायला आवडेल :) (म्हणजे तुलना करता येईल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

अयुष्य - एक तडजोड.

प्रभाकर पेठकर
Tue, 12/10/2013 - 11:33 नवीन
लग्नानंतर बायको-मुलांची जबाबदारी नवर्‍याच्या शीरावर येते. सर्वांची जबाबदारी आली की फक्त आपल्यापुरता विचार करून चालत नाही. सर्वांसाठी काय योग्य आहे ह्यावर विचार करून, प्रसंगी आपल्या आवडीनिवडींना मुरड घालून कृती करावी लागते. आम्हाला चांगले कपडे घालता यावेत (नेहमीच्या वापरातले, छानछोकीचे नाही) म्हणून वडिलांना भोकाभोकांचा गंजीफ्रॉक घालताना पाहिले आहे. तसेच, कुटुंबाच्या औषधपाण्यासाठी स्वतःचे आजारपण अंगावर काढतानाही पाहिले आहे. मुलांना उच्च शिक्षणासाठी पैसा पाहिजे म्हणून दीर्घकाळ इथे आखातात नोकरी करणार्‍या पुरुषांना पाहिले आहे. मुलांना स्कूटर घेऊन द्यायची म्हणून स्वतः सायकल दामटत मैलोनमैल जाणारे बाप पाहिले आहेत. पत्नी नोकरी व्यवसाय करू शकत नाही पण तिचे आणि सासूचे पटत नसल्याने आणि तिने मागे धोशा लावल्याने छोटासेच का होईना पण वेगळे घर घेऊन २० वर्षे एचडीएफसीचे हप्ते भरणारे नवरे पाहिले आहेत. परिपक्वतेचे वय उलटून गेलेल्या, सासू-सूनेच्या वादामध्ये अकारण मध्यस्थाची भूमिका घ्यावी लागून अडकित्यात सुपारीसारखी अवस्था झालेले महाभाग पाहिले आहेत. मुलींच्या लग्नासाठी म्हातारपणी कर्जांच्या ओझ्याखाली पिचलेले बाप पाहिले आहेत. वाढत्या महागाईशी तोंड देण्यासाठी निवृत्तीनंतरही (६५-७० वर्षे वयातही) छोट्या-मोठ्या नोकर्‍या करणारे पाहिले आहेत. मुलाच्या अपघातात, बायकोच्या दुर्धर व्याधीसाठी म्हातारपणीही आर्थिक खस्ता काढणारे पुरुष पाहिले आहेत. मुलं रडताहेत म्हणून स्वतःच्या ताटलीतल अन्न त्यांच्या ताटलीत (कारण पातेल्यात कांही उरलेलं नाहीए) वाढून स्वतः तांब्याभर पाणी पिऊन कामावर जाणारे फुटपाथवरचे बापही पाहिले आहेत. कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे साहेबांची अपमानास्पद वागणूकही सहन करून नोकर्‍या टिकविणारे पुरुष पाहिले आहेत. चांगलं स्थळ हातचं जाऊ नये म्हणून हुंड्याची जमवाजमव करणारे आणि ते पैसे फेडण्यासाठी खस्ता खाणारे बाप पाहिले आहेत. मुलीच्या सुखासाठी आर्थिक गणितं जमत नसतानाही जावयांची सरबराई करणारे, त्यांच्या मागण्या पुर्‍या करणारे बाप पाहिले आहेत. आयुष्यभराची कमाई मुलाला व्यवसायासाठी देऊन कफल्लक म्हातारपणाला सामोरे जाणारे बाप पाहिले आहेत. खूप मोठी यादी आहे हो! एकदा कुटुंबाची जबाबदारी घेतली की हे सर्व करावेच लागते हे मान्य आहेच. पण ह्यात कुठे तुम्हाला तडजोड दिसत नाही का??? हल्ली कमावत्या महिलांमुळे कांही अंशी आर्थिक जबाबदारीला हातभार लागतो. मुद्दा असा आहे की तडजोड ही दोघांनाही करावी लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांजसंध्या

याला तडजोड म्हणत असतील तर

सांजसंध्या
Wed, 12/11/2013 - 07:18 नवीन
याला तडजोड म्हणत असतील तर पुरुषाने बायकोकडे नांदायला जावे. सासरा आणि जावई यामधे अडकित्त्याची भूमिका बायको बजावेल. कर्तव्यं आणि तडजोड यातच इतका गोंधळ असेल तर काय बोलणार ? हल्ली बायका सर्रास कमावत्या झाल्याच आहेत. पुरुषाने फक्त घर आणि मुलं सांभाळून दाखवावीत. घरी बसून किंवा कमावून.. कसंही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

नाईलाज आहे.

प्रभाकर पेठकर
Wed, 12/11/2013 - 10:05 नवीन
ह्यात तुम्हाला कुठेच तडजोड दिसली नसेल तर वादच मिटला. झोपलेल्याला जागं करता येतं झोपेचे सोंग घेणार्‍याला नाही. समजविण्याचा प्रयत्न संपल्यावर पुरुषाला माघारीची तडजोड करावीच लागते. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांजसंध्या

काका, इतकी वर्षे मिपावर काढुन

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 12/11/2013 - 10:14 नवीन
काका, इतकी वर्षे मिपावर काढुन सुद्धा तुम्हा पाशवी शक्तींना समजवावेसे वाटते या बद्दल कौतुक वाटते. रच्याकने, मूळ प्रतिसाद सुंदर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

ज्ञानार्जन.

प्रभाकर पेठकर
Wed, 12/11/2013 - 17:33 नवीन
वाद घातल्याने कांहीतरी ज्ञानात भर पडतेच. आजचा ट्रेंड काय आहे ह्याचे ज्ञान झाले. 'बाईने केली की तडजोड, पुरुषाने केली की 'कर्तव्य'.'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

कसली मज्जा आहे. घुम फिर के

खटासि खट
Wed, 12/11/2013 - 18:18 नवीन
कसली मज्जा आहे. घुम फिर के भोपळे चौक मे गाडी बार बार आती है. मैलामंडळ रजेवर गेलंय. त्यांच्यावतीनं पुरुषानं बाजू मांडली कि त्यालाच तै म्हणतात, गायनॉकॉलॉजिस्टला प्रेग्ननसीवर बोलायला प्रेग्नंट असण्याची अट घालतात, महाभारताचं थेट प्रक्षेपण करणारी वाहीनी मधेच मनोरंजक कार्यक्रम करतेय... मज्जा मज्जा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

मैलामंडळ

बॅटमॅन
Wed, 12/11/2013 - 18:42 नवीन
मैलामंडळ
शब्द बाकी लाईकवण्यात आला आहे. प्रतिसादाशी सहमत हेवेसांनल अर्थातच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

विश्वासघात करणे ही नेहमी

सूड
Mon, 12/09/2013 - 21:41 नवीन
विश्वासघात करणे ही नेहमी पुरषांची मक्तेदारी असल्यासारखा समज का असतो हे कळलेलं नाही. एकदा मेघना पेठेंचं 'नातिचरामि' वाचा, खाडकन उघडतील डोळे!! पुरुषच विश्वासघात करु शकतात असा तुमचा समज असावा, असं निदान तुमच्या एकतर्फी विधानांवरुन वाटतंय. तसं असेल तर हे पुस्तक मनाला पटणार नाही तुमच्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांजसंध्या

विश्वासघात फक्त पुऊषच करतात

सांजसंध्या
Tue, 12/10/2013 - 05:47 नवीन
विश्वासघात फक्त पुऊषच करतात असं म्हटलेलं नाही. स्त्री ने केला तर त्याकडे पहायचा दृष्टीकोण वेगळा असतो. ती होतीचतशी, वाईट चालीची, बदफैली पासून अनेक विशेषणं लावली जातात. लगेचच त्या बिचा-या पुरुषाला अनेक सल्ले दिले जातात. पण पुरुषाकडून हे झालं तर जाऊ द्या.. एक डाव माफ करा. तरुण वय आहे, असं व्हायचंच असे सल्ले दिले जातात. एखाद दुसरं उदाहरण वेगळं. प्रत्यक्षात फक्त संशयावरूनही बाईला मारहाणीपर्यंत मजल जाते. सुशिक्षित समाजात प्रत्यक्ष मारहाण होत नसेल पण शब्दांचा मार पुरेसा असतो. थोडक्यात चुकला तर पुरूष हा माणूस असतो, पण चुकलेली बाई ही माणूस नसते. त्यामुळं न चुकण्याची जबाबदारी शेवटी बाईवरच येऊन पडते. वरच म्हटलंय ना विधवा, टाकून दिलेया बाईवर लोकांचा डोळा असतो म्हणून ? हे पुरुषाचं वर्तन सहज म्हणून स्विकारलं जातं. इथंही काळजी बाईनेच घ्यायची असते. रात्री दार वाजवलं तर त्या बाईचाच काहीतरी दोष असला पाहीजे हा समज घट्ट असतो. दार वाजवणारा काय पुरूष असल्याने तो हे करणारच हे गृहीत धरलेलं असतं. जर चुकून काही झालं तर दोष बाईचाच. "रक्षण" न करू शकणारा पुरूष लगेच बिच्चारा ठरून काडीमोड द्यायला पात्र ठरतो. ही उदाहरणं अर्थातच सुशिक्षित वस्त्यांमधली नाहीत. पण मानसिकता ब-यापैकी सगळीकडे लागू पडते. प्रश्न प्रत्यक्षात फसवणूक / विश्वासघात कोण करतं याचा नसून उघडकीस आल्यानंतर त्याकडे पाहण्याच्या दृष्टीकोणाचा आहे. बिपाशा बासू आणि जॉन अब्राहमचं उदाहरण आहेच. दहा वर्षे रिलेशन मधे राहील्यानंतर परदेशातल्या फुटबॉलप्लेयर बरोबरच्या पार्टीवरून बिनसलं. हीच गोष्ट जॉन च्या बाबतीत अनेकदा घडते तेव्हां ती अभिमानाने मिरवण्याची असते. तिने ते समजावून घ्यायचं असतं. पण तीच गोष्ट तिने केल्यावर मात्र फिल्म इंडस्ट्रीसारख्या क्षेत्रात राहूनही त्याचा पुरुषी इगो हर्ट झाला. त्या एका कारणावरून त्यांना वेगळं व्हावं लागलं. एकदा नात्याला तडा गेल्यानंतर उगाचच एकत्र राहण्यापेक्षा तो निर्णय केव्हांही चांगला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

पुन्हा पहिले पाढे पंचावन !!

सूड
Tue, 12/10/2013 - 15:59 नवीन
पुन्हा पहिले पाढे पंचावन !! चालू द्या. वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांजसंध्या

बोलणंच खुंटलं.

सांजसंध्या
Wed, 12/11/2013 - 07:19 नवीन
बोलणंच खुंटलं. शुभेच्छांबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आजच्या सकाळ पेपरमधे (पुणे शहर

Dhananjay Borgaonkar
Tue, 12/10/2013 - 10:53 नवीन
आजच्या सकाळ पेपरमधे (पुणे शहर पुरवणी) पान नं ३ वर लिविन वर लेख आहे. त्यात मानसोपचार तज्ञ,समुपदेशक, वकील यांची मते आली आहेत. फायद्या पेक्षा तोटेच जास्त सांगितले आहेत.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा