✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

लिवैनरिलेशनितेचे आईस पत्र

ख
खटासि खट यांनी
Tue, 12/03/2013 - 19:30  ·  लेख
लेख
प्रिय आई, प्रत्येक मुलिप्रमाणे मी ही लिवइनरिलेशनशिप (लिइरि) बद्द्ल कोर्टाचा निर्नय आल्यापासुण खुप उत्सुक होते. माझ्या राजकुमारांची स्वप्ने रंगवत होते. पण आज मला जाणिव होते आहे की लिइरि म्ह्णजे फक्त गुलाबी स्वप्ने. लिइरि म्हणजे केवळ तुमच्या लाडक्या व्यक्ति सोबत राहाणे . तर लग्न म्ह्णजे जबाबदार्या, त्याग, कटकटी आणि तडजोडी यांवर अवलंबुन असलेली एक संस्था आहे. मी मला हव्या तितका वेळ झोपु शकते. मला सर्वांच्या आधी उठायची काही एक गरज नाही इन मिन दोघंच घरात. त्याला काही पाहीजे असेल तर तो करून खातो. नाहीतर आम्ही दोघे मिळून हाटेलात जातो. मी गबाळयासारखी घरभर फिरु शकते. समोरच्या बिल्डींगवर तरूण मुलं येऊन बसतात. त्याला एण्जॉय करता येत नाही पण तो काही बोलू शकत नाही. मला एण्जॉय करता येतं मी पण बोलत नाही. मी टापटीप राहाणं गरजेच नाही. वाटेल तितका वेळ लोळू शकते. तुझ्याशि फोनवर बोलायची इच्छाच होत नाहि ........... ए़खाद्या राजकुमारीसारखी मला वागणू़क मीळाली नाहि तर मी याला चल फूट म्हणू शकते. मग दुस-या स्वप्नातला राजकुमार. मला माझ्या घरच्यांची काळजी घेणं गरजेचे नाहि. त्यांना इथं आणणंच अलाऊड नाहि. मी मला हव्या त्या वेळि आणि ठीकाणी मनाला वाटेल तेव्हा जाउ शकते. अगदि तुझ्याकडेहि ........................ पण लिईरित असल्यापासुण इच्छाच झालि नाहि. एकेकदा मी स्वत: ला विचारते , ' का बरं मी लग्न केलं नसेल?'. खुप खुश होते ग मी तुझ्यासोबत.एकेकदा मला तुझ्याकडे यावसं वाटत. खुप गप्पा माराव्याशा वाटतात. पण त्या कोंडवाड्यात तुम्ही दोघांनी काढलेले दिवस आठवून शहारे येतात. अजुणही तुच करतेस ना ? मला घरी यायचं आहे तुझ्या हातचं जेवायला. माझ्या आवडीच्या डीशेस चाखयला. सगळ्या नातेवाइकांना, शेजार्यांना जळवायला. वेगवेगळ्या गोश्टि शेअर करायच्या आहेत. म्हणजे यू सर्टिफिकेटवाल्या गं पण अचानक मला जाणिव झाली कि तु लग्न केल होतंसं ना? माझ्या अंगावर शहारे आले. त्या काळि फक्त लग्न झाल्यावरच मुलं व्हायची ना ? आज इतकी प्रगती झाली कि त्यासाठी लग्नाची गरज नाही. आणि मुलांचीही नाही. कूटुंबा साठी किति फसवणुक केलीस स्वतःची . आहे त्या मधे मन मारत राहिलिस. ना कधि दागिन्यांसाठी हट्ट केलास ना कधि कपड्यांसाठि ........ आपल नविन घर घेतल तेवा आठवतय मला तुझे सगळे दागिने गहाण टाकले होते. आम्हि खुप शिकाव म्हणुन तु आणि पप्पांनि घेतलेले श्रम आजहि आठवतात. तुम्हि दोघांनी स्वतःची ही फसवौक केली नसतीत तर आज माझ्या जवळ जे काहि शहाणपण आहे ते कदाचित नसतं. हे सर्व आठ्वून मी खुप शांत होते आणि मला माझ्या लिवैन्रिलेशनिता असण्याचा अर्थ उमगतो. मुलीच्या शहाणपणा साठि आई सासरि नांदते हेचं खरे. वेळ हे काहि गोश्तिनवर औशध आहे आणि मला खात्रि आहे कि जसा जसा वेळ जाईल तशी तू ही अ‍ॅक्सेप्ट करशील हे सर्व आणी लग्ना शिवायचं आमचं आयुश्यही आवडु लागेल तुला हळु हळू........................................... तू आणि पप्पांनी केलेल्या घोडचुकां बद्द्ल आणि तड्जोडिं बद्द्ल शतशः प्रणाम......... तेच माझ्या साठि प्रेरणा दायि आणि माझे बळ वाडवणारे ठरतात.......................................................
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
शुद्धलेखन
समाज
जीवनमान
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
अभिनंदन
अनुभव
शिफारस
सल्ला
मदत
वाद

प्रतिक्रिया द्या
39416 वाचन

💬 प्रतिसाद (153)

प्रतिक्रिया

आणंदी आणंद गडे...

निराकार गाढव
Sun, 12/08/2013 - 11:07 नवीन
हकडे तकडे चोविकडे!! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ग ग म्हटलं कि प्रातःस्मरणीय

खटासि खट
Sun, 12/08/2013 - 12:16 नवीन
ग ग म्हटलं कि प्रातःस्मरणीय गाढवाचा(च) आठवतो आठवणीनं. त्यातून निराकार असल्यानं वंदन करतो. - सावळा खट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निराकार गाढव

सहमत आहे. खरेच चांगला

मृत्युन्जय
Sat, 12/07/2013 - 13:17 नवीन
सहमत आहे. खरेच चांगला प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

चर्चा सुरु केलीये म्हणून प्रतिसाद!

निराकार गाढव
Sun, 12/08/2013 - 11:04 नवीन
लै भारी! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

माझ्या जवळपास मात्र १७ वर्षापासुन ते ८५ वर्षापर्यंतची जोडपी

केदार-मिसळपाव
Mon, 12/09/2013 - 20:09 नवीन
व्यक्तीस्वातंत्र्याचा विचार (लिव-इन) हा फक्त आयुष्याचा पिक पिरिअड (पंचवीस ते चाळीस) फोकस केला तर फलदायी वाटतो पण तो संपूर्ण जीवनाचा समग्र विचार नाही.
माझ्या जवळपास मात्र १७ वर्षापासुन ते ८५ वर्षापर्यंतची जोडपी एकत्र काही अपरिहार्य, काही जमतय का बघु असे म्हणुन, काही दोघांनाही कोणि इतर मिळाले नाहित म्हणुन, काही दोघांचीही गरज म्हणुन असे (लीव्ह-इन)राहात आहेत. काहि आनंदाने तर काही ना आनंद ना दुःख अश्या विचारात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

या कालावधीत सुयोग्य

खटासि खट
Fri, 12/06/2013 - 15:01 नवीन
या कालावधीत सुयोग्य संगोपनासाठी आई-वडीलांचा समन्वय असलेलं घर आवश्यक आहे. वार्धक्यापासून मृत्यूपर्यंत काळजी घेणारं एक घर ही आयुष्यातल्या उत्तरार्धाची आवश्यकता आहे. विवाह या दोन अवस्थांमधला उमेदीचा आणि सर्वात आनंदाचा काळ आहे.
लिव इन मधे राहून हे सर्व करता येणार नाही हे कशाच्या आधारावर ठरवलंय ? (त्यासाठी विवाहाची गरज काय ?)
  • Log in or register to post comments

संगोपन आणि मूल हा लिव-इनचा फोकसच नाही

संजय क्षीरसागर
Fri, 12/06/2013 - 15:09 नवीन
एकदा अपत्य जन्म झाला की पती-पत्नीत एक अनामिक भावनुबंध तयार होतो. त्या भावनिक जवळीकेपासून स्वातंत्र्य हेच तर लिव-इनच्या पर्यायाच आकर्षण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

त्या भावनिक जवळीकेपासून

खटासि खट
Fri, 12/06/2013 - 15:14 नवीन
त्या भावनिक जवळीकेपासून स्वातंत्र्य हेच तर लिव-इनच्या पर्यायाच आकर्षण आहे. >> याला काही आधार ? लिव इन रिलेशन मधे मूल नको असतं हे कशाच्या आधारे म्हणत आहात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

एकदा अपत्य जन्म झाला की पती

खटासि खट
Fri, 12/06/2013 - 15:16 नवीन
एकदा अपत्य जन्म झाला की पती-पत्नीत एक अनामिक भावनुबंध तयार होतो.
मूल झाल्यानतरही घटस्फोट होतात, बायकोला वा-यावर सोडणारे नवरे असतात, अंगवस्त्र किंवा विवाहबाह्य संब्म्ध वगैरे याबद्दल कधीच काही कानी आलेलं नाही का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

तुमच्या मते आदर्श लिव-इनचं वर्णन करु शकाल का?

संजय क्षीरसागर
Fri, 12/06/2013 - 15:42 नवीन
म्हणजे चर्चेला दिशा राहील. वेगवेगवेगळे मुद्दे किंवा मुद्यांची पुनरावृत्ती टाळता येईल.
लिव इन रिलेशन मधे मूल नको असतं हे कशाच्या आधारे म्हणत आहात ?
मूल हवं असेल तर रितसर लग्नाचा समाजमान्य पर्याय आहे. मग लिव-इन कशाला?
मूल झाल्यानतरही घटस्फोट होतात, बायकोला वा-यावर सोडणारे नवरे असतात, अंगवस्त्र किंवा विवाहबाह्य संब्म्ध वगैरे याबद्दल कधीच काही कानी आलेलं नाही का ?
तुम्ही असफल विवाह आणि लिव-इन यांची सरमिसळ करतायं. असफल विवाहाची वेगळी कारणमिमांसा आहे. तुम्ही फक्त लिव-इन वर्सेस (सफल किंवा वेल अ‍ॅक्सेप्टेड) विवाह अश्या दृष्टीकोनातून तुमचे विचार लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

तुमचं लिव इन बद्दल काय मत आहे

खटासि खट
Fri, 12/06/2013 - 17:45 नवीन
तुमचं लिव इन बद्दल काय मत आहे ते लिहा ना, ते बरं पडेल. चर्चेसाठी तुम्हीच उत्सुक होता म्हणजे माहीतगार तुम्हीच. आम्ही मौजमजा, टाईमपास या कॅटेगरीत मोडणारे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आदर्शची काही गरज नाही. तुम्ही

खटासि खट
Fri, 12/06/2013 - 17:48 नवीन
आदर्शची काही गरज नाही. तुम्ही स्वतः केलेले स्टेटमेण्टस का केले हा सोपा प्रश्न आहे उत्तरासाठी. तेव्हढी उत्तरं द्या. आग्रह नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

व्यक्तीस्वातंत्र्याचा विचार

खटासि खट
Fri, 12/06/2013 - 15:08 नवीन
व्यक्तीस्वातंत्र्याचा विचार (लिव-इन) हा फक्त आयुष्याचा पिक पिरिअड (पंचवीस ते चाळीस) फोकस केला तर फलदायी वाटतो पण तो संपूर्ण जीवनाचा समग्र विचार नाही. >> हे पण काय झेपलं नाय बाबा. लिव इन म्हणजे पंचवीस ते चाळीस हे कुठून काढलय ? तसच विवाह म्हणजे घटस्फोट, विभक्त जोडपी नाहीतच हे तरी कुठून घेतलय ?
  • Log in or register to post comments

लिव इन म्हणजे पंचवीस ते चाळीस हे कुठून काढलय ?

संजय क्षीरसागर
Fri, 12/06/2013 - 15:25 नवीन
मग तुमच्या दृष्टीनं लिव-इनचं वय काय? टू बे वेरी फ्रँक, स्त्रीचं तारुण्य ओसरल्यावर तिचं कुणाला आकर्षण राहील?
तसच विवाह म्हणजे घटस्फोट, विभक्त जोडपी नाहीतच हे तरी कुठून घेतलय ?
असफल विवाह हा वेगळा मुद्दा आहे. विवाहाला लिव-इन हा पर्याय आहे का असा विषय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

अमृता प्रीतम?

साती
Fri, 12/06/2013 - 18:27 नवीन
अमृता प्रीतम बद्दल वाचलं नाही का? त्यांचे वय किती होते? त्या मरेपर्यंत लिवईनमध्ये होत्या. आमच्या गावातल्या घरासमोर एक लिव इन जोडपे राहते. काकूचे वय ४८-५० असेल. काकांचे वय ५०-५५. काकांना स्वतःची मुले आहेत काकूंना मुलबाळ नाही. दोघंही अगदी प्रतिष्ठितपणे आपापल्या समाजात वावरतात (दोघे वेगवेगळ्या जातींचे आहेत) तोंडावर तरी त्यांना नाव ठेवायची कुणाची हिंमत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तुम्हाला मुद्दे समजत नाहीत

खटासि खट
Fri, 12/06/2013 - 18:32 नवीन
तुम्हाला मुद्दे समजत नाहीत असं दिसतंय. तुम्ही एका ठिकाणी लिव इन २५ ते ४० वर्षे एकत्र राहणे असं म्हणता. सर्वात पहिल्यांदा हे स्टेटमेण्ट कसं काय केलं हे जाणून घेणं हे आमचं कर्तव्य आहे. दुसरं म्हणजे विवाह बंधनात स्त्री पुरूष "समाधानी" असते तर वर सांगितलेलं झालं असतं का ? विवाह झाला म्हणजे स्त्री-पुरूष समाधानी होतात, सुखी होतात, त्यांची टक्केवारी किती याबद्दल तुमच्याकडे काही विदा आहे काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तुमची सिग्नतुरे आवडली हो.

सूड
Fri, 12/06/2013 - 18:57 नवीन
तुमची सिग्नतुरे आवडली हो. सुविचार म्हणून वापरु का कघीतरी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

बिनधास्त वापरा.

खटासि खट
Fri, 12/06/2013 - 18:59 नवीन
बिनधास्त वापरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मलापण त्यांची सिग्नतुरे आवडली

स्पंदना
Sat, 12/07/2013 - 05:39 नवीन
मलापण त्यांची सिग्नतुरे आवडली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

टू बे वेरी फ्रँक, स्त्रीचं

पिशी अबोली
Fri, 12/06/2013 - 18:58 नवीन
टू बे वेरी फ्रँक, स्त्रीचं तारुण्य ओसरल्यावर तिचं कुणाला आकर्षण राहील?
मग यच्चयावत लग्न झालेले पुरुषही बायकोचं तारुण्य ओसरल्यावर मनातून केवळ अन्य तरुणींचा विचार करत राहतात का? केवळ लग्न या संस्थेने त्यांना बांधून ठेवलंय म्हणून ते स्वतःशी आणि बायकोशी प्रतारणा करत जगतात का? मग लिव इन मधला प्रामाणिकपणा काय वाईट? केवळ भावनिक गुंतवणूक नाकारणे या कारणासाठी लिव इन वर टीका करत असाल, तर भावनिक नातं अजिबात नसूनही आयुष्यभर केवळ 'लग्न झालंय' म्हणून एकत्र राहणार्‍यांच्या परिस्थितीबद्दल काय म्हणणं आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

एखाद्या गोष्टीबद्दल कुठलीही

खटासि खट
Fri, 12/06/2013 - 19:03 नवीन
एखाद्या गोष्टीबद्दल कुठलीही माहीती नसताना स्टेटमेण्ट्स करणं, चर्चा करणं, लोकांना चर्चेला भाग पाडणं याला काय म्हणावं ? किमान आपण जे स्टेटमेण्ट्स करतो त्याबद्दल सफाई पेश करता येत नसेल तर तसं कबूल करण्याचा प्रांजळपणा तरी दिसावा. उगाचच चर्चेला तोंड फोडून पांडीत्य सांडत सुटायचं आणि अंगाशी आलं कि तुम्हीच सांगा अशी १८० अंशातून उसळी घ्यायची असल्या चर्चेला आपला तर रामराम. आमचं येड्याचं ध्यान कितीतरी बरं, काय म्हणता मंडळी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

पिशी अबोली

खटासि खट
Fri, 12/06/2013 - 19:07 नवीन
पिशी अबोली क्लिकची जागा चुकली. तुम्हाला उद्देशून नाही,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

स्त्रीचं तारुण्य ओसरल्यावर

खटासि खट
Fri, 12/06/2013 - 18:36 नवीन
स्त्रीचं तारुण्य ओसरल्यावर तिचं कुणाला आकर्षण राहील? ?>>> तारुण्य ओसरल्यावर लिव इन रिलेशन संपतं असा तुमचा मुद्दा असेल तर गूगलदेवाला शरण जावे. तारुण्य ओसरल्यावर "रिलेशन" संपत असेल तर विवाह संस्था देखील काही करू शकत नाही. तुमच्या मते विवाहात अडकून बायकोचं तारुण्य ओसरलं म्हणून बाहेर लफडी करणं हे समर्थनीय आहे का ? कि विवाह करणारे असं काही करत नाहीत असं म्हणायचंय ?
  • Log in or register to post comments

तारुण्य ओसरल्यावर "रिलेशन"

कवितानागेश
Fri, 12/06/2013 - 18:45 नवीन
तारुण्य ओसरल्यावर "रिलेशन" संपत असेल तर विवाह संस्था देखील काही करू शकत नाही.>> असं कसं? विवाहसंस्था 'जुलुमाचा रामराम' करायला लावते की. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

अचूक टोला.

खटासि खट
Fri, 12/06/2013 - 18:49 नवीन
अचूक टोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

>>असं कसं? विवाहसंस्था

सूड
Fri, 12/06/2013 - 18:56 नवीन
>>असं कसं? विवाहसंस्था 'जुलुमाचा रामराम' करायला लावते की. जे ब्बात !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

लिव-इन आणि विवाह!

संजय क्षीरसागर
Fri, 12/06/2013 - 21:37 नवीन
पहिली गोष्ट, लिव-इनमधे राहाणार की विवाह करणार हा व्यक्तिगत प्रश्न आहे आणि तो सध्याच्या अविवाहितांच्या दृष्टीनं विचाराधिन आहे. त्यांना या चर्चेचा काही उपयोग होईल अशी आशा आहे. विवाहितांच्या लिव-इनच्या कल्पना आणि इतरांचे दाखले निरुपयोगी आहेत. तस्मात :
अमृता प्रीतम बद्दल वाचलं नाही का? आणि आमच्या गावातल्या घरासमोर एक लिव इन जोडपे राहते.
याला अर्थ नाही. विषयाला धरुन फक्त तुमचे मुद्दे मांडा.
मग यच्चयावत लग्न झालेले पुरुषही बायकोचं तारुण्य ओसरल्यावर मनातून केवळ अन्य तरुणींचा विचार करत राहतात का?
विचार करणं आणि कृत्य यात कमालीची तफावत आहे. शिवाय लग्न हा लिव-इनसारखा निव्वळ आकर्षणाचा भाग नाही त्याला अनेक पैलू आहेत.
तारुण्य ओसरल्यावर "रिलेशन" संपत असेल तर विवाह संस्था देखील काही करू शकत नाही
हा विचार लिव-इन संदर्भात आहे. त्याचा साधा आणि सरळ अर्थ असा की नॉर्मल स्त्री चाळीशी उलटल्यावर कुठपर्यंत आणि किती जणांशी कोणत्या आधारावर लिव-इनमधे राहू शकेल. थोडक्यात जे विवाहाच्या बाजूनं आहेत त्यांनी त्यांची बाजू मांडली आणि जे लिव-इनमधे राहू इच्छितात किंवा आहेत त्यांनी त्यांचे मुद्दे मांडले तर चर्चा विधायक होईल.
  • Log in or register to post comments

असं कसं?

दिनेश सायगल
Fri, 12/06/2013 - 23:44 नवीन
मला एका वाघावर लेख लिहायचा आहे, तर मी प्राणिसंग्रहालयात किंवा वाघाच्या गुहेत राहू म्हणता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

हे उदाहरण गैरलागू आहे

संजय क्षीरसागर
Sat, 12/07/2013 - 00:04 नवीन
लिव-इनवर चर्चा करण्यासाठी एकतर तुम्हाला तो पर्याय उपलब्ध हवा किंवा तुम्ही तो निवडलेला हवा आणि लिव-इनच्या विरुद्ध मत मांडायच असेल तर तुम्हाला विवाहाचा अनुभव हवा अन्यथा चर्चेला अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिनेश सायगल

म्हणजे प्रत्येक

बॅटमॅन
Sat, 12/07/2013 - 00:12 नवीन
म्हणजे प्रत्येक गायनॅकॉलॉजिस्टनं प्रेग्नंट व्हायलाच पाहिजे म्हणा की =)) कॉमन सेन्स इतका अनकॉमन असेलसं वाटलं नव्हतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

म्हणजे प्रत्येक

यसवायजी
Mon, 12/09/2013 - 19:15 नवीन
म्हणजे प्रत्येक गायनॅकॉलॉजिस्टनं प्रेग्नंट व्हायलाच पाहिजे म्हणा की
:)) ए ढिश्क्याँव्! ढिश्क्याँव्!! ढिश्क्याँव् :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अनुभव!

साती
Sat, 12/07/2013 - 13:54 नवीन
लिव ईनचा तीन वर्षे आणि लग्नाचा साडेआठ वर्षांचा अनुभव आहे. म्हणजे मी चर्चा करण्यास पात्रं आहे. ;) दोन्हींचे आपापले फायदे तोटे असले तरी तुम्ही म्हणता तसे सध्याच्या समाजात लग्नं करून र्हाण्याचे फायदे जास्त आहेत हे नक्कीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

लग्नं करून र्हाण्याचे फायदे जास्त आहेत हे नक्कीच.

संजय क्षीरसागर
Sat, 12/07/2013 - 14:54 नवीन
काय बोललात! आणि खुद्द तुमचा अनुभव तेच तर सांगतो :
तीन वर्षे लिव ईन + साडेआठ वर्ष लग्न आणि प्रेझंट स्टेटस : मॅरीड!
वॉट एल्स कॅन बी द प्रूफ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

सरसकटीकरण नको

पियू परी
Mon, 12/09/2013 - 19:30 नवीन
शिवाय लग्न हा लिव-इनसारखा निव्वळ आकर्षणाचा भाग नाही त्याला अनेक पैलू आहेत.
हे कश्याच्या आधारावर लिहिताय? ज्यांची भावनिक गुंतवणुक असुन लीवीन मध्ये राहात आहेत त्यांच्याबद्दल काय म्हणाल? लग्नात आकर्षण नसते हे कश्यावरून? कांदेपोह्याच्या कार्यक्रमात अर्धा तास वै. बोलायला एकटे सोडतात. त्या अर्ध्या तासात ते दोघे कश्यावरून एकमेकांच्या कमिटमेंटच्या कल्पनांविषयी बोलतात? माझ्या माहितीत बरेच जण "आधी अफेअर होते का?" अश्या टाईपचे प्रश्न विचारतात. (स्वानुभव नाही).
नॉर्मल स्त्री चाळीशी उलटल्यावर कुठपर्यंत आणि किती जणांशी कोणत्या आधारावर लिव-इनमधे राहू शकेल.
"लिवीन चा पाया फक्त शारीरीक आकर्षण आहे" अशी तुमची काहीतरी गैरसमजुत झालेली दिसते. तसंच पुन्हा लिवीन म्हणजे एकाच वेळी अनेकांशी संबंध हा अजुन एक गैरसमज. ता.क. मी लिव्ह-इनचे अजिबात समर्थन करत नाही. पण म्हणुन सरसकटीकरण (जनरलाईझेशन) करणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

चला चर्चा करून कुणीतरी का

सांजसंध्या
Sat, 12/07/2013 - 01:01 नवीन
चला चर्चा करून कुणीतरी का होईना कुठल्यातरी निष्कर्षाला आलं. मी वेडी, चर्चेला घाबरून पळाले, नुकसानच झालं नाई ?
  • Log in or register to post comments

च्यायला...

तुषार काळभोर
Sat, 12/07/2013 - 13:01 नवीन
कुनाचा कुनाला पायपोस नाय, कोन कुनाला काय बोल्तय ते कळंना... जे ह्या बाजूचे हैत, त्यांनी ह्या बाजूचे फायदे सांगा..(दुसर्‍या बाजुच्या तोट्यांविषयी न बोलता..) जे त्या बाजूचे हैत, त्यांनी त्या बाजूचे फायदे सांगा..(दुसर्‍या बाजुच्या तोट्यांविषयी न बोलता..) जे तटस्थ हैत, त्यांनी शंका इचारा...
  • Log in or register to post comments

असं व्हय. बरं.

सांजसंध्या
Sat, 12/07/2013 - 14:01 नवीन
असं व्हय. बरं. -------------------------------------------------------------- कल लुंगी पेहनकु आया, आज पँट पेहनकु.. फटे पुराने जुते भी बदलकू आते तो हम नही पैचानते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

पैलवानदादा

संजय क्षीरसागर
Sat, 12/07/2013 - 14:57 नवीन
तुम्ही विषयची योग्य समज दाखवली आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

पण

मुक्ती
Sat, 12/07/2013 - 16:14 नवीन
कोणाला विचारा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

@ साती, अँजेलिना जोलीची लिंक

खटासि खट
Sat, 12/07/2013 - 16:35 नवीन
@ साती, अँजेलिना जोलीची लिंक इथं देता आली असती. नंतर कधीतरी अनेक वर्षे लिव इन मधे राहीलेले आणि शेवटी शेवटी लग्न केलेले, न केलेले असे काही सेलेब्रिटीज यांच्याबद्दल बोलण्यासारखं आहे. सेलेब्रिटीजच का इतरांमधेही आहे कि हा ट्रेण्ड. भारतातही आहे. मध्यंतरी संध्या गोखले या बाईचं लिव इन बद्दलचं एक आर्टिकल वाचनात आलेलं. http://wonderwoman.intoday.in/story1/do-they-need-to-say-i-do/1/86035.html संदर्भ म्हणून फक्त. ;)
  • Log in or register to post comments

जी व्यक्ती स्वतः तीन वर्ष लिव-इनमधे राहिल्यावर

संजय क्षीरसागर
Sat, 12/07/2013 - 17:14 नवीन
साडेआठ वर्ष संसार करुन म्हणते की :
दोन्हींचे आपापले फायदे तोटे असले तरी तुम्ही म्हणता तसे सध्याच्या समाजात लग्नं करून राहाण्याचे फायदे जास्त आहेत हे नक्कीच.
तिथे चर्चा संपन्न होते. इतर दाखल्यांची आवश्यकताच नाही. मी सुरुवातीपासूनच म्हणत होतो की प्रत्यक्ष अनुभव महत्त्वाचायं. कारण अँजेलिना जोली किंवा संध्या गोखलेबद्दल इथे फक्त काल्पनिक चर्चा होईल आणि त्याचा कुणाला काही उपयोग नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

>>>सध्याच्या समाजात लग्नं

प्यारे१
Sat, 12/07/2013 - 18:48 नवीन
>>>सध्याच्या समाजात लग्नं करून राहाण्याचे फायदे जास्त आहेत (विथ ड्यु रिस्पेक्ट टु साती मॅडम) त्यांनी व्यवहार्य मार्ग स्वीकारला आहे असं नाही वाटत तुम्हाला, सर????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

खरंय!

साती
Sat, 12/07/2013 - 20:12 नवीन
व्यवहार्य मार्गं हा शब्दप्रयोग बरोबर आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

मॅडम!

साती
Sat, 12/07/2013 - 20:14 नवीन
मॅडम नका हो म्हणू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

ठीके मॅडम. (हा शं-भरावा! )

प्यारे१
Sun, 12/08/2013 - 19:12 नवीन
ठीके मॅडम. ;) (हा शं-भरावा! =)) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

मानलं राव! काय दाँडगा अणुभव है,,,!

निराकार गाढव
Tue, 12/10/2013 - 08:56 नवीन
मी सुरुवातीपासूनच म्हणत होतो की प्रत्यक्ष अनुभव महत्त्वाचायं
बगा बगा. उगाच नाय्येत शानपन. याला म्ह्न्त्यात आणुभव. समद्या मणुक्षांणी या आणुभव संप्प...प..प्प्ण्ण्णतेचा उपेग करूण घेवा हीच म्या गाढवाची प्रार्थना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

लिव्ह इन रिलेशन हि फक्त उच्च

सुबोध खरे
Sat, 12/07/2013 - 20:50 नवीन
लिव्ह इन रिलेशन हि फक्त उच्च मध्यम वर्गात किंवा उच्च वर्गात सफल होण्यःची शक्यता आहे. जेथे स्त्री हि आपल्या पायावर उभी आहे. इतर सर्व वर्गात स्त्री ला ते शक्य नाही. कारण विवाह संस्थेत पुरुष हा आपण एकत्र राहणार याची ग्वाही/ बांधिलकी(commitment) देत असतो. त्यामुळे जनाची (आणि मनाची) तशी तयारी करून असतो. याउलट लिव्ह इन मध्ये TTMM (तुझी तू माझा मी)असल्याने मुळातच हि बांधिलकी नाही. शिवाय या नात्याला कायद्याचे पूर्ण संरक्षण नाही. लिव्ह इन पार्टनर पुरुष दिवंगत झाला तर त्याला मिळणारी विमा किंवा इतर सर्व रक्कम हि त्या स्त्रीला मिळणारच नाही. मग मध्य वयात जर हातात उत्पन्नाचे स्त्रोत नसेल तर ती स्त्री कोणाच्या तोंडाकडे पाहील? त्यातून जर मुल असेल तर अजूनच बिकट परिस्थिती. शिवाय समाजमान्यता नसल्याने सासू सासरेच काय पण स्वतःचे आईवडील सुद्धा आधार देतील याची खात्री काय? अगदी खालच्या वर्गात जर्री स्त्री हि मुख्य मिळवती घटक असेल तरीही ती जर "नुसतीच" राहत असेल( आधुनिक भाषेत लिव्ह इन) तर आजूबाजूचे लोक तिच्यावर डोळा ठेवून असतात. याच कारणासाठी दारुडा असेल तरी बायका "नवर्याबरोबर राहतात". तस्मात अजूनतरी स्त्रीसाठी लिव्ह इन पेक्षा विवाहसंस्था हि जास्त सुरक्षित आहे. येणारा काळ जर या नात्याला कायदेशीर आणि फायदेशीर मान्यता देईल तर गोष्ट वेगळी अन्यथा लिव्ह इन रिलेशन हि पुरुषाला फायदेशीर आहे. हा फार गहन विषय आहे आणि एवढे सगळे टंकायचा कंटाळा आला आहे(तुम्हाला वाचायचाही आला असेलच) म्हणून इथेच थांबवितो.
  • Log in or register to post comments

@ सुबोधजी

संजय क्षीरसागर
Sat, 12/07/2013 - 23:30 नवीन
अन्यथा लिव्ह इन रिलेशन हि पुरुषाला फायदेशीर आहे
संपूर्ण सहमत आहे. स्त्रियांच्या हे लक्षात येईल तो सुदिन!.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

तर आजूबाजूचे लोक तिच्यावर

सांजसंध्या
Sun, 12/08/2013 - 08:12 नवीन
तर आजूबाजूचे लोक तिच्यावर डोळा ठेवून असतात. याच कारणासाठी दारुडा असेल तरी बायका "नवर्याबरोबर राहतात".
यात त्या स्त्री ची फरफटच आहे असं नाही वाटत ? तिची कुठलीही चूक नसताना "पवित्र" राहता यावं म्हणून "दारुडा" "बाहेरखाली" "बसून खाणारा" कसाही असला तरी कुंकवाचा धनी असलाच पाहीजे. पातिव्रत्य, योनीशुचिता या सर्व कल्पना पुरुषाच्या. तिचं पालन करण्यासाठी तिने खितपत पडायचं. पण नव-याने दारुडा असू नये यासाठी हा समाज काही करणार नाही, तिच्यावर लोक डोळा ठेवतात म्हणून तिला त्याच्याबरोबर नांदण्यासाठी भाग पाडणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

@ सांजसंध्या

सुबोध खरे
Sun, 12/08/2013 - 12:24 नवीन
सांजसंध्या ताई, दुर्दैवाने ते सत्य आहे. स्त्रीची पुरुषसत्ताक पद्धतीत फरफट होतेच. आजही जोवर कायद्याचे संरक्षण सर्वसामान्य माणसा(स्त्री) पर्यंत पोहोचत नाही तोवर स्त्रीला कुंकवाचा धनी हा लागणारच. कारण आजही निम्न वर्गातील स्त्री जर एकटी( मुलांबरोबर) राहत असेल तर रात्रीबेरात्री तिचा दरवाजा ठोकणारे हलकट असतातच. त्यामुळे असा रोजचा ससेमिरा लागण्यापेक्षा दारुड्या का होईना पण एक "पुरुष" घरात असावा लागतो. गरिबी हि अशी वाईट गोष्ट आहे कि विधवा किंवा नवर्याला सोडून आलेल्या स्त्रीला आई बाप सुद्धा आपल्या घरात थारा देत नाहीत. यासाठी आर्थिक किंवा सामाजिक उन्नती होत नाही तोवर स्त्रीची खरी बंधमुक्ती होणार नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांजसंध्या
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा