Skip to main content

आनंद - कार्लसन डाव ५

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 15/11/2013 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
एक डोळा तिकडे मुंबईत आणि दुसरा चेन्नै अशी अवस्था झाली होती. त्यापैकी आता फक्त चेन्नैत जीव अडकला आहे!बहुप्रतीक्षित असा डाव क्र. ५ सुरु होतोय.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 36277
प्रतिक्रिया 215

प्रतिक्रिया

In reply to by सुहासदवन

त्याचा उद्देश एफ ६ ला सपोर्ट द्यायचा आहे.. ई-एफ आणि जी पट्यात बरीच मारागीरी होइल

In reply to by अग्निकोल्हा

कालु? भारतीयीकरण आवडलं नावाचं :-)

आणला आनंदने. जी आणि एच प्यादी पुढे सरकवून एक्स्चेंज करवणे आणि मग एच पट्टीतला हत्ती मोकळा करुन घेणे अशी आयडिया दिसतेय.

हत्ती डी ८ मधे. आता कालूचा उंट डी३ मधे येऊ शकत नाही! मस्त आता हत्ती डी४ असा घुसलाय आनंदचा. कालूचे हत्ती राजाच्या बाजूला आणि आनंदचे वजिराच्या बाजूला चढाई करताहेत!

आनंदला शह देऊ शकत नाहीये आणि त्याचा सी २ वरचा उंट अडकल्यासारखा झालाय तो ई४ वरचे प्यादे हलवू शकत नाहीये. त्याला एफ पट्टीतला हत्ती मागे घ्यायला लागणार बहुदा.

आनंदने थेट डी८ मधे नेला ऊंट! आता कालूचा उंट बी१ असा गेलाय. आनंद कदाचित ए ४ असा खेळेल कारण मग प्याद्यंची मारामारी होऊन मॅग्नुसचा राजा उघडा पाडता येईल!

प्यादे पुढे येऊन हत्तीला सपोर्ट झाला. आनंदने ई५ प्यादे सुद्धा पुढे ढकलून ई४ प्याद्याची वाट बंद केली.

In reply to by चतुरंग

ई प्यादे पडल्यावर आनंदला काय पर्याय राहतील या विचारांत.

In reply to by आतिवास

राजा डी ६ मग हत्ती एच५ जाईल मग हत्ती डी८ असा उंटावर जाऊ शकतो.

डी८ आला तर राजाला मागे जावे लागेल किंवा उंट डी३ आला तर प्यादे सी४. मग ऊंटाला जागा राहत नाही.

आला. आता उंट हलवावा लागणार एफ ५ बहुतेक मग हत्ती सी १ राजा डी३ सी४ शह मग राजा ई३ आणि प्यादे सी ३

In reply to by arunjoshi123

कारण ई५ फारच धोकादायक आहे आणि शिवाय उजव्या बाजूला दोन कनेक्टेड प्यादी आहेत. फारच अचूक खेळ करावा लागेल तर कदाचित डाव वाचवता येईल! बघूयात काय होते.

राजा डी ७, आता प्यादे ई ६ चेक आणि मग राजा ई७ मग हत्ती एच ७ चेक झाला बहुतेक वजीर झाला असे वाटते अजून ४ खेळ्यात?

आजचा कार्लसन चा विजय तूफानच म्हटला पाहिजे बघता बघता एका अतिशय नीरस व अनिर्णीत भासणार्या डावाचे आनंदला गाफिल ठेउन विजयात सुरेख रूपांतर केले. आनंदला त्याच्या अतीबचावात्मक खेळाची मस्त शिक्षा मिळाली.