Skip to main content

आनंद - कार्लसन डाव ५

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 15/11/2013 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
एक डोळा तिकडे मुंबईत आणि दुसरा चेन्नै अशी अवस्था झाली होती. त्यापैकी आता फक्त चेन्नैत जीव अडकला आहे!बहुप्रतीक्षित असा डाव क्र. ५ सुरु होतोय.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 36181
प्रतिक्रिया 215

प्रतिक्रिया

E4 ऐवजी B4 न्यायला पाहिजे होते

आणला आनंदने. जी आणि एच प्यादी पुढे सरकवून एक्स्चेंज करवणे आणि मग एच पट्टीतला हत्ती मोकळा करुन घेणे अशी आयडिया दिसतेय.

आता उंट डी३ अशी अटकळ आहे मॅग्नुसची. आनंद बहुतेक हत्ती डी८ घेणार का?

हत्ती डी ८ मधे. आता कालूचा उंट डी३ मधे येऊ शकत नाही! मस्त आता हत्ती डी४ असा घुसलाय आनंदचा. कालूचे हत्ती राजाच्या बाजूला आणि आनंदचे वजिराच्या बाजूला चढाई करताहेत!

आनंदला शह देऊ शकत नाहीये आणि त्याचा सी २ वरचा उंट अडकल्यासारखा झालाय तो ई४ वरचे प्यादे हलवू शकत नाहीये. त्याला एफ पट्टीतला हत्ती मागे घ्यायला लागणार बहुदा.

आता इथवर येउन कार्लसन मागे जाणार नाहीच मुळी

आनंदने थेट डी८ मधे नेला ऊंट! आता कालूचा उंट बी१ असा गेलाय. आनंद कदाचित ए ४ असा खेळेल कारण मग प्याद्यंची मारामारी होऊन मॅग्नुसचा राजा उघडा पाडता येईल!

प्यादे पुढे येऊन हत्तीला सपोर्ट झाला. आनंदने ई५ प्यादे सुद्धा पुढे ढकलून ई४ प्याद्याची वाट बंद केली.

कालू वेळात मागे पडतोय की काय?

KF6 ??

डी८ आला तर राजाला मागे जावे लागेल किंवा उंट डी३ आला तर प्यादे सी४. मग ऊंटाला जागा राहत नाही.

आला. आता उंट हलवावा लागणार एफ ५ बहुतेक मग हत्ती सी १ राजा डी३ सी४ शह मग राजा ई३ आणि प्यादे सी ३

In reply to by arunjoshi123

कारण ई५ फारच धोकादायक आहे आणि शिवाय उजव्या बाजूला दोन कनेक्टेड प्यादी आहेत. फारच अचूक खेळ करावा लागेल तर कदाचित डाव वाचवता येईल! बघूयात काय होते.

राजा डी ७, आता प्यादे ई ६ चेक आणि मग राजा ई७ मग हत्ती एच ७ चेक झाला बहुतेक वजीर झाला असे वाटते अजून ४ खेळ्यात?

In reply to by चतुरंग

नाही. माझं काहीतरी मोजायला चुकलं नक्कीच!

हुदिनी +२.७५ (!!!!) देतोय मॅग्नसला. (दात खाणारी स्मायली कुठे आहे?)

आजचा कार्लसन चा विजय तूफानच म्हटला पाहिजे बघता बघता एका अतिशय नीरस व अनिर्णीत भासणार्या डावाचे आनंदला गाफिल ठेउन विजयात सुरेख रूपांतर केले. आनंदला त्याच्या अतीबचावात्मक खेळाची मस्त शिक्षा मिळाली.