Skip to main content

आनंद - कार्लसन डाव ५

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 15/11/2013 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
एक डोळा तिकडे मुंबईत आणि दुसरा चेन्नै अशी अवस्था झाली होती. त्यापैकी आता फक्त चेन्नैत जीव अडकला आहे!बहुप्रतीक्षित असा डाव क्र. ५ सुरु होतोय.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 36422
प्रतिक्रिया 215

प्रतिक्रिया

आला. आता उंट हलवावा लागणार एफ ५ बहुतेक मग हत्ती सी १ राजा डी३ सी४ शह मग राजा ई३ आणि प्यादे सी ३

In reply to by arunjoshi123

कारण ई५ फारच धोकादायक आहे आणि शिवाय उजव्या बाजूला दोन कनेक्टेड प्यादी आहेत. फारच अचूक खेळ करावा लागेल तर कदाचित डाव वाचवता येईल! बघूयात काय होते.

राजा डी ७, आता प्यादे ई ६ चेक आणि मग राजा ई७ मग हत्ती एच ७ चेक झाला बहुतेक वजीर झाला असे वाटते अजून ४ खेळ्यात?

आजचा कार्लसन चा विजय तूफानच म्हटला पाहिजे बघता बघता एका अतिशय नीरस व अनिर्णीत भासणार्या डावाचे आनंदला गाफिल ठेउन विजयात सुरेख रूपांतर केले. आनंदला त्याच्या अतीबचावात्मक खेळाची मस्त शिक्षा मिळाली.

In reply to by रमताराम

कारण आता सलग दोन डावात आनंदकडे पांढरी मोहोरी असणार आहेत! सहाव्या डावात पांढरी आणि पुढच्या सहा डावात रंग बदलतात त्यामुळे पुन्हा एकदा. त्याला आता चमत्कार दाखवावाच लागेल! कम ऑन विशी फाईट!!

फारच सुंदर खेळला कार्लसन!! आनंदच्या काही चुका त्याला चांगल्याच महागात पडल्या!! फर्स्ट रिअल ब्लड ड्रॉन!!