मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आनंद - कार्लसन डाव ८

चतुरंग · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
शेवटल्या पाच डावात आनंद काय चमत्कार करणार? पहिली मूव मॅग्नुसची मूव काय असेल? कॅन आनंद क्रॅक कोड मॅग्नुस? चला बघूयात गेम ८.

वाचने 19989 वाचनखूण प्रतिक्रिया 109

चतुरंग Tue, 11/19/2013 - 15:06
डावाच्या मध्यात मॅग्नुसचा हत्ती आणि प्यादे आलेय. आता बी ६ प्यादे घेऊन कर्णात उंट काढणार का आनंद? का काळा उंट लगेच हाकलून लावेल? तसेच झाले, हत्ती मागे गेला.

चतुरंग Tue, 11/19/2013 - 15:10
तो आक्रमकपणा दिसत नाहीये जो आता खरंतर दिसायला हवा, कारण आता नाही तर तो कधी आक्रमक होणार? तसाही तो दोन गुण मागे आहे, हीच संधी आहे आक्रमणाची. अन्यथा सामना गेल्यासारखाच म्हणावा लागेल!

चतुरंग Tue, 11/19/2013 - 15:15
जितकी मोहोरी पटावरुन जातील तितका डाव मॅग्नुसला सोपा हे समीकरण आहेच. घोडा ई१ म्हणजे आता डी५ असे प्यादे टाकायचा विचार आहे. उंट एफ ४ आलाय. मॅग्नुस चटाचट खेळतोय. आणि आनंदचे प्रेशर वाढवतोय. दोघांसाठी ही स्थिती पहिल्यांदाच आलीये बोर्डावर.

रमताराम Tue, 11/19/2013 - 15:17
या आनंदला हाणा रे कुणीतरी. बाहेर काढून घोडा परत पहिल्या फळीत मागे नेला पठ्ठ्याने. जवळ जवळ प्रत्येक गेममधे असं झालंय. एकुणच त्याच्या प्रवासाचं निदर्शक मानायचं की काय? :)

रमताराम Tue, 11/19/2013 - 15:17
या आनंदला हाणा रे कुणीतरी. बाहेर काढून घोडा परत पहिल्या फळीत मागे नेला पठ्ठ्याने. जवळ जवळ प्रत्येक गेममधे असं झालंय. एकुणच त्याच्या प्रवासाचं निदर्शक मानायचं की काय? :)

In reply to by रमताराम

चतुरंग Tue, 11/19/2013 - 15:19
एरवी घोडी इतका उत्तम नाचवणारा आनंद यावेळी रिकिबीत पाय ठरत नाहीयेत त्याचे! ;)

चतुरंग Tue, 11/19/2013 - 15:18
आता पुढच्या खेळीत पांढरे उंट एक्सचेंज होणार का? घोडा डी२. मॅग्नुसने १५ खेळ्यांना फक्त ३ मिनिटे घेतलीत आणि आनंदने १५.

In reply to by संजय क्षीरसागर

चतुरंग Tue, 11/19/2013 - 15:25
म्हणजे एफ, जी, एच प्यादी रेटणार म्हणाकी!

चतुरंग Tue, 11/19/2013 - 15:24
डबल करणार काय मॅग्नुस वजिराच्या पट्टीत? आनंद आज वेळ घेतोय खेळ्यांना. त्याच्या चेहेर्‍याकडे बघून डाव त्याला हवा तसा डेवलप झालाय की नाही हे समजत नाहीये. पोकर फेस!

चतुरंग Tue, 11/19/2013 - 15:27
हत्ती + वजीर मॅग्नुसने. पहिली वेगळी खेळी. आनंदच्या पांढर्‍या उंटाला आता चांगली जागा हुडकावी लागेल कारण बी एफ ५ झाले तर थेट मारामारी करणार कार्लसन असे दिसते.

चतुरंग Tue, 11/19/2013 - 15:34
आता घोडी डावाच्य मधे आलीत. मॅग्नुसची घरची तयारी जोरात झालीये. तो खेळायला अजिबात वेळ घेत नाहीये. फक्त ६ मिनिटात त्याने १९ खेळ्या केल्यात! अमेझिंग!

चतुरंग Tue, 11/19/2013 - 15:37
अरे आनंदा असे काय चालले आहे? आजही ग्राईंडिंग लाँग गेम किंवा ड्रॉ असे भविष्य वर्तवावे का?

In reply to by चतुरंग

रमताराम Tue, 11/19/2013 - 15:44
मला वाटतंय की २ पॉईंट लीड हा तसा खूप मोठा आहे. मॅग्नस अजून एक दोन ड्रॉ घेईन फटाफट आणि नंतर शेवटचे दोन तीन डाव एकदम आक्रमक खेळून आनंदला पुरता भुईसपाट करण्याचा प्रयत्न करेल. आनंदला नव्या खेळ्या शोधण्यात सातत्याने अपयश येते आहे. मॅग्नस अगदी आरामात आणि ताबडतोब प्रत्युत्तर देतो आहे.

In reply to by रमताराम

चतुरंग Tue, 11/19/2013 - 16:07
तो भलताच अनप्रेडिक्टेबल आहे हे नक्की! संपूर्णपणे गेम ऑफ इंट्यूशन आहे.

चतुरंग Tue, 11/19/2013 - 15:43
तर मॅग्नुसचा घोडा मस्त डावाच्या मधे ठाण मांडून बसतोय! त्याला उंट कुठेच हलवता येत नाहीये आहे तिथेच ठेवयचा नाहीतर एक्सचेंज.

In reply to by संजय क्षीरसागर

चतुरंग Tue, 11/19/2013 - 15:46
आहेच. झाले उंट गेले. आनंदचा वजीर आणि घोडा डावाच्या मधे आलेत. आणि कालूचा घोडा ई५ असा मस्त येऊन बसलाय.

चतुरंग Tue, 11/19/2013 - 15:56
खरंतर सांदीपन चंदा हा बराचसा मॅग्नुससारखा खेळतो असं म्हणतात म्हणून आनंदने त्याला टीममधे घेतला. परंतु टीम कार्लसनने आत्तापर्यंत आनंदचे सगळे प्लॅन्स हाणून पाडलेत. आक्रमणाशिवाय पर्याय नाहीये!

रमताराम Tue, 11/19/2013 - 15:58
कार्ल्या असा काही तंगड्या पसरून बसतो की असं वाटतं आत्ता म्हणेल 'अरे काय टाईमपास लावलाय, जरा पटपट खेळ की.'

चतुरंग Tue, 11/19/2013 - 16:16
टीम आत्तापर्यंतरई पूर्णपणे निष्प्रभ ठरली आहे. कोणताही थरारक काउंटरप्ले ते जनरेट करु शकले नाहीत! वी अलमोस्ट हॅव अ न्यू चँपिअन!!

In reply to by चतुरंग

रमताराम Tue, 11/19/2013 - 16:18
त्याची बॉडी-लॅंग्वेज आणि खेळातील रिस्क घेण्याबाबत अनिच्छा पाहता पुढे फार फरक पडेल असे म्हणणे फारच धाडसाचे ठरेल.

In reply to by रमताराम

खरंच :( आता इथुन पुढे जर आनंदने कम्बॅक केले अन च्यॅम्पीयनशीप राखली तर ते एक ग्रेट मिरअ‍ॅकल असेल !!

In reply to by चतुरंग

येस! बॉबी फिशरनं म्हटलंय चेस इज नॉट अ लाँग ड्रॉन डिप थॉट गेम. यू जस्ट नीड टू हॅव अ थ्री-फोर मूव्हज शॉर्ट अँड फ्लॉलेस प्लान. विन दिज स्मॉल फाईटस अँड दॅट अल्टिमेटली विन्स द बॅटल!

In reply to by चतुरंग

मन१ Tue, 11/19/2013 - 23:18
व्ही व्ही एस लक्ष्मण -राहुल द्रविड ह्यांच्या भागीदारीसारखं काहीतरी होउन फॉलोऑन मिळालेला सामनाही आनंदनं जिंकून घ्यावा असं अजूनही वाटतय. काही तरी चमत्कार व्हावा राव आता.

चतुरंग Tue, 11/19/2013 - 16:17
चेन्नैत सामना घेणे हे आनंदच्या पथ्यावर पडण्याऐवजी त्याला अपेक्षांच्या ओझ्याखाली दाबून टाकणारे ठरले!! आनंद त्याच्या शेलमधून बाहेर येऊ शकत नाहीये. ही इज टू डिफेन्सिव, वेरी अननॅचरल ऑफ हिम! :(

जेपी Tue, 11/19/2013 - 16:51
आर्रर्र आलो तोपर्यंत संपलीपण मॅच . बायदहायवे , धन्यवाद समालोचनासाठी .

In reply to by भडकमकर मास्तर

चतुरंग Wed, 11/20/2013 - 11:08
ऑलिंपिक संघटनेशी सलग्न आहे त्यामुळे बुद्धीबळातही उत्तेजक द्रव्य चाचणी अनिवार्य झाली आहे. आज आनंद आणि मॅग्नुस दोघांचे युरीन सँपल घेतले गेले. अर्थात हे आजच नाही तर २००६ पासूनच्या सग़ळ्या मोठ्या सामन्यात केले जाते आहे.

नी सेकंड्स ची नावं डिस्क्लोज केल्यामूळं कार्ल्सन ला थोडा अंदाज आला असेल तो काय खेळु शकतो ते. त्याचाही त्याला थोडा फायदा झाला असेल असं वाटतं. पण आता जर २ गेम्स हरलेतच तर थोडीशी रिस्क घेउन खेळायला काय हरकत आहे ? कि या लेवलला काउंटर प्ले जनरेट करणं तेव्हढं सोपं नाही आहे अँड दॅट वीन लॉस इक्वेशन कॅन अफेक्ट द प्राइज मनी अ‍ॅज वेल ?

सुहासदवन Tue, 11/19/2013 - 21:34
इट इज कॉल्ड एटिट्युड एण्ड प्रोफेश्नलिज्म. मी आधीच म्हणालो होतो की पटाबाहेरच्या ह्या खेळात कार्लसनने आधीच बाजी मारली आहे. कार्लसनला सुरुवातीपासूनच आनंदची टिम ओळखू शकली नाही. हा असा अभ्यास असतो आपला आपल्या विरोधी पक्षाचा, ह्याच नाही तर इतर साऱ्याच खेळांमध्ये. आपल्या भारतीयांना आपल्या शत्रूविषयी देखील खूप काळजी असते आणि तीच नडते आपल्याला. जेव्हा आपण आपले पत्ते बाहेर काढले तेव्हा तो आपले पत्ते शो ऑफ करणार की नाही हे देखील कळले नाही. त्याने पूर्ण टूर्नामेंट पोकर फेसने काढली. समोरच्याला आपल्या खेळाचा थांगपत्ताच लागू दिला नाही. माझा आनंदच्या खेळावर पूर्ण विश्वास आहे. जरी तो अडचणीत आला असला तरी फाईटर आहे. सो लेट्स होप फॉर द बेस्ट.

In reply to by सुहासदवन

चतुरंग Wed, 11/20/2013 - 11:23
त्यात फारसे गुपित राखण्याजोगे काही नव्हते. त्यामुळे कार्लसनला त्याचा वेगळा फायदा झाला असे वाटत नाही. मॅग्नुसचा खेळ हा आनंद टीमने जोखला त्याहीपेक्षा वेगळा निघाला हे मात्र खरे.

In reply to by चतुरंग

आनंद ने डिक्लेअर केली टीम तेव्हा कार्ल्सनचा चेहरा बघण्यासारखा होता. (आनंदनी पीटर लेकोचं नाव घेतलं तेव्हा पाहा) त्यानी एक्स्पेक्ट नव्हतं केलं की आनंद उत्तर देइल म्हणून. ही वॉज टोटली सरप्राइज्ड. तेव्हा त्याला अंदाज आला असेल व्हॉट टू एक्स्पेक्ट.

जेव्हा आनंदने टीम डिक्लेअर केली तेव्हा अगदी आनंदने डावाच्या आधीच "सायकोलॉजीकल बॅटल" सुरु केलंय वगैरे रिपोर्ट्स ! झालं उलटच. सगळे म्हणत होते कार्ल्सन ला मॅच प्ले चा एक्स्पीरीअन्स नाही त्यामुळे त्याला अवघड जाइल वगैरे वगैरे. तो झोप आल्यासारखा चेहरा करुन बसतो अगदी आरामात. कळत देखील नाही त्याला टेन्शन आहे की नाही ते :)

माझ्या मते कार्लसननं 25. Qxe8+ या जबरदस्त चालीनं, आनंदला निर्विवादपणे ड्रॉ करायला भाग पाडलं. याविषयी तुम्हाला काय वाटतं?

In reply to by संजय क्षीरसागर

अग्निकोल्हा Wed, 11/20/2013 - 14:26
ड्रो कार्लसन करत नाही फक्त आनंद करतो, कारण त्याला कसे जिंकावे हेच अजुन उमजले नाहिये! बघुया आज काय होतय. बाकी तुमच्या विरुध्द एक बुध्दिबळाचा डाव खेळायची तीव्र इच्छा आहे येताय का ऑनलाइन ? कारण तुम्हाला सगले फक्त ऑनलाइन पसंत असते म्हणून विचारले

In reply to by संजय क्षीरसागर

अग्निकोल्हा Wed, 11/20/2013 - 16:47
ड्रो कार्लसन करत नाही फक्त आनंद करतो, कारण त्याला कसे जिंकावे हेच अजुन उमजले नाहिये!
कार्लसन त्याला ड्रो करायला भाग पाडत नाही कारण आनंद कार्लसनला मुळात धोक्यातच आणत नाही.... तर तो आनंदला ड्रो करायला भाग पाडायच्या फंदात पडेल कशाला ?