Skip to main content

आनंद - कार्लसन - डाव ४

लेखक आनन्दा यांनी बुधवार, 13/11/2013 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
चौथा डाव सुरू झालाय -- हा डाव निकाली निघणार असे वाटतेय.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 31077
प्रतिक्रिया 251

प्रतिक्रिया

आता हत्ती डी७ वर घेतला तर काय होईल? उंटाने हत्ती मारला तर दुसर्‍या हत्तीने उंट मारता येईल प्यादे पिन करायला? नाही ते फारसे फायदेशीर दिसत नाही.

आता इ ५ वरचे प्यादे वाचवण्यासाठी हत्ती इ१ किंव्वा हत्ती इ२ करावेच लागणार ....बॅटर्री ब्रेक होणार :( अवघडय

छान! आता ए ६ येईल का प्यादे? पण मग हत्ती सी स्तंभात डबल होऊन घोड्यावर येतील बी ५ वरचा घोडा घेतला तर सी ६ वरचा घोडा मारुन सी ७ वरच्या प्याद्याला धोका आहे!

मॅग्नुसने प्यादे हलवून हत्तीला जागा करुन द्यायचे ठरवले!आता आनंदला ते प्यादे थोपवणे भाग आहे नाहीतर दुसरा हत्ती आत आला की मग अवघड होईल!

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

सध्या डाव सी सॉ होतोय. आनंदकडे एक प्यादे कमी आहे पण त्याची मोहोरी अ‍ॅक्टिव आहेत विरुद्ध मॅग्नुसकडे एक प्यादे जास्त असले तरी मोहोरी फारशी अ‍ॅक्टिव नाहीत.

फारशा खेळ्या नाहीयेत त्यामुळे आता प्याद्याची खेळी होणार. फक्त जी ६ च दिसते आहे मला तरी!

जी-६ खेळेल मॅग्नस. आनंदने प्यादे घेणे म्हणजे सरळ ती प्यादी गमावणे. त्याऐवजी ई पट्टीतले प्यादे पुढे सरकवणेही धोकादायक. कारण मग एफ पट्टीतले प्यादे मॅग्नस आरामात मटकावतो. आनंदचे जी पट्टीतले प्यादे त्याला मदत करू शकत नाही कारण मागे मॅग्नसचा हत्ती आहे. जी प्याद्याने सपोर्ट दिलाच तर हत्ती एक्स्चेंज करून मॅग्नस आपले ए प्यादे निर्धोकपणे पुढे दामटायला सुरुवात करेल.

In reply to by शैलेन्द्र

दोन प्यादी पडतील. उंट आणि एच पट्टीतला हत्ती घेऊन मॅग्नस हल्ले सुरू करेल.

In reply to by रमताराम

बी पट्टीतल दुसरा घोडा डी-४ वर आणता येईल. पण मग आतापर्यंत लावलेला सगळा कोट मोडीत निघेल.

त्याचा घोडा एफ २ वर अडकलाय आणि त्याचा वेळ कमी होतोय! आता कार्लसनचा हत्ती सुद्धा अ‍ॅक्टिव होतोय. आनंदने घोडा खेळला ई४ वरती?!! वॉव!!

मॅग्नसने एफ पट्टीतून हत्तीने चेक देताना जी पट्टीतले प्यादे निर्धोक केले. दोन प्यादी अधिक असलेल्या मॅग्नसला आता मारामारी करायला मोकळीक. शेवटी फक्त राजे राहिले तर हे जी प्यादे विना-अडथळा वजीर बनू शकते.

In reply to by रमताराम

हत्तीदेखील सुरक्षित हलवायला हवा आधी त्याला. नाहीतर डिस्कवर्ड चेक देऊन आनंद त्याला मटकावू शकतो. बहुधा ई-६ ला मागे जाईल.

In reply to by रमताराम

एफ-६

असे कॉमेंटेटर म्हणताहेत - हत्ती डी ८! खेळायला हवी होती. आनंदचा सगळा भर ई ६ प्याद्यावर आहे. ते जोपर्यंत आहे तोपर्यंत काळी मोहोरी त्या प्याद्याच्या भोवती फिरत राहणार एकदा का ते पडले की डाव गेला मग आनंदची स्थिती अवघड आहे!

मॅग्नसने अपेक्षित खेळी केली. नैतर घोड्याने राजाला चेक देऊन, घोडा बळी देऊन त्या बदल्यात हत्ती घेतला असता आनंदने.

ई ७.. :)

घमासान सुरू होते की काय!! घोडा मागे घेऊन सर्व जोर एका घरावर एक्वटलाय. मॅग्नसचे उंट व घोडे घेता येतील आनंदला.

हत्ती थेट ८ व्या फळीत मागे नेला????? काय कळंना. कार्ल्याने एकदम थेट मागे घेतला?? हुदिनी अचानक डाव बरोबरीत दाखवू लागलाय.

काळ्याची दोन जास्त प्यादी आणि पांढर्‍याचे पोझीशनल अ‍ॅडवांटेज असा सामना आहे! घोडा डी ४, आता घोड्याने डी४ वरचा घोडा मारणे गरजेचे आहे. उंट ई८ वरती अडकलाय. आनंदचा घोडा डी४ वर येऊ शकेल हे बहुदा त्याने मिस केले!

काय पोझीशन आहे!! दोन हत्ती शेवटच्या पट्टीत आहेत प्यादे ई ६ वर थ्रेट करते आहे पांढरा हत्ती सातव्या पट्टीत आहे आणि काळ्याकडे एक पासपॉन आहे!! खतरनाक. तालच्या डावांची आठवण व्हावी असे चित्र!!