Skip to main content

आनंद - कार्लसन - डाव ४

लेखक आनन्दा यांनी बुधवार, 13/11/2013 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
चौथा डाव सुरू झालाय -- हा डाव निकाली निघणार असे वाटतेय.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 31187
प्रतिक्रिया 251

प्रतिक्रिया

chess इकडे थेट प्रक्षेपण बघु शकता.

आह ! बर्लिन डिफेन्स !! आजचा डाव निकाली पहायला मिळावा :)

इथे यायला सज्ज झालो तर आल्रेडी कापाकापी झाली. दहा मिनिटातच डाव रूक-एन्डिंग कडे जाणार हे निश्चित झाले.

धक्कादायक रित्या आनंदने पहिल्या तेरा खेळ्यातच दोन्ही उंटांचा बळी दिलाय. बेट्याने नक्की काय प्लान केलंय कळंत नाही. आता कार्लसनचा राजा प्याद्यांच्या कोटात सुरक्षित राहू शकतो. उंटाविना तो भेदणे खूप अवघड होऊन बसते.

In reply to by आनन्दा

कार्ल्सन्ने ते प्यादे घेतले ...मलातरी हे रीकव्हर करायची संधी दिसत नाहीये ... पण आनंद लई प्रॅक्टीस करुन आला असणार त्या शिवाय असे सहजासहजी प्यादे देणार नाही .... This is becoming exciting now !!

In reply to by आनन्दा

आनंद ने चुक केलि अन त्याचा परिणाम भोगतोय, अजुन एक चूक आणि डाव कार्लसन च्या घशात

आनंदचे हत्ती आधीच अ‍ॅक्ट्व झालेत तर कार्लसनचे दोन्ही हत्ती अजूनही हललेले नाहीत. (अर्थात राजा बी-२ ला आणून तो जागीच त्यांना कनेक्ट करू शकतो) पण तरीही आनंदकडे मध्यपटावर थोडा अधिक कंट्रोल राहतोय. पण अजून मला उंट गमावल्याने दूरवरच्या मार्‍याची क्षमता गमावली असे वाटते. उंटाचे नुस्ते अस्तित्वही प्रतिस्पर्ध्याच्या प्याद्यांना जागीच खिळवून ठेवण्यास पुरेसे असते. आता आनंदला तो फायदा नाही. पण त्याबदल्यात एक पुरी पट्टी ताब्यात घेऊन आणि हत्ती डबल करून आनंद वेगळा मार्ग निवडतोय.

चौथ्या डावाचे समालोचन सुरु केल्याबद्दल आनंदा आणि तुम्हा सर्वांचे अभिनंदन! डाव एकदम तलवारी काढून कापाकापीनेच सुरु झालाय. पहिल्या सतरा खेळ्यातच लै हाणामारी झालीये.

In reply to by रमताराम

मागे पडल्याचा आनंद कसा फायदा उठवतो हे पहायचे.

अडकवायला बघतोय. मॅग्नुसकडे मस्त कनेक्टेड प्याद्यांचे दोन सेट्स आहेत आणि आनंद्कडे विस्कळित प्यादी आहेत पण अतिशय रोमांचकारी अवस्थेत डाव आलेला आहे.

एवढ्या जोरावर आनंद काय करतो हे बघायचे. अत्यंत अचूक कॅलक्यूलेशन्स महत्त्वची आहेत.

मोहरे बघता अ‍ॅडव्हांटेज टू कार्ल !! आनंदचे काहीतरी प्लानिंग असावे ..जे फिसकटले आहे असे डावा वरून दिसतय

आता घोडा सी २ मग उंट एफ ५, जी प्यादेपुढे मग उंट सी ८ असा जाणार काय?

In reply to by आनन्दा

त्प ऑलरेडी पॉन डाऊन आहे ... जर कॅनसलेशन केले तर अजुन खोलात जाईल :( आज कार्लसन्ची बाजु जड दिसतेय मला .... अनंदला ड्रॉसाठी झगडावे लागणार

आता एफ ५ असा घोड्यावर हल्ला होणार आहे. राजाकडची प्यादी रोलर कोस्टर मोड मधे आहेत कॅलक्यूलेशन्स!!!!!

घोडा थेट सी-८ ,मधे नेऊन सुरक्षित ठेवला कार्लसनने. त्यासाठी हत्तींचे कनेक्शन बंद केले नि ए पट्टीतला हत्ती पुन्हा बंद केला. त्याच्या दृष्टीने उंट फारच महत्त्वाचा आहे असे दिसते.

उंट मिळवला पाहिजेच !! सध्या आनंदचा घोडा ओव्हर्लोड झालाय .. एक पॉन डाउन पण आहे .. :(

तर एफ प्यादे ५ वर मग काळा घोडा एच ४, हत्ती एफ १ आणि पांढरे एफ प्यादे पुढे सरकते मग घोडा ई ५ वर जाऊन बसला तर एफ प्याद्याचा वजीर होणे थांबू शकत नाही

आहे असे दिसते. जरी आनंदच्या राजच्या बाजूला डेडलॉक परिस्थिती उद्भवली तर तो ए पट्टीतील प्यादे पुढे ढकलायला सुरुवात करून आनंदलाच डेडलॉक तोडणारी, धोका पत्करणारी मूव करायला भाग पाडू शकेल. आनंदची वजीराची बाजू कमकुवत झाल्याचा हा थोडा तोटा ठरेल. आनंद उजवीकडे परिस्थिती सतत हलती ठेवेल अशी आशा करू या.

एफ ५ प्याद्याला पर्याय नाही मग् घोडा एच४ वर येणार?

आता पहिली बुचकळ्यात पाडणारी खेळी आली. आता काहीतरी नवे पहायला मिळेल अशी आशा करू या.

आतापर्यंत निवांत तंगड्या पसरून निवांत बसलेला मॅग्नस आता कपाळाला हात लावून बसलाय, आनंद तसा निवांत आहे पहिल्यापासून. पण इकडे 'हुदिनी' काळ्याला भरपूर अ‍ॅडवांटेज आहे म्हणतोय. इंट्रेस्टिंग.

In reply to by रमताराम

याने असाच गेम (बर्‍याच खेळी सारख्या) खेळला होता त्याचे चांगले अ‍ॅनालिसीस आनंद टीमने केलेले दिसते हे नक्की. मॅग्नुस विचारात पडलाय हे नक्की.

In reply to by रमताराम

हम्म! बिचार्यावर ड्रो ची नामुष्की येतेय वाटते

एफ ५ वरील प्यादे वल्नरेबल आहे तिथे पीस कॅन्सल करुन हत्ती मोकळा करुन घेता येईल कार्ल्याला .