✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आनंद - कार्लसन डाव - ३

च
चतुरंग यांनी
Tue, 11/12/2013 - 15:20  ·  लेख
लेख
तिसरा डाव सुरु झालाय. पुन्हा कार्लसनने रेटी सदृश खेळ्यांनी सुरुवात केली आहे परंतु तिसर्‍या खेळीला पहिल्या डावापासून फारकत घेतलीये. डाव खेळून बघता येईल.
Play Online Chess
[Event "Anand-Carlsen World Championship"]
[Site "Chennai, India"]
[Date "2013.11.12"]
[Round "3"]
[White "Magnus Carlsen"]
[Black "Viswanathan Anand"]
[Result "1/2-1/2"]
[WhiteELO "2870"]
[BlackELO "2775"]

%Created by Caissa's Web PGN Editor
1. Nf3 d5 2. g3 g6 3. c4 dxc4 4. Qa4+ Nc6 5. Bg2 Bg7 6. Nc3 e5 7. Qxc4 Nge7
8. O-O O-O 9. d3 h6 10. Bd2 Nd4 11. Nxd4 exd4 12. Ne4 c6 13. Bb4 Be6 14. Qc1
Bd5 15. a4 b6 16. Bxe7 Qxe7 17. a5 Rab8 18. Re1 Rfc8 19. axb6 axb6 20. Qf4
Rd8 21. h4 Kh7 22. Nd2 Be5 23. Qg4 h5 24. Qh3 Be6 25. Qh1 c5 26. Ne4 Kg7 27.
Ng5 b5 28. e3 dxe3 29. Rxe3 Bd4 30. Re2 c4 31. Nxe6+ fxe6 32. Be4 cxd3 33.
Rd2 Qb4 34. Rad1 Bxb2 35. Qf3 Bf6 36. Rxd3 Rxd3 37. Rxd3 Rd8 38. Rxd8 Bxd8
39. Bd3 Qd4 40. Bxb5 Qf6 41. Qb7+ Be7 42. Kg2 g5 43. hxg5 Qxg5 44. Bc4 h4 45.
Qc7 hxg3 46. Qxg3 e5 47. Kf3 Qxg3+ 48. fxg3 Bc5 49. Ke4 Bd4 50. Kf5 Bf2 51.
Kxe5 Bxg3+ 1/2-1/2
आणि तूनळीवरती या डावाचं फार सुरेख विश्लेषण आलंय तेही मदतीला घ्या! एन्जॉय माडी!!:) http://www.youtube.com/watch?v=D4mRcBHdlfw&list=PL9JCz2Gsbqe71hz5eKe9mVDWyKU2arBvR&index=1

Book traversal links for आनंद - कार्लसन डाव - ३

  • ‹ आनंद - कार्लसन - डाव २
  • Up
  • आनंद - कार्लसन डाव ५ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
35723 वाचन

💬 प्रतिसाद (228)

प्रतिक्रिया

दरवेळी नवी ओपनिंग करण्याच्या

रमताराम
Tue, 11/12/2013 - 15:22 नवीन
दरवेळी नवी ओपनिंग करण्याच्या आपल्या परंपरेला छेद देऊन कार्लसनने पहिल्या सामन्यातील रेटी'चाचा वापर केलाय. त्याने ऑफर केलेले सी प्यादे चटकन स्वीकारून आनंदने त्याला थोडा गोंधळात टाकलाय. वजीराला पुढे आणून आनंदचे प्यादे टप्प्यात राखून कार्लसनने पॉप्युलर पद्धतीकडे डाव वळवलाय.
  • Log in or register to post comments

नमस्कार ररा!

चतुरंग
Tue, 11/12/2013 - 15:24 नवीन
आंतर्जालावर तुमचं स्वागत आहे! :) रं.गा. पंडित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

पहिल्या ६ खेळ्या झाल्यात

चतुरंग
Tue, 11/12/2013 - 15:23 नवीन
दोघांचं एकेक प्यादं गेलंय. मोहोरी विकसित होताहेत
  • Log in or register to post comments

मस्त.

प्रचेतस
Tue, 11/12/2013 - 15:25 नवीन
मस्त. मजा यायला लागलीय समालोचन वाचायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/12/2013 - 15:28 नवीन
वाचतोय आणि पाहतोय. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आनंद

चतुरंग
Tue, 11/12/2013 - 15:26 नवीन
कार्लसनकडे बघून त्याच्या प्रतिक्रियांचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करतोय! एरवी फार क्वचित तो मला असा दिसलाय. दोघांचे किल्लेकोट झाले. राजाच्याच बाजूला झालेत.
  • Log in or register to post comments

परत एकदा रेटी

प्रसाद गोडबोले
Tue, 11/12/2013 - 15:28 नवीन
स्लो ...लेन्दी गेम्स अगैन !!
  • Log in or register to post comments

कार्लसनचा इरादा

चतुरंग
Tue, 11/12/2013 - 15:29 नवीन
सी१ वरुन जी ५ वरती घेऊन वजिरापुढचा घोडा पिन करायचा विचार आहे असे वाटते. आनंद कार्लसनच्या वजिरावर हल्ला करेल का काही दुसरे खेळेल?
  • Log in or register to post comments

वजिराला मागे रेटण्याची संधी

सुहासदवन
Tue, 11/12/2013 - 15:38 नवीन
बिशप ला पुढे नेउन मग बिशप टू बिशप एक्सचेंज आणि नंतर चेक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

एच ६

चतुरंग
Tue, 11/12/2013 - 15:31 नवीन
जी५ वरती येऊ बघणार्‍या उंटाला किंवा घोड्याला रोखले
  • Log in or register to post comments

बहुधा

केदार-मिसळपाव
Tue, 11/12/2013 - 15:35 नवीन
उंटाला रोखले. पहिलीच वेळ आहे धावते बुद्धीबळ विश्वचषक स्पर्धा बघण्याची..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

आनंदची पुढची खेळी

चतुरंग
Tue, 11/12/2013 - 15:34 नवीन
बी ई ६ असेल बहुदा पांढर्‍या वजिराला हाकलून लावायला. आता कार्लसन काय खेळतोय? उंटाची प्रगती करायला त्याला दोन वाटा आहेत. बी डी २ किंवा बी प्यादे सरकवून कर्णातून उंट काढ्णे (ती शक्यता मला कमी वाटते कारण प्याद्याची एक मूव वाया जाते.)
  • Log in or register to post comments

यावेळी एक विशेष

चतुरंग
Tue, 11/12/2013 - 15:39 नवीन
जाणवलेला म्हणजे कोणीच पाणी, ज्यूस, चहा/कॉफी इ. चे ग्लास त्यांच्या टेबलावर आणलेले दिसत नाहीये. फक्त ब्रेकरुमला जाऊनच ते घ्यायचे आहे की काय? असा काही नियम झाल्याचे ऐकले नाहीये.
  • Log in or register to post comments

पाणी पित आहेत ना..

केदार-मिसळपाव
Tue, 11/12/2013 - 15:44 नवीन
बी-डी२ खेळला की कार्ल्सन..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

नाही

रमताराम
Tue, 11/12/2013 - 15:45 नवीन
फक्त ब्रेकरुमला जाऊनच ते घ्यायचे आहे की काय? >> नाही. परवा आनंदचा फेवरिट ग्रीन टी आला होता त्याच्या साठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

ओक्के!

चतुरंग
Tue, 11/12/2013 - 15:48 नवीन
मग हरकत नाही. माझ्या नजरेतून सुटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

जीवघेणा वेळ लावतोय कार्लसन.

प्रचेतस
Tue, 11/12/2013 - 15:41 नवीन
जीवघेणा वेळ लावतोय कार्लसन. बाकी मागच्या स्पॉन्सरशिप बोर्डावर जयललिताचा फोटू बघून डोळे पाणावलेत.
  • Log in or register to post comments

+१

प्रसाद गोडबोले
Tue, 11/12/2013 - 15:43 नवीन
+१ =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अम्मा, अम्मा म्हणायचं!

चतुरंग
Tue, 11/12/2013 - 15:44 नवीन
जयललिथा नाही! तंबी!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हाहा

प्रचेतस
Tue, 11/12/2013 - 15:45 नवीन
=)) अगदी अगदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

अतिअवांतर

बॅटमॅन
Tue, 11/12/2013 - 16:46 नवीन
तंबी देणे हा वाक्प्रचार अशातूनच आला असेल काय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

उंट डी२

चतुरंग
Tue, 11/12/2013 - 15:42 नवीन
कार्लसनचा उंट पुढे सरकला. आता बहुदा बी ई६ खेळणार आनंद, मग वजीर ए ४ असा वजीर मागे जाईल का?
  • Log in or register to post comments

बी ई ६ मलाही हेच वाटत आहे

प्रसाद गोडबोले
Tue, 11/12/2013 - 15:44 नवीन
बी ई ६ मलाही हेच वाटत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

दोघेहि गेले ब्रेक रूम ला..

आनन्दा
Tue, 11/12/2013 - 15:43 नवीन
आत आनंद त्याला सांगत असेल "मजा आली की नाही" :) आमच्या पँट्री सारखे..
  • Log in or register to post comments

अरे वा बरेच लोक लाईव

चतुरंग
Tue, 11/12/2013 - 15:45 नवीन
काँएंटरीत सहभागी झालेले बघून अतिशय आनंद झालाय. सगळ्यांचे स्वागत आहे!
  • Log in or register to post comments

श्रेय तुम्हाला

सुहासदवन
Tue, 11/12/2013 - 15:47 नवीन
आम्हा सगळ्यांना ह्या खेळाकडे वळविण्याच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

आज आनंदने

चतुरंग
Tue, 11/12/2013 - 15:47 नवीन
कपाळाला गंध लावले आहे का? तुम्हाला कोणाला दिसतंय का मलाच दिसतंय?
  • Log in or register to post comments

आज नाही

रमताराम
Tue, 11/12/2013 - 15:52 नवीन
बरेचदा असते, दिसेल न दिसेल असे. छेन्नैचा अन्नाए तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

येस!

चतुरंग
Tue, 11/12/2013 - 16:00 नवीन
आणि श्रद्धाळू आहे. तो मन शांत करण्यासाठी त्याची प्रार्थना सुद्धा म्हणतो! रंगमुरुगन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

वा वा

केदार-मिसळपाव
Tue, 11/12/2013 - 15:49 नवीन
आता मार लेका घोडा.. मुख्य घोडा गेला तर पुढे आक्रमण कसा करशिल?
  • Log in or register to post comments

आणि

केदार-मिसळपाव
Tue, 11/12/2013 - 15:50 नवीन
घोडा मारला तर वजीरावजीर्..प्यादे शाबुत... ह्म्म्म
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केदार-मिसळपाव

ई-५

रमताराम
Tue, 11/12/2013 - 15:49 नवीन
आनंदचे ई-५ प्यादे मस्त बसले आहे. त्याला सपोर्ट न देण्याचा निर्णय घेऊन आनंदने कार्लसनला ते घेण्यात एक मूव दवडण्याचे आव्हान दिले आहे. नाही घेतले तर कार्लसनचे काही मोहर्‍यांच्या हालचालीवर मर्यादा पडतात. टु बी ऑर नॉट टु बी.
  • Log in or register to post comments

हं!

चतुरंग
Tue, 11/12/2013 - 15:51 नवीन
घोडा उडी मारुन डी४ वर टाकलान की. आनंद आक्रमक खेळतोय. आता घोड्यांची मारामारी होईल का? पंढर्‍या वजिराला अजूनत्री त्याने दुर्लक्षित केले आहे. आनंदचा काहीतरी टॅक्टिकल डाव दिसतोय मला!
  • Log in or register to post comments

हम्म

रमताराम
Tue, 11/12/2013 - 15:55 नवीन
ई पट्टीतले प्यादे घोड्यांच्या मारामारीनंतर एक फळी पुढेही सरकते आणि वजीराच्या पाठिंब्याखाली येते. म्हणजे मागची प्यादी न हलवता हे प्यादे वाचलेच पण आणखी एक फळी पुढे जात कार्लसनची डोकेदुखी आणखी वाढवते. ते लवकरात लवकर उचलणे त्याला अत्यावश्यक होऊन बसते. दुर्लक्ष केलेले प्यादे अचानक महत्त्वाचे होऊन बसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

बरोबर!

चतुरंग
Tue, 11/12/2013 - 16:05 नवीन
शिवाय त्या प्याद्याने डी प्याद्याचा मार्ग रोखला शिवाय आता पांढरा घोडा ई४ वर आल्याने ई प्यादे सुद्धा काहीकाळ मागासलेले ठेवावे लागणार कार्लसनला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

एक्सलंट लाईन

रमताराम
Tue, 11/12/2013 - 16:05 नवीन
हे प्यादे खूपच कामात येणार. जी-७ मधला उंटाच्या कर्णात असल्याने भक्कम तर बसलेच पण त्याच बरोबर उंटाचा कर्ण मोकळा करण्याचे स्वातंत्र्य आता आनंदकडेच असणार आहे. पुढील पटावर हे प्यादे पुढे टाकून प्याद्याने एका मोहर्‍यावर नि उंटाने दुसर्‍या मोहर्‍यावर मोर्चा लावण्याची परिस्थिती निर्माण करणे त्याला शक्य होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

जाता जाता

प्रसाद गोडबोले
Tue, 11/12/2013 - 15:51 नवीन
हायला ही तानिया माझ्यापेक्षाही लहान आहे ... http://en.wikipedia.org/wiki/Tania_Sachdev चला परत एकदा कॉम्पीटेटीव्ह् चेस मधे उतरायला इन्सेन्टीव्ह मिळाला ;)
  • Log in or register to post comments

अगदी अगदी!

चतुरंग
Tue, 11/12/2013 - 15:55 नवीन
घ्या भाग घ्या! ;) रंगा सचदेव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मज्जा येते आहे!!!

अविनाश पांढरकर
Tue, 11/12/2013 - 15:51 नवीन
पहिलीच वेळ आहे धावते बुद्धीबळ विश्वचषक स्पर्धा बघण्याची..
  • Log in or register to post comments

घोड्याची चाल करून कार्लसनला

प्रचेतस
Tue, 11/12/2013 - 15:52 नवीन
घोड्याची चाल करून कार्लसनला गोंधळात पाडलेले दिसतेय आनंदने.
  • Log in or register to post comments

नाईट नाईट कॅन्सलेशन मग

प्रसाद गोडबोले
Tue, 11/12/2013 - 15:54 नवीन
नाईट नाईट कॅन्सलेशन मग वजीरावजीरी झाली तर परत डाव ड्रॉ कडे सरकेल ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ओह्ह

प्रसाद गोडबोले
Tue, 11/12/2013 - 15:59 नवीन
आनंदने वजीरावजीरी केली नाही !! आनंद इस लुकिंग फॉर विन ...आय गेस्स
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

घोड्यावरुन आक्रमक वाटतोय आनंद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/12/2013 - 15:54 नवीन
कार्लसन सारखं डोकं धरुन बसतो. वरीजनल आनंदच्या खेळीचं ओझं असेल का त्याला ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

नाही हो प्राडॉ

चतुरंग
Tue, 11/12/2013 - 15:56 नवीन
डोक्यात अनेक डाव सुरु असतात त्यांच्या. एकाच वेळी साधारण पाचपन्नास डावांचे अ‍ॅनालिसिस एकेका खेळीसाठी सुरु असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्सही हं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/12/2013 - 15:58 नवीन
+१ -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

घोड्याची चाल करून

केदार-मिसळपाव
Tue, 11/12/2013 - 15:53 नवीन
कार्ल्सन च्या वजीरावर हल्ला करणार कि काय आनंद?
  • Log in or register to post comments

दोघांची घड्याळे बरोबरीत आहेत

चतुरंग
Tue, 11/12/2013 - 15:54 नवीन
दोघांनी १० खेळ्यांना साधारण २३ मिनिटे प्रत्येकी घेतली आहेत.
  • Log in or register to post comments

घोडा मारला

चतुरंग
Tue, 11/12/2013 - 15:58 नवीन
कार्लसनने. प्याद्याने घोडा घेतला. छान आता घोडा हलवणे भाग आहे बहुदा ई४ वरती. आणि मग आनंद बहुदा उंट बाहेर आणेल ई ६ वरती.
  • Log in or register to post comments

घोडे मारले..

केदार-मिसळपाव
Tue, 11/12/2013 - 15:59 नवीन
पन प्यादे पुढे?
  • Log in or register to post comments

एपिक प्रपोर्शनचा सामना आहे राव हा!

चतुरंग
Tue, 11/12/2013 - 16:03 नवीन
मला सामना बघताना एवढी प्रचंड उत्सुकता कधी वाटली नव्हती. आनंद्-टोपलोव किंवा आनंद्-गेल्फंड्च्या वेळी सुद्धा! यावेळी मात्र मी जाम उत्सुक आहे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा