मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आनंद - कार्लसन डाव - ३

चतुरंग · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
तिसरा डाव सुरु झालाय. पुन्हा कार्लसनने रेटी सदृश खेळ्यांनी सुरुवात केली आहे परंतु तिसर्‍या खेळीला पहिल्या डावापासून फारकत घेतलीये. डाव खेळून बघता येईल. आणि तूनळीवरती या डावाचं फार सुरेख विश्लेषण आलंय तेही मदतीला घ्या! एन्जॉय माडी!!:) http://www.youtube.com/watch?v=D4mRcBHdlfw&list=PL9JCz2Gsbqe71hz5eKe9mVDWyKU2arBvR&index=1

वाचने 35758 वाचनखूण प्रतिक्रिया 228

कपिलमुनी Tue, 11/12/2013 - 18:48
डी ३ वर डोळा आहे कार्ल भौ चा !! आणि आनंद भौ नी हत्ती चा वापर करावा अशी आमची इछा आहे

कपिलमुनी Tue, 11/12/2013 - 18:50
पांढरा उंट असताना सर्व प्यादी पांढर्ञा घरात आहे .. ही कदाचित डोकेदुखी होइल ..आणि आता सेटल करायला वेळ / मूव्ह नाहियेत

कपिलमुनी Tue, 11/12/2013 - 18:52
पटावर कुरुक्षेत्र झाला .. आनं दच्या राजाची पोझिशन वीक आहे .. काळजी वाटू लागली आहे..

आत्ता सायटीवर जाऊन बघितले तर दोघेही शेकहँडकरून उठताना दिसले लाईव्ह स्ट्रीम मधे. तेवढेच आपल्याला ड्रॉ झाल्यासारखे वाटले.

रमताराम Tue, 11/12/2013 - 19:09
अर्र. शेवटीही आनंदने उंट-प्याद्याचे कॉम्बिनेशन न सोडत राजा पुढे आणत गेम प्रेस करायला हवा होता. मॅग्नस काहीही करून त्या दोघांना हात लावू शकत नव्हता. जर आनंदच्या राजाने मॅग्नसचे प्यादे मटकावण्याचा प्रयत्न करायला हवा होता. अर्थात इथे पुन्हा तीन रिपीट मूवची शक्यता ९९.९९% होती. पण आनंदने झटपट ड्रॉ घेतला. बहुत मजा आया आज.

चतुरंग Tue, 11/12/2013 - 19:13
आनंद तोंडि भराभर पोझीशन्स सांग्तोय की काय काय झाले असते बोर्ड न बघताच, शेवटी ती मुलाखत घेणारी म्हणाली जरा बोर्डवर दाखव म्हणून!!! =)) =))

रमताराम Tue, 11/12/2013 - 19:16
मॅग्नस गॅरीच्या सपोर्टला काही फारशी किंमत देत नाही दिसतंय. 'जस्ट अ डायमेन्शन' म्हणतोय. गॅरीला यावर काय वाटतं कुणीतरी विचारलं पाहिजे.

अमेय६३७७ Tue, 11/12/2013 - 19:27
प्रश्नांचा दर्जा भंगार. कास्पारोवबाबत एकदा सूचक उत्तर ऐकल्यावर पुन्हा तेच उगाळत बसले काही पत्रकार. आणि तो टिपीकल चेन्नै अ‍ॅक्सेंटवाला... देअर वॉज ब्लड ऑन द बोर्ड म्हणे.

चतुरंग Wed, 11/13/2013 - 11:20
कार्लसन चमत्कारिक स्थिती पटावर निर्माण करायला मागेपुढे बघत नाही. बेधडक खेळत जातो. त्याची इंट्यूशन अतिशय सशक्त असल्याने कोणत्यावेळी रेटून खेळायचं आणि कोणत्यावेळी 'चड्डीत राहायचं' याचे त्याचे आडाखे पक्के आहेत! त्याच्या या बेभरवशी खेळण्याच्या शैलीमुळे तुमचा घरचा अभ्यास किती उपयोगी पडेल हे नक्की सांगता येत नाही. महाभयानक अशा स्मरणशक्तीमुळे त्याला अनेक डाव आठवू शकतात आणि त्यात वापरलेल्या चाली प्रतिचाली तो इंप्रोवाईज करुन वापरु शकतो. प्रतिस्पर्ध्याला जराही सैल पडण्याची उसंत तो देत नाही, एकदम टाईटरोप वॉक! एखादी जरी चूक झाली तरी तो निर्दयपणे घुसून ते भगदाड मोठे करायला बघतो. कालच्या डावात उंट आणि वजीर जेव्हा पटाच्या मध्यात ठाण मांडून बसले होते तेव्हा ४-५ खेळ्या आनंदची धडगत नव्हती! परंतु आनंदची खासियत अशी आहे की समोरच्याचा खेळ जितका उंचावेल तितका तो स्वत्:चा खेळ उंचावर नेऊ शकतो, ही अ‍ॅडॅप्टिबिलिटी त्याचे सामर्थ्य आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की त्याचे बुद्धीबळाचे ग, म, भ, न अत्यंत पक्के आहेत. समोरच्याने कितीही विचलित करणारा खेळ केला तरी हा आपले बेसिक्स कधीही सोडत नाही (क्रिकेटच्या भाषेत, त्याला त्याचा ऑफस्टंप कुठे आहे हे बरोब्बर माहीत असतं!) त्याला धीर पुष्कळ आहे. त्यामुळे वाट बघू शकतो, उतावळा होत नाही. आणि त्याचा अनुभव तर प्रचंड आहे. ओपनिंग मधले त्याचे प्रभुत्व जगात अव्वल दर्जाचे आहे. त्याचीही मेमरी भयानक आहे. तिसर्‍या डावात मॅग्नुस करेल त्या प्रत्येक खेळीला आनंदने सडेतोड उत्तर शोधून काढले इतकेच नव्हे तर मॅग्नुसचा वजीर जेव्हा, त्याने स्वतःच, एच १ वरती अडकवून घेतला होता तेव्हा आनंद जिंकू शकेल अशी परिस्थिती निर्माण होता होता राहिली. एकूण कालचा डाव हातघाईवर आलेला होता पण तरिही बाजू तुल्यबळ राहिल्या. इथून पुढचे सगळे डाव मात्र श्वास रोखून धरायला लावणारे होतील अशी दाट शक्यता वाटते. अतुलनीय बुद्धीबळ कौशल्य आपल्याला बघायला मिळेल असा विश्वास वाटतो!

नुसतं वाचून काहीही कळत नाहीये, व्हिज्युअलाइज पण होत नाहीये. लि़ंका हापिसात चालत नाहीयेत. पण भारी मजा येते आहे. सर्व खेळ नंतर यु ट्युब वरुन पहातो.. लै इंट्रेस्ट तयार केलात. धन्यवाद!!

सुहासदवन Fri, 11/15/2013 - 12:45
जबरदस्त ओपनिंग आणि बर्फासारखा संयम असून देखील, दुसऱ्या आणि तिसऱ्या डावात एकदा-दोनदा जिंकण्याची पटावर स्थिती असून देखील आनंदने डाव जिंकण्यात स्वारस्य दाखवले नाही. त्याच वेळी कार्लसन मात्र अवघडलेल्या स्थितीतून सही सलामत बाहेर पडून डाव बरोबरीत सोडवून गेला.