Skip to main content

आनंद - कार्लसन सामना - डाव १

लेखक चतुरंग यांनी शनिवार, 09/11/2013 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवार, दि, ९ नोवेंबर २०१३ आज बुद्धीबळ विश्वविजेतेपदाचा पहिला सामना सुरु होतोय. प्रचंड प्रसिद्धी मिळालेल्या या शतकातल्या सामन्याला सुरुवात होते आहे. चला आस्वाद घेऊयात! कार्लसन येऊन बसलाय आनंद अजून आलेला नाही. एकच मिनिट राहिलं आहे. कार्लसन कोणती मूव खेळणार? प्रत्येक डावात वेगळी पहिली मूव खेळण्यासाठी तो प्रसिद्ध आहे!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 20841
प्रतिक्रिया 89

प्रतिक्रिया

दोन्ही खेळाडूंनी एकमेकांकडे बघितलेले नाही. एफ एफ ३ - कार्लसनने रेटी ओपनिंग ने सुरुवात केली डी ५ - आनंद

असे लगेच दिसते आहे. खेळ्या बर्‍याच पटापट होताहेत.पहिल्या सहा खेळ्या झाल्या आहेत. दोघांचे उंट कर्णात आलेत. सहाव्या खेळीला मॅग्नुस बी ३ खेळलाय.

वातावरणातला ताण अजूनही सैलावला नाहीये,कार्लसन उठून गेला होता परत आल्यावर त्याने उंट बी २ मधे सरकवलाय

आनंदची तयारी चांगली आहे तो सुद्धा फार वेळ घेत नाहीये. आनंदचा उंट एफ ५ मधे आला. डावाच्या मध्यातल्या चार चौकोनांवर ताबा मिळवण्याची धडपड सुरु आहे. एक नक्की आहे की आधीच्या जगज्जेतेपदापेक्षा यावेळी भरपूर वेगवेगळी काँबिनेशन्स बघायला मिळतील.

In reply to by रमताराम

इथे ती बया नाही बक बक करायला. फक्त विडीओ नाही, बोर्ड लाईव पाहता येईल.

नंतर काळ्याचा घोडा डी७ मधे आलाय. वजिराचा प्याद्याशी जोर तुटलाय. कार्लसनने डी ५ प्याद्यावर हल्ला चढवलाय. आनंदने सी४ प्यादे घेतले.

कडेचे प्यादे घेणे हे थोडे इन्फीरिअर असते कारण डावाच्या मध्याचे नियंत्रण कमी होते. परंतु विशीची मोहोरी चांगली विकसित आहेत त्यामुळे हा धोका बहुदा विशीने घेतला असावा.

बी ६ मधे हलवलाय. डावाच्या मध्यातलं नियंत्रण हा आता कळीचा मुद्दा आहे. कार्लसन कोणती खेळी करणार? सी ५ खेळला तर घोडा डी५ मधे ताकदवान पोस्टवर येईल त्यामुळे ती शक्यता कमी आहे. घोडा ई५ खेळेल का?

नंतर आनंदचा घोडा बी४ वरती येऊन पाढर्‍याच्या काळ्या उंटावर आलाय

वजीर ब ३ ला फोर्स्ड कॅन्सलेशन आहे ... आणि मग क्रॉस कलरड बिशप ड्रॉईश जाईल असे वाटते

In reply to by प्रसाद गोडबोले

आनंद दोन उंटांचा खेळ ठेवायचा प्रयत्न करतोय. कारण जितका डाव ओपन तितकी उंटांची मोबिलिटी जास्त!

डावाची सुरुवात आणि मध्य यातली सीमारेषा धूसर झालेली समजते आहे. अचानक अकराव्या खेळीलाच डाव मध्यात आलाय. मॅग्नुस काय खेळणार उंट मागे घेणार का?

In reply to by प्रसाद गोडबोले

आता आनंद बहुदा वजीर ए ५ खेळून घोड्यावर हल्ला करेल असे वाटते

In reply to by चतुरंग

पण मग वजीर डावा बाहेर जाईल ना ? मी ब्लॅक असेन तर ई ५ खेळेन

वजीर ए ५ का प्यादे ई ५? वजिराची खेळी आक्रमक आहे. कारण त्यानंतर मॅग्नुसला वजीर सी२ वर किंवा बी३ वर घेऊन घोड्याला आधार द्यावा लागेल.

घोडा डी५. आता ई५ असे पांढर्‍याला उचकवले आहे. किंवा मॅग्नुस घोड्यांची मारामारी करेल का? मग प्यादे डी ५ वर येऊन घोडा सी४ मधे मस्त बसेल!

In reply to by रमताराम

मलाही असच वाटतय कारण कॅन्सलेशन केले तर पांढर्‍याच्या मध्यातील कन्ट्रोल बराच कमी होईल

घञाळे बर्‍यापैकी तोलून आहेत. मॅगुस ९ मिनिटे मागे आहे परंतु फारसे काळजीचे कारण नसावे.

नुसतं वाचून काहीच समजत नाहीये पण मजा येतीये वाचायला . सामना संपला कि समोर बोर्ड धरून शांतपणे बसेन . कीप इट अप मंडळी

In reply to by अद्द्या

रमतारामनी किंवा मी दिलेल्या दुव्यावरती. त्यावरुन बर्‍याच गोष्टी सुकर होतील. एकीकडे बोर्ड मांडून बसलात तरी चालेल!

अशा दोन प्रकारे घोड्याला सपोर्ट करता येईल. पैकी बी ३ मधे वजीर आला तर काळा घोडा ए ५ मधे जाऊन वजिरावर हल्ला करु शकतो. त्यामुळे बहुदा सी २ मधेच.

एफ-५ वरचा उंट आणि दोन घोडे यांच्या मदतीने आनंदने मॅग्नुसच्या क्षेत्रात बराच दबाव निर्माण केला आहे. सध्या तरी वजीर बी-३ ला पर्याय दिसत नाही. एक वाईल्स गेसः वजीर ए-४ हा एक धोका पत्करणारा पर्याय म्हणून पाहता येईल. घोड्यांच्या एक्स्चेंज ऐवजी, एका बदल्यात दुसरा घोडा घेऊन दुसर्‍यावरही दबाव टाकता येऊ शकेल. पुढे काय काय घडेल हे तपासून पाहतोय.

In reply to by रमताराम

आनंद घोडा बी-६ मधे आणून एकाच वेळी दुसर्‍या घोड्याला पाठिंबा नि मॅग्नुसच्या वजीराला धोका देऊ शकतो. परतीचा मार्ग धरण्याखेरीत मॅग्नुसला पर्याय नाही. पण आनंदचा घोडाही मागे फिरतो.

वजिराच्या बाजूला घुसमट झाली आहे. घोडा अडचणीच्या जागी आहे आणि वजिराशिवाय मदतीला कोणी नाही. घोड्यांची मारामारी केली तर डाव सोपा होत जातो. तो वजीर बी ३ खेळला!

In reply to by चतुरंग

माझ्यामते आनंदला थोड्ड्सं अ‍ॅडव्हान्टेज आहे ... बी ५ खेळायला हरकत नाही

In reply to by प्रसाद गोडबोले

सी ६ आयसोलेट होईल , एन्ड गेम मधे वीकनेस राहील .... बघुया आनंद काय खेळतो ते ..

सध्या तरी त्याची पोझीशन चांगली वाटते आहे (माझ्यामते जरा सरसच असावी). अर्थात ड्रॉ झाला तरी चालेल कारण पुढल्या डावात त्याची पांढरी मोहोरी आहेत त्यामुळे तो एकप्रकारे आनंदसाठी मानसशास्त्रीय विजय असेल!

In reply to by आदिजोशी

वरती लेखात उल्लेख केल्याप्रमाणे चतुरंग - Tue, 05/11/2013 - 05:34 अँड्रॉईड फोन्ससाठी अ‍ॅप्लिकेशन तयार झाले आहे आणि ते इथून उतरवून घेता येईल. माझ्या फोनवर मी घेतले आहे. चांगले वाटते आहे, अजून जास्त खेळून बघितले की जास्त समजेल. .

In reply to by रमताराम

फारच लवकर संपला डाव हे खरेच. परंतु पहिला डाव असल्याने दोघेही सावधपणे खेळले. उद्या फुलबाज्या मिळाव्यात बाबा बघायला!!

In reply to by रमताराम

सहमत. बुद्धीबळातले खूप कळते असे नाही. पण मला हा डाव फार खास नाही वाटला. ज्या प्रकारे draw झाला ते पाहून तर जगज्जेतेपदाची लढत पाहतोय असे अजिबात वाटले नाही. आता हा माझ्या अपुर्या ज्ञानाचा दोष असेल म्हणा.

In reply to by चतुरंग

बाकी कटिंग चहा मारायला तयार आहेत दोघे!! >> खी: खी: खी: त्यापेक्षा सांऽबर बाऽत खायला जातील दोघे.