✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आनंद - कार्लसन सामना - डाव १

च
चतुरंग यांनी
Sat, 11/09/2013 - 14:59  ·  लेख
लेख
शनिवार, दि, ९ नोवेंबर २०१३ आज बुद्धीबळ विश्वविजेतेपदाचा पहिला सामना सुरु होतोय. प्रचंड प्रसिद्धी मिळालेल्या या शतकातल्या सामन्याला सुरुवात होते आहे. चला आस्वाद घेऊयात! कार्लसन येऊन बसलाय आनंद अजून आलेला नाही. एकच मिनिट राहिलं आहे. कार्लसन कोणती मूव खेळणार? प्रत्येक डावात वेगळी पहिली मूव खेळण्यासाठी तो प्रसिद्ध आहे!
Play Online Chess
[Event "Anand-Carlsen World Championship"]
[Site "1:08:33-1:22:33"]
[Date "2013.11.9"]
[Round "1"]
[White "Magnus Carlsen"]
[Black "Viswanathan Anand"]
[Result "1/2-1/2"]
[WhiteELO "2870"]
[BlackELO "2775"]

%Created by Caissa's Web PGN Editor
1. Nf3 d5 2. g3 g6 3. Bg2 Bg7 4. d4 c6 5. O-O Nf6 6. b3 O-O 7. Bb2 Bf5 8. c4
Nbd7 9. Nc3 dxc4 10. bxc4 Nb6 11. c5 Nc4 12. Bc1 Nd5 13. Qb3 Na5 14. Qa3 Nc4
15. Qb3 Na5 16. Qa3 Nc4 1/2-1/2
  • आनंद - कार्लसन - डाव २
  • आनंद - कार्लसन डाव - ३
  • आनंद - कार्लसन डाव ५
  • आनंद - कार्लसन डाव ६
  • आनंद - कार्लसन डाव ७
  • आनंद - कार्लसन डाव ८
  • आनंद - कार्लसन डाव ९

Book traversal links for आनंद - कार्लसन सामना - डाव १

  • आनंद - कार्लसन - डाव २ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
20754 वाचन

💬 प्रतिसाद (89)

प्रतिक्रिया

वातावरणातला ताण असह्य होईल इतका आहे.

चतुरंग
Sat, 11/09/2013 - 15:02 नवीन
दोन्ही खेळाडूंनी एकमेकांकडे बघितलेले नाही. एफ एफ ३ - कार्लसनने रेटी ओपनिंग ने सुरुवात केली डी ५ - आनंद
  • Log in or register to post comments

सी ६ !?

प्रसाद गोडबोले
Sat, 11/09/2013 - 15:05 नवीन
सी ६ !?
  • Log in or register to post comments

दोघांची तयारी चांगली आहे

चतुरंग
Sat, 11/09/2013 - 15:08 नवीन
असे लगेच दिसते आहे. खेळ्या बर्‍याच पटापट होताहेत.पहिल्या सहा खेळ्या झाल्या आहेत. दोघांचे उंट कर्णात आलेत. सहाव्या खेळीला मॅग्नुस बी ३ खेळलाय.
  • Log in or register to post comments

तुमचं 'धावतं समालोचन'

आतिवास
Sat, 11/09/2013 - 15:10 नवीन
तुमचं 'धावतं समालोचन' उत्सुकतेने वाचतेय. कितपत समजतंय मला ते माहिती नाही :-)
  • Log in or register to post comments

विशीचा किल्लेकोट पूर्ण

चतुरंग
Sat, 11/09/2013 - 15:10 नवीन
वातावरणातला ताण अजूनही सैलावला नाहीये,कार्लसन उठून गेला होता परत आल्यावर त्याने उंट बी २ मधे सरकवलाय
  • Log in or register to post comments

इथे लैवे पहा

प्रसाद गोडबोले
Sat, 11/09/2013 - 15:14 नवीन
http://www.youtube.com/watch?v=MH_5Ko7QCi8
  • Log in or register to post comments

मस्त काम केलंत गिरिजा!

चतुरंग
Sat, 11/09/2013 - 15:17 नवीन
दुवा दिल्याबद्दल तुम्हाला दुवा! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

कार्लसन अतिशय आक्रमक खेळतोय

चतुरंग
Sat, 11/09/2013 - 15:15 नवीन
आनंदची तयारी चांगली आहे तो सुद्धा फार वेळ घेत नाहीये. आनंदचा उंट एफ ५ मधे आला. डावाच्या मध्यातल्या चार चौकोनांवर ताबा मिळवण्याची धडपड सुरु आहे. एक नक्की आहे की आधीच्या जगज्जेतेपदापेक्षा यावेळी भरपूर वेगवेगळी काँबिनेशन्स बघायला मिळतील.
  • Log in or register to post comments

उंट एफ ५

प्रसाद गोडबोले
Sat, 11/09/2013 - 15:20 नवीन
उंट एफ ५ >>> ही खेळी मला कळाली नाही , जरा डुबीयस आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

दुवे

रमताराम
Sat, 11/09/2013 - 15:21 नवीन
http://chennai2013.fide.com/live-video-streaming-alternate-server/ http://www.geekosystem.com/2013-chess-championship-live/ फिडेचा (चेन्नै) दुवा मेलाय..
  • Log in or register to post comments

थॅन्क्स

प्रसाद गोडबोले
Sat, 11/09/2013 - 15:23 नवीन
युट्युब वरची ती तानिया ची कॉमेन्ट्री डोक्याला शॉट लावतीये ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

पूर्वी मी हा सर्वर वापरत होतो. आज कनेक्ट होत नाही.

रमताराम
Sat, 11/09/2013 - 15:23 नवीन
http://www.chessdom.com/world-chess-championship-2013-live/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

आणखी एक

रमताराम
Sat, 11/09/2013 - 15:34 नवीन
http://www.chess.com/tv
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

हा

रमताराम
Sat, 11/09/2013 - 15:37 नवीन
इथे ती बया नाही बक बक करायला. फक्त विडीओ नाही, बोर्ड लाईव पाहता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

प्यादे सी ४

चतुरंग
Sat, 11/09/2013 - 15:22 नवीन
नंतर काळ्याचा घोडा डी७ मधे आलाय. वजिराचा प्याद्याशी जोर तुटलाय. कार्लसनने डी ५ प्याद्यावर हल्ला चढवलाय. आनंदने सी४ प्यादे घेतले.
  • Log in or register to post comments

मध्यातल्या प्याद्याने

चतुरंग
Sat, 11/09/2013 - 15:24 नवीन
कडेचे प्यादे घेणे हे थोडे इन्फीरिअर असते कारण डावाच्या मध्याचे नियंत्रण कमी होते. परंतु विशीची मोहोरी चांगली विकसित आहेत त्यामुळे हा धोका बहुदा विशीने घेतला असावा.
  • Log in or register to post comments

मला इथे

चतुरंग
Sat, 11/09/2013 - 15:25 नवीन
चांगले दिसते आहे http://chennai2013.fide.com/anand-carsen-game-1-live-analysis-video/
  • Log in or register to post comments

त्या

रमताराम
Sat, 11/09/2013 - 15:30 नवीन
त्या बयेचे तोंड बंद करण्याचा काही उपाय आहे का?
  • Log in or register to post comments

हा हा हा!

चतुरंग
Sat, 11/09/2013 - 15:32 नवीन
स्पीकर म्यूटवर टाका!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

आनंदने घोडा

चतुरंग
Sat, 11/09/2013 - 15:31 नवीन
बी ६ मधे हलवलाय. डावाच्या मध्यातलं नियंत्रण हा आता कळीचा मुद्दा आहे. कार्लसन कोणती खेळी करणार? सी ५ खेळला तर घोडा डी५ मधे ताकदवान पोस्टवर येईल त्यामुळे ती शक्यता कमी आहे. घोडा ई५ खेळेल का?
  • Log in or register to post comments

सी५

चतुरंग
Sat, 11/09/2013 - 15:36 नवीन
नंतर आनंदचा घोडा बी४ वरती येऊन पाढर्‍याच्या काळ्या उंटावर आलाय
  • Log in or register to post comments

उंट मागे घेतला मॅग्नुसने

चतुरंग
Sat, 11/09/2013 - 15:38 नवीन
दोघांच्या डोक्याचे एमाराय स्कॅन्स घ्यायला पाहिजेत! मेंदू गरागरा फिरत असतील आतमधे!!
  • Log in or register to post comments

वजीर बी ३

प्रसाद गोडबोले
Sat, 11/09/2013 - 15:41 नवीन
वजीर ब ३ ला फोर्स्ड कॅन्सलेशन आहे ... आणि मग क्रॉस कलरड बिशप ड्रॉईश जाईल असे वाटते
  • Log in or register to post comments

घोड्याने उंट मारुन

चतुरंग
Sat, 11/09/2013 - 15:44 नवीन
आनंद दोन उंटांचा खेळ ठेवायचा प्रयत्न करतोय. कारण जितका डाव ओपन तितकी उंटांची मोबिलिटी जास्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मी आधीच्या धाग्यात म्हटले होते तसा

चतुरंग
Sat, 11/09/2013 - 15:42 नवीन
डावाची सुरुवात आणि मध्य यातली सीमारेषा धूसर झालेली समजते आहे. अचानक अकराव्या खेळीलाच डाव मध्यात आलाय. मॅग्नुस काय खेळणार उंट मागे घेणार का?
  • Log in or register to post comments

मलातरी वाटतय की मागेच घेईल ..

प्रसाद गोडबोले
Sat, 11/09/2013 - 15:43 नवीन
मलातरी वाटतय की मागेच घेईल ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

घेतला मागे कारण तो उंट घालवून चालणार नाही

चतुरंग
Sat, 11/09/2013 - 15:48 नवीन
आता आनंद बहुदा वजीर ए ५ खेळून घोड्यावर हल्ला करेल असे वाटते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

पण मग वजीर डावा बाहेर जाईल ना

प्रसाद गोडबोले
Sat, 11/09/2013 - 15:49 नवीन
पण मग वजीर डावा बाहेर जाईल ना ? मी ब्लॅक असेन तर ई ५ खेळेन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

आहा

रमताराम
Sat, 11/09/2013 - 15:45 नवीन
फायनली.... फायनली एक साईट सापडली जिथे शांतपणे गेम पाहता येईल. http://chessbomb.com/site/
  • Log in or register to post comments

शेवटी बाँब टाकावा लागला तर!

चतुरंग
Sat, 11/09/2013 - 15:49 नवीन
बघा बघा शांतपणे बघा. ती तान्या सचदेव लै बडबड करते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

आनंदची पुढची खेळी

चतुरंग
Sat, 11/09/2013 - 15:53 नवीन
वजीर ए ५ का प्यादे ई ५? वजिराची खेळी आक्रमक आहे. कारण त्यानंतर मॅग्नुसला वजीर सी२ वर किंवा बी३ वर घेऊन घोड्याला आधार द्यावा लागेल.
  • Log in or register to post comments

एकदम वेगळीच खेळी

चतुरंग
Sat, 11/09/2013 - 15:58 नवीन
घोडा डी५. आता ई५ असे पांढर्‍याला उचकवले आहे. किंवा मॅग्नुस घोड्यांची मारामारी करेल का? मग प्यादे डी ५ वर येऊन घोडा सी४ मधे मस्त बसेल!
  • Log in or register to post comments

वजीर

रमताराम
Sat, 11/09/2013 - 15:59 नवीन
वजीर बी३ मधे येऊन बसेल बहुधा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

मलाही असच वाटतय कारण

प्रसाद गोडबोले
Sat, 11/09/2013 - 16:10 नवीन
मलाही असच वाटतय कारण कॅन्सलेशन केले तर पांढर्‍याच्या मध्यातील कन्ट्रोल बराच कमी होईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

येप

रमताराम
Sat, 11/09/2013 - 16:16 नवीन
B-3 it is.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

आता घोडा अ ५ ... प्रधानाला

प्रसाद गोडबोले
Sat, 11/09/2013 - 16:19 नवीन
आता घोडा अ ५ ... प्रधानाला हकला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

ई५ ?

प्रसाद गोडबोले
Sat, 11/09/2013 - 15:59 नवीन
ई५ ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

बाय तानिया

रमताराम
Sat, 11/09/2013 - 16:01 नवीन
बाय तानिया. प्लीज डोन्ट कम बॅक.
  • Log in or register to post comments

सूझन पोल्गर आणि रमेश येताहेत कॉमेंट्रीला

चतुरंग
Sat, 11/09/2013 - 16:01 नवीन
घञाळे बर्‍यापैकी तोलून आहेत. मॅगुस ९ मिनिटे मागे आहे परंतु फारसे काळजीचे कारण नसावे.
  • Log in or register to post comments

सुझन कोण ? जुडीथची बहीण काय ?

प्रसाद गोडबोले
Sat, 11/09/2013 - 16:03 नवीन
सुझन कोण ? जुडीथची बहीण काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

नुसतं वाचून काहीच समजत नाहीये

अद्द्या
Sat, 11/09/2013 - 16:07 नवीन
नुसतं वाचून काहीच समजत नाहीये पण मजा येतीये वाचायला . सामना संपला कि समोर बोर्ड धरून शांतपणे बसेन . कीप इट अप मंडळी
  • Log in or register to post comments

एकीकडे डाव बघत राहा

चतुरंग
Sat, 11/09/2013 - 16:10 नवीन
रमतारामनी किंवा मी दिलेल्या दुव्यावरती. त्यावरुन बर्‍याच गोष्टी सुकर होतील. एकीकडे बोर्ड मांडून बसलात तरी चालेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

हापिसात आहे

अद्द्या
Sat, 11/09/2013 - 16:12 नवीन
हापिसात आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

वजीर बी ३ किंवा वजीर सी २

चतुरंग
Sat, 11/09/2013 - 16:08 नवीन
अशा दोन प्रकारे घोड्याला सपोर्ट करता येईल. पैकी बी ३ मधे वजीर आला तर काळा घोडा ए ५ मधे जाऊन वजिरावर हल्ला करु शकतो. त्यामुळे बहुदा सी २ मधेच.
  • Log in or register to post comments

प्रधान सी २ ??

प्रसाद गोडबोले
Sat, 11/09/2013 - 16:11 नवीन
तिथे उंटाचा अटॅक आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

अरे हो!

चतुरंग
Sat, 11/09/2013 - 16:22 नवीन
ब्लंडर!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

हम्म

रमताराम
Sat, 11/09/2013 - 16:13 नवीन
एफ-५ वरचा उंट आणि दोन घोडे यांच्या मदतीने आनंदने मॅग्नुसच्या क्षेत्रात बराच दबाव निर्माण केला आहे. सध्या तरी वजीर बी-३ ला पर्याय दिसत नाही. एक वाईल्स गेसः वजीर ए-४ हा एक धोका पत्करणारा पर्याय म्हणून पाहता येईल. घोड्यांच्या एक्स्चेंज ऐवजी, एका बदल्यात दुसरा घोडा घेऊन दुसर्‍यावरही दबाव टाकता येऊ शकेल. पुढे काय काय घडेल हे तपासून पाहतोय.
  • Log in or register to post comments

एक शक्यता

रमताराम
Sat, 11/09/2013 - 16:15 नवीन
आनंद घोडा बी-६ मधे आणून एकाच वेळी दुसर्‍या घोड्याला पाठिंबा नि मॅग्नुसच्या वजीराला धोका देऊ शकतो. परतीचा मार्ग धरण्याखेरीत मॅग्नुसला पर्याय नाही. पण आनंदचा घोडाही मागे फिरतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

मॅग्नुसच्या

चतुरंग
Sat, 11/09/2013 - 16:17 नवीन
वजिराच्या बाजूला घुसमट झाली आहे. घोडा अडचणीच्या जागी आहे आणि वजिराशिवाय मदतीला कोणी नाही. घोड्यांची मारामारी केली तर डाव सोपा होत जातो. तो वजीर बी ३ खेळला!
  • Log in or register to post comments

दोन झटपट

रमताराम
Sat, 11/09/2013 - 16:23 नवीन
अपेक्षित खेळ्या.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा